संतुष्टतेत विश्राम करणे म्हणजे निर्वाण


बेंगलोर, १० फेब्रुवारी


प्रश्न : गुरुजी निर्वाण म्हणजे काय? तुम्ही आम्हाला आत्ताच देऊन टाका, हे सर्वात चांगले आहे. 
श्री श्री रवि शंकर : निर्वाण म्हणजे आपल्यामध्ये समतोल आणणे आणि आपल्या इच्छा आकांक्षामध्ये अडकून न पडणे . इच्छा म्हणजे आपल्यातली एक कमतरता आहे, एक अभाव आहे. जेंव्हा तुम्ही म्हणता की मला काहीच नको आहे , मी संतुष्ट आहे , म्हणजे निर्वाण होय. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमची कर्तव्ये सोडून द्यावीत. तुम्ही तुमची कर्तव्ये नीट पार पाडत असता  आणि तरीही तुम्ही तुमच्या स्वतःच्या बरोबर असता. आणि आत्मा साक्षात्काराची लालसा धरणे म्हणजे साक्षात्कारात अडथळा आणणे होय. 
सगळ्या भावना ह्या व्यक्ती , वस्तू आणि परिस्थिती ह्यातच बांधलेल्या असतात. आपण स्वतःला व्यक्ती , वस्तू आणि परिस्थिती ह्यात अडकवून घेणे म्हणजे आपल्या स्वातंत्र्यात आणि मुक्ततेत अडथळा आणणे होय. जेंव्हा मन सगळ्या आवृत्ती  आणि धारणापासून मुक्त होते तेंव्हा मोक्ष मिळतो. काहीच नसणे ही स्थिती म्हणजे निर्वाण, साक्षात्कार , समाधी होय. मी कोण आहे? जेंव्हा तुम्ही स्वतःच्या आत खोल जाता , एकेक स्तर आत जाता म्हणजेच निर्वाण होय. हे कांद्याच्या एकेक पाती सोलण्यासारखे  आहे. कांदा पूर्ण सोलाल्यानंतर आत आपल्याला काय मिळते , काहीच नाही!
जेंव्हा तुम्हाला माहीत आहे की सगळे बदलत आहे, नाती, माणसे , शरीर , भावना - अचानक तुमचे मन जे दुःखाशी झुंज देत असते ते स्वत:पाशी येते. माझ्याकडून परत माझ्याकडे येणे हे तुमच्यात संतुष्टता आणि दुःखापासून मुक्तता आणते. संतुष्टतेत विश्राम करणे म्हणजे निर्वाण होय. 


प्रश्न : मोक्ष हा प्रयत्न  करून मिळतो की प्रयत्नांशिवाय मिळू शकतो ?
श्री श्री रवि शंकर : दोन्ही प्रकारे. हे ट्रेन पकडण्यासारखे आहे. एकदा तुम्हाला ट्रेन मिळाली  की फक्त आराम करायचा. तुम्ही सतत हा विचार करू शकत नाही मला ह्या स्थानकावर उतरायचे आहे. तुम्हाला  विश्राम करणे जरुरीचे आहे. तुम्हाला दुसरे काहीच करण्याची गरज नाही. फक्त बसा आणि आराम करा. 


प्रश्न : जेंव्हा कोणीही काही चूक करतो आणि त्याला केलेल्या चुकीची जाणीवही नसते, अशा वेळेस आपण त्यांना माफ कसे करावे?
श्री श्री रवि शंकर : जेंव्हा तुम्ही माफ करता तेंव्हा तुमचे मन शांत होते. त्यांना प्रेमाने आणि करुणेने सांगा , रागावून सांगू नका. जर तुम्हाला कोणालाही पश्चात्ताप करायला लावून आनंद होत असेल तर ही चांगली गोष्ट नाही. त्यांना प्रेमाने सांगा आणि तुम्ही सोडून द्या. 
The Art of living
© The Art of Living Foundation