तुम्ही जेंव्हा दुसऱ्यांना मदत करता किंवा ज्ञानात राहून काळजी घेता तेंव्हा तुम्ही त्यांच्यासाठी गुरूच असता.

मोनट्रीअल केंद्र, कॅनडा, एप्रिल २१:  




प्रश्न : तुम्ही गुरु आहात हे तुम्हाला कसे कळले? तुम्हाला गुरु होते का? कधी कधी मी असा विचार करतो की मी फक्त माझ्यासाठी गुरु असेन. तुम्ही त्याला काय म्हणाल?

श्री श्री रवि शंकर: तुम्ही स्वतःसाठी सर्जन असू शकत नाही. तुम्ही सर्जन असू शकता पण स्वतःसाठी नाही, बरोबर? तर तुमची आई ही तुमचा पहिला गुरु आहे. आई तुम्हाला शिकवते. नक्कीच, गुरूचा तुमच्याबद्दलचा भाव आणि दृष्टीकोन हा विना अट असतो. कुठलीही अट न ठेवता तुम्ही गुरुची भूमिका पार पडली पाहिजे. तुम्ही इतरांना ज्ञानात राहून मदत केली पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. तेंव्हा तुम्ही त्यांच्यासाठी गुरूची भूमिका पार पडत असता.

तुम्ही जर कुणाला ' मला काही नको' या भावनेने मदत केलीत, मला फक्त तुमची प्रगती हवी आहे तेंव्हा तुम्ही त्यांचे गुरु असता. तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला गुरु मानावे असे त्यांचाकडे मागू नका. नाही, एक सच्चा गुरु काहीही मागत नाही, आभार पण नाही.



प्रश्न : मी ऐकले की आर्ट ऑफ लिव्हिंग भारतातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहे? आम्ही इथे उत्तर अमेरिकेत भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी काय करू?

श्री श्री रवि शंकर: त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. ही परस्थिती कशी हाताळावी? भ्रष्टाचार ३ पातळ्यांवर आहे. १ म्हणजे लोकांमध्ये. लोक भ्रष्टाचाराला जगण्याचा एक भाग म्हणून स्वीकारतात. दुसरे म्हणजे नोकरशाही; आणि तिसरे म्हणजे राजकारणी लोक. प्रत्येक स्तरावर चांगले लोक आहेत.आणि तसे चांगले नसणारे लोक पण आहेत. आपण त्यांना आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्स मध्ये आणले पाहिजे आणि प्राणायामाच्या पद्धती शिकवल्या पाहिजेत. ते सुधारतील.



प्रश्न : प्रिय गुरुजी, २०१२ मध्ये काय होणार आहे ते तुम्ही सांगू शकाल का?

श्री श्री रवि शंकर: नेहमीप्रमाणेच. फक्त लोक जास्तीत जास्त अध्यात्मिक होतील.



प्रश्न : अध्यात्मिक प्रगती वाढवण्यासाठी आपण हा वेळ कसा वापरावा?

श्री श्री रवि शंकर: तुम्ही जे आत्ता करत आहात तेच करा.



प्रश्न : जगामध्ये अनेक लढाया आणि प्रादेशिक हिंसाचार होत आहे. जगातील हिंसाचार कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो?
श्री श्री रवि शंकर: हिंसाचाराचे मूळ ताण आणि रागामध्ये आहे. राग आणि ताण कमी करण्याचा मला माहित असलेला एकमेव मार्ग म्हणजे ध्यान, प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया. हाच एक मार्ग आहे. तुम्ही आयुर्वेदाचा वापर करा, आहार बदला, तुम्ही ते करू शकता. तरी ते सर्व दुय्यम आहे. 



प्रश्न : गुरुजी, गाणे म्हणणे हा शिबिराचा महत्वाचा भाग का आहे? गाण्याचे अध्यात्मिक महत्व काय?

श्री श्री रवि शंकर: तुम्हाला माहिती आहे, ज्ञान आणि तर्क, आणि संगीत मेंदूच्या दोन भागांमध्ये निर्माण होतात, दोन्ही महत्वाचे आहे. त्याने शरीर व्यवस्थेमध्ये संतुलन येत. संगीत जरुरी आहे.

The Art of living

सेवेमधून कार्य शुद्ध होते!

आर्ट ऑफ लिविंग केंद्र ,टेक्सास,अमेरिका १२, एप्रिल,२०११

प्रश्न: न्यायासाठी लढताना शांती कशी ठेवू शकतो?
श्री श्री रवि शंकर
: हेच संपूर्ण भगवत गीतेचे सर आहे. आतून शांत राहून जेंव्हा आवश्यक असेल तेंव्हा कृत्य करावे. जेंव्हा आवश्यक असेल तेंव्हा लढावे, परंतु त्या लढाईला आपल्या मनात ठेवू नये. बऱ्याच वेळा आपण आत लढत राहतो आणि बाहेर शांत राहतो. आपल्याला त्याच्या विरुद्ध केले पाहिजे. ध्यानाद्वारे हे परिवर्तन आणणे सहज शक्य आहे. सत्व आणि ध्यान याची शक्ति हे सगळे सोप्पे बनवते.
आज रामनवमी आहे. रा चा अर्थ आहे प्रकाश, आणि म चा अर्थ आहे मी. राम चा अर्थ आहे “ माझ्या आतला प्रकाश” रामाचा जन्म दशरथ आणि कौशल्या यांचा इथे झाला. दशरथ चा अर्थ आहे “दश रथ”. दश रथ पांच इन्द्रिय आणि पांच ज्ञान आणि कृत्य यांना दाखवतो. (उदाहरणार्थ ; प्रजनन,पाय,हात, इत्यादि) कौशल्या चा अर्थ आहे ‘कौशल’. अयोध्या चा अर्थ आहे, “असा समाज जिथे अजिबात हिंसा नाही” जेंव्हा तुम्ही अतिशय बारकाईने याचाकडे बघाल, की आपल्या शरीरात काय प्रेवेश करत आहे, आपल्या आत प्रकाश वाढत आहे. तेच ध्यान आहे. आपल्याला तणावातून मुक्त होण्यासाठी काही कौशल्याची आवश्यता आहे. मग तुम्ही पसरायला सुरुवात होते.
तुम्हाला माहिती आहे की आत्ता तुम्ही इथे आहात तरी तुम्ही इथे नाही. या अनुभवाने की काही प्रकाश लगेच येतो. जेंव्हा आतल्या प्रकाशात चमक येते तेंव्हा तो राम आहे. सीता जे मन/बुद्धि आहे, त्याला अहंकार(रावण) पळवून घेऊन जातो. रावणाला दहा तोंडे होती. रावण (अहंकार) असा होता, जो कुणाचेही ऐकत नसे. तो स्वतःच्या डोक्यात (अहंकार) अडकलेला असे. हनुमान चा अर्थ श्वास आहे. हनुमान (श्वास) चा सहाय्याने सीता(मन) आपल्या रामाजवळ (स्त्रोत्र) जाऊ शकली.
रामायण ७,५०० वर्ष पूर्वी घडले. त्याचा जर्मनी आणि यूरोप आणि पूर्वेचा खूप देशांवर प्रभाव पड़ला. हजारों पेक्षा अधिक नगरांचे नाव रामावरून पडले. जर्मनी मध्ये रामबौघ,इटली मध्ये रोमचे मूळ राम या शब्दामाधेच आहे. इंडोनेशिया, बाली आणि जापान सगळे देश रामायणाने प्रभावित झाले आहेत. तसे तर रामायण एक इतिहास आहे परन्तु ही अशी अनंत घटना आहे,जी नेहमी घडत असते.

प्रश्न: गुरु आदर्श भक्तामध्ये कुठले गुण बघू इच्छितो?
श्री श्री रवि शंकर:
कुठलेच नाही. जर मी कुठला एक गुण सांगितला, तर तुम्ही तोच पाळायला लागाल. यासाठी स्वतःबरोबर स्वाभाविक आणि ईमानदार राहा. जर एक दिवस सुद्धा तुमचे ध्यान करायचे राहिले तर त्यासाठी काळजी करत बसू नका. समय तुम्हाला घेऊन चालला आहे. ज्या काही चांगल्या गुणांचा शोध तुम्ही घेत आहात, ते तसेही तुमाचामध्ये आहेत. तुम्ही इथे आहात आणि सगळे चांगले करत आहात.
उचित आहार घेऊन आपण आपले शरीर शुद्ध ठेवू शकता. वर्षातले २-३ दिवस व्रत ठेवणे चांगले असते. रस घेऊन व्रत करा. परंतु जर तुमचे शरीर याला अनुमति देत नसेल तर करू नका. तुम्हाला तुमच्या शरीराकडे पण लक्ष दिले पाहिजे.
मन प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया यांच्या द्वारे शुद्ध होते.
बुद्धि ज्ञानाद्वारा शुद्ध होते.
भावना भजन केल्याने शुद्ध होतात.
सेवा केल्याने कृत्य शुद्ध होतात.
दान केल्याने धन शुद्ध होते.
तुम्ही तुमच्या उत्पन्नातले २ ते ३ % दान केले पाहिजे.

प्रश्न: येणाऱ्या वर्षांमध्ये तुमचा आर्ट ऑफ लिविंग साठी काय दृष्टिकोण आहे?
श्री श्री रवि शंकर :
मी त्याची सुरुवात केली आहे. मी माझे काम केले आहे. आता हे तुमच्यावर आहे. तुमच्याकडे दृष्टिकोण आहे, यासाठी तुम्ही त्याला जिथे हवे तिथे घेऊन जा. आम्ही जर्मनीमध्ये आर्ट ऑफ लिविंग च्या ३० वर्ष पूर्ण होण्याचा उत्सव साजरा करणार आहोत. हिटलर नी ७५ वर्षांपुर्वी जसे ओलंपिक स्टेडियम बनवले होते. आपण तिथेच असू. त्यांनी युद्धाची सुरुवात तिथूनच केली. ज्या जागेतून युद्धाची सुरुवात झाली, आपण तेथूनच शांतीचा प्रचार करूयात.

प्रश्न: खूपशा युद्धाचे कारण धर्म का असतो?
श्री श्री रवि शंकर: मला पण आश्चर्य वाटते. जगामध्ये १० मुख्य धर्म आहेत. ४ मध्य पूर्व आणि ६ पूर्व देशांमधले आहेत. पूर्वेकडील ६ धर्मांमध्ये अजिबात द्वंद्व नाही. हिंदू,बुद्ध,सिख, जैन,शिंटो आणि ताओ धर्म एकच वेळी अस्तित्वात होते. जेंव्हा राष्ट्रपति निक्सन जापानला गेले , तेंव्हा त्यांच्या एका बाजूला शिंटो संत होते आणि दुसर्या बाजूला बौद्ध संत होते. त्यांनी शिंटो संताना विचारले की जपानमध्ये शिंटो किती टक्के आहेत? संताने सांगितले ८०% त्यांनी परत बौद्ध संताला विचारले की जपान मध्ये बुद्ध कितने प्रतिशत है? संताने सांगितले ८०%. निक्सन ना आश्चर्य वाटले की हे कसे शक्य आहे. शिंटो बुद्ध मंदिरामध्ये जातात आणि बुद्ध शिंटो मंदिरामध्ये जातात. त्याच प्रकारे हिंदू सिख गुरूद्वारमध्ये जातात, आणि सिख हिंदू मंदिरामध्ये जातात. भारमध्ये हीच गोष्ट हिंदू आणि बुद्ध लोकांसाठी सांगितले जाऊ शकते. त्याच प्रकारे चीनमध्ये बुद्ध आणि ताओ धर्मामध्ये कोणतेही द्वंद नाही.
मध्य पूर्वेच्या चार धर्मांमध्ये नेहमी युद्ध झाले. यांनी इतर ६ धर्मांकडून शिकले पाहिजे की एकत्र कसे टिकून राहिले पाहिजे. ईसाई आणि यहूदी धर्म यांचाशी मित्रता आहे. यहूदी आणि इस्लाम धर्मामध्ये काही त्यांचातला मुद्दा आहे.

प्रश्न: कर्म आणि भाग्य यात काय अंतर आहे ?
श्री श्री रवि शंकर:
भाग्य याचा अर्थ आहे विधि म्हणजे हे आहे हे असेच आहे. कर्म याचे अनेक अर्थ आहेत. याचा अर्थ कृत्य किंवा अप्रत्यक्ष कृत्य सुद्गा होऊ शकतो. काही कृत्यांचा संस्कारामुळे कुठले दुसरे कृत्य उत्पन्न होऊ शकते आणि त्यालाही कर्म म्हणू शकतो.

चांगल्या आणि वाईट गोष्टी एकत्र असणे हेच जीवन आहे

प्रश्न : गुरुजी ह्या विश्वात आत्म्यांची संख्या ठराविक आहे का कि संपूर्ण ब्रम्हांडात एकच अंतरात्मा आहे.
श्री श्री रवी शंकर : अनंत आत्मे. हे असे विचारण्यासारखे झाले कि आकाशात ठराविक संख्येने तारे आहेत का? वैदिक शास्त्र आणि आगम शास्त्र असे सांगते कि २२४ पृथ्वी आहेत , आपल्यासारखे जग आकाशगंगेत आहेत. तसे बघितले तर खूप आहेत पण महत्वाचे २२४ आहेत. हि आपल्या संतांची दूरदृष्टी आहे कि ज्यांनी ध्यानात गहिरे जाऊन ब्रम्हांडाचा शोध घेतला आहे.

प्रश्न : गुरुतत्त्व म्हणजे काय ,आणि गुरु कोण आहे?
श्री श्री रवी शंकर : विवेक, तारतम्य हे गुरुतत्त्व आहे. गुरु कोण आहे हे खरच महत्वाचे आहे का? तुम्ही फक्त ज्ञान घ्या आणि पुढे चला हेच पुरेसे आहे. गुरु कोण आहे ह्याची काळजी करू नका.

प्रश्न : गुरुजी आत्मबल कसे वाढवावे?
श्री श्री रवी शंकर : आत्मबल....प्रार्थना, प्राणायाम, आणि साधना करा.

प्रश्न : गुरुजी , हे जग स्थायी आहे कि बदलत आहे?
श्री श्री रवी शंकर : तुम्ही बघता आहात कि हे जग स्थायी नाही.

प्रश्न : जर शिष्याचेच निधन झाले तर सत्गुरूचा काय उपयोग?
श्री श्री रवी शंकर : सत्गुरुला माहित असते कि शिष्याला मरण नाही. कारण आत्मा अमर आहे. मरणानंतर सुद्धा त्याचा एका दिशेने प्रवास हा सुरूच असतो.

प्रश्न : गुरुजी अश्वमेध म्हणजे काय?
श्री श्री रवी शंकर : अश्वमेध म्हणजे शुद्ध. 'श्व' म्हणजे भूत किंवा भविष्य. 'अश्व' म्हणजे उपस्थित क्षण आहे. 'मेध' म्हणजे मार्जन होय. मनाचे आणि बुद्धीचे मार्जन जेव्हा आत्ताच्या म्हणजेच उपस्थित क्षणात होत असते तेव्हा त्याला अश्वमेध म्हणतात. बुद्धी आणि मन आत्ताच्या क्षणात ठेवा.

प्रश्न : गुरुजी कोदागणं कोळी नुन्गीथा (क्न्नादामाध्ले एक भजन)
श्री श्री रवी शंकर: ह्याचा अर्थ खूप अदभूत आहे.मी विचार करत होतो कि मी खूप मोठा माणूस आहे पण मी जेव्हा माझ्या गुरूच्या चरणांकडे पहिले तेव्हा उदार्चारीत , मोठ्या मनाचे दिसले .माझा अहंकार कि जो मला खूप मोठा वाटत होता तो गुरुचे चरण लहान वाटत होते. पण खरं तर त्याच्या अगदी विरुद्ध होत.
त्यांच्या चरणांनी माझा मोठा अहंकार गडप करून टाकला.

प्रश्न : आम्ही फक्त चांगल्या गोष्टी लक्षात ठेवून वाईट गोष्टी कश्या विसराव्यात?
श्री श्री रवी शंकर : हे खूप चांगले आहे कि वाईट गोष्टी विसराव्यात आणि चांगले आहे कि चांगल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. दोन्ही एकत्र असणे हेच जीवन आहे पण आपण त्याचा विसर पडतो आणि आपण फक्त वाईटच गोष्टी लक्षात ठेवतो. तुम्ही सत्संग मध्ये जे ऐकता ते लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. इतर लोकांच्या चुका विसरणे हि खूप महत्वाची बाब आहे. पुन्हा पुन्हा त्याच चुका करू नयेत हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. इतर लोकांच्या चुकांवरून आपण शिकणे हेही महत्वाचे आहे.

प्रश्न : गुरुजी स्त्री साठी एखादी गोष्ट नीट रचणे कठीण असते कारण तिला संपूर्ण घराला सांभाळायचे असते. हि गोष्ट ती इतक्या क्षमतेने कशी करू शकते?
श्री श्री रवी शंकर : कुठलीही गोष्ट कठीण आहे असा विचार करू नका. जरी ती कठीण असली तरी तुमच्या मनातल्या विचाराने ती आणखीन कठीण होते. जर तुम्हाला एखादे कठीण काम नेमून दिले तरी हे माना कि तुमच्यात खूप शक्ती आहे अगदी त्याच्याहीपेक्षा जास्त. आपल्यासाठी तेच काम उपलब्ध होते जे आपण करू शकतो.

प्रश्न : गुरुजी एक स्त्री ब्रह्मचर्याचे पालन करू शकते का?
श्री श्री रवी शंकर: ब्रह्मचर्य हि तुमची वैयक्तिक निवड आहे. जर तुम्हाला लग्न करायचे असेल तर करा, आणि जर लग्न करायचे नसेल तर करू नका. असे खूप लोक आहेत जे लग्न करून दुखी आहेत, आणि अशीही लोक आहेत जी लग्न न करता दुखी आहेत. मला फक्त पाहिजे आहे कि तुम्ही सुज्ञ व्हा . कुठल्याही एका गोष्टीत केंद्रित व्हा ते खूप महत्वाचे आहे.

सृष्टी देवता आहे

प्रश्न : कोणाला मी समर्पण करावे?
श्री श्री रवी शंकर : परमात्मा कि जो माझ्या आत आहे, त्या परमात्म्याला मी समर्पण करतो.

प्रश्न : पूजा काय आहे?
श्री श्री रवी शंकर : जिचा जन्म पुरातन काळापासून झाला आहे (संपूर्णपणे) तीच पूजा आहे. जेव्हा कृतज्ञता अगदी सदगतीत होतात, जेव्हा कंठ दाटून येतो कृतज्ञतेच्या भावनेने तेव्हा तुम्ही जे काही कर्म करता तिलाच पूजा म्हणतात. जेव्हा आपण सगळे समर्पण करतो - त्या भावना तिलाच पूजा म्हणतात.

प्रश्न : गुरुजी हिंदुत्वाची जी प्रतीके आहेत त्याच्यामागे जे गूढ अर्थ आहेत ते परस्पर विरोध दर्शवितात त्याबाबतीत तुम्ही बोलला होतात. कृपया ज्या करोडो देविदेवता आहेत त्यांच्याबद्दल काही सांगाल का?
श्री श्री रवी शंकर: करोड ,कोटी म्हणजे प्रकार. ३३ करोड म्हणजे ३३ प्रकारची दैवी स्पन्दने आहेत. आपल्या शरीरात सुद्धा ३३ प्रकारची स्पंदने आहेत. ३३ प्रकारचे जीन्स आपल्या शरीरात असतात. एक विशिष्ठ प्रकार आपले डोळे बनवतो ,एक प्रकार आपले नाक बनवतो त्याचबरोबर एक विशिष्ट प्रकार आपले कानाचे पडदे , केस, नखे. हे सगळे प्रत्येक विशिष्ठ प्रकारच्या जीन्स ने बनलेले आहे कि जी ३३ प्रकारची आहेत.
त्याचप्रकारे ३३ प्रकारच्या ईश्वरी शक्ती आहेत. एकच प्रकाश, एकच देव, एकच परमात्मा तरी सुद्धा ३३ प्रकार आहेत. देवांच्या ३३ प्रकारच्या दैवी शक्ती आहेत. इथे करोड म्हणजे संख्या दर्शवित नाही . दैवी शक्तीला कुलाही आकार , रूप नाही, पण आपल्या प्राचीन संतानी सांगितले आहे कि तुम्ही कुठच्याही रूपाने, नावाने भजू ,पुजू शकता. सगळी हजारो नवे हि देवाचीच आहेत. हे खूप गहिरे विज्ञान आणि अंतरज्ञान आहे. हे खूप अदभूत आहत जेव्हा तुम्ही त्याच्या खूप खोलात जाता तेव्हा तुम्हाला त्यातले गम्य कळते. लोक ज्यांनी हे लिहिले, ज्याचा शोध लावला त्यांना खरच आश्चर्यकारक ज्ञान आहे. हे विश्व तसे सोपे अजिबात नाही.खूप गुंतागुंतीचे आहे.आधुनिक भौतिकशास्त्र हि हेच सांगते कि जेवढे तुम्ही खोल जाल तेवढे अधिक पहेलू तुम्हाला दिसतील.हे विश्व खूप वेगळे आहे, हि ईश्वरी शक्ती जी नियम सांभाळते आणि जिने इतके वेगळे विश्व बनवले ती देवता . इंग्रजी नाव डेवीड आणि संस्कृत मध्ये देव + विद , देव म्हणजे दैवी शक्ती आणि विद म्हणजे माहित असणे. डेवीड म्हणजे ज्याला दैवी शक्ती म्हणजे काय ते माहित असते.हि दैवी शक्ती म्हणजे कुठे स्वर्गात नसते ती ह्या जगातच आहे , ह्या विश्वातच आहे, सगळीकडे आहे. आणि ते तुम्हाला जाणवले पाहिजे जेव्हा तुमचे मन शांत असेल, नितळ, प्रसन्न आणि हृदयात स्थिरावले आहे, जेव्हा मन आणि बुद्धी चा एकत्र मिलाप होऊन ते एकजीव होईल तेव्हा तुम्ही हे समजून घेण्याच्या मनस्थितीत असाल कि हि वास्तविकता सूक्ष्म आहे आणि सृष्टी देवता आहे.

प्रश्न : गुरुजी ही जी दैवी शक्ती आहे ती आपल्या थोड्या प्रार्थनेलाच उत्तर देते तर काही प्रार्थना अनुत्तरीतच राहतात असे का?
श्री श्री रवी शंकर : मला खरचं माहित नाही कि काही प्रार्थनांचीच उत्तरे मिळतात आणि काहींची मिळत नाहीत. मला काही कल्पना नाही .पण तेच कदाचित तुमच्यासाठी चांगले असेल. आणि आत्ता जे तुम्हाला हवे आहे त्याबाबतीत तुमचे विचार आणि मन बदलू शकते. जेव्हा तुम्ही खरेदीला जाता - भारतात तरी हे नेहमी घडते , खरेदी करताना दुकानदाराला तुम्ही विचारता कि मी नंतर येऊन हि वस्तू बदलू शकते का, जर मला नाही आवडली तर? मग ते घरी जातात आणि नाही आवडली तर दुसऱ्या दिवशी बदलून घेतात. सर्वात अविश्वासू हे आपले मनच असते कारण तुम्हाला माहित नाही कि आत्ता काय हवे आहे आणि नंतर काय पाहिजे आहे? म्हणून मनाला त्याच्या मूळ उगमस्थानाकडे आणणे महत्त्वाचे आहे. मनाचे केंद्रस्थान हे खूप महत्त्वाचे असते अध्यात्मिक उत्क्रांतीसाठी . हे समजून घ्या कि काय अशाश्वत आहे आणि काय अविनाशी आहे. कुठली गोष्ट तुमच्या आयुष्यात चिरकाल आनंद आणणार आहे आणि कुठली गोष्ट तात्पुरती अनुकूल वाटून अनंत काळासाठी दुख आणणार आहे. कुठल्या गोष्टीचा परिणाम तात्पुरता अस्वस्थ करणारा आहे परंतु अनंत काळासाठी आनंद आणणारा आहे. आणि त्याचबरोबर कुठल्या गोष्टीच्या कारणामुळे चिरकाल अस्वस्थता राहणार आहे. ह्यालाच विवेक , तार्तम्यता म्हणतात . चातुर्य - आहे हे जाणून घेणे.

आनंद हा तुमच्या मनावर अवलंबून असतो

बंगलोर आश्रम , जान १७:

प्रश्न : जेंव्हा सगळे झोपलेले असतात तेंव्हा गुरुजी जागे असतात. तुम्हाला त्याचा काही त्रास होत नाही का?
श्री श्री रवी शंकर:
तुम्ही झोपलेले असताना तुमच्या घरासमोर एक चौकीदार असतो. ज्यांचापुढे मोठे प्रश्न असतात त्यांना लहान लहान प्रश्न काही वाटत नाही. सामान्य लोकांना ज्या गोष्टींची चिंता वाटते त्याची योगी पुरुषांना वाट्त नाही. योगी पुरुषासाठी सर्व काही शक्य आहे.

प्रश्न : भक्ती मिळवण्यासाठी मी कुठे जावे?
श्री श्री रवी शंकर
: भक्ती – प्रीती – भक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. केवळ स्मरण करून त्तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही जिथे असाल तिथून भक्ती करू शकता. कोणी तुम्हाला थांबवू शकते का? चालताना, खाताना तुम्ही समर्पित राहू शकता.

प्रश्न : आर्ट ऑफ लिव्हिंग ने मला बरेच काही दिले आहे, मला काहीतरी द्यायचे आहे, सेवा करायची आहे. मी की करू शकतो?
श्री श्री रवी शंकर
: आश्रमात येऊन कधीही तुम्ही सेवा करू शकता.

(The person then tells Sri Sri Ravi Shankar: I’m very happy to have food with many people, with no differences between people and so much togetherness.)

प्रश्न : गुरुजी , मला माझ्या भूतकाळाचा त्रास होतो, मी काय करू?
श्री श्री रवी शंकर
: झाले ते जाऊ देत. क्षमेला पण विसरून जा. क्षमा करण्यासाठी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावे लागते.त्याला एका स्वप्नासारखे बघा. कोणी स्वप्नाचा विचार करत बसते का? त्याच प्रमाणे आपला भूतकाळ पण सोडून द्या. एक भविष्य सांगणारा भक्त एक दिवस म्हणाला, "माझा पाय मोडला. मी रात्री झोपलो होतो. आणि मला मी एका वाघाशी लढत आहे असे स्वप्न पडले. मी भिंतीवर लाथ मारली आणि पाय मोडला. वाघ माझ्या स्वप्नात होता, मी स्वप्नात लाथ मारायला हवी होती" अडचणीमुळे थांबू नका, चालत राहा.

प्रश्न : मी जिथे जातो तिथे मला दुक्ख दिसते. मी कुठे जाऊ आणि की करू?
श्री श्री रवी शंकर
: अंतर्मुखी (आत जाणे). बाहेर बाजार आहे. गावातल्या बाजारात, पुलाखाली, लोक झोपलेले असतात. तुम्ही त्यांचाकडून शिका. ते भर बाजारात झोपू शकतात. तुम्ही पण ध्यान करा आणि शांत व्हा. किंवा इथे या. तुम्हाला शांतता मिळेल. २० अडचणी असतील पण १०० चांगल्या गोष्टी पण असतील. तरी सुद्धा मान त्या २० अडचणीतच अडकलेले असते.

प्रश्न : ध्यानाच्या सी डी मध्ये दिलेल्या सूचना मी पळू शकलो नाही .
श्री श्री रवी शंकर
: ध्यानात मला ऐकायचा प्रयत्न करू नका, जे होतंय ते होऊ द्यात.सल्ला जसे ऐकता त्याप्रमाणे करा. एका कानाने ऐका आणि दुसर्या कानाने सोडून द्या! तुम्ही नुसते बसलात तरी ओउरेसे आहे.

प्रश्न: समाजात सगळेजण शांतपणे राहत आहेत. तरी काही लोक अशांती निर्माण करतात. आपण की केले पाहिजे?
श्री श्री रवी शंकर
: काही गोष्टी करा आणि काही काही गोष्टी करू नका. अस्पृशाते (जातीयता) कुणालाही काहीही मदत करत नाही. कुणाचाही दुस्वास करू नका. मेलेल्या सापाला उगीच मारत बसतो, तेव्हा तुमचाच हाताला लागते. तरी सुधा काही ठिकाणी हातात काठी असणे जरुरी असते. कशाचाही द्वेष करू नका.

प्रश्न: तुम्ही जे टाळत आहात ते तुमच्या आयुष्यात घडेल हे तत्व मी पाळतो. तरीसुद्धा मी काही गोष्टी टाळतोच असे मला दिसते.
श्री श्री रवी शंकर:
मन आणि शरीराचे नियम वेग वेगळे आहेत. जे टाळत आहात ते मनात घडते, शरीराचे तसे नाही.

प्रश्न: आयुष्याची व्याख्या काय? आनंदी आयुष्य कसे जगावे?
श्री श्री रवी शंकर:
आर्ट ऑफ लिव्हिंग त्याच्याच बद्दल आहे. आयुष्य व्याख्येच्या पलीकडे आहे. व्याख्या करणे किंवा पकडणे याच्या पलीकडे आयुष्य आहे. ते इतके मोठे आहे, व्यापक आहे की काही शब्दात त्याला बांधता येणे शक्य नाही. त्याची व्याख्या करायला जाताना तुम्ही त्याला खूपच छोटे करून टाकता. आनंद हि अशी गोष्ट आहे की ज्याचा आपण नेहमी मागोवा घेत राहिले पाहिजे. नकळत आपण सगळे आनंदी आहोत, पण कुठेतरी आनंदाचा मागोवा घेत असताना आपण अडकून बसतो आणि लक्ष्य चुकवतो. अध्यात्म म्हणजे की आहे - चेहेऱ्यावर एक हसू आणणे.

एकदा तुम्हाला प्रकाश दिसला, की सारा भूतकाळ एका स्वप्नासारखा वाटू लागतो, पुढे चला. जागे व्हा आणि वर्तमानात काय चालले आहे ते पहा, तुम्ही तिथे आनंदी असाल, कुठलीही अट न ठेवता. तेव्हा तुम्ही आनंदी असाल आणि तुमचा आनंद इतक कुणावरही अवलंबून नसेल. आनंद हा तुमच्या मनावर अवलंबून आहे. जेंव्हा मन भूतकाळातील कुठल्याही प्रभावापासून आणि भविष्यातल्या चिंतांपासून मुक्त असते, तेंव्हा तिथे आनंद असतो.

प्रश्न: देवाने त्याच्या अगाध हुशारीतून हे जग बनवले आहे, मी मांस का खाऊ नये हे मला कळत नाही? मी जन्मतःच मांसाहारी आहे आणि मी ते सोडू शकत नाही.
श्री श्री रवी शंकर:
ओके. मांस आवडीने का खावेसे वाटते? (त्या महिलेने उत्तर दिले चव आणि सुवास) सुवास आणि चव ज्याचापासून येते ते म्हणजे मसाले. ठीक आहे. चव आणि वासाबद्दल, अध्यात्मिकते बद्दल विसरून जा. तुम्हाला माहिती आहे, मांसाहारी पदार्थांबद्दल नवीन काय कळले आहे? १ किलो मांस हे ४०० लोकांच्या जेवणाइतके आहे. फक्त १०% लोक जरी शाकाहारी झाले. ग्लोबल वॉर्मिंग चा प्रश्न कमी होईल.

आत्ता आपल्याला आपला ग्रह वाचवायचा आहे. मांसाहारी पदार्थ आपल्याला कमीच केले पाहिजेत. आपल्या ग्रहासाठी, जेणेकरून सगळ्यांना अन्न मिळेल, आपल्याला त्याची काळजी असली पाहिजे. देवाने आपल्याला दुसऱ्याची आणि ग्रहांची काळजी घ्यायची बुद्धी दिली आहे! तुम्ही भरपूर खाल्ले आहे, त थोडे कमी ख म्हणजे ज्यांना खायला काहीच नाही त्यांना थोडेतरी मिळेल. जास्तीत जास्त लोकांना खायला मिळेल .

जेव्हडे आपण निर्माण करतो त्याचा ४०-५०% जास्त आपण खात आहोत. झाडे लावा, शाकाहारी बना, हे अध्यात्मिक होण्याचा एक भाग आहे. ध्यान म्हणजेच फक्त अध्यात्मिकता नव्हे. भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा १००० लोकांमागे ४०० गायी होत्या. आता आपल्याकडे १००० लोकांमागे १०० गायी आहेत. २० वर्षांमध्ये १००० लोकांमागे फक्त २० गायी असतील. मुलांना दुध, दही, तूप यासारखा त्यांचा मुख्य आहार मिळणार नाही. आपल्याला प्राण्यांचे, आपल्या ग्रहाचे रक्षण केले पाहिजे.

प्रश्न: गुरुजी, माणूस कायम भांडतो. जगात कधी शांतात असेल का? जग कधी हिंसाचार रहित होईल का?
श्री श्री रवी शंकर:
हं. तेच आपले स्वप्न असले पाहिजे आणि त्यासाठीच आपण काम केले पाहिजे. संपूर्ण जड एक कुटुंब आहे. वसुधैव कुटुंबकम हे पुराणात सुद्धा सांगितले आहे


आयुष्याची व्याख्या


प्रश्न: आयुष्याची व्याख्या काय? आनंदी आयुष्य कसे जगावे? 
श्री  श्री  रवी  शंकरआर्ट ऑफ लिव्हिंग त्याच्याच बद्दल आहे. आयुष्य व्याख्येच्या पलीकडे आहे. व्याख्या करणे किंवा पकडणे याच्या पलीकडे आयुष्य आहे. ते इतके मोठे आहे, व्यापक आहे की काही शब्दात त्याला बांधता येणे शक्य नाही. त्याची व्याख्या करायला जाताना तुम्ही त्याला खूपच छोटे करून टाकता. आनंद हि अशी गोष्ट आहे की ज्याचा आपण नेहमी मागोवा घेत राहिले पाहिजे. नकळत आपण सगळे आनंदी आहोत, पण कुठेतरी आनंदाचा मागोवा घेत असताना आपण अडकून बसतो आणि लक्ष्य चुकवतो. अध्यात्म म्हणजे की आहे - चेहेऱ्यावर एक हसू आणणे. 
एकदा तुम्हाला प्रकाश दिसला, की सारा भूतकाळ एका स्वप्नासारखा वाटू लागतो, पुढे चला. जागे व्हा आणि वर्तमानात काय  चालले आहे ते पहा, तुम्ही तिथे आनंदी असाल, कुठलीही अट न ठेवता. तेव्हा तुम्ही आनंदी असाल आणि तुमचा आनंद इतक कुणावरही अवलंबून नसेल. आनंद हा तुमच्या मनावर अवलंबून आहे. जेंव्हा मन भूतकाळातील कुठल्याही प्रभावापासून आणि भविष्यातल्या चिंतांपासून मुक्त असते, तेंव्हा तिथे आनंद असतो.