" मान्य करा की तुम्ही आपल्या क्षमतांपासून अनभिज्ञ आहात"

बुधवार, ऑगस्ट, २०१०
प्रश्न : आपण आपल्या सत्संगात आलेल्या लोकांना काय म्हणायचे जे विविध गुरूंचे ज्ञान घेऊन येतात?
श्री श्री रविशंकर: ऐका आणि जाऊ द्या. त्यांच्या सोबत चर्चा करण्यात गुंतू नका. प्रत्येकाला आपले मत मांडू  द्या. महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतः चिंतन करणे.


प्रश्न : काम आणि आयुष्य यात संतुलन कसे साधायचे?
श्री श्री रविशंकर: तुम्ही सायकलवर कसे संतुलन साधता? तिथे "कसे" हे नसते. तुम्ही फक्त करा.


प्रश्न : मी ध्यानाचा "सगळे  ठीक आहे" हा अनुभव, ध्यानातून मिळणारी शांती कशी टिकवून ठेवू शकतो?
श्री श्री रविशंकर: तुम्ही रात्री कसे झोपता? तुम्ही सगळा सोडून देता.तुम्ही जेव्हा उठता तेव्हा ताजे तवाने असता आणि तुमच्यात परिस्थितीचा सामना करण्यासाठी उर्जा आणि गतिशीलता येते, तसेच ध्यानासोबत पण आहे. तुम्ही जर ध्यान केले नाही तर याच्या विपरीत अनुभव येईल.


प्रश्न : मी जेंव्हा अडचणीतून जातो तेंव्हा मी परिस्थितीचा शिकार होत आहे या भावनेच्या चक्रातून कसे बाहेर पडू? 
श्री श्री रविशंकर: जेंव्हा तुम्हाला हे लक्षात आले त्याच क्षणी तुम्ही त्या चक्रातून बाहेर पडला आहात.  तुम्हाला हे जाणवत आहे की हे मनाचे खेळ आहेत आणि हे पुन्हा पुन्हा होत राहणार आहे. ही जाणीव तुम्हाला काळासोबत येईल.आणि हे जेव्हा होईल, तेव्हा आनंदी आणि कृतज्ञ राहा. कल्पना करा तुम्ही ५ -१० वर्षांपूर्वी कुठे होता. तुम्ही किती बदलला? तेव्हा पासून आता परिस्थिती किती बरी झाली आहे. तुमचं लक्ष यावर केंद्रित करा. जितके आपण कृतज्ञ होऊ तितकी आयुष्यात कृपा राहील.
मजेची पहिली पायरी ही आराम करणे आहे. तुम्हाला उद्याची चिंता आणि महत्वाकांक्षा थकवत आहेत. कालचा क्रोध आणि घृणा मनात अडकून राहत आहेत. त्याच प्रकारे बेचैनी उत्साह कमी करते. दीर्घ विश्रांतीमध्ये तुम्हाला सगळे मजेशीर वाटत राहील.


प्रश्न : मी जास्त शिस्तबद्ध कसा होऊ शकतो?
श्री श्री रविशंकर: तुम्हाला शिस्तबद्ध का व्हायचे आहे? तुम्ही आनंदी राहाल? हे तुमची योग्यता वाढवेल? तुमचे आकारात राहण्याचे प्रेम किंवा आजारी पडण्याची भीती तुम्हाला शिस्तबद्ध  ठेवेल. प्रेम, भीती, आणि लोभ शिस्त  लावतो. जर कुणी तुम्हाला म्हणाले की आयुष्यात शिस्तीत राहण्यासाठी तुम्हाला १ करोड मिळतील तर तुम्ही तसे नक्की कराल.


प्रश्न : मी तुमची उपस्थिती आपल्या दैनंदिन आयुष्यात कशी अनुभवू शकतो?
श्री श्री रविशंकर:तुम्ही अगोदरच अनुभवता आहे ना?


प्रश्न : आपल्या प्रिय व्यक्तीच्या जाण्याचे नुकसान कसे सहन करावे?
श्री श्री रविशंकर: जेव्हा प्रिय व्यक्ती  जाते तेव्हा सहन करा. त्या क्षणासोबत राहा. कालच तुम्हाला त्या यातनांमधून बाहेर काढेल. त्यासाठी तुम्ही काही "करू" शकत नाही. ज्ञानात राहा.


प्रश्न: कलेचा काही उच्च उद्देश आहे का?
श्री श्री रविशंकर: कलेला काही उद्देश नाही. ती आनंदाची अभिव्यक्ती आहे. दर्शकासाठी कला सांत्वना आणि आराम देते. निर्मात्यासाठी ही एक अभिव्यक्ती आहे.


प्रश्न: मला जेव्हा काही मिळवायचे असते तेंव्हा मला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मी काय करू?
श्री श्री रविशंकर: जे तुमच्या मनात असते तेच प्रकट होते. तुम्ही स्वतःला काहीही छाप देऊ नका.त्याची गरज नाही. मान्य करा की तुम्ही स्वतःच्या गुणांना ओळखत नाही. तुम्ही नेहमी अडचणीत असता असा विचार करत असाल, पण असा विचार करणे तुम्हाला नकारात्मक दिशेकडे घेऊन जाइल. फक्त हे जाणून घ्या की तुम्हाला जे हवे आहे ते नक्की होईल.


प्रश्न: कष्ट आणि क्रोध या पासून कसे मुक्त व्हावे?
श्री श्री रविशंकर : सुदर्शन क्रिया करा, श्वास घ्या, ध्यान करा, गा. आयुष्यात थांबण्यामध्ये काही अर्थ नाही, चालत राहा. काल काय घडले यासाठी आजचा दिवस वाया घालवू नका. जागे व्हा आणि म्हणा, " या सगळ्यावर मात  करण्यासाठी मी शूर आणि धैर्यवान आहे." दुसर्यांच्या क्रोधासाठी, त्यांना शांत करायला सगळ्या  युक्त्या करायला हव्यात. मग देवावर सोडा. शिकवा आणि दुर्लक्ष करा. त्यांना काही वेळ द्या. क्षमा मग आणि लोक घृणा करणार  नाही. ते करतात ते केवळ अजाणतेपणी.


प्रश्न: आपल्याला गरजेपेक्षा जास्त मिळालेले आहे असे जाणवले तर कसे होईल आणि ते गमावण्याची भीती वाटत असेल तर?
श्री श्री रविशंकर : कृतज्ञ आणि प्रार्थनेत राहा. हे जाणून घ्या की ज्याने तुम्हाला हे दिले आहे त्याला तुमची काळजी आहे आणि ते परत घेऊन नाही जाणार. सेवा करा. तुम्ही या समाजाला परत काय देउ शकता यावर तुमचे लक्ष केंद्रित करा. हे देवाला परत देण्यासारखे झाले. नकारात्मक विचारांनी असुरक्षितता, शंका मनात येतात, ओम नमः शिवायचा जप करा. तेच तुम्हाला सरळ मार्गावर ठेवेल. भूतकाळाला आपले नशीब माना आणि भविष्यकाळाला मुक्त इच्छा. जे घडायचे आहे ते घडणार आहे. आपण अगदी उलटे करतो. जे मूर्ख लोक असतात ते भूतकाळाला इच्छा समजतात आणि भविष्याला नशीब. यामुळे तुमचे वर्तमानकाळ दुखी बनते.
ओम नमःशिवाय कित्येक हजारो वर्षांपासून आहे. पाच तत्व या मंत्राने संबोधित केली जातात आणि मंत्रातला प्रत्येक स्वर त्या पाच तत्वांना संबोधतो. उदारणार्थ, ओम ही जीवन शक्ती किंवा दैवीशक्ती आहे. जपाने अंतरात्म्याला उर्जा मिळते. हे खूप शक्तिशाली आहे आणि ह्याचा जप रोज करायला हवा. हे नैराश्य दूर करते. हे करून बघा. तुम्हाला जेंव्हाही उदास वाटते तेव्हा ओम नमः शिवाय म्हणले की नकारात्मकता दूर होते.


प्रश्न:तुमचा पालकांना काय सल्ला आहे?
श्री श्री रविशंकर: घोडेस्वारी जमली पाहिजे! जेव्हा तुम्ही घोड्याच्या पाठीवर बसता, त्यासोबत पुढे जायला हव.तुम्हाला घोड्याच्या हालचाली सोबत तुम्हालाही हालचाल करावी लागते नाही तर पाठीला त्रास होतो. पालकांना घोडेस्वारी सारखीच कसरत करावी लागेल. कधी मुलांसाठी कडक व्हावे लागेल कधी सैल सोडावे लागेल. ज्याप्रमाणे लगाम कधी खेचावे लागतात कधी सोडावे लागतात त्याचप्रमाणे हे आहे. मुलांना जाणून घ्या आणि हळू हळू मार्गदर्शन करा.  कधी कधी शिस्त दाखवावी कधी कधी  मोकळीक ही द्यावी.


प्रश्न: तुम्ही मला सांगाल माझ्यासाठी योग्य व्यवसाय काय आहे?
श्री श्री रविशंकर:याची निवड मी तुमच्यावर सोडतो आणि आशीर्वाद देतो.


प्रश्न: मी आयुष्यातील नकारात्मक चाक्रांमधून कसे बाहेर पडू?
श्री श्री रविशंकर: तुम्हाला एकदा ती चक्रे लक्षात आली की तुम्ही तेंव्हाच त्यातून बाहेर पडलेले असता.


प्रश्न: तुम्ही म्हणता की निवड आमची आणि आशीर्वाद तुमचे. मला कसे समजेल की मी योग्य निवड केली आहे?
श्री श्री रविशंकर: वेळ सांगेल. पण ते आशीर्वादासोबत आले असेल तर ते जास्त चांगले असेल.


प्रश्न: मी स्वतःमध्ये शक्ती कशी शोधू?
श्री श्री रविशंकर: आराम करा आणि तुमचं मन योग्य जागी असू द्या.तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरामाची गरज आहे. तुम्ही जर विचार केला की "मी खूप काम केले आहे" तर ते कंटाळवाणे ठरेल.फक्त जाणून घ्या की जे करण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे ते करण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ आणि उर्जा मिळेल.
The Art of living

जन्माष्टमी

ओगस्ट २२, २०११  

भगवान कृष्णाचा जन्मदिवस म्हणजे जन्माष्टमी. सत्याचे दृश्य आणि अदृश्य पैलुंमधील उत्तम संतुलन म्हणजे जन्माष्टमी; दृश्य भौतिक जग आणि अदृश्य अध्यात्मिक क्षेत्र. 
कृष्णाचा अष्टमीचा जन्म अध्यात्म आणि भौतिक अशा दोन्हीवरील प्रभुत्व दाखवतो. तो एक उत्कृष्ट शिक्षक आहे आणि अध्यात्मिक प्रेरणा आहे तसेच एक हुशार राजकारणी पण आहे. एका बाजूला, तो योगेश्वर (योगाचा देव - प्रत्येक योगीला ती अवस्था हवी असते) आणि दुसऱ्या बाजूला तो एक खोडकर चोर आहे. 
कृष्णाचा आणखी एक गुण म्हणजे तो संतांपेक्षाही पवित्र आहे आणि तरीसुद्धा तेव्हडाच खोडकर व्यापारी पण आहे! त्याचा स्वभाव म्हणजे दोन टोकांमधील समतोल आहे - म्हणूनच बहुतेक कृष्णाच्या व्यक्तिमत्वाचा थांग लागू शकत नाही. बाहेरच्या जगासाठी अवधूत हा वेडेपणा आहे आणि भौतिक माणूस, राजा,  राजकारणी हे अध्यात्मिक जगासाठी वेडेपणा आहे. पण कृष्ण द्वारकाधीश आहे आणि योगेश्वर पण आहे.
कृष्णाची शिकवण आपल्याला आजच्या काळातही उपयोगी आहे म्हणजे ते तुम्हाला भौतिक जगात हरवू देणार नाही आणि पूर्णपणे विरक्तही बनवणार नाही. ते तुमच्या आयुष्याला उजाळा देते, एका थकलेल्या आणि ताणाखाली असलेल्या व्याक्तीत्वापासून ते स्व केंद्रित आणि गतिशील व्यक्तीत्वापर्यंत.  कृष्ण आपल्याला कौशल्यपूर्ण समर्पण शिकवतो. गोकुळाष्टमीचा उत्सव आपल्याला विरुद्ध पण परस्पर पूरक गोष्टी आयुष्यात घ्यायला शिकवतो आणि तुमच्या आयुष्यात त्या प्रत्यक्ष उतरवायला शिकवतो.
म्हणूनच जन्माष्टमी साजरी करण्याचा प्रामाणिक मार्ग म्हणजे की तुम्हाला दोन्ही भूमिका करायच्या आहेत हे जाणून घेणे — या ग्रहावरची एक जबाबदार व्यक्ती आणि त्याच वेळी हे समजून घेणे की तुम्ही सर्व घटनांच्या वर आहात, स्पर्श न केलेले ब्राह्मण. तुमच्या आयुष्यात थोडे अवधूत आणि थोडे सक्रीय असणे हेच जन्माष्टमी साजरी करण्यामागचे महत्व आहे.



The Art of living 

ध्यान म्हणजे मन नसणे

जुलै २९, २०११ 

 (प्रिय वाचक जुलै २९ ला गुरुजींनी दिलेले उरलेले ज्ञान तुम्हाला थोड्याच वेळात उपलब्ध करून दिले जाईल)

प्रश्न : प्रिय गुरुजी, जेंव्हा तुम्ही असे म्हणता की मी शरीरापासून वेगळा आहे ते मला समजते, पण जेंव्हा तूम्ही म्हणता की मी मनापेक्षा वेगळा आहे ते मला समजत नाही.  मी माझ्या मनापासून कसा वेगळा आहे?
श्री श्री रवि शंकर: ओकेआता तू तुझे विचार आहेस की विचार तुझे आहेत? मन म्हणजे विचार. विचार येतात आणि जातात. तर खूप विचार येतात आणि खूप विचार जातात. खूप तुम्हाला पटतात आणि खूप नाही पटत. आणि जे विचार पटतात तेच तुम्हाला काही काळाने पटत नाहीत. नाही का? तुम्ही बसा   आणि तुमचे विचार लिहून काढा. नंतर तुमच्या असे लक्षात येईल की, ' ओह, मी तोच माणूस आहे का ज्याने हा विचार केला?'  तुम्ही आश्चर्य कराल, बरोबर? तर, त्या प्रकारे तुम्ही तुमच्या विचारांपासून वेगळे आहात. विचार येतात आणि जातात पण ते तुमच्या मध्ये येतात आणि तुमच्या मधेच जातात. ते आकाशातील ढगांसारखे आहे. पण जेंव्हा खूप विचार असतात, ते इतके ढगाळ असते, तुम्हाला असे वाटते की, 'ओह, आकाश म्हणजे ढग'. पण जर तुम्हाला स्वच्छ आकाश म्हणजे माहित असेल, मोकळ्या आकाशाचे काही क्षण, तर तुम्ही पाहाल, 'ओह आकाश हे ढगांच्या पलीकडे आहे, फक्त ढग नाही' आणि तीच साधनेमधील सुंदरता आहे. अगदी पहिल्या सुदर्शन क्रियेमध्ये काय होते? अगदी पहिल्यांदा तुम्ही कशाही शिवाय काही क्षण अनुभवता. काही क्षण; त्याने तुमची ढगाळलेली सजगता जागृत केली. तुम्ही ढग म्हणजेच आकाश असा विचार करता, पण तुम्हाला छोटे भोक मिळाले, आणि तुम्ही काळ्या ढगांच्या मागचे निळे आकाश तुम्ही बघू शकलात, बरोबर? हा तुमचा अनुभव नाही का? आता तुम्ही मागे वळून बघा की पहिले शिबीर करण्याच्या आधी, पहिले ध्यान किंवा सुदर्शन क्रिया करायच्या आधी तुम्ही काय होता? तुम्ही त्या आधी काय होता? तुम्ही आता काय आहात? तुमच्यापैकी किती जण दहा वर्ष आधीच्या माणसापेक्षा खूप वेगळे आहेत? (खूप जण हात वर करतात.) पहा, हेच दाखवते की तुमचे विचार म्हणजे तुम्ही नाही. दहा वर्ष पूर्वीच्या व्यक्तीचा जो काही विचार करता ते म्हणजे फक्त विचाराचा एक गठ्ठा आहे, मन. पण तुम्हाला थोडा अवकाश मिळाला, मनाच्या बाहेर मन नसण्याचा अवकाशाची झलक मिळाली जिथे आपण आहोत ; आणि ध्यान म्हणजे मन नसणे. पण कधी कधी ढग परत येतात आणि विचार येतात आणि ते जातात आणि त्यांच्यामध्ये कौशल्याने तुम्ही स्वतःशी केंद्रित राहता.

आत्म शक्ती (स्वतःची शक्ती) ही कुठल्याही आकारात आणि रुपात खूप शक्तिशाली आहे.


बेंगलोर आश्रम जुलै ३१, २०११ 


प्रश्न: नकारात्मक विचार कसे टाळावेत?
श्री श्री रवि शंकर: नकारात्मक विचार, तुम्हाला त्यांना का टाळायचे आहे? त्यांना येऊ देत आणि जाऊ देत. टाळणे म्हणजे तुम्ही त्यांना धरून ठेवायचा प्रयत्न करत आहात. जर ते आले तर म्हणा, ' ओह, तुम्ही आलात, हाय, बाय बाय', आणि ते जातात.
 
प्रश्न: जय गुरुदेव! पिरॅमिड मध्ये ध्यान करणे इतर जागी ध्यान करण्यापेक्षा काही वेगळे आहे का?
श्री श्री र
वि शंकर: पिरॅमिड हे बाह्य वातावरण आहे. पण फक्त पिरॅमिड मधेच चांगले ध्यान होईल असे नाही! घुमटामध्ये सुद्धा चांगले ध्यान होऊ शकते आणि मोकळ्या आकाशाखाली आणखी चांगले ध्यान होऊ शकते. म्हणून तुमची आत्म शक्ती ही इतर आकार आणि रुपांपेक्षा अधिक शक्ती शाली आहे. तुम्हाला माहिती आहे, आकार आणि रूप हे प्रभावापुरते मर्यादित आहेत पण मंत्राचे आवाज त्यापेक्षा अधिक आहेत. मंत्र आकार आणि रूपापेक्षा अधिक प्रभाव टाकू शकतात आणि त्याहीपेक्षा मूक उपस्थिती महत्वाची आहे. हे सगळे जेंव्हा ध्यान असेल तेंव्हाच परिणामकारक असते.
 
प्रश्न: श्रोत्यांमधील एकानी हा प्रश्न विचारला. नीट ऐकू शकले नाही.
श्री श्री रवि शंकर: तुम्ही अध्यात्मात आहात याची तुमचे मित्र मजा उडवतात का? हो, तुम्ही फक्त हसा आणि म्हणा, ' तुम्ही किती मोठ्या गोष्टीला मुक्त आहात हे तुम्हाला माहित नाही.' त्यांना सांगा, 'तसेही तुम्ही या गोष्टी पळणार आहातच; ही फक्त वेळेची गोष्ट आहे', तुम्ही त्यांना सांगा. ' पाच वर्षांत तुम्ही या ज्ञानासाठी याल आणि आम्ही यात अग्रभागी आहोत', त्यांना सांगा,'या सगळ्याची सुरुवात करणारा मी आहे, आम्ही पहिल्यांदा चव घेतो आणि जे उरते ते तुम्ही घेता'. जर कोणी तुमची गम्मत करत असेल, तुम्ही फक्त हसा, तुमचे हास्य हरवू नका. त्यांना सांगा थांबा, थांबा, हा फक्त काही वर्षांचा प्रश्न आहे; तुम्ही पण हेच कराल. त्यांना सांगा की तुम्हाला उष्टे खायची सवय आहे; त्यांना सांगा, ' मी चांगले अन्न घेत आहे
The Art of living