आपल्याला कशाची गरज आहे तर आंतरिक समृद्धीची आणि बाह्य कृतीशीलतेची

मंगळवार, ऑगस्ट १०, २०१०

ऑगस्ट ५,२०१०,वोबुर्ण,मेसेच्युसेट्स, युएसए
तुम्ही काय करता जेव्हा गर्दीत अडकता? (प्रेक्षक यादी सांगतात) तुम्ही देवाला सच्च्या मनाने ती दूर करण्यासाठी प्रार्थना करू शकता. तुम्ही गाडीत गाणे ऐकण्याचा आनंद घेऊ शकता. तुम्ही बाहेर जाण्याचा जवळचा मार्ग घेऊ शकता. तुम्ही एकतर गर्दीचा आनंद घेऊ शकता किंवा श्लोक म्हणू शकता. आता काय करू नये? तक्रार. हे थांबवा आणि तुम्ही तुमचा उत्साह कायम ठेवू शकाल. आपण या जगात या उत्साहासकटच येतो पण वाटेत तो कुठेतरी हरवतो. आपण जसजसे मोठे होत जातो, आपण सकारात्मतेकडून नकारात्मतेकडे जातो. तर या ट्राफिक जॅमकडे बटणे दाबण्याच्या परीक्षेसारखे बघा. 

प्रत्येक घटना ही
विवेकात खोलवर जाण्याची एक संधी असते. एखादी  अप्रिय घटना कुठेतरी आपल्या जन्मासोबत आलेल्या ज्ञानाला बाहेर काढते. सकारात्मक किंवा नकारात्मक, प्रत्येक घटनेमुळे हेच होते.  जर घटना आपल्यावर  प्रबळ झाली, आपण भावना आणि बुद्धिमत्ता हरवून बसतो. मग आपल्याला मदतीची गरज भासते. इथेच समन्वय येतो. आपण एकत्र बसतो आणि गातो आणि भार हलका होतो. प्रत्येकाने आयुष्यात थोडा वेळ ध्यान करण्यासाठी काढायला हवा. यालाच सत्संग, सत्याबरोबर राहणे म्हणतात. आयुष्यात सत्याचा सामना करत राहा. काहीच क्षण शांती, स्थिरता, आणि मजबुती आणू शकतात. 
लोकांना वाटत हे सगळा कंटाळवाणं आहे. त्यांना वाटत ज्ञान हे फार गंभीर आहे. मी म्हणतो ज्ञानाबरोबर जा आणि मजा तुमच्याबरोबर येईल,पण मजेच्या मागे जाल तर कष्ट तुमच्या मागे येतील. आत्मज्ञान तुम्हाला हलके आणि लहान मुलांप्रमाणे बनवतो. आंतरिक उत्साह आणतो. हेच अध्यात्म होय.

अनुभव करा की सगळं ठीक आहे. सगळं ठीक होईल. तेंव्हाच आपण आत जाऊन ध्यान करू शकतो. तुम्ही जेव्हा ध्यान करता, सगळं ठीक रहाते. जेव्हा तुम्ही ध्यानातून बाहेर येता तेव्हा तुम्हाला काहीच दिसत नाही. तुम्ही आयुष्यातल्या, जगातल्या समस्येप्रती सजग होता. तुम्ही ह्यासाठी काहीतरी केले पाहिजे. ध्यान हे स्वतःशी हास्य आहे आणि सेवा दुसर्यांच्या चेहेर्यावर हास्य आणते. तर पहिले तुम्ही आंत जायला हवय "सगळं ठीक आहे" या भावनेमध्ये. हे जाणून घ्या की तुम्ही सुरक्षित आहात आणि आणि तुमची काळजी घेतली जात आहे. हा विश्वास यायला हवा. हेच ध्यान आहे.

मग जेव्हा तुम्ही बाहेर येता, तेंव्हा काम करताना काय चूक आहे हे तुम्ही जाणू शकता आणि त्यावर काम करू शकता. हे सगळं कर्तव्य समजून करू नका. हे कर्तव्य म्हणून नाही तर तुमचा सहज स्वभाव असल्यासारखे करा. जर तुम्ही कर्तव्य समजलात तर त्यात सुंदरता नसेल. सेवा करा आणि हसत राहा. हसा आणि सेवा करा. सहसा आपण सेवेत हसत नाही. लोक त्रासून जातात आणि दुसर्यांना सेवेच्या नावाखाली त्रास देतात. आणि
जे लोक आनंदात असतात ते सेवा करीत नाही! दोन्ही प्रकारचे लोक एकाच पायावर चालतात. तुम्हाला दोन्ही गुणांची गरज आहे, आंतरिक ऐश्वर्य आणि बाहेरील कृतिशीलता.
The Art of living
ओगस्ट  १४
श्री श्रीं बरोबर च्या सत्संगामधून

प्रश्न: गुरुजी  मी पहिल्यांदा आश्रमामध्ये येत आहे आणि येथे येऊन मला खूप आनंद होत आहे. मला अस वाटत कि तुम्हीच मला येथे घेऊन आला आहात. आपण आपल्या सार्वजनिक दैनंदिन जीवनामध्ये काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टीना सामोरे जात असतो आणि काही वेळा आपण या मार्गावरून बाजूला हटतो. मी दररोज ध्यान, योग व प्राणायाम करतो. मी जेव्हा एकांतामध्ये असतो तेव्हा स्वतःकडे पाहायला व सात्विक गुण आत्मसात करण्यासाठी खूप सोपे जाते. सर्वांतर्फे माझा एक प्रश्न आहे कि जीवनामध्ये चांगल्या व वाईट गोष्टींचा सामना करीत असता सात्विक गुण, पवित्रता अंगी कशा जोपासायच्या?
श्री श्री : याबद्दलची जागरुकताच ती घेऊन येयील.ध्यान करा, सुदर्शन क्रिया करा सत्संगला जा आणि चांगल्या लोकांच्या संगती मध्ये राहा. ते सर्व घडेल. 


प्रश्न: गुरुजी गुरु आणि सत्गुरू यामधील फरक काय?
श्री श्री: सत हे फक्त गुरूच्या आधी जोडले गेले आहे. दोन्ही मध्ये काही फरक नाही. ते फक्त एक नाव आहे, दोन्ही एकच आणि सारखे आहेत. 


प्रश्न: भगवत्गीतेमध्ये धर्म आचरत असताना ४ पायऱ्या सांगितल्या आहेत. सत्य, नियमांचे पालन, सात्विकता, दया. मी शेतकीय विभागामध्ये सुपर्वाझेर म्हणून कामाची देखरेख करीत असताना माझ्या खालच्या सहकार्यांवर मी कामाच्या तणावामुळे (औद्योगिक क्षमता आणि उत्पादन वाढवण्यामुळे) दया दाखवू शकत नाही. 
श्री श्री: जे दुखी: आहेत त्यांचाशी दया दाखवावी, पण जे उद्धट आणि काम चुकारपणा करतात त्यांचाशी कडक वागले पाहिजे कुणाचा प्रामाणिकपणा न दुखावता.मित्रता, दया, सुख, उदासीनता:या चार गुणांपैकी :एक उच्च ध्येय्य गाठण्यासाठी सर्वजण एक करू शकता, उदासीनतेचा अभ्यास करायची जरुरी आहे किवा व्यवस्थित समजण्याची गरज आहे. . 

प्रश्न: गुरुजी मी एस प्लस केला आहे. मी दोन वर्षानंतर आश्रमामध्ये येत आहे आणि मी इथे काही दिवसांपासून आहे, मला आता आश्रम सोडून जावेसे वाटत नाही. मी माझ्या घरच्या जबाबदाऱ्या आणि इथे रहायची इच्छा यामध्ये साधर्म्य कसे साधू?
श्री श्री: दोन्ही कर. तुला दोन्न्हींची घरच्या जबाबदाऱ्या आणि इथे राहून सेवा करायची इच्छा यांची सांगड आणि काळजी  घेता आली पाहिजे.




The Art of living


नवरात्री : स्रोतापर्यंतचा प्रवास

नवरात्रीचा सण प्रार्थना आणि आनंदाने अश्विन आणि चित्र महिन्याच्या सुरुवातीला साजरा केल्या जातो. हा अवधी  स्वतःला समजण्याची आणि स्वतःकडे परतायची वेळ आहे. ही परिवर्तनाची वेळ आहे, प्रकृती जुने टाकून नवे धारण करते, प्राणी शीतनिद्रेत जातात आणि वसंतामध्ये नवीन जीवन सुरु होते.


वैदिक शास्त्राप्रमाणे, गोष्ट वारंवार निर्माण होण्यासाठी आपल्या मूळ आकारात जाते. ही रचना एकरेषीय नाही तर चक्रीय आहे. सर्व काही पुनर्निर्माण होत असते, कायापालटाची एक निरंतर प्रक्रिया. तरीपण, मानवी मन या निरंतर चक्राहून मागे पडते आहे. नवरात्री हा मन पुन्हा सोत्राकडे मागे नेण्याचा उत्सव आहे.
शक्ती माता ही फक्त बुद्धीदेवता नाही तर भ्रांतीदेवता म्हणूनही ओळखली जाते; ती नुसतीच लक्ष्मीदेवता नाही तर क्षुधादेवता (भूक) आणि तृष्णादेवता (तहान) पण आहे. सृष्टीच्या या रचनेत शक्तीचे हे रूप जो जाणतो तो सखोल समाधी अवस्थेत जातो. हे जुन्या पश्चिमेतील धार्मिक संघर्षाला उत्तर आहे.  ज्ञानाद्वारे, निष्काम कर्माद्वारे आणि समर्पणाद्वारे अद्द्वैत सिद्धी प्राप्त केली जाऊ शकते. 
काली ही प्रकृतीची सगळ्यात भयानक अभिव्यक्ती आहे. प्रकृती हे सुंदरतेचे प्रतिक आहे, तरीपण त्याचं भयंकर स्वरूप आहे. दोन विरुद्ध गोष्टींचा स्वीकार करताना मनात पूर्ण स्वीकृती येते आणि मन शांत ठेवते.  

नवरात्री हा वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करणारा सण म्हणून जरी साजरा केला जात असला तरी, मूळ लढाई ही वाईट आणि चांगल्याची नाही. वैदिक दृष्टीकोनातून बघितले गेले तर, संपूर्ण सत्याचा स्पष्ट द्वंद्वावर विजय आहे. अष्टावक्राच्या शब्दात सांगायचे तर एका छोट्या लाटेचा समुद्रापासून आपली ओळख लपवण्याचा हा प्रयत्न आहे, पण काही फायदा नाही. 

तीन बीजभूत गुणांना आपल्या भव्य ब्रम्हांडाची स्त्री शक्ती मानले जाते. नवरात्री दरम्यान देवीची पूजा केल्याने, तीन गुणांचे संतुलन होते आणि वातावरणातील सत्व वाढते. 

हा आत नेणारा प्रवास आपल्या नकारात्मक कर्मांना नष्ट करतो. नवरात्री हा उत्सव आहे भाव आणि प्राणाचा जो एकटाच महिषासुर (जडता), शुंभ - निशुम्भ (गर्व आणि लज्जा) आणि मधु - कैटभ (तृष्णा आणि घृणा चे तीव्र रूप) यांना नष्ट करू शकतो. ते पूर्णपणे एकमेकांच्या विरुद्ध असले तरी परस्परपूरक आहेत. जडता, आत खोलवर असलेली नकारात्मकता, आग्रह (रक्ताबीजासुर), अनुचित तर्क (चंड - मुंड), आणि नीट पाहू न शकणारी दृष्टी (धूम्रलोचन) या सगळ्यावर मात करायला जीवन शक्ती उर्जा, प्राण आणि शक्ती वाढवायला लागेल. 

साधक उपवास, प्रार्थना, मौन आणि ध्यान या द्वारे खऱ्या स्रोत्राकडे परतू शकतो. रात्र म्हणतात कारण ती नवीन जीवन आणते. हे आपल्या अ अस्तित्वाच्या तीन स्तरावर समाधान देते - शारीरिक, सूक्ष्म,आणि कारण. उपवास शरीरातील दुषित द्रव्य काढतो, मौन वाचा शुद्ध करतो आणि अशांत मनाला शांत करतो, आणि ध्यान स्वत्वात नेतो.

ज्या तीन बीजभूत गुणांपासून ब्रह्मांड बनले आहे त्या गुणांना वाढवण्यासाठी नवरात्रीचे नऊ दिवस संधी आहे. जरी आपल्या आयुष्यावर तीन गुणांचा प्रभाव आहे, तरी आपण त्यांवर क्वचितच ओळखतो किंवा विचार करतो. नवरात्रीचे पहिले तीन दिवस तमोगुण म्हणून  संबोधले जातात, पुढचे तीन दिवस रजोगुण आणि शेवटचे तीन दिवस सत्त्वगुण. आपली चेतना तमो आणि रजो गुणा द्वारे  प्रवास करते आणि शेवटच्या तीन दिवसात सत्वगुणाद्वारे  बहरते. जेव्हा हे सत्व आयुष्यात वाढते तेंव्हा साहजिकच विजय होतो. दहाव्या दिवशी ह्या ज्ञानाचे सार विजयादशमी म्हणून सन्मानिले जाते आणि साजरी केले जाते.

जरी संसाराचे सूक्ष्म दर्शन या विश्वातच आहे, त्याचा मानलेला वेगळेपणा हाच वादाचे कारण आहे. ज्ञानी व्यक्तीसाठी, पूर्ण जगताची निर्मिती सजीव आहे आणि ज्या प्रमाणे लहान मुले सगळ्यात जीवन बघतात त्याचप्रमाणे तो सगळ्यातच जीवन बघतो. पृथ्वी माता किंवा शुद्ध चेतना यांनीच स्वतः सगळी  रूपे आणि सगळी नावे व्याप्त केली आहेत. प्रत्येक रुपात आणि नावात देवत्व ओळखणे हाच नवरात्रीचा उत्सव आहे. म्हणूनच, जीव आणि प्रकृतीच्या सगळ्या पैलूंचा सन्मान करणाऱ्या विशेष पूजा शेवटच्या तीन दिवसात साकारल्या जातात.

The Art of living