जग हे माणसांनी आणि चुकांनी भरले आहे. चुकांना माफ करा आणि लोकांवर प्रेम करा

बंगलोर , जून २२ :

प्रश्न : प्रिय गुरुजी, देवी कालीचे दर्शन देऊन विवेकानंदानी रामकृष्ण परमहंसाना आशीर्वाद दिला असे आम्ही वाचले आहे. लोकांना हाच अनुभव आजसुद्धा येऊ शकतो का?
श्री श्री रवि शंकर : याउलट आहे. रामकृष्णानी विवेकानंदाना आशीर्वाद दिला. खूप अनुभव घडले. ती फक्त एक शक्ती होती जिच्यामुळे संपूर्ण वातावरण बदलले. अध्यात्मिक शक्तीने नाते आणि मन बदलले.

प्रश्न :गुरुजी , एक माणूस एकापेक्षा जास्त बीज मंत्र एका आयुष्यात घेऊ शकतो का?
श्री श्री रवि शंकर : हो, काहीच अडचण नाही.

प्रश्न : गुरुजी , जेंव्हा तुम्ही तारुण्यात पदार्पण केले तेंव्हा तुम्हाला कोण आवडले?
श्री श्री रवि शंकर : देवत्व, आणि तेच अजूनही आवडत आहे, हो!

प्रश्न : माझ्या आयुष्याशी निगडीत निर्णयांबद्दल मी संभ्रमावस्थेत असतो. मी काय करू?
श्री श्री रवि शंकर : संभ्रमावस्था चांगली आहे, तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही नेहमीच संभ्रमावस्थेत असता. याचा अर्थ असा की तुमची प्रगती होत आहे. ठराविक कल्पना मोडून जेंव्हा नवीन कल्पना येतात तेंव्हाच संभ्रमावस्था येते. पण ती तात्पुरती स्थिती असते. नवीन कल्पना येतात, तुम्ही त्याचबरोबर पुढे जाता आणि ते मोडल्यावर परत संभ्रमावस्था येते. तर तुम्ही पुढे जात आहात.

प्रश्न : मी अशा ठिकाणी राहतो जिथे मी बंदूक घेऊन फिरलो नाही तर मला मारून टाकतील, अशा जागी मी अहिंसक कसा राहू? मी काय करू?
श्री श्री रवि शंकर : हिंसाचार म्हणजे स्व-सुरक्षा नाही आणि अहिन्साचार म्हणजे स्व-सुरक्षेचा अभाव असेही नाही. तुम्ही स्व-सुरक्षेसाठी तयार असले पाहिजे यात काही शंकाच नाही, पण तुमच्या मनात आणि हृदयात अहिंसा ठेवा. आणि मग तुम्हाला अहिंसा दिसेल, अशी अहिंसा की हिंसाचारी लोक सुद्धा हिंसाचार सोडून देतील.

मी जेंव्हा वॉशिंगटन डी. सी. मध्ये होतो, लोस एंजिलीस मध्ये होतो तेंव्हा हे माझ्याबरोबर इतक्या वेळा झालेले आहे. दोन्ही ठिकाणी एक सभ्य पुरुषाला माझ्यावर हल्ला करायचा होता. त्याने मला येशूच्या नावाने शाप दिले आणि म्हणाला की हे सगळे पैशाचिक आहे, योग पैशाचिक आहे. हा उंच जाड्या माणूस जसा पुढे आला, मी म्हणालो " थांब". आमच्याकडे कुठलीही हत्यारे नव्हती आणि सुरक्षा व्यवस्था पण नव्हती. तो त्याच्या गुढग्यांवर बसला आणि रडायला लागला. सगळ्यांना इतके आश्चर्य वाटले, तो सत्संग होता, अशाप्रकारे कोणी हल्ला करेल असे कोणालाही वाटले नव्हते. मी फक्त म्हणालो, "थांब, थांब', आणि तो वाकला आणि त्याने रडायला सुरुवात केली. नंतर त्याने शिबीर केले.
तुम्हाला माहिती आहे, गैरसमजुतींमुळे हिंसा होवू शकते. ताण आणि अत्याचारांमुळे हिंसा होवू शकते. पण जेंव्हा आपण अहिंसेमध्ये विश्वास ठेवतो आणि हृदयातील शक्तीबरोबर चालतो तेंव्हा तुम्हाला मोठा फरक दिसेल. अशा कितीतरी घटना आहेत.

खूप पूर्वी मी दिल्ली आणि नोयडा मध्ये होतो. हजार लोक मशाली घेऊन माझी गाडी जाळायला आले होते. मी फक्त माझा हात दाखवला आणि म्हणालो, "थांबा, तुम्हाला काय हवे ते करा फक्त १० मिनिटे मला बोलू द्यात. पण तेंव्हाच, त्या १० मिनिटात ते सर्व बदलले. त्या दिवसात, १९८० मध्ये, नोयडा इतका प्रगत नव्हता, ते सर्व जंगल होते, चोर - लुटारूंचे खेडे. म्हणून आपण अहिंसेमध्ये विश्वास ठेवला पाहिजे आणि मी असे म्हणत नाही की तुम्ही हत्यार वापरू नका किंवा स्व-सुरक्षा शिकू नका. जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे अहिंसेमध्ये मुरत नाही तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टींचा आधार घेऊ शकता, तुम्ही स्व सुरक्षेसाठी साधणे बाळगू शकता.

प्रश्न : मी माझी एक खूप चांगली नोकरी सोडली कारण तेथे खूप इर्षा धोका देण्याचे प्रकार होते. अशा नकारात्मक लोकांबरोबर कसे काम करावे?
श्री श्री रवि शंकर : कौशल्याने. नकारात्मक लोकांमुळे तुमच्यामधील अनेक कौशल्ये बाहेर येतात. तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजेत कारण त्यांनी तुम्हाला त्यांचाबरोबर कसे वागायचे ते शिकवले, त्या सर्व परिस्थितींमधून कसे बाहेर पडायचे आणि आणि पुढे जायचे हे त्यांचामुळे तुम्ही शिकला. आणि ते तुमची सर्व बटणे दाबातील आणि तुम्ही त्या बटण पासून मुक्त व्हाल.

प्रश्न : गुरुजी,खूप वेळा मला वाईट स्वप्ने पडतात. मी त्यापासून कशी सुटका करून घेऊ?
श्री श्री रवि शंकर : ध्यान करा, झोपी जायच्या आधी पण ध्यान करा आणि काही चांगले मंत्र ऐका, त्याने मदत होईल.

प्रश्न : गुरुजी, माझे आयुष्य अनेक वर्षांपासून अडीअडचणीने भरलेले आहे कि मला आता सगळे सोडून द्यावेसे वाटते. माझे वडील म्हणतात कि कोणीतरी आमच्या कुटुंबावर जादू टोणा केला आहे. जादू टोण्यासारख्या गोष्टी आहेत का आणि त्यातून मी कसा बाहेर पडू?
श्री श्री रवी शंकर: साधना, सेवा आणि सत्संग करा, काळी जादू तुम्हाला शिवू पण शकणार नाही. मंत्र म्हणा, वेदिक मंत्रोच्चार करा, रुद्र, ओम नमः शिवाय चा जप. या सगळ्याची मदत होईल.

प्रश्न : मी जेंव्हा यु. एस. मध्ये असतो तेंव्हा मला भारतात यायचे असते आणि मी जेंव्हा भारतात असतो तेंव्हा मला यु. एस. ची आठवण येते, मी काय करू?
श्री श्री रवि शंकर : बर, आत्ता जे करत आहात तेच करा, याची आठवण येऊ दे त्याची आठवण येऊ देत पण तुमचे ध्यान विसरू नका, साधना, सेवा आणि सत्संग विसरू नका. ते सगळीकडेच असेल.

प्रश्न : गुरुजी, महाभारतामध्ये कृष्णाने कौरव आणि पांडव दोघांना पाठींबा दिला. त्याने पांडवांच्या बाजूने शस्त्र का उचलले नाही जेंव्हा की त्याने पूर्ण सेना कौरवांच्या बाजूने पाठवली होती?
श्री श्री रवि शंकर : कृष्णाचे स्वतःचे मार्ग होते, अत्यंत गुड, तुम्ही समजू शकणार नाही. सोडून द्या. ज्याने कृष्णाला समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यांना समजले नाही, वेगवेगळे लोक, वेगवेगळे गट कृष्णामध्ये वेगवेगळ्या गोष्टी बघत असतात. म्हणूनच त्याला पूर्णावतार म्हणतात, तो प्रत्येक बाजूने पूर्ण आहे. एकमेवच.

प्रश्न : गुरुजी, ध्यानामुळे दृष्टीकोन बदलतो हे तर सरळच आहे, ध्यानामुळे कौशल्य पण वाढते का?
श्री श्री रवि शंकर : हो, नक्कीच

प्रश्न : गुरुजी , भाव समाधी बद्दल सांगू शकता का. आम्ही त्याचा अनुभव घेऊ शकतो का?
श्री श्री रवि शंकर : हो, भाव समाधी. बसा आणि संगीतामध्ये, भावनेमध्ये, भावामध्ये पूर्णपणे विरघळून जा. जेंव्हा मन स्थिर आणि शांत असते, तेंव्हा त्या क्षणी तुम्हाला नृत्य करावे असे वाटते. विचार आणि चिंता समाप्त होतात.

प्रश्न : मला माझे आई-वडील आणि माझे प्रेम यातील निवड का करावी लागते आहे?
श्री श्री रवि शंकर : अवघड प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा, “ माझ्या आई-वडिलांना आवडत नाही अशा व्यक्तीला मी का निवडू किंवा माझे आई वडिलांना मी निवडलेली व्यक्ती का आवडत नाही?" तारेवरच्या कसरतीसारखे आहे, बरोबर?

प्रश्न : भक्ताचे देवावरचे प्रेम कमी होऊ शकते का आणि जर कमी झाले तर ते बदलण्यासाठी काय करावे?
श्री श्री रवि शंकर : वेळ जाईल तसे ते बरोबर होईल.

प्रश्न : भावना, शरीर, मन आणि राग यांचे काय काम आहे?
श्री श्री रवि शंकर : तुमचे शरीर स्वस्थ ठेवा आणि भावना सकारात्मक ठेवा. खूप सोपे आहे. हे असे विचारण्यासारखे आहे की " मी माझा शर्ट कुठे ठेवू आणि प्यांट कुठे ठेवू?" तुमचा शर्ट वर ठेवा आणि प्यांट खाली. दुसरी पद्धतच नाही. प्रत्येकाची आप-आपली जागा आहे: अहंकाराची आपली जागा, भावनेची आपली जागा, आपले शरीर स्वस्थ आणि ताकदवान पाहिजे. निसर्गाच्या नियमांचा आदर केला पाहिजे, ठीक आहे?

प्रश्न : जेंव्हा अनेक रस्ते असतात तेंव्हा मी निवडलेला रस्ता बरोबर आहे हे कसे ओळखावे?
श्री श्री रवि शंकर : जेंव्हा शंका येतात, तेंव्हा खात्री बाळगा की तो योग्य रस्ता आहे. बऱ्याच वेळा, जेंव्हा खरे असते तेंव्हाच शंका येते. आपण ज्याची शंका घेतो, ते सगळे चांगले आहे. जर कोणी तुम्हाला विचारले की तुम्ही आनंदी आहात का तर तुम्ही म्हणाल, "मी खात्रीपूर्वक नाही सांगू शकत". पण तुम्हाला तुमच्या दु:खाबद्दल पूर्ण खात्री असते, बरोबर? त्याचप्रमाणे जर तुम्हाला कोणी सांगितले की त्यांचे तुमच्यावर प्रेम आहे, तुम्ही म्हणाल, "खरच?" आणि जर कोणी म्हणाले, " मी तुझा द्वेष करतो",तर तुम्ही कधीही विचारात नाही की " खरच?"
बऱ्याच वेळा, आपल्या शंका चांगल्या गोष्टींसाठी असतात. जेंव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या मार्गावर असता, मार्ग चांगला की वाईट ही शंका येणारच.

प्रश्न : विश्वासघात कसा विसरावा? कुणीतरी माझा फार पूर्वी विश्वासघात केला आणि तो माणूस सारखा माझ्या मनात येत राहतो. योग, प्राणायाम, ध्यान केल्यानंतर ते विचार कधीतरी येतात. आधी सारखे सारखे यायचे. ते विचार संपूर्णपणे कसे काढून टाकावे?
श्री श्री रवि शंकर : ते आधीच कमी झाले आहे, हो की नाही? आतापर्यंत किती कमी झाले आहे? कधीतरी ते विचार येतात, बरोबर? मग काय? त्याने काही फरक पडत नाही. तुम्ही ते जितके टाळाल, ते परत येत राहील. ते स्वीकारा, हा आयुष्यातला अनुभव आहे.

प्रश्न : असे म्हणतात की एखादी गोष्ट करून करून, अभ्यास करून माणूस परिपूर्ण होतो, पण परिपूर्ण कोणीच नसते, मग अभ्यास का करावा?
श्री श्री रवि शंकर : अभ्यास का करावा? कारण तसेही कोणी परिपूर्ण नाही. हो.
तुम्ही जेवता, आणि मग पोट रिकामे होते आणि परत, तुम्ही खाता आणि परत पोट रिकामे होते आणि तुम्ही परत खाता. मग, कशाला खायचे? पोट जर सारखे रिकामेच होणार असेल तर खायची काहीही गरज नाही.

प्रश्न : गुरुजी, कोणी जर एकसारखे खोटे बोलत असेल आणि सारखे दुसरी संधी मागत असेल तर काय करावे?
श्री श्री रवि शंकर : जर कोणी एकसारखे खोटे बोलत असेल तर काय करावे?
कोणीतरी मला काळ एक प्रश्न विचारला, " गुरुजी, तुम्ही माझावर रागावला आहात का?" मी म्हणालो, "नाही". याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझाशी नेहमी खोटे बोलत राहाल. आता, मला माहित आहे की काही लोक वाईट गोष्टी करतात, चुकीच्या गोष्टी बोलतात आणि इतरांच्या विश्वासाचा दुरुपयोग करतात. ते म्हणतात, " मी आताच गुरुजींशी फोन वर बोललो आणि ते असे असे म्हणाले."
मी माफ करतो आणि रागावत पण नाही पण मला त्यांची दया येते कारण ते त्यांचा डोक्यावर चिखल टाकत असतात. ते त्यांनाच त्रासदायक ठरत असतात. मग अशा लोकांवर रागावून मी माझे मन का खराब करावे? मला राग येत नाही पण दया येते कारण ते इथे तिथे जाऊन लोकांना त्रास देत असतात.

पिताजींनी एक वाक्य लिहिले आहे, " हे जग माणसांनी  आणि चुकांनी भरलेले आहे. चुकांना माफ करा आणि लोकांवर प्रेम करा." किती छान गोष्ट सांगितली आहे!
The Art of living
© The Art of Living Foundation

जेंव्हा तुम्ही ध्यान करता तुमचे मन शांत होते, आणि ते शांत मन देवाचे घर असते.

 
बेंगलोर, मे २२

प्रश्न : जय गुरुदेव, गुरुजी, मी मन, बुद्धी, स्मृती, अहंकार इ. मधून जगाला ओळखतो. पण या सहा पायऱ्या ओलांडल्यानंतरच मी मला स्वतःला ओळखू शकतो. तर माझा प्रश्न असा आहे की जेंव्हा आपण या सहा पायऱ्या ओलांडतो, त्यानंतर स्वतःला सातव्या पायरीवर कसे ठेवावे?
श्री श्री रवि शंकर:  आपल्याला या सहा पायऱ्या सोडायची गरज नाही; आपण शरीर, मन आणि बुद्धी सोडू शकत नाही. आपल्याला याबरोबर राहिलेच पाहिजे आणि स्वतःला ओळखले पाहिजे. शरीर, मन स्मृती आणि बुद्धी आहेत आणि त्यांना तिथेच राहू देत. तुमचे काम सुरु होण्याआधी आणि झाल्यानंतर रोज काही मिनिटे ध्यान करा आणि आराम करा. हे पहा, जेंव्हा तुम्ही ध्यान करता आणि तुमचे मन शांत होते, ते शांत मन देवाचे घर असते. म्हणूनच तुम्ही देवाला जणू शकत नाही पण देवाबरोबर एकरूप होऊ शकता. तुम्हाला शांत वाटत असेल, आनंदी वाटत असेल, तुम्ही तुमच्या आत जात असता. यात तुम्ही "मीच सगळे काही आहे, हे सर्व मीच आहे'.

प्रश्न : जय गुरुदेव. गुरुदेव. मी तुमची खूप सारी पुस्तके वाचली आहेत आणि सत्य साई बाबा आणि ओशोंची पण वाचली आहेत. मला त्यांच्यात काही फरक वाटला नाही, ते सर्व प्रेमाबद्दल बोलतात आणि मला वाटते की ते फक्त वेगवेगळी भौतिक रूपे आहेत. ओशोंचा झोर्बा द बुद्ध या संकल्पनेचा माझ्यावर खूप परिणाम आहे. मला तुमच्या त्याबद्दलच्या धारणा माहिती करून घ्यायच्या आहेत. ते ज्याप्रकारे भौतिक आणि अध्यात्मिक दोन्ही विषयांवर एकदम बोलले ते मला आवडले. तुम्हाला काय वाटते ते ऐकायचे आहे.
श्री श्री  रवि शंकर: हो, ते खूप मोठे वक्ते होते आणि ते खरच खूप चांगले बोलायचे. त्यांना एक खोल बौद्धिक अंतर्दृष्टी होती की जे चांगले आहे पण एक गोष्ट नव्हती ती म्हणजे मंत्रांचे ज्ञान; मंत्रांच्या रूढीचे ज्ञान. बुद्ध म्हणाले की हे काही नाहीये, सगळे नाही आहे आणि ते असेही म्हणाले की त्यांनी अंतिम गोष्टीचा शोध घेतला, मी स्वतःचा शोध घेतला पण मला असे लक्षात आले की स्व नाहीच. मी शोधले आणि खुप शोधले आणि असे लक्षात आले की आत्मा पण नाही.
पण सनातन धर्मामध्ये, आदि शंकराचार्य म्हणतात ‘कोणाचा शोध घेतला जातो? काय आहे की जे सापडले नाही?' ते नाण्याच्या दोन बाजुसारखे आहे. ते रिकामेपणाबद्दल बोलतात आणि दुसऱ्या बाजूला वेदांत पूर्णत्वाबद्दल बोलते. ती एक पायरी आहे, कुणीतरी पासून कुणी नसणे ही एक पायरी आहे, आणि वेदांत तुम्हाला कुणीही नसल्यापासून कुणीतरी सगळ्यांकडे घेऊन जाते.

प्रश्न : प्रिय गुरुजी, असे म्हणतात की पुनर्जन्मातून आपले आत्मे परत परत वापरले जातात, तरी सुद्धा जगाची लोकसंख्या वाढत आहे. बाहेरच्या ग्रहावरील आत्मे पृथ्वीवर येऊन राहात आहे की इतर जीव मनुष्य जन्म घेत आहेत?
श्री श्री रवि शंकर: इतर जीव. दोन्ही शक्य आहे, दोन्ही गोष्टी घडत आहेत.

प्रश्न : गुरुजी , डॉ. स्टीफन हॉकिंग यांना यांना आताच्या मनुष्य जन्माबद्दल खूप विश्वास आहे. ते म्हणतात की या आयुष्याच्या पलीकडे काही नाही, या अस्तित्वाशिवाय दुसरे काही नाही. मला माहित नाही की धर्मांचा किती अभ्यास त्यांनी केला आहे पण मला माहित आहे की तुम्ही भौतिक शास्त्राचा अभ्यास केला आहे. तर तुम्ही त्यांना कसे उत्तर द्याल?
श्री श्री रवि  शंकर:  कोणीही शास्त्रज्ञ असे म्हणणार नाही की, ' मला सगळे काही माहित आहे आणि इथे जे काही आहे तेवढेच आहे आणि त्या पलीकडे काही नाही'. अजिबात नाही, स्टीफन हॉकिंग असे नाही म्हणाले की इथे आहेच तेच सर्वस्व आहे. ते म्हणाले की अनेक स्तर आणि आयाम आहेत. आपला मेंदू लहरी विश्लेषक आहे; तो काही विशिष्ट लहरींचे विश्लेषण करू शकतो. आत्ता या क्षणी अनेक इतर लहरी आहेत. त्यामुळे कोणीही शास्त्रज्ञ वेवेगळ्या स्तरांवरचे अस्तित्व, अनेक विश्व, यांचे असणे नाकारू शकत नाही, कारण अनेक तरंग आहेत. तुम्ही जे पाहता ते तरंगांचे काम आहे आणि त्यांत अनंत स्तर आहेत, एक आत आणि दुसरी त्याचा आत. मायक्रोसोम पासून म्याक्रोसोम पर्यंत, इतकी विश्व आहे आणि काळाचे वेगवेगळे स्तर.

प्रश्न : जय गुरुदेव. रामकृष्ण परमहंस हे मोठे साधक होते, त्यांनी आयुष्यभर साधना केली तरी आयुष्याच्या शेवटी त्यांना त्रास झाला, का?
श्री श्री रवि शंकर: कधी कधी, गुरु त्यांच्या शिष्यांचे कर्म घेतात. त्यांच्या शिष्यांच्या कर्मामुळे त्यांना शारीरिक आजारामधून जावे लागले. प्रत्येकानेच त्यातून जावे असे काही नाही, काही गुरु तसे करायला निवडतात, एवढेच!

प्रश्न : कधी कधी मी कामामुळे थकून जातो आणि स्वतःवरचे नियंत्रण हरवून बसतो. मी स्वतःवर नियंत्रण कसे ठेवू कारण याचे परिणाम माझ्यासाठीच त्रासदायक असतात?
श्री श्री रवि शंकर: हो, म्हणूनच जेंव्हा तुम्ही थकून जाता, बस आणि ध्यान करा. प्राणायाम करा आणि ध्यान करा त्याने तुमचा थकवा निघून जाईल.

प्रश्न : प्रिय गुरुजी, मला एक लक्षात आले आहे की जेंव्हा कोणी तुम्हाला फुलांची माल घालतो ती पडते, असे का?
श्री श्री रवि शंकर: फुलांच्या माळांची काही गरज नाही, ती मी तुम्हाला परत देतो आहे.

प्रश्न : गुरुजी, असे म्हणतात की मृत्युच्या शेवटच्या क्षणी जो विचार किंवा जी स्मृती असते त्याचा परिणाम पुढच्या जन्मावर होतो. माझ्या मनात या भौतिक जगाचा खूप परिणाम आहे. या माझ्या मनात मृत्यूचा वेळी फक्त तुमचा आणि तुमचा विचार असावा यासाठी मी काय करू?
श्री श्री रवि शंकर: त्यासाठी मृत्युच्या शेवटच्या क्षणाची वाट बघायची काही गरज नाही. प्रत्येक क्षण आनंदाने जगा आणि सेवा, साधना आणि सत्संग करा.

प्रश्न : आदरणीय गुरुजी, मला आपल्या देशाच्या अर्थशास्त्राबद्दल काळजी वाटते ज्यावर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम होत आहे. त्याच वेळी अणु उर्जा घटक आहे हे जपान च्या उदाहरणावरून स्पष्ट होत आहे. आपला देश कसा पुढे जाईल?
श्री श्री रवि शंकर:  लोकांमध्ये त्याबद्दल विचार वाढवा. प्रत्येकाने आपल्या वातावरणाबद्दल सजग राहिले पाहिजे, लोकांसाठी, देशासाठी. जेंव्हा प्रत्येकाला ही काळजी वाटेल, तेंव्हा गोष्टी बदलतील.

प्रश्न : जय गुरुदेव. देव आहे का, त्यावर विश्वास कसा ठेवावा?
श्री श्री रवि शंकर: गाड्या पळत आहेत, तुम्ही त्यांना पाहता का? हो, पण त्यांना कोणी पळवत आहे की त्या आपला आप पळतात? त्यात चालक आहे, बरोबर, पण गाड्या पळताना तुम्हाला नेहमी चालक दिसत नाही, बरोबर?

प्रश्न: गुरुजी, प्रत्येकजण मोक्षाचा मागे पळत आहे. मोक्ष म्हणजे काय ते मला पण कृपया सांगा?
श्री श्री रवि शंकर: तू पण मोक्षाच्या मागे का धावत आहेस? तू जर पळत नाहीस तर मग अडचण काय आहे? जे पळत आहेत त्यांना मी सांगेन, तू त्याची काळजी करू नको.

प्रश्न : गुरुजी माझ्याकडे ३० एकर शेतीखालाची जमीन आहे जिथे शेवटी गुरुदेव दत्ताचे आणि साई बाबांचे एक छोटे देऊळ आहे, पश्चिम दिशेच्या जवळ दक्षिणोत्तर जागा आहे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे उतार आहे. माझ्या वास्तू तज्ञाने मला सांगितले आहे की अशी जमीन असणे धोकादायक आहे आणि ती काढून टाका. गुरुजी, मी काय करू?
श्री श्री रवि शंकर:  हे पहा, ग्रहावर अशी जमीन आहे. प्रत्येक जागेत काही चांगले घडते आणि काही फार चांगले घडत नाही, काही फरक पडत नाही. 'ओम नमः शिवाय' चा किंवा 'गुरु ओम' चा जप करा आणि सर्व नकारात्मक परिणाम दूर होतील.

प्रश्न : प्रिय गुरुजी, माझा नवरा माझावर नेहमी आरडा ओरडा करतो आणि मी साधारण आवाजात बोलले तरी मोठ्याने बोलतो. इतरांशी अतिशय मृदू बोलतो, मी काय करू?
श्री श्री रवि शंकर: याचा अर्थ असा की तो इतरांपेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम करतो. त्याने तिथेच फरक केला आहे. इथेपर्यंत तुम्ही सांभाळले आहे; तुम्हाला माहिती आहे की कसे सांभाळावे, संभाळा. तो चांगले बोलेल याची अपेक्षा ठेवू नका, निदान तुम्ही चांगले बोला आणि त्याला कठोर राहू देत. ते एकतर्फी असेल, फरक पडत नाही, सामंजस्य राहील.

प्रश्न :गुरुजी, ज्ञानाचा मार्ग खूप अवघड आहे; समर्पणाने ज्ञान मिळू शकते का?
श्री श्री रवि शंकर: हो, नक्कीच.

प्रश्न: प्रिय गुरुजी, मी स्वतःची तुलना जगाबरोबर करणे कसे थांबवू?
श्री श्री रवि शंकर: तुमच्याकडे स्वतःची तुलना इतरांबरोबर करण्याइतका वेळ आहे. अरे बापरे, मला वेळच नाही. तुमच्या हातात खूप वेळ आहे, तुम्ही काहीतरी जास्त निर्मितीक्षम करा. तुम्ही बसून स्वतःची जगाबरोबर तुलना करत आहात, वेळेचा केवढां  अपव्यय.

प्रश्न : गुरुजी, आपल्या शास्त्रात चार गोष्टी करा म्हणून सांगितल्या आहेत त्या म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष आणि करू नये अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत त्या म्हणजे काम, क्रोध, मोह, लोभ आणि अहंकार.  काम हा करावे आणि करू नये या दोन्हीत आहे, असा विरोधाभास का?
श्री श्री रवि शंकर:  हो, कारण ते अती करणे हे चूक आहे आणि योग्य प्रमाणत करणे चांगले आहे. जेवणातील मिठासारखे आहे, योग्य प्रमाणात मीठ चांगले असते आणि जास्त मीठ चांगले नसते.

प्रश्न : ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक ज्योतिषी वेगवेगळे खडे आणि अंगठ्या घालायला सांगतात. तुम्ही त्या घालायला सांगता का आणि जर तुम्ही अध्यात्मिक मार्गावर असाल तर या गोष्टी घालायची गरज आहे का?
श्री श्री रवि शंकर: नाही, काही गरज नाही, नक्कीच प्रत्येक गोष्टीचा तुमच्या आयुष्यावर थोडाफार परिणाम होतो पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही दगडाच्या एका तुकड्यापेक्षा नक्कीच शक्तिशाली आहात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करा. नाहीतर 'ओम नमः शिवाय' चा जप करा, तो सगळ्यात शक्तिशाली मंत्र आहे की जो कुठल्याही ग्रहाचे वाईट परिणाम घालवू शकेल. The Art of living

मन, मानसिकता आणि वेळ यांचे सुंदर शास्त्र

२६ जानेवारी, २०११, बेंगलोर आश्रम, भारत 


प्रश्न : गुरुजी, एका गुरूला निवडणे म्हणजे इतर महात्म्यांचे विचार न मानणे असे आहे का? आपल्याला एका पेक्षा अधिक गुरु असू शकतात का?
श्री श्री रवि शंकर: ओह! एका गुरूला सांभाळणे इतके अवघड आहे, तुम्ही कसे ......! (हशा) ते इतके सोपे नाही. सगळ्यांचा आदर करा पण एकच मार्ग धारा. सगळ्यांना मन द्या आणि तुम्ही पाहाल, सगळ्या महात्म्यांनी एकच गोष्ट सांगितली आहे. फक्त एकच सत्य आहे, म्हणून, सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली आहे, पण काळाच्या गरजेनुसार पद्धती वेगवेगळ्या आहेत.
या रस्त्यावर असताना मनात द्वंद्व ठेवू नका. ज्या रस्त्यावर असाल, तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, आणि त्यामुळेच तुम्ही इथे आलेले आहात. तुम्ही त्या रस्त्यावर, त्या शिक्षकांची, त्या महात्म्यांची सेवा केली आहे आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला येथपर्यंत घेऊन आले आहेत, आणि या धारणेने तुम्ही पुढे चला, ठीक आहे?
असे आहे की तुम्ही सगळेच करत बसलात तर, गोंधळात पडाल! तर, मी असे म्हणेन, की एकाला सगळ्यामध्ये बघा आणि सगळ्यांना एकामध्ये बघा.
सगळ्यांना मन द्या आणि एकच रस्ता निवडा.

प्रश्न : जर तुमचा गुरु किंवा मार्गदर्शक तुमच्यावर नाराज असेल तर काय करावे?
श्री श्री रवि  शंकर: वेगाने प्रगती करा! गुरु तुमचा प्रगतीमुळे नाराज असतो. म्हणून, वेग वाढवा आणि प्रगती करा. जोरात पळा !

प्रश्न : गुरुजी, मानसिकता आणि वेळ यामध्ये काही संबंध आहे का? काही वेळा आपल्याला वेगवेगळ्या भावना का येतात, जसे की रात्री उदास वाटणे? 
श्री श्री रवि शंकर: हो, हो! वेळ आणि मन एकमेकांशी जोडलेले आहेत, हो! तुम्हाला हे माहिती पाहिजे. वेळ आणि मन हे समानार्थी आहेत. आठ गोष्टी आहेत: वैशेशिका, कानडा …सगळ्यांनी सांगितले आहे ' देश, काल, मनः' देश म्हणजे आकाश, काल म्हणजे वेळ आणि मनः म्हणजे मन. ही सगळी तत्व आहेत. आणि एकमेकांशी जोडलेली आहेत. देश आणि काल जोडलेले आहेत. आकाश आणि वेळ जोडलेले आहे. या पृथ्वीवरचा एक दिवस म्हणजे दुसऱ्यावरचे अनेक दिवस. चंद्रावर ही परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही, गुरु ग्रहावर असाल तर माणसाचे एक वर्ष म्हणजे तिथला एक महिना. जर तुम्हाला गुरु ग्रहावर १ वर्ष अनुभव घ्यायचा असेल तर माणसाची १२ वर्षे लागतील.
गुरु ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालायला १२ वर्षे लागतात. तसेच जर तुम्ही शनी ग्रहावर असाल, तर ३० वर्षांचे १ वर्ष!
अगदी तसेच पितरांचे, जे लोक वारले आहेत, आपले माणसांचे एक वर्ष म्हणजे त्यांचा १ दिवस. म्हणजे आपले सहा महिने म्हणजे एक रात्र आणि सहा महिने म्हणजे एक दिवस. तर, एका आत्म्यासाठी जे आपल्याला सोडून गेले आहेत त्यांचासाठी एक पूर्ण वर्ष म्हणजे एक दिवस आहे. वेगवेगळ्या आयामांमध्ये इतके वेगवेगळे काळ आणि वेगवेगळे अवकाश आहेत. म्हणून, वेळ आणि अवकाश जोडलेले आहेत. त्याला वेळ-अवकाश कर्व्ह. तसेच तिसर्या आयमाचे आहे, म्हणजेच मनाचे! मनविरहित, अलौकिक चेतना म्हणजे महाकाळ, शिवा, चेतनेची चौथी स्थिती.
त्याला महाकाळ म्हणजे मोठा काळ आणि मन नसलेला. मन नसणे म्हणजे चांगला काळ.
तर, सकाळी ४.३० ते ६.३०, सूर्योदयाच्या थोडे आधी, पहाटेच्या आधीच्या वेळेला निर्मितीक्षम वेळ म्हणाले आहे.
ब्राह्म मुहूर्त! आणि नंतर प्रत्यक दोन तासांनी, त्याला लग्न; म्हणजे वेळेचे एकक. आणि हे एकक मनाची स्थिती दर्शवते. आणि परत हे चंद्राच्या, सूर्याच्या स्थितीशी जोडलेले आहे. इतके पहलु आहेत! १० वेगवेगळे पहलु मनावर परिणाम करत. तर, फक्त वेळच नाही तर दिवसाची गुणवत्ता पण मनावर परिणाम करते. प्रत्येक अडीच दिवसांनी मनाची अवस्था बदलते! मनाची मानसिकता! तर जर तुम्ही त्रासलेले असाल, तर ते पुढे जास्तीत जास्त अडीच दिवस चालू राहू शकते; अडीच दिवसच असे काही नाही. एका टोकापर्यंत ते वाढते आणि खाली येते. पण अडीच दिवसानंतर तुम्हाला त्याच भावना तेव्हड्याच तीव्रतेने असणार नाहीत.
अशक्य! त्या बदलतात. खूप बदलतात! मन, मानसिकता आणि वेळ यांचा संबंध असलेले शास्त्र खूप मोठे आहे.
ज्योतिष शास्त्रा याच्यावर  प्रकाश टाकू शकते. तुम्हाला भविष्य सांगणारे माहित आहेत, सामान्यपणे आठवड्याच्या स्तंभामध्ये ते सांगतात, ' ओह, नात्यांसाठी चांगले, पैसे मिळवण्यासाठी चांगले, हे आणि ते!' ते त्या गोष्टी लिहितात (हसतात)! ते त्या गोष्टीना सर्वसामान्य बनवतात, ' तुम्ही जर या वेळी जन्माला आले असाल तर तुमच्यासाठी हे चांगले आहे आणि तुम्ही हे करा.' यात काही शंकाच नाही, हे खूप सामान्य आहे आणि पैसे कमावण्यासाठी केलेली गोष्ट आहे. पण ही फसवा-फसवी नाही; त्यात सत्यही आहे. त्याचा पाया सत्य आहे. मन आणि काल जोडलेले आहेत हे तवा सत्य आहे.
मन म्हणजे मानसिकता, विचार, मते, कल्पना, सर्व गोष्टी ज्या आपण गोळा करतो. आणि, मन नसणे म्हणजे ध्यान. पाहत आणि संध्याकाळ हे ध्यानासाठी चांगली वेळ समजली जाते. तर, जेंव्हा तुम्ही ध्यान करता, किंवा जेंव्हा वाईट काळ असतो, तेंव्हा तुम्ही ध्यान करता. जेंव्हा तुम्ही ध्यान करता तुम्ही मनाच्या प्रभावापासून मुक्त होता आणि स्वतःमध्ये जाता. स्वतः म्हणजे शिव तत्व.  शिव तत्व म्हणजे नेहमी उदार, काळजी घेणारे, प्रेमळ, वर न्हेणारे. तुमच्या आतील खोल चेतना की जी प्रेमळ, काळजी घेणारी, वर न्हेणारी आणि उदार आहे, ती मनाचे नकारात्मककाळाचे  परिणाम दूर करेल.
भारतामध्ये हा सामान्य विश्वास आहे, जेंव्हा वाईट काळ असेल तेंव्हा फक्त ओम  नमः शिवाय, असे म्हणा आणि ते निघून जाईल. तो सगळा वाईट काळ निघून जाईल.  ‘मनः’, जेंव्हा उलट बाजूने वाचले जाते, त्याचे नमः होते. मनः म्हणजे जेंव्हा चेतना जगाच्या बाहेर जाते, आणि नमः म्हणजे जेंव्हा चेतना आत जाते. शिवाय , शिव तत्वाकडे, चेतनेचा चौथा आयाम,  अस्तित्वाचा सूक्ष्मतम पहलु, शिव तत्व! नमः, म्हणजे मन निर्मितीच्या पायाभूत अवस्थेकडे जाते, तेंव्हा ते सर्वकाही अतिशय उदार अनुभवामध्ये बदलू शकते.

प्रश्न : तुमच्याकडे सगळ्या प्रश्नाची उत्तरे कशी असतात?
श्री श्री रवि शंकर: याचे उत्तर माझ्याकडे नाही!


© The Art of Living FoundationThe Art of living

भ्रष्टाचार सुरु होतो जिथे आपलेपणा संपतो!

बेंगलोर १८ मे

प्रश्न : आपल्या आयुष्याच अंतिम ध्येय काय असायला हव?
श्री श्री रवि शंकर : जर कुणी तुम्हाला अंतिम इच्छा काय आहे हे सांगितल तर निरर्थक आहे. या क्षणाला तुम्हाला गरज आहे ती आकांक्षेची. जेव्हा तुम्ही आयुष्याकडे एक व्यापक दृष्टीकोन ठेवून बघाल तेव्हा तुम्हाला कळेल तुम्हाला काय हवाय ते. स्वाभाविकच, तुम्ही दयाळू व्हाल आणि आपल्या देशाप्रती, पर्यावरण प्रती विचारशील राहाल आणि अश प्रकारे हे काम निरंतर करीत राहा मग आयुष्याचा अंतिम ध्येय काय हा प्रश्नच उद्भवणार नाही.

प्रश्न : मला कस कळेल मी आधात्मिक मार्गावर प्रगती करीत आहे?
श्री श्री रवि शंकर : बघा तुम्ही शांत आहात? गतिशील आहात? तुम्ही दोष, वाईट सवयींपासून मुक्त आहात आणि काय तुम्ही आपल्या आसपासच्या लोकांशी आपलेपणाने वागता? हे काही उपायांपैकी उपाय आहे.

प्रश्न : प्रिय गुरुजी, तुम्ही नेहेमी म्हणता,"तुमच्या सगळ्या अडचणी मला द्या".पण मला काळजी वाटते कि मी सगळ्या अडचणीतून मुक्त झालो पण माझ्या अडचणींमुळे तुम्हाला त्रास तर होत नाहीये ना?
श्री श्री रवि शंकर : नाही, काळजी करू नका. कमीत कमी तुमची थोडी तरी काळजी दूर झाली, जेव्हा तुम्ही काळजीत असता मी पण काळजीत असतो. तेव्हा तुम्ही आनंदात राहा.

प्रश्न : गुरुजी, पुराणात असे म्हटले जाते की पत्नी पुढच्या सात जन्मासाठी एकाच पतीची कामना करते. हे खरे आहे का?
श्री श्री रवि शंकर : पहा, या प्रश्नाच उत्तर द्यायला मी योग्य नाही. तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना विचार आणि शोधून काढा. कुणी हो म्हणेल कुणी नाही, एक जनगणना घ्या आणि आपल्या अनुभवानुसार जा. एकदा एक अमेरिकन महिला सांगत होती तिच्या लग्नाला चाळीस वर्ष झालेत आणि ती एकाच माणसासोबत चाळीस वर्षापासून राहतेय. तिथे उपस्थित असलेले सर्व लोक आश्चर्यचकित झालेत ती कशी काय एकाच माणसासोबत चाळीस वर्ष राहू शकते.मग ती म्हणाली जर तुम्हाला माहित नसेल की बोट एका ओळीत कशी लावायची आणि जरी तुम्ही बोट बदलली तरी तुम्हाला माहित नाही कशी रांगेत लावायची तर काय कराल. मी त्यावर म्हंटले, "हि कथा भारतातल्या प्रत्येक घरातली आहे आणि हि प्रथा तिथल्या प्रत्येक गावातली आहे.'
जर तुम्हना बोट कशी लावायची हे माहित नसेल तर काही उपयोग नाही.
म्हणूनच, आपल्या अवती भवती कसेही लोक असले तरी आपल्याला त्यांच्याशी चांगले संबंध ठेवावे लागतात आणि आपल्या प्रयत्नांनी इतरांमधील चांगले गुण जोपासायचे. दुसऱ्याची टीका केल्याने आपले कधी भले होत नाही. त्यापेक्षा दुसऱ्यान्चा  आधार बना.तुम्ही नुसते बसून जर टीकाच करीत राहाल तर संबंधांमध्ये अंतर येईल. तुम्ही त्यांना समजून घ्याला हवय, ते कुठून आलेत कुठे चुकतंय त्याचं. आणि त्यांना प्रेमाने सांगा कुठे चुकतंय आणि तुंना प्रेमाने जिंका. ह्या प्रक्रियेला वेळ लागेल, कुणाचीही टीका करणे आणि आपल्यापासून दूर ठेवणे सोपे आहे. हे काही मिनिटात शक्य आहे पण त्यांच्या सोबत दिवस रात्र राहणे त्यांना समजावणे त्यांच्यात बदल घडवणे हे कठीण पण महत्वाचे आहे. हे तेच आहे की काय केल्या गेल्या पाहिजे.

प्रश्न : गुरुजी, पूजा करताना जेव्हा देवाच्या मूर्तीला सजवल्या जाता ते बघताना खूप सुंदर वाटत, पण आपले डोळे बंद करून जेव्हा ध्यान करतो ते देखील सुंदर वाटत. मग, अशा वेळी काय करावा ध्यान करावा की बघाव?
श्री श्री रवि शंकर : ध्यानात तल्लीन होऊन जा आणि ती पूजा श्रेष्ठ तुज होय.पूजा म्हणजे काय? 'येन केन प्रकारेण यस्य कस्यापि देहीनाद, संतोषां जानायेत्प्रग्यः तादेवेश्वारापुजानाम.'
कुठल्या पद्धतीची आराधना श्रेष्ठ? ज्या उपासनेने लोकांच्या मनाला सुख आणि शांती मिळेल ते श्रेष्ठ होय, सगळ्यांना आनंद मिळेल.'येन केन प्रकारेण ' हे पूर्वीच्या काळी म्हंटले जायचे. आता ते होणे शक्य नाही. खरा आनंद फक्त ध्यानाने मिळवता येईल.

प्रश्न : गुरुजी, देशात भ्रष्टाचाराविरुद्ध लढाईला सुरुवात झाली आहे. ह्या लढाईत तुम्ही राम, श्री रामदेवजी लक्ष्मण, आणि अन्न हजारेजी हनुमान आहे. पण राम अजून युद्ध भूमीत आले नाहीत अजून?
श्री श्री रवि शंकर : तुम्ही अरविंद (अरविंद केजरीवाल) यांह सोडलत. मी सगळ्यांमध्ये आहे आणि मी सगळ्यांसोबत आहे. अरविंद हा एक माध्यम आहे त्या लोकांचा जे भ्रष्टाचाराविरुद्ध लढताहेत. बघा, भ्रष्टाचार हा समाजाच्या विविध स्तरावर उपस्थित आहे. प्रार्थमिक भ्रष्टाचाराची पटली हि लोकांच्या मनातली आहे आणि सगळ्यात पहिले ती दूर करायला हवी. आपण देवालाही लाच देतो, तू जर माझा हे काम केला तर मी तुला ते देईल, मी तुला नारळ अर्पण करेल, वैष्णव देवीला पदयात्रा करीत जाईल. लोक जी मागणी किंवा इच्चा करतात देवाकडे तो सुधा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. पण हे ठीक आहे एखादवेळी मनुष्य काही ना मागता देवाला अर्पण करतो हे चालत. तुम्ही देवाला काही देता ते द्या पण ते आपल्या गरजा पूर्ण करता देत असाल तर ते चुकीच आहे. ही प्रथा सगळ्याच धर्मांमध्ये चालते हिंदू, इस्लाम, ख्रिस्ती , आणि बौद्ध. ही समज चुकीची आहे की माझी मनोकामना पूर्ण झाल्यावर मी हे देईल ते देईल. हे व्हायला नको. जर सामान्य जनता भ्रष्टाचाराविरुद्ध उभी राहिली आणि लाच दिली नाही तर कुणी कसे काय घेईल? तर सग्यात पहिले त्या लोनाकाना पकडल पाहिजे जे लाच देतात.त्यांना सांगा देऊ नका.आपल्याला अध्यात्माची लाट जागवायची गरज आहे. हेच कारण आहे की आपली आंतरिक शक्ती अजून वाढेल आणि लोक लाच द्यायला नाकारतील. तुम्ही जेव्हा परत जाल, तेव्हा तुम्चातल्या प्रत्येकाला कमीत कमी १०० लोकांना प्रतिज्ञा घ्यायला लावायची की ते कधीही कुणालाही लाच देणार नाही. तुम्ही कुणाला पैसे देऊ केलेत तर तू आपल्या बायको मुलांचा विचार करतो आणि त्याला वाटत की आपण हे पैसे घ्यायला पाहिजे तर हे अत्यंत महत्वाचे आहे की लोकांना लाच देण्यापासून थांबवावे.
दुसरे असे, लाच घेणे हे सरकारी पातळीवर पण होताहेत. बऱ्याच स्वयंसेवकांनी जागोजागी सरकारी कर्मचार्याच्या टेबलावर जाऊन "आम्ही लाच घेत नाही" अशी पट्टी चिकटविली आहे. हे इथे सुरु झले आहे पण बऱ्याच राज्यात सुरु व्याचे आहे. अजून महाराष्ट्रात हे सुरु नाही झाले; जिथे हे सुरु नाही झाले तिथे आपण स्वयंसेवकांनी कर्मचार्यांच्या टेबल जवळ जाऊन "आम्ही लाच घेत नाही" असे चिकटवायला हवे.तुम्ही जर जाल आणि चीक्तावळ तर कुठलाच कर्मचारी तुम्हाला अडवणार नाही; कुठे चिकटवा टेबलावर किंवा कुर्चीवर की इथे लाच घेतली जात नाही आणि जे लोक लाच देतात ते हे वाचल्यावर लाच देणार नाही.
अच्चा आता तिसऱ्या प्रकारचा भ्रष्टाचार हा मंत्र्यांच्या स्तरावर चालतो, त्यासाठी लोकपाल बिल मार्फत काम चाल्लय आणि अरविन्द्जी, अण्णाजी, स्वामीजी, किरण बेदी हे दिवस रात्र यासाठी काम करताहेत. जर लोकपाल, एकदा पास झला तर बरेच बदल घडतील. पण एका बिलाच्या भरोश्यावर काम भागणार नाही, समाजात या बिलाबद्दल जागरूकता आणण्याची गरज आहे, की ही काय आहे आणि कसे तुम्ही भ्रष्टाचाराशी संबंधित असाल तर कायद्याने तुम्हाला शिक्षा केली जाईल. आता या क्षणाला हे व्यायला हवे. अशाप्रकारे हे काम समाजाच्या सर्व पातळीवर व्यायला हवे आणि सर्वात महत्वाचे आहे लोकांची मानसिकता बदलणे आणि ते अध्यात्माच्या मदतीने शक्य होईल कारण जिथे आपलेपणा संपतो तिथेच भ्रष्टाचाराला सुरुवात होते. कुणीही आपल्या घरच्यांना किंवा आप्तस्वकीयांना लाच मागणार नाही. आणि याचा अर्थ असा आहे आध्यात्माद्वारे आपण लोकांमध्ये आपलेपणा जागृत करायलाच हवय. आपल्याला साग्यांमध्ये विश्वास जागवायला लागेल की जे तुमचा आहे ते तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही मेहनत करा स्वयंभू बना आणि स्वतःच्या पायावर उभे राहा. जे तुमच आहे ते तुम्ही कमवाल.अशा प्रकारे, लोकांमध्ये ही आंतरिक शक्ती आणि जागरूकता जागवण्याची गरज आहे, होय! ह्यासोबत आपल्या देशात मोठा बदल आणण्याची आवशकता आहे.
आता बघा, तमिळ नाडू मध्ये कीती भ्रष्टाचार होता, निवडणुकांपूर्वी, लोकांना त्यांच्या परिवार खातर पैसे देऊ केले जायचे आणि हे लोक मुलांखातर पैसे घ्यायचे आणि त्या मतदाराला निवडून द्यायचे. मी लोकांना विविध जिल्ह्यात पाठवून सांगितले की पैसे घ्या पण त्या लोकांना मत देऊ कारण ते तुमचेच पैसे तुम्हाला परत करताहेत. ते इतके गरीब लोक असतात की ते पैसे घेतात. मी त्यांना सांगितला पैस्याच्या बदल्यात मत देऊ नका आणि पापाची चिंता करू नका, सगळे पाप मला द्या, मी सगळे पाप आपल्यावर घेतो, काही समस्या नाही. आणि आम्ही तामिळ नादूत यशस्वी झालो.आणि सुदैवाने निवडणूक आयुक्त आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि त्यांनी आपला पाठिंबा आणि संमती दिली.पण आपल्या पैकी प्रत्येकाल काम करायला हवाय. आपल्याला गावोगावी जाऊन भ्रष्टाचाराविरुद्ध जागरूकता आणायला हवी, आणि समाजाच्या विचारसरणीला आणि मानसिकतेला बदलायला हवंय.
प्रत्येक व्यक्तीला वाटायला हव कि आपल्याला एकत्र पुढे जायचं आहे, सगळ्यांना सोबत घेऊन.इथे विविध प्रकारचे लोक, विश्वास, समुदाय आहेत आपल्याला सगळ्यांना प्रेमाने आलिंगन द्या आणि एकत्र पुढची वाटचाल करा.आपण असा म्हणायला नको की "फक्त माझाच मार्ग बरोबर आहे" नाही.भारताची एक सुन्देर्ता आहे की जरी इथे विविध प्रकारचे लोक, विश्वास, समुदाय आहेत आम्ही सर्वच सम्मान करतो सगळ्यांचा आदर करतो आणि समंजस पाने आम्ही पुढची वाटचाल कर

अध्यात्मिकता आनंदाबरोबर सुरु होते!

बेंगलोर, मे २३:

प्रश्न: गुरुजी, विज्ञानाने अध्यात्मिकता समजावता येऊ शकते का?  ही निर्मिती जी विज्ञान अजून सांगू शकला नाही त्याबद्दल मला खूप आश्चर्य वाटते. वेदांमध्ये याचे उत्तर आहे का?
श्री श्री रवि शंकर : हो, मनोरंजन ही योगाची सुरुवात आहे. जेंव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मनोरंजक वाटते तेंव्हा तुम्ही निसर्गातील सत्यांबद्दल प्रश्न विचारू लागता तेंव्हा तुमचा प्रवास सुरु होतो. हे उत्तम आहे. ‘विस्मयो योग भूमिका,’ अध्यात्मिकता मनोरंजनाबरोबर सुरु होते
आणि नंतर ते कायम अम्युजमेंट पार्क मध्ये असल्यासारखे वाटेल. तुम्ही आश्चर्यचकित होता, वाव! हे काय आहे? हे जग काय आहे? किती प्रकारची झाडे, पाने, फुले, फळे, भाज्या, माणसे, हे काय आहे? जेंव्हा असा विचार येतो तेंव्हा ज्ञान सुरु होते.

प्रश्न: गुरुजी, जर आपण घटना आहे तशी स्वीकारली तर आपण निर्माण क्षम कसे होऊ?
श्री श्री रवि शंकर : हे तुम्हाला शिबिरामध्ये (आर्ट ऑफ लिव्हिंग चा पार्ट १ शिबीर ) कळले असेलच, बरोबर? स्वीकार म्हणजे निष्क्रियता नव्हे; स्वीकार म्हणजे आत्ताची परिस्थिती ओळखणे.

तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक मुलाला माहिती पाहिजे की ते जगातील प्रत्येक रुढीचा भाग आहेत. पाकिस्तानींचे पूर्वज हिंदू होते, बौद्ध, जैन होते; खूप पूर्वज या पुरातन पद्धतींचे होते. काही पारसी होते. पाकिस्तानातील मुलांना उपनिषद शिकवले पाहिजे, थोडे योग आणि ध्यान. योगाचा जन्म पाकिस्तान मध्ये झाला; जन्म म्हणजे आता ज्याला पाकिस्तान म्हणतो त्या भागात योग शिकवला गेला आणि तिथे त्याचा प्रचार झाला.

अध्यात्मिक ज्ञान नसल्यामुळे खूप लोक सर्व प्रकारचा प्रचार करतात, त्याच्याबद्दल त्यांना खरी  माहिती नसते. म्हणूनच लोकांना अध्यात्मिक ज्ञान देणे हे आपले महत्वाचे कर्तव्य झाले आहे. तुम्हाला असे वाटत नाही का?
आपण आता खूप कार्यक्षम झाले पाहिजे आणि सर्व प्रकारची अंधाधुंदता दयेमध्ये रुपांतरीत होईल आणि तीच अंधाधुंदता चांगले काम करण्याच्या प्रतीबद्दतेमध्ये रुपांतरीत होईल हे बघितले पाहिजे. हो की नाही. आपण त्यासाठी काम केले पाहिजे. हो.

प्रश्न : प्रिय गुरुजी, सुदर्शन क्रिया डी. एन. ए. बदलू शकते का?
श्री श्री रवि शंकर: हो.

प्रश्न : गुरुजी, टीका स्वीकारण्याइतके स्वतःला मजबूत कसे बनवू? 
श्री श्री रवि शंकर: हे पहा, तुम्ही स्वीकारा अथवा स्वीकारू नका, टीका अगोदरच झाली आहे, हो की नाही? तुम्हाला पर्याय नाही. फक्त कोणी बोलले की तुम्हाला टीका झाल्याचे कळते, बरोबर. त्यांनी बोलल्याशिवाय तुम्हाला कसे कळेल? कोणी तुमची टीका करेपर्यंत तुम्हाला माहिती नसते. त्यांनी टीका केल्यावर, ती झालेली आहे. तुम्हाला काय पर्याय आहे? ओके, त्याचा स्वीकार करू नका, त्याने तुम्हाला काय होईल? तुम्ही आणखी दुःखी व्हाल. तुम्ही हुशार असाल तर त्याचा स्वीकार कराल, जर तुम्हाला  हुशार व्हायचे नसेल तर तुम्हाला काही काल त्रास सहन करायला लागेल. फक्त याच मार्गाने तुम्ही करू शकाल.

प्रश्न: गुरुजी, तुमची माझ्यावर कृपा आहे हे मी पहिले आहे. मला जे काही पाहिजे, माझ्या ज्या इच्छा आहेत, ते तुम्ही मला देता. असे कधीही झाले नाही की मला जे हवे ते मिळाले नाही पण इच्छा अशा आहेत की त्या संपत नाहीत आणि आता मला स्वतःची लाज वाटते आहे, मी काय करू?
श्री श्री रवि शंकर : हे पहा, आता तुम्ही त्याबद्दल सजग झाले आहात, बरोबर? तुम्ही आता बरोबर रस्त्यावर आहात. गाडीने 'यु' टर्न घेतला आहे. काहीतरी मोठे मागा. छोट्या गोष्टी का मागता? आणि तुमच्यासाठी मागू नका, सगळ्यांसाठी मागा. तुम्ही जे मागाल, ते मिळेल.

प्रश्न: कधी कधी, माझे मूल ज्या शाळेत जाते ती शाळा मला आवडत नाही. मी त्याला शाळेतून काढून घरीच ठेवू का? 
श्री श्री रवि शंकर: नाही, शाळेचे वातावरण चांगले नाही म्हणून घरी राहणे चांगले नाही. मुले मंद होतील. आपल्याला शाळेतील पद्धती आणि या घटना बदलल्या पाहिजेत. म्हणूनच आपण इतक्या शाळा सुरु करत आहोत; आपण भारतामध्ये जवळपास १०० शाळा सुरु केल्या आहेत.

प्रश्न: प्रिय गुरुजी, माझी सासू इतर धर्मांच्या लोकांना प्रसाद वाटत नाही. त्यांचा तर्क असा आहे की ज्यांना प्रसादाचे महत्व कळत नाही त्यांना प्रसादाचा फायदा होत नाही. त्यांचा हा विचार मी कसा बदलू?
श्री श्री रवि शंकर: त्या करत नसतील तर काही फरक पडत नाही, तुम्ही सगळ्यांना द्या. प्रसादाचे पदार्थ खूप वेळा चांगले असतात, लोकांना आवडेल. तुम्हाला माहितीये, प्रत्येकाचे स्वतःचे मत असते. त्यांचे असू देत, तुमचे मत तुमच्यापाशी, इथे काहीच संघर्ष नाही. तुम्हाला हवे ते तुम्ही करा.

प्रश्न: महत्वाचे काय आहे: वेदना, ज्ञान की प्रेम? 
श्री श्री रवि शंकर: हो, वेदना, ज्ञान आणि प्रेम नेहमी एकत्र असतात. कधी कधी एकाला खूप महत्व दिले जाते आणि कधी दुसऱ्याला जास्त महत्व दिले जाते. तुम्हाला दोन्ही बरोबर गेले पाहिजे. छान !

The Art of living