सत्य काय आहे?.. एक  असा मार्ग ज्यावर दुख्खा:पासून मुक्त असा निर्भेळ आनंद आहे !
डिसेंबर २०११

'आयुष्याचे सत्य काय आहेयाकडे लक्ष देणे म्हणजे सत्संग.
काय आहे जीवनाचे सत्य?

सत्य हे आहे कि पंचेंद्रिय ही बहिर्मुख आहेत. बाहेरच्या जगाबद्दलचे आकर्षण खूप जास्त आहे आणि अंतरंगाबद्दलचे खूप कमी. हे जीवनातले  निखळ सत्य आहे.
आपल्याला या बाहेरच्या जगाच्या ओढीपासून मुक्ती हवी आहे कारण जेवढे तुम्ही बाहेरच्या आकर्षणाच्या आहारी जाता तेवढा त्यापासून काहीच लाभ होत नाही, पण तरीही ते सोडून देणे खूप अवघड जाते. हे आयुष्याचे प्रथम सत्य आहे.
जेंव्हा तुम्ही या प्रलोभनांच्या  आहारी जाता, तेंव्हा काय होते तुम्हाला त्यापासून दुख्ख: मिळते. तुम्ही सुखाची अपेक्षा करून त्याच्या पाठीमागे  जाता आणि पदरी शेवटी निराशाच पडते.
तुम्ही सगळ्यांनी हे अनुभव केले आहे कि नाही? आपली सर्व इंद्रिये बहिर्मुख जातात, काहीतरी पाहण्यासाठी, काहीतरी ऐकण्यासाठी, कशाचातरी वास घेण्यासाठी, कशाचातरी स्पर्श अनुभवण्यासाठी  किंवा कशाचीतरी चव घेण्यासाठी!
आता जर तुम्ही या इच्छा आकांक्षांच्या मागे जात राहिलात तर तुम्हाला समाधान मिळते का? थोड्या काळासाठी मिळतही असेल पण परत लागलीच तुम्ही अस्वस्थ होता.
हे दुसरे सत्य आहे. .. तुम्हाला क्षणिक समाधान मिळते पण ते टिकत नाही आणि तुम्ही पुन्हा बेचैन होऊन जाता. प्रत्येक वेळेस तुम्ही कुठलीतरी कामना पूर्ण करण्यासाठी जाता आणि अशांत होता आणि क्षणोक्षणी  हि बेचैनी वाढत जाते आणि शेवटी  तुमच्यामध्ये नीरसता, उदासीनता येत जाते

 तुमच्यापुढे सुग्रास अन्न ठेवले आहे पण तुम्हाला ते खाण्याची वासना होत नाही. तुमच्या घरी कर्णमधुर संगीताच्या खूप CD असतात, पण तुम्हाला त्या ऐकण्यामध्ये रस नसतो. तुम्ही विवाहित असता पण तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर शरीरसुखाची  कामना नसते. तुमच्या कपाटामध्ये खूप सुंदर वस्त्र असतात, पण तुम्हाला ती परिधान karaychi   इच्छा नसते.

अनुत्साह  आणि उदासीनता या सातत्याने  ऐहिक इच्छापूर्तीच्या मागे धावल्याने निर्माण झालेल्या  अस्वस्थतेतून जन्म घेतात.  
हे एक दुष्टचक्र आहे.  
एक आकर्षण निर्माण झाले, तुम्ही त्याच्या मागे लागलात आणि त्यामधून तुम्हाला क्षणिक समाधान आणि आनंद मिळाला आणि नंतर तुम्ही परत अस्वस्थ झालात.  मग त्या गोष्टीमधला आनंद निघून गेला पण ती बेचैनी मात्र तशीच राहिली. मग तो बेचैनी वाढत वाढत गेली आणि त्यातूनच नैराश्य आणि उदासीनता आली.
लोक प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी जातात. काही  जण म्हैसोर संग्रहालय बघायला गेले, तिथे त्यांनी फक्त हॉटेल मध्ये जाऊन काहीतरी खाल्ले आणि नंतर विचार केला " या संग्रहालयात बघण्यासारखे काय आहे, जाऊ देत"! ते खरे तर इतक्या लांबून संग्रहालय बघयला आले होते, पण त्यांनी तिथे काहीच बघितले नाही.
काही लोक बंगलोर  पासून  पार वैश्नोदेविपर्यंत गेले, आजूबाजूचे पर्वत बघितले, देवळापर्यंत जाणारी  भक्तांची रांग  बघितली  आणि दर्शन घेताच परत आले. त्यांना त्यामध्ये रसाच उरला नाही.
जेंव्हा मनामध्ये अशांतता असते, तेंव्हा कोणत्याही गोष्टीचा आस्वाद घेता येत नाही. हा मानवी आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे..
सर्व  गोष्टींबद्दल  एक प्रकारची अरुचीपरावृत्ती   निर्माण होते, पण तरीही ती सोडून देते कठीण असते. एकदा अरुची निर्माण झाल्यावर ते सोडून देणे सोप्पे असते तरी ठीक आहे, पण अस्वस्थता असूनही ते सोडून देणे जमत नाही.
अशा परिस्थितीत काय कराल? अंतर्मुखी व्हा...स्वताच्या अंतरामध्ये डोकावून पहा.
आता अंतर्मुख कसे वायचे? इथेच सर्वजण अडकून पडलेले असतात... ना अंतर्मुख होता येत  ना बाहेरच्या जगाबद्दल रस उरलाय  --
ना   घर का ना घाट का !
या जगातले तर काही आनंद देत नाही पण तरीही चित्त  ध्यान धारणेमध्ये लागत नाहीये..
अशा अवस्थेत काय करावे..हे आकर्षण कसे बदलायचे.....मोठ्ठा प्रश्न आहे.
माझ्याकडे उत्तर नाहीये.. फक्त प्रश्न आहे !
खरे तर हे उत्तर तुमच्या आतूनच यायला पाहिजे ..जसे बीज पेरल्यानंतर त्यापासून रोपटे येते जे नंतर वृक्षामध्ये बदलते, उमलत जाते आणि नंतर त्याला फळे लागतात. हे बीज पेरण्याची प्रक्रिया म्हणजेच सत्संग.
हे बीज कसे पेरायचे? प्रथम जमीन तयार करायची, नंतर नांगरणी करायची; म्हणजेच आयुष्याचे सत्य काय आहे याची जाणीव करून घेणे, हे समजून घ्या कि इंद्रिये हि बहिर्मुख असतात. त्यांचा बाहेरच्या आकर्षण जास्त असते आणि याच्यामुळे समाधानाचा अनुभव करता येत नाही. क्षणिक आनंद मिळतोही पण तो अस्वस्थता घेऊन येतो आणि शेवटी उदासीनतेकडे घेऊन जातो.
अर्धे काम तर तिथेच होऊन जाते जेंव्हा आपण हे सत्य ओळखतो आणि समजून घेतो. बहुतेकांना ये सत्य जाणून घेण्याची इच्छा नसते. पण याचा सामना करणे आवश्यक आहे. सत्संगाचा अर्थ आहे, ' जीवनाचे सत्य काय आहे, ते समजून घेणे.'
यानंतर, प्रलोभनाना कसे जिंकून घ्यायचे?
एका आकर्षणापासून दूर होण्यासाठी  दुसरे त्याहून मोठे आकर्षण असणे जरुरी आहे; मगच लहानमोठी प्रलोभने गळून पडतील.
पहिला मार्ग आहे तो ध्यान, ज्ञान आणि सेवेचा. जेंव्हा एकाद्याला यामध्ये आनंद मिळू लागेल, तेंव्हा ऐहिक आनंदाच्या गोष्टींचे   आकर्षण कमी होऊ लागेल.
दुसरे म्हणजे जेंव्हा  एखाद्या कामासाठी एकचित्त आणि समर्पित वृत्ती असेल, त्याही वेळेस हे आकर्षण कमी होऊ लागेल.

माझ्या माहितीचे एक गणिताचे प्राध्यापक होते . ते रस्त्यातून चालताना स्वत:शीच बोलायचे, हातवारे करायचे आणि मनातल्या मनात गणिते सोडवायचे. लोक त्यांना वेद समजायचे. कधी कधी ते नादात आपल्या घरासमोरून पुढे निघून जायचे आणि मग त्यांच्या घरातली माणसे त्यांना बोलावून घेऊन यायची.
ते गणितामध्ये इतके बुडून जायचे कि घरदार, अन्नपाणी याची  त्यांना पर्वा नसायची. त्यांनी गणितातल्या एक नाव्वीन शाखेचा शोध लावला आणि त्यावर पुस्तकही लिहिले. इतके ते गणित प्रेमी  होते.
अशाच प्रकारचे काही शास्त्रज्ञ आहेत ज्यांना तहह, भूक यांची पर्वा नसते. जेंव्हा त्यांच्या विश्वात एखादा नवीन शोध लागतोत्यावेळेस त्या शोधाचा जनक असलेला शास्त्रज्ञाने  त्यामध्ये संपूर्णपणे स्वत:ला वाहून घेतले असते आणि जगातल्या इतर कुठल्याही  गोष्टींचे  त्यांचे आकर्षण संपून जाते.

आणि तिसरे म्हणजे, ज्ञानाचा   लगाम लावणे. जसे अपघाताच्या भीतीने गाडीला ब्रेक लावतो. म्हणूनच अधूनमधून वैराग्याचे ब्रेक लावले, तर तुम्चाय्वर  बाहेरच्या प्रलोभांनाचा प्रभाव  पडणार नाही.
हे सर्व करूनही जरा तुम्हाला तहान-भूक लागली, झोप आली किंवा काही बघण्याची तीव्र इच्छा झालीतर असे समजा कि इंद्रिये त्यांच्या स्वभावधर्मानुसार काम करत आहेत आणि मी या सर्वांपासून वेगळा आहे आणि शांत रहा.  
इन्द्रिये आपापल्या  गुणधर्म नुसार कार्य करणार  हे नैसर्गिक आहे . त्यामुळेस्वत:ला दोष देण्यापेक्षास्वत:ला अलिप्त आणि मुक्त, निवांत व्हा.
इंद्रियसुख हे प्रयत्नपूर्वक मिळवावे लागते पण निर्भेळ आनंद हा विनाप्रयत्न विश्रामातून, ध्यानामधून मिळतो. ध्यानातून मिळालेला आनंद हा प्रयत्नातून मिळालेल्या आनंदापेक्षा कितीतरी पतीने जास्त असतो.
कशापासुनही आनंद मिळवण्यासाठी काही प्रयत्न करावा लागतो. अशा प्रकारे, पाचपैकी कोणत्याही एका इंद्रीयापासून मिळालेल्या  सुखामुळे उर्जेचा (शक्तीचा) अपव्यय होतो आणि दमणूक होते कारण इथे कष्ट करावे लागतात. काही (काम) करण्यातून मिळालेले सुख हे कमी दर्जाचे आहे पण काहीही करता (ध्यानातून ) मिळालेला आनंद हा असीम,  उच्च  प्रतीचा आहेध्यानातून मिळालेल्या गाढ विश्रांतीमुळे शरीर सजग बनतेत्यामध्ये उर्जा  निर्माण होते आणि अस्वस्थता नाहीशी होते.
त्यामुळे, जेंव्हा  आपली अस्वस्थता शिगेला पोचते, तेंव्हा आपण ध्यान  करून त्यापासून मुक्ती मिळवू शकतो. हे अत्यंत महत्त्वाचे आहे

सत्य काय आहे? असा मार्ग कि ज्यावर दुखा:पासून मुक्त असा निखळ आनंद आहे. असा निखळ आनंद प्राप्त करणे, ज्यामध्ये अस्वस्थता आणि उदासीनतेचा अंश नसेल, हि आंतरिक ओढ आहे. हा पाठपुरावा करणे हीच अध्यात्मिक पृच्छा (ओढ) आहे आणि जो हा पाठपुरावा करतो, त्यालाच 'साधक' म्हणतात.
याबद्दल बोलणे आणि ऐकणे सोप्पे आहे, पण ते आचरणात आणणे खूप अवघड आहे, पण ते अशक्यही नाही. ज्याच्या मनात अशी इच्छा जागृत झाली आहे, त्यासाठी हे अजिबात अवघड नाही. त्याच वेळेस  (खरी) प्रार्थना होते.
जेंव्हा माणूस तहानलेला असतो, त्यावेळेस  तो  याचना  करतो  कि  ' कृपा करून मल थोडे पाणि द्या'. त्याच कळकळीने अशा प्रकारच्या शांतीची मनाला ओढ लागली पाहिजे - तती एक गोष्ट प्राप्त करण्याची उत्कट आकांक्षा ,  ज्यामध्ये बाकी सर्व काही मिळून जाईल. जो अशा या प्रबळ इच्छेने भारला गेला आहेतोही एक 'साधकआहे.  
आता, अशी शंका घेत बसू नका कि ' मी साधक आहे किंवा नाही? मला अशी काही उत्कटता नाही, मी सहज इथे येऊन बसलो आहे'.
असे मानून चला कि तुम्ही साधक आहात. मान्य करा कि तुमच्यामध्ये काही प्रमाणात आकर्षण आहे आणि ते आता कमी होते आहे. काही वर्षांपूर्वी ज्या प्रकारे तुम्ही या प्रलोभानांमध्ये गुंतला होतात, आताही तसेच आहे का? नाही ना?
 ज्ञान आणि वेळानुसार हे आकर्षण कमी होत जाते. त्यासाठी ज्ञान आणि वेळ, दोन्हीची गरज आहे. जसे हे आकर्षण सरते, तसे मन शांत होत जाते आणि जेंव्हा  हि शांती मिळते, त्याच वेळेस तुम्हाला ईश्वरप्राप्ती होते.© The Art of Living Foundation
The Art of living