क्षमाशीलता हे कमकुवतपणाचे लक्षण नाही !

30
2012
Jun
बून, नॉर्थ कॅरोलिना
प्रश्न: गुरुजी, कधी कधी मुलांबरोबर धीराने वागणे खूप अवघड होऊन जाते.रोज मी शांत राहण्याचे ठरवते, पण जेंव्हा कठीण परिस्थिती येते, तेंव्हा मला स्वत:ला आवरणे कठीण होते, मी काय करू?
श्री श्री: तुम्ही ‘आत्ता’ त्याबद्दल काहीच करू शकत नाही. तुम्हाला आयुष्य अंत:स्फुर्तीनेच जगावे लागते. लक्षात येतेय का मी काय म्हणतोय ते? कधीतरी राग येणेही ठीक आहे, काळजी करू नका. तुमच्या आयुष्यात ‘थोड्याश्या चुकीलाही’ जागा ठेवा आणि ते स्वीकार करा.
 तुम्ही, पार्ट १ कोर्स मध्ये काय शिकलात? माणसांना आणि परिस्थितीला आहे तसे स्वीकार करा. हि संपूर्ण आयुष्यभराची प्रक्रिया आहे. रोजच्या रोज तुम्ही स्वत:ला याची आठवण करून द्या मग जेंव्हा अशी परिस्थिती तुमच्यासमोर येऊन ठाकते, तेंव्हा तुम्हाला हे आपोआप आठवते, कि ‘ मला अमुक अमुक करायचे आहे’. आपण या अशा मार्गाने जात असतो. कधीतरी थोडेसे इकडेतिकडे घसरतो, पण त्याकडे लक्ष देऊ नका. पुढे चालत राहा. एक दिवशी नक्कीच तुम्हाला ‘बिनचूक’ वागायला जमेल.

एके दिवशी, एक शिक्षक, ज्यांनी २० वर्ष आर्ट ऑफ लिविंग बरोबर काढली आहेत, ते म्हणाले, “ गुरुजी, मी कायम आनंदी असतो हे खूप विचित्र वाटते. काहीही झाले तरी मी आनंदी असतो. आणि म्हणालो, “अखेरीस हे साध्य झाले तर! ” २० वर्ष हा काही कमी काळ नाही पण तरीही ठीक आहे. तुम्हालाही २० वर्ष लागली पाहिजेत असे नाही. मागे वळून पहा आणि तुमच्यामध्ये किती बदल झाला आहे, तुम्ही किती काय नवीन जाणून घेताले आहे आणि तुम्ही किती चांगले माणूस झाला आहात, याचा आढावा घ्या; याचसाठी हे उत्सव आहेत.गुरु पौर्णिमेचे उद्दिष्ट काय आहे? वर्षातून एकदा, तुमची किती प्रगती झाली आहे याची जाणीव करून घेणे, हाच उद्देश आहे. तुम्ही वेगवेगळया परिस्थितीमध्ये कशा प्रकारे प्रतिक्रिया देता, तुमचे अविचारी वागणे कसे कमी झाले आहे आणि विचारपूर्वक, समजुतीने वागणे कसे वाढले आहे, याकडे डोळसपणे बघा. आयुष्य म्हणजे एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, हो कि नाही?
तुमच्यापैकी किती जणांना असे वाटते आहे कि तुमच्यामध्ये अमुलाग्र बदल झाला आहे.(खूप लोकांनी हात वर केले)

कोणी असे म्हणूच शकत नाही कि काही झाले नाही. कोणीही असे म्हणू शकत नाही कि ‘माझ्यामध्ये काहीच बदल झाला नाहीये. माझ्यामध्ये तसूभरही बदल झाला नाहीये. ‘ जर कोणी असे म्हणत असेल तर तुम्ही त्याचे पायच धरायला हवेत. कारण तो मनुष्य जन्मत:च साक्षात्कारी असला पाहिजे.

काही मुले तुम्हाला खूप काही शिकवण्यासाठीच असतात. आणि आई वडिलांचे त्यांच्यावर नाराज होणेही ठीक आहे. तुम्ही त्यांच्याशी सतत गोड गोड, मधाळ वागणेही अपेक्षित नाही. तुम्ही त्यांना कमकुवत बनवाल. मी असे पालक पाहिले आहेत ज्यांनी कधीच आपल्या मुलांना ओरडले नाहीये. हि मुले जेंव्हा मोठी होतात, तेंव्हा ते कोणत्याही टीकेला तोंड देऊ शकत नाहीत. कोणाची थोडीशी टीका, थोडासा अपमान, थोडेसे अपयश त्यांना हादरवून टाकते. कारण त्यांनी असे काहीच कधी घरी अनुभव केलेले नसते. म्हणून घरी कधी कधी (नेहमी नाही) , मुलंवर नाराज होणे ठीक आहे. हे म्हणजे त्यांना ‘लस’ देण्यासारखे आहे, कि मोठे झाल्यावर बाहेरच्या जगात सक्षम आयुष्य जगू शकतील.पण म्हणून याचे निमित्त करून मुलांना सारखे रागावू नका, त्याचाही काही उपयोग होत नाही. त्याचाही अतिरेक वाईटच. तुम्ही तुमच्या मुलांना रोज ओरडत असाल तर ते कोडगे होतात आणि ते पूर्णपणे दुसऱ्या टोकाला जातात.हेही चांगले नाही. थोडीशी मात्राच ठीक राहील.

प्रश्न: आपला जीवांसाठी निवडताना ज्योर्विद्येला किती महत्त्व द्यावे?
श्री श्री: ते चांगले आहे. तुम्ही पत्रिकेवरून तुलना करू शकता कि तुमचे आपसूक किती गुण जुळतील आणि किती ठिकाणी तुम्हाला तडजोड करावी लागेल.
बऱ्याचदा, वेदिक ज्योतिष शास्त्रामध्ये असे म्हणतात, कि ‘ ३० गुणांपैकी २० गुण जुळतात आणि १० तुम्हाला तडजोड करून जुळवावे लागतात.’ म्हणूनच हे गणित आहे. हे माहीत असणे चांगले., म्हणजे जर एक नाराज झाला तर तुम्हाला आठवण येईल कि तुम्हाला अजून थोडी तडजोड करण्याची गरज आहे.
ग्रह ताऱ्यांचा प्रभाव नक्कीच असतो पण तो एकतर्फी नसतो. तुमचा सुद्धा या ग्रहावर प्रभाव पडतो. हे दुतर्फा आहे. या जगात सर्व काही दुतर्फा आहे.
मग तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही नामजप करा, मंत्र पठण करा. म्हणूनच असे म्हणतात कि ‘ओम नम: शिवाय’ हा मंत्र सर्व ग्रहतार्यांचे नियमन करतो. सर्व ग्रहांच्याही वरती शिवतत्त्व आहे. तिथे नक्कीच उपाय उपलब्ध आहे. हा उपाय म्हणजे ‘ ओम नमः शिवाय’ या मंत्राचा जप. कारण त्यामध्ये सर्व पंचमहाभूतांचा समावेश आहे जे सर्व वाईट प्रभाव निकामी करतात. तुम्हाला माहिती आहे का कि १०८ हा आकडा कुठून आला ते? तुमच्यापैकी किती जणांना १०८ चे महत्त्व माहिती नाहीये? १०८ म्हणजे ९ ग्रह (नवग्रह) आणि त्यांची १२ घरे, राशी.जेंव्हा हे ९ ग्रह १२ राशिन्मधून फिरतात, तेंव्हा १०८ वेळा त्यांची स्थिती बदलते.म्हणून त्या परिस्थिती मुळे होणारे अपायकारक प्रभाव मिटवण्यासाठी आपण ‘ ओम नम: शिवाय’ चा जप करतो. ते म्हणजे एका कवच सारखे आहे. हा अत्यंत पवित्र असा मंत्र आहे. अगदी या सभामंडपा पर्यंत येणाऱ्या पायऱ्याही १०८ आहेत. म्हणजेच तुम्ही सर्व ग्रह ताऱ्यांचा प्रभाव मागे सोडून संपूर्ण चेतनेची अनुभूती करता. जर सर्व काही ग्रहगोलांचे परिणाम आहेत तर मग साधना, प्राणायाम, ध्यान, सत्संग, मंत्रजप, भजन हे सगळे करण्याचे काय प्रयोजन? हे त्याचा प्रभाव निष्प्रभ करते आणि तुम्हाला जास्त स्वातंत्र्य मिळते. नाहीतर आपली चेतना हि काळ आणि अवकाश यावर अवलंबून असते. साधनाही खूप प्रमाणात स्वातंत्र्य देते. मी अगदी १००% म्हणणार नाही, पण खूप प्रमाणात. हे म्हणजे, पाऊस पडतो आहे आणि तुम्ही बाहेर जात आहात, तर तुम्ही निवाडा करू शकता, तुम्ही बाहेर जाऊन भिजा किंवा रेनकोट घाला आणि भिजू नका.

प्रश्न: जर तुम्हाला लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल खात्री नसेल तर तुम्ही प्रवाहाबरोबर वाहत जाऊन लग्न करावे का तुम्ही खात्री होईपर्यंत थांबावे?
श्री श्री : तुम्ही ज्याच्याबरोबर लग्न करणार आहात त्याला विचारा. काही लोकांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नसते., त्यांना सगळ्यासाठी कोणीतरी धक्का देण्याची गरज असते, अगदी लग्नासाठी सुद्धा. आणि एकीकडे दुसरे असतात जे क्वचित अशा परिस्थितीत सापडतात. मी निवाडा तुमच्यावर सोडतो. आणि एकीकडे हे दुसरे असतात, ज्यांना कधीही सुंदर मुलगी/मुलगा दिसले कि लग्न करायचे असत आणि जेंव्हा त्या दिशेने काही ठोस घडू लागते, त्यांच्या मनात शंका कुशंका येऊ लागतात, कि हे चांगले आहे का अजून कोणीतरी चांगले मिळेल. इथे मी पुन्हा सांगेन, कि तुमच्या साथीदाराचे मत विचारात घ्या, त्यांना तुमच्यासारख्या निर्णय न घेऊ शकणाऱ्या माणसाशी लग्न करायचे आहे का? तुम्हाला माहीत आहे ना या अशा प्रश्नांना माझे काय उत्तर असते ते? निवड तुमची, आशीर्वाद माझे ! Category: Confusion, Relationships, Marriage

प्रश्न: मला फ्लोरिडा येथील मायामी मध्ये ‘प्रीसन स्मार्ट प्रोग्राम’ करायचे आहेत. गुन्हेगारी प्रवृत्ती आणि मानसशास्त्र यांचा मी अभ्यास केला आहे. आमच्या राज्यात खूप पैसा हा तुरुंग, बिल्डिंग आणि शिक्षण यासाठी राखून ठेवला आहे. मी कशा प्रकारे मदत करू शकतो?
श्री श्री : हे चांगले आहे. जेंव्हा तुम्ही तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना भेटायला जाल, तेंव्हा एकटे जाऊ नका. ४ ते ५ लोक एकत्र मिळून जा, त्यांच्याशी बोला आणि त्यांना आपले म्हणणे पटवून द्या. त्यांना व्हिदिओ दाखवा आणि दाखवून द्या कि ज्या लोकांनी हा प्रोग्राम केला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये किती आणि काय बदल झाला आहे. मला माहितीये, कि हे अनुभव पाहिल्यावर कुठलाही शहाणा माणूस त्याला नाही म्हणू शकणार नाही. ते अनुभव फारच छान आणि कोणाच्याही थेट हृदयाला भिडणारे आहेत.
Category: Art of Living Courses

प्रश्न: मृत्यूला वय नसते. मग जेंव्हा एखादा माणूस मरण पावतो, लहान किंवा म्हातारा, त्यांचा आत्मा त्याच वयाचा असतो का?
श्री श्री : आत्म्याला वय नसते आणि तुम्ही म्हणालात तसे मृत्यूलाही वय नसते. मृत्यूला वेळ नसते आणि आत्म्याला वय नसते. बरोबर आहे! सगळे काही आरंभापासून सुरु होते. Category: Death.

प्रश्न: जेंव्हा गोष्टी खूप न समजणाऱ्या, संदिग्ध असतात तेंव्हा मला त्याबद्दल ज्ञान कसे होईल?
श्री श्री: चायनिज भाषेमध्ये एक म्हण आहे, ‘जेंव्हा तुम्ही खूप गोंधळून जाता, तेंव्हा उशी घेऊन झोपून जा. दुसऱ्या दिवशी जेंव्हा तुम्ही उठाल, तेंव्हा तुम्ही खूप चांगले असाल.’ तुम्हाला माहितीये का, कि आपली महत्त्वाकांक्षा, आपली अति महात्त्वाकांक्षा आपल्याला निवाडा करू देत नाही. मला एक SMS आला होता. एक भक्त एका श्रीमंत माणसाच्या घरी गेला होता आणि त्यांनी विचारले कि ‘ तुम्ही काय घेणार? कॉफी, चहा, कोक, दुध, ओजास्वीता, आणि बरेच काही. मग त्या भक्ताने उत्तर दिले’ चहा’. मग तो म्हणाला, ‘कोणता चहा, सिलोन चहा, फळांच्या स्वादाचा, दर्जीलीन्ग्चा, भारतीय का बर्माचा चहा?’ तो म्हणाला ‘सिलोन चहा’.मग त्यांनी विचारले, ‘ तुम्हाला कला चहा, दुधाचा चहा, थंड चहा का लिंबू घातलेला चहा हवा आहे? तो म्हनला, ‘ दुधाचा चहा’. ‘कोणते दुध पाहिजे?’ प्रक्रिया केलेले, न प्रक्रिया केलेले, निरसे, २%, २.५% का १०% स्निग्धता असलेले? तो म्हणाला , ‘ अरे बापरे, मला काळा चहाच द्या’. ‘मग तुम्हाला त्यामध्ये साखर हवी आहे का? ‘ तो हो म्हणाला. मग ते म्हणाले, कोणती साखर? पंढरी साखर, ब्राऊन साखर का मध?’ तो म्हणाला, ‘ तहानेने माझा जीव चालला आहे.’ मग त्या माणसाने विचारले, ‘तुम्हाला कसे मरायचे आहे? आमच्या कंपनीचे भागीदार होऊन का आम्हाला माल पुरवून? ‘ तात्पर्य काय तर ,जर का निवड करायला खूप गोष्टी असतील, तर बुद्धीचा पार गुंता होऊन जातो. Category: Confusion, Choice Insert Text Box 2

प्रश्न: मी तुमच्या भोवताली खूप लोक बघतो, जे तुमच्या खूप जवळ असतात. मला असे वाटते कि मी काही खास नाही. मला तुमच्याबद्दल आपुलकी कशी वाटेल? या मार्गावर १००% झोकून देण्यासाठी ती आपलेपणाची भावना असणे गरजेचे आहे असे मला वाटते.
श्री श्री : काही गोष्टी तुम्हाला मानून चालाव्या लागतील आणि हि त्यातलीच एक गोष्ट आहे.--- आपल्यामध्ये खूप जिव्हाळा आहे, संपले.आता पुन्हा हा प्रश्न विचारू नका. तुमच्या संबंधाबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. आपण नक्कीच जोडलेले आहोत.यामध्ये काही शंकाच नाही. ते तुझ्या किंवा माझ्या कोणाच्याच हातात नाहीये. म्हणून शांत राहा, हा प्रश्न जर तुला त्रास देत असेल तर सोडून दे तो विचार. असा विचार करू नकोस कि काही लोक माझ्या जवळचे आहेत आणि काही लांबचे. प्रत्येकजण वेगळा आणि खास आहे.
कोणत्यातरी प्रकल्पामध्ये स्वत:ला गुंतवून घे. तू हे जेवढे जास्त करशील, तेवढे आपल्याला एकमेकांशी संपर्कात राहावे लागेल. नाहीतर एकमेकांशी बोलण्यासारखे आहे तरी काय? काय, बरे आहे न? तुम्ही म्हणणार ‘हो बरे आहे’ आणि आपण वेगळे होणार. पण जर तुम्ही काहीतरी करत असाल, जसे सुशांत त्वितर वर करतो आहे, मी त्याला बोलावून विचारले, ‘ हे मलाही शिकायचे आहे.’ सुशांत ला पुरस्कार मिळाला आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? तो ओबामांच्या प्रचारात होता आणि त्याने काही कामहि केले आहे, त्याबद्दल २च दिवसांपूर्वी त्याला पुरस्कार मिळाला आहे. जेंव्हा सार्वजन विचारात पडले होते, तेंव्हा त्याने एक नवीन कल्पना मांडली. आणि त्याच्या या वेगळ्या दिशेने विचार करण्यामुळे कंपनी ने त्याला बक्षीस दिले आहे.

म्हणून, असा काहीतरी प्रकल्प हातात घ्या. तुम्हाला जे आवडेल ते करा. आत्ता मीनाक्षी एक खूपछान स्वयंपाक कलेचे पुस्तक घेऊन आली आहे. ते खरे तर पुस्तक नाहीये, तर वेगेवेगली पाने आहेत कि पदार्थ बनवताना ते समोर ठेवून सुरुवात करता येईल. हा एक प्रकल्प आहे. अशाच प्रकारे सर्वांनी एकत्र येऊन काही सुरु केले तर काहीतरी बसून बोलता येईल. नाहीतर मौन, ध्यान यामधून आपण जोडलेले आहोतच. आणि तुम्हाला कधीही मदत हवी असते, तेंव्हा ती तुम्हाला मिळते का नाही? किती जणांना मिळते? (सगळे जन जात वर करतात). बघा, सगळ्यांना मिळते. म्हणजे मी माझे काम नीटपणे करत आहे.
Category: Guru, Sri Sri Ravi Shankar, Spiritual Master, Doubt.

प्रश्न: माझ्या मानत खूप वेडेवाकडे विचार चालू असतात. त्यामुळे काही नुकसान होईल का?
श्री श्री : काळजी करू नका. ते विचार म्हणे स्वत:ची ओळख बनवू नका. विचार येतात आणि जातात. जोवर तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही, त्यानुसार आचरण करत नाही, तोवर तुम्ही सुरक्षित आहात. संपूर्णपणे विरक्त होऊन सुखादुक्खाच्या पली कडे जाण्यासाठी, हे असे विचार मनातही न येण्यासाठी, तुमच्या चेतनेला वेळ लागेल. ते लगोलग होत नाही. मी सांगतो कि त्याला वेळ लागेल. तुम्हाला जाणवले असेल कि जशी तुमचे साधना चांगली होते, तसे अश्या प्रकारचे विचार कमी कमी होत जातात. वेडेवाकडे, विध्वंसक विचार कमी कमी होत.
Category: Thoughts, Lust, Sex, Sadhana

प्रश्न: या उद्घानाच्या दिवशी मला आशीर्वाद मिळाल्यान मी धन्य झालो आहे. हे खूप छान आहे. प्रत्येक वाक्याने माझे मन जिंकून घेतले आहे. माझी बहिण आणि पालक यांना मी धन्यवाद देतो, जे ध्यान आणि समर्पित वृत्ती आणि सेवा यांचे स्वरूप आहेत. मी कधी इथे येईन असे मला वाटले नव्हते. मला माझ्या आर्त ऑफ लीविग्न्च्या शिक्षकांना, बंधू आणि भगिनींना धन्यवाद द्यायचे आहेत. त्यांनी वेळोवेळी मला या मार्गावर राहण्यासाठी प्रेरणा दिली आहे. माझे आणि माझा मुलगा, यांनी मला खूप सहकार्य केले. त्यांना मी माझे प्रथम गुरु मानते. त्यांनी मला ‘साक्शिभावामधे जगणे शिकवले. या सगळ्यासाठी खूप खूप आभार.
श्री श्री : हे चांगले आहे. हेच आपण ओळखायला शिकले पाहिजे.आपली सांगत हि फार महत्त्वाची आहे. आपले मित्र, नातेवाईक, आपल्याला उंचीवर नेऊ शकतात किंवा आपल्याला पार तलागालात नेऊ शकतात. जर का कोणी जास्त नकारात्मक होत असेल तर त्याला वर उठवण्याचा प्रयत्न केला पाहिजेत. त्यांना या नकारात्मक वृत्तीन मधून बाहेर काढले पाहिजे. अशा नकारात्मक वृत्ती सहज बळावल्या जातात, दोषारोप करणे, तक्रार करणे हे सगळे त्यापाठोपाठ येते. पण हे ज्ञान जे आहे ते खूप मौल्यवान आहे. जेंव्हा आपण जास्तीत जास्त त्यामध्ये गढून जातो, आपल्याला वर उठण्याची शक्ती मिळते आणि आपल्याबरोबर दुसऱ्यांनहि आपण घेऊन चालतो.

सर्वसाधारणपणे औपाचारिक समारंभ हे खूप कंटाळवाणे असतात., अर्धे लोक झोपून जातात तर उरलेले डुलक्या घेत असतात. पण आजचा कार्यक्रम मात्र छान झाला, सार्वजण एकदम उत्साही होते.आणि दुसरी गोष्ट म्हणजे, सगळे श्रेय वक्य्तांकडे जात नाही तर श्रोतेही तेवढेच महत्त्वाचे आहेत. चांगले श्रोते हे वक्त्या मधले चांगले गुण वर आणण्यासाठी प्रेरणादाई ठरतात. त्यामूळे जेंव्हा तुमच्यासारखे चैतन्यदायी, जागरूक, सहृदय श्रोते, अत्यंत चांगल्या उद्देशाने इथे जमा असताना वक्त्यांनी चांगले सुयोग्य भाषणे केली यात फारसे नवल नाही. नेहमीच वक्ते आणि श्रोते यांच्या मिलाफातून कार्यक्रम चांगला होत असतो. आणि कितीही चांगले वक्ते असले आणि तेवढे चांगले श्रोते नसतील, तर योग्य ते शब्द बाहेरच पडणार नाहीत. त्यांना अडथळा होईल.
Category: Gratitude, Overcoming negative emotions.

प्रश्न: ज्यांना आपण टाळू शकत नाही, अश्यांच्या प्रती जर राग आणि द्वेष असेल, तर काय करावे?आणि विशेषकरून जर दोघांच्यात खूप प्रमाणात मतांची भिन्नता असेल तर?
श्री श्री: प्रथम तुमच्यातील भव्यतेचा, विशालातेचा अनुभव करा. जर तुम्ही तुमच्या तल्या विशालातेवर आणि तुमच्या अंतरंगात असलेल्या सुंदरतेवर विश्वास ठेवलात, तर तुम्हाला अशा परिस्थितीचा सामना करणे सोप्पे जाईल. पण जर तुम्ही स्वता:च्या अंतरंगात न पाहता, फक्त दुसऱ्यांच्या वागण्यावारच लक्ष केंद्रित केलेत, तर नक्कीच तुम्हाला त्याचा त्रास होईल. मग तुम्ही समोरच्या माणसाला बदलण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही त्यामध्ये अपयशी होता. जी मनसे तुम्हाला वैतागून सोडतात, कुठल्या न कुठल्या प्रकारे ते तुमच्यातील चांगले गुण वर आणत असतात. त्यांच्यामुळे तुमच्यामधील हुशारी आणि कौशल्य पणास लागते. जेंव्हा तुमच्या आजूबाजूला सर्व काही उत्तम असते, तेंव्हा तुम्हाला कुठल्या कौशल्याची गरज नसते. पण जेंव्हा तुम्हाला वाटते कि तुमच्या सभोवतालची माणसे फारच अव्यवहार्य वागत आहेत, तेंव्हाच हे घडते. हा एक प्रकारे अभ्यास आहे, परीक्षा आहे.

मला माहीत आहे कि हे सोपे नाही पण कमीतकमी तुमचे चित्त तरी अविचलित राहील. मी “Celebrating Silence आणि Celebrating Love,या २ पुस्तकांमध्ये याबद्दल बोललो आहे. जेंव्हा तुमच्या आतमध्ये खोलवर तुम्हीत्या माणसाचा स्वीकार करता, तेंव्हा समोरचा माणूसही हळू हळू बदलू लागतो. हे विचित्र आहे, पण सत्य आहे. जेंव्हा आपण बदलतो, तेंव्हा ते बदलतात.
Category: Anger, Relationships

प्रश्न: मी माझ्या घरच्यांसाठी खूप काही करतो पण तरीही ते सतत मला नावे ठेवतात. मी काय करू?
श्री श्री : असे म्हणू नका ते कायम तुम्हाला चूक ठरवतात. जर ते नेहमीच तुम्हाला चुकीचे बोलत असले तर ते तुमच्या लक्षातही येणार नाही किंवा तुम्हाला त्याचा अजिबात त्रासही होणार नाही. तुम्ही तो त्यांचा स्वभावाच आहे म्हणून स्वीकार कराल. कधीतरी तुम्ही योग्य ते केले आहे, असे ते म्हणाले असतीलच न. जेंव्हा ते तुमचे कौतुक करतात, तेंव्हा जर का तुम्ही त्या कौतुकाचा स्वीकार करता, तर तुम्हाला त्यांच्या टीकेचाही स्वीकार करायला हवा. तुम्हाला कोणतातरी मधला मार्ग शोधायला हवा.

तुम्हाला माहितीये, बऱ्याचदा आपण कुठलीही समस्या हि कायमच आहे असे ठामपणे मानून चालतो आणि बाहेरच्या(भौतिक) जगाशी त्याचा संबंध जोडतो. ‘काय हे, मी नेहमीच चुकीचे वागतो’, ‘ मी नेहमी बरोबरच असतो’, ‘ मी असाच आहे’, ‘सगळेजण वाईट आहेत’. हे अगदी सामान्यपणे आढळते. आपण त्याच्यातून बाहेर पडून त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फक्त स्मित करा. तुम्हाला त्यांचे बोलणे अयोग्य वाटत असेल आणि ते जर सतत तुमच्यावर टीका करत असतील तर फक्त स्मित करा. त्याचा त्रास करून घेऊ नका. त्याना योग्य ती शिकवण द्या आणि विसरून जा आणि आपल्या मार्गावर चालत रहा. तुम्ही काय करू शकता? प्रत्येक वेळेला जेंव्हा तुम्ही ध्यानासाठी बसता, कोणीतरी येऊन म्हणते ‘ हे काय डोळे मिटून बसला आहेस. याने काही होत नाही. तू हे करू नकोस. ‘ त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही उठा, स्मित करा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ध्यानाला बसा. बोलणारे लोकांमध्ये बदल घडून येईल.
Category: Blame, Right and Wrong. Insert Text Box 3

प्रश्न: जर प्रेम हा आपला स्वभाव आहे, तर आपल्याशी वाईट वागणाऱ्या माणसाला दुखावताना बरे का वाटते? दुसऱ्यांवर सूड उगवण्या पासून स्वत:ला कसे आवरू शकू?
श्री श्री : परत, तुम्ही ‘निस्सीम साधकाच्या अंतरंग वार्ता’ हे पुस्तक वाचा. मी या विषयावर खूप काही बोललो आहे.

तुम्हाला हि साखळी अशीच चालू राहायला हवीये का?ते तुम्हाला दुखावतात, मग तुम्ही त्यांना आणि ते परत त्याचा सूड घेतात. तुम्हाला असे आवडेल का? मी प्रश्न विचारतोय.

तुमच्याकडून चुकून चूक झालेली आहे. समजा, तुमच्याकडून काहीतरी चुकले आहे आणि कोणी सूडबुद्धीने तुमच्याशी वागायला सुरुवात केली. तुम्ही जे केले किंवा बोललात त्याने ते खोलवर दुखावले गेले आहेत, तुम्ही हजार वेळेला क्षमा मागितलीत आणि तरीही त्यांना बदला घ्यायचा आहे, तर तुमची मन:स्थिती कशी होईल? तुम्हाला ते आवडेल का? तुम्ही दुसऱ्या माणसाच्या ठिकाणी स्वत:ला ठेवून बघा. तुम्ही विचार कराल, “ नाही, मी माफी मागितली, मी क्षमायाचना केली.’. असा विचार करा कि कोणी तुम्हाला तुमच्या चुकून झालेल्या छोट्याश्या चुकीसाठी माफ केले नाही, तर तुम्हाला ते आवडेल का? जर तुम्हाला माफ केलेले आवडेल तर मग तुम्ही कसे माफ करू शकत नाही? आणि हे, दुसऱ्याला दुखावून मजा घेणे योग्य नाही. हे म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे लक्ष वेधून घ्यायचे आहे, इतकेच. हे तुम्हाला सुधारायला हवे. हि आपल्या वृत्तीमधील विकृती आहे. दुसर्या कोणाला दु:ख्खी करून आपण मजा करणे हि एक विकृती आहे. “बघ, तू मला दु:ख्ख दिलेस मग मीही तुला दुख्खी करणार.’अशा प्रकारचा आनंद तुमच्यासाठी नाही. तो थोड्या काळा साठीचा आनंद आहे, जो तुम्हाला कितीतरी जास्त दु:ख्ख देऊन जातो, म्हणून त्याच्या मागे लागू नका. आनंद प्राप्तीचे याहून खूप चांगले मार्ग आहेत. जेंव्हा तुम्ही क्षमा करता, तेंव्हा त्यामधून किती मोठा आनंद आणि सौख्य मिळते ते. जेंव्हा कोणीतरी तुमच्या कडे येउन्माफी मागते, तेंव्हा त्याला क्षमा करणे हा तुमचा मोठेपणा आहे. मी तुम्हाला सांगतो, मोठेपणा हा माफ करण्यामध्ये आहे आणि तेच आपण करतो.

आणि नंतर तरीही जर का ते तसेच चुकीचे वागत राहिले, तर मग काठी हातात घ्या, त्यांना आव्हान द्या, कोर्टात जा काही करा. पण आधी एखाद्याला चूक सुधारण्याच्या बऱ्याच संधी दिल्या पाहिजेत. क्षमाशीलता हे कमकुवतपणाचे लक्षण नाही; त्याला आपण गृहीत धरता काम नाही. तसेच क्षमा न करण्याने तुम्ही चांगले बनणार नाही.
Category: Relationship, Forgiveness, Compassion

प्रश्न: २ मुले असलेल्या पण तणावपूर्ण लग्न संबंधाला कसे सामोरे जावे? या तणावपूर्ण परिस्थितीत अडकलेल्या २ छोट्या मुलींना कसे मार्गदर्शन करावे आणि कसा दिलासा द्यावा?
श्री श्री: जेंव्हा लग्न तुटतात, तुम्हाला मुलांच्या मानसिकतेशी फार काळजीपूर्वक सांभाळून घ्यावे लागेल. बऱ्याचदा पालक आपला राग त्या छोट्या मुलांवर काढतात. ते आपल्या जोडीदाराबद्दल मुलांशी वाईट बोलतात जेणेकरून मुले कायम त्यांच्याबरोबर राहतील. हे असे करू नका. त्यांना सांगू नका कि तुमची आई किंवा बाबा वाईट आहेत. त्यामूळे त्यांना काहीच मदत होणार नाही .

तूम्ही दोघांनी मिळून त्यांना समजवायला हवे कि, ‘ कि आम्ही वेगवेगळे रस्ते निवडले आहेत. पण आम्ही दोघे मिळून तुमची काळजी घेऊ.

‘ हि खूप नाजूक परिस्थिती असते, पण थोड्या काळापुरतीच असते. तुम्हाला माहीत आहे न कि हा अवघड काळ हि निघून जाईल; तुम्हाला हे नक्कीच माहीत असले पाहिजे. फक्त धीर धारा आणि भाकी करा. तुमची भाकी, ध्यान, तुमची साधना, या सगळ्याची तुम्हाला मदत होईल. ठीक आहे?

कधीकधी आपल्याला आयुष्यातले कटू सत्य पचवावे लागते पण त्यात अडकून न पडतात योग्य दृष्टीने त्याकडे पहावे लागते. तुमच्या मुलांना सुद्धा भविष्याचा विशाल दृष्टीकोन द्या. त्यांना भविष्यातील चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवलेत तर ते वर्तमानातील कटू क्षणांकडे लक्ष देणार नाहीत आणि दु:ख्खी हा होणार नाहीत.त्यांना चांगल्या भविष्याची स्वप्ने दाखवा, मोठे झाल्यावर त्यांनी काय करावे याबद्दल बोला किंवा देशाला कशाची गरज आहे याबद्दल बोला. जेंव्हा तुमच्यासमोर मोठ्ठी आव्हाने किंवा किंवा मोठ्ठ्या समस्या येतात तेंव्हा छोट्या वैयक्तिक घटना मागे पडतात. हि परिस्थिती हाताळण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. Category: Marriage, Relationships

प्रश्न: छोटी पूजा न करता मोठी पूजा करण्याचे काय प्रयोजन आहे?
श्री श्री : हे म्हणजे तुमचे रोजचे ध्यान आणि पार्ट २ कोर्स मधले मोठ्ठे ध्यान.. तसे आहे. प्रत्येकाचा आपला एक प्रभाव आहे. पूजा खूप मोठ्ठ्या असल्या पाहिजेत असे नाही, पण त्या खूप लोकांसाठी केलेल्या असतात, एका साठी नाही.

प्रश्न: आपण क्रिये नंतर उजव्या बाजूला का वळतो आणि डाव्या का नाही? मी हा प्रश्न खूप लोकांना विचारला, पण कोणीही याचे उत्तर दिले नाही.
श्री श्री: ओह, ते हुशार आहेत. त्यांची अपेक्षा आहे कि तुम्ही टीचर ट्रेनिंग कोर्स ला यावे. तिथेच आम्ही हे सर्व बोलतो. हि सगळी मोठी रहस्ये आहेत.

प्रेमाविना आयुष्य शुन्य आहे

17
2012
Jun
हार्लेम, हौलंड
मला सांगा, हि संध्याकाळ तुम्हाला कशी घालवायची आहे? तुम्हाला कोणत्या विषयांवर चर्चा करायला आवडेल? (श्रोत्यामधून आवाज: निरोगी कसे रहायचे, ध्यान करूया, आयुर्वेदा बद्दल सांगा, संकटकाळा विषयी बोला), पाहिलत! संकट या शब्दानेच आपल्या चेहऱ्यावर कसे स्मितहास्य आले, हे थोडे विचित्र आहे, हो कि नाही? सामान्यत: संकट म्हटल्यावर लोक अक्षरश: रडतात, पण इथे वेगळे आहे आणि हीच जीवन जगण्याची कला आहे –
प्रत्येक संकट हे कुणाच्या तरी फायद्यात बदलावे. संकटाला एक आव्हान, सुसंधी म्हणून स्वीकारायला हवे, हे आपण जगभर प्रचलित केले पाहिजे. तुम्हाला काय वाटते? तुम्हाला माहीत आहे का, चायनीज भाषेमध्ये संकट आणि सुसंधी या दोन्हीना एकच शब्द आहे! तुम्ही संकट असे म्हटले तर त्याचा अर्थ सुसंधी म्हणून सुध्दा होतो.

आणि कोणत्या विषयांवर तुम्हाला चर्चा करायला आवडेल? (श्रोत्यामधून आवाज: स्वातंत्र्य, प्रेम, निर्णय कसे घ्यावेत? अव्यवस्था, अंतरराष्ट्रीय स्थरावर मुलांना कसे शिकवावे?, फुटबॉल) आता मला सांगा, जर ह्या विषयाबद्दल काहीच ज्ञान नसेल तर? फुटबॉल बद्दल मला काही कल्पना नाही. भारतामध्ये फुटबॉल तेवढा लोकप्रिय नाही, लोकप्रिय आहे ते म्हणजे क्रिकेट. पण त्याच्या बद्दल पण मला ज्ञान नाही. ह्या कुठल्याच विषयी मला ज्ञान नाही. (श्रोत्यामधून आवाज: चालेल, इथे असणे हेच आम्हाला खूप चांगले वाटते!)

तुम्हाला माहीत आहे का, शब्दापेक्षा आपल्या उपस्थितीने आपण खूप काही व्यक्त करू शकतो; तुम्ही ह्याचे निरीक्षण केले आहे का? शब्द महत्वाचे आहेत, पण शब्दापेक्षा उपस्थिती महत्वाची आहे. मी नेहमी एक उदाहरण सांगतो. जेव्हा तुम्ही विमानातून उतरता तेव्हा हवाई सुंदरी म्हणते कि “तुमचा दिवस चांगला जावो’”, पण हे वरवर असते. हे फक्त त्यांच्या तोंडातून येते, त्यावेळेस त्यांचे मन कुठेतरी दुसरीकडे असते. पण तेच जर का आपल्या कुणी जवळच्या म्हणजे तुमची आई, आजी, काका किंवा काकू यांनी असे म्हटले तर त्याच्यात भावना, कंपन असते.

तुम्ही हे निरीक्षण केले आहे का? आपण लहान असताना आपल्या मध्ये भावनांचे महत्व होते. आपण जे काही बोलू किंवा करू ते खरे होते. हृदय आणि मन एकत्र होते. पण जस जसे आपण मोठे होतो कुठेतरी, कधीतरी, काही तरी घडते ते आपल्याला देखील माहीत नाही आणि त्यामुळे या दोन्ही मधली तार तुटते, आणि मग आपल्या मनात जे नाही ते आपण बोलून जातो.

काही जण म्हणतात ’खूप खूप आभारी आहे!’. विशेषत: हे तुम्हाला अमेरिके मध्ये दिसून येईल. तुम्ही जर एक पाण्याचा ग्लास भरून दिला की ते लगेच म्हणतात, ‘खूप खूप आभारी आहे!’. या मध्ये खूप आभार मानण्यासारखे काय आहे? तुम्ही काही अरब देशातील वाळवंटात नाही जिथे तुमचा पाण्याविना जीव चालला आहे आणि कुणीतरी तुम्हाला ग्लास भरून पाणी दिले आणि तुम्ही म्हणता की,’धन्यवाद! तुम्ही माझे प्राण वाचविले, अशी तरी परिस्थिती नाही. हो की नाही? मी असे म्हणत नाही की तुम्ही धन्यवाद मानूच नका. मला असे म्हणायचे आहे की जिथे तुमच्या भावना आणि शब्दांमधील तारतम्य नसेल तिथे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.

इथेच खरेपणाची उणीव भासते. आपल्या संवादामध्ये खरेपणा नसेल तर आयुष्य निरस आणि उदास वाटते. तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे? कल्पना करा तुमच्या कडे सर्व सुख सोयी आहेत, झोपायला चांगला बिछाना आहे, खाण्यासाठी चांगले अन्न आहे, पण प्रेम नाही, आपुलकीची भावना नाही, तुमची कुणाला काळजी नाही. तुम्ही कसे जगता किंवा तुम्हाला काय झाले याची कुणाला पर्वा नाही. तुम्हाला या पृथ्वीवर जगावसे वाटेल? जर आयुष्यात प्रेम नसेल, आपुलकीची जाणीव नसेल तर आयुष्य हे शून्य आहे. हे मानवी आयुच्याची विशेषत: आहे.

कुत्री, मांजरी, गाय, घोडा या प्राण्यामध्ये देखील या भावना असतात. तुमच्या घरी घोडा असेल आणि तुम्ही एक महिन्यानंतर घरी आलात तर तो घोडा आपले प्रेम व्यक्त करतो. हो की नाही? माणसाने भावनांची जाणीव ठेवली पाहिजे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही ‘ब्लू स्टार’ असायला हवे, जसे आपण आर्ट ऑफ लिविंग मध्ये म्हणतो. ब्लू स्टार म्हणजे जो नेहमी डोलत राहतो, हसत खेळत राहतो, ज्याला बुद्धी नाही आणि भावनांमध्ये गुंतून राहतो. हे पण चांगले नाही. आपल्याला भावना आणि बुद्धी, वैयक्तिक आयुष्य आणि सामाजिक आयुष्य ह्या मध्ये समतोल राखता आला पाहिजे.

काहीजण असतात जे फक्त स्वत: बद्दल काळजी करतात. दुसरे असे काही आहेत जे स्वत: बद्दल अजिबात काळजी करत नाहीत. ते एखाद्या यंत्रा सारखे काम करतात. आपल्या जगण्याचे तात्पर्य काय आहे, ह्या आयुष्या कडून आपल्याला काय हवे आहे याची त्यांना काहीच काळजी नसते.

जीवन जगण्याची कला म्हणजेच वैयक्तिक आयुष्य आणि सामाजिक आयुष्य या मधील समतोल राखणे. तुम्हाला तुमच्या स्वत:ची, मनाची, शरीराची, भावनाची काळजी घेतली पाहिजे आणि त्याच बरोबर समाजाची पण तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. समाजासाठी काही जबाबदारी घ्या पण त्याच बरोबर स्वत:च्या वैयक्तिक विकासाकडे दुर्लक्ष करू नका. कंपन विषयकची काळजी कशी घ्यावी हे ना कोणी घरी ना कुठल्या शाळेत शिकविले जाते, हे आपल्या भावनाच आपल्याला शिकवितात आणि आपल्या भावनांना शुद्ध, निर्मळ, सौम्य, शांत आणि आनंदी कसे ठेवावे हे देखील शिकवितात. आपण आनंदी कसे रहावे हे आपल्याला कोणी शिकवीत नाही. हे आपल्या स्वभावात आहे हे आपण गृहीत धरतो . हे आपल्या स्वभावात आहे यात काही शंका नाही, पण आपण कुठेतरी हे हरविले आहे. हो की नाही? आणि मी तुम्हाला सांगतो की याचा स्टोक मार्केट शी काहीही संबंध नाही. तुम्ही जर भूतान, बांगलादेशला गेलात तर तुम्हाला हे जाणवेल की भले हे देश गरीब आहेत पण सगळे आनंदी आहेत.

अलीकडे संयुक्त राष्ट्र संघटने मध्ये भूतान च्या पंतप्रधानांनी, The GDH (Gross Domestic Happiness) नावाने एक परिसंवाद आयोजित केला, जो ‘आपण सुखी आनंदी कसे राहू शकतो?’ या विषयावर आधारित होता. आजकाल सर्वजण या विषयावर बोलत आहेत. आणि हेच आम्ही गेली तीस वर्षापासून बोलत आहोत. मला आनंद आहे कि तीस वर्षाच्या दीर्घकालावधी नंतर जगातील नेत्यांनी या विषयावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. पन्नास वर्षापूर्वी सरकार ला मानवी आरोग्या विषयी काही काळजी नव्हती. पण काही कालावधीनंतर ते समाजातील लोकांची मानसिक, शारीरिक आरोग्याची आणि अध्यात्मिकाची काळजी घेवू लागले. The World Health Organization (WHO)ने तर हे दहा वर्षापूर्वी पासून सुरु केले आहे. आता जगातील सर्व सरकार Gross Domestic Happiness बद्दल बोलत आहेत. माझा इथे येण्याचा हेतू हाच आहे कि इथे हॉलंड मध्ये एक आनंदाची लाट निर्माण करणे.

मी जिथे जातो तेथील लोक हेच म्हणतात कि ,’गुरुजी तुम्ही इथेच रहा. तुम्ही इथे आल्यावर आम्ही सर्व खूप खुश, आनंदी आहोत’. मग मी सांगतो कि. ’मी नसल्यावर आनंदी न रहाण्याच हे कारण मला सांगू नका’. मला माहीत आहे कि मी आल्यानंतर एक आनंदाची लाट, तरंग निर्माण होते आणि हि लाट तरंग पसरविण्याची तुमची जबाबदारी आहे. ज्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग चा कोर्स केला आहे त्यांच्या मध्ये असे परिवर्तन आले आहे.

आपण स्वत: साठी थोडा वेळ दिला पाहिजे. थोड्यावेळ ध्यान करावे, सामाजिक कार्यामध्ये स्वत:ला गुंतून घ्यावे. मला असे वाटते कि सर्वानी पुढे येवून नेतृत्व करून दुसऱ्यांना रस्ता दाखवावा. पहिल्यांदा एक निश्चय करा कि माझ्या आयुष्याचे ध्येय हे दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणे आहे. मी कुठल्याही मार्गाने हातभार लावेन. तुम्ही तुमचा वेळ देवू शकता, तुमच्या कर्तृत्वाने काही करू शकता, तुमच्या साधनसंपत्तीने मदत करू शकाल.

तुमच्या सर्जनशील कल्पनेने पहा आपण या समाजाला किती आनंदी सुखी बनवू शकतो. माझे स्वप्न एक अहिंसा मुक्त विश्व पहावयाचे आहे. एक अहिंसा मुक्त समाज, आरोग्य शरीर, शांत मन, प्रतिबंध न करणारी बुद्धी, आघात मुक्त स्मृती आणि उदासी मुक्त आत्मा हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. लोकांच्या मनामध्ये खूप प्रतिबंध आहेत. आपल्याला हे प्रतिबंध नाहीसे केले पाहिजेत. युरोप देशात ३०% लोकसंख्या हि उदासीनते पासून पिडीत आहे आणि आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्याला ह्या साठी काहीतरी केले पाहिजे, हो कि नाही? त्यासाठी मी म्हणतो कि आपण आधुनिक तंत्रज्ञाना बरोबर प्राचीन ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. प्राचीन लोकांना बरेच काही माहीत आहे. आपल्याला दोन्हींचा वापर केला पाहिजे; काही भूत काळातील गोष्टी आणि काही वर्तमान पिढीच्या गोष्टी. हे एकत्रित केल्याने आपण हे विश्व, समाज सुंदर बनवू शकतो.

तंत्रज्ञानामुळे विश्व हे छोटे खेडे झाले आहे. माणुसकी आणि अध्यात्मामुळे हे एका परिवारात परिवर्तन होईल. आपले स्वप्न विश्व एक परिवार बनवायचे आहे. आपण ह्या परिवाराचे एक भाग आहोत. ज्या क्षणी तुम्ही हा विचार कराल त्या क्षणी तुमच्या भावनांचे तुम्ही निरिक्षण करा. आपल्यात खरेपणा येईल. आपला स्वभाव एकदम नैसर्गिक होतो. आपण प्रत्येकाशी आपुलकीने वागतो. आपल्याला कशाचीही भीती वाटत नाही, तो माझ्याविषयी काय विचार करेल?’, ‘त्याचे माझ्याविषयी काय मत असेल?’. ह्या सर्व चिंता दूर होतील. लपविण्यासारखे काहीच नसेल. तुम्हाला स्वत:चे संरक्षण करावे असे वाटणारच नाही किंवा दुसऱ्यापासून काही लपवावे लागणार नाही कारण तुम्हाला माहीत आहे कि हे सर्व तुमच्याच परिवारातील आहेत.

आपण ज्यावेळेस म्हणतो कि मला संरक्षण हवे याचा अर्थ म्हणजे आपल्या मध्ये कुठेतरी भय आहे. भय वाटणे म्हणजे आपुलकीची जाणीव नाही. मला इराक च्या पंतप्रधानानी आमंत्रित केले होते. मी तिकडे गेल्यानंतर मला त्यांनी संरक्षण साठी १२ गाडया दिल्या. हि ४-५ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नुकतेच युद्ध संपले होते. त्यात दोन टँकर होते, जे अंतर कापायला नेहमी अर्धा तास लागायचा त्याला दोन तास लागले. मी ज्या हॉटेल मध्ये राहिलो होतो ते सर्व बाजूनी सुरक्षा रक्षकानी वेढले होते. तो ग्रीन झोन होता. तिथे तीन प्रकारचे झोन होते – ग्रीन झोन, येलो झोन आणि रेड झोन. मी मंत्र्यांना सांगितले कि मी इथे काही सुरक्षा गराडयात रहायला आलो नाही. मला लोकांना जावून भेटायचे आहे. ते म्हणाले.’ हा रेड झोन आहे; तुम्ही तिथे जावू शकत नाही. तुम्ही भारतातून आलेले पाहुणे आहात आणि महत्वाचे व्यक्ती आहात. आम्ही तुम्हाला तिकडे जावू देवू शकत नाही’. मी म्हणालो,’माझी स्वत:ची सुरक्षा आहे, कृपया मला जावू द्या’, आणि मी त्यांना सारखे म्हणत राहिलो. ज्यांना काही बोलयचे नव्हते त्याच्याशी मला संपर्क साधायचा होता. सरकार नाराज झाले होते, पण ते पाहुण्यांच्या विनंती ला नकार देवू शकले नाहीत. मग मी तिथे गेलो आणि तेथील लोकांना भेटलो. सुरुवातीला त्यांच्यामध्ये खूप राग भरलेला होता. त्या जमाती च्या नेत्यांना मी भेटलो. तेथील शिया समितीने माझ्यासाठी स्वागत समारंभ आयोजित केला होता. ते खूप कृतज्ञ होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते म्हणाले कि, ‘गुरुजी हे तुमचे दुसरे घर आहे. आमच्या कडे परत या. आम्हाला असे वाळवंटात टाकून जावू नका. त्यांना माझी भाषा समजत नाही कि ते माझ्या धर्माचे नाहीत तरी देखील त्यांच्या मध्ये प्रेम, आपुलकी दिसत होती.

त्यानंतर इराकच्या पंतप्रधानांनी ५० युवकाना भारतात शांतीचे दूत बनण्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले. हे ५० युवक बेंगलोर मध्ये दाखल झाले. त्यांना इंग्रजी येत नव्हते. आम्ही त्याच्या साठी अनुवादक आमंत्रित केले होते. ते रात्री खूप वेळ जागे रहायचे, येथील कुठलेही नियम पाळायचे नाहीत. ते एकमेकात भांडण करत रहायचे. तसे पाहता आश्रम मध्ये खूप शांती आहे. इथल्या लोकांना असे चित्र पाहायची सवय नाही. त्यांना सावरायचे म्हणजे खूप मोठे आव्हान होते. ते खूप मासांहार खायचे, पण इथे आश्रमात फक्त शाकाहारी आणि आरोग्यकारक अन्न आहे. पहिला दिवस खुपच कठीण, त्रासदायक होता. दुसरा दिवस तर अजूनच त्रासदायक होता. तिसरा दिवस तर असह्य होता. त्यांना तिथून पळून जायचे होते. मग मी त्यांच्याशी बोललो, त्यांची समजूत काढली आणि मग ते थांबायला तयार झाले. चौथ्या दिवशी त्यांच्यात परिवर्तन झाले. मला सांगायला आनंद होतो कि हे युवक त्यांच्या मायदेशी गेले आणि त्यांच्या पैकी एकजण पंतप्रधानांना त्यांच्या सचिवालयात मदत करतो. त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आहे. मला पंतप्रधानांनी विचारले कि, ‘तुम्ही अशी काय जादू केली? कि हे सर्व युवक सारखे हसत असतात आणि एवढ्या तणावपूर्ण परिस्थितीत देखील खूप उत्साही असतात’. हे युवक मायदेशी शांतीचे दूत बनून गेले आणि त्यांनी हजारो लोकांना, शांत कसे रहायचे, दुसऱ्याशी कसे संबंध करायचे आणि आनंदी कसे रहायचे याचे शिक्षण देवू लागले. अर्थात हा तर सागरातील एक थेंब म्हणू शकाल;

मी असे म्हणत नाही कि सर्व काही बदललेले आहे. आज पण इराक मध्ये अजूनही बॉम्बस्फोट होत आहेत. पूर्ण इराकचे परिवर्तन झाले आहे असे नाही पण काही युवकांमध्ये खूप परिवर्तन आले आहे ज्यांना शांत कसे रहायचे माहीत नव्हते. म्हणून मला वाटते कि ह्या ज्ञानाची जगाला फार गरज आहे – स्व मध्ये कसे रहावे आणि दुसऱ्याशी संबंध असे ठेवावे. तुम्हाला काय वाटते? जीवनाचा सार म्हणजे प्रेम आहे, जीवनाची सुरुवात आणि ध्येय प्रेम आहे. प्रेमानेच जीवनाची सुरुवात होते आणि जीवनला आधार मिळतो. प्रेमा शिवाय कोणी जगूच शकत नाही. तुम्ही लहान असताना तुम्ही कुणावर अवलंबून नसता. सर्व लहान मुले हि आश्रित असतात, पण तुम्हाला त्याची कधी जाणीव होत नाही कारण तुमच्याकडे आईचे प्रेम असते ज्यामुळे तुम्ही तिच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतात. आणि तुम्ही जसे मोठे होतात तसे तुम्ही प्रेम मिळविण्याचा प्रयत्न करता. तुम्ही आप्तसंबंधातून, तुमच्या मुलांकडून, वडीलधाऱ्याकडून किंवा सगळ्याकडून प्रेम मिळविण्याचा प्रयत्न करता. तुम्ही ज्या वेळेस वृद्ध होता त्यावेळेस सुध्दा एकटे राहू शकत नाही कारण तुमची काळजी घ्यायला कोणीतरी हवे असते.

तुम्ही भौतिक दृष्टीकोनाच्या पलीकडे पहिले तर तुम्हाला अध्यात्मिकाचा प्रभाव दिसेल; एक प्रकारची उर्जा असते कि जिच्यामुळे प्रेम सर्वत्र असते. आणि हीच उर्जा, ज्याला तुम्ही काहीही म्हणू शकता, एका व्यक्ती कडून किंवा असंख्य व्यक्ती कडून तुम्हाला एक सुंदर कंपन मिळते त्यालाच तर प्रेम म्हणतात. आपण सर्व याच गोष्टीपासून बनलो आहोत. आपण आयुष्यभर जी गोष्ट शोधत असतो त्याच गोष्टी पासूनआपण बनलो आहोत. ध्यान म्हणजे ज्या गोष्टीमुळे आपण अस्तित्वात आहोत त्या मध्ये विश्राम, आराम करणे. म्हणजे आपल्या उगम स्थानी रहाणे. मी तुम्हाला सांगतो ज्या गोष्टी मुळे हि सृष्टी निर्माण झाली आहे ती गोष्ट अनाकलनीय, चिरंतन, सुंदर, प्रचंड आहे. मी त्याचे वर्णन करू शकत नाही. खर पाहता आपण प्रेमा बद्दल जास्त बोलू नये कारण ते व्यक्त करणे अशक्य आहे. माझे एक निरीक्षण आहे, जे मला मनोरंजक वाटते, पूर्वेकडील देशात प्रेम व्यक्त केले जात नाही. ते प्रेम अनुभवतात पण व्यक्त करत नाहीत. ‘I love you so much’ असे सांगायला खूप लाजतात. ते खूप लाजाळू आहेत आणि असे शब्द ते उच्चारत नाहीत. मला माहीत आहे कि माझ्या आईचे माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझे तिच्यावर, पण तिने ‘मी तुझ्यावर प्रेम करते ‘ असे एकदा सुध्दा म्हटले नाही ना मी तिला कधी म्हटले नाही. आणि आपल्याकडे ‘I love you so much’ हे कधीच म्हणत नाहीत. नवरा बायको पण कधी शब्दाने प्रेम व्यक्त करत नाहीत. अमेरिके मध्ये याच्या बरोबर विरुद्ध आहे. कोणी बसले असेल किंवा उभे असेल तरी ते ‘Oh, I love you so much dear’ म्हणत राहतात. सकाळच्या चहा पासून ते रात्री झोपेपर्यंत ते वारंवार तेच म्हणत राहतात. मला असे वाटते कि याचा कुठेतरी मध्य, मधला मार्ग असावा. भारतातील खेड्यामध्ये लोक प्रेम करीत असतील पण ते कधीही बोलून दाखवत नाहीत.

माती मध्ये आपण ज्या प्रमाणे बीज पेरतो, प्रेम हि तसेच असावे, बीज जर जमिनीत जास्त खोलवर पेरले तर त्याला कधीही अंकुर फुटणार नाही. किंवा जमिनीवर ठेवले तरी त्याला अंकुर फुटणार नाही कि मुळे येणार नाहीत. प्रेम हे ना अमेरिके पद्धतीने ना पूर्वेकडील देशाप्रमाणे असावे, पण या दोन्हीतील मध्य असावे. प्रेम तुम्ही व्यक्त करा पण एवढे करू नका कि तुम्ही तुमच्या बायकोला सुरुवातीला, ’मधू, मधू, मधू’, म्हणाल आणि नंतर तुम्हाला मधुमेह होईल. सुरुवातीला तुम्ही म्हणता कि, ‘मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही’ आणि नंतर ‘ माझ्या डोळ्यासमोर उभी राहू नकोस’. असे खूप वेळा घडते. म्हणून मला वाटते कि आपण मध्य मार्गाने जावे, प्रेम व्यक्त करावे पण थोडे, अतिरेक नको. प्रेमाची मागणी केल्याने प्रेमाचा विनाश होतो. सामान्यत: बायको नेहमी म्हणते, ‘तुमचे माझ्यावर प्रेम आहे?’. हा प्रश्न नवरा बायको एकमेकाला सारखे विचारत असतात. ‘तुमचे हल्ली माझ्यावर प्रेमच नाही. तुमचे खरच माझ्यावर प्रेम आहे?’ असे सारखे विचारणा केली असता थोडेफार काही प्रेम आहे त्याचा पण विनाश होतो. ‘अरे देवा, या माणसावर माझे प्रेम आहे हे मी कसे सिद्ध करू?’. एखाद्याला आपले प्रेम सिद्ध करून दाखवायचे म्हणजे ओझे वाटते कारण प्रेम व्यक्त करणे फार कठीण आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीने व्यक्त करून दाखवा पण ते व्यक्त करता येत नसते. एका व्यक्तीला आपल्या भावना व्यक्त करायला कठीण जात असते आणि त्यात तुम्ही जर त्याला त्याच्या भावना व्यक्त करायला भाग पाडले तर तो विचार करतो कि, ‘अरे बापरे, हि तर मोठी डोके दुखी आहे’. याच करणामुळे काही कालानंतर संबंध तुटतात. मी तुम्हाला एक युक्ती सांगतो त्याचे तुम्ही अनुसरण करा – तुम्हा विषयी कोणा व्यक्तीचे प्रेम कमी होत आहे असे तुम्हाला वाटले तर तुम्ही त्यांना विचारा कि, ‘तुम्ही माझ्यावर एवढे प्रेम का करता? मी त्यासाठी पात्र नाही. मग त्यांना मोठेपणा वाटेल आणि ते आनंदी होतील. तुम्ही जर तृप्त असाल तर लोकांना तुमच्या बरोबर रहायला आवडेल, तुमच्या मध्ये काही उणीवा असतील किंवा तुम्ही जर निराश असताल तर लोक तुमच्यापासून दुरावतील. हे माझे निरीक्षण आहे, तुम्हाला काय वाटते? तर, तुमच्या सर्व विषयावर मी संबोधीत केले का? काही राहिले आहे का? चुकून काही राहिले का? (श्रोते:शांत)

प्रश्न: हा प्रतिकार येतो कुठून?
श्री श्री : काही प्रमाणात असुरक्षितता, अस्वस्थता आणि भूत काळातील आठवणी. तुम्हाला प्रतिकाराची जाणीव झाली कि तुम्ही त्यातून बाहेर येण्याचा निश्चय करा. हे पहा सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रतिकाराची जाणीव होत नाही अथवा तुम्ही ओळखू शकत नाही. एकदा का तुम्ही हे जाणले तर त्यातून जरूर बाहेर येवू शकाल. मी बुद्धिवान नाही असा विचार करू नका. तुम्ही फार बुद्धिवान आहात. तुम्हाला थोडासा धक्का देण्याची आवश्यकता आहे म्हणूनच मी सगळीकडे फिरत असतो. तुम्हाला पाठबळ द्यायला समूह हवा आहे. जसे सगळ्यांना माहीत आहे कि दारूचे व्यसन वाईट आहे तरी पण बरेचजण दारूच्या व्यसनाधीन होतात आणि त्यासाठी एक AA म्हणून समूह आहे जो अशा लोकांना थोडे पाठबळ देवून त्यांना व्यसन मुक्त करतात. आपल्या कडे सुदर्शन क्रिये साठी आहे. हा समूह का आहे, कारण तुम्हाला एकटयाला जर व्यायाम करायचा आळस आला तर तुम्हाला समुहात करू शकाल, आणि त्याने आपल्याला मदत होते. व्यायामाचे पण तसेच आहे, सगळीकडे जिम का आहेत? घरी कोणीही व्यायाम करू शकतो, जिम ला जायची गरज काय आहे? कारण एकटयाला व्यायाम करायला कंटाळा, आळस येतो, जिम मध्ये तुमच्या बरोबर बरेच लोक व्यायाम करत असतात. आणि जर का तिथे प्रशिक्षक असेल तर ते तुम्हाला आणखीनच सोपे होते कारण प्रशिक्षक तुम्हाला व्यायाम करायला मदत करतो. संस्कृत मध्ये एक प्राचीन म्हण आहे, ‘तुम्हाला जर काही सोसायचे असेल तर ते तुम्ही एकटेपणात सोसू शकता पण जर कुठली गोष्ट शिकायची असेल किंवा त्या गोष्टीचा अभ्यास करायचा असेल तर ते समुहात करा’ – एकास तपस्वी द्विर अध्यायी. तुमच्यावर काही संकट असेल किंवा काही नकारात्मकता असेल तर ती टोम, डिक आणि हैरीला सांगण्यात काही तथ्य नाही. उलट ते म्हणतील कि हा मनुष्य किती भयानक आहे, किती नकारात्मक आहे आणि या मुळे ते पण उदास होतील. तुमच्या उदासीनता किंवा नकारात्मक बद्दल बोलून काही उपयोग होणार नाही, त्याची तुम्हाला काही मदत होणार नाही. लोक आपले संकट सगळ्यांना सांगत बसतात. तुम्ही जर आजारी असाल तर तुम्हीं हे डॉक्टरला सांगितले पाहिजे, तोच त्याच्यावर उपचार करू शकेल. आजारपणा विषयी मित्राला फोन वरून सांगण्यात काही तथ्य नाही, कारण तो काहीही करू शकणार नाही. याच्यामधून फक्त फोन कंपनीचा फायदा होईल. मी सांगतो तुम्हाला कि या जगामध्ये जर लोक आपले आजारपणाबद्दल आपल्या मित्रांना सांगणे बंद करतील तर फोन कंपन्याचे उत्पन्न ४०% कमी होईल. तुम्ही जर संकटात असाल तर ते सर्वाना सांगणे आवश्यक नाही, तुम्हाला जर काही अडचण असेल तर त्याचा स्वीकार करा. आणि जर का तुम्हाला कुठल्या गोष्टीचा अभ्यास करायचा असेल उदा: वायोलीन किंवा पियानो वाजविणे, तर त्यासाठी कुणाची तरी आवश्यकता असते, बरोबर आहे कि नाही! संगीत, अभ्यास, जिम, योगा, ध्यान यातील काहीही समुहात करणे योग्य आहे. आज सकाळी इथे ९०० लोकांनी प्राणायाम आणि ध्यान केले. मी विचारले कि, ‘ आपल्या इथे किती केंद्र आहेत?’ उत्तर आले कि हॉलंड मध्ये ५ केंद्र आहेत. मग मी त्यांना सांगितले कि आपल्याला केंद्रांची संख्या वाढवावी लागेल. सर्व लोकांनी एकत्र येवून श्वासांचा सराव केला पाहिजे, योगासने केली पाहिजेत ज्यामुळे त्यांची चेतना उंचावेल. तुम्हाला मान्य आहे का? तुमच्या पैकी कितीजणांना वाटते कि अशा प्रकारची अनेक केंद्र असांवी जिथे लोकं एकत्र येतील आणि आनंदी होतील. (बरेचजण हात उंचावतात) तुम्ही सर्वजण मिळून अशी अनेक केंद्र बनविले पाहिजेत जिथे सर्व लोकं आठवड्यातून एकदा एकत्र येवून भोजन करतील, गाणी म्हणतील आणि त्याच्यामुळे आपुलकीची भावना येईल. मला हॉलंड आनंदमय करण्यास आवडेल. आपण पुढील एक वर्षात हॉलंडच्या प्रत्येक खेड्यात पोहोचून, कोणीही आत्महत्या करणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. आर्ट ऑफ लिव्हिंग चे यश म्हणजे Prozac च्या विक्रीत घट. ‘Prozac हे हॉलंड च्या कुठल्याही औषधी दुकानात मिळता कामा नये, कारण ते घ्यायला कोणी नसेल’ हे उद्दिष्ट आपल्या समोर ठेवले पाहिजे. आपण सगळे मिळून करू या? आपण याच दिशेने गेले पाहिजे. आपले उद्दिष्ट Prozac च्या विक्री मध्ये घट.

त्याग केल्याने तुम्ही सशक्त होता

05
2012
Jun
बेंगलोर, भारत
कोणत्या कारणामुळे आपण उदास होतो? पक्षी, आकाश, निसर्ग यामुळे आपण कधीच निराश, उदास होत नाही. पर्यावरणामुळे पण आपण उदास होत नाही. मग आपले निराश होण्याचे नेमके कारण काय? आपण आपल्या भोवतालच्या लोकांमुळे निराश होतो. आपले शत्रूच काय पण आपल्या मित्रांमुळे आपण निराश होतो. आपले मन आपल्या शत्रू किंवा मित्रामध्ये गुंतून राहते. दिवसभर आपण आपल्या मित्राबद्दल किंवा शत्रूबद्दल सतत विचार करत असतो.
कोणाचे काही वाईट केले नाही तरी लोकं आपले शत्रू बनतात. इथे बऱ्याच लोकांना हा अनुभव आला आहे. आपण कोणाचाहि अपमान केला नाही तरी लोकं आपले शत्रू होतात. हे खूप आश्चर्यकारक आहे. आपण विचार करतो कि, ‘काल पर्यंत हा माझा चांगला मित्र होता, आज अचानक ह्याला काय झाले? तो असा का वागत आहे?
त्याचप्रमाणे आपण ज्यांच्यावर काही उपकार, मदत केली नाही ते लोकं आपले जवळचे मित्र बनतात. म्हणून मी सांगतो कि, ही सर्व काही आश्चर्यकारक आणि रहस्यमय कर्म आहेत ज्यामुळे काही लोकं आपले मित्र बनतात आणि काही शत्रू.
तर मग आपण काय करायचे? आपण आपले सर्व मित्र आणि शत्रू यांना एका टोपलीत ठेवून आपण अंर्तमनाने रिकामे व्हायचे आणि आनंदी रहायचे. हे सर्व जे काही घडते ते एका नियमाने होते, पण हा नियम काय आहे आणि कुठून आला हे आपल्याला माहित नाही. लोकांच्या आपल्या बद्दलच्या असणाऱ्या भावनांबद्दल आपण कधीही काहीही सांगू शकत नाही. त्यासाठीच आपला आपल्यावर पूर्ण विश्वास असायला हवा, देवावर विश्वास ठेवावा पण कोणा मित्र अथवा शत्रूवर ठेवू नये. मित्र आणि शत्रू यांच्या बद्दल विच्रार करून आपला वेळ वाया घालवू नये. काय म्हणता तुम्ही?
याचा अर्थ असा घेवू नका कि तुम्ही तुमच्या मित्रांपासून दूर रहा किंवा नवीन मित्र बनवू नका. मला हे अजिबात म्हणायचे नाही. प्रेम, मित्रत्व हे आपल्या स्वभावातच असायलाच हवे. आपल्या शेजारी कोणी येवून बसल्यावर आपण त्यांच्या कडे पाहून स्मितहास्य करून त्यांच्याशी दोन गोष्टी बोलतोच. आपण हा विचार करू नये कि हा मित्र आहे कि शत्रू, मला कुणाबरोबर काहीच बोलायचे नाही असा विचार करून तिथून रागाने उठून जावू नये, हे चांगले, शहाणपणाचे लक्षण नाही. हा दुर्लक्षितपणा आणि मुर्खपणा आहे. आपण सर्वांशी वार्तालाप केला पाहिजे आणि त्याच वेळेस स्व: वर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. समजले का तुम्हाला?
जेव्हा आपण आपल्या स्व वर लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस आपल्याला राग येत नाही, आपण उदास होत नाही कि आपण आक्रमक होत नाही. आपल्याला कुठल्याही प्रकारची निराशा येत नाही. नाही तर बऱ्याच वेळेला काय होते, आपण विचार करतो कि एकेकाळी हा माझा किती चांगला मित्र होता आज तो माझ्याशी बोलत देखील नाही, मी त्याच्यासाठी काय काय केले आणि तो आज माझ्या विरोधात गेला. या विचाराने आपण आपला वेळ वाया घालवतो. हे आपण अजिबात करू नये. ठीक आहे ना !!!!!
आयुष्य हे फार छोटे आहे आणि या छोट्या वेळेत काही चांगले कृत्ये करावेत. आपल्याकडे त्याग बुद्धी असायला हवी. त्यागाने आपण सशक्त बनतो. जी शक्ती त्यागाने मिळते ती दुसऱ्या कुठल्याही गोष्टीने मिळत नाही. त्याग आपल्याला चांगली शक्ती देतो. सगळेजण कुठल्या ना कुठल्या मार्गाने छोटे किंवा मोठे त्याग करतातच. या जगात असा एकही मनुष्य नाही कि जो त्याग करत नाही. कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आपल्याला त्याग करावाच लागतो. जिथे प्रेम आहे तिथे कुठल्या तरी गोष्टीचा त्याग करावाच लागतो. आई आपल्या सुखाचा त्याग आपल्या मुलासाठी करते. प्रत्येक आई तिच्या बाळासाठी रात्रभर जागी राहते. तिचे सर्व लक्ष रात्रंदिवस आपल्या बाळावर असते. ती त्याच्या साठी आपले सुख विसरते.
त्याच प्रमाणे जगात अशी काही लोकं आहेत जे समाजासाठी त्याग करतात. हो कि नाही? जसे वडील आपल्या घरासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. नाही तर त्यांना एवढी मेहनत घ्यायची काय गरज आहे? कशासाठी? ते काही स्वत:साठी करत नसतात. कुटुंबाला सुख मिळावे म्हणून ते आपल्या सुखाचा त्याग करतात. हो कि नाही? एकटा मनुष्य एवढी स्वत:साठी मेहनत करत नाही. नाही तरी एकट्या मनुष्याच्या काय गरजा आहेत? त्याला फक्त रहायला एक छोटी खोली आणि पोटासाठी अन्न. एवढ्यासाठी थोडीशी मेहनत खूप आहे, रात्रंदिवस मेहनत करायची गरज नाही. आणि तो जर का ब्रम्हज्ञानि असेल तर तो थोडक्यात सुध्दा आनंदी आणि समृद्ध असेल. पण ज्याच्यावर कुटुंब आणि समाजाची जबाबदारी असेल तर त्याला कष्ट हे घेतलेच पाहिजेत.
म्हणजे प्रत्येक मनुष्य हा त्याग करतोच. जर कोणी मोठा त्याग करत असेल तर तो जास्त सशक्त आणि समृद्ध असतो. काहीजण आपले सुख आणि एशोराम त्याग करण्यासाठी तयार असतात, काहीजण आपली धन संपत्ती, काहीजण आपले नाते संबंध, काहीजण समाजानी दिलेल्या आदर सन्मानांचा त्याग करायला तयार असतात. आणि याचा विरोधाभास म्हणजे काही लोकं आपला समाजातील आदर सन्मान सोडायला तयार नसतात. जर का त्यांचा कुणी अपमान केला तर त्यांना खूप वाईट वाटते आणि ते कोसळतात. ती त्यांची दुर्बलता असते. आपण याचे बारकाईने निरीक्षण केले पाहिजे.
समृद्ध आणि सशक्त होण्यासाठी मोठ्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे. ज्यांच्याकडे त्याग करायला काहीच नाही आणि म्हणतात कि मी सर्व गोष्टींचा त्याग केला आहे, हे बरोबर नाही. सर्व कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडून ज्या व्यक्तीकडे सर्व काही आहे अशा व्यक्तीला त्याग बुद्धीची जाणीव असायला हवी. हे सर्वात चांगले.
हे पहा, एक संत म्हणू शकतात कि माझ्याकडे काहीच नाही, माझ्यासाठी घर पण नाही. मी किती मोठा त्याग केला आहे. पण मी याला त्याग म्हणत नाही कारण त्याच्यावर काही जबाबदारी, कर्तव्ये नाहीत. पण कोणी एक जण मोठ्या आश्रमाची आणि मोठ्या संस्थेची व्यवस्थापन जबाबदारी व्यवस्थित पार पाडतो. आणि हे करताना ज्याला त्याग आणि वैराग्याची जाणीव आहे तो सर्वोच्च. हाच भगवान श्रीकृष्णाचा मार्ग आहे.
अर्जुन भगवान श्री कृष्णाला म्हणाले कि, ”मी सर्व गोष्टींचा त्याग करून हिमालयात जात आहे. मला माझ्या भावंडांशी युद्ध करायची इच्छा नाही आणि मला राजेशाही चा उपभोग घ्यावयाचा नाही. मी हे सर्व कशासाठी करू? कृष्णा तू मला युद्ध करायला का भाग पाडत आहेस? मला जावू दे. मला हिमालयात जायचे आहे. तेव्हा श्री कृष्ण म्हणाले, “नाही, तू ते करू नकोस. तू तुझा धर्म सोडू नकोस, त्याच्यातून तुला काय फळ मिळेल याचा तू विचार करू नकोस.
तुम्ही तुमची कर्तव्ये आणि जबाबदारी पार पाडा पण त्याच बरोबर त्यागाची जाणीव ठेवा. देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी उचला पण त्याचबरोबर मनात त्यागाची आणि वैराग्याची जाणीव ठेवा.
संत कबीर यांची एक सुंदर कविता आहे, “ झुठ ना छोडा, क्रोध ना छोडा, सत्य वचन क्यों छोड दिया; क्रोध ना छोडा, काम ना छोडा, नाम जपना क्यों छोड दिया”
आपली जाणीव जेव्हा ईश्वराच्या नामजपाने पक्व होईल त्याच वेळेस आपण जप करायचे थांबवावे. जप केल्याने तुमची प्रगती अजपा कडे होते. पण तुम्ही जर जप अर्ध्या वरच सोडलात तर ते चुकीचे आहे. उदा: तुम्हाला कुठे उतरायचे आहे त्यानुसार तुम्ही एखाद्या बस मध्ये चढता. त्यावेळेस तुम्ही असे म्हणू शकत नाही, कि जर मला बस सोडायचीच आहे तर ती मी पकडू कशाला? काही लोकं असा विचार करतात. त्यांना समजत नाही कि जिथे तुम्ही बस पकडता आणि जिथे ती बस सोडता त्या दोन्ही वेगवेगळी ठिकाणे असतात. तुम्ही एका ठिकाणाहून बस मध्ये बसता आणि ती दुसऱ्या ठिकाणी उतरता. त्याच प्रमाणे तुमच्या मनाची स्थिती जप करण्याआधी वेगळी असते आणि जप केल्यानंतर वेगळी असते. आपल्या जीवनाचा प्रवाह पण ह्याच दिशेने असावा.
त्याग हा महत्वाचा आहे. त्यागाविना आपल्या मनात फार जडता येते. ज्या व्यक्तीला त्यागाची जाणीव असते, त्या व्यक्तीची तुम्ही कितीही स्तुती केली तरी त्याला त्याचा अहंकार येत नाही. ज्ञानी, त्यागी आणि भक्त यांची तुम्ही कितीही कौतुक, स्तुती केली तरी त्यांना अहंकार येत नाही. आणि ज्याला वैराग्याची किंवा त्यागाची जाणीव नाही अशा व्यक्तीला स्तुती, कौतुक म्हणजे एक ओझे वाटते. प्रेम आणि कौतुक ओझे वाटू शकते. असे वाटू लागल्यास आपण त्याच्या पासून दूर राहणे पसंत करतो. याच कारणांमुळे काही प्रेम विवाह तुटले आहेत. नवरा बायको मध्ये एक जण दुसऱ्यावर इतके प्रेम दाखवितो कि दुसरी व्यक्ती ते हाताळू शकत नाही. मग ती दुसरी व्यक्ती पळवाटा शोधते, आणि पळून जाते ! किती जणांनी असे होताना पहिले आहे? (खूप जण हात उंचावतात)
बरेच जण माझ्यापाशी येवून म्हणतात कि, “मी या व्यक्ती वर खूप प्रेम करतो, पण ती व्यक्ती माझ्यापासून दुरावते”. मी त्यांना सांगतो कि, ”तुम्ही एवढे प्रेम व्यक्त करू नका कि समोरचा व्यक्तीला कंटाळा येईल आणि तो चिडेल”.
परदेशात हेच नेमके होते. एक दुसऱ्याच्या पाठीमागे सारखे, ‘प्रिये प्रिये’, करून पळतात. आणि मग काय होते? त्यांना मधुमेहाचा त्रास सुरु होतो!!
ते सारखे प्रिये प्रिये म्हणतात आणि मग एके दिवशी ते कंटाळून म्हणतात कि, “मी तुला सहन करू शकत नाही”. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी अतिशोक्ती करू नये. आपल्या कडे भारतात एकदम विरुद्ध आहे. इथे प्रेम व्यक्त केले जात नाही. तुम्ही खेडे गावांत जाऊन पाहिले तर ते प्रेम कधीही व्यक्त करत नाही. ते आपल्या हृदयात प्रेम जपतात. परदेशात प्रेम एवढे व्यक्त करतात कि त्यातील प्रेम नाहीसे होते.
प्रेम हे एका बीजा प्रमाणे पेरले पाहिजे. जर तुम्ही बीज मातीत खोलवर पेरले तर त्याला कधीही अंकुर फुटणार नाही. जर तुम्ही १० फुट खोल बीज पेरले तर ते मरून जाईल. हीच परिस्थिती भारतातील खेडे गावात आहे. अशा काही नवरा बायकोच्या जोड्या आहेत जे आयुष्यभर एकत्र आहेत पण आपले एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करत नाहीत. शहरात आणी परदेशात वस्तुस्थिती एकदम ह्याच्या उलट आहे. तिथे नवरा बायको सारखे एकमेकाला ‘I Love you’ म्हणतात आणि म्हणूनच त्यांचे प्रेम अयशस्वी होते. त्यांचे नाते औपचारिक होते.
समजा तुम्हाला कुणी पाणी आणून दिले कि लगेच तुम्ही म्हणता, ‘खूप खूप धन्यवाद!’ इथे धन्यवाद म्हणायची काही गरज नाही. त्याने फक्त टेबला वरचा पाण्याने भरलेला ग्लास उचलून तुम्हाला आणून दिला आणि तुम्ही लगेच त्याला धन्यवाद म्हणता.
जर तुम्ही खरेच एखाद्या वाळवंटातून २-३ दिवस पाणी न पिता आला आहात आणि अशा परिस्थितीत तुम्हाला जर कोणी पाणी देवू केले आणि तुम्ही, ‘खूप खूप धन्यवाद’ म्हटलात तर त्यांत तुमचा प्रामाणिकपणा दिसू शकेल.
आपल्याच घरात आपण खूप औपचारिक राहतो. जर आपल्याला कोणी पाणी अथवा काही खायला दिले कि आपण लगेच, ‘धन्यवाद’ म्हणतो! ह्याला काहीच अर्थ नाही.
आपल्या भावना किती खोलवर आहेत हे आपल्या शब्दातून प्रामाणिकपणे व्यक्त झाले पाहिजे. शब्दांतून सगळ्याच भावना व्यक्त करता येत नाही, पण भावनांना नेमक्या शब्दात गुंडाळून व्यक्त करता आले पाहिजे. नाहीतर एखाद्याच्या खऱ्या अर्थाने भावना व्यक्त करणे अवघड होते. त्यासाठी शब्द हे फार महत्वाचे असतात आणि अशा पद्धतीने आपली भाषा व्यक्त करता आली पाहिजे.
कन्नड भाषेत एक छानशी कविता आहे जिचा सार असा आहे, ‘तुम्ही ज्या वेळेस बोलता, तुमची शब्द रचना हि जणू गळ्यातील मोती हारा प्रमाणे असावी. ती मोत्यासारखी शुद्ध, स्वच्छ, स्पष्ट, निर्मळ असावी, ती हिऱ्या सारखी चमकणारी असावी आणि ती पारदर्शक असावी. तुमच्या संभाषणाचा परिणाम असा झाला पाहिजे कि भगवान श्री शंकरांनी सुद्धा डोके हलवून आपली संमती दर्शवली पाहिजे. भगवान श्री शंकर हे तसे नेहमी शांत आणि स्थिर असतात, पण तुमच्या संभाषणाने त्यांनी सुद्धा आपले डोके हलवून म्हटले पाहिजे कि, ‘हो, हे सत्य आहे! ते बरोबर आहे.’
प्रश्न: गुरुजी, जर प्रेमाचे वास्तव्य चेतने सारखे आहे तर मग हि नातीगोती कशासाठी?
श्री श्री रविशंकर: चेतनेतूनच मनुष्य व्यक्त होत असतो. आणि मग नातीगोती ही आपापसात होतात. जर तुम्हाला कुठल्या नात्यांची गरज नसेल तर तुम्ही बळजबरीने कुठले ही नाते करू शकत नाही. तुम्हाला कुठेतरी नात्यांची गरज वाटते म्हणूनच तुम्ही हा प्रश्न विचारात आहात. तुम्ही स्वत:शी झगडत आहात म्हणून तुम्हाला नात्यांची गरज वाटते, पण इथे तुमचा अहंकार आड येतो आणि तुम्ही विचार करता कि ‘मला नात्यांची गरज नाही’. किंवा तुम्हाला नक्की माहीत नाही कि तुम्हाला नात्यांची गरज आहे कि नाही. ह्या साठी मी म्हणतो कि नाती चांगली राहिली अथवा वाईट त्याचा तुमच्यावर काही परिणाम होता कामा नये. तुम्ही फक्त विश्राम करा. सर्व काही बाजूला ठेवून ध्यान करा, विश्राम करा, आणि स्व कडे पहा. या जगात कोणाच्याही बरोबर संवाद साधताना चांगले संबंध जोडण्याचा प्रयत्न करा.
प्रश्न: गुरुजी, स्वत:ला आकर्षणापासून कसे दूर ठेवावे?
श्री श्री रविशंकर: ‘आकर्षणापासून दूर राहणे’ हा विचार जरी मनात आला तरी तुम्ही त्या पासून दूर आहात हे नक्की. हे चांगले आहे. तुम्ही असे समजून घ्या. गाडीला ब्रेक असणे आवश्यक आहे नाही तर तुम्ही संकटात येवू शकता. आयुष्य हे प्रेमाने भरलेले आहे यावर तुमचा दृढ विश्वास हवा. तुम्हाला प्रेम वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही, ज्या क्षणी तुमची उदासीनता दूर होईल त्या क्षणी प्रेम स्पष्ट दिसू लागेल. या साठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे – उदासीनते पासून मुक्तता आणि विश्राम.
प्रश्न: गुरुजी, माझी अशी इच्छा आहे कि मी घराचे दार उघडताच दारात तुम्ही असावेत, जेव्हा माझा फोन वाजेल त्यावेळेस तुम्ही तिकडून बोलत आहात आणि मी तुमचा आवाज एकत आहे. जो कोणी साधना रोज करत असेल त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही. तर मग मी माझ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी किती वेळ थांबू?
श्री श्री रविशंकर: हो! मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एके दिवशी मी आणि एक व्यक्ती, आम्ही आश्रमातून कोणालाही न सागंता बाहेर पडलो. आम्ही दुरवर एका गावात निघलो. वाटेत मी चालकाला एका छोट्या झोपडी पाशी गाडी थांबावयास सांगितली. मी त्या झोपडीत गेलो. आत मध्ये एक मनुष्य बसलेला होता. तो एका साधा शेतकरी होता ज्याच्याकडे थोडीशी शेती होती. घरात एक छोटासा टीव्ही होता ज्याच्यावर तो माझे कार्यक्रम पहायचा. कार्यक्रम पाहून त्याला मला भेटायची तीव्र इच्छा झाली. आणि मग तो विचार करायचा कि, ‘मी गुरुजींना कसे भेटू? माझ्याकडे तर बेंगलोरला जाण्यासाठी पैसे सुद्धा नाहीत. मला काहीही करून गुरुजींना भेटायचे आहे’.
मी त्याचा समोर जावून उभा राहिलो! त्याला एवढा जबरदस्त धक्का बसला कि तो लगेच गुडघ्यांवर पडून रडू लागला. तो एक साधा शेतकरी होता. त्याची अर्ध्या एकरा पेक्षा ही कमी शेती होती जिच्या मध्ये तो टोम्याटो पिकवायचा. त्याचे छोटे कुटुंब होते.
त्याच प्रमाणे एकदा मी एका शाळेत गेलो आणि तिथे मी शिक्षक आणि विद्यार्थी दोघांना शिकविले. जवळ जवळ दोन तास मी त्याच्यांशी बोललो. ते सर्व खूप उत्तेजित आणि उत्साही झाले होते. ती एका छोट्या गावातील छोटी शाळा होती. शिक्षक खुपच गंभीर झाले होते. म्हणून मी त्यांना थोडे उत्तेजन दिले आणि सर्वाच्या चेहऱ्यांवर स्मितहास्य आले. हे फक्त ज्ञानामुळेच झाले. ज्ञान एकून ते जर आपल्या आयुष्यात आचरणात आणले तर आपल्या आयुष्य आनंदी आणि उस्ताहपूर्ण राहते.
कुठल्याही क्षणी काहीही घडू शकते!
एकदा मी आणि किशोरदा आसाम हून अरुणाचल प्रदेश साठी प्रवास करत होतो. आसाम मधील एक खेडेगाव पार करताच मी एका झोपडी बाहेर गाडी थांबावयास सांगितली. आम्ही त्या झोपडीत गेलो आणि मी किशोरदा ना त्या झोपडीत असणाऱ्या महिलेला ७०० रुपये देण्यास सांगितले. त्या महिलेच्या पतीचे ऑपरेशन करावयाचे होते ज्याच्या साठी तिला २१०० रुपये लागणार होते. पण तिच्या कडे फक्त १४०० रुपयेच होते. ऑपरेशन साठी तिच्या कडे पुरते पैसे सुद्धा नव्हते. म्हणून ती देवळात देवासमोर ती पैशांसाठी प्रार्थना करीत होती. तिच्या देवळात एक काली मातेचा फोटो होता आणि एक श्री रामकृष्ण परमहंसचा. ती त्यांच्या समोर बसून पैशांसाठी प्रार्थना करीत होती. मी तिला भेटून तिच्या बरोबर थोडा वेळ घालविला.
मला काय म्हणायचे आहे कि - ही सर्व सृष्टी एकाच शक्ती पासून निर्माण झाली आहे आणि तीच शक्ती ही सृष्टी चालवत आहे. एकाच तत्वापासून ती निर्माण झाली आहे. आपण सगळेजण ह्याच तत्वापासुन निर्माण झालो आहोत. तुम्ही कुणाला ही नमस्कार करा अथवा कुठल्याही देवाला प्रार्थना करा ते सर्व ह्याच तत्वाला जावून मिळते.
आता पहा, ती महिला मला ओळखत देखील नव्हती, हा प्रसंग २० वर्षापूर्वी घडला आहे. त्या वेळेस आम्ही फक्त ४-५ जण गाडीत होतो. आम्ही ज्या वेळेस तिला भेटलो त्यावेळेस पाहिले कि ती खूप सामर्थ्यवान आणि एकदम भक्ती मध्ये दंग होती. जर आपण ईश्वराला हृदयापासून बोलविले तर पहा आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवू लागतात. तुम्हा पैकी किती जणांच्या तरी बाबतीत असे घडले आहे. हो कि नाही? किती जणांच्या तरी जीवनात असे अदभूत चमत्कार घडले आहेत. पहा!
इथे सर्वाच्या जीवनात असे घडले आहे. (दर्शकांकडे बघून). हे आश्चर्यकारक नाही. हे घडत राहते. हे जर घडत नसेल तर हे आश्चर्यकारक आहे. वास्तविक पाहता जर चमत्कार घडत नसेल तर आश्चर्यकारक आहे! हो खरच, काही चमत्कार तत्काळ होतात आणि काहींना वेळ लागतो.
प्रश्न: गुरुजी, तुम्ही म्हटलात कि त्यागाने माणूस सशक्त बनतो. पण काय त्याग करायला माणसाचे अंतर्मन सशक्त हवे?
श्री श्री रविशंकर: हो, त्यागाने तुम्ही सशक्त होता. आणि त्यासाठी आपले अंतर्मन ज्ञानाने सशक्त केले पाहिजे. दुर्लक्षितपणा तुम्हाला त्याग करायला सशक्त बनवू शकत नाही. ते फक्त ज्ञानातूनच होवू शकते. निरीक्षण करून पहा. काही वेळापूर्वी तुम्ही हा ज्ञानाचा मुद्दा एकला आणि तुम्हाला आता धैर्य आणि धीटपणा आला. हो कि नाही? हे लगेचच किंवा तत्काळ होते.
प्रश्न: गुरुदेव, YLTP कार्यक्रमामुळे आमच्या क्षेत्रात खूप काही बदल घडून आले आहेत. ह्या कार्यक्रमाचा ध्येय, उद्देश काय आहे? कोणते उद्दिष्ट ठेवून मी युवाचार्याचे काम करू?
श्री श्री रविशंकर: श्रेया (स्वत:ची प्रगती) आणि प्रयास (समाजातील दुसऱ्याची प्रगती). तुमची आणि समाजाची प्रगती ही एकत्रित झाली पाहिजे. ते एका मागोमाग होवू शकत नाही. हेच YLTP कार्यक्रमाचे उद्दिष्ट आणि ध्येय आहे.
तुमच्या आयुष्यातील एक किंवा दीड वर्ष हे देशासाठी दिले पाहिजे. आणि तुम्ही पाहाल कि तुमची प्रगती कशी होते!! जर आपल्याला इमारत उंच बांधायची असेल तर तिचा पाया हा खोलवर खोदला पाहिजे. तुमची जर मोठ्या सामाजिक दर्जा वर जाण्याची महत्वकांक्षा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टींचा त्याग करावा लागेल. आळशी राहून आराम करून तुम्हाला हे साध्य करता येणार नाही. तुम्हाला कष्ट हे घेतलेच पाहिजेत. आणि ह्याच कष्टातूनच तुम्हाला चांगले फळ मिळेल.

त्याग केल्याने तुम्ही सशक्त होता

 5
2012............................... Banglore Ashram
June

५ जून २०१२ – बेंगलोर, भारत 

तुमच्या आयुष्यालाच तुमची साधना समजा!

 25
2012............................... Banglore Ashram
May

२५ मे २०१२ – बेंगलोर आश्रम
प्रश्न: गुरुजी भगवद्गीतेमधे भगवान श्रीकृष्ण म्हणतात कि माझा जन्म आणि कर्म दोन्ही अध्यात्म आहे. कृपया हे स्पष्ट करा.
श्री श्री रविशंकर: हो, तुम्ही जेव्हा आत्मज्ञान प्राप्त करता तेव्हा तुम्हाला दोन्ही, जन्म आणि कर्म अध्यात्म असल्याचे जाणवते. ही समज तुम्हाला येते. तुमच्यामधे जर एकदा शिस्तपणा आणि नैतिक जबाबदारी प्रस्थापित झाली कि तुमच्याकडून चुका होवूच शकत नाहीत. तुमच्या मुखातून एकही वाईट शब्द येवू शकत नाही. तुमच्या हृदया मध्ये दुसऱ्यांबद्दल तिरस्कार निर्माण होवू शकत नाही. कारण सर्वजण तुमच्यातील एक भाग आहे असे तुम्हाला वाटू लागते. हेच प्रेमाचे सर्वोच शिखर आहे. हेच ज्ञान, सतर्कता तुमच्या मध्ये पूर्णपणे प्रस्थापित झाल्यावर तुम्हाला स्व: चा अनुभव येईल. हेच भगवतगीते मध्ये म्हटले आहे “ तत् स्वयम् योगा संसिद्ध: कलेन अत्मानी विंधाती”
जीवनात आपण फक्त एवढेच समजले पाहिजे की – मी जे काही करतोय आणि जे काही केले आहे ते सर्व अध्यात्मानेच उस्फुर्त होवून झाले आहे. आणि हे सर्व मी अध्यात्माला समर्पित करतो. सर्वात पहिल्यांदा तुम्ही अध्यात्माला समर्पित आहात हे तुम्ही जाणले पाहिजे मग तुमच्या चुकीच्या वर्तनात सुध्दा तुम्हाला विनासायसपणा जाणवेल.
ह्याचा अर्थ असा नाही कि तुम्ही तुमच्या चुकांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. आपल्या काही तीव्र इच्छामुळे आपण जर काही चूक केली तर त्याच्यावर आपण तोडगा शोधला पाहिजे आणि ती चूक पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. हे वारंवार केल्याने आपण एका अशा अवस्थेत येतो जिथे आपण प्रेममय होवून जातो आणि आपल्याला जाणवते कि सर्व काही अध्यात्मामुळे प्रेरित आहे.
प्रश्न: गुरुजी, या शरीरांपलीकडे मी तुम्हाला गुरु म्हणून कसे ओळखू शकतो, समजू शकतो? मला वाटते कि याबाबतीत मी कमी जाणतो.
श्री श्री रविशंकर: तुम्हाला जर वाटत असेल कि मी या बाबतीत खूप कमी जाणतो तर तेच खूप आहे. आराम करा, विश्राम करा! हेच प्रेम आहे. प्रेम म्हणजे काय? अभेद – मी त्याच्यापासून वेगळा नाही आणि तो माझ्यापेक्षा वेगळा नाही. समजा कुणी जर एखाद्या मुलाला वाईट बोलले तर त्याचे वडील काय म्हणतील? “जर तू माझ्या मुलाला वाईट बोललास म्हणजे मला वाईट बोलल्यासारखे आहे.” किंवा जर तुम्ही कुठल्या पालकांना वाईट बोललात तर त्यांचा मुलगा काय म्हणेल? “माझ्या आई वडिलांना वाईट बोलणे म्हणजे मला वाईट बोलल्यासारखे आहे.” ते सर्व प्रतिकार करतील, हो कि नाही? म्हणजे त्यांच्यामध्ये एकता आहे. जिथे आपुलकीपणा आणि एकता असते तेच प्रेमाचे प्रतिक आहे.
प्रश्न: गुरुजी, गरुड पुराणा मध्ये मृत्यू नंतरचे वर्णन खूप भयानक केले आहे. पण तुम्ही म्हणता कि मृत्यू म्हणजे एक शांत झोप. याच्यावर काही बोलावे.
श्री श्री रविशंकर: हो, आपण मृत्यू बद्दल नंतर बोलूया आधी आपण जीवना विषयी बोलूया. या जीवना मध्ये आपण जर सर्व इच्छा पासून तृप्त झालो तर सर्व काही व्यवस्थित होईल. पण जीवनाच्या शेवटी आपण दु:खी, कुणा विषयी अभद्र बोललो, किंवा कुणावर राग धरला तर ती एक मोठी समस्या आहे. म्हणून जीवनाच्या शेवटी विशेषतः मृत्यूच्या क्षणी आपण तृप्त आणि आनंदी होवून या शरीराचा त्याग करावा.
पण जीवनाचा शेवटचा क्षण कुणीही सांगू शकणार नाही म्हणून जीवनात नेहमी आनंदी आणि तृप्तमय रहा !
प्रश्न: काळाच्या पलीकडे चेतना आहे का? आपण असे का म्हणतो कि पृथ्वीलोकावरची १०० वर्षे म्हणजे पितृ लोका मधील १ दिवस?
श्री श्री रविशंकर: हे असच आहे ! आपल्या जीवनातील १ वर्ष म्हणजे पितृ लोकातील १ दिवस. हे आपल्या धर्मग्रंथ मध्ये लिहिले आहे. आपण सर्वजण पितृलोका मध्ये जावून आलो आहोत पण आपल्याला तो काळ लक्षात नाही. आपण तो काळ कसा घालविला याची परिपूर्ती करायची तुम्हाला गरज नाही. हे सर्व धर्म ग्रंथात लिहिले आहे आणि आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे.

प्रश्न: गुरुजी तुम्ही भगवान श्री शंकरा विषयी खूप सांगितले आहे. आपण श्री शंकरा ला शिवलिंगम म्हणून का पुजतो?
श्री श्री रविशंकर: लिंगम म्हणजे ओळख, एक असे चिन्ह कि ज्या मधून तुम्हाला सत्य आणि वस्तुस्थितीची ओळख होते. जे दिसू शकत नाही पण एका अशा वस्तू मुळे तुम्ही ते ओळखू शकता ते म्हणजे लिंगम. जेव्हा एक बालक जन्माला येते तेव्हा तुम्ही कसे ओळखता कि ते मुलगा आहे कि मुलगी? शरीराच्या एका भागामुळे तुम्ही ओळखू शकता कि ते मुलगा आहे की मुलगी. नाहीतर काही वयापर्यंत सर्व लहान बालके एक सारखीच दिसतात. पण शरीरामधील एका भाग त्यांचे भविष्य सांगते. याच कारणामुळे शरीराच्या त्या भागाला लिंगम म्हणतात. त्याचप्रमाणे ज्याने हि सृष्टी निर्माण केली त्याला तुम्ही कसे ओळखणार? त्याला काही आकार नाही. पण ज्याने हि सृष्टी निर्माण केली त्याची काहीतरी ओळख असली पाहिजे. म्हणून एक असे चिन्ह कि ज्याच्या वरून आपण स्त्री  पुरुष आकार ओळखू शकतो, ह्या दोन आकारांची संयोग करून एक अशी ओळख त्या सृष्टी निर्मात्याला द्या ज्याला आकार, ओळख नाही जो या ब्रम्हांड मध्ये व्यापक आहे तो म्हणजे शिव लिंगम. म्हणून म्हटले आहे कि, “नमामि शमीशना निर्वाणारुपम विभूम व्यापकम ब्रहमवेदास्वरूपम”  निर्वाणारुपम – ज्याला आकार नाही कि शरीर नाही, विभूम – तो सर्व व्यापक आहे, ब्रहमवेदास्वरूपम – सर्वोच ज्ञानाचा प्रतिक आहे.
बघा इंटरनेट, फोन कसे काम करतात? अवकाशां मधील प्रत्येक अणु रेणू मध्ये ज्ञान आहे. आता या इथे आपण सर्वजण बसलो आहोत, जगामध्ये किती तरी माध्यमे चालू आहेत, विविध प्रकारचे कंपन आहेत, आता इथे कितीतरी इ-मेल्स आहेत. त्यामुळेच जेव्हा तुम्ही तुमचा संगणक चालू केल्यानंतर लगेच तुमचे इ-मेल्स डाउनलोड होतात.
तुम्ही जे शब्द टाइप करून SMS  व्दारे पाठविता ते पण या आवकाशात आहेत. तुम्ही जर कुणावर रागविला असलात तर ते पण या आकाश तत्वात आहे. तुम्ही जर कुणाचे अभिनंदन केले आहे तर त्या भावना या आकाशात आहेत. म्हणूनच हे सर्व ज्ञान स्वाभाविकपणे या आकाश तत्वात आहे. हे ज्ञान आताच नाही तर हजारो वर्षांपासून या आकाश तत्वात आहे. तुम्ही हे पण पाहू शकता कि हजारो वर्षापूर्वी काय झाले आणि हजारो वर्षांनतर काय होईल, कारण हे सर्व या आकाश तत्वात लिहून ठेवले आहे अभिलीखीत आहे आणि या क्षणी इथे आहे.
मग एखादा या आकाश तत्वाला कसा आठवणीत ठेवील? पूर्वीचे लोक एक गोलाकार दगड ठेवून त्याची उपासना करत आणि या सृष्टी निर्मात्याला पूजत.
प्रश्न: गुरुदेव, भक्ती आणि ज्ञान यांचा काय संबंध आहे? ज्ञाना विना भक्ती फलदायी होवू शकते का?
श्री श्री रविशंकर: तुम्हाला जर रसगुल्ला आवडत असेल तरच तुम्हाला तो खाण्याची इच्छा होईल, बरोबर? एखादी गोष्ट तुम्हाला जर माहीत नसेल तर त्या गोष्टी विषयी तुम्हाला इच्छा कशी काय निर्माण होईल? आवडणे म्हणजे भक्ती.
तुम्ही प्रेम आणि इच्छा कोणत्या गोष्टी विषयी करता? जी गोष्ट तुम्हाला आधीपासून माहीत आहे. या, आधी पासून माहीत असलेल्या गोष्टीला ज्ञान म्हणतात. आणि एखादी गोष्ट तुम्हाला आवडली कि तुम्ही त्या विषयी माहिती काढून घेता.
हेच नेमकं नवरा बायको मध्ये होते. ते लग्नाच्या आधी एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि लग्न झाल्यावर एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ते कुठे जातात, काय करतात समजण्याचा प्रयत्न करतात. ते दोघ वेगवेगळ्या शहरात असले तरी ते फोन वरुन एकमेकाची विचारपूस करतात. एक आई पण आपल्या दुसऱ्या शहरात राहणाऱ्या मुलाला हेच विचारते कि “तू आज काय जेवलास? आज कुठे गेला होता? आज कुठले कपडे घातले होतेस?
जर तुमचा एखादा प्रिय व्यक्ती तुमच्या पासून जर लांब रहात असेल तर तुम्हाला त्याच्या विषयी जाणून घेण्याची उत्सुक्ता असते. ह्याचे कारण म्हणजे तुम्ही जर कुणावर प्रेम करत असाल तर त्याच्या विषयी सर्व काही जाणून घेण्यास तुम्ही प्रयत्न करता. ह्याच कारणामुळे नवरा बायकोला वाटते कि ते एकमेकांवर हेरगिरी करत आहे, हे सहाजिक आणि नैसर्गिक आहे. जिथे ज्ञान आहे तिथे प्रेम आपोआपच फुलत जाते. ज्या प्रमाणे एक अवकाशयात्री अवकाशा संबंधी जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, त्यात त्याची रुची एवढी वाढते कि तो त्यातच गुंग होवून जातो. तुम्ही भक्ती आणि ज्ञान यांना दूर करू शकत नाही. सुरवातीला जर ज्ञान असेल तर त्याच्या मागोमाग भक्ती येईल. आणि जर सुरवातीला भक्ती असेल तर त्याच्या मागोमाग ज्ञान येईल. म्हणून त्यांना दोन वेगवेगळे मार्ग समजू नका.

प्रश्न: गुरुदेव, यशस्वी दांपत्य जीवना मध्ये नवरा बायकोची काय भूमिका असते हे तुम्ही खूप वेळा सांगितले आहे. आज, यशस्वी दांपत्य जीवनामध्ये सासर मधल्या लोकांची भूमिका काय असावी हे सांगा.
श्री श्री रविशंकर: तुमचे आई वडील तुमच्यावर किती वेळा तरी रागावले असतील. हो कि नाही? जेव्हा तुमची आई तुमच्यावर रागावते त्यावेळेस तुम्ही ते स्वीकारता, पण तेच का तुमची सासू तुमच्यावर रागावली तर तुम्हाला राग येतो आणि दु:ख होते जणू तुमच्या घशा मध्ये काही रुतले आहे. तुमचे सासू सासरे तुम्हाला काही सांगायच्या आधी कचरतात. ते तुम्हाला तुमच्या आई वडिलां सारखे रागावत नाहीत. ते तुम्हाला कमी रागवतात. ते ज्या अधिकाराने आपल्या मुलांना रागवतात तो अधिकार ते आपल्या सून किंवा जावई वर रागविताना नसतो.
एखादा व्यक्ती अभ्यास करून अधिकाराने दुसऱ्या व्यक्तीबर कृती करतो तेव्हा तो त्याच्यावर रागावतो किंवा काहीतरी कटू बोलतो. ते तुम्हाला खटकते कारण तुम्ही त्यांना आपले मानत नाही, तुम्ही त्यांना परके मानता. तुम्ही जर तुमच्या सासूला आपली आई मानत असाल तर तुम्ही तिला जावून मिठी माराल जरी तिने काही कटू बोलल्या असल्या तरी. पण तुम्ही त्यांना परके मानता, आणि मग काही वादावादी झाल्या नंतर तुम्ही अपेक्षा करता कि त्या येतील आणि माफी मागून मिठी मारतील.
तुमचे सासू किंवा सासरे जर तुमच्यावर रागावले तर ती एका चांगली गोष्ट आहे. तुम्ही समजून घेतले पाहिजे कि ते त्यांच्या मुलात आणि तुमच्या मध्ये काही फरक करत नाहीत. तुम्ही तुमच्या आई बरोबर कधी भांडण केले नाही का? जरा तुलना करून बघा. दोन्ही बाजू एकदा तपासून पहा. तुम्ही तुमच्या आई बरोबर किती वेळा तरी भांडला आहात. किती वेळा तरी ती तुमच्यावर रागावली आहे. पण त्याचा तुम्हाला कधी राग आला नाही. कधीच नाही थोडा सुद्धा नाही. तुम्ही फक्त खांदे उडवत झाडून टाकला.
तुमच्या आई बरोबर जर तुमचा वाद झाला तर तुम्ही त्याच दिवशी तिची माफी मागून तिच्या बरोबर बोलत असता जणू काही झालेच नाही असे दाखवता. हेच तुम्ही तुमच्या सासूबाई बरोबर करा, सासुबाई बरोबर भांडण झाल्यानंतर त्याच दिवशी त्याची माफी मागून त्यांच्या बरोबर गप्पा गोष्टी करा जसे तुम्ही तुमच्या आई बरोबर करता. काही दिवसांनी ते पण तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतील. प्रेमाने तुम्ही कुणालाही आणि सर्वाना जिंकू शकता. संकल्प करून तुम्ही त्यांना जिंकू शकता. जर प्रेम आणि संकल्पाने तुम्ही त्यांना जिंकू शकला नाहीत तर प्रार्थना करा, आणि कृपादृष्टी ने तुम्ही नक्कीच तुमचे ध्येय साध्य होईल.

प्रश्न: गुरुजी, भगवतगीते मध्ये भगवान श्री कृष्णाला सर्वोच आत्मा मानले आहे आणि सर्वस्वी तोच आहे. शिवतत्व मध्ये श्री शंकराला सर्वस्वी मानले आहे. या पैकी कोणते सत्य आहे?
श्री श्री रविशंकर: दोन्ही, कारण दोघां मध्ये काहीच फरक नाही. तो जो शिवा आहे तोच कृष्ण आहे आणि तोच देव आहे. दोन असे वेगवेगळे प्रकार नाहीत फक्त एकच. एकेकाळी ते ऋषी होते, त्यांचा विश्वास होता कि भगवान श्री कृष्ण (हरी) आणि भगवान श्री शंकर (हर) हे वेगळे आहेत. काहीजण हरी म्हणून प्रार्थना करू लागले आणि काहीजण हर म्हणून प्रार्थना करू लागले. मग देवाने त्या ऋषींना असा दृष्टांत दाखवून दिला कि ज्या मध्ये त्यांचे अर्धे शरीर हरीचे होते आणि अर्धे शरीर हर चे होते, आणि सांगितले कि हरी आणि हर मध्ये काहीच फरक नाही. ते एकच आहेत.
त्याच प्रमाणे काहीजणांना वाटते कि शिव आणि शक्ती वेगवेगळे आहेत. पूर्वी थोर ऋषी भ्रिंगी होवून गेले, त्यांना पण हेच वाटायचे. त्यांचा असा विचार होता कि मर्दानी आकार हा बायकी आकारा पेक्षा वरचढ आहे.
खूप धर्मामध्ये स्त्रियांना त्यांची हक्काची जागा दिली गेली नाही. त्यांना दुय्यम दर्जा दिला जातो आणि पुरुषांना प्रथम दर्जा दिला जातो.
म्हणून ऋषी भ्रिंगी भगवान श्री शंकराला पूजत असत आणि स्त्री स्वरुपाकडे दुर्लक्ष करत असत. ते शक्तीला कधी पूजत नसत. म्हणून देवाला वाटले कि यांना चांगली बुद्धी येईल असा धडा शिकवला पाहिजे. कधी कधी प्रामाणिक साधा सरळ माणूस सुद्धा भटकतो. ते चांगलेच असतात पण त्यांचा बोध चांगला नसतो, त्यांच्या बुद्धीवर काळ्या ढगांचे सावट असते. ऋषी भ्रिंगी ना खरे ज्ञान दाखविण्यासाठी देवाने अर्धनारेश्वरचे रूप धारण केले म्हणजे अर्धे शरीर पुरुषाचे आणि अर्धे शरीर स्त्रीचे. हे पाहिल्यानंतर ऋषी भ्रिंगी यांनी या आकाराभोवती प्रदक्षिणा घातली. त्यांना शिव रूपाच्या अर्ध्या शरीराभोवती प्रदक्षिणा घालता येत नव्हती म्हणून त्यांनी शिव आणि शक्ती म्हणजेच स्त्री आणि पुरुष एकाच आकारात असल्याने संपूर्ण प्रदक्षिणा घातली. म्हणजे त्यांनी दोन्ही शिव आणि शक्ती ची आराधना केली.
एका स्त्रीला तोच मान दिला पाहिजे जो आपण एका पुरुषाला देतो. स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव करू नये. आपण आज जे काही स्त्री शक्ती, स्त्री अधिकार बद्दल बोलतो ते १०० वर्षापूर्वी पासून या देशात चर्चेत आहे. अर्धनारेश्वर च्या रूपात देवाने हे ज्ञान ऋषी भ्रिंगी यांना दिले.
भ्रिंगी या शब्दाचा अर्थ म्हणजे मोठी मधमाशी. माधामाशिचा जसा आवाज चालू असतो तसाच भक्तीचा महिमा ऋषी भ्रिंगी यांच्या हृदया मध्ये नेहमी असायचा. मधमाशी जशी प्रत्येक फुलावर जाऊन मध गोळा करते त्याच पद्धतीने ऋषी भ्रिंगी प्रत्येक माणसापाशी  जाऊन शिवतत्व घ्यायचे. पूर्ण ब्रह्मांडात ऋषी भ्रिंगी शिवतत्व गोळा करायचे आणि त्याला पूजत असत. ते खूप मोठे भक्त होते. पण ते स्त्रीचा आदर करत नव्हते म्हणून देवाने त्यांना एकाच स्त्री पुरुष आकारात दर्शन दिले.
हे पौराणिक आहे पण खरे असू शकेल, सार असा सांगता येईल कि अशा पद्धतीने ऋषी भ्रिंगी यांना कळले कि हरी आणि हर मध्ये काही फरक नाही.     
इतिहासात भगवान श्री कृष्ण खूप मोठे व्यक्ती होते. त्यावेळेस श्री शंकराचा जन्म झालेला नव्हता, म्हणून त्यांना स्वयंभू म्हटले आहे.
इस्लाम धर्मात हेच म्हटले आहे कि अल्लाचा कधी जन्म झाला नव्हता तसेच शिवाचा पण कधी जन्म झाला नाही. ते स्वत: प्रकट होतात. त्यांचे काळावर वर्चस्व आहे त्यामुळे मृत्यू पण त्यांना स्पर्श करू शकत नाही. शीख धर्मात पण हेच म्हटले आहे कि देव काळाच्या पलीकडे आहे – एक ओमकार सतनाम करता पुराख निरभाऊ निर्वैर अकल मुरात.  सर्व धर्म एकाच तत्वा संदर्भात सांगतात आणि तेच भगवान श्री कृष्णाने गीते मध्ये म्हटले आहे कि ‘अवजानन्ति मम मुधा मनुसिम तनुम अश्रीतम; परम भवम अज्जानंतो मम महेश्वरं’.
मुर्ख लोक माझ्याकडे एक फक्त शरीर म्हणून बघतात. माझ्या अलौकिक स्वभावचा लोकांना अनुभव नाही, लोक माझ्याकडे एक मानव शरीर आणि मन म्हणून बघतात. मुर्ख लोकं मला अजून ओळखू शकले नाहीत.  मी मानवी शरीरात आहे पण माझी चेतना हि सर्वोच चेतना आहे., हे अर्जुना ! तू माझ्यातील ईश्वरी मूलतत्वाकडे लक्ष दे.
त्यामुळे असे म्हटले जाते कि मानवी बुद्धी , मानवी मन हे ईश्वरा मध्ये कधीही पाहू नये, कारण ज्या दृष्टी कोनातून तुम्ही ईश्वराकडे पाहता तसेच तुम्हाला चित्र दिसते. जर तुम्ही मूर्तीकडे एक दगड म्हणून पाहिले तर तो फक्त दगडच असेल, पण तुम्ही जर त्या मूर्ती मध्ये भक्ती पाहिली तर त्यामध्ये तुम्हाला ईश्वर दिसेल.
त्याच पद्धतीने आपण जर प्रत्येक मनुष्यामध्ये भक्तीचे मुलतत्व पाहिले आणि प्रेम केले तर आपल्या आजूबाजूला एकात्मता दिसेलकारण आपण सर्वजण एकाच ईश्वरापासून आलो आहोत. मनुष्य बुद्धी म्हणजे बाहेरील मर्यादित आकार बघणे एवढीच असते, पण आपण इथे सर्वत्र सर्वामध्ये जी भक्ती व्यापक आहे त्याच्या कडे पहावे.
प्रश्न: गुरुजी, आपण जसे ज्ञान जमवतो आणि समजतो तसेच गमवतो का?
श्री श्री रविशंकर: आपण ज्ञान कधीही हरवू शकत नाही. आपण संपूर्ण ज्ञान मिळविल्यानंतर ते हरविणे कदापि शक्य नाही. हां, पण कोणी अर्धवट ज्ञान घेतले असेल तर त्याने ते परत नीट समजून घ्यावे.
प्रश्न: मी ज्यावेळेस ध्यान करायला बसतो, माझे मन खूप भटकते. त्याच्यावर मी नियंत्रण कसे करू?
श्री श्री रविशंकर: हे पहा. तुम्ही तुमच्या जीवनालाच साधना समजा. आपले संपूर्ण जीवन साधनाच आहे. तुमचे मन कुठे भटकते? त्याला जिथे तृप्ती मिळेल ते तिथेच जाईल. तुम्ही परत ध्यान करायला बसल्यावर निरीक्षण करा कि माझे मन मला तृप्ती मिळेल अशा ठिकाणी भटकते का? अशा पद्धतीने तुम्ही जर निरीक्षण केले आणि त्या मागचे कारण ज्ञानाने शोधले तर तुम्हाला जाणवेल कि मन ना इथे आहे ना तिथे, मग तुमचे मन शांत आणि स्थिर होईल व स्व: मध्ये येईल. म्हणून तरी ध्यान करण्यासाठी खूप सीडी आणि मार्गदर्शन दिले जाते. हे करत रहा. पण फक्त ध्यान केल्याने तुमचे मन शांत होणार नाही. ध्यान बरोबर ज्ञानाची पण त्याला गरज आहे.
प्रश्न: गुरुदेव, जर आपला प्रियजन किंवा जवळचा आपल्याला सोडून जातो, आपल्याला त्यांना आपल्या आयुष्यात  परत आणता येईल का, विशेषत: आपण या मार्गावर असताना?
श्री श्री रविशंकर: जो कोणी गेला आहे तो आपल्या बरोबर जागी गेला आहे. जेव्हा आपला जवळचा कोणी प्रियजन जातो, तो तुम्हाला आठवण करून देतो कि हे आयुष्य क्षणिक आहे आणि ते संपणारच आहे. कळतयं का तुम्हाला?
एके दिवशी मला पण जायचे आहे. तुम्हाला पण सर्व सोडून जावे लागेल. त्या क्षणा मध्ये तुम्हाला निराश वाटेल. त्या साठीच तर ध्यान, साधना, सत्संग आहे. हे सर्व केल्याने तुम्ही शोक, दु:ख यावर मात करू शकता.

प्रश्न: गुरुजी, मला आश्रम मध्ये रहायचे आहे.
श्री श्री रविशंकर: हो, आश्रम व्यवस्थापनाशी संपर्क साधा. मी आधी म्हटल्या प्रमाणे हे सर्व विश्व माझे आश्रम आहे. तुम्ही कुठेही असा, दुसऱ्यांना ज्ञान द्या आणि दुसऱ्यांना मदत करण्यास तत्पर रहा. मग तो आश्रमच होईल. प्रत्येक घर हे आश्रम आहे. आश्रम म्हणजे काय? जिथे आपले मन काही प्रयत्न न करता शांत आणि स्थिर होईल, शरीरात उत्साह भरेल, बुद्धीला थोडी चालना मिळेल, आत्म्यालाही शांतता मिळेल आणि जीवन हे उत्सव होईल.

प्रश्न: आत्म्याला जर मृत्यू नाही तर मग या ग्रहावरची लोकसंख्या का वाढत आहे?
श्री श्री रविशंकर: खूप प्रकारच्या प्राण्यांच्या जाती या पृथ्वीवरून नष्ट होत चालल्या आहेत. साप, किटके, सिंह वगैरे नष्ट होत चालले आहेत. गाढवांची पण संख्या कमी होत चालली आहे ! पूर्वी जेवढी गाढवं आपल्याला दिसायची तेवढी आता आपल्याला दिसत नाहीत. जंगल नष्ट करून तिथे शहर उभी केली जात आहेत. मग माकडे कुठे जातील? म्हणून ते आपल्या घरात येतात.
प्रश्न: मी जेव्हा स्फोटाची किंवा विमान दुर्घटनेची बातमी एकतो ज्याच्या मध्ये लहान मुले मरण पावतात, त्या दिवशी मला दिवसभर दु:ख वाटते, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. तुम्ही त्यांची पण काळजी घेता का?
श्री श्री रविशंकर: हो, काळजी करू नका, असे वाटणे नैसर्गिक, साहजिक आहे. जेव्हा तुम्हाला दुसऱ्यांच्या दु:खा बद्दल दु:ख होत असेल याचा अर्थ म्हणजे तुम्ही मानव आहात. दुसऱ्यांचे दु:ख जाणवत नाही ते हृदय कसले? पण तुम्ही त्यात अडकून रहायचे नाही जेणे करून तुम्ही दुसरे काहीच करू शकणार नाही. सेवा करून तुम्ही याच्यावर मात करू शकाल.