संध्याकाळचा सत्संग

31
2012
Aug
ब्राझील, दक्षिण अमेरिका
तुमच्यापैकी किती जणांना असे वाटते कि तुम्ही कुणाचेही काहीही वाईट न करता तुमचे शत्रू खूप आहेत?

लोक तुमचे शत्रू बनतात. तुम्ही कुणाला दुखापत केली नाही किंवा कुणाचे वाईट केले नाही तरी पण लोक तुमचे शत्रू बनतात.

त्याच प्रमाणे तुम्ही कुणाची मदत केली नाही वा कुणावर उपकार केले नाहीत तरी पण बरेचजण तुमचे चांगले मित्र बनतात. हो कि नाही?

कितीजणांना हा अनुभव आला आहे?

हे पहा, हे असेच आहे, काही विचित्र कर्मामुळे किंवा कायद्यामुळे लोकं आपले शत्रू अथवा मित्र बनतात. काही विचित्र कर्मामुळेच एकाएकी आपले खास मित्र हे आपले शत्रू बनतात आणि आपले चांगले मित्र आपले शत्रू बनतात.

म्हणून आपल्या सर्व मित्रांना आणि शत्रूंना एका टोपलीत ठेवा आणि तुम्ही निश्चिंत रहा.

तुमच्या मनाला एक तर मित्रांपासून किंवा शत्रूंपासून त्रास होतो, हो कि नाही?

तुम्ही ज्या वेळेस ध्यान करायला बसता त्यावेळेस तुमचे सर्व मित्र, शत्रू यांना बाजूला ठेवून तुम्ही शांत, आराम करा आणि मन मोकळे करा.

काय म्हणताय तुम्ही? बरोबर आहे कि नाही?

जेव्हा तुमचे मन तृप्त असेल, शांत असेल, आनंदी असेल तेव्हा त्याच्याकडे एक विलक्षण शक्ती येते ती म्हणजे आशिर्वाद देण्याची.

जेव्हा तुम्ही आनंदी आणि तृप्त असता त्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांना आशीर्वाद देऊ शकता. जेव्हा तुमचे मन व्याकुळ असेल आणि तुमच्या मनात खूप इच्छा असतात त्यावेळेस तुम्ही आशीर्वाद देऊ शकत नाही. जरी तुम्ही आशीर्वाद दिला तरी त्याचा जास्त प्रभाव पडत नाही. या साठी आपण नेहमी तृप्त असले पाहिजे.

ज्यावेळेस तुमचे मन तृप्त असेल त्यावेळेस तुम्ही तुमच्याच नाही तर दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करू शकता.

प्रश्न: गुरुदेव, कारुण्य बद्दल काही बोला.

श्री श्री: जीवनात तीन महत्वाच्या गोष्टी आहेत:

१. उत्कटता
२. नि:पक्षपाती
३. कारुण्य

श्वास घेणे म्हणजे उत्कटता आहे, आणि श्वास बाहेर सोडणे म्हणजे नि:पक्षपातीपणा होय.

असे कोणीहि म्हणू शकत नाही कि, ‘मला फक्त श्वास आत घ्यावयाचा आहे, बाहेर सोडायचा नाही’. ते अशक्य आहे!

जसे श्वासोच्छवास महत्वाचा आहे त्याचप्रमाणे उत्कटता महत्वाची आहे.

त्यानंतर आहे नि:पक्षपातीपणा. नि:पक्षपाती पणा म्हणजे सर्वाना क्षमा करण्याची क्षमता. नि:पक्षपातीपणा मुळे तुम्हाला मुक्तता मिळते. आणि तिसरे म्हणजे कारुण्य, जो तुमचा स्वभाव बनतो.

म्हणून काम करताना उत्कटता हवी, आराम करताना नि:पक्षपातीपणा हवा आणि कारुण्य हा स्वभाव हवा. कळले !

प्रवर्ग: उत्कटता, नि:पक्षपातीपणा

प्रश्न: ध्यान आणि आराम ची काय गरज आहे?

श्री श्री: आराम केल्याने मनाचा विस्तार होतो.

तुम्ही परीक्षण केले आहे का, तुम्ही आनंदी असताना काय होते? तुमच्या मध्ये अशा कुठल्यातरी गोष्टीचा विस्तार होतो. आणि तुम्ही दु:खी असताना काय होते? तुमच्या मध्ये कुठलीतरी गोष्ट आकुंचित पावते.

म्हणून शरीराला आराम मिळताच मनाला प्रसन्नता मिळते.

प्रवर्ग: ध्यान

प्रश्न: गुरुदेव,परस्परता बद्दल काहीबोला.

श्री श्री: परस्परता हे नैसर्गिक आहे.

उच्च मन:स्थितीत परस्परता ही तत्क्षणीक होते. जर कोणी संवेदनशील नसेल तर तिथे परस्परता नसते.

अनेकदा लोक वाईट गोष्टीची देवाणघेवाण करतात. जर तुम्ही कोणाला दोष दिला तर लगेच तो तुम्हाला दोषी ठरवतात. तुम्ही कोणाचा अपमान केला असेल तर ते लगेच तुमचा अपमान करतात. पण हे चांगल्या गोष्टींच्या बाबतीत होत नाही.

तुम्ही जर काही चांगले केले तर सगळेच तुमच्या बाबतीत चांगले करतील असे नाही. हे फक्त उच्च मन:स्थितीतच होवू शकते.

प्रवर्ग:मानवी मूल्ये, दोष

प्रश्न: मी माझ्या बायको पासून विभक्त झालो आहे. मी आणि माझ्या बायकोने वेगळे मार्ग पत्करले आहेत आणि आम्ही विभक्त जीवन जगत आहोत. आम्हाला दोघांना मुले हवी आहेत. अशा परिस्थिती मध्ये सर्वात शहाणपणाचा मार्ग कोणता?

श्री श्री: मुला समोर दोन्ही मार्ग उघड केले पाहिजेत आणि त्याला निवडण्याची संधी दिली पाहिजे. जर नवरा बायको मध्ये सामंजस्य नसेल तर नक्कीच मुलांच्या मनावर ताण येतो.

मुलांसमोर एकमेकांना दोष देवू नये हे आई वडिलांनी लक्षात ठेवले पाहिजे. मुलांना कुणा एका विरुद्ध ठेवणे चांगले नाही. हे संकुचित मनाचा दृष्टीकोन आहे.

प्रवर्ग: नातेसंबंध, मुले

प्रश्न: गुरुदेव, मृत्यू काय आहे?

श्री श्री: मृत्यू ची व्याख्या करायची गरज नाही. ती एक स्पष्ट घटना आहे.

आपला जन्म झाला आहे आणि एकेदिवशी आपला मृत्यू होणार आहे.

आपण या जगात आल्यावर सर्वात पहिली कोणती गोष्ट केली आहे तर ती म्हणजे श्वास घेवून आपण रडायला सुरुवात केली आहे. आणि सर्वात शेवटची गोष्ट कोणती करतो तर ती म्हणजे श्वास सोडतो आणि बाकीचे रडतात.

आपण जर (मृत्युनंतर) दुसऱ्यांना रडविले नाही तर आपण चांगले जीवन जगलो नाही, हे नक्की.

जेव्हा आत्मा सर्व तृप्तीने, प्रसन्न पणे आनंदी होवून हे शरीर सोडतो तेव्हा तो परत येत नाही. तो परत येतो तो स्व: इच्छेने येतो.

प्रवर्ग: मृत्यू

प्रश्न: गुरुदेव, माझे निर्णय बरोबर आहेत हे मी कसे समजू शकतो?

श्री श्री: तुम्ही ज्या वेळेस निर्णय घेता त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी वाटत असते कि, ‘हो, हे बरोबर आहे.’

एक गोष्ट लक्षात घ्या कि जरी तुमचा निर्णय चुकीचा असला, तरी त्यामुळे तुमचा विकासच होईल. तुम्ही आणखी मजबूत होता आणि त्यामधून तुम्हाला एक धडा शिकायला मिळतो. त्यासाठी काळजी करू नका.

प्रवर्ग: अस्पष्टता

प्रश्न: गुरुदेव, माझ्या मित्रांच्या आणि परिवारांच्या अपेक्षेला विरोध केल्याने मला आनंद मिळतो. अशा परिस्थितीमध्ये मी काय करू?

श्री श्री: हो, तुम्हाला समतोल राखता आला पाहिजे.

तुम्हाला तुमच्या सुखाच्या शोधात आणि लोकांच्या अपेक्षा मध्ये तुम्हाला समतोल राखता आला पाहिजे. हे खूप नाजूक आहे, पण हे करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केले पाहिजेत.

प्रवर्ग: विरोध, परिवार

प्रश्न: गुरुदेव, मानवाची सर्वात मोठी परिसीमा काय आहे?

श्री श्री: शरीराला परिसीमा आहे, मनाला परिसीमा आहे, पण चेतनेला परिसीमा नाही.

जर तुम्ही स्व:ताला शरीर समजले तर तुम्हाला परिसीमा आहे. मग तुम्ही तेवढेच करू शकाल जेवढे तुमचे शरीर सोसेल.

जर तुम्ही स्व:ताला मन समजलात तर मनाला पण परिसीमा आहे. पण तुमच्या प्रेमाला परिसीमा नाही. तुमच्या चेतनेला परिसीमा नाही.

पहा, एका छोट्या फोनच्या माध्यमातून तुम्ही सर्व जगात संपर्क साधू शकता. तुमच्या एका फोन नंबर ने तुम्ही जगात कोणत्याही फोन नंबरशी संपर्क साधू शकता. हो कि नाही?

त्याचप्रमाणे विचार करा ज्या मानवी मनाने फोनचा शोध लावला तो किती सामर्थ्यवान असेल. तुम्ही ते फक्त उपलब्ध करा.

प्रवर्ग: आव्हान

प्रश्न: गुरुदेव, कधी कधी मला वाटते कि मी खूप घमेंडी आहे. मी ह्या घमेंडी पणाचा कसा त्याग करू? मी आर्ट ऑफ लिव्हिंग चा कोर्स केला आहे आणि मी रोज साधना करतो.

श्री श्री: तुम्ही एक परीक्षण केले का, तुम्ही आधीपण घमेंडी होता, पण त्याची तुम्हाला जाणीव नव्हती. पण आता निदान तुम्हाला त्याची जाणीव तरी झाली. ‘हे घडत आहे’ ही जाणीव होणे महत्वाची आहे.

ही जाणीव होणे फार चांगले आहे. ही त्याच्या मधून बाहेर पडण्याची पहिली पायरी आहे.

दुसरी पायरी म्हणजे तुम्ही जीवनाकडे बघण्याचा मोठा दृष्टीकोन ठेवा.

तुम्ही जसे जास्तीत जास्त ज्ञानात सखोल जाताल तसे तुम्हाला सर्व मनाचे खेळ, छोट्या मुलांचे खेळ वाटतील. एकदा जर का तुम्ही हे जाणले मग तुम्हाला तुमच्या घमेंडी पणाचे काही वाटणार नाही, तुम्ही त्याचा स्वीकार करून पुढे चालत रहा.

जेव्हा तुम्ही तुमच्या मनाकडे छोट्या मुलाच्या खेळण्या प्रमाणे बघता म्हणजे तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.

प्रवर्ग: अहंकार, सजकता

मूर्तीच्याद्वारा अमूर्ताचा अनुभव

19
2012
Sep
बंगलोर
परम पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्याकडून

गणेश चतुर्थी हा तो दिवस आहे ज्यादिवशी भगवान गणपती हे भक्तांकारिता या पृथ्वीतलावर अवतीर्ण झाले.गणेश, (हत्तीचे मस्तक असलेला) शंकर आणि पार्वती यांचा पुत्र असून त्याचे बुद्धीचा, रिद्धीसिद्धीचा आणि ऐश्वर्याची परमोच्च देवता म्हणून पूजन केले जाते. हा उत्सव गणपतीचा जन्म दिवस म्हणून जरी साजरा केला जात असेल तरी या उत्सवाला अतिशय गहन अर्थ आहे.

आदि शंकराचार्यांनी गणपतीचे सार फार सुंदरपणे समजावले आहे.

गणपतीचे गजानन(गजाचे शीर्ष असलेला) म्हणून जरी पूजन होत असले तरी, हे स्वरूप केवळ परब्रह्म रूप प्रकट करण्याकरिता आहे.

भगवान गणपतीचे वर्णन ‘अजम निरविकल्पम निराकारमेकम’ असे करतात. याचा अर्थ असा की भगवान गणपती हा कधीही न जन्मणारा आहे. तो अजम (न जन्मलेला) आहे, तो निराकार(आकार रहित)आहे आणि तो निर्विकल्प (गुणरहित) आहे. भगवान गणेश हे सर्वव्यापी चेतनेचे प्रतिक आहेत.ज्या उर्जेतून सगळे आविष्कृत झाले,या विश्वाच्या निर्मितेचे कारण असलेली आणि ती उर्जा ज्यामध्ये हे संपूर्ण जग विरघळून जाणार आहे तीच उर्जा भगवान गणेश आहेत.

भगवान गणेश हे आपल्या बाहेर कुठेतरी नसून ते तर आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी आहेत. परंतु हे अतिशय तरल ज्ञान आहे. सगळ्यांना हे मुर्तापलीकडचे अमूर्त इंद्रियगोचर होत नाही.आपल्या प्राचीन ॠषी-मुनींना हे माहित होते; म्हणून त्यांनी सर्व पातळीवरील लोकांना समजेल आणि त्यांना त्याचा फायदा होईल असे मूर्त रूप निर्माण केले.

ज्यांना अमूर्ताची अनुभूती होत नाही ते बराच काळ केलेल्या मूर्ताच्या अनुभवाद्वारे अमूर्त ब्रह्मापर्यंत पोचू शकतात.

तर वास्तविक पाहता गणपती हा निराकार आहे; तरीसुद्धा तो एक आकार आहे ज्याला आदि शंकर यांनी प्रार्थना केलीआणि तो आकार गणपतीच्या निराकारतेचा संदेश घेऊन येतो.

अशा प्रकारे आकार हा एक आरंभबिंदू आहे आणि यथावकाश अमूर्त चेतना आविष्कृत होते.

गणपतीच्या मूर्त स्वरूपाचे वारंवार पूजन करून अमूर्त परमात्म्यापर्यंत पोचण्याच्या अलौकिक कलेची खुण आहे गणेश चतुर्थी. गणपतीची प्रशंसा करणारे गणेश स्तोत्रामध्येदेखील हेच सांगितले आहे.

आपल्या बोधावास्थेतील गणपतीला आपण प्रार्थना करतो की बाहेरच्या मूर्तीमध्ये थोडा वेळ स्थित हो म्हणजे मग आम्ही त्याच्या सोबत थोडावेळ खेळू शकू. आणि मग पूजा झाल्यावर आपण पुन्हा त्याला प्रार्थना करतो की त्याने ज्या ठिकाणहून तो आला ,म्हणजे आपल्या बोधावस्थेत,पुन्हा परतावे. जोपर्यंत तो मूर्तीमध्ये स्थित असतो तेव्हा देवाने आपल्याला जे काही दिले ते आपण त्याला मूर्तीच्या पुजेद्वारा अर्पण करतो.

थोडे दिवस गणपतीचे पूजन केल्यानंतर मूर्तीचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. ही प्रथा याच गोष्टीचे पुष्टीकरण करते की देव मूर्तीमध्ये नसून तो आपल्या आतच आहे. त्या सर्वव्यापी परमेश्वराला मुर्तस्वरुपामध्ये अनुभवणेआणि त्या मूर्तस्वरूपातून आनंद प्राप्ती करणे हेच गणेशोत्सवाचे सार आहे.

अशा प्रकारे आयोजित उत्सव आणि पूजनाने उत्साहाची आणि भक्तीची एक लाट निर्माण होते.

आपल्यामधील प्रत्येक चांगल्या गुणांचा देव हा गणपती आहे. म्हणून जेव्हा आपण त्याला पुजतो तेव्हा आपल्यातील सगळे चांगले गुण हे अजून फुलतात. गणपती हा ज्ञान आणि बुद्धीचा देखील देव आहे.ज्ञानाचा उदय तेव्हाच होतो जेव्हा आपण स्वयंबद्दल जागरूक होतो. जिथे कुठे आळस असतो तिथे ज्ञान आणि बुद्धी नसते, चैतन्य नसते. आणि जीवनात प्रगती नसते. म्हणून चेतना शक्ती जागी असायला हवी आणि चेतनेचे आदिदैवत आहे गणपती. म्हणूनच तर कोणत्याही पूजेच्या आधी गणेशपूजन करतात ते चेतनेला जागृत करण्यासाठीच.

म्हणून मूर्तीची स्थापना करा, त्याची अमर्याद प्रेमाने पूजा करा, ध्यान करा आणि गणपतीला आतून अनुभवा.

आपल्या आत झाकलेल्या गणेश तत्वाला जागृत करणे हेच गणेशोत्सवाचे प्रतीकात्मक सार आहे.!

तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !

जगातील सर्वात मौल्यवान वस्तू

30
2012
Aug
ब्राझील, दक्षिण अमेरिका
आता मी तुम्हाला अतिशय गंभीर प्रश्न विचारणार आहे:

तुम्ही समोरच्या व्यक्तीला मनापासून वंदन करता किंवा ती केवळ एक औपचारिकता समजता?

बघा, आपण दररोज लोकांना भेटतो, त्यांना नमस्कार करतो, काही विनोद करतो. परंतु हे एका औपचारिकतेच्या पातळीवर असते. हो ना?

कोणी जर प्यायला पाणी आणून दिले तर आपण,"अनेक धन्यवाद" म्हणतो.

त्या "अनेक"ला काही अर्थ नाही.

जर तुम्ही सहारा वाळवंटात आहात आणि तुम्ही खरोखर एकदम तहानलेले असाल आणि तुम्हाला कोणी प्यायला पाणी दिले आणि तुम्ही त्याला "अनेक धन्यवाद" म्हणालात तर ते मनःपूर्वक असेल.

तर जीवनात आपण सदैव वरवरच्या पातळीवर काम करीत असतो आणि जेव्हा आपल्यामध्ये गहनतेची कमतरता होते तेव्हा आयुष्य हे शुष्क आणि निरर्थक वाटू लागते. 

आपल्याला एका वेगळ्या पातळीवर विस्थापित होण्याची गरज आहे....अस्सलपणाची, खरेपणाची आणि निर्व्याजपणाची पातळी जिथे हृदयाचे तार हृदयाशी जुळतील. यालाच मी अध्यात्म म्हणतो.

जेव्हा तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या खरेपणाबरोबर नाते जोडता तेव्हा तेच असते अध्यात्म. 

बालक असताना आपण सगळे तेच तर करीत होतो.

तुम्हाला आठवते आहे का तुम्ही तान्हे बाळ होतात तेव्हा संपूर्ण ग्रह,संपूर्ण विश्व किती जागृत होते. चांदोबा बोलायचा,तरु वेली लता बोलायच्या आणि पशु पक्षी बोलायचे. तुमचे संपूर्ण विश्वासोबत एक नैसर्गिक संभाषण होते. तुम्हाला ते आठवते आहे का? तुम्ही कार्टूनमधली मुले बघितली आहेत का? त्यातील झाडेदेखील त्यांच्याबरोबर बोलतात. ते एक निराळेच जग आहे.

आता हा प्रश्न आहे, आपण ती निरागसता अजूनदेखील टिकवून ठेवून त्याचवेळेस बुद्धिमानतेचे शिखर गाठू शकतो का?

मी म्हणतो,"होय,आपल्याला हे शक्य आहे."

बुद्धीमानता आणि निरागसता हे दोन्ही एकत्र ही जगातील सर्वात मौल्यवान वस्तू आहे. 

जगात असे लोक आहेत जे हुशार आणि लबाड आहेत ,आणि निरागस व अडाणी असणे फार सोपे आहे. परंतु हुशारी जोपासणारे तरीसुद्धा निरागसता टिकवणाऱ्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे.

तर आता आपण आरामशीर आहोत आणि अनौपचारिक आहोत तर आज रात्री कोणत्या विषयावर तुम्हाला मी बोलून पाहिजे? (
(श्रोते : प्रेम,जन्म,क्षमा,नातेसंबंध,निर्णय,देव,भ्रष्टाचार आणि शांती,अनुकंपा,राग,भीती,भांडवलशाही,आशा,सहनशीलता) 

तुम्हाला मी सहनशीलतेवर बोलून पाहिजे? ते मी पुढच्या वर्षी करेन. आणि पुढे.... 

मला सांगा आपण आज रात्री कोणत्या विषयावर बोलतो याने खरोखर काही फरक पडतो का? 

सकल जग हे केवळ कंपायमान आहे. 

जर तुम्ही भौतिकशास्त्रज्ञाला विचारलं तर तो सांगेल की संपूर्ण विश्व हे दुसरे तिसरे काही नसून ते एक तरंग कार्य आहे. आपण प्रत्येक जण हे एका तरंगेशिवाय काही नाही. 

जर तुम्ही तुमच्या केंद्राच्या संपर्कात आहात तर तरंग हे सकारात्मक असतील. जर तुम्ही तुमच्या केंद्राच्या संपर्कात नाही आणि जर तुम्ही गुंतून पडलेले आहात तर तुमचे तरंग नकारात्मक असतील. 

शांती,प्रेम,अनुकंपा,हे सर्व आपले खरे तरंग आहेत; आपल्या विकृत न झालेल्या वास्तविक लहरी आहेत. हे सर्व आपल्यातून येणारी सकारात्मक कंपने आहेत. जेव्हा तुम्ही संतप्त होता,अस्वस्थ होता,नकारात्मक होता, तेव्हा तुम्ही काय करता? तुम्हाला ते सकारत्मकतेमध्ये बदलणे जरुरी आहे. परंतु हे कसे करावे हे आपल्याला कोणीसुद्धा शिकवले नाही; ना घरी ना शाळेत. हो ना? 

आजी आपल्याला सांगितले असेल,'जा,जाऊन कोपऱ्यात उभा राहा आणि दहापर्यंत अंक मोज',बस्स इतकेच. या दिवसांमध्ये दहापर्यंत आणि शंभरपर्यंत मोजण्याने काहीही होत नाही. 

जर तुम्ही तुमच्या मनाचे निरीक्षण कराल तर तुमचे मन हे भूतकाळाच्या घटनावर संतापलेले असते किंवा भविष्याची चिंता सतावत असते. दोन्हीचा काहीच उपयोग नाही. हो ना? भूतकाळातील घटनांवर रागावून काय मिळणार,भूतकाळ तर कधीचा संपलेला आहे. आणि भविष्याची चिंता करून काय उपयोग? हे तर अर्थहीन आहे. आता तुम्हाला वर्तमानाच्या या क्षणात येण्यास कशाची मदत होईल तर ध्यानाची. 

हे पहा,जर लोकांना थोडा काळ,दररोज दहा मिनिटे ध्यान करणे माहित असेल तर त्यांच्यामधील तणाव निघून जाईल आणि ते आनंदी होतील. 

हिंसा-रहित समाज, निरोगी शरीर, द्विधा-रहित मन, अटकाव-रहित बुद्धी, आघात-रहित स्मृती आणि दुःख-रहित आत्मा हे पाहण्याचे माझे स्वप्न आहे. हे माझे स्वप्न आहे. तुमच्यापैकी कितीजणांना हे स्वप्न सत्यात आणायचे आहे?(सगळे श्रोते त्यांचा हात वर करतात) 

आपल्या मुलांना आणि भावी पिढीला आपण अधिक चांगले जग दिले पाहिजे. अधिक प्रेम असलेले,अधिक अनुकंपायुक्त जग आपण त्यांना दिले पाहिजे आणि असे जग नाही जिथे बंदूक संस्कृती असेल. नशेच्या किंवा हिंसेच्या संस्कृती आपल्या मुलांना गरज नाही. ते अधिक प्रेमळ, अधिक माणुसकी आणि अनुकंपा यांनी युक्त समाजाचे अधिकारी आहेत. अधिक निरोगी समाज. तुम्हाला नाही का असे वाटत? मग आपल्याला याच दिशेने काम केले पाहिजे. 

प्रश्न : पृथ्वीवरचे आमचे विशेष कार्य काय? 

श्री श्री : पृथ्वीवरचे कोणते काम तुमचे नाही याची सर्वप्रथम आपण यादी तयार करू या. तुमचे विशेष कार्य आहे की कधीही दुःखी न होणे आणि इतरांना दुःखी होऊ न देणे.,बरोबर? 

आता जर तुम्ही कोणते कार्य तुमचे नाही ते हटवत गेला तर सर्वात शेवटी तुमचे विशेष कार्य काय आहे इथे तुम्ही येऊन पोहोचाल. 

प्रश्न : जर इतरांना नकारात्मक वाटत असेल तर त्याचा प्रभाव आपल्यावर कसा पडू नाही द्यायचा? 

श्री श्री : तुम्ही जास्तीत जास्त केंद्रित राहा आणि अपूर्णतेकरिता थोडी जागा सोडून द्या. कित्येक वेळेस आपण अपूर्णतेकरिता थोडी जागा सोडत नाही आणि मग आपल्याला त्रास होतो. 

जर कोणी नकारात्मक असेल तर त्यांना थोड्या अवधीसाठी नकारात्मक राहण्याचा हक्क आहे. त्यांना तसे असू द्या. त्यांना थोडी जागा द्या. आणि मी तुम्हाला सांगतो की तुमच्या सगळ्या काळज्या गोळा करायला मी इथे आहे. तर मग तुमचे सगळे त्रास,कटकटी,अडचणी आणि काळज्या मला देऊन टाका. 

मला तुमच्या चेहऱ्यावर कधीही न मावळणारे हास्य फुललेले पाहिजे आहे. 

प्रश्न : आम्ही आमच्या भावनांना कश्या प्रकारे आवर घालू शकतो? 

श्री श्री : आपण भावनांच्या पलीकडे सहजपणे जाऊ शकतो जेव्हा आपल्याला हे कळते की भावनांपेक्षा सर्वसामान्य जीवनात काहीतरी आहे जे भावनांपेक्षा मोठे आहे आणि ते आहे स्वयं; कधीही न बदलणारी आपल्या आत असणारी जीवन शक्ती.

प्रश्न : प्रेम आणि वासना यातील फरक कसा ओळखावा? 

श्री श्री : प्रेमामध्ये समोरची व्यक्ति महत्वाची असते तर वासानेमध्ये तुम्ही महत्वाचे असता. 

प्रश्न : प्रिय गुरुजी, मनातून तीव्र प्रतिरोध करणाऱ्या लोकांची मी कशी काय मदत करू शकतो? 

श्री श्री : या जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. ते जसे आहेत तसाच आपण त्यांचा स्वीकार करायला पाहिजे. प्रतिरोध करणारे लोक आहेत. ठीक आहे. त्यांना त्यांच्या स्वतःच्या गतीने चालू द्या. 

या ग्रहावर ससे आहेत, हरीण आहे आणि गोगलगाय आहे. मग तुम्ही एका गोगलगायीला सश्याच्या वेगाने धावण्याची अपेक्षा करू शकता; नाही ना? 

तर मग बाकीचे जरी हरिणीच्या वेगाने धावत असतील तरी तुम्ही कोणाला गोगलगायीच्या गतीने चालू द्या. हे जग असेच आहे. सुहास्य वदनाने पुढे जात राहा. 

प्रश्न : मला लोकांना क्षमा करणे कठीण जाते. 

श्री श्री : त्यांना विसरू नका आणि मग बघा ते सोपे आहे का? 

जर तुम्ही कोणाला क्षमा करू शकला नाहीत तर तुम्ही सतत त्यांच्याबद्दलच विचार करीत राहाल. 

कोणाबद्दल मनात राग धरून ठेवणे खरोखर सोपे आहे का? अरे देवा,आपली किती तरी उर्जा यामध्ये व्यर्थ जाते. तुम्ही दुसऱ्यांना क्षमा कशी करू शकता हे माहिती आहे? तुमच्या स्वतःच्या भल्याकरिता. 

तुम्ही एखाद्या गुन्हेगाराला जेव्हा पिडीत म्हणून बघता तेव्हा तुम्ही त्याला माफ करू शकता. प्रत्येक गुन्हेगार हा अज्ञानाने; संकुचित मनाने ग्रासलेला असतो. त्यांना जीवनाची महानता आणि सुंदरता माहिती नसते आणि म्हणून ते अशा आत्मकेंद्रित शुद्र चुका करतात आणि दुसऱ्यांची पर्वा ते करीत नाहीत. याचे कारण म्हणजे की त्यांचे मन हे संकुचित असते. म्हणून त्यांना आपण क्षमा केली पाहिजे. नंतर तुमच्या लक्षात येईल की त्यांना तुमच्याप्रमाणे महान विचार करण्याची किंवा महानता अनुभवण्याची संधी मिळाली नाही. मग तुम्हाला त्यांच्या प्रति अनुकंपा वाटेल आणि मग तुम्ही त्यांना माफ करू शकाल.

विश्वास’ महत्वाचा आहे?

13
2012
Aug
बंगलोर
हो! आज तुमचे मौन पूर्ण होत आहे! (गुरुदेव सर्व अडव्हान्स कोर्स सहभागी व्यक्तींना संबोधून बोलतात).

अडव्हान्स कोर्स करणाऱ्या दोन व्यक्तींना तळे काठी बोलताना मी एकले, एक म्हणाला. ‘आपले मौन केव्हा पूर्ण होणार?’ तर दुसरा म्हणाला की, ‘उद्या सकाळी! उद्या सकाळी आपले मौन पूर्ण होणार’. (सर्वजण हसतात)

अशा पद्धतीचे पण मौन काहीजणांनी ठेवले होता!

आणि काही जणांनी पूर्ण निष्ठेने मौन पाळला होता.

मौन मध्ये तुम्ही तुमची उर्जा वाचवत असता. आपण बोलत असताना आपली खूप सारी उर्जा वाया जाते, त्यासाठी काही काळ मौन मध्ये असणे चांगले असते.

वर्षाकाठी दोन-तीन वेळा किंवा चार महिन्यातून एकदा हा कोर्स करणेचे गरजेचे आहे. हा कोर्स केल्याने खूप फायदे होतात. या मध्ये मानसिक आणि शारीरिक फायदे आहेत. मज्जा संस्थेतून सर्व मानसिक ताण बाहेर पडतो, तुम्ही परत ताजे तवाने होता, आनंदी होता!

मौन केल्याने आपली वाणी शुद्ध होते, आणि मग आपण जे बोलाल ते ते होत जाते. या साठीच तर साधनेचे आपले एक असे महत्व आहे.

प्रश्न: विश्वासाचे महत्व काय?

श्री श्री: विश्वासाशिवाय तुमचे अस्तित्वच नाही!

ऐका, समजा तुम्ही इथे तुमची गाडी घेवून आला आहात, तुम्ही तुमची गाडी पार्किंग आवारात पार्क केली आहे. आता तुम्ही इथे बसला आहात, तुम्हाला माहीत आहे, विश्वास आहे की तुम्ही परत ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुमची गाडी तिथेच असेल! या विश्वासाशिवाय तुमचे अस्तित्व काय?

प्रथम तुमचा स्व:तावर विश्वास हवा.

तीन प्रकारचे विश्वास आहेत जे महत्वाचे आहेत.

१. स्व:तावर विश्वास. तुमचा जर तुमच्यावर विश्वास नसेल तर त्याला प्रणालित विभ्रम विकृति. तो ऐक रोग आहे.

२. तुमच्या सभोवताली असणाऱ्या सर्व चांगल्या व्यक्तींवर तुमचा विश्वास हवा. या जगात चांगले व्यक्ती आहेत यावर तुमचा विश्वास असायला हवा, नाहीतर तुम्ही या समाजात राहूच शकत नाही.

३. ज्या अमूर्त शक्तीमुळे हे सर्व विश्व चालले आहे अशा अज्ञात शक्तींवर तुमचा विश्वास असायला हवा. हा तिसऱ्या प्रकारचा विश्वास आहे.

या तीन विश्वासापैकी पहिले दोन फार महत्वाचे आहेत. तिसऱ्या मुळे तुमचे आयुष्य चांगले व्यतीत होईल.

प्रश्न: मी खूप प्रयत्न केल्यानंतर ही मला यश मिळत नाही?

श्री श्री: फक्त प्रयत्नाने यश मिळत नाही. प्रयत्नांबरोबर विश्वास आणि भक्ती असायला हवी. तुमच्या कडे भक्ती आणि विश्वास असेल तर तुम्हाला यश मिळतेच. पण असे ही समजू नका की नुसत्या भक्तीने यश मिळेल, त्या बरोबर प्रयत्न केलेच पाहिजेत; दोन्ही एकत्रित करणे महत्वाचे आहे.

प्रश्न: गुरुदेव, अहंम बद्दल बोला.

श्री श्री: प्रेमा मध्ये हानी झाली तरी तो विजय असतो, आणि अहंम मध्ये विजय झाला तरी ती हानी होवू शकते!

प्रश्न: गुरुदेव, भगवतगीतेत भगवान श्री कृष्ण म्हणतात की तुम्ही तुमच्या स्वभावा प्रमाणे रहा आणि तेच करत रहा, जरी त्यातील एखादी गोष्ट योग्य नसेल तरी. यावर मार्गदर्शन करा.

श्री श्री: हो, तुम्ही तुमच्या स्वभावा प्रमाणे रहा. तुम्हाला ज्या गोष्टी पटत नाहीत त्या करण्याचा प्रयत्न करू नका. याचा अर्थ असा नाही की तुम्ही मुर्ख व्हा. ठीक आहे!

समजा तुम्ही एका अंत्य यात्रेला गेले आहात आणि तिथे तुम्हाला नाचण्याचा विचार आला. तुम्ही काय विचार करणार की गुरुदेवानी सांगितले आहे की स्वभावा प्रमाणे रहा, आणि तुम्ही तिथे टाळ्या वाजवून नाचू लागलात तर ते चालणार नाही. तुम्हाला शिष्टाचार सांभाळता आला पाहिजे.

तुम्ही म्हणताल की गुरुदेवांनी सांगितले आहे की हे विश्व म्हणजे एक कुटुंब आहे, सर्वाना मिठीत घेवून आनंदाने पुढे व्हा. म्हणून काय रस्त्यावरून जाणाऱ्या एका स्त्रीला तुम्ही मिठी मारालं? हे कृत्य जर तुम्ही केले तर तुम्हाला चांगलाच मार बसेल. असे काही करू नका!

ब्रम्ह भाव जोपासणे चांगले आहे – हे सर्व एकच आहे;हे सर्व माझ्यातील अंश आहेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुणाच्याही पाकिटातले पैसे काढून घेणार आणि म्हणणार हे सर्व माझेच आहेत.

प्रश्न: गुरुदेव, मला वाटते की मी उदास असल्या कारणाने लोक माझा स्वीकार करत नाहीत. मी काय करू?

श्री श्री: लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात ह्याची काळजी तुम्ही करू नका. जीवनात एक ध्येय ठेवून पुढे चालत रहा. जीवनात मी एकटाच आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकटेच चालत रहा आणि तुमच्या जीवनाचे ध्येय साध्य करा. आणि मग पहा सर्वजण तुमच्या बरोबर असतील.

एकेकाळी मी पण खूप उदास असायचो. मला क्रिकेट बद्दल काही ज्ञान नव्हते आणि त्या काळात सर्वजण क्रिकेट बद्दल बोलायचे आणि मी फक्त पहात असायचो. माझ्या किशोर वयात मला क्रिकेटची आवड नव्हती. बाकी सर्वजण त्या साठी वेडे व्हायचे. पाच-पाच दिवस ते कानाला रेडिओ लावून कॉमेंट्री एकत असत.

त्या वेळी मला वाटायचे की मी काय बोलू? सर्वजण क्रिक्रेट बद्दलच बोलायचे दुसरे काही नाही.

तुम्ही तुमचा मार्ग निवडा आणि त्या वर पुढे चालत रहा. स्व:ताचे आणि दुसऱ्यांचे परीक्षण करू नका.

प्रश्न: गुरुदेव, समोर खूप पर्याय असताना, आपल्या साठी कोणता योग्य आहे हे आपल्याला कसे माहित पडेल? आणि ते सर्व पर्याय चांगले असताना मी योग्य तो पर्यायाची निवड कशी करू?

श्री श्री: योग्य तो पर्याय आपोआप समोर येईल. अशा परिस्थिती मध्ये थोडे थांबा, धीर धरा आणि पहा योग्य ते होवून जाईल.

प्रश्न: गुरुदेव, मी आणि माझा भाऊ एकत्रित वाढलो आणि सगळे संस्कार सारखे झालेत, तरी आम्ही दोघे खूप वेगळे आहोत हे कसे शक्य आहे?

श्री श्री: हे फार सखोल शास्त्र आहे. तुम्ही या विषयी विचार करायला हवा.

छोट्या छोट्यातील प्रतिकृती या ब्रम्हांडाशी जोडलेली आहे. तसे पाहिले तर हे सर्व एकच आहे. पण ह्या छोट्या प्रतिकृती आणि ब्रम्हांडा मध्ये काहीतरी दुवा आहे. या पृथ्वी वरील धान्य हे ब्रम्हांडाशी विशेषरित्या निगडीत आहेत.

आपल्या पूर्वजांना हे माहीत होते. म्हणून त्यांनी सांगितले आहे की आपल्या सूर्यमालेत नऊ ग्रह आहेत, आणि हे नऊ ग्रह नऊ वेगवेगळ्या धान्य, नऊ वेगवेगळे रंग, नऊ वेगवेगळे प्राणी, नऊ वेगवेगळे आकार, नऊ वेगवेगळे पदार्थ या सर्वाशी निगडीत आहेत.

एकमेकांशी असणाऱ्या या नात्यांचा शोध त्यांनी कसा काय केला हे आश्चर्यकारक आहे!

आपण शाळेत शिकलो आहोत की पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्या भोवती फिरते हा शोध गेलिलिओने लावला आहे. पाश्चिमात्य देशात असे समजले जाते की सूर्य हा पृथ्वी भोवती फिरतो. पण भारतातील कोणत्याही मंदिरात जावा, त्यांना माहीत आहे की सूर्य हे सूर्यमालेतला केंद्र बिंदू आहे.

हजारो वर्षापासून भारतात याचा अभ्यास केला गेला आहे. ते सूर्याला मधे ठेवून सर्व ग्रहांना त्याच्या भोवती ठेवतात.

आणि पुढे जावून त्यांनी प्रत्येक ग्रहाला एका मंत्राला आणि यंत्राला जोडलेला आहे. जसे मंगळ ग्रहाला हरभरा याच्याशी जोडलेला आहे, बुध ग्रहाला मुग डाळीशी जोडलेले आहे, शनी ग्रहाला तीळ याच्याशी जोडलेले आहे, सूर्य आणि चंद्राला, तांदूळ आणि गहू याच्याशी जोडलेले आहे.

राहू आणि केतू, चंद्राच्या या दोन बिंदुना पण वेगवेगळ्या डाळी शी जोडलेले आहे.

प्रत्येक ग्रह हा विशिष्ट धान्य, विशिष्ट आकार आणि रंग, आपल्या शरीरातील विशिष्ट भागांशी जोडलेला आहे.

आपल्या शरीरातील प्रत्येक भाग हा विशिष्ट ग्रहाशी जोडलेला आहे. तुमच्या शरीरामध्ये संपूर्ण सूर्य माला आहे. हे आश्चर्यजनक शास्त्र आहे.

पूर्वी या शास्त्राला समुद्रिका लक्षण असे म्हणायचे. या मध्ये तुमच्या चेहऱ्याकडे पाहून तुमची जन्म कुंडली काढली जायची. ते तुमच्या दाता कडे पाहून तुमचा कोणत्या साली जन्म झाला ते सांगायचे. पण आता हे शास्त्र हरवून गेले आहे. खूप सारे ज्ञानाचा गैरवापर करून ते हरवून गेले आहे.

या जगातील लोकांचे कल्याण करण्यासाठी विविध मंदिरातील पंडित एकत्र येवून नव ग्रहासाठी यज्ञ करीत आहेत. येणारे काही दिवस हे फार कठीण आहेत, जगातील सकारात्मक प्रभाव वाढविण्यासाठी आणि नकारात्मक कंपन कमी करण्यासाठी हे यज्ञ आज आणि उद्या करीत आहेत.

या अशा सर्व पुरातन गोष्टी आहेत. कोणी योग्य प्रकारे समजून घेतले नाही आणि योग्य प्रकारे करणारी लोक नाहीत. अशा विषयामध्ये आपण युवकांना प्रेरित केले पाहिजे.

म्हणून मी विचार केला की सर्व पंडितांना एकत्र आणून आपण युवकांना मार्गदर्शन केले पाहिजे.

प्रश्न: व्यसनापासून मुक्ती कशी मिळेल?

श्री श्री: साधना केल्याने. कोणत्याही व्यसनापासून मुक्ती हवी असेल तर तुम्हाला साधना केली पाहिजे. इथे या, शांत बसा आणि साधना करा.

अडव्हान्स कोर्स करत रहा. एक नाही, दोन नाही, पण वारंवार करत रहा आणि पहा तुमची व्यसनापासून कशी मुक्ती होते. ‘मी कोण आहे? मी कोण आहे?’ हे स्व:तशी विचारत रहा. हे सर्वात उत्तम. याच्यातून तुम्हाला उत्तर मिळेल.

प्रश्न: गुरुदेव, मला एकच मुलगी आहे. तिच्या लग्नानंतर ती कॅनडाला स्थलांतरित झाली. आणि मला भेटून एक दीड वर्ष झाले आहे. मी तिला भेटू शकेन का?

श्री श्री: हो, तिला जावून भेटा!

‘मला आईला भेटायचे आहे’ असे तुमच्या मुलीला पण वाटले पाहिजे. काय झाले आहे की आपण मुलांना वाढविताना अशा पद्धतीने वाढवितो की त्यांच्या मध्ये करुणा ही भावना राहिलेली नाही. आपण त्यांना चांगले संस्कार देवू शकलो नाही म्हणून ते विदेशी जाताच सर्व विसरून जातात आणि स्वार्थी होतात.

तुम्ही तिला माफ करा, शांत रहा! सर्व काही व्यवस्थित होईल.

गुरू तत्व

11
2012
Aug
बंगलोर
अन्नकुट ( श्री श्री, व्यासपीठावर सजविलेल्या अनेक अन्न पदार्थांच्याकडे बघून म्हणतात) आज बायकांनी ४५१ प्रकारचे पदार्थ बनविले आहेत. हि तर गुजरातची खासियत आहे, हे ४५१ पदार्थ गुजरात मधून आलेल्या स्वयंसेवकांनी बनविले आहेत.

(अन्नकुट (म्हणजे धान्याचा डोंगर) हा कृष्णाच्या इंद्रावरील विजयाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो. अन्नकुटसाठी , अन्न पदार्थांचा, प्रतीकात्मक डोंगर सजविला जातो , असे म्हणतात कि गोवर्धन पर्वत जो भगवान श्रीकृष्ण यांनी भगवान इंद्रापासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी उचलला होता, त्याचे हा अन्नकुट प्रतिक आहे)

भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेत असे म्हटले आहे कि

 “ अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः” 

मी “जठराग्नी” ( आपल्या उदरातील एक प्रकारचा अग्नी जो अन्नपचनाला मदत करितो) आहे. मीच प्राणीमात्रांच्या ठिकाणी निर्माण होणारी भूक आहें आणि मीच चारही प्रकारचे अन्नपचनाला कारण होतो.

पण आपण काय करतो? आम्ही तर भुकेची वाट न बघता सारखे पोटात अन्न भरत असतो. आम्ही भगवान श्रीकृष्ण आमच्या पोटात राहू देत नाही! आणि म्हणूनच कधीतरी उपास कारणे गरजेचे असते.

लोक हे अष्टमीला उपवास करतात, त्याने सपाटून भूक लागते आणि मग ते दुसऱ्या दिवशी देवाला अनेक प्रकारचे अन्नपदार्थ अर्पण करतात.

म्हणून जेंव्हा तुम्हाला भूक लागेल तेंव्हा समजा कि भगवान कृष्ण आले आहेत.

तुमच्या पोटातील आग म्हणजे देव होय, तुमची भूक आणि अन्न म्हणजे पण देवच आहे. 

आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणतात कि “ तुमच्या पोटातील भूक म्हणजे मी होय आणि तुम्ही जे अन्न खाता तो म्हणजे पण मीच होय.

हे एक चमत्कृतीपूर्ण असे ज्ञान आहे. असे ज्ञान फार दुर्मिळ असते. तुम्ही जरी जगातली सर्व पुस्तके पालथी घातलीत तरी असे ज्ञान मिळणार नाही.

बऱ्याच लोकांना हे लक्षात येत नाही, त्यांना असे वाटते कि ते उगीचच असे म्हणत आहेत. पण जे शहाणे आणि ज्ञानी आहेत त्यांच्या हे लक्षात येते. त्यांना त्यातील सत्य आणि त्याचा गाभा कळतो.

प्रश्न: गुरुजी, येथे ४५१ पदार्थ आहेत पण तुम्ही मिठाई आहात. तुम्ही एक अशी अशी मिठाई आहात कि आम्हाला नेहमीच उपलब्ध असेल. तुम्हाला यावर काय वाटते?

श्री श्री : तुम्ही म्हणता ते खरे आहे. तुम्हाला जर मधुमेह नसेल आणि तुम्ही जर गोडखाऊ असाल तर मी नेहमीच मिठाई आहें.

प्रश्न: गुरुदेव, काल तुम्ही असे म्हणालात कि भगवान श्रीकृष्ण हे देवांमधील कार्तिकेय आहेत. आम्हाला कार्तिकेयबद्धल काही सांगा.

श्री श्री : जेंव्हा भगवान शिव ज्यांच्यावर वर्चस्व गाजवतात ती पंचतत्वे (पंच महाभूते-पृथ्वी, पाणी, आग, हवा, वातावरण) यांचा जेंव्हा शक्तीशी संयोग झाला तेंव्हा भगवान कार्तीकेयांचा जन्म झाला.

भगवान शिव यांचे एक नाव पंचानन म्हणजेच पंच मुखी होय. हि पंच मुखे निसर्गाची पाच स्वरूपांची निर्देशक आहेत. जेंव्हा या पांच तत्वांचा चैतन्य शक्तीशी संयोग झाल्यावर , षडानन म्हणजेच भगवान कार्तिकेय यांचा जन्म झाला.

तुम्ही हे कुंडलिनी शक्तीच्या भाषेत चांगले समजू शकाल. ( कुंडलिनी म्हणजे शरीराच्या मणक्याच्या तळभागात वेटोळे स्थितीतील सुप्त पण अत्यंत प्रभावशाली अशी शक्ती होय)

आपल्या शरीरात सात चक्रे असतात त्यांना उर्जा केंद्र म्हणून पण संबोधतात. जेंव्हा या सहा चक्रातून प्रवास करून जेंव्हा सातव्या चक्रात म्हणजे अज्ञ चक्रात ( जे दोन भुवयांच्या मध्ये असते) स्थिरावते, तेंव्हा ती भगवान कार्तीकेयांचे स्वरुपात ( गुरू तत्वच्या स्वरुपात) उमलते. अज्ञ चक्र हे गुरू तत्वाची जागा आहे. तिथेच ते स्थिरावते आणि प्रकट होते. आणि गुरू तत्व म्हणजेच कार्तिकेय तत्व होय.

भगवान शिव हे अव्यक्त दैवत आहे तर कार्तिकेय हे प्रकट दैवत आहे.

म्हणून तुम्ही भगवान कार्तिकेय हे कुंडलिनी शक्तीचे प्रतिक समजू शकता.

इच्छा शक्ती आणि स्वयं ज्ञान हे कुंडलिनी शक्तीमुळे प्राप्त होते. खरे पाहता, त्यात इच्छाशक्ती आणि कार्यशक्ती हे ज्ञान शक्तीचे भाग म्हणता येतील.

इच्छाशक्ती आणि कार्यशक्ती हे दोन्ही एकाच कुंडलिनी शक्तीचे भाग आहेत (कार्तिकेय) आणि मग ते वल्ली आणि देवयानी म्हणून प्रकट होतात तेच भगवान कार्तीकेयांचे दैवी अंश आहेत. आणि भगवान कार्तिकेय हेच प्रत्यक्ष ज्ञान अवतार होत.

सोप्या भाषेत सांगायचे तर कार्तिकेय म्हणजेच गुरू तत्व होय.

भगवान शंकर हे त्रिमूर्ती पैकी एक होय ( ब्रम्हा, विष्णू आणि महेश) जे ओंकार स्वरुपात ओळखले जातात, जो कि एक मौलिक असा निर्मितीचा आवाज आहे. त्यापैकी म हे भगवान शंकर होत.

भगवान कार्तिकेय यांची पुराणात एक गोष्ट अशी आहे.

भगवान शिव यांनी आपल्या पुत्राला भगवान ब्रह्मदेवाकडे अभ्यास आणि ज्ञानार्जन करिता धाडले.

तर कार्तिकेय भगवान ब्रह्मदेवाकडे गेला आणि त्याने म्हटले,'कृपा करून मला ॐ चा अर्थ सांगा.' भगवान ब्रह्मदेव म्हणाले,'अरे पहिले मुळाक्षरे तर शिक! तू तर थेट ॐ चा अर्थ विचारतो आहेस.' कार्तिकेय म्हणाला,'नाही. मला सर्वोच्च ज्ञान ॐ माहित करून घ्यायचे आहे.'

आता भगवान ब्रह्मदेव यांना सगळी मुळाक्षरे माहिती होती,परंतु त्यांना ॐ(अनादी ध्वनी) चा अर्थ माहित नव्हता.

तर कार्तिकेय भगवान ब्रह्मदेव यांना म्हणाला,'जर तुम्हाला ॐ चा अर्थ माहित नाही तर तुम्ही मला कसे शिकवणार? मी तुमच्याकडे शिकणार नाही.' आणि कार्तिकेय त्याचे पिता भगवान शिव यांच्याकडे परत गेला.

भगवान ब्रह्मदेव भगवान शिव यांना म्हणाले,'तुम्हीच तुमच्या पुत्राला सांभाळा.मी काही सांभाळू शकत नाही. मी जे काही म्हणतो,तो त्याच्या अगदी विरुद्ध म्हणतो. मी काही त्याला शिकवू शकणार नाही. आता उत्तम काय ते तुम्हीच ठरवा आणि त्याला सांभाळा.'

हे ऐकून भगवान शिव यांनी कार्तिकेयाला विचारले,'काय झाले,बेटा? भगवान ब्रह्मदेव हे समस्त सृष्टीचे निर्माता आहेत. तुला त्यांच्याकडून शिकले पाहिजे.'

यावर कार्तिकेय उत्तरला,'मग तुम्ही मला सांगा कि ॐ चा अर्थ काय आहे?'

हे ऐकून भगवान शिव यांनी स्मितहास्य केले आणि म्हणाले, 'मलासुद्धा माहित नाही.' 

कार्तिकेय म्हणाला,'मग मी तुम्हाला सांगेन कारण मला ॐ चा अर्थ माहित आहे.'

'जर तुला अर्थ माहित आहे तर मग तू मला सांग,' भगवान शिव म्हणाले. '

असे मी सांगू शकत नाही. तुम्ही मला गुरुचे स्थान दिले पाहिजे.जर मला तुम्ही गुरूच्या आसनावर बसवले तरच मी तुम्हाला सांगू शकतो', कार्तिकेय म्हणाला.

गुरु म्हणजे तो वरिष्ठ जागी अथवा वरिष्ठ आसनावर असला पाहिजे. शिक्षक नेहमी वर बसतो आणि जो शिष्य आहे तो खाली बसून शिक्षकाचे ऐकतो.

कारण भगवान शिव हे त्यांच्या पेक्षा वरची जागा कशी बरे शोधतील कारण त्यांच्या वरचढ काही नाही! म्हणून मग भगवान शिव यांनी त्याला खांद्यांवर उचलून घेतले आणि अशाप्रकारे त्याला स्वतःपेक्षा उंच आसन दिले. आणि मग भगवान शिव यांच्या कानात कार्तिकेयाने सांगितला परम सत्याचा अर्थ-ॐ काय आहे?!

तर मग भगवान शिव यांचा पुत्र कार्तिकेय याने शिव यांना काय सांगितले?

त्रिमूर्ती ( ब्रम्हा, विष्णू आणि महेश) यांचा मिळून ॐ बनतो. ॐ म्हणजे प्रेम. प्रेमाने सर्व ओतप्रोत आहे. सर्वाचे अमृत सार केवळ प्रेमच असून ते अभंग आणि अविनाशी आहे. '

हा ॐ अर्थ चा कार्तिकेयाने भगवान शंकरांना सांगितला.

हे ऐकून माता पार्वती ( भगवान कार्तिकेय यांचीआई आणि प्रत्यक्ष जगन्मातेचा अवतार) खुपच उल्हासित आणि आनंदी झाली.

 मग ती (कार्तिकेयाला) म्हणाली” तू स्वामी झालास माझ्या नाथांचा.” आणि तेंव्हापासून कार्तीकेयांना स्वामिनाथ असेपण संबोधतात.

अशा तऱ्हेने कार्तीकेयांनी गुरुचे स्थान ग्रहण करून ॐअर्थ कार्तिकेयाने भगवान शंकरांना त्यांच्या खांद्यावर बसून सांगितला.

या कथेचा मतितार्थ असा कि –गुरू तत्वाची जागा हि प्रत्यक्ष भगवान शंकरांपेक्षा उंच आहे हेच समजावून सांगण्यासाठी हो गोष्ट स्कंद पुराणात सांगितली आहे.

भगवान शंकर हे गुरू तत्वाचे शिष्य झाले म्हणूनच गुरू तत्व आणि कार्तिकेय तत्व एकच आहेत. अशी एक म्हण आहे कि:

“गुरू गोविंद दौ खडे, काके लागू पाय? बलिहारी गुरू आपके गोविंद दियो मिलये” 

(जेंव्हा गुरू आणि देव हे माझ्यासमोर उभे आहेत तेंव्हा आधी कोणाला नमन करू? तर प्रतःम मी गुरूला वंदन करीन कारण गुरुशिवाय मला देव ओळखताच आला नसता).

भगवान कार्तीकेयांनादेवांचा सेनापती म्हणतात, देव तत्वाचा पालक आणि त्राता म्हणून.भगवान शंकर हे भक्तांना सहज प्रसन्न होऊन वरदान देत असतात अगदी असुरांना सुद्धा. हे असे आमचे भोळे बाबा आहेत कि जे कोणालाही मागेल तो वर किंवा आशीर्वाद देतात आणि मग ते त्यात अडकून जातात.

त्रिमूर्ती ( ब्रम्हा, विष्णू आणि महेश) हे यासाठी प्रसिद्ध आहेत कि ते कोणालाही चटकन प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि मग त्यात अडकून जातात. असाह वेळी मग भगवान कार्तिकेय ज्याअसुरांनी असा वर मिळवून देवावर कुरघोडी करायचा प्रयत्न करायचे त्यांच्याशी लढून मग देवांचे संरक्षण करायचे. म्हणून त्यांना देवांचे सर्-सेनापती म्हणत. 

कार्तिकेय म्हणजे एक असे तत्व कि जे शांत आणि सक्रीय आहे.

साधारण पणे जे लोक सक्रीय असतात ते फारसे शांत नसतात आणि जे शांत असतात ते फारच मठ्ठ असतात. म्हणून कार्तिकेय म्हणजे एक असे तत्व कि जे सक्रीयपण आहे आणि शांत पण आहे.

आध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण आणि जागतिक पातळीवरचे शहाणपण अशी दोन्ही तत्वे महत्वाची आहेत.गतिशीलता आणि खोलवरची शांतता या दोन्हीपासून कार्तिकेय तत्व बनते.

इच्छाशक्ती आणि कार्यशक्ती, ज्ञान शक्तीचे मिळून कार्तिकेय तत्व होते. म्हणून असे म्हणतात कि या क्रिया शक्ती मुळे भगवान कार्तिकेय देवाचे सेनापती झाले आणि त्यांनी देवांचे असुरांपासून संरक्षण केले. 

भगवान कार्तीकेयांनी तारकासुराचा पराभव केला.

तारकासुर हा अहंकाराचा निर्देशक आहे. जेंव्हा कोणी म्हणतो कि” मी सर्व जग जिंकले आहे, सर्वांवर माझे प्रभुत्व आहे, मला सर्व काही माहित आहे’ अशी मनाची भावना म्हणजे तारकासुर होय.

काही लोक असे असतात कि जे नेहमी म्हणतात कि “मला हे या आधीच माहित आहे, मला सांगण्याची गरज नाही.” ते त्यांचे अज्ञान कधीच उघडपणे सांगणार नाहीत. ते असे वागतात कि त्यांना सर्वकाही माहित आहे.

हा दुराभिमान , असा उर्मटपणा ज्यामध्ये सर्व गोष्टी या उन्मत्तपणे धिक्कारण्याची सवय दिसून येते हा असुरीपणा होय.

विनम्रपणा, साधेपणा, आणि नैसर्गिक पणा या सर्व गुणांना उर्मटपणा झाकोळून टाकतो.म्हणून या दुष्ट शक्तींचा नाश करणे हे कुंडलिनी शक्ती म्हणजे कार्तिकेयाचे काम आहे. म्हणून कार्तिकेय हा अहंकाराचा संहारक आहे.

म्हणून अशी गोष्ट आहे कि जेंव्हा तारकासुर (अहंकार) याचा कार्तिकेयाने पराभव केला तेंव्हा त्याचा कोंबडा झाला. कोंबडा हा अशक्त, स्थिरतेचा आणि धैर्याचा अभाव याचे प्रतिक आहे. म्हणून जर कोणी भित्रा, घाबरट असेल तर त्याला कोंबडा म्हणतात, होय कि नाही?

म्हणून हा अहंकार (तारकासुर) त्याला कार्तिकेयाने पराजित केल्यावर एक कोंबडा झाला. 

त्या युद्धातील पराभवानंतर त्यांनी त्याला माफ केले आणि वर मागायला सांगितला. तेंव्हा तारकाने त्यांच्या पायाशी जागा मिळावी असा वर मागितला आणि कार्तीकेयांनी त्याला त्यांच्या ध्वजावर कायमची जागा दिली. याचा अर्थ असा कि अहंकार पूर्ण काबूत ठेवणे असते. अहंकार हा आयुष्यात महत्वाचा असतो पण तो काबूत ठेवायचा असतो.

तुम्ही जर कार्तीकेयांची मूर्ती पाहिलीत तर असे लक्षात येईल त्यांच्या एका हातात भाला आहे.त्याला वेळ असेही म्हणतात. ते त्रिशूल नव्हे. ते कुंडलिनीचे प्रतिक आहे. त्यांच्या दुसऱ्या हातात एक ध्वज आहे कि ज्यावर एक कोंबडा आहे.हा कोंबडा म्हणजे तारकासुराचे चिन्ह आहे, ज्याने कार्तीकेयांना विंनती करून त्यांच्या ध्वजावर जागा मिळविली होती.खरेतर तामिळनाडू आणि दक्षिणेच्या काही राज्यात कार्तिकेय यांचा उल्लेख “मुरुगन” असाही होतो.

प्रश्न: गुरुदेव, भगवान विष्णू यांच्या परशुराम या अवताराविषयी काही गैरसमज आहेत. प्रभू रामचंद्र हे पण परशुराम यांच्याच काळात जन्मालाआले होते. ते दोघेही जर भगवान विष्णू यांचे अवतार असतील हे कसे शक्य आहे?

श्री श्री : अवतार म्हणजे काय हे आधी समजून घ्यायची गरज आहे.

अवतार हा एका वेळी एकाच ठिकाणी अवतीर्ण होतो आणि त्याच वेळी दुसऱ्या ठिकाणी अवतीर्ण होऊ शकत नाही असे नाहीये.अवतार म्हणजे देवतेचा अंश होय.आणि देव कोठे नाहीये?

देवाचा अंश हा सदासर्वकाळ आणि सर्वत्र अस्तित्वात असतो.जेंव्हा देवाचा एक अंश हा पूर्ण पणे प्रकट होतो, जसे कि एखाद्याच्या समोर संपूर्णपणे अवतीर्ण होतो तेंव्हा त्यास अवतार असे म्हणतात.असे नाही कि तो अचानकपणे अवकाशातून अवतीर्ण होतो.देव हा सर्व जगदीश्वर असून तो प्रत्त्येक गोष्टीत आहे.

असे पहा कि घराला चार खिडक्या असू शकतात होय कि नाही? आणि कोणत्याही खिडकीतून तुम्ही पूर्ण सूर्य पाहू शकता.

पण जर तुम्ही मला जीवात्माविषयी विचारू शकता जसे कि जीवात्मा जर एके ठिकाणी जन्मला तर त्याचवेळी तो दुसऱ्या ठिकाणी कसा जन्माला येऊ शकतो? हा प्रश्न तुम्ही विचारू शकता.पण ते परमात्म्याविषयी मात्र खरे असत नाही. देव हा जगदीश्वर असल्यामुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होऊ शकतो.

भगवान परशुराम या स्वरुपात देव बघणे हे फार आकर्षक आहे.

तुम्ही जर परशुरामांच्या जीवन चरित्राकडेनजर टाकलीत तर असे लक्षात येईल कि त्यांच्या हातून अशी कोणतीच गोष्ट घडली नाही कि तुम्हाला वाटेल कि ते देवाचे अवतार आहेत. पहिल्यांदा त्यांनी आईचे डोके उडवले.

आता एखाद्या मुलाला आपल्या आईचे डोके उडवणे शक्य आहे काय? नाही, ते फारच अवघड आहे. खरे तर अशक्य आहे.आणि मग ते सर्व क्षत्रिय लोकांचा सर्वनाश करायला बाहेर पडले.

माझ्या दृष्टीने असे करणे चुकीचे होते. आपण आजखुपच प्रगती केली आहे.पण मग त्यांच्या या वागण्याचा अर्थ काय? त्याचा खरा अर्थ असा आहे कि आश्चर्यकारकपणे ती सर्वोच्च सत्ता अश्या घृणास्पद गोष्टी करू शकते.

परशुरामांनी केलेल्या गोष्टी अमानवी होत्या आणि सामान्य मनुष्य त्या करूच शकत नाही, फक्त देव माणूसच त्या करू शकतो. म्हणून परशुराम हे दैवी अवतार होते हा त्याचा अर्थ आहे. तर या संदर्भ घेऊन परशुराम यांच्या कडे बघितले तर त्याचा उलगडा होतो. 

परशुरामयांनी केलेल्या गोष्टी सामान्य माणूस करू शकत नाही म्हणून त्यांचा कोणी शिष्य बनून त्या मार्गावर चालायला तयार झाला नाही.

प्रथमतः त्यांनी ज्या कृती केल्या , त्या त्यांनी कर्त्याच्या भावनेतून न करिता, फक्त साक्षीभाव ठेऊन केल्या. कर्त्याच्या भूमिकेतून त्यांनी काहीच केले नाही. दुसरे असे कि जर तुम्ही परशुराम यांच्या मध्ये देव बघू शकत असाल तर तुम्हाला सर्वत्र फक्त देवच दिसेल. प्रत्येक मुलात आणि माणसात तुम्ही देव बघू शकाल.

म्हणून परशुराम यांना अवतार म्हणतात.

तुम्ही जर देवाला माशामध्ये (मत्स्य अवतार), वराह मध्ये (वराह अवतार),कासवामध्ये (कुर्म अवतार), सिंह मध्ये (नरसिंह अवतार), हंस, कावळा वगैरे मध्ये, तुमच्या आजूबाजूच्या सर्व गोष्टींमध्ये बघू शकाल तर, आणि पाषाण हृदयी अशा परशुराम यांच्यात देव बघायला लागलात तर मग कामच झाले! मग तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या सर्व निर्मितीमध्ये देव दिसायला लागेल. त्यानंतर तुम्हाला जगात देवाशिवाय काहीच दिसणार नाही.

हे ज्ञान लक्षात येण्यासाठी परशुराम हे अवतारी पुरुष मानले गेले आहेत, येतेय लक्षात? 

म्हणून असे लक्षात घ्या कि देव काही एका धर्मापुरता, एका देशापुरता किंवा काळापुरता मर्यादित नाहीये.देव हा जगदीश्वर असून तो या निर्मितीच्या प्रत्तेक कणा कणात सामावलेला आहे.

भगवान राम हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखिले जातात, तरीसुद्धा ते अगदी वाकून सर्व ऋषी मुन्नींना वांदान करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे.ते सर्वांचा यथोचित मन ठेवीत असत.ते अगस्ती ऋषींच्या पायाशी बसून ज्ञान मिळवीत असत.

त्यांचा मोठेपणा किती सांगावा, रावण आपल्या मृत्यूशय्येवर असताना त्यांनी लक्ष्मणाला त्यांच्याकडे पाठवून सांगितले कि त्यांच्या मृत्यूला अजून काही काळ आहे , जा शक्य तेवढे ज्ञान त्यांच्याकडून घे.असे त्यांनी त्यांच्या लहान भावाला रावण मृत्युशय्येवर असताना ज्ञान घ्यायला सांगितले.

भगवान राम म्हणाले “ मी त्याच्या कडे गेल्यावर ते शरीर सोडून देतील आणि त्यांचा आत्मा माझ्यात विलीन होईल, ते व्हायच्या आत जा आणि शक्य तेवढे ज्ञान त्यांच्याकडून मिळव.त्या नंतर मी त्यांना दर्शन देईन आणि त्यांचा आत्मा मग माझ्यात विलीन होईल. 

श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही भगवान शिव यांचे उपासक होते. भगवान श्रीकृष्ण हे तर देवीचे फार मोठे उपासक होते. भगवान श्रीकृष्ण नेहमी मां भगवतीची उपासना करीत असत.

येथे देवी म्हणजे एक अशी दैवी शक्ती जी सर्व प्राणीमात्रामध्ये चेतना, जीव, भूक,बुद्धी,शक्ती आणि अनेकविध प्रकारात वास करून असते.

आज हीच देवी आपल्यासमोर अन्नपूर्णेच्या स्वरुपात प्रकट झाली आहे. आपल्यासमोर नानाविध प्रकारचे अन्न पदार्थ आहेत. ( गुरुदेव, हे अन्नकुट साठी गुजरात मधून आलेल्या स्वयंसेवकांनी बनविलेल्या ४५१ पदार्थांविषयी बोलत आहेत).