बुटांचा निराळा जोड

02
2012
Nov
बंगलोर, भारत


प्रश्न : ‘इंद्रियार्थेषु वैराग्यं अनाहंकार इव च, जन्म-मृत्यू-जरा-व्याधी दु:ख दोषनुदर्शनं’ याचा अर्थ समजावून सांगाल कां ?

श्री श्री : ‘इंद्रियार्थेषु वैराग्यं’, आपण इतक्या गोष्टी बघतो, इतकी सुंदर दृश्ये बघतो, पण आपण किती काळ पर्यंत बघत राहू शकतो ? एका क्षणाला आपले डोळे थकून जातात त्यामुळे आपण ते बंद करतो. तसेच वासाचे आहे. जे लोक अत्तराच्या कारखान्यात काम करतात, त्यांना सुगंधाचाच वीट येतो. कधी कधी तर त्यांचे नाक कामच करेनासे होते. सुगंध मोगऱ्याचा आहे, चमेलीचा आहे की गुलाबाचा हेच त्यांना कळेनासे होते. सतत सुवास घेऊन घेऊन त्यांना इतका वीट येतो की कुठलाही वास नाही अशा ठिकाणी त्यांना जावेसे वाटते. 

चवीचेही तसेच आहे. किती चव घेऊ शकाल ? आणि स्पर्श, किती स्पर्श करू शकाल ? दिवसातले २४ तासं ? जर कुणी एकमेकांना २४ तासं स्पर्श करत राहिले तर दोघांनाही त्याचा वीट येईल. त्यांना म्हणावेसे वाटेल की, “दूर हो, हात लाऊ नको मला !” म्हणजे स्पर्शालाही मर्यादा आहेत.

‘इंद्रियार्थेषु’ म्हणजे दृष्टी, वास, स्पर्श, चव आणि श्रवण या सर्व ज्ञानेद्रीयांपासून मिळणाऱ्या ज्ञानापासून मनाला लांब नेणे. त्याबद्दल वैराग्याची भावना निर्माण होणे.

‘अनाहंकार इव च’ म्हणजे अहंकार रहित व्यक्तिमत्व. ‘मी ’, ‘मला’, ‘माझे’ या सर्वाचा त्याग करून रिक्त होणे. हा ‘मी ’ आपले वजन बरेच वाढवतो. या ना त्या प्रकारे ते चीकटतेच, जसे, ‘माझे घर’, ‘माझा देश’, ‘ माझी भाषा’, ‘माझा धर्म’.

लोक त्यांच्या धर्मासाठी जीव द्यायलाही तयार असतात. कां ? धर्मासाठी नाही तर ‘मी ’ साठी. मी हिंदू आहे, मी बौद्ध आहे, मी क्रिश्चन आहे किंवा मी मुस्लीम आहे या साठी. जेव्हा लोक मी ला चिकटून रहातात तेव्हा त्यांच्याकडून मूळ प्रश्नाबद्दल डोळे झाक केली जाते. या मी ला घालवून टाका आणि मुक्त व्हा. तुमच्यापासून अलग, मनाच्या मुक्त अवस्थेतून सगळ्या गोष्टींकडे बघा. असा मी जो अनाहंकारी आहे.

आपल्याला हे कळले पाहिजे की आपण आपल्याच बुटात अडकलेले आहोत. त्यां बुतातून तुमचे पाय बाहेर काढा आणि दुसरे बूट घालून बघा आणि मग तुम्हाला एक निराळेच जग पहायला मिळेल. भारतात संतांनी अशा गोष्टी केलेल्या आहेत.

मी मध्ये अडकून राहू नका. ‘माझाच धर्म श्रेष्ठ’ असे म्हणू नका. जर तुमच्या धर्मात काही त्रुटी असतील तर त्यां लक्षात घ्या. सर्व धर्मांकडे एकत्रितपणे बघा म्हणजे मग तुम्हाला प्रत्येक धर्मातील गुण आणि मर्यादा लक्षात येतील. जर तुम्ही ‘माझा धर्म ’ यातच अडकून राहिलात तर, ना तुम्हाला त्यातल्या उणीवा कळतील ना तुम्ही शांततेने जगू शकाल. त्यात तुमच्या मनाची विशालता किंवा मोठेपणाही दिसणार नाही. जर तुमच्यात मनाची विशालता निर्माण झाली नाही आणि मन संकुचित राहिले तर, तुमच्यात आत्म्याचे ज्ञान उदयास येणार नाही आणि तुम्हाला भक्तीचा अनुभवही येणार नाही की तुमचे व्यक्तिमत्व फुलून येणार नाही.

तुम्ही रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल ऐकले असेल. (१९ व्या शतकातील भारतातील एक महात्मा)त्यांनी निनिराळ्या धर्मांचा अनुभव घेतला. त्यांनी प्रत्येक धर्माचा तीन दिवसांसाठी स्वीकार केला आणि त्या त्या धर्मातील सर्व प्रथा पाळल्या व कर्मकांडे केली. याचा अर्थ प्रत्येकाने असेच करायला पाहिजे असे नाही.

मी जेव्हा ८-१० वर्षांचा होतो तेव्हा मी देखी चर्चमध्ये गेलो, पद्र्यांचे भाषण ऐकले आणि त्यांच्या प्रथा बघितल्या. मी माशिदीतही गेलो आणि मुस्लीम मौलवींकडून कुराण शिकलो. आमचे चांगले संबंध होते आणि आम्ही ज्ञानावर चर्चाही केल्या. बौद्ध लोकांशीही मी चर्चा केल्या आहेत, त्यांच्या पद्धती शिकलो आहे. आपण सर्व धर्मातील लोकांचे सुख दु:ख, यातना आणि भोग वाटून घेतले पाहिजे.

मी जेव्हा युरोप मध्ये जातो तेव्हा मी युरोपियानांसारखा रहातो. मी मंगोलियाला जातो तेव्हा तो मला स्वत:चाच देश वाटतो. त्याचप्रमाणे मी जेव्हा दक्षिण अमेरिकेत जातो तेव्हा ते मला आपले स्वत:चे असल्यासारखेच वाटते. मला त्यांच्या भाषेचे एकही अक्षर माहित नाही आणि त्यांना माझी भाषा येत नाही, तरीही एकीची भावना असते. तर, ही एकीची भावना ही अहंकार नसण्याची खून आहे. ‘अनाहंकार’. तो अहंकाराच्या अभावातून निर्माण होतो. अहंकार म्हणजे कोंडमाऱ्याची, संकुचीतपणाची भावना असते.

प्रश्न : गुरुदेव, एखाद्या परिस्थितीत मन अडकून रहाते तेव्हा ते पटकन त्यातून बाहेर येत नाही. या साठी काय करावे ?

श्री श्री: ठीक आहे, मन असेच असते. अशा वेळीच ज्ञान महत्वाचे असते. ज्ञान म्हणजे वादळात सुरक्षा जॅकेट धरून ठेवण्यासारखे आहे. म्हणूनच त्याला भावनांचे वादळ असे म्हणतात. प्राचीन लोकांनी भावनांची तुलना महासागराशी केली आहे आणि तुम्हाला हा सागर पोहून पार जायला शिकायला हवे. ज्ञान हे सुरक्षा जॅकेट आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही पोहून पोहून थकाल तेव्हा सुरक्षा जॅकेट घाला म्हणजे तुम्ही सुरक्षितपणे तीरावर पोहोचाल. 

कल्पना करा, जर ज्ञान तुमच्याबरोबर नसेल आणि तुम्ही एखाद्या संकटात अडकलात तर तुमची काय परिस्थिती होईल ? तुम्ही काय कराल ? जर तुम्ही कधीच ध्यान, प्राणायाम केले नसेल, कधीच ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्या नसतील आणि तुम्ही अशा एखाद्या एखाद्या प्रसंगात अडकलात की जिथे तुमचे मन एखाद्या मुलीत किंवा मुलात अडकले तर अशावेळी तुमच्या मनात काय काय झाले असते ? तुम्हाला वेड लागले असते. आभार माना की तुमच्याकडे निदान हे ज्ञान तरी आहे. ज्ञानच तुम्हाला सुरक्षितपणे तरून जायला मदत करेल.

उदाहरणार्थ, जर कुणी तुमचा अपमान केला तर ज्ञानाचा एक मुद्दा तुम्हाला आठवतो, ‘ दुसऱ्यांच्या मतांचा फुटबॉल बनू नका.’ हे आपोआप होते. कुठूनतरी तुमच्यात एक ज्ञानाचा किरण येतो आणि तुम्हाला वाचवतो आणि त्या प्रसंगातून वर उचलून धरतो. असे होते की नाही ? (प्रेक्षकातील बऱ्याच लोकांनी सहमती दर्शवली.)

बघा किती तरी लोकांना असा अनुभव आला आहे.
 ( एक भक्त : गुरुदेव, तुम्ही फक्त आशिर्वाद द्या)

होय, माझा आशिर्वाद कधी नसतो ? माझा आशीर्वाद नेहमीच असतो. पण तुम्ही जास्त मोठे भांडे घेऊन यायला हवे. तुम्ही एक लहानशी वाटी घेऊन येता आणि म्हणता, ‘मला दोन लिटर द्या.’ तुम्ही तुमचे भांडे मोठे करायला हवे म्हणजे मी दोन लिटरच्या ऐवजी चर लिटर देऊ शकेन. तुम्ही इतके लहान भांडे आणता की ज्यात दोन लिटर तर सोडाच, फक्त दहा मिली लिटर मावेल.

कृपा आणि आशिर्वाद यांची आपापली जागा असते. त्यांच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. तुम्हाला ते मिळत राहिलच पण आपल्यालाही आपले प्रयत्न करायला हवे. स्वीकारण्याची आपली कुवत आपल्याला वाढवायला हवी.

प्रश्न : एखाद्या लग्न झालेल्या माणसावर निरपेक्ष परम करणे चूक आहे कां ?

श्री श्री : ज्याच्यावर कुणीतरी निरपेक्ष प्रेम करत आहे अशा कुणाची तरी समजा तुम्ही पत्नी किंवा पती असाल तर तुम्हाला ते आवडेल ? हे प्रेम नाही ही तर भावनिक गुंतणूक आहे. त्यातून बाहेर या.

तुम्ही जिथे आहात तिथेच तुमच्यात ठाम आणि घट्ट रहा. दुसऱ्या कुणाचे तरी कुटुंब उध्वस्त करायला जाऊ नका. यातून बाहेर रहा.

जगात ७ कोटी लोक आहेत. त्यातले जवळ जवळ अर्धे अविवाहित आहेत. तुम्ही ज्याच्यात गुंतला आहात त्याच्यापेक्षा चांगली व्यक्ती तुम्हाला भेटेल.

जेव्हा तुम्ही भावनिकरीत्या गुंतता तेव्हा तुमच्या डोक्यात दुसरे काहीच येत नाही. तुम्ही एका बुडबुड्यात असता. तुम्ही तुमच्या स्वत:च्याच एका लहानशा विश्वात असता. विचार करता, बसता, बोलता, खाता, झोपता तुम्ही त्याच माणसाचा विचार करत राहता, तुम्हाला वेदाच लागते. हाच क्षण आहे जेव्हा तुम्ही हे लक्षात ठेवायला हवे की एक दिवस तुम्ही मरणार आहात. जेव्हा तुम्हाला मृत्यूची जाणीव होते तेव्हा अचानक हा मोह हा तुम्ही कुणात अडकल्याचा भास नाहीसा होतो. तुम्ही फक्त तुमच्या स्वत:च्या मृत्यूचा विचार करायचा. मृत्यूचे ज्ञान जीवनाला खूप गहिरे मजबूत पाया असलेले बनवते. नाही तर आपण असे जगतो की जणू काही आपण इथे कायमचेच रहाणार आहोत.

प्रश्न : भावनांपासून सुटका कशी करून घ्यायची ?

श्री श्री : प्रत्येक भावानांनाध्ये पक्केपणा असायला हवा. भावनांपासून सुटका करून घ्यायची गरज नाही. भावनांचे वर खाली होतच राहिल पण त्यातून तुम्ही कणखर बनायला हवे.

प्रश्न : गुरुदेव, जर नाकपुड्या, फुफ्फुसे, पोट, सगळे शरिर पोकळ आणि रिकामे आहे तर मग, मन मात्र विचारांनी भरलेले कां असते ? विचारांचा मूळ स्रोत काय आहे ?

श्री श्री : जेव्हा मन विचार करू लागते की ते पोकळ आणि रिकामे आहे तेव्हा ते पोकळ आणि रिकामे व्हायला लागते. तुम्ही तेच करताय.

प्रश्न : गुरुदेव, आज करवा चौथ आहे. ( एक प्राचीन उत्सव, ज्यात स्त्रीया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुआरोग्यासाठी प्रार्थना करतात.)

श्री श्री : होय, आज करवा चौथ आहे. तुम्ही चंद्र पाहिला आहेच. आता जाऊन जेवण करा. जरी तुम्हाला चंद्र दिसला नसला तरी काही हरकत नाही. अशी कल्पना करा की तुम्ही तुमच्यातच चंद्र पाहिला आहे आणि जाऊन जेवण करा.

आपल्या देशात या सगळ्या प्रथा आहेत. जसे भाऊ बीज ( या दिवशी बहिणी त्यांच्या भावांसाठी प्रार्थना करतात. आई त्यांच्यासाठी दीर्घायुष्य आणि सुआरोग्या चिंतितात.) आणि करवा चौथ. या उत्सवांनी आपले नातेसंबंध दृढ होतात. नातेसंबंधातील पावित्र्य राखण्यासाठी आपल्या देशात गेली अनेक वर्षे ही खास प्रथा पाळली जात आहे. करवा चौथ च्या दिवशी पत्नी पतीच्या सुखासाठी प्रार्थना आणि उपवास करते. आजकाल ती त्याच्या मनस्वास्थ्यासाठीही प्रार्थना करते.

देवाची प्रार्थना करण्याच्या प्रत्येक संधीचा आपण योग्य उपयोग करून घ्यायला हवा. ही अशीच एक संधी आहे. तुम्ही दिवसभर उपवास करता तेव्हा शरीराची शुद्धी होते, मनाची शुद्धी होते आणि तुम्ही प्रार्थना करू शकता. ही चांगली परंपरा आहे.

जे कुणी हा उपवास करतील त्यांनी निर्जळी उपवास करू नये. माझा निर्जळी उपावासावर विश्वास नाही. उपवसाबारोबरच थोडे पाणी पिण्याचीही गरज आहे. पाणी प्यायल्याने शरीरातील सर्व विषारी द्रव्ये (टॉकझिन्स) बाहेर फेकली जातात आणि शुद्धी होते.त्यामुळे उपवास करताना पाणी पिणे आवश्यक आहे.

तुम्हाला जर मधुमेह किंवा अशा काही शारीरिक व्याधी असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपवास करा.

पतीदेखील आपल्या पत्नीसाठी उपवास करू शकतात. काही पुरुषांनी करवा चौथ करायला सुरवात केलीही आहे. करत रहा, काही हरकत नाही.करायलाच हवे. हे दोन्ही बाजूनी गरजेचे आहे. केवळ एकतर्फी नाही.

प्राचीन शिकवणींचे सार

24
2013
May
हाँगकाँग, चीन

आज पौर्णिमा आहे, बुद्ध पौर्णिमा.  आजच्या दिवशीच बुद्धाचा जन्म झाला होता, आणि याच दिवशी त्याला साक्षात्कार झाला होता.

तुम्हाला घरच्यासारखे मोकळे वाटते आहे का? औपचारिकता आपल्याला एका लांबच्या पातळीवर ठेवतात, आणि सत्संग हे एक माध्यम आहे दिलखुलास एकत्र येण्याचे. मोकळेपणाने वावरा, घरच्याप्रमाणे राहा, पूर्णपणे आरामात, कोणतीही औपचारिकता ठेवू नका.

ज्याला आपण आयुष्य म्हणून समजतो ते एकदम इवलेसे सत्य वास्तव आहे. इथे प्रत्येक घटने मागे एक तरल जग दडलेले आहे, एक तरल स्तर ज्यामध्ये स्थूलतेपेक्षा जास्त शक्ती आहे.

आज, वैज्ञानिकांनीसुद्धा हे सिद्ध केले आहे, आणि ते समान निष्कर्षाला आले आहेत. जगात घडणाऱ्या घटना, ज्या आपण पाहतो, त्या जणू काही आधीपासून अभिलीखीतअसलेल्या सीडीप्रमाणे आहेत. तरल जगामध्ये सर्व गोष्टींना गहन अर्थ आहे, आणि आपण सर्वांना तरल शरीर आहेत. 

एक आहे स्थूल शरीर, आणि एक आहे तरल शरीर, आणि तरलतेच्या पलीकडे आहे नैमित्तिक शरीर, आणि नंतर आपण ज्या घटनेला वास्तव समजतो ते जग.

भौतिकशास्त्राचे फार मोठे प्राध्यापक असलेले जर्मनीचे प्राध्यापक डीहोरे माझ्याकडे बंगलोर आश्रमात आले आणि फार रोचक गोष्ट म्हणाले. ते म्हणाले, ‘गुरुदेव, मी गेले ४५ वर्षे पदार्थाचा अभ्यास केला केवळ हे शोधण्यास कि त्याला अस्तित्व नाही! म्हणून आज जेव्हा मी भाषण देतो तेव्हा लोकांना वाटते की मी बौद्ध किंवा इतर पूर्वेच्या तत्वज्ञानाविषयी बोलत आहे कारण मी म्हणतो की पदार्थाला अस्तित्व नाही, जे अस्तित्वात आहे त्या केवळ लहरी आहेत.’

ज्याला आपण पदार्थ समजतो तो वास्तवामध्ये पदार्थ नाही. पदार्थ इतर काही नसून केवळ लहरी आहेत. परिमाण भौतिक शास्त्र म्हणते की हे संपूर्ण विश्व आणखी काही नसून केवळ लहरींचे काम आहे. 

म्हणून प्राध्यापक डीहोरे म्हणतात की पदार्थाला अस्तित्व नाही, जे आपण पाहतो त्याला अस्तित्व नाही!

जर तुम्ही स्वतःचे शरीर पाहाल तर त्या संपूर्ण शरीराला एक काडेपेटीमध्ये बांधता येईल. तुमच्या शरीरातील सर्व काही आकुंचित होऊ शकते. तितकीच स्थूलता तुमच्या शरीरात आहे, बाकी सर्व काही पोकळ आणि रिक्त जागा आहे.

जर तुम्ही तुमच्या कातडीचा तुकडा सूक्ष्मदर्शिकेखाली धरला तर तो तुम्हाला मच्छरदाणीप्रमाणे दिसेल. त्यात बरीच रिकामी जागा दिसेल. आपल्या शरीराचा जवळजवळ ६० टक्के भाग हा पाण्याने बनलेला आहे, १५ टक्के वायू घटक आहे, आणि उरलेला ९० टक्के भाग हा अवकाश या घटकाने व्याप्त आहे. तर आपल्या शरीरात बाकी कशापेक्षा जास्त जागा आहे. तुमचे मन हे आकाशाप्रमाणे पूर्णपणे अवकाश आहे.

भगवान बुद्ध तीच गोष्ट म्हणाले, ‘सर्वकाही काहीही नाहीये!’

तुमचे शरीर काही नाही, तुमचे मन काही नाही, जे तुम्ही पाहत आहात ते काही नाही, मी काही नाही, तुम्ही काही नाही! खरी गोष्ट तर ही आहे की सर्व काही कंपने आहेत, केवळ लहरी. संपूर्ण विश्व हे केवळ लहरी आहेत.

अष्टावक्र गीतेच्या प्राचीन संहितेमध्ये, ‘तरंग फेन बुडबुडा ’ असे म्हटले आहे. संपूर्ण विश्व हे महासागराप्रमाणे आहे, आणि प्रत्येक व्यक्ती ही एका लाटेप्रमाणे आहे; लाटा उठतात आणि शांत होतात. त्याचप्रमाणे, हे सर्व शरीरे ८०, ९० वर्षांसाठी उठली आहेत आणि नंतर ती पुन्हा महासागरात परत जातील. पुन्हा उठतील आणि पुन्हा परतून जातील.

अब्जावधी वर्षांपासून हे विश्व अविरहित सुरु आहेत, आणि हे ६०,८०,किंवा १०० वर्षांचे आयुष्य काहीही नाही. ते या महासागरात एका लाटेप्रमाणे आहे. 

गेले कित्येक वर्षांपासून लाटा उठता आहेत आणि पुन्हा परतून पाण्यात जात आहेत.

जेव्हा तुम्ही जागे होता आणि हे काहीही नाही, सर्वकाही शून्य आहे हे तुमच्या लक्षात येते तेव्हा तुम्ही स्मितहास्य करता आणि त्यालाच निर्वाण म्हणतात! 

निर्वाण काय आहे? निर्वाणचा अर्थ आहे सर्वकाही शून्य आहे! जेव्हा तुमच्या हे लक्षात येते तेव्हा प्रचंड मुक्ती प्राप्त होते. प्राचीन शिकवणींचे हे सार आहे. हेच टाओ आहे, हेच वेदांत आहे, आणि हेच भगवान बुद्ध यांची शिकवण आहे.

आज बौद्ध पौर्णिमेच्या औचीत्यावर मला भगवान बुद्ध यांच्या जीवनवर थोडे बोलायला आवडेल. जेव्हा भगवान बुद्ध यांनी जगातील दुःखे बघितली तेव्हा ते म्हणाले, ‘जीवनाला काही अर्थ नाही. जर तुम्ही म्हातारेच होणार आहात, आणि तुम्ही मरणारच आहात तर मग जगण्यात काय अर्थ आहे!’

जेव्हा त्यांनी एक आजारी मनुष्य, एक मृत व्यक्ती आणि एक साधू पहिले तेव्हा त्यांनी त्यांचा राजवाडा सोडला आणि अनेक वर्षे बसून तपस्या केली.

त्यांना साक्षात्कार प्राप्त झाल्यानंतर सात दिवस त्यांनी एक शब्दसुद्धा उच्चारला नाही. देवदूत आणि तरल जगताचे देव हे काळजीत पडले. ते म्हणाले की भरपूर काळानंतर बुद्ध हे या ग्रहावर आले आहेत, ते काही का बोलत नाहीयेत?

बुद्ध म्हणाले, ‘ज्या लोकांना माहिती आहे,त्यांना माहित आहे, आणि ज्यांना माहिती नाही, त्यांना माझ्या सांगण्यानेसुद्धा समजणार नाही. ते पैसा कमावण्यात, नातेसंबंध टिकवण्यात,भांडण्यात, खाण्यात आणि झोपा काढण्यात इतके गर्क आहेत की माझ्या सांगण्याने त्यांच्या डोक्यात काहीही शिरणार नाही.’

म्हणून त्यांनी सात दिवस मौन ठेवले, आणि नंतर सर्व देवांनी बुद्ध यांच्याबरोबर युक्तिवाद केला की या लोकांपैकी काही लोक हे सीमारेषेवर आहेत. जर तुम्ही त्यांना सांगितले तर त्यांना ते समजेल! असे लोक आहेत ज्यांना थोडीफार कल्पना असते आणि ज्यांना खरोखर माहित करून घ्यावयाचे असते,त्यांच्यासाठी तरी तुम्ही बोला.

अशा प्रकारे भगवान बुद्ध हे बोलू लागले; सातव्या दिवसापासून.

पौर्णिमेनंतरच्या सातव्या दिवशी, भगवान बुद्ध बोलू लागले, आणि त्यांनी काय म्हटले असेल तर, ‘हे सर्व काही शून्य आहे!’

आदि शंकराचार्यांनीसुद्धा हेच म्हटले, ‘तुम्ही जे पाहता आहात ते इंद्रजाल आहे, ही माया आहे.’

मायाचा अर्थ आहे ते सर्व काही जे मोजता येते, आणि जे परीवर्तनशील आहे. ज्याच्या परिवर्तन होते ती माया  आहे. तुमच्या सभोवतीच्या सर्व गोष्टींमध्ये परिवर्तन येते, नाही का?

भगवान बुद्ध म्हणाले, ‘सर्व काही शून्य आहे.’

आदि शंकराचार्य हीच गोष्ट किंचित वेगळ्या प्रकारे म्हणाले. ते म्हणाले, ‘हे सर्व संपूर्ण ब्रह्म आहे, हे सर्व एक आहे.’

सर्वांचा मूळाधार ही एकच उर्जा आहे, एकच दिव्यता आहे. आपण जे पाहतो ते स्वप्नवत आहे. 

मला तुम्ही ताबडतोब एका गोष्टीची अनुभूती करून पाहिजे. जागे व्हा आणि या क्षणापर्यंत बघा, तुम्ही इथे येईपर्यंत पहा तुमच्या जीवनात गेल्या ३०,५० वर्षात काय काय घडले, ते तुम्हाला स्वप्नवत नाही का भासत?

तुमच्या मनाला पुढे आणि मागे घेऊन जा, हे मनाचे फास्ट फाँरवर्ड आणि रीवाइंड आहे. स्वतःचे मशीन हाताळण्यास शिका.

आता फास्ट फाँरवर्ड करा. तुम्ही इथे बसलेले आहात, तुम्ही घरी परत जाल, रात्रीचे जेवण जेवल आणि झोपी जाल. उद्या तुम्ही उठाल, दात घासाल आणि आपल्या कामाला लागाल. दुसरा दिवस येईल, तिसरा दिवस येईल आणि जून येईल. नंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, आणि नववर्षाची पार्टी होईल. हे सर्व निघून गेले! हे सर्व दिवस निघून जातील. हे स्वप्नवत नाही का भासत? मी इथे उभा आहे आणि तुमच्याबरोबर बोलत आहे, हे स्वप्न असू शकेल काय? तुम्हाला कसे माहिती की हे वास्तव आहे? हे स्वप्न असू शकते.

वर्तमान हे स्वप्न असू शकते, वर्तमानाला सवाल करा. भविष्य हे स्वप्नवत आहे. जर तुम्ही तुमचे लक्ष विस्थापित करू शकलात आणि वास्तव पाहू शकलात तर तुम्हाला याच्यावरचे दिसून येईल. याच्या वरती आणि याच्या पलीकडे काहीतरी आहे जे असते, जे फार सुंदर आहे, ते आहे स्वयं, हेच सत्य आहे. आणि तुम्हाला त्याच्यातून (स्वयंमधून) तुमच्या जीवनात इतकी अविश्वनीय शक्ती, अविश्वनीय उर्जा, अविश्वनीय प्रेम आणि सौंदर्य प्राप्त होईल के ते कशानेही ढळू शकणार नाही.

तुम्हाला काय करणे जरुरी आहे? तुम्हाला केवळ जागे होणे आणि बटण चालू जरुरी आहे. हे बटण बंद करा, आणि दुसरे बटण चालू करा.

तुम्ही त्रिमितीय चित्रे, ज्यामध्ये तुम्ही निरनिराळ्या कोनातून पहिले की वेगळेच काहीतरी दिसते, पहिली आहेत का? अशी चित्रे तुम्ही पहिली आहेत का? तुम्हाला हेच तर करणे जरुरी आहे. एका कोनातून तुम्हाला भिन्नातेचे जग आणि त्याची गुंतागुंत दिसेल, दुसऱ्या कोनातून तुम्ही एक निराळेच जग पाहाल, तुम्ही आता पाहत आहात त्यापेक्षा फार फार निराळे. आपल्याकडे बटण चालू व बंद करण्याची आणि दोन्हीची क्षमता पाहिजे. तेच तर अध्यात्म आहे, तीच शांतता आहे.

एका क्षणाकरिता जागे व्हा आणि पहा, हे सर्व एक स्वप्न आहे, आणि सगळे काही टाकून त्या. त्याच क्षणी तुम्ही वैश्विक उर्जा, ब्रह्म, ॐ, तुम्ही ज्यापासून बनेलेल आहात ते सत्य यांच्यासोबत जोडले जाता! 

तर, आपण जगत असलेल्या जीवनाच्या या निरनिराळ्या मिती आहेत.

जेव्हा तुम्हाला लोकांसोबत काम करायचे असते तेव्हा सर्व काही शून्य आहे हे तत्वज्ञान वापरू नका.तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकणार नाही! तसेच सर्व काही शून्य आहे हे लक्षात ठेवा. याने तुम्हाला आंतरिक शक्ती, अंतःस्फूर्तीची क्षमता,आनंद, समाधान, प्रेम आणि अनुकंपा प्राप्त होते. ही अजून एक पद्धत आहे. तर पद्धती बदलत राहा, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन कामावरून परत याल तेव्हा त्याच्यावर कृती करा!

प्रश्न : मला केवळ सांगा, मी तुमच्याकरिता काय करू शकतो, आणि मी ते करेन!

श्री श्री : आनंदी राहा आणि आनंद पसरवा.

मला तुम्ही ज्ञानामध्ये खोलवर गेलेलात पाहिजे, आणि जगाला देणाऱ्यांपैकी एक असा, आनंद, ज्ञान आणि विवेक उत्सर्जित करा. हे मला तुम्ही करून पाहिजे.

या ग्रहावर असलेल्या अब्जावधी लोकांपैकी,केवळ काही थोड्या लोकांनी जरी ज्ञान, प्रेम आणि आनंद उत्सर्जित केला तरी या ग्रहाचे फार भले होईल. हे असे भले होणे अतिशय जरुरी आहे.

या काळामध्ये या ग्रहाकरिता तुम्ही फार मौल्यवान आहात. सेवा गटाला जोडून घ्या, आणि काही सेवा करा.

प्रश्न : मनाला कसे काय नियंत्रित करावे?

श्री श्री : तुम्हाला मनाला कशाला नियंत्रित करायचे आहे? जिथे जास्त आनंद आणि मजा असते तिथेच मन धावते. त्याला सोडून द्या!

तुमच्या लक्षात येईल की खरा आनंद हा बाहेर नाहीये तर आत आहे. मन बाहेर सगळ्या दिशेने जाईल, आणि जेव्हा त्याला आनंद प्राप्त होणार नाही तेव्हा शेवटी ते आपणहून आतल्या दिशेने वळेल.

जिथे कुठे प्रेम असते तिथे तुम्हाला मनाला नियंत्रित करण्याची गरज पडत नाही. जिथे कुठे रस असेल तिथे मनाला नियंत्रित करण्याची गरज पडत नाही. आपल्या मुलाला प्रेम करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात का? नाही! मुलांकरिता असणारे प्रेम हे उस्फुर्त, नैसर्गिक असते. त्याचप्रमाणे, जेव्हा सगळे रिते भासू लागते तेव्हा मन उच्च ज्ञान, विवेक आणि उर्जा यांच्याकडे जाते. हे फार नैसर्गिक आहे.

प्रश्न : मन आणि हृदय हे एकाच प्रकारे कसे विचार करू लागतील?

श्री श्री : माझ्या लाडक्या, हृदय विचार करीत नाही, त्याला केवळ जाणवते! मन फक्त विचार करते, त्याला काहीही जाणवत नाही. त्यांना आपापल्या जागी राहू द्या. तुमचा व्यवसाय हा मनाने करा आणि तुमचे जीवन तुमच्या हृदयाबरोबर व्यतीत करा.

प्रश्न : एका व्यक्तीला जसे आहे तसे जीवनसाथी म्हणून कसे स्वीकारावे?

श्री श्री : मला याचा काही अनुभव नाही! मला वाटते की तुम्ही सभोवती पहिले तर तुम्हाला अनेक सल्ले देणारे भरपूर लोक असतील. त्यांना विचारा आणि पहा त्याने तुमचे काम बनते का ते!

अशाच ठिकाणी जीवनाच्या व्यावहारिक पैलूमध्ये वेदांत मदतीला येते. तुम्ही पाहाल तर संपूर्ण भूतकाळ निघून गेलेला आहे, ते एका स्वप्नासारखे होते, ते संपले आहे. निदान अतापुरते तरी, उत्साही व्हा! या क्षणी!

जीवनाच्या प्रत्येक क्षणात उत्साह निर्माण करणे हे तुमच्या हातात आहे. हे तुम्ही कसे काय करू शकाल? जर तुम्ही तुमच्या भूतकाळाला घट्ट धरून बसलात तर तुम्ही हे करू शकणार नाही. तुम्हाला तुमचा भूतकाळ केवळ झटकून टाकायचा आहे. त्याला सोडून द्या.

ठीक आहे, काल तुमच्याकडून चूक घडली, हरकत नाही. काही सुखद गोष्टी घडतात, काही अप्रिय गोष्टी घडतात, काही चांगल्या गोष्टी घडतात, काही वाईट गोष्टी घडतात. सगळय फेकून टाका!!

आता या क्षणी वातावरणात सकारात्मक उर्जा आणि उत्साह निर्माण करणे, आणि परिवारामध्ये अधिकाधिक प्रेम आहे हे बघणे हे तुमचे काम आहे. काय आपण सगळे हे करू शकतो? हे आहे ज्ञानामध्ये जीवन जगणे होय!

सहा महिन्यांनी किंवा वर्षभरानंतर जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर बसा आणि तासभर तक्रार करा आणि नंतर त्याबद्दल विसरून जा. पण रोज असे करू नका.

सतत चांगले असल्याचा देखावा करा असे मी म्हणत नाही. जीवन हा सर्व गोष्टींचा मिलाफ आहे, कधी भांडण, राग, आणि आनंद. जीवनाला विविध रंग असले पाहिजे; तुमच्या जीवनात सर्व रंग असणे जरुरी आहे, केवळ एकच रंगछटा नको.

तसेच, मनाच्या सर्व प्रकारच्या या फडफडण्यातून तुम्ही चुटकीसरशी बाहेर यायला पाहिजे, आणि हे ज्ञान तुम्हाला मदत करेल. रोज सकाळी उठा आणि म्हणा, ‘शिवोहं, मी आहे चैतन्य, पवित्र आणि सुंदर.’ 

तर, आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी, ‘सर्व काही शून्य आहे’, हा सुंदर संदेश आपल्यासोबत घेऊन जा. ‘अप्पो दीपो भाव’ ,याचा अर्थ आहे, तुम्ही स्वतःचा प्रकाश आहात.

तुम्ही प्रकाश आहात. तर आता आनंदाने घरी जा आणि झोपायच्या आधी हे सर्व ज्ञानाचे मुद्दे आठवा. ते तुमच्या सचेतन बुद्धीमध्ये काही वेळा आणणे चांगले असते.

पुढचे दोन दिवससुद्धा जर तुम्ही या ज्ञानाची उजळणी करीत राहिलात तर ते तुमच्यासोबत अधिक काळ टिकेल.

दोन गोष्टी आहेत. एक आहे श्रवण, याचा अर्थ आहे ऐकणे. दुसरे आहे मनन, याचा अर्थ आहे ज्ञान थोड्या अवधीकरिता तुमच्या मनात, तुमच्या सचेतन अवधानात आठवणे. दोन्ही महत्वाचे आहेत आणि दोन्हीमुळे बरीच मदत होईल.

तुम्हाला काय लक्षात ठेवणे जरुरी आहे की सर्व काही शून्य आहे, हे सर्व एक स्वप्न आहे. भूतकाळ स्वप्न आहे, भविष्यकाळ स्वप्न आहे, आता वर्तमान काळ स्वप्न आहे; जग हे स्वप्नवत आहे. आणि तुम्ही स्वतःचा प्रकाश आहात.

मानवी अस्तित्वाचे पाच कोष (वर्ल्ड कल्चर फोरम)

18
2013
May
हॅन्गझु, चीन

पर्यावरणाची आपण काळजी घेतली पाहिजे यावर आपण सगळे सहमत आहोत, परंतु हे शिक्षण ग्रामीण भागात, गावकऱ्यांपर्यंत, आणि शहरांमध्येसुद्धा पोहोचणे जरुरी आहे. आपल्याला लोकांना शिकवायला पाहिजे, जागरुकता आणली पाहिजे.

आज हव्यास आपल्या समाजाला पोखरतो आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, कुटुंबे उध्वस्त होत आहेत, आपण ज्या मानवतेला पुष्टी देतो ते नष्ट होत आहे. लोभाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला तद्भावीतेची भावना निर्माण करायला हवी. 

या संमेलनामध्ये तुमच्यापैकी अनेकांनी अध्यात्मिक मुल्ये, मानवतावाद, आणि मानवी मुल्ये यावर भाष्य केले त्याचा मला फार आनंद होत आहे. दहा वर्षापूर्वी, वीस वर्षापूर्वी याला मनाई होती. पर्यावरणवादी किंवा वैज्ञानिक परिषदेमध्ये प्रेमाबद्दल केवळ बोलणेसुद्धा असमर्पक मानले जायचे. आज आपल्या लक्षात येत आहे की आपल्याला समाजाला आनंदी करणे जरुरी आहे. केवळ उच्चतम स्थूल एत्तदेशीय उत्पादन (GDP) असणे पुरेसे नाही, आपल्याला उच्चतम स्थूल एत्तदेशीय आनंद (GDH-Gross Domestic Happiness) याची गरज आहे.

 आनंद निर्माण करण्यासाठी आपल्याला ती जागरुकता निर्माण करायला पाहिजे. भगवद्गीतेनुसार, भारताच्या पवित्र धर्मग्रंथानुसार,असे म्हणतात की निसर्ग हे आठ गोष्टीने किंवा विश्व हे आठ वस्तूने बनलेले आहे : पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश (अवकाश), मन, बुद्धी आणि चैतन्य.

आपण पृथ्वीची सुरक्षा केली पाहिजे. खाणींच्या नावाखाली आपण इतके सुरुंग लावता कामा नये. आपण आपल्या लोभावर नियंत्रण ठेवले पाहिजे, आणि ग्राहकवाद तेव्हाच नियंत्रणात येईल जेव्हा मानवतावाद फुलून येईल. जेव्हा तद्भावितेची भावना आपल्याला असेल तेव्हा या ग्रहाची काळजी घेणे अधिकाधिक महत्वाचे होईल. पृथ्वी हा जीव आहे. ती जीवंत आहे कारण ती अनेक जीवंत प्राण्यांना निवारा देते आहे.

संपूर्ण जगभरातील प्राचीन लोक पृथ्वी, नदी, पर्वत आणि वायू यांचा सन्मान करायचे. आपल्याला ही प्राचीन मुल्ये टिकवून ठेवायला पाहिजे आणि सर्वांच्या विकास आणि उत्कर्ष यासाठी आधुनिक दृष्टी ठेवली पाहिजे.

तणाव-रहित मन असणे हे जास्त महत्वाचे आहे. एक आहे पर्यावरणाचे प्रदूषण आपण निर्माण करतो, दुसरे आहे भावनिक प्रदूषण. जर कोणी उदास असेल तर तो त्याच्या खिन्नतेच्या लहरी त्याच्या सभोवती पसरवतो. संपूर्ण जग इतर काही नसून कंपने आहे, सर्व काही लहरी आहेत.

जगाकडे लहरी म्हणून पाहणे हा तो दृष्टीकोन आहे जो लोकांना आनंदात पाहण्याकरिता आपण वापरणे जरुरी आहे.

जगात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत चालेल आहे कारण आपण प्रेम, तद्भाविता, आणि अनुकंपा या शब्दांकडे लक्ष देत नाही आहोते. खिन्न होण्याचे एक अगदी सोप्पे सूत्र आहे: बसा आणि केवळ स्वतःबद्दल, ‘माझे काय? माझे काय? माझे काय?’ असे म्हणत विचार करीत राहा. हा उदास होण्याचा खात्रीचा मार्ग आहे.

जेव्हा आपण या ग्रहाची काळजी घेतो, जेव्हा आपण आपल्या सभोवतीच्या माणसांची काळजी घेतो, जेव्हा आपण आपला मदतीचा हात पुढे करतो आणि प्रत्येक गरजूसाठी उपलब्ध राहतो, तेव्हा उदासी आपल्या जीवनातून गायब होऊन जाते. असे शिक्षण किंवा अशी जागरुकता ही आजची निकडीची गरज बनली आहे कारण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अनुसार येत्या दशकात आत्महत्या हा सर्वात मोठा मारेकरी ठरणार आहे. 

कर्करोग हा आणखी एक आजार आहे. हा सर्व रोगांना तेव्हाच हाताळता येईल जेव्हा आपण आपल्या पृथ्वी ग्रहाची काळजी घेऊ, जेव्हा आपण आपल्या जलसंपदेची काळजी घेऊ, जेव्हा आपण आपल्या परिसरातील, पर्यावरणातील कंपनांची काळजी घेऊ. सगळीकडे इतके अनेक उंच टॉवर्स असल्यामुळे विद्युतचुंबकीय किरणोत्सर्ग हा पहिल्यापेक्षा अधिक जास्त आहे, आणि त्यामुळे अनेक शहरी भागांमध्ये आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

भारतामध्ये ‘झाड कापण्याआधी तुम्ही त्या झाडाकरून परवानगी घेणे जरुरी आहे.’ अशी एक प्राचीन म्हण आहे. झाड हे सजीव आहे हे या मागचे कारण आहे. तुम्ही त्या झाडाची पाच कलमे लावून मोठी करणार असे त्या झाडाला वाचन द्यावे लागते. तर आता मला झाड कापण्याची परवानगी द्या.

ही परंपरा फार काळापासून अस्तित्वात आहे. मला खात्री आहे की ही चीन (वेदांत ते त्सु बौद्ध धर्मापर्यंत चीन आणि भारत यांच्या समान परंपरा आहे.) इथेसुद्धा होती.

तर, संपूर्ण विश्व हे एक व्यक्तिगत भाग आहे, आणि आपण या विश्वाचा एक अविभाज्य घटक आहोत.

मानवी अस्तित्वाचे पाच कोष आहेत: पर्यावरण हा आपला एक कोष आहे, भौतिक शरीर हे आपला दुसरा भाग आहे, प्राण किंवा उर्जा तिसरा भाग आहे (चीनच्या परीभाषेनुसार चि; जेव्हा प्राण किंवा उर्जा जास्त असते तेव्हा उत्साह, सृजन असते. जेव्हा उर्जेची पातळी खालावते तेव्हाच खिन्नता, आत्महत्येचे विचार आणि निसर्ग व स्वतःला दुखावण्याचे विचार मनात घोळू लागतात.)

म्हणून हा प्राण असलेला भाग विकसित करणे अत्यावश्यक आहे. चौथा कोष आहे मन, जे महत्वाची भूमिका करते. पाचवे आहे चैतन्य, जे पर्यावरणाचे संरक्षण आणि मानव जातीचे जतन करणे यात महत्वाची भूमिका निभावते. 

थोडक्यात सांगायचे तर मी म्हणेन प्रदूषण-मुक्त पर्यावरण, आजार-मुक्त शरीर, गोंधळ-मुक्त मन, निरोधन-मुक्त बुद्धी, आघात-मुक्त स्मृती, आणि शोक-मुक्त आत्मा हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध अधिकार आहे.

स्व:ताला दुखावून घेवू नका.

15
2013
May
बंगलोर, भारत.

प्रश्न: गुरुदेव, जर माझा कुणी अपमान केला तर मी ते प्रेमाने स्वीकारतो, आणि मी त्याचा सूड घेत नाही. मी असे करून अन्याय करायला प्रेरणा तर देत नाही ना?

श्री श्री: हो, आपण अन्यायाला कधीही पाठिंबा देवू नये. तुम्ही त्यांना एकदा, दोनदा क्षमा करू शकता. पण जर ते वारंवार होत असेल, तर तुम्ही त्यांच्या विरुद्ध उभे राहून त्यांना जाणीव करून दिली पाहिजे की ते जे करत आहेत ते चुकीचे आणे आणि त्यांना योग्य मार्गावर आणले पाहिजे.

पण तुम्ही हे आनंदाने केले पाहिजे, तुम्हाला त्याचा त्रास होतो म्हणून नाही. जो कोणी चुकीचे करत आहे तो स्व:ताला हानी पोचवत आहे ना कि दुसऱ्याला. हे तुम्ही त्यांना जाणवून दिले पाहिजे.

लहान मुलांनी जर काही खोडी केली तर त्याची आई त्याला थोबाडीत मारते, का? कारण त्या मुलाने आईला धडक दिली किंवा आईचा अपमान झाला म्हणून नाही. तर त्या लहान मुलाच्या वाईट स्वभावामुळे तो स्व:ताला हानी करून घेत आहे, त्या कारणा साठी आई आपल्या मुलाला रागविते.

उदा: एक लहान मुलगा आपल्या आईच्या कुशीत बसतो, पण त्याच वेळी तो आईला लाथ मारतो. त्या वेळेस त्याच्या आईला काही वाटत नाही , उलट तिला बरे वाटते. पण त्याच मुलाने काही खोडी केली किंवा तो चाकू बरोबर खेळत असेल तर आई त्याला रागविते कारण त्या चाकूने मुलालाच इजा होईल म्हणून.

हे असे तुम्ही समजले पाहिजे.

प्रश्न: गुरुदेव, काल तुम्ही सांगितले कि जो कोणी समर्पण करतो, देव त्याचे काही वाईट करत नाही. रावण (रामायणातील लंके चा राजा), तो सुद्धा मोठा शिवभक्त होता, तरी पण त्याने दुष्कृत्य (भगवान श्री राम ची पत्नी सीतेच्या अपहरणाच्या संदर्भात) कसे केले?

श्री श्री: श्रीलंके मध्ये मला वाटते दुसरे रामायण वाचले जाते. त्याच्या प्रमाणे भगवान श्री रामाने मोठी चूक केली होती (वनवासा मध्ये आपल्या पत्नीला दुर्लक्षित केले होते).

हा प्रबोधनाचा भाग आहे. श्रीलंके मध्ये रामायण वेगळेच सांगितले जाते, रावण जो राजा असूनही त्याने सीतेचे अपहरण का केले.

रावणाची बहीण सुर्पन्खा हि श्री रामा कडे आकर्षित होवून त्याच्यावर प्रेम करीत होती. जेव्हा श्री रामा कडे येवून तिने तिचे मत मांडले, तेव्हा श्री रामाने तिचा अपमान करून तिला नाकारले. आणि एवढेच नाही तर लक्ष्मणाने (श्री रामाचे छोटे बंधुराज) तिचा उत्साहभंग करीत तिचे नाक कापून टाकले. आता राजाच्या बहिणीचे नाक कापून टाकणाऱ्या व्यक्तीला राजा कसे माफ करेल? कुठलाही राजा किंवा कोणताही मानव असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला माफ करणार नाही. कुणी हे सहन करू शकेल का? नाही, अशा प्रकारच्या गोष्टी सहन करणे म्हणजे एक प्रकारचा अपराधच आहे. म्हणून आपल्या बहिणीचा सन्मान राखण्यासाठी रावणाने सीतेचे अपहरण केले.

पण असे हि म्हटले जाते कि रावणाने सीतेला सन्मान पूर्वक वागणूक दिली होती.

जर रावण एवढा दुष्टच होता तर त्याने रामेश्वरम मध्ये श्री रामा साठी पूजा करण्यासाठी तयार झाला नसता. तुम्हा सर्वांना हि गोष्ट माहीत आहे का?

रावणा बरोबर च्या युद्धात श्री रामाला विजयी व्हायचे होते, आणि त्यासाठी त्यांना एका शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा करावयाची होती. आता हे करण्यासाठी एका पुजाऱ्या ची आवश्यकता होती, पण त्या काळात रामेश्वरम मध्ये पुजारी मिळणे कठीण होते. म्हणून हे विधी पार पाडण्यासाठी श्री रामाला एका चांगल्या पुजाऱ्या ची नितांत आवश्यकता होती.

रावण हा कट्टर शिवभक्त होता आणि जन्माने तो ब्राह्मण होता. म्हणून रावणाचा भाऊ विभीषण (जो श्री रामाच्या बाजूने होता) याने श्री रामाला सांगितले कि रावणाला या विधी करण्याचा अनुभव आहे. म्हणून श्री रामाने रावणाला ह्या पूजेसाठी आमंत्रण पाठविले. 

रावणाने आमंत्राणाचा स्वीकार करून तो पूजा करण्यास तयार झाला. पण तो श्री रामाला म्हणाला कि पूजा हि पत्नी शिवाय केल्यास ती अधुरी होईल. पत्नी शिवाय कुठलीही पूजा किवा यज्ञ हे करता येत नाही. रावण श्री रामाला म्हणाला, ‘तुम्ही विवाहित असल्याकारणाने, पूजेला सपत्नीक बसणे आवश्यक आहे अन्यथा हि पूजा होवू शकत नाही’.

श्री राम रावणाला म्हणाले, ‘अशा अडचणीतून पर्यायी मार्ग सांगण्याचे काम हे पुजाऱ्याचे असते. माझी पत्नी माझ्यापाशी नाही (त्या वेळेस सीता हि रावणाच्या कैदित होती), त्यामुळे यातून पर्यायी मार्ग कोणता मला कृपया सांगा. पत्नीच्या जागी तिची प्रतिमा ठेवली तर चालेल का?’

रावण म्हणाला, ‘पर्यायावर माझा विश्वास नाही. मला शिवलिंगाच्या पूजेच्या वेळी सर्व काही जागच्या जागी हवे आहे. म्हणून मी तुझ्या पत्नीला बोलावून घेतो आणि पूजा झाल्यावर तिला परत लंके मध्ये पाठवून दे’.

मग रावणाने सीतेला पूजेसाठी आणले. पूजा झाल्यावर श्री राम आणि सीता रावणाकडून आशिर्वाद घेण्यासाठी त्यांचे चरण स्पर्श केले, रावणाने आशिर्वाद दिला “विजयी भव”. हा आशीर्वाद देण्याशिवाय त्याच्या कडे दुसरा पर्याय नव्हता.

जेव्हा एखाद्याने पुजाऱ्याचे चरण स्पर्श केला तर पुजाऱ्याला आशिर्वाद देण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. म्हणून रावणाने श्री रामाला आशिर्वाद द्यावाच लागला ज्या साठी श्री रामाने पूजा आयोजित केली होती. दोघांना आशिर्वाद देवून, रावणाने सीतेला परत लंकेला नेले.

हि खूपच चित्तवेधक गोष्ट आहे. आपण नेहमी रावणाचा खलनायक म्हणून जाणले आहे, पण रावणा मध्ये हि काही चांगले सद्गुण होते. याच कारणामुळे जेव्हा रावण युद्धभूमी वर मृत्यू शय्येवर होता, श्री रामाने लक्ष्मणाला रावणाचे चरण स्पर्श करून सर्व ज्ञान प्राप्त करून घेण्यास सांगितले.

श्री राम म्हणाले, ‘मी जर रावणा जवळ गेलो तर तो शरीर सोडून देईल आणि त्याचा आत्मा माझ्या मध्ये विलीन होईल. ते होण्याआधी तू त्याच्या जवळ जा आणि जेवढे काही शिकता येईल ते शिकून घे’.

तुम्हाला माहीत आहे का, रावणाच्या नावाने पण गीता आहे? त्याचे नाव रावण गीता आहे.

पाच गीता ज्या अस्तित्वात आहेत त्या पैकीच हि एक. जसे तुम्हाला माहित आहे श्रीमद भगवत गीता, अष्टावक्र गीता, उद्धवा गीता आणि गुरु गीता; आणखी एक गीता आहे त्याचे नाव आहे रावण गीता. या मध्ये रावणाने लक्ष्मणाला धार्मिक प्रवचन दिले आहे. रावणाचे सर्व शिकवून झाल्यावर लक्ष्मणाने श्री रामाला इशारा केला. श्री राम रावणा जवळ येताच त्याच्या आत्म्याने एक तेजस्वी प्रकाशा प्रमाणे शरीर सोडले आणि श्री रामा मध्ये विलीन झाला. हि गोष्ट अध्यात्म रामायणा तील आहे. मी ती पूर्ण वाचली नाही, मी फक्त ही गोष्ट ऐकली आहे. पण तुम्ही सर्वांनी वाचली पाहिजे.

तुम्ही जेव्हा हे वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल कि कैकयी (दशरथाची पत्नी आणि श्री रामाच्या आई सारखी) हि किती थोर होती ती. आपण नेहमी विचार करतो कि ती खूप दुष्ट आणि कपटी होती. पण ते खरे नाही. ती वाईट स्त्री नव्हती. तिने श्री रामाला जंगलात वनवासाला पाठविले कारण श्री रामाला जायचे होते.

म्हणूनच म्हटले जाते, ‘सर्वम वासुदेवम इति’.

रावण आणी श्री राम हे दोघे हि वसुदेव आहेत (म्हणजे दोघेही एकाच ईश्वराचे अवतार आहेत).

प्रश्न: गुरुदेव, तुम्ही एका गोष्टींचा उल्लेख केला होता कि भगवान श्रीकृष्णाने गीते मध्ये म्हटले आहे कि, ‘मला तीन गुण शासित करू शकत नाही, आणि हे तीन गुण माझ्या मध्ये रहात देखील नाहीत’. हे समजण्यासाठी, कपडे परिधान केलेल्या व्यक्तीचे तुम्ही उदाहरण दिले होते. पण मी घातलेल्या कपड्याकडे पाहता असे वाटत नाही का कि कपडे म्हणजे मीच आहे?

श्री श्री: जे कपडे तुम्ही परिधान केले आहेत, त्या मध्ये तुम्ही असाल तर तुम्ही कपाटात देखील आहात आणि धुलाई यंत्र मध्ये देखील आहात. (प्रेक्षकां मध्ये हशा) 

कपडे धुतले जातात पण तुम्ही नाही. मग असे कसे म्हणता येईल कि तुम्ही कपड्या मध्ये आहात? या गोष्टीवर विचार आणि चिंतन करा.

जेव्हा तुम्ही परिधान केली कपडे बदलून बाजूला ठेवता, तुम्ही त्या कपड्यांमध्ये असता? कपड्यांबरोबर धुलाई यंत्र मध्ये तुम्ही जाता का?

हे तर्क शास्त्राने समजू शकत नाही. हे खूप सूक्ष्म आहे आणि त्याचा अनुभव घेतला पाहिजे. 

जे कपडे तुम्ही परिधान करता, कपडे तुमचेच आहेत, तरी पण तुम्ही त्या कपड्यांमध्ये नाहीत (मर्यादित किंवा शासित). हे स्पष्ट आहे.

म्हणून भगवान श्री कृष्णाने म्हटले आहे कि, ‘मी तिन्ही गुणात उपलब्ध आहे आणि ते माझेच आहेत तरी पण ते माझ्या मध्ये रहात नाहीत’.

हे बुद्धीने पूर्णपणे समजणे जवळ जवळ अशक्य आहे, पण तुम्ही हे अनुभवाने समजू शकाल.

हे पहा, सगळ्या उदाहरणांना एक निश्चित मर्यादा असते. उदाहरणांना जास्त ताणून त्याच्या मर्यादा बाहेर जावून अर्थ लावू नका. नाहीतर त्याचे महत्व जाते आणि आपली बुद्धी पण काम करत नाही. प्रत्येक उदाहरणातील अर्थ व्यक्त करण्यासाठी मर्यादित सामर्थ्य असते. आपण त्याच मर्यादेत त्याचा अर्थ समजला पाहिजे.

उदाहरण म्हणजे जी गोष्ट अकथित, अजाण आणि व्यक्त करण्या पलीकडे आहे ती दर्शविते. ते समजण्यासाठी तुमच्या बुद्धीला एक दिशा दिली जाते. म्हणून तुम्ही त्याच मर्यादेत तुम्ही समजले पाहिजे. तुम्हाला त्याचा अर्थ कळला कि शांत रहा आराम करा.

सखोल विश्रांती नंतरच तुमच्या मध्ये ज्ञानाची पहाट होते. सूक्ष्म गोष्टी तुम्हाला प्रयत्न केल्याने समजू शकत नाहीत.

प्रश्न: गुरुदेव, मी अज्ञानापासून मुक्त कसा होवू?

श्री श्री: तुम्हाला ज्या वेळेस उमजते कि तुम्ही अज्ञान आहात, त्याच क्षणी तुम्ही अज्ञानापासून मुक्त होता. एक अज्ञानी व्यक्ती स्व:ताला अज्ञानी कधीही समजत नाही. ज्या प्रमाणे तुम्ही झोपेतून उठल्यावर कळते कि तुम्ही झोपला होता, त्याच प्रमाणे एक व्यक्ती अज्ञानातून बाहेर पडल्यावर त्याला कळते कि तो अज्ञानी होता.

या ज्ञाना मध्ये खूप मधुरस आहे. आपण तासंतास या विषयावर चर्चा करू शकतो. आज रात्री साठी मी तुम्हाला एक अभ्यास देणार आहे.

‘सर्वम वासुदेवम इति’, लक्षात ठेवा कि तुमच्या अवतीभोवती च्या सर्व गोष्टी वासुदेव (एक प्रकारचा आकार) आहे. तुमच्या मध्ये कितीही श्रद्धा असो ती वासुदेव च्या कृपा दृष्टीनेच आली आहे.

प्रश्न: गुरुदेव, अष्टदा प्रकृती ( ईश्वराच्या आठ उर्जा शक्ती संदर्भात - पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, आणि अहं) मध्ये अहं गणला आहे पण चित्त (स्मृती) नाही. हे असे का?

श्री श्री: तुम्ही गणनांक करू शकता!

वेगवेगळ्या ऋषींनी वेगवेगळ्या तत्वांचे स्पष्ट वर्णन केले आहे आणि अस्तित्वाच्या विविध स्तरांना समजण्याचे मार्ग दाखविले आहेत. तुम्ही मन, बुद्धी आणि अहं यांना स्मृतीचे विस्तार रूप म्हणून पहा. हे चार चेतनेचे केवळ कार्य किंवा स्वभाव आहेत. हे काही घटना पुरतेच मर्यादित आहेत असा गैरसमज करून घेवू नका. हे एकाच चेतनेचे चार वेगवेगळे शब्द प्रयोग आहेत.

काही शाळांमध्ये फक्त तीनच मोजले जातात, चार नाही. त्यांना वाटते स्मृती हा मनाचा किंवा बुद्धीचा अविभाज्य भाग आहे म्हणून तो वेगळा मोजला जात नाही.

प्रश्न: गुरुदेव, तुम्ही सांगितले आहे कि आपली जीवनामध्ये जी काही भूमिका आहे ती आपण १००% देवून पार पाडली पाहिजे. पण आपली भूमिका काय आहे हे कसे कळेल?

श्री श्री: आता तुमची जी काही भूमिका आहे, तीच आहे समजा! (प्रेक्षकांमध्ये हशा). 

प्रत्येक मनुष्य जीवनात वेगवेगळे भूमिका बजावतो. तुम्हाला जीवनात जी काही भूमिका मिळाली आहे तीच करा. काहीजण माता, पिता, पती, पत्नी असे वेगवेगळया भूमिका बजावतो.

समाजाचे चांगले नागरिक म्हणून तुम्ही भूमिका पार पाडा. तुम्ही बुद्धिमान व्यक्ती आहात किंवा एक भक्त किंवा गुरु, तुम्हाला जी काही भूमिका मिळाली आहे ती तुम्ही निर्भयपणे पार पाडा. त्या साठी काही करावे लागले तर ते करायला घाबरू नका.

प्रचंड सामर्थ्याचे गुपित

11
2013
May
बंगलोर, भारत

नंतर येतात पुढचे दोन श्लोक, ‘बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् I बुद्धीर्बुद्धीमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् II बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् I धर्माविरूद्धो भूतेषु कामोsस्मि भरतर्षभ II’ (७.१० व ७.११)

प्रत्येकामध्ये बीज उपस्थित आहे. या जगात येणारा प्रत्येक मनुष्य आपल्या सोबत काहीतरी ( गुण किंवा देणगी) घेऊन येतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये हे काही उपजत गुण (बीज) असतात जे बदलत नाहीत.

अनेक वेळा तुम्ही शिक्षकांना, ‘विद्यार्थ्यामध्ये हा गुण जर केवळ विकसित होऊ शकला तर बरे’ असे म्हणताना ऐकले असेल.

तुम्ही त्याच गोष्टीचा केवळ विकास करू शकता ज्याचे बीज तुमच्या आत असते. जर सुरुवातीपासूनच काही नसेल तर मग तुम्ही ते गुण कसे काय विकसित करणार?

म्हणून भगवान कृष्ण म्हणतो, ‘अनादी काळापासून प्रत्येक जीवामध्ये (जिवंत प्राण्यामध्ये) बीज हजर आहे आणि हे काही नवीन नाहीये. त्याला कोणता आरंभ नाही आणि ते कधी पेरल्या गेले हे कोणालाही माहिती नाही. मीच हे बीज आहे जे सर्व जिवंत प्राण्यांमध्ये (भूतानां) उपस्थित आहे. हे तू जाणून घे कारण प्रत्येक जिवंत प्राणी, प्रत्येक जीवजंतू या सर्वांच्या आत एक बीज अस्तित्वात आहे. ज्याप्रमाणे अनादी काळापासून हे बीज उपस्थित आहे त्याप्रमाणे अनादी काळापासून हे सर्व जीव  अस्तित्वात आहेत.

तीन गोष्टी आहेत आहेत ज्यांना अनादी (आरंभ रहित) आणि अनंत (शेवट नसलेले) आहेत असे मानतात. 

एक आहे ईश्वर, दुसरा जीव (इथे वैयक्तिक आत्मा किंवा चैतन्य या अर्थाने). आणि तिसरा आहे प्रकृती (सृष्टी). 

अनादी काळापासून अपरा-प्रकृती अस्तित्वात आहे. हे ईश्वर आणि जीव  यांच्याबाबतीतसुद्धा लागू आहे. तर निर्मिती ही वर्तुळाप्रमाणे (वृत्त); वर्तुळाला न आरंभ असतो आणि न अंत, आणि तरीसुद्धा प्रत्येक बिंदू हा सुरुवात आणि शेवट दोन्हीही असतो. 

भगवान कृष्ण पुढे अजून समजावतो, ‘हे अर्जुना, जर तुम कोणी बुद्धिमान व्यक्तीला पाहिलेस तर असे समजू नकोस की त्या व्यक्तीने तिचे बुद्धिमत्ता आपणहून कमावली आहे. बुद्धीमंतातील बुद्धीमानता मी आहे.’

भगवानाने ही अतिशय चलाख गोष्ट केली होती. जिथे कुठे मन अडकून पडते किंवा आकर्षित होते तिथे भगवान कृष्ण अर्जुनाच्या मनाला त्या सर्व जागेमधून काढून पुनःपुन्हा त्याच्यावर केंद्रित करण्यास भाग पडतो.

बुद्धिमान लोकांचा आपल्यावर फार प्रभाव पडतो. आपण विचार करतो, ‘हा माणूस किती बुद्धिमान आहे. त्याची बुद्धी किती कुशाग्र आहे आणि त्याला किती ज्ञान आहे’. अश्या प्रकारे आपण त्याची स्तुती करू लागतो. मनाला परत आणण्यासाठी म्हणून भगवान कृष्ण म्हणतो, ‘जिथे कुठे तुम्हाला अशी तळपती बुद्धीमानता दिसून येईल तेव्हा ती मी आहे हे जाणून घे. तो केवळ माझ्या एकट्याचा अविष्कार आहे.’ 

असे म्हणून तो मनाला परत आणून त्याच्यावर केंद्रित करतो. याचा अर्थ असा की जेव्हा कधी तुम्ही कुशाग्र बुद्धी पाहता तेव्हा ती कृष्ण आहे आणि ती कृष्णाकडूनच आलेली आहे हे लक्षात घ्या.जेव्हा तुम्ही हे लक्षात घेता तेव्हा तुमचे मन इतरत्र कुठेही भटकू शकत नाही (कारण कुठेही मन गेले तरी त्याला कृष्णाचे रूप गवसेल आणि अशा तऱ्हेने ते केंद्रित राहील).

त्याचप्रमाणे तो म्हणतो, ‘सामार्थ्यावानांमध्ये मी तेजस (प्रभा किंवा उज्ज्वालता) आहे. कोणाच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसणारा मी तजेला आहे. लालसेचा परिणाम न होणाऱ्या व्यक्तीमधील मी धैर्य आहे.’ द्वेष आणि तिरस्कार यापासून एखाद्याला शक्ती मिळू शकते. असे लोक अतिशय भक्कम दिसतात. परंतु मी ते नाही. अतिरेकी आणि हिंसक लोक द्वेषातून प्रचंड शक्ती कमावताना दिसतात. परंतु भगवान कृष्ण म्हणतो, ‘(नकारात्मकतेतून मिळणारी) ती शक्ती मी नाही.’

अतिरेकी इतके क्षोभित होऊन चालतात. ते दुसऱ्यांना घाबरवतात आणि आपल्या शक्तीचे प्रदर्शन करतात. परंतु अशी शक्ती काम  आणि क्रोध  रहित नसते. जिथे लालसा असते तिथे तिरस्कारसुद्धा असतो. जे लालसेपोटी शक्ती प्रदर्शन करतात ते मूर्ख आहेत.

तसेच, उद्विग्नतेची भावना असणारे लोकासुद्धा कमालीची शक्ती प्रदर्शित करतात. आजकल जगामध्ये हे नेहमीच दिसून येते. उद्विग्नेतेची भावना असणारे लोक स्वतःला अतिशय भक्कम दाखवितात, परंतु अशी शक्ती काहीही उपयोगाची नाही.

क्षोभित इच्छांमुळे येणारी शक्ती हे वरकरणी असते, केवळ वरवरची. ही शक्ती आतून पोकळ असते. अशा माणसांच्या मनात खोल भीती दडून असते. आणि आतून भीती असणारे भक्कम कधीच असू शकत नाही.

आपल्या स्वतःच्या चैतन्यासोबत जो जोडलेला नसतो तो कधीही भक्कम होऊ शकत नाही. जी व्यक्ती आपल्या स्वतःच्या केंद्रस्थानासोबत जोडलेली नाही आणि स्वतःच्या अस्तित्वाविषयी जागरूक नाही, अश्या व्यक्तीने बाहेर कितीही जरी मोठे शक्ती प्रदर्शन तरी आतून ती व्यक्ती भीतीने पोकळ असते.

तसेच तिरस्कार आणि राक्षसी वृत्तीने येणारी शक्ती हीसुद्धा आतून पोकळ असते.

‘द्वितीय द्वै भयं भवती’ अशी एक म्हण आहे. याचा अर्थ दोनचे अस्तित्व  (इथे द्वंद्व या अर्थाने; म्हणजे स्वतःसोबत संयुक्त न झालेला हा अर्थ अभिप्रेत आहे) हे भयाचे कारण आहे.

जे लोक स्वतःच्या चैतन्याबरोबर संयुक्त झालेले नाहीत (अंतर्मुखी) आणि आतल्या दिशेने स्वयंकडे वळलेले नाहीत, अशा लोकांना कधीच भक्कम म्हणता येणार नाही. आणि जेव्हा एखादा लालसा आणि क्षोभाने युक्त असतो तेव्हा त्यांना आतल्या दिशेने जाऊन स्वयंसोबत संयुक्त होता येत नाही.

जेव्हा एक व्यक्ती स्वतःच्या आत केंद्रित होते तेव्हा प्रचंड शक्ती उदय पावते. अशी शक्ती लालसा आणि क्षोभ यांच्या नकारात्मकतेपासून मुक्त असते आणि त्यांच्या पलीकडे असते. केवळ तीच खरी शक्ती आहे. 

म्हणूनच भगवान कृष्ण म्हणतो, ‘जिथे कुठे तुम्हाला अशी निव्वळ शक्ती दिसेल तिथे मी आहे हे जाणून घ्या.’ 

आता तुम्ही विचाराल, ‘भगवान कृष्णाने सांगितले की जेव्हा आपण लालसा आणि क्षोभ यापासून मुक्त असतो तेव्हा महान शक्ती येते. याचा अर्थ असा की सर्व इच्छा वाईट आहेत? इच्छा असणे चुकीचे आहे, किंवा सर्वांचे कल्याण होवो ही इच्छासुद्धा चुकीची आहे? याचा अर्थ असा झाला का की एखाद्याला काहीसुद्धा इच्छा आकांक्षा असू नये?’ नाही, असे नाहीये. 

भगवान कृष्ण म्हणतो, ‘धर्माच्या विरुद्ध न जाणाऱ्या (कर्तव्याचे सदाचरण) सर्व इच्छा आकांक्षा मी आहे. जे सर्व लोक धर्मानुसार वागतात आणि आपल्या स्वधर्माचे (आपली जबाबदारी असलेल्या आपल्या कर्तव्याचे) पालन करतात, अशा लोकांमध्ये उद्भवणारी इच्छा ही मी आणि केवळ मीच आहे.’

तुम्ही हे अनुभवले असेल: अशा प्रसंगी जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयात उठणाऱ्या इच्छेनुसार वागता तेव्हा तुम्हाला जाणवते की तुमची आणि इतरांची उन्नती झाली आहे. सगळ्यांचा त्याने फायदा झाला आहे. अशा इच्छा या देवाचा अविष्कार असतात.

जेव्हा आपण धर्मानुसार वागतो तेव्हा आपल्या हातून कोणतीही चूक घडू शकत नाही. तसेच धर्मासोबत इच्छासुद्धा निर्माण होतात. परंतु अशा इच्छा या स्वभावाने दैवी (दैवी इच्छाशक्तीने प्रेरित) असतात.

म्हणूनच ‘तन्मेया मनः शिव-संकल्पमस्तु’  (सर्वांचे कल्याण करणाऱ्या इच्छा माझ्या मनात येवो) असे वेदांमध्ये म्हटलेले आहे. सर्वांचे भले करणाऱ्या पवित्र इच्छा माझ्या मनात येवो. मला सत्यकडे नेणाऱ्या आणि जे काही मंगल आहे त्या सर्वांकडे घेऊन जाणाऱ्या इच्छा माझ्या मनात येवो.

आता, सत्य जाणण्याची इच्छासुद्धा एक इच्छा आहे. जर आपल्याला आयुष्यात प्रगती होऊन पाहिजे असेल तर तीसुद्धा एक इच्छा आहे. सर्वांचे भले होण्याची इच्छासुद्धा पुन्हा एक इच्छा आहे. (सर्वांच्या) अभीष्टचिंतनाशिवाय तुम्ही सण साजरे करूच शकत नाही.

तुम्ही तुमच्या जीवनात इच्छेशिवाय एक पाऊलसुद्धा उचलू शकत नाही. जीवनात तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कृती मागे इच्छा असतात. आयुष्यात तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कृती मागे कारण असते, आणि ते कारण आहे इच्छा. तर मग कोणत्याप्रकारची इच्छा असायला पाहिजे? अशी इच्छा जी धर्माच्या विरोधात नाही तर धर्माला अनुसरून आहे. म्हणून भगवान कृष्ण म्हणतो, ‘मी धर्माला अनुसरून असलेल्या सर्व इच्छा आहे.’

तुम्ही सर्वांनी कधीतरी हे अनुभवले असेल, जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वागलात आणि त्याचा निकाल तुम्हाला पाहिजे तसा लागला, आणि अनेक लोकांना तुमच्या या कृतीने दिलासा मिळाला. अशा काही इच्छा आहेत ज्या तुमच्यात निर्माण होतात,जेव्हा तुम्ही त्यानुसार कृती करता तेव्हा त्याने तुम्हाला आणि सभोवतीच्या सर्वाना शांतता आणि आराम मिळतो. अशा इच्छा मनात कोणताही कलह निर्माण करीत नाही आणि त्या धर्माच्या विरुद्ध नसतात.

धर्माच्या विरुद्ध असणारी तुमची कोणतीही कृती तुम्हाला मनात टोचण देईल. ती तुम्हाला आतून त्रास देत राहील आणि तुम्हाला वाटेल, ‘अरे, मला वाटते की मी काहीतरी खरोखर चुकीचे केले आहे’. तुमची सदसद्विवेकबुद्धी तुम्हाला हे सांगेल. परंतु जेव्हा तुमची कृती धर्माला अनुसरून असेल तेव्हा तुम्हाला शांत आणि शिथिल वाटेल.

ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्र्च ये I मत्त एवेति तान्विध्दि न त्वहं तेषु ते मयि II’ (७.१२)

भगवान कृष्ण म्हणतो, ‘हे अर्जुना, तीन गुण, सत्त्व, राजस आणि तमस हे माझ्यातून निर्माण झालेले आहेत. परंतु ना मी त्यांच्यात आहे आणि ना ते माझ्यात, तरीसुद्धा ते सर्व माझ्यापासून निर्माण झालेले आहेत. हे तू जाणून घे.’

हे अतिशय विचित्र वाक्य आहे. भगवान कृष्ण म्हणतो, ‘मी त्रिगुणाने नियंत्रित नाही आणि त्रिगुण माझ्यामध्ये निवाससुद्धा करीत नाही, तरीसुद्धा ते माझ्यापासून अस्तित्वात आले आहेत.’

यामागे मोठे वैज्ञानिक सत्य दडले आहे. जेव्हा तुम्ही हे समजून घेण्यास खोलवर जाता तेव्हा तुम्हाला लक्षात येते की जेव्हा तुम्ही त्रिगुणांच्या खेळाचे साक्षीदार होता तेव्हा तुम्ही त्या सर्वांपासून विभक्त होता. 

म्हणून तो म्हणतो, ‘ जरी ते (त्रिगुण) माझ्यापासून वेगळे आहेत, तरी ते माझाच विस्तार आहे.’

मी माझ्या शरीरावर कापड घेतले आहे पण मी ते कापड नाही आणि मी त्या कापडाचा भागसुद्धा नाही. हे समजण्यास हे उदाहरण सर्वात जवळचे आहे.

जसे आपण आपल्या अंगावर कपडे घालतो, पण आपण आपले कपडे बनत नाही आणि ना आपण त्या कपड्यांचा भाग बनतो, तरीसुद्धा ते आपल्या मालकीचे असतात. तुम्हाला हे समजले का?

भगवान कृष्ण म्हणतो, ‘तो मी आहे ज्याने त्रिगुण (कपडा) निर्माण केला, आणि ते माझ्या मालकीचे आहेत, तरीसुद्धा मी त्यांनी प्रभावित नाही आणि ना ते माझ्यामध्ये निवास करतात आणि मीसुद्धा ते त्रिगुण नाही. म्हणून, हे धनंजय (अर्जुनाचे आणिक एक नाव ज्याचा अर्थ आहे महान संपदेचा जेता), तूसुद्धा त्रिगुणांचा साक्षीदार बन. ते माझ्या दैवी स्वभावाचा एक भाग आहे हे तू समजून घे. ते मी निर्माण केले आहेत आणि तो मीच आहे जो त्यांना कायम ठेवून आहे, आणि तरीसुद्धा मी हे त्रिगुण नाही.’

ज्याप्रमाणे तुमच्या शरीराच्या वेगवेळ्या भागासाठी निरनिराळे कपडे असतात, पायांसाठी चप्पल-बूट असतात, शरीरासाठी आतले आणि बाहेरचे कपडे, फेटा-टोपी डोक्यासाठी, त्याचप्रमाणे सर्व गुणांचे निराळे गुणधर्म असतात.

आता जर तुम्ही तुमचा फेटा काढून पायाला घातला, किंवा हातमोजे जर तुम्ही पायात घातले आणि पायमोजे हातात घातले तर त्याने काम बनणार नाही. प्रत्येक कपड्याची स्वतःची ठरलेली जागा आहे आणि त्या जागेव्यतिरिक्त ते इतर कुठेही घालता येत नाही.

म्हणून भगवान कृष्ण म्हणतो, ‘या प्रत्येक त्रिगुणांचे स्वतःचे निरनिराळे गुणधर्म आहेत आणि त्यांची स्वतःची ठरलेली एक विशिष्ट जागा आहे, आणि ते सर्व माझ्यापासून आलेले आहेत, आणि तरीसुद्धा मी ते नाही. म्हणून मला त्यांच्यात शोधायला जाऊ नको,कारण मी त्यांच्या पलीकडे आहे.’ 

तुम्हाला कळते आहे का की भगवान कृष्ण इथे काय करण्याचा प्रयत्न करीत आहे? अर्जुनाचे मन ज्या ठिकाणी आकर्षित होण्याची शक्यता आहे तिथून तो परत आणतो आहे, आणि अर्जुनाला कृष्णावर लक्ष केंद्रित करायला लावतो आहे. म्हणून यामध्ये ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीचा सहभाग आहे, आणि या संभाषणाचे हेच वैशिष्ट्य आहे.

तर हे विशेष ज्ञान वापरून भगवान कृष्ण वारंवार अर्जुनाच्या मनाला ते जिथे कुठे आकर्षित झाले आहे तिथून त्याला परत आणून अर्जुनाला कृष्णाकडे लक्ष केंद्रित करायला लावतो आहे. याचा अर्थ असा की तो मनाला अतंर्मुख करायला लावून चैतन्याकडे ध्यान केंद्रित करायला लावतो आहे. हे काम गुरुचे आहे आणि शिष्याची जबाबदारी आहे. 

म्हणून जिथे कुठे प्रचंड शक्ती दिसून येते तिथे ती देवाची आहे आणि जो व्यक्ती ती प्रदर्शित करतो आहे त्याची ती नाही हे ओळखा. जिथे कुठे एखाद्याला सौंदर्य दिसून येते, तर ते सौंदर्य त्या व्यक्तीचे असा विचार करू नका तर त्या सौंदर्य मागे देवाचा हात आहे. देवाच्या शिवाय कोणतेही सौंदर्य असू शकत नाही. म्हणून तर, ‘सत्यं शिवं सुन्दरं’ असे म्हटले आहे. याचा अर्थ असा की जिथे कुठे भगवान शिव आहेत तिथे तिथे सौंदर्य आणि सत्य आहे.

 तर असे म्हणून भगवान कृष्ण अर्जुनाच्या मनाला सर्व प्रकारच्या आकर्षणांपासून मुक्त करतो आणि त्याला स्वतःकडे ओढून घेतो.

कृष्णाचा  अर्थ आहे आकर्षण; म्हणजे असा जो सर्वकाही स्वतःकडे आकर्षित करून घेतो. सर्व प्रकारच्या बाह्य आकर्षणांकडे भटकणाची शक्यता असणाऱ्या जागांपासून मनाला मुक्त करणे आणि त्याला केंद्रित करणे- हेच काय ते भगवान कृष्ण आहे.

म्हणून जेव्हा तुम्हाला कोणी तेज-पुंजाप्रमाणे  (चेहऱ्यावरअध्यात्मिक तेज दिसणे) चमकताना दिसेल तेव्हा ते भगवान कृष्णाच्या गहिऱ्या प्रेमात बुडालेले आहेत हे लक्षात घ्या, म्हणूनच ते सर्वांना स्वतःकडे आकर्षित करून घेत आहेत. याचा अर्थ त्रिगुणांमुळे भिन्नता वाटणाऱ्या या जगाकडे धावणाऱ्या मनाला आत ओढून घेणे आणि त्याला आतील चैतन्याकडे माघारी आणणे. 

ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पायरी आहे आणि आश्चर्यकारक विज्ञान.

तुमचा वास्तविक स्वभाव

11
2013
May
बंगलोर, भारत


समग्र निर्मिती ही दोन प्रकारच्या प्रकृतीने बनलेली आहे : परा-प्रकृती आणि अपरा-प्रकृती. अपरा-प्रकृती  ही आठ प्रकारची आहे परंतु परा-प्रकृती, ज्यामध्ये समस्त कायम आहे,अशी परा-प्रकृती  ही केवळ एकाच प्रकारची आहे.

सहाव्या अध्यायात भगवान कृष्ण म्हणतो ,’ एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय I अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा II’ (७.६)

तर, भगवान कृष्ण म्हणतो,’ही समग्र सृष्टी ही अपरा-प्रकृती  आणि परा-प्रकृती  या दोन्हीने बनलेली आहे, आणि या दोन्हीचा जन्म माझ्यामधूनच झालेला आहे. त्यांच्या निर्मितीचे मी कारण आहे आणि त्यांच्या नाशाचेसुद्धा मी कारण आहे, आणि ते सगळे माझ्यामध्येच निवास करून आहे. हे तू जाणून घे.’ 

ते ज्यापासून सगळे निर्माण झालेले आहे तो देव आहे.

आता तुम्ही मला विचाराल, ‘मग देव कुठून आला?’

जर तो कोणत्या उगमापासून निर्माण झाला आहे तर तो देव नाही. मग तो उगम जिथून तो निर्माण झाला तो देव आहे.

नेहमी लोक मला विचारतात, ‘देवाला कोणी जन्म दिला?’

जन्म घेणारा कोणी देव कसे काय होऊ शकतो? निर्मितीमधील प्रत्येक गोष्ट ज्यापासून जन्म घेते, आणि सर्वात शेवटी ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट विलीन होते ते देव आहे. 

हे ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की देव म्हणजे काहीतरी किंवा कोणीतरी असे जे तुमच्यापासून अतिशय दूर आहे; कोणीतरी ज्याच्यापासून सगळी निर्मिती निर्माण झाली आहे. नाही, तो दूरवर नाहीये. म्हणूनच भगवान कृष्ण म्हणतो,’मला आणि फक्त मला (सगळे काही ज्यातून निर्माण झाले आणि ज्यामध्ये सगळे काही विलीन होणार आहे अशा सर्वांचे मूळ असलेल्या मला) जाणून घे.’

हे ‘मी’ व ‘माझे’ जे प्रत्येकामध्येच असते, ते चैतन्य ( स्वयं किंवा बोधावास्था ) आहे. आणि सर्व काही या चैतन्यातून निर्मान्र झाले आहे, आणि सर्वात शेवटी सगळे काही या चैतन्यामध्ये विलीन होणार आहे. चैतन्य हा जीवनाचा पाया आहे. 

हे शरीर जिवंत आहे याचे कारण आहे चैतन्याची उपस्थिती. जेव्हा चैतन्य देहाला सोडून जाते तेव्हा जीवन संपुष्टात येते.

म्हणून भगवान कृष्ण म्हणतो, ‘मला प्रत्येक जिवामध्ये अस्तित्वात असलेली चेतना म्हणून जाणून घे. ती चेतना जी सर्व गोष्टीचा आधार आहे आणि जी समग्र निर्मितीला कायम ठेवून आहे. सर्व गोष्टींचे मी आद्य कारण आहे.’

तर, चैतन्य हे सर्व गोष्टींचा आधार आहे. आईच्या उदरात असलेल्या बाळामध्येसुद्धा चेतना असते ज्यामुळे त्या बाळाचा विकास होते. जर ती नसेल तर बाळाला मृत घोषित करतात. 


भगवान कृष्ण म्हणतो, ’निर्मितीमध्ये जिवंत असलेली आणि विकास पावणारी प्रत्येक गोष्टीचे कारण मी चैतन्य शक्तीच्या रूपाने सर्वत्र आविष्कृत होत आहे.’ 

चैतन्याच्या अस्तित्वामुळे झाडांना नवीन पालवी फुटते आणि त्यांना फळे येतात. झाडे आणि झुडुपे जिवंत आहेत कारण त्यांच्यात चैतन्य उपस्थित आहे म्हणून, नाहीतर ते विकसित झाले नसते.

आता आपल्याला वाटेल की दगडात प्राण नसतात परंतु तसे नाहीये. दगडातसुद्धा चैतन्य आहे. असे म्हणतात की समस्त निर्मिती ही जैविक (म्हणजेच जिवंत आणि विकास पावणारी) आहे. सम्पूर्ण रचनेमध्ये जीवितरहित काहीही नाहीये. सर्व गोष्टी जिवंत आहेत. 

तुम्हाला काय वाटते की निसर्ग किंवा पृथ्वी मृत आहे जेव्हा की तिने दीर्घ काळापासून अब्जावधी जीवांना जन्म दिला आणि सांभाळले आहे? बिलकुल नाही!! ही वसुंधरा अतिशय जिवंत आहे, म्हणूनच आपण तिला आपली माता, किंवा भू देवी म्हणतो. तिला ही पदवी बहाल केली आहे कारण तिच्यात जीव आहे. निसर्ग मातासुद्धा जिवंत आहे.

तर पृथ्वी ही जैविक आहे. अब्जावधी जिवंत प्राणीमात्र आणि सूक्ष्म जीवजंतू तिच्यामध्ये उपस्थित आहेत. निर्मितीच्या प्रत्येक अणु आणि प्रत्येक पेशी यामध्ये जीव आहे.

जेव्हा तुम्ही निर्मितीला या दृष्टीकोनातून पाहता तेव्हा तुम्हाला हे जाणवते की इथे काहीही मृतवत नाहीये, सर्वकाही जिवंत आहे.

जर तुम्ही बघाल तर निर्मितीतील काही गोष्टी निश्चल वाटतात तर काही हलताना दिसतात. परंतु वास्तवामध्ये सर्व काही गतिमान आहे. सूर्यसुद्धा हलतो आहे.

म्हणून भगवान कृष्ण म्हणतो,’या समस्त निर्मितीमध्ये सर्वत्र मी जिवंत आहे. ही निर्मिती अस्तित्वात आहे ती केवळ माझ्यामुळेच.’

भगवान कृष्ण पुढच्या श्लोकात समजावून सांगतो, ‘मत्तः परतरं नान्यत्किञ्चिदस्ति धनञ्जय I मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव II’ (७.७) 

तो म्हणतो, ‘ हे अर्जुना! माझ्याविरहित या निर्मितीमध्ये काहीही नाहीये हे जाणून घे. तो केवळ मीच आहे जो सर्व गोष्टींमध्ये आहे. या निर्मितीमध्ये माझ्या पलीकडे काहीही नाहीये. ज्याप्रमाणे मोती हे धाग्यामध्ये ओवलेले असतात त्याप्रमाणे ही समग्र निर्मिती माझ्यामध्ये विणलेली आहे.’

काल मी म्हणालो होतो की ही समस्त निर्मिती ही गडद द्रव्य  किंवा गडद  उर्जा ज्याला म्हणतात त्या उर्जेने युक्त आहे. याचे सोप्पे उदाहरण आहे हवा. पहा, तुमच्या सभोवती हवा आहे आणि तुमच्या आतसुद्धा हवा आहे. जर तुमच्या शरीरातील सर्व हवा काढून टाकली तर तुमचे शरीर नुसते आक्रसून जाईल. टायरमध्ये ज्याप्रमाणे हवा असते त्याप्रमाणेच शरीरसुद्धा हवेने भरलेले आहे. टायरमधील हवा काढल्यावर ते जसे आकुंचित पावते तसेच आपले शरीरसुद्धा हवा काढल्यावर आकुंचित होऊन एका पिशवीत मावेल. शरीर इतके आकुंचित पावेल. ज्याप्रमाणे हवा काढल्यावर फुगा आकुंचित पावतो आणि एकदम छोटासा होऊ जातो त्याप्रमाणे.

त्याचप्रमाणे, हवा हा घटक तुमच्या शरीराच्या आत आणि त्याच्या सभोवती आहे. आपले शरीर हवा या घटकाशिवाय जिवंत राहू शकत नाही. त्याचप्रमाणे, या जगात कोणतीही गोष्ट चैतन्याच्या शक्तीशिवाय जिवंत राहू शकत नाही.

म्हणून तो म्हणतो, ‘ज्याप्रमाणे मोती हे धाग्यामध्ये ओवलेले असतात त्याप्रमाणे ही समग्र निर्मितीमध्ये मी उपस्थित आहे. सर्व गोष्टींच्या केंद्रस्थानी मीच आहे.’

पुढचा श्लोक, ‘रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः I प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरूषं नृषु II’ (७.८) 

आता रोचक भाग सुरु होतो. भगवान कृष्ण म्हणतो, ‘मी पाण्यातील ओलावा आहे, सर्व द्रव्य पदार्थांची चव आहे; सूर्य आणि चंद्र यांच्यातून निघणाऱ्या प्रकाशांची किरणे मी आहे. सर्व वेदांमध्ये प्रणव ( निर्मितीचा आदिम ध्वनी ) मी आहे.’

आपले वास्तविक नाव ॐ आहे. जे नाव घेऊन आपण वावरतो ते आपल्याला आपल्या पालकांनी दिलेले आहे, आणि ते केवळ या जीवनकालाकरिता मर्यादित आहे.

कोणचे जरी छान नाव असले तरीसुद्धा लोक मिंटू, पिंटू किंवा जिमी या लाडिक नावानेच हाक मारतात. मुलीचे नाव असेल पद्मा ( याचा अर्थ कमळ आहे) जे फारच छान नाव आहे, परंतु तरीसुद्धा लोक तिला पम्मी या लाडिक नावानेच बोलावतील. (हशा).

तर आजकाल लोक एकमेकांना काहीही नावाने बोलावतात. हे नाव आपला खरा स्वभाव नाही. आपला वास्तविक स्वभाव आहे ॐ. ते आपले जन्माला येण्याधीचे नाव होते आणि ते आपण मृत्यू पावल्यानंतरसुद्धा आपले नाव असणार आहे.  एक दिवशी आपण सगळे ॐ मध्ये विलीन पावणार आहोत.

शीख धर्मामध्ये गुरुदेव नानक यांची एक प्रार्थना आहे, ‘इक ॐकार (देव एक आहे), सतनाम (त्याचे नाव हे सत्य आहे), कर्ता-पुरख (तो सृष्टीकर्ता आहे)’.

याचा अर्थ, ॐ हे केवळ एकुलते एक सत्य आहे आणि ते समस्त सृष्टीचे कारण आहे. 

परंतु काही अज्ञानी लोक असतात जे म्हणतात, ‘ आम्ही ॐ मध्ये विश्वास ठेवीत नाही, आम्ही ॐकार यावर विश्वास ठेवतो.’ या दोन्हीमध्ये काय फरक आहे? काहीही फरक नाही. 

‘ॐ हे सर्व वेदांचे सार आहे आणि तेच मी आहे’ ,असे भगवान कृष्ण अर्जुनाला सांगत आहे. 

ॐ च्या शिवाय ज्ञानामध्ये काहीही प्रगती होऊ शकत नाही. वेदांचे पठाण हे ॐ ने सुरु होते, आणि ॐ ने संपते. वेद हे ॐ चे विस्तारण आहे. समस्त निर्मितीचे सार हे ॐ आहे.

ध्वनी हा अवकाशाबरोबर निगडीत गुण आहे. म्हणून याच श्लोकात भगवान कृष्ण म्हणतो, ‘उच्चारलेला आणि व्यक्त केलेला सर्व प्रकारचा अवकाशातील ध्वनी मी आहे. माणसाला मिळालेले सामर्थ्य मी आहे. ज्याप्रमाणे स्त्रीला तिच्या नाजुकपणा आणि ममत्व याने ओळखतात त्याप्रमाणे तू मला पुरुषातील निश्चयीपणाने (शक्ती, कौशल्य किंवा यत्न या लक्षणांनी) जाण’.

पुढच्या श्लोकात, तो म्हणतो: ‘पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्र्चास्मि विभावसौ I जीवनं सर्वभूतेषु तपश्र्चास्मि तपस्विषु II’ (७.९) 

गंध हा गुण पृथ्वी या घटकाबरोबर निगडीत आहे. 

आपल्याला वाटते की आपल्याला सुवासाचा अनुभव वायू घटकामुळे येतो, परंतु तसे नाही. ज्याप्रमाणे साखरेचा गुण गोडपणा आहे, पाण्याचा गुण ओलेपणा आहे, अग्नीचा गुण उष्णता आहे, त्याचप्रमाणे सुवास हा गुण पृथ्वी घटकाचा आहे.

म्हणून भगवान कृष्ण म्हणतो, ‘मी पृथ्वी घटकाचा सुवास आहे; मी अग्नीची उष्णता आहे, आणि प्रत्येक जीवातील जीवावेग मी आहे. एखादा माणूस चांगला असू दे वा वाईट, सिंह असू दे नाहीतर मांजर, उंदीर किंवा गाढव, जिथे कुठे तुम्हाला जीवन दिसते, त्याचे मूळ कारण मी आहे. हे सर्व मी आहे. ज्ञानी ॠषीमुनींचे तप (तपश्चर्या) मी आहे. यति आणि ज्ञानी ॠषी यांच्यातील अनुकंपा आणि इच्छाशक्ती मी आहे.’

ध्यान करण्याने, वाटणारही नाही इतके आरोग्य सुधारू शकते

23
2013
May
उलान बाटोर, मंगोलिया

ध्यान करण्याने, वाटणारही नाही इतके आरोग्य सुधारू शकते वैश्विक कुटुंब निर्माण करणे हे आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वप्न आहे. संपूर्ण जग एक कुटुंब म्हणून जोडले जायला हवे. मंगोलियात हे मला मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. मंगोलियाची आर्थिक परिस्थिती बरीच चांगली झाली आहे आणि त्याचा खूपच वेगाने विकास होत आहे. या आर्थिक विकासाबरोबरच मानवी मूल्ये टिकून रहातील याची काळजी घ्यायला हवी.

मंगोलियाची आध्यात्मिक परंपरा खूप मोठी आहे आणि या देशात ती तशीच टिकून राहावी याची आपण काळजी घ्यायला हवी.

आधुनिक काळातील मानसिक ताण तणाव आणि हिंसा हे आता बास झाले. जगाच्या या भागात आपण ते वाढू देता कामा नये.

समाज जसजसा सामर्थ्यवान बनतो आणि आर्हिक दृष्ट्या समृद्ध होतो तसतसे गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागते. अमेरिकेत काय होते आहे बघताय नां ? जगातील सर्वात विकसित देशात हिंसेच्या कितीतरी घटना झाल्या आहेत. मागच्या एका वर्षात अमेरिकेत एक कोटी हिंसेच्या घटना नोंदविल्या गेल्या.

आर्ट ऑफ लीव्हिंगने जगभरात अहिंसा चळवळ सुरु केली आहे आणि विशेषत: अमेरिकेत. अहिंसा आणि करुणा जास्तीत जास्त प्रमाणात आपण समाजात रुजवली पाहिजे, मंगोलियात सुद्धा.

जेव्हा आपल्याला खूप जास्ती गोष्टी करायच्या असतात, वेळ कमी असतो आणि शक्ती नसते तेव्हा मानसिक ताण येणे साहजिक आहे. आजच्या जगात आपण आपल्या गरजा तर कमी करू शकत नाही, त्यामुळे मग आपल्याला आपली शक्तीच वाढवायला हवी. जेव्हा आपण आपल्या सवयी बदलतो, जेव्हा आपण योग्य आणि सकस आहार घेतो,चांगली विश्रांती घेतो, आणि सकारात्मक विचार करतो तेव्हा आपली शक्ती वाढते. जर तुम्ही एका जागी बसून अर्धा तास किंवा अगदी दहा मिनिटं जरी नकारात्मक विचार केलात तरी संपूर्ण दिवस थकवा जाणवलाच म्हणून समजा.

आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन जगण्याची कला म्हणजे, नाकारात्मक विचारांकडून सकारात्मक विचारांकडे जाणे. कुरकुर करणाऱ्या मनाच्या अवस्थेकडून करुणामय मनाच्या अवस्थेकडे, तणावग्रस्त चेहऱ्याकडून हसऱ्या चेहऱ्याकडे, तणावाकडून प्रसन्नतेकडे जाणे. तुमच्या श्वासाकडे लक्ष देऊन आणि ध्यान करून हे मिळवणे शक्य आहे. आज शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे की सुदर्शनक्रिया आणि ध्यान यांच्यामुळे कुणाला वाटणारही नाही इतके आरोग्य सुधारू शकते.

नॉर्वे इथल्या ऑस्लो विद्यापीठातल्या एका शास्त्रज्ञाने नुकतेच एक संशोधन केले. त्यांना असे दिसून आले की अगदी दोन दिवस जरी कुणी या तंत्रानुसार साधना केली तरीही त्याचा डी.एन.ए. वर, माणसाच्या गुणसुत्रांवर परिणाम होतो. त्यांनी सांगितले की आपल्या शरीर सस्थेतील जवळ जवळ ३०० गुणसूत्रे कॅन्सर वगैरे सारख्या रोगांना कारणीभूत असतात. जेव्हा कुणी ध्यान करते तेव्हा ही गुणसूत्रे दाबली जातात. अर्थात जगभरातील करोडो लोकांचा हा रोजच्या जीवनातला अनुभव आहे, ज्यांनी कळवले आहे की त्यांना शारीरिक,मानसिक, भावनिक, आणि अध्यात्मिक दृष्ट्या किती फायदा झाला.त्यांची तब्येत सुधारली, लोकांबारोबरचे नातेसंबंध सुधारले आणि बरेच काही.

त्यामुळे आपण आपली मुळे खोलवर रुजवायला हवी आणि आपली दृष्टी जास्त व्यापक करायला हवी. आणि जो काही थोडा काळ आपण या पृथ्वीवर राहणार आहोत त्या काळात आपण जास्त हसून आनंद पसरवायला हवा.

तीन वर्षांपूर्वी जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा म्हटले होते की या देशाची GDP (एकून अंतर्गत उत्पादन) नक्की वर जाईल. आणि मला ऐकून आनंद झाला की ते खरोखरच वर गेले आहे.

संयुक्त राष्ट्रांकडून आजकाल आणखी एक शब्द वापरला जातो, तो म्हणजे GDH (एकूण अंतर्गत आनंद). मंगोलियात तोही वर जायला हवा. या देशात सुशिक्षित लोकांची संख्या मोठी असल्यामुळे आध्यात्मिक मूल्ये शिकवणे सोपे आहे. आज भूतान हा जगातील सर्वात आनंदी देश आहे. मला वाटतं याबाबतीत मंगोलियाने भूतानशी स्पर्धा करावी. तो नक्की अशी स्पर्धा करू शकेल आणि GDH च्या उच्च स्तरावर पोहोचू शकेल. आपण हेच आपले ध्येय ठरवूया.

आज इथे असलेल्या सर्वांनी एक जबाबदारी स्वीकारली तर मला आवडेल; आपल्याला हे बघायचे आहे की या देशातील तुरुंग आणि दवाखाने ओस पडले आहेत. हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यादृष्टीने कामाला लागुया. हे साध्य करण्यासाठी आपल्याला काही समाजकार्य करावे लागेल. तुम्ही ध्येयवादी असलेले मला आवडेल पण लोभी नको. जेव्हा लोक लोभी होतात तेव्हा भ्रष्टाचार वाढतो. जिथे आपलेपणा संपतो तेथे भ्रष्टाचार सुरु होतो. कोणताही कायदा भ्रष्टाचार थांबवू शकत नाही. भ्रष्टाचार कशाने थांबणार असेल तर तो अध्यात्माने. जेव्हा लोकांच्या मनात आपलेपणाची भावना असेल तेव्हा भ्रष्टाचार संपलेला असेल. गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार यांचा खरा अपराधी कोण असेल तर तो म्हणजे मादक द्रव्यांचे आणि दारूचे व्यसन. आपण हे बघितले पाहिजे की आपले युवक सिगारेट, दारू यांच्या व्यसनी लागत नाहीत कारण त्यामुळे माणसाचे आयुष्य बरबाद होते.

लोक जेव्हा मादक द्रव्यांच्या आहारी जातात तेव्हा ते काय करतात याचे त्यांना भान रहात नाही त्यामुळेच ते गुन्हे करतात. त्यामुळे माता, भगिनी म्हणून, एक सूज्ञ व्यक्ती म्हणून तुम्ही आपल्या युवा पिढीला अशाप्रकारच्या, स्वास्थ्य, संपत्ती आणि मन यांना घातक असलेल्या कुठल्याही मादक द्रव्यांचे व्यसन लागण्यापासून दूर ठेवायला हवे.

प्रदूषण हे आणखी एक क्षेत्र आहे ज्याकडे लक्ष द्यायला हवे. जगातील वेगवेगळ्या भागात प्रदूषण वाढत चालले आहे. मंगोलिया अजूनही खूप शुद्ध आहे. इथली जमीन, पाणी, इथले सगळे अजून शुद्ध आहे. वातावरण सुस्थितीत ठेवले आहे. ही जमीन, पृथ्वीवरचा परिस्थितीक स्वर्ग म्हणून सांभाळूया. अन्न पिकवण्यासाठी इथे धोकादायक अशी रसायने वापरली जाणार नाही याची आपण काळजी घेऊया. कीटकनाशके नाही, रासायनिक खाते नाही तर आपण सेंद्रीय खते वापरून नैसर्गिकरीत्या शेती करुया.

मंगोलियाला याबद्दलची माहिती, तंत्र शिकविण्यासाठी ज्या कशाची गरज असेल ते सर्व आर्ट ऑफ लिव्हिंग कडून केले जाईल. भारतात आणि जगातल्या इतर देशात आम्ही सेंद्रीय शेती करत आहोत. यावर आम्ही बरेच संशोधन केले आहे आणि ते मंगोलियामधील शेतकऱ्यांना सांगायला आम्हाला आवडेल.

भारतामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या २०० हून अधिक शिक्षण संस्था आहेत. आपले एक विद्यापीठ आहे आणि व्यवसाय प्रशासन उच्च पदवी (MBA) शिकवणारी दोन महाविद्यालये आहेत. मी आमच्या उपकुलगुरूंना विनंती करतो की त्यांनी मंगोलियातून भारतात शिकायला येण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी MBA च्या १० जागा राखून ठेवाव्या. आमच्याकडे अगदी मर्यादित जागा आहेत, या महाविद्यालयात फक्त १८० जागा आहेत. तुमच्या मित्रांना आणि आमच्या महाविद्यालयात शिकण्याची ज्यांना इच्छा असेल अशांना तुम्ही नक्की अर्ज करायला सांगा. आज सकाळी मी मंगोलियाच्या माननीय पंतप्रधानांना भेटलो. त्यांना मी म्हटले की इथे जशी गरज असेल त्यानुसार एखादी शाळा किंवा महाविद्यालय सुरु करण्याची आमची इच्छा आहे. तुमच्यापैकी ज्यांना शाळा सुरु करायची असेल किंवा मंगोलियातील या प्रकल्पात भाग घ्यायचा असेल त्यांनी कृपया आपली नावे व नंबर द्यावेत. आपण एक समिती स्थापन करून वेगवेगळ्या भागात एक दोन शाळा सुरु करुया. जिथे पूर्व आणि पश्चिम आणि उत्तर आणि दक्षिण सगळीकडचे उत्तम ते दिले जाईल. आणि एक जागतिक शैक्षणिक केंद्र निर्माण होईल.

जीवन हे एखाद्या वृक्षासारखे आहे. ज्याची मुळे जुनी असतात आणि फांद्या नवीन असतात. अगदी तसेच जीवनात प्राचीन ज्ञान आणि आधुनिक वैज्ञानिक ज्ञान याची एकत्रितपणे गरज असते.

तसेच मला आणखी एक गोष्ट समजली की मंगोलियामध्ये डोक्याला मालिश करण्याचे एक खास तंत्र आहे ज्याने लोकांना बरे वाटते. हे जगात फारसे माहित नाही. हे ज्ञान भारतात, अमेरिकेत आणि जगभर नेले जावे आणि तिथे लोकप्रिय व्हावे असे मला वाटते. जसे आम्ही आयुर्वेद, अॅक्यूपंक्चर आणि अस्थिचिकित्सा पद्धतीचे केले. हे असे करण्याने खूपच चांगले होईल.

मानवाला उपयुक्त अशा पारंपारिक मंगोलियन चिकित्सा पद्धती आणि चिकित्सा तंत्रे यांचा प्रसार होऊन ते सगळीकडे पोहोचले पाहिजे. मी अशा डॉक्टर्सना भारतात येण्याचे आमंत्रण देतो. आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये पारंपारिक चिकित्सा पद्धतींबद्दल काही तरी करायला आम्हाला आवडेल.

प्रश्न : आपला आतला प्रवास आणि बाहेरचे घटनांनी भरलेले जग यांचा मेळ कसा घालावा ? 

श्री श्री : आतला प्रवास आणि बाहेरचे घटनांनी भरलेले जग हे एकमेकाला पूरक आहेत. जर तुम्ही आंतमध्ये आनंदी असाल तर बाहेर जोशपूर्णतेने काम करू शकाल. आणि तुम्ही जितके जास्त जोशपूर्ण असाल तितकी तुमची विश्रांती तुमचे ध्यान जास्त गहिरे असेल. जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुमचा आनंद वाढतो. जे लोक आळशी असतात ते आनंदी होऊ शकत नाहीत. आणि जे लोक जोशपूर्ण असतात तेही आनंदी असतीलच असे नाही. जोशपूर्णते बरोबरच अंतर्गत शांती असणे गरजेचे आहे. म्हणूनच अधून मधून सुट्टी घेउन आपल्यातच खोलवर जाऊन ध्यान कसे करायचे हे शिकायला हवे.

प्रश्न : असे वाटते की आपण चिंधीच्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे आहोत. कृपया, यावर प्रकाश टाकाल कां ?

श्री श्री : होय, हा खूप मोठा आध्यात्मिक प्रश्न आहे.

खूप चांगले काम केलेल्या एखाद्याला किंवा अगदी वाईट गुन्हा केलेल्या एखाद्याला तुम्ही विचारले तर ते सांगतील की कसे माहित नाही पण हे त्यांनी केले नाही ते फक्त त्यांच्याकडून करवून घेतले गेले. हा खूप जणांचा अनुभव आहे.

तुमच्यात काहीतरी आहे जो तुमच्या आसपास होणाऱ्या घटनांचा साक्षीदार आहे. या विषयाबद्दल तुम्हाला आणखी वाचायचे असेल तर अष्टावक्र गीता किंवा योग वसिष्ठ वाचा. याने तुम्हाला त्यातील खोलवरची माहिती कळेल.