07
2013
Mar
बंगलोर, भारत.
प्रश्न: गुरुदेव, काली मातेने भगवान शिवांच्या मिळविलेल्या विजयाचे महत्व काय आहे?

श्री श्री : काली हे एक प्रचंड बदल घडवून आणणाऱ्या शक्तीचे, संहारक शक्तीचे प्रतिक आहे. पण जेंव्हा ती भगवान शिव यांच्यावर विजय मिळविते, तेंव्हा ती भद्रकाली होते म्हणजे एक अशी शक्ती कि जी फक्त उदार परिणाम देऊ शकते.

हे सारे प्रतीकात्मक असून त्याचा अर्थ असा आहे कि हि एक उदार परिणाम देणारी शक्ती आहे.

शिव हि एक उत्कृष्ट अवस्था असून ती फक्त जगाचा उद्धार आणि जगाचे मंगल करण्यासाठी आहे. म्हणून जेंव्हा काली जी एक संहारक शक्ती आहे ती रागाने धावून येते तेंव्हा शिव तिच्यासमोर येतात. आणि जेंव्हा ती त्यांच्यावर विजय मिळविते तेंव्हा तिच्या संहारक शक्तींना मर्यादा पडतात आणि त्या उदार कामांकडे परिवर्तीत होतात. मग जरी त्या संहारक असल्या तरी त्या उदार परिणाम देतात.

असे पहा कि जेंव्हा एखादी जुनी इमारत पाडायची असेल तेंव्हा तुम्ही काय करता? तेंव्हा तुम्ही त्या इमारतीत स्फोटके लावता आणि मग ती इमारत जमीनदोस्त होते होय कि नाही? काहीतरी नवीन करण्यासाठी जुन्याचा नाश करतो. म्हणून काही चांगल्या कारणासाठीचा विध्वंस हा राग, अहंकार, दुस्वास आणि अज्ञान यातून निर्माण होणाऱ्या विध्वंसापेक्षा निराळा असतो.

हे अणूचा विस्फोट करून निर्माण झालेल्या अणुशक्ती सारखे असते. पण हि उर्जा जर योग्य मार्गाने वळविली नाही किंवा तिचा चांगल्या कामासाठी वापर केला नाही तर ती विध्वंसक होऊ शकते. जेंव्हा ती अणुशक्ती चांगल्या मार्गाने वापरली तर तिचा उपयोग हा वीज, उजेड आणि तत्सम चांगल्या कामांसाठी होऊ शकतो.

विजेचे पण तसेच आहे कारण ती पण एक विध्वंसक शक्ती आहे. तुम्ही जर खूप शक्तिमान अशा या विजेच्या संपर्कात आलात तर काही क्षणात तुम्ही भस्मसात होऊ शकता. पण हीच वीज जेंव्हा तारा आणि जनित्रे यांचा योग्य उपयोग करून वापरली जाते तेंव्हा ती लोकांच्या उपयोगी पडते.

त्याच प्रमाणे कालीची शक्ती जी एक संहारक शक्ती आहे, ती जेंव्हा वाईट गोष्टींचा नाश करायला निघाली तेंव्हा ती खूप प्रखर होती, पण ती जेंव्हा भगवान शिवांच्या संपर्कात आली तेंव्हा ती जगाच्या दृष्टीने उपकारक झाली.

शिव हे नेहमी जगाच्या कल्याणासाठीच काम करीत आले आहेत, त्यासाठी त्यांनी विष-प्राशन पण केले. पुराणात एक अशी गोष्ट आहे. जेंव्हा देव आणि दानव यांनी समुद्र-मंथन केले तेंव्हा त्यातून प्रथम विष बाहेर आले. तेंव्हा शिवांनी ते विष पिऊन टाकले. त्या विष पिण्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला म्हणून त्यांना नीलकंठ असे नाव मिळाले. हि अशी पुराणात गोष्ट आहे.

कालीचा एक अर्थ ज्ञान , बदलाचे ज्ञान असा पण होतो. जेंव्हा काली शिव तत्वाशी एकरूप झाली, त्या शिव तत्वाच्या उदारपणामुळे जगाचे कल्याण झाले. म्हणजे तीच शक्ती इतकी उदार झाली कि कालीच्या या उदारपणामुळे जगाल ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे तिला भद्रकाली असे नाव मिळाले, जी नेहमी चांगले करते.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, जर प्रत्येक आकार-हीन हे शिव असते आणि प्रत्येक आकार हे शक्ती असते तर श्वास जो दोन्ही आकार आणि आकार-हीन आहे, तो काय आहे?

श्री श्री : होय, आकार-हीन ते शिव आणि आकार हि शक्ती असते. तुम्ही त्यांची व्याख्या कशीही करू शकता.

प्राणाला ( ज्यावर आयुष्य चालते ती श्वासातून मिळविलेली शक्ती) मुख्य-प्राण म्हणून पण संबोधतात. हनुमान हे प्राणाशी निगडीत आहेत, हवा (वायू तत्व) हे पण प्राणाशी निगडीत आहेत, ओंकार पण प्राणाशी निगडीत आहे. आपण सर्व एकप्रकारे या प्राणाच्या समुद्रात विहार करीत असून, प्राण हे शिव आणि शक्ती दोन्ही आहे.

एक वेळ अशी येते कि तुम्ही शिव आणि शक्ती हे वेगळे करू शकत नाही. त्या दोन्हीतील सीमारेशा नाहीशा होतात. त्यावेळी त्याला ब्राम्हण असे म्हणतात म्हणजेच ते सर्व एकच, दोन नव्हेत.

अद्वैत म्हणजे- दुसरा नव्हे, दोन नव्हे (पहिल्यापर्यंत मोजणी करण्यासाठी पण दोघांची आवश्यकता असते,म्हणून असे म्हणतात कि तेथे दोन गोष्टी नसतात तर फक्त एकाच असते). उर्जेचे एकच केंद्र, त्यापेक्षा दुसरे काहीच अस्तित्वात नसते. अद्वैत म्हणजे दुसरी शक्ती नसणे, या ब्रम्हांडात दुसरी कोणतीच शक्ती नाहीये.

अद्वैत हेच अंतिम ज्ञान आहे, या जगात दुसरी कोणतीच शक्ती नाही. हे ब्रम्हांड एका गोष्टीचे बनले आहे.

तुम्ही जेंव्हा एक पायरी खाली येता तेंव्हा ते मात्रा भौतीकासारखे असते. अजून एक पायरी खाली आलात कि ते रसायन शास्त्रातील आवधिक तालीकेसारखे असते, तुम्हाला आवधिक तालिका आठवते आहे काय? वेगवेगळ्या तत्वांचे वेगवगळे गुणधर्म असतात. हे सर्व म्हणजे वेगवेगळे देव आणि देवता असतात.

प्रश्न: भगवान कृष्ण असे म्हणतात कि ‘धर्माच्या विरुद्ध नसलेल्या इच्छा म्हणजे मी होय’. आम्हाला कृपा करून धर्माच्या पाउल खुणांवरून चालणाऱ्या आणि धर्माच्या विरुद्ध असणाऱ्या इच्छा कशा ओळखाव्यात हे सांगाल काय?

श्री श्री : अशा इच्छा कि ज्या सामान्य , नैसर्गिक असतात आणि ज्या कोणतीही अपराधाची भावना निर्माण करीत नाहीत किंवा तुम्हाला असुविधा करीत नाहीत किंवा ज्या तुमचा नैसर्गिक सहजपणा घालवीत नाहीत त्यांना धार्मिक असे म्हणतात. अशी कोणतीही गोष्ट कि जी तुम्हाला हादरवून सोडते, तुम्हाला जाळून टाकते, तुम्हाला असुविधा निर्माण करते, तर त्यात ती असुविधा असणे म्हणजेच ती अधार्मिक आहे. जर ती धार्मिक असेल तर तुम्हाला त्यात सुविधा वाटेल.आणि जर त्यात तुम्हाला भीती वाटली, अपराधीपणा वाटला, असुविधा वाटली तर ती अधार्मिक होय.

प्रश्न: गुरुदेव, मी जेंव्हा समर्पित झालो आहे तेंव्हा देव किंवा गुरू माझी सर्व काळजी वाहायला समर्थ आहे अशा विश्वासाने आयुष्य कसे जगावे?

श्री श्री : तुम्ही असे कधीच करू शकत नाही! तुमचे ओझे तुम्हालाच वाहायचे आहे.’काय व्हायचे आहे ते होईल ‘ असे म्हणा आणि बघा काय होते ते.

तुम्ही जर त्यात विश्वास आणायचा प्रयत्न करीत असाल तर त्याचा काही उपयोग नाही.

‘मला माझी श्रद्धा ठेवायची आहे’, तुम्हाला कशावर श्रद्धा ठेवायची आहे? तुमची श्रद्धा फेकून द्या!

मी तुम्हाला सांगतो कि तुमची हि श्रद्धा हे एक फार मोठे ओझे आहे! त्याऐवजी म्हणा कि ‘ मी कशाची तमा बाळगत नाही!

जर श्रद्धा असेल तर ती आहे, जर श्रद्धा नसेल तर ती नाहीये, हे एवढे सरळ आहे. श्रद्धा असणे हि एक देणगी आहे. तुम्ही तुमच्या मनावर किंवा हृदयावर श्रद्धा लादू शकत नाही.

आणि जेंव्हा तुमचे मन त्यातील सर्व विचार आणि नकारार्थी भावना एकवटून श्रद्धा नाकारता, तरीसुद्धा तुमच्या आतील काही गोष्टी हलून तुम्हाला श्रद्धेकडे खेचून घेतात. हे असे घडते याची जाणीव ठेवा आणि हे असे घडत असते.

कोणी म्हणतो कि ‘ मी त्यावर विश्वास ठेवत नाही’ पण तरी सुद्धा तो एकेठिकाणी बसून ध्यान करतो. आणि तुम्ही जर त्याला विचारलेत कि ‘तू ध्यान का करतोस?’, तो म्हणतो कि ‘ मला आतून कोणीतरी ते करायला सांगत आहे’.

एखादा माणूस म्हणतो कि ‘ माझा गुरूवर विश्वास नाही’. पण जेंव्हा गुरुदेव येतात तेंव्हा तो म्हणतो कि ‘ मला आता दुसरे काही करण्यासारखे नाही म्हणून मी मला तेथे येउदेत’.आणि असे म्हणून तो तेथे येईल. कोणीतरी खेचल्यासारखा मग तो विमानतळावर येतो, किंवा सत्संगासाठी येतो. हे काय आहे? तुम्ही असे ठरविले कि तूमची श्रद्धा नाहीये आणि तुम्ही तिचा नाश करण्यासाठी सर्व काही केले किंवा तुमची श्रद्धा आहे याचा तुम्ही नेहमी इन्कार केलात आणि तरीसुद्धा असे काही तरी आहे कि तुमच्या बरोबर आहे आणि त्याने तुम्हाला जाऊ दिले नाही. तेंव्हा तुम्हाला याची जाणीव व्हायला पाहिजे कि ‘ होय हीच ती श्रद्धा’.

तर श्रद्धा हि लादली जात नाही , तर ती तेथे असते. एकदा कि ती आली कि ती तेथे राहते. जर ती निघून गेली तर तुम्हाला अभागी करून सोडते. जेंव्हा तुम्हाला असे अभागी वाटायला लागेल तेंव्हा खात्री ठेवा कि तुमची श्रद्धा निघून गेली आहे. आणि मग तुम्हाला अभागी पणा नकोसा वाटतो तेंव्हा तुम्ही ठरविता मी आता अभागी बनणार नाही तेंव्हा तुमची श्रद्धा टिकून राहते. खरेतर श्रद्धा तेथेच होती पण तो परत तुम्हाला जाणवू लागली आहे.

तुम्ही तुमचा विश्वास टिकवून ठेवायचा प्रयत्न करीत आहात हि खूप अवघड गोष्ट आहे. काही वेळा लोकांना असे वाटते कि त्यांचा विश्वास किंवा श्रद्धा टिकून आहे ती केवळ देव किंवा गुरू यांच्यामुळेच. तुम्ही तुमच्यासाठी देवावर श्रद्धा ठेवीत आहेत. पण एक लक्षात ठेवा कि जर तुमची देवावर श्रद्धा नसेल तरीही देवाला त्याचे काही सोयर सुतक नाही. देव म्हणेल कि ‘ठीक आहे , तुझी श्रद्धा नाही तर काय झाले, मी तर येथे आहे. तुला जर असे वाटत आहे कि मी येथे नाहीये, तर तूला काय वाटायचे आहे ते ठरवायला तू पूर्णपणे मोकळे आहेस’. बरेच लोक म्हणतात कि ‘माझी देवावर खूप श्रद्धा आहे’. तुमची श्रद्धा आहे म्हणून काय झाले? जे व्हायचे आहे ते होईल.

खरेतर आपली श्रद्धा फारच उथळ असते. आपली श्रद्धा हि आपल्या सुविधांसाठी असते, छोट्या छोट्या गोष्टी होण्यासाठी असते.आपली श्रद्धा हि आपली महत्वाकांक्षा सफल होण्यासाठी असते.आपली महत्वाकांक्षा पूर्ण झाली तर आपण म्हणतो कि श्रद्धा आहे जर आपली महत्वाकांक्षा पूर्ण झाली नाही तर आपण म्हणतो कि माझी श्रद्धा ढळली आहे . पण मी तुम्हाला सांगू इच्छितो कि आयुष्य हे महत्वाकांक्षापेक्षा मोठे आहे, आणि श्रद्धा हि आयुष्यापेक्षा मोठी आहे.

खरेतर श्रद्धा कि कोठे जात नाही तर जेंव्हा सत्व किंवा शुचिता किंवा सामंजस्य याचा तुम्हाला प्रत्यय येतो तेंव्हा श्रद्धेची अनुभूती होते. तुम्ही एवढेच करा कि सामंजस्य ठेवा, योग्य व्यायाम, आहार आणि ज्ञान या गोष्टींनी तुमचे मन शुद्ध ठेवा. या सर्व गोष्टी तुम्हाला त्या दिशेने जायला मदत करतील.

प्रश्न: गुरुदेव, पूर्वीच्या अज्ञानामुळे मला भीती वाटायची, परंतु हल्ली काहीवेळा ज्ञानामुळे मी संभ्रमात पडतो. मी काय करावे?

श्री श्री : हे तर फारच छान आहे! तुम्हाला पुनः पुन्हा संभ्रमात टाकणे हेच ज्ञानाचे काम आहे. स्पष्टता आणणे हे त्याचे काम नव्हे. संभ्रमाच्या प्रत्येक पातळीला तुम्ही एक पायरी उडीमारून वर जात असता. तेव्हा ते फारसे मनावर घेऊ नका.

जेंव्हा संभ्रम नसतो तेंव्हा ते सरळ चालण्यासारखे असते, तिथे उड्या माराव्या लागत नाहीत. पण काहीवेळा जीन्यासारखे पायऱ्या चढून जायचे असते, जेंव्हा एक पायरी सोडून दुसऱ्या अधिक उंचावरच्या पायरीवर जायचे असते. आणि तेंव्हा संभ्रमात पडल्यासारखे होते.

आता मला असे विचारू नका ‘ याचा अर्थ असा कि जेंव्हा संभ्रम नसतो आणि मी सरळ आयुष्य घालवीत असतो, तेंव्हा वाढ होत नसते का?, तेंव्हा प्रगती होत नसते का? या ज्ञानाचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही काय?’ असे काही नसते! तुम्ही सरळ चालत असता. आणि जेंव्हा तुम्ही सरळ चालत नसता तेंव्हा खाच खळग्यानी भरलेल्या रस्त्यावरून प्रवास सुरु असतो, तसा प्रवास पण चांगला असतो.

प्रश्न: गुरुदेव, दक्षिणामूर्ती चा अर्थ काय?

श्री श्री : अमुर्त्य म्हणजे ज्याला काही आकार नाही,जे व्यक्त करता येत नाही, आणि जे बघता येत नाही. भगवान शिव, म्हणजे अमर्याद अंतरीक्षाची आकारहीन अभिव्यक्ती, जी काहीही आकार घेऊ शकत नाही. ते केवळ अशक्य आहे.

मूर्ती म्हणजे ज्याला आकार आहे, जे बघू शकतो ते आणि दक्ष म्हणजे जे कुशल आणि सक्षम आहे. म्हणून दैवत्व जे व्यक्त करता येत नाही, ते जेंव्हा अतिशय कुशलरीतीने व्यक्त केले जाते त्याला दक्षिणा म्हणतात.

असे पहा कि आपण आपल्या मनातील सर्व भावना व्यक्त करू शकत नाही. म्हणून बऱ्याच वेळा आपण फुल वाहून आपल्या भावना व्यक्त करतो. या फुल वाहण्याच्या क्रियेतून आपण आपल्या भावना व्यक्त करितो, होय कि नाही? आपल्या मनातील खोलवर असलेल्या सर्व भावना व्यक्त होतील असे काहीही नसताना आपण काहीतरी देण्याचा प्रयत्न करीत असतो. यालाच दक्षिणा म्हणतात.

दक्षिणामूर्ती म्हणजे असे कि जे बघता येत नाही तरीपण ते व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जातो. जे व्यक्त करण्यापलीकडचे आहे पण ते काही आकारातून व्यक्त केले जाते. ते दृश्य नाही, तरीपण बघितले जाते,आणि सर्व त्यापासूनच बनलेले असते.

जेंव्हा काही अमर्याद असते आणि जे व्यक्त करता येत नाही , ते काही आकारातून कुशलपणे व्यक्त केले जाते , तेंव्हा त्याला दक्षिणामूर्ती म्हणतात.

सूर्य हा केवढातरी मोठा आहे आणि आपल्यापासून खूप मैल अंतरावर आहे तरीसुद्धा तुम्ही एका छोट्या काचेच्या तुकड्यात त्याचे प्रतिबिंब बघू शकता. प्रत्यक्षात सूर्य जरी खूप मोठा असला तरी कुशलपणे तुम्ही एका छोट्या आरशात त्यांची प्रतिमा घरात आणू शकता. यालाच दक्षता ( बुद्धीची कुशलता) म्हणतात आणि यालाच दक्षिणामूर्ती म्हणतात.

भगवान शिव यांना आदि गुरू ( असा गुरू जो काळाच्या सुरवातीपासून आहे आणि जो कालातीत आहे) म्हणतात. ते सर्व गोष्टींमध्ये आहेत आणि सर्वत्र आहेत, ते गुरूरूप पण आहेत. म्हणून जेंव्हा अमर्यादित हे गुरूरुपात येते तेंव्हा त्याला दक्षिणामूर्ती म्हणतात.

अनादिकालापासून गुरू तत्वाच्या मूळ रुपाला दक्षिणामूर्ती असे म्हटले आहे. असे पहा कि गुरू हा काही मनुष्य नाही. गुरूच्या शरीरात असलेल्या त्या चैतन्याला दक्षिणामूर्ती असे म्हटले आहे. ती एक दैवी, सर्वत्र सामावलेली, अमर्यादित, जी अव्यक्त आणि तरीही व्यक्त होते अशी मार्गदर्शन करणारी बुद्धिमत्ता आहे.

म्हणून भगवान शिव यांना दक्षिणामूर्ती , आदी गुरू असे म्हटले आहे. अशी एक गोष्ट सांगितली जाते कि भगवान शिव हे शांतपणे बसले आहेत. एक तरुण मुलगा या स्वरुपात त्यांच्याकडे बघितले तर त्यांचे वयस्कर शिष्य त्यांच्यासमोर ज्ञानार्जनासाठी बसले आहेत. त्यांच्या समोर मौनात बसताच त्यांना सर्व ज्ञान प्राप्त झाले आणि त्यांचे सर्व प्रश्न विरून गेले. त्यांचे प्रवचन हे मौनात होते.याचा अर्थ असा कि त्यांच्या उर्जेत वाढ झाली. यालाच गुरू तत्व म्हणतात. ते मूळ गुरू ज्यांच्यापासून सर्व ज्ञान आणि बुद्धिमत्ता सुरु झाली त्याला दक्षिणामूर्ती म्हणतात.

म्हणून , अतिशय कुशल रीतीने अव्यक्त दैवी गुण हे व्यक्त केले गेले. हे दक्षिणामूर्ती चे सार आहे.

प्रश्न: खरी सेवा कुठली? माझी प्रत्येक कृती हि सेवा कशी होईल?

श्री श्री : सेवा म्हणजे या जग निर्मात्यासारखे करणे. तो तुमच्यासाठी सर्व काही करतो पण तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवीत नाही. म्हणजे मोबदल्यात कोणतीही अपेक्षा न ठेवता जेंव्हा तुम्ही कोठली गोष्ट करता ती सेवा. अर्थात त्याचा मोबदला जरूर मिळतो पण जेंव्हा तुम्ही मोबदल्याची अपेक्षा ठेवता तेंव्हा ती सेवा नव्हे. कशाचीही अपेक्षा न ठेवता, मागणी न ठेवता फक्त ती गोष्ट करण्याच्या उदेशाने जी केली जाते ती सेवा.

इंडिया टूडे सभा

16
2013
Mar
दिल्ली, भारत
ज्ञान हे कालातीत आहे!

सूर्य हा प्राचीन आहे, पण सूर्याचे किरण आजसुद्धा ताजेतवाने आहेत. ते जुने अथवा शिळे किरण नाहीयेत. तसेच पाण्याचेसुद्धा आहे. गंगा नदी ही इतकी प्राचीन आहे, पण आजसुद्धा तिचे पाणी तितकेच निर्मळ आहे.

त्याचप्रमाणे,मी तर म्हणेन की आपल्या आयुष्याला लागू होणारे ज्ञान जे प्राचीन असूनसुद्धा नीतनवीन आणि ताजेतवाने आहे. जे जीवनाचा पुरस्कार करते ते ज्ञान होय.

अडाणी,किंवा कट्टर धार्मिक यांना पहा; स्वतःला बुद्धीजीवी म्हणणारे यांच्यात नास्तिकवादीची फँशन असते, आणि ज्यांना प्राचीन आणि आधुनिक यांची सांगड घालून स्वतःचे जीवन घडवता येते ते ज्ञानी असतात.

ज्याप्रमाणे एका वृक्षाला जुन्या मुळांची आणि नवीन अंकुरित झालेल्या कोंबाची आवश्यकता असते; त्याचप्रमाणे जीवन हे बदलाभीमुख असले पाहिजे, आणि हेच प्राचीन ज्ञान आहे.

ऋग्वेदातील सर्वात पहिला श्लोक आहे ,’अग्निः पूर्वेर्भी ॠषीर्भी ईदयो नूतनैर उता ’. जुने आणि नवीन, हे दोहो एकत्रित अस्तित्वात असतात, आणि हेच ज्ञान आहे. तंत्रज्ञान आणि व्यापार यांच्याप्रमाणेच, परंपरांचे पुनरुज्जीवन आणि पुनरावलोकन पुन्हा करणे जरुरी आहे. हे महत्वाचे आहे. आणि भारताचे चैतन्य असे आहे की आपण हे करू शकलो होतो. प्राचीन काळापासून परंपरेचे काही आयाम आपण कायम ठेवले, तरीसुद्धा आधुनिक काळाच्या गरजेनुसार आणि जीवनाच्या आव्हानानुसार परंपरा या अतिशय अनुकूलक्षम बनलेल्या आहेत.

ज्ञान म्हणजे खरोखर काय? आपण ज्ञानी का असायला पाहिजे?

कोणालाही यातना नको असतात. कोणालाही निराशा नको असते. ज्याच्यामुळे दुःख दूर होते, जे दूरदृष्टी देते, ज्याच्यामुळे जीवन चैतन्यमय होऊन जाते, आणि जे वैयक्तिक स्वयंला विश्वामध्ये उपस्थित असलेल्या वैश्विक स्वयं सोबत जोडते, ते ज्ञान होय.

ज्ञान हे अपरिमित समाधान देते. असे समाधान जे छोट्या तृप्ततेमधून मिळू शकत नाही. आणि असे अपरिमित समाधान हे सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आणि मी तुम्हाला सांगतो कि याचा शिक्षणाबरोबर काहीही संबंध नाहीये.गावागावातून अशिक्षित लोकांमध्ये तुम्हाला ज्ञानी माणसे सापडतील. कदाचित जास्तच. त्यांना परिवाराचे व्यवस्थापन कसे करायचे माहिती असते, त्यांना त्यांच्या विभागात शांतात कशी ठेवायची ते माहिती असते, त्यांना माणसे कशी जोडायची हे माहिती असते, आणि त्यांना जीवन एक उत्सव कसा करायचे हे माहित असते. जीवनाचे उत्सवात रुपांतर होणे,ज्यामुळे चेहऱ्यावर हास्य फुलून येते हेच ज्ञान आहे. ते जे तुम्हाला निरोगी ठेवते, आणि तुमच्या जीवनात पुढे पाहण्याची आंतरिक दृष्टी देते ते ज्ञान होय.

विचारावर आपण चर्चा करीत असताना मला अजून एक मुद्दा जोडावा असे वाटते. मला वाटते की विचार हा केवळ घराच्या दारावरचा रखवालदार आहे. भावना या विचारापेक्षा थोड्या बलवान असतात. तुम्ही असा विचार करीत असाल ,’मी आनंदात आहे’ , किंवा तुम्ही तुमचे सर्व प्रयत्न त्या विचाराच्या दिशेने ठेवाल, परंतु जेव्हा भावना उत्पन्न होतात मग सगळे संपले, भावना अतिशय वेगाने चाल करून येतात की तुम्ही स्वतःकडे ठेवलेल्या संपूर्ण विचार प्रक्रिया क्षणार्धात नाहीशा होऊन जातात. तुमच्या विचारांपेक्षा तुमच्या भावना फार शक्तिशाली आहेत हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही असे जरी म्हणत असाल, ‘मला आनंदित राहायचे आहे’, किंवा ‘मी आनंदात आहे’, परंतु जेव्हा वैफल्यग्रस्त प्रसंग उत्भवतात तेव्हा अचानक मोठा भावनावेग उसळतो किंवा प्रचंड उर्जा निर्माण होते आणि मग हे सगळे विचार गायब होऊन जातात.

म्हणून आपल्याला जीवनाच्या अनेक पातळ्यांवर काम करणे जरुरी आहे. सर्वप्रथम वातावरण, नंतर देह, श्वास- श्वास हा मन आणि देह यांना जोडणारी कडी आहे. नंतर मन; विचार. मग भावना, ज्या तरल आहेत आणि मनापेक्षा शक्तिशाली आहेत. आणि या सर्वांच्या पलीकडे, उर्जा क्षेत्र, जे सकारात्मक आहे, तेजस्वी आहे, आत्मा किंवा चैतन्य जे तुम्ही आहात ते फुलून येते.

आणि ध्यानाचे हे सर्व तंत्र, क्रिश्चन परंपरेतील चिंतनशील प्रार्थना, किंवा बौद्ध झेन ध्यान पद्धती, हे सर्व वैचारिक पातळी पार करतात आणि अशा पातळीवर पोचतात जिथून सर्व काही नियंत्रित केले जाते. आणि हे म्हणजे घराच्या मालकाची प्रत्यक्ष भेट घेणे होय. एकदा का घरच्या मालकाची प्रत्यक्ष भेट झाली की मग रखवालदार मालकाचे म्हणणे ऐकेल.