कामाच्या ठिकाणी नेहमी थकलेले?

15
2013
Apr
रेजिना, कॅनडा

इथे फार मस्त वाटते!

रेजिना ही शांत डोके आणि प्रेमळ हृदय असलेल्या लोकांची जागा असल्याचे दिसून येत आहे. नेहमी, मोठ्या शहरांमध्ये लोक हे दगडी हृदय आणि गरम डोक्याची असतात. छोट्या शहरांमध्ये एकोपा असतो, लोक एकत्र येतात. आपल्याला ही प्रेम पसरण्याची संस्कृती जपली पाहिजे.

हिंसा-मुक्त समाज, आजार-रहित शरीर, गोंधळ-विरहित मन, निरोधन-मुक्त बुद्धी, आघात-रहित स्मृती आणि दुःख-रहित आत्मा हे प्रयेक व्यक्तीचा जन्मसिद्ध अधिकार आहेत. दि आर्ट ऑफ लिविंग संस्था हेच तर काम करते; बंधुभावाची भावना निर्माण करणे. आपण सगळे एक मानवीय परिवाराचे सदस्य आहोत.

आपण ज्याप्रकारे पूजा करतो त्यात फरक असेल, ज्याप्रकारे आपण जीवनोत्सव साजरा करतो त्यात वेगळेपणा असेल, परंतु आपण सगळे एकाच मानवीय परिवाराचे सदस्य आहोत. जेव्हा आपण हे विसरतो तेव्हा मानवजात विनाशाकडे जाते.

जगात काय चालले आहे ते बघितले? वर्गांमधून हिंसाचार घडत आहे. लोकांना मुलांना शाळेत पाठवायलासुद्धा असुरक्षित वाटते. जेव्हा मी ऐकले की एका वर्षात युनियटेड स्टेट्समध्ये १० मिलियन हिंसाचाराच्या घटना घडल्या तेव्हा मला प्रत्येक एका हिंसाचाराच्या कृत्याकरिता एक बिलियन अहिंसेच्या कृती  ही कल्पना सुचली. आपल्याला ही परिस्थिती बदलली पाहिजे; याच्या बरोबर विरुद्ध परिस्थिती करायला पाहिजे. प्रत्येक एका हिंसात्मक कृतीचा बदला आपण शेकडो अहिंसेच्या कृतींनी चुकवायला पाहिजे. 

जेव्हा मी काँनेक्टीकटयेथील दुर्दैवी घटनेबद्दल ऐकले तेव्हा मला वाटले, मी सगळीकडे प्रवास करतो आणि सगळ्यांबरोबर बोलतो, त्यांना शपथ घ्यायला लावतो, वचन द्यायला लावतो की आपण सगळे बघूया की हिंसाचार कसा काय कमी होईल. तुम्ही काय म्हणता?

निराशा, घरगुती हिंसाचार आणि सामाजिक हिंसाचार या सगळ्या समस्या संपूर्ण जगभर आहेत. याचे कारण आहे की आपण आपल्या स्वतःबरोबर आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्यांबरोबर जोडायला विसरलेलो आहे. ही एकच गोष्ट आहे ज्यामुळे जीवन जगण्यायोग्य होते.

जीवन जगण्यायोग्य तेव्हाच होते जेव्हा त्यात प्रेम असते.  प्रेम, अनुकंपा आणि आपलेपणाची भावना नसलेल्या जीवनाची केवळ कल्पना करून पहा. मनुष्यजात निराश होऊन जाईल. आपल्याला समाजात आणि परिवारात उत्सव साजरा करण्याची आणि एकोप्याची भावना निर्माण करण्याची गरज आहे. (प्रत्येक एका हिंसाचाराच्या कृत्याकरिता एक बिलियन अहिंसेच्या कृती हा ) कार्यक्रम आम्ही याच उद्देश्याने सुरु केला. तुरुंग, शाळा, आणि वर्ग अशा ठिकाणी या कार्यक्रमाने स्पर्श केला जेव्हा त्याची सर्वात जास्त गरज होती. मी खूपच आनंदात आहे कारण इतक्या कार्यकर्त्यांनी स्वतःला या कार्यक्रमामध्ये झोकून दिलेले आहे.

दि आर्ट ऑफ लिविंग हे पाच तत्वांवर आधारित आहे :

१. परस्परविरोधी मुल्ये ही एकमेकांना पूरक असतात : जीवनात, सर्व काही आपल्याला पाहिजे तसे घडत नाही, कधी कधी चुकीच्या गोष्टी घडतात. आपण ते स्वीकारायला पाहिजे, त्यातून शिकले पाहिजे, आणि पुढे जात राहिले पाहिजे. प्रसंग चांगला असो वा वाईट, आपण मनाची संयमशीलता राखली पाहिजे. हे मुलभूत तत्वांपैकी एक आहे जे मानवजातीमध्ये असले पाहिजे असे मी सुचवू इच्छितो.

कोणत्याही परिस्थितीत आपण आपली बुद्धी आणि तारतम्य शाबूत ठेवले पाहिजे.

हे आपण कसे काय करू शकतो?

आम्ही अनेक श्वासाची तंत्रे आणि व्यायाम संकल्पित केलेले आहेत ज्याने मनाचा तणाव दूर होतो आणि ते वर्तमान क्षणात जगू लागते.

२. लोक आणि परिस्थिती यांचा आहे तसा स्वीकार करा : आपण जरी स्वीकार नाही केला तरी गोष्टी बदलणार नाहीयेत, बरोबर? जेव्हा तुम्ही किमानपक्षी त्याचा स्वीकार करता तेव्हा तुम्ही अधिक केंद्रित होता. मग, तुम्ही बदल घडवण्यास मदत करता.

३. इतर लोकांच्या चुकांच्या मागे त्यांचे उद्देश्य पाहू नका : सर्वात वाईट गुन्हेगारामध्येसुद्धा तुम्हाला दुर्दैवी बळी ठरलेली व्यक्ती दिसेल जी मदतीची याचना करीत असेल. जेव्हा तुम्हाला असे दिसेल तेव्हा तुम्हाला अनुकंपा वाटेल, तिरस्कार वाटणार नाही.

४. इतरांच्या मताचा फुटबॉल बनू नका.

५. वर्तमान क्षणात जगा.

ही अतिशय मुलभूत तत्वे आहेत जी मला वाटते की आपल्या जीवनात आणि परिवारात शांतता आणण्यासाठी फार महत्वाची आहेत, हो ना? आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला वाटते त्याप्रमाणे बरोबरच होऊन पाहिजे असते. परंतु असे नेहमी घडतेच असे नाही. आपल्याला इतरांच्या मतांचा स्विकार करावा लागतो. हे साध्य करण्यासाठी श्वास हे महत्वाचे साधन आहे. प्रत्येक भावनेसाठी श्वासाचा विशिष्ट ताल असतो. 

प्राचीन काळामध्ये हे ज्ञान अत्यंत संरक्षित गुपित होते. हे ज्ञान केवळ शाही आणि काही खास लोकानांच प्रदान केल्या जायचे. मी विचार केला की मोबाईल फोनप्रमाणेच, हे ज्ञान समस्त लोकसंख्येला उपलब्ध करून दिले पाहिजे. आपण सर्वांना त्यांचे मन कसे हाताळावे हे शिकवायला पाहिजे; याची गरज आहे. आणि आम्ही हे गेल्या ३२ वर्षांपासून करीत आहोत. 

आज आपण हिंसाचार मुक्त समाज निर्माण करण्याचे मनावर घेऊ या.

आपण आपली संस्कृती, खेळ, व्यवसाय आणि आपले श्रद्धेवर आधारित कार्यक्रम या सर्वांमध्ये हे अहिंसेचे ज्ञान संमेलीत करणे जरुरी आहे. त्या सर्वाना याची गरज आहे. आपण क्षुब्ध असताना आपले मन शांत कसे करावे हे आपण शिकणे जरुरी आहे.

आता आपण असे म्हणू, ‘ होय, हे सर्व माझ्या डोक्यात आहे, परंतु हे माझ्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष व्यवहारात कसे अणु. मला माहिती आहे की रागावणे, वैतागाने किंवा निराश होणे हे वाईट आहे. मी ते कसे काय थांबवू?’

इथेच ध्यान आणि श्वासाची तंत्रे मदतीला धावून येतात. ही ती उपकरणे आहेत जी तुमचे मन शांत ठेवण्यास मदत करतात आणि तुम्हाला आतून आनंदी वाटते. जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्ही केवळ तेच करता जे सर्वांकरिता चांगले असते.

जे असंतुष्ट असतात ते त्याच गोष्टी करतात ज्या त्यांच्या स्वतःसाठी आणि इतर सगळ्यांसाठी वाईट असतात. हेच काय ते होते. जर कोणी असंतुष्ट असेल तर मग त्यांचा हेतू असो किंवा नसो, जीवनाला पोषक नसणारे कृत्य त्यांच्याकडून घडणारच. हे माझे निरीक्षण आहे.

आनंदी असणे हा आपला खरा स्वभाव आहे. आपल्याला आनंदाच्या लाटा निर्माण करायच्या आहेत. हे केवळ संपत्तीने होऊ शकत नाही.

प्रश्न : गुरुदेव, जेव्हा कधी मी एखाद्या क्षेत्रात श्रेष्ठत्व मिळवू पाहतो तेव्हा मला अतिशय तणावाचा अनुभव येतो उदाहरणार्थ नोकरीमध्ये. मला सतत तणाव राहतो. याला मी चुकवू शकत नाही कारण मला झोप लागत नाही. शांतात कशी प्राप्त करावी?

श्री श्री : तुम्हाला तणाव म्हणजे काय ते माहिती आहे? करायला भरपूर काम, वेळेचा अभाव आणि उर्जा नसणे, यालाच तणाव म्हणतात. 

म्हणून, एक तर तुम्ही तुमची उर्जा वाढवा किंवा कामाचा ताण कमी करा. अर्थात तुम्ही कामाचा तणाव कमी करू शकत नाही किंवा वेळ वाढवू शकत नाही, परंतु तुम्ही तुमच्या उर्जेची पातळी वाढवू शकता. जर तुमच्या उर्जेची पातळी उंचावली तर तुम्ही तुमचे काम सहजपणे करू शकता. श्वासाची सर्व तंत्रे ही उर्जेची पातळी वाढवण्यासाठी मदत करतात. सकाळी केवळ दहा मिनिटे प्राणायाम करा आणि मग जा आणि कोणतेही काम करा. जेव्हा तुम्ही कामावरून परत याल तेव्हा पुन्हा दहा मिनिटे करा.

प्रश्न : गुरुदेव, हिवाळ्यात उर्जेची पातळी वाढवण्यासाठी आम्ही काय करू शकतो?

श्री श्री : हिवाळ्यात तुम्ही नक्कीच प्राणायाम आणि श्वासाचे व्यायाम करू शकता. असे म्हणतात की शरीरात इतकी उर्जा आहे की त्याने संपूर्ण न्यूयॉर्क शहराला सहा महिने अखंडित वीज पुरवठा होई. ती उर्जा आणण्याकरिता आपल्याला केवळ प्राणायाम ; भस्त्रिका करणे जरुरी आहे. 

तुम्हाला तुमच्या हाताच्या अंगठ्याचे गुपित ठावूक आहे का?

जेव्हा थंडी असते तेव्हा सर्व जगभरातील लोकांना आपले हाताचे अंगठे काखेत किंवा खिशात लपवताना तुम्ही पहिले आहे? ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. तुमच्या शरीराला गरम वाटते, संपूर्णपणे नाही,जवळजवळ ६० टक्के, जेव्हा तुम्ही तुमचे अंगठे गरम ठेवता.

आदि मुद्रा  ( अंगठा मुडपून करंगळीच्या तळाला लागलेला आणि इतर चार बोटे त्याच्यावर मुडपून मुठ वळलेली ) घेऊन जन्मलेली मुले असतात. जर तुम्ही एका बाळाला जन्मल्यापासून ते तीन वर्षाचा होईपर्यंत जर निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की तो सर्व योग आसने करतो. तुम्हाला योगाच्या शिक्षकाची गरज नाही; तुम्हाला केवळ त्या मुलाला बघितले पाहिजे.

तुम्ही नवजात शिशूला झोपलेले पहिले आहे? ते चीन मुद्रेमध्ये  ( तर्जनी अंगठ्याला हलकेच स्पर्शून असते आणि इतर तीन बोटे अंगठ्याला समांतर असतात ). या मुद्रेमध्ये, चैतन्य जागृत असते आणि प्राण, जीव शक्ती, ही हृदय परिसरात असते. मुले चीन मुद्रा अथवा चिन्मयी मुद्रा  (तर्जनी अंगठ्याला हलकेच स्पर्शून असते आणि इतर तीन बोटे मुडपून हाताच्या तळव्याला स्पर्श करुन असतात ) यामध्ये झोपतात.

जेव्हा तुम्हाला अतिशय थंडी वाजत असते तेव्हा तुम्हाला आदि मुद्रेमुळे मदत होईल. या अवस्थेमध्ये काही काळ श्वसन करा.

थंडीच्या दिवसांमध्ये केवळ तुमचा लँपटाँप किंवा काँम्प्यूटर घेऊन आभासी जगात जाऊन बसू नका. आपापल्या घरांमधून बाहेर या, २०-४० जणांचा गट बनवा, गा आणि उत्सव साजरा करा. मग तुम्हाल हताश किंवा निराश वाटणे शक्यच नाही. मला वाटते की याची गरज आहे. प्राचीन काळी लोकांनी हेच तर केले. ते शेकोटी पेटवायचे, गप्पा मारायचे, आणि कूटाळकी करायचे.

थंड हवामान हे ध्यानाकरिता फार चांगले आहे. मन एकदम स्थिर होते कारण निसर्गसुद्धा स्थिर असतो म्हणून.

लोक हिमालयात ध्यान धारणेकरिता जायचे कारण निसर्ग शांत आणि निरव आहे. मुक्त उर्जाभाग अवतीर्ण होतो, चुका घडून येत नाहीत. मन एकदम शांत होते, आतून फार छान वाटते.

प्रश्न : आपण जन्माला का आलो आहोत? आपण खातो, पितो,झोपतो; एका नात्यातून दुसऱ्या नात्यात अडकतो. जीवनाचा अर्थ काय आहे?

श्री श्री : हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ज्याला याचे उत्तर माहिती आहे तो तुम्हाला सांगणार नाही. जो तुम्हाला याचे उत्तर सांगेल त्याला ते माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे का? याचे कारण असे की हा प्रश्नच एक वाहन आहे जे तुम्हाला तुमच्या घरी घेऊन जाईल. ‘जीवनाचा अर्थ काय? जीवनाचा हेतू काय? ' असे तुम्ही जेव्हा पुनःपुन्हा विचाराल तेव्हा असंबंधित असलेल्या सर्व गोष्टी निघून जातील, आणि आयुष्यात पुढे जाण्याकरिता वस्तुस्थिती स्पष्ट होईल. म्हणून, मी उत्तर न देणे हेच बरे आहे, परंतु हा अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे.

हाच तो प्रश्न आहे ज्याने तुमचा जीवनाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरु होतो. याच्याआधी तुम्ही केवळ अस्तित्वात असतात, परंतु या प्रश्नाने तुम्ही अध्यात्मिक मार्गावर चालू पडता.

प्रश्न : आपण ग्रहण करीत असलेल्या अन्नामध्ये सुधारणा केल्याने आणि तुम्ही श्वासोत्श्वास आणि ध्यान केल्याने तुम्ही स्वप्ने अधिक स्पष्ट होत जातात काय?

श्री श्री : हो. स्वप्नांची प्रत नक्कीच सुधारते.

प्रश्न : कित्येकवेळा आपल्याला आपली स्वप्ने लक्षात का राहत नाही? हे आपण ग्रहण करीत असलेल्या अन्नाचा परिणाम आहे का मग आपण ध्यान करीत नाही म्हणून?

श्री श्री : आपल्याला आपली सर्व स्वप्ने लक्षात ठेवण्याची गरज नाही. हे चांगले आहे की आपल्याला ती लक्षात राहत नाहीत. तसे झाल्याने, आपण अधिक वर्तमान क्षणात असतो. स्वप्न हे स्वप्न आहे, ते गेले तर गेले.

प्रश्न : आपल्या बघण्यात अनेक मुळे आहेत ज्यांना अॅलर्जी आहे आणि ज्यांची प्रतिकार शक्ती क्षीण आहे. लहान मुलांना तर तणाव नसतो. त्यांच्या भल्याकरिता आपल्या जीवन शैलीत काही फरक आपण आणू शकतो काय?

श्री श्री : नक्कीच. मुलांना टीव्ही समोर अथवा व्हिडिओ गेम समोर फार वेळ सोडू नका. त्यांच्या प्रभावाचा मारा मुलांच्या लहानश्या मेंदूवर फार काळ होतो. त्याने त्यांच्या डोळ्यावर परिणाम होतो; त्यांच्यात लक्ष केंद्रित न होण्याचा आजार बळावतो, आणि इतर गोष्टी. 

म्हणून मुलांनी फार काळ टीव्ही समोर घालवू नये,जास्तीत जास्त दिवसाचा एक तास. आजकाल तर मुले उठल्या उठल्या टीव्ही लावल्या जातो आणि ते बसून कार्टून बघत बसतात. ते शाळेत जातात आणि आल्यानंतर पुन्हा ते कार्टून समोर बसतात. जेवतानासुद्धा सगळे लक्ष कार्टूनवरच असते. मी बरोबर बोलतो आहे ना?

आपल्या मुलांच्या भल्याकरिता आपण हे टाळले पाहिजे. हे माझे मत आहे, आणि मुलांचे अनेक डॉक्टर माझ्याबरोबर सहमत होतील.

प्रश्न : गुरुदेव, मुलांनी व्हिडिओ गेम खेळू नये असे तुमचे म्हणणे आहे का?

श्री श्री : त्यांनी कधीच व्हिडिओ गेम खेळू नये असे माझे म्हणणे नाही.

मेंदूला चालना देणारे अनेक खेळ आहेत जे मुले खेळू शकतात. हिंसात्मक व्हिडिओ गेम आपण टाळावे येवढेच मी सुचवू इच्छितो. त्यांच्या इवल्याश्या मनांना आभासी जग आणि खरे जग यातील फरक काळात नाही. आभासी जगतात त्यांनी कितीही जरी गोळ्या झाडल्या तरीसुद्धा लोक पुन्हा उठून उभे राहतात. म्हणून त्यांना वाटत की खऱ्या जगातसुद्धा, आभासी जगाप्रमाणेच, लोक पुन्हा उठून उभे राहतील जर त्यांनी लोकांना गोळ्या झाडल्या तरी. अनेक गुन्हे घडतात कारण त्यांच्या वैचारिक प्रक्रीयेमध्ये खरे जग आणि आभासी जग यातील फरक अदृश्य होऊन जातो.

मी खेळांच्या बाजूने आहे. मुलांनी खेळ शिकले पाहिजे. मी मुलांनी व्हिडिओ गेम खेळायच्या किंवा टीव्ही बघण्याच्या विरुद्ध नाहीये, परंतु यात खूप वेळ घालवू नये; रोजचा केवळ एक तास.

अपमान- एक छुपा आशीर्वाद

17
2013
Apr
कँलगँरी, कॅनडा

प्रश्न : मी माझ्या अतिशय बलवान अहंकारापासून सुटका कशी मिळवू?

श्री श्री : अरे, कृपा करून असे करू नका! तुम्ही स्वतःच्या अहंकारापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करू नका.

जर तुम्हाला तुमचा अहंकार तुमची सर्वात मोठी समस्या वाटत असेल तर त्याला खिश्यात किंवा पर्समध्ये ठेवा. त्याला असू द्या.

जर तुमचा अहंकार तुम्हाला त्रास देत असेल तर स्वतःला संपूर्णपणे अपमानित करून घ्या. तुम्ही असे कराल का? बस्स हेच तर आहे! सर्वात मोठी समस्या ही आहे की तुम्हाला अपमानित व्हायचे नाही. अपमानित व्हा आणि तुम्हाला दिसून येईल की तुमचा अहंकार नाहीसा झाला आहे. 

जीवनात जर कोणी कुठे तुम्हाला अपमानित केले तर लक्षात ठेवा की ती तुम्हाला मृदू बनवण्याची योजना आहे. हा एक आशीर्वाद आहे; या प्रसंगाला तुम्ही सुहास्य वदनाने सामोरे जायला पाहिजे. सुरुवातीला तुम्हाला अस्वस्थ वाटेल, परंतु तुमच्यात बदल घडून येतो आहे, ज्याने तुम्ही इतके आश्चर्यचकित व्हाल. नंतर कोणीही तुमच्या आतील हास्य, प्रेम आणि अनुकंपा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही.

आपण कधीही अपमान किंवा टीका यापासून अंग चोरता कामा नये. जर टीका मिळाली तर तिचा स्वीकार करा.

तुम्हाला माहिती आहे आपण किती वेळा आपल्या मुठी घट्ट आवळतो; मी हा असाच आहे, हे माझे, माझे, माझे आहे!  आणि ज्याक्षणी कोणीतरी आपल्यावर टीका करते तेव्हा आपण मागे हटतो. आपल्याला इतरांच्या टीकेची इतकी भीती वाटते. मी तर म्हणतो की ही सर्वात कमकुवत माणसे आहेत.

जर कोणी तुमच्यावर टीका केली तर त्याचे स्वागत करा! जर त्यात काही तथ्य असेल तर ते घ्या. ते तुमच्यावर टीका करून, तुमच्या विरुद्ध बोलून तुमची मैत्री हरवण्याचा धोका स्वीकारत आहेत.

तुम्हाला हे माहिती असले पाहिजे की लोक आहेत ती तुम्हाला या जगात निभावून नेण्यास मदत करण्यासाठी. लोकांकडे शत्रू म्हणून पाहू नका. जगाला शत्रू आणि विरोधकांनी भरलेले मानतात जे ते मूढच आहेत. जे जगाकडे मित्रांनी भरलेली जागा मानतात आणि ही सर्व लोक केवळ मदत करण्यासाठीच आहेत असा विचार करतात ते बुद्धिमान आहेत. 

एका बुद्धिमंतांच्या दृष्टीकोनातून पाहाल तर असे दिसून येईल की जो कोणी तुमच्यावर टीका करीत आहे तुमच्यासाठी तो काही चांगले करीत आहे. ते तुमच्या चुका दाखवीत आहेत, तुमची मैत्री तुटण्याचा धोका स्वीकारून.

नाहीतर सामान्य माणूस केवळ असे म्हणेल,’ ठीक आहे, आपण या अमुक तमुक माणसाची मैत्री का तोडायची? केवळ छान छान गोष्टी बोलायच्या आणि रामराम. तुमचे दुर्गुण दर्शवण्याची काय गरज.’

म्हणून जेव्हा कोणी तुमच्यावर टीका करीत असेल तर ती ऐका. जर त्या टिकेमध्ये काही तथ्य असेल तर तिचा स्वीकार करा. जर त्या टिके मागे मत्सर असेल तर त्यांच्या प्रती अनुकंपा दर्शवा. ती त्यांची समस्या आहे; ते त्यांच्या मत्सरावर उपाय करतील. ते त्यांचे नैराश्य तुमच्यावर काढीत आहेत. आणि एका दृष्टीने ते नैराश्य बाहेर काढून त्यांचे मन हलके करण्यास तुम्ही त्यांची मदत करीत आहात.

जर ते अनुकंपेने, तुमच्याबरोबर असलेल्या मैत्री खातर बोलत असतील तर तुमची त्या दृष्टीने त्याचा स्वीकार कर. तर, तुम्हाला शांत मनाने रचनात्मक टीका करता आली पाहिजे, आणि त्याच शांत मनाने टीकेचा स्वीकार करता आला पाहिजे. याने तुमच्या अहंकाराचे रुपांतर होईल.

प्रश्न : गुरुदेव, कृपा करून तुम्ही इच्छाहिनतेबाबत बोलू शकाल काय?

श्री श्री : हे पहा, आपली ज्ञानेंद्रिये ही निसर्गतः बाहेरच्या दिशेन धावत असतात. हा नैसर्गिक कल असतो, जेव्हा तुम्ही झोपून उठता, तेव्हा डोळ्यांना बघायचे असते, कानांना ऐकायचे असते, नाकाला वास घ्यायचा असतो, त्वचेला स्पर्श हवा असतो, आणि जिभेला चाखायचे असते. तर ज्ञानेंद्रियांचे बाहेरच्या दिशेने धावणे आणि समस्त निर्मितीची मजा लुटणे हा नैसर्गिक कल असतो. परंतु मजा लुटायची ज्ञानेन्द्रीयांची क्षमता फार मर्यादित असते.

आज आपण बागेत गेलो आणि तेथील दृश्य फार सुंदर होते, पण तुम्ही किती वेळ ते सुंदर दृश बघत बसणार?

ज्ञानेन्द्रीयांद्वारा मजा लुटायची इच्छा सर्व प्रथम मनात उठते, परंतु ज्ञानेंद्रियांची क्षमता मर्यादित असते.

समजा तुम्हाला गोड खायला किंवा सफरचंदाची खीर खायला आवडते; खाऊन खाऊन तुम्ही किती खाणार? एक वाटी, दोन वाट्या, तीन वाट्या? तीच तुम्हाला आवडणारा पदार्थ तिसऱ्यांदा जेव्हा तुम्हाला वाढल्या जाईल तेव्हा तो त्रासदायक होईल. याचे कारण असे की आपल्या ज्ञानेन्द्रीयांद्वारा मजा लुटायची आपली क्षमता मर्यदित आहे.

मनाची जास्तीतजास्त पाहिजे असण्याची हाव आणि ज्ञानेन्द्रीयांकडे असलेली मजा लुटायची मर्यादित क्षमता  यामध्ये नेहमीच असंतुलन दिसून येईल.

याचे तीन प्रसंग असू शकतील :

१. गोष्टी उपलब्ध नसणे; मनाला अन्न पाहिजे असेल परंतु ते उपलब्ध नसेल.
२. अन्न उपलब्ध असेल परंतु मनाला त्याची मजा लुटायची इच्छा नसेल.
३. मनात इच्छा असेल, अन्नसुद्धा उपलब्ध असेल, परंतु ज्ञानेन्द्रीयांना त्याची मजा लुटायची
     कार्यक्षमता नसेल.

तुम्हाला हे तीन प्रसंग कळताहेत का?

एक सद्गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला,’ गुरुदेव, मी ५० वर्षाचा आहे आणि मी जोडीदार शोधात आहे, पण मला योग्य व्यक्ती मिळत नाहीये’.

मी म्हणालो, ‘ थांब, आणि अजून २० वर्षे शोध घेणे सुरु ठेव!’

जर तुम्ही त्याबाबत इतके चोखंदळ असाल, आणि काही तरी शोधात असाल, तर मग तुम्हाला ते जरी मिळाले तरी तुम्हाला त्यात मजा येणार नाही. का? कारण तुमचे मन त्यावरून उडून गेले असेल. उपलब्ध असलेल्या गोष्टी, मनाची प्रवृत्ती आणि ज्ञानेन्द्रीयांची क्षमता यांच्यामध्ये असंतुलन असते; या सगळ्यांची जुळून येणे जरुरी आहे. केवळ तेव्हाच तुम्हीला या ग्रहावर काही आवडू शकेल. 

मनाची चळवळ, गोष्टींची उपलब्धता, आणि ज्ञानेन्द्रीयांची क्षमता, यांचे कधीही एकमेकांबरोबर जुळून येत नाही.

आता समजा की सगळे काही उपलब्ध आहे. तुम्हाला भूक लागलेली आहे, तुम्हाला अन्न पाहिजे आहे, आणि तुम्हाला त्यात मजा येणार आहे, परंतु हे फार क्षणिक आहे. हे फार थोडा काळ राहते आणि मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या. असे सगळे आहे! आणि यातून काय निष्पन्न होते? वैफल्य!

पूर्ण झालेल्या इच्छेने विफलता येते, अपूर्ण असलेल्या इच्छेनेसुद्धा नैराश्य येते. आपण काय केले पाहिजे? काय उत्तर आहे?

उत्तर आहे आत बघणे. जिथून आनंद निर्माण होतो त्या आनंदाच्या स्रोत्राकडे जा. जेव्हा तुम्ही आनंदाच्या उगमस्थानाकडे जाता तेव्हा ज्ञानेन्द्रीयांची क्षमता वाढते, मनात समाधान निर्माण होते, आणि तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने वस्तू उपलब्ध होतात. तिन्हीपण होते जेव्हा ज्ञानेन्द्रीये आतल्या दिशेने वळतात, आणि हे ज्ञानेन्द्रीयांचे आत वळणे म्हणजेच इच्छाहीनता होय. 

आपल्याला इच्छाहीनता, उत्कटता आणि अनुकंपा या तीन गोष्टींची आयुष्यात गरज आहे. 

आपण नेहमी असा विचार करतो की इच्छाहीनता म्हणजे कंटाळवाणे, निरास आणि रसहीन आहे; आणि अशीच तर स्वतःला इच्छाहीन म्हणवणारी लोक असतात, निर्जीव. नाही, असे असणे म्हणजे इच्छाहीनता नव्हे. माझ्या मते इच्छाहीनता म्हणजे जे जिवंत आणि उत्साहाने खळाळणारे असते.

संस्कृतमध्ये एक जुनी म्हण आहे, ‘ कोणता आनंद, कोणती मजा अशी आहे जी इच्छाहीनता तुमच्यापर्यंत आणू शकत नाही?’

याचा अर्थ असा की इच्छाहीनता तुमच्याकडे ते सगळे आनंद घेऊन येईल जे तुम्हाला नेहमी जीवनात पाहिजे होते. 

तुम्हाला उत्कटतेची गरज आहे. तुमचे श्वास आत घेणे उत्कटता आहे, तुमचे श्वास बाहेर सोडणे उत्कटता आहे आणि या दोन्हीच्या मध्ये अनुकंपा आहे.

जर तुमच्याकडे केवळ उत्कटता असेल तर तुम्ही थकून जाल आणि निराश व्हाल. ज्या लोकांकडे तीव्र उत्कटता असते, ते अनेक गोष्टी करतात आणि शेवटी थकून जातात. तुम्हाला माहिती आहे का? कारण ते त्याला पकडून बसतात. ते त्यांचे हृदय आणि आत्मा त्यामध्ये ओततात. ते इतका ताण देतात, आणि तरीसुद्धा त्यांच्या हातात काहीही गवसत नाही. ही अतिशय दुर्दैवी स्थिती आहे.

हे अनुकंपेने बदलू शकते, आणि म्हणूनच अनुकंपेमुळे इतका मोठा फरक येतो.

तर जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा उत्कटता, जेव्हा तुम्ही आतल्या दिशेने वळता तेव्हा इच्छाहीनता आणि सदैव अनुकंपा ही गुरुकिल्ली आहे.

प्रश्न : जेव्हा तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्या व्यक्तीचे दुसऱ्यावर प्रेम असेल तर काय करावे?

श्री श्री : तुमचे प्रेम अटरहित असण्याची ही परीक्षा आहे हे जाणून घ्या. ते तुम्हाला अटरहित प्रेमात पडण्याची संधी देत आहेत. 

तुम्ही याचा उपयोग बलवान होण्यास आणि प्रेमात वृद्धिगत होण्यास वापरू शकता किंवा मग तुम्ही निराश, हताश, क्रोधीत आणि मत्सरग्रस्त होऊ शकता.

तुम्हाला काय आवडेल? मत्सरामध्ये वाढ होणे आणि मत्सराच्या सर्व भावना तुम्हाला ग्रस्त करणे; वाईट वाटणे, निराश होणे आणि तुमच्या कंपनांना खराब करणे, किंवा दुसऱ्यांकरिता आनंदी होणे, तुम्ही प्रेम करीत असलेल्या व्यक्तीला उत्तम शुभेच्छा करणे!

मला माहिती आहे की दुसरा पर्याय फार कठीण आहे, परंतु पहिलासुद्धा सोप्पा नाहीये. मत्सर जवळ बाळगून राहणे हे तर अजून कठीण आहे, हो ना? याचा विचार करून पहा.

असो, आयुष्य फार छोटे आहे. सगळे काही एक दिवशी संपून जाणार आहे. याचा विचार करा, तुम्हाला फार शांत वाटेल.

जेव्हा कधी तुम्ही क्षुब्ध व्हाल, तुम्हाला अन्यायची,अस्वस्थतेची जाणीव होईल, किंवा तुम्हाला झोप येत नसेल किंवा परिस्थिती हाताबाहेर असेल, तेव्हा लक्षात ठेवा की हे सर्व संपणार आहे! सगळ्याचा अंत होणार आहे, आणि तुम्ही इथून गेलेले असाल. तुम्हाला छान झोप लागेल. पुन्हा, हे इच्छाहीनता झाली.

प्रश्न : कृपा करून पाचवी ते तेरावी मिती, आणि परिमाण भौतिकशास्त्र आणि अध्यात्म यांच्यातील नाते याबद्दल चर्चा करावी. 

श्री श्री : वेदांत हे शुद्ध परिमाण भौतिकशास्त्र आहे.

वेदांत काय म्हणतो किंवा वेदांचे ज्ञान काय आहे की संपूर्ण निर्मिती ही एकाच गोष्टीपासून बनलेली आहे, इथे दोन गोष्टी नाहीत. आणि अगदी हेच परिमाण भौतिकशास्त्रसुद्धा सांगते की सर्व काही तरंग लहरींचे काम आहे. अशा प्रकारे जे भिन्न वाटत असले तरी तो केवळ भास आहे, आणि वास्तविक पाहता हे सर्व काही केवळ एकच आहे.

जगातील श्रेष्ठ भौतिकशास्त्रज्ञांपैकी एक बंगलोर आश्रमात बोलत होते. ते म्हणाले,’ मी ४० वर्षे द्रव्याचा अभ्यास केला, केवळ याचा शोध लावण्यास की ते अस्तित्वात नाही. त्याल अस्तित्वच नाही!’ ते नेहमी म्हणायचे ,’ जेव्हा मी बोलतो तेव्हा लोकांना वाटते की मी पुरातन तत्वज्ञान बोलतो आहे, जे अगदी बरोबर आहे कारण हे सर्व काही नाहीच आहे! अध्यात्मिक ज्ञानसुद्धा हे सांगते की सगळे काही नाहीये, आणि काही नाही ते सर्व काही आहे. 

तुमचे ध्यान ही तुमची काही नाहीबरोबर भेट घेण्याची नियोजित वेळ आहे! 

प्रश्न : गुरुदेव, तुम्ही मला ॠषी कपिलबद्दल जास्त सांगू शकाल काय? त्यांच्याबद्दल फार थोडे माहित आहे.

श्री श्री : ॠषी कपिल हे कँलिफोर्नीया येथे राहत होते. त्यावरूनच कँलिफोर्नीया हे नाव पडले. कपिलारानिया हे कँलिफोर्नीयाचे वैदिक नाव आहे.

एके काळी वैदिक ज्ञान हे संपूर्ण दक्षिण अमिरेका आणि उत्तर अमेरिका येथे प्रचलित होते. शास्त्रांमध्ये असे म्हंटले आहे की भारत आणि कपिलारानिया यांच्यात १२ तासांचा फरक होता.जेव्हा तिथे दिवस असतो तेव्हा इथे रात्र असते आणि त्याचप्रमाणे उलटे; आणि हे कँलिफोर्नीयाला,ज्याला कपिलारानिया म्हणतात, त्याला एकदम समर्पक आहे.

कपिल हे देवाहुती या महिलेचे पुत्र होते. आजचे डेट्रॉईट शहराचे देवाहुती बरोबर काही नाते आहे, आणि देवाहुती या नावातूनच डेट्रॉईटला त्याचे नाव मिळाले.

देवाहुतीचा पुत्र कपिलारानिया कँलिफोर्नीयाला राहायचा. तो भगवान कृष्णाचा आधीचा अवतार होता. तो संख्या दर्शन  या तत्त्वज्ञानाचा शोधकर्ता होता.

संख्या म्हणजे निरनिराळे घटक आणि तत्वे ज्याने संपूर्ण विश्व बनलेले आहे उदाहरणार्थ पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी इत्यादी मोजणे. याचप्रमाणे २४ वेगवेगळी तत्वे त्यांच्या तत्वज्ञानात उपस्थित आहेत, म्हणून त्याला संख्या योग असे म्हणतात.

चेतना आणि द्रव्य कसे भिन्न आहेत याबद्दल त्यांचे भाष्य आहे आणि चेतना आणि द्रव्य यांचे नाते त्यांनी तपशीलवार विवरण केले आहे.

भगवद्गीतेचा दुसऱ्या अध्यायालासुद्धा संख्या योग  म्हंटले आहे, यामध्ये भगवान कृष्ण मन आणि आत्मा हे द्रव्यापेक्षा कसे वेगळे आहेत आणि आत्मा अमर आहे हे सांगतात. हे स्वयंचे ज्ञान दिले गेले आहे.

प्रश्न : संस्कृतींमध्ये मतभेद का होतात? माणुसकी लुप्त का पावते? कृपा करून तुम्ही यावर काही प्रकाश पडू शकाल काय?

श्री श्री : हा फार चांगला प्रश्न आहे. आज बंगलोर आणि बॉस्टन इथे बाँबस्फोट झाले. ही असहिष्णुता झाली, अहिंसेची संस्कृती हरवली आहे. म्हणूनच आपण सर्वांना आपले काम केले पाहिजे. तुम्हाला नाही का वाटत? आपण सर्वांनी मिळून काही काम करूया का?

दुर्दैवाने भारतातसुद्धा, राजकारण्यांनी परिस्थिती खराब करून ठेवली आहे. लोकांना सर्वसाधारण शिक्षण देण्याऐवजी ते जातीय-आधारित शिक्षण संस्थांना प्रोत्साहित करीत आहेत. यामुळे केवळ उग्रवादाला खतपाणी मिळते आहे. हे फार दुर्दैवी आहे.

याप्रकारचा धार्मिक उग्रवाद संपला पाहिजे, नाहीतर हे जग सुरक्षित जागा उरणार नाही.

सत्य आणि वास्तव याची विशाल समजूत असणे जरुरी आहे. प्रत्येक धर्माचा आदर करा, सगळ्यांना मान द्या. केवळ माझा मार्ग हा देवाचा मार्ग आहे आणि बाकीचे सगळे नरकात जाणार आणि मी फक्त स्वर्गात जाणार असे म्हणू नका.

अशा प्रकारचे लोक बाकीच्यांचे जीवन नरक बनवतात. या लोकांना वाटते की इतर धर्मियांना मार्गातून काढून टाकून ते देवाची सेवा करीत आहेत. हे अतिशय दुर्दैवी आहे.

मुलांना शिकवणे जरुरी आहे. नाहीतर, हेच सत्य आहे,बाकीचे सर्व अश्रद्धावान लोक आहेत आणि त्यांना जगण्याचा काही अधिकार नाही असा विचार करीत मोठे होतील. याप्रकारची मनोवृत्ती फार घातक आहे.

तुमच्यापैकी कितीजणांना ही समस्या वाटते? आपण ही मनोवृत्ती बदलली पाहिजे, विस्तीर्ण समजूत आणली पाहिजे, आणि आपण सर्वांनी यादिशेने काम केले पाहिजे.

आपण इथे बोलत असताना, तिथे इराकमध्ये एक कार्यक्रम होतो आहे. आरोग्य मंत्री आणि खेळ मंत्री यांनी येऊन इराकमध्ये तरुणांनी आयोजित केलेल्या आपल्या शिबिराचे उत्घाटन केले.

आज त्यांनी दुसरी सुदर्शन क्रिया केली, आणि त्यांच्या समजुतीमध्ये संपूर्णपणे रुपांतर घडून आले आहे. या तरुणांना आता जनतेपर्यंत पोच्याचे आहे, त्यांना योग, ध्यान आणि सुदर्शनक्रिया करायला लावायची आहे. ही अतिशय चांगली बातमी आहे. आपण हे करायला पाहिजे; आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायला पाहिजे.

प्रश्न : कोणत्याही कार्याची अथवा नात्याची सुरुवात फार मस्त असते; ते टिकवणे कठीण. एखादी व्यक्ती किंवा प्रसंगापासून मी अलिप्त होतो जेव्हा त्याचा अंत जवळ येतो. मी माझी उर्जा कायम कशी काय टिकवून ठेवू?

श्री श्री : तो सगळा भूतकाळ सोडून द्या,आत्ता जागे व्हा! ‘अरे मी कमकुवत आहे, मी हे करू शकत नाही, मी ते करू शकत नाही’, असे स्वतःला लेबल लावू नका. तो सगळा भूतकाळ होता!

तुम्ही काय किंवा कोण आहात हे तुम्हाला माहित नाही याचा स्वीकार करा. तुमच्याकडे किती उर्जा आहे हे तुम्हाला माहिती नाही; तुम्ही काय करू शकता ते तुम्हाला माहिती नाही, आणि बस्स इतकेच!तुमच्यात तुम्हाला एक नवीन उर्जेचा संचार होताना जाणवेल, आणि तुमची मनोवृत्ती, तुमची वागणूक, तुमची जाणीव आणि तुमची अभिव्यक्ती या सगळ्यात बदल घडून येईल.

तुम्ही जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी जे स्वतःला लेबल लावले आहेत ते केवळ तुम्हाला काढून टाकायचे आहेत. कळले?

प्रश्न : मला असे सांगितले गेले आहे की जेव्हा गुरु एका व्यक्तीकडे पाहतात तेव्हा ते त्याला एक व्यक्ती म्हणून न पाहता त्याचे वलय बघतात, काय हे खरे आहे का?

श्री श्री : मला वाटते की त्याबाबत तुम्ही तर्क करीत राहा.

अपरिपूर्णतेत परिपूर्णता बघणे

13
2013
May
बंगलोर, भारत

आज आपण “कुमुदवती नदीच्या” पुनरुथानच्या प्रकल्पचा अहवाल सादर करत आहोत. “समृद्ध भारतासाठी स्वयंसेवक”  या योजनेत स्वयंसेवकांनी कोरड्या पडलेल्या नदीचे पुनरुजीवन करून उत्तम काम केले आहे. ही नदी बंगलोर शहरासाठी पाण्याचा स्त्रोत होती. या नदीच्या पुनरुजीवानाचे काम पूर्ण झाल्यानंतर बंगलोर शहराचा ६०% टक्के पाणी प्रश्न सुटेल. याशिवाय ३०० गावांचा यापासून फायदा होईल.

जवळपास २० तलाव पुनरुजीवीत करण्यात आले आहेत, आणि हे सर्व काम स्वयंसेवक करत आहेत. ज्या स्वयंसेवकांनी गेले ३ महिने अत्यंत मनापासून, आठवड्यात ७-८ तास या साठी काम केले त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो.

बदल घडवण्यासाठी आपल्याला अश्याच ध्येयाची गरज आहे. जीवनात सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आपल्याला अश्याच ध्येयाची गरज आहे.

आज आपण “श्री श्री ओर्गनिक“ ची सुद्धा सुरुवात करत आहोत, जेणे करून ज्या शेतकर्यांना त्यांच्या सेंद्रीय उत्पादनांना भाव मिळत नाही त्यांना काळजी करावी लागू नये. त्यांनी फक्त आपल्या कृषी विभागाशी संपर्क साधावा, त्यांना मदत मिळेल. आपण त्यांना रसायनमुक्त शेती कशी करावी हे शिकवू, आणि त्यांचे उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायला मदत करू.

त्यानंतर “घर तिथे वीज”  उपक्रम, जो आपल्या श्री श्री ग्रामीण विकास उपक्रमांतर्गत येतो. यात स्वयंसेवकांनी ज्या घरात वीज नाही तिथे वीज आणली. काही महिन्यात ४००० घरात वीज आली आहे, ही एक मोठीच उपलब्धी आहे. ४००० घरात जिथे वीज नव्हती तिथे आज सौर वीज आहे, नैसर्गिक वीज. यातील कित्येक घरे अशी आहेत जिथे अजून रस्ते सुद्धा नाहीत, पण वीज आहे.

आज सकाळी उठल्यानंतर माझ्या मनात विचार आला, एखाद्या सत्पुरुषात, चांगल्या लोकांत देवत्व पाहणे यात काही अवघड नाही, पण मूर्ख, वाईट लोकांमध्ये देवत्व पाहणे हे मोठे अवघड आहे. मूर्ख, वाईट लोकांमध्ये देवत्व पाहणे कठीण आहे. याच लोकांचा तुमच्या मनाला त्रास होतो. जेंव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेंव्हा तुम्हाला कशाचा त्रास होतो? याच वाईट आणि मूर्ख लोकांचा, बरोबर?

असे बघा की ते सुद्धा त्याच परमात्म्याचे स्वरूप आहे. त्याने तुमचे मन एका चेतनेच्या वेगळ्या स्तरावर जाईल. तुमच्या चेतनेचा स्तर वाढला हि तुम्हाला ते अद्वैत दिसून येईल, ते एकच देवत्व सगळीकडे आणि सगळ्यात आहे. यामुळे ध्यान चांगले लागायला मदत होईल.

याउलट आपण काय करतो? जेंव्हा आपल्याला कृती करायची असते तेंव्हा आपण म्हणतो “हे जरी ठीक नसेल तरी काय ही सगळी देवाची करणी आहे” जेंव्हा आपण असा विचार करतो तेंव्हा आपण आपले ध्येय, उत्साह गमावून बसतो. ही चुकीची धारणा आहे.

जेंव्हा तुम्हाला अंतर्मुख व्हायचे असेल (ध्यान करायचे असेल) तेंव्हाच तुम्हाला अशी धारणा ठेवावी लागेल कि “सगळे ठीक आहे”. जेंव्हा तुम्हाला कृती करायची असेल तेंव्हा तुमची बुद्धी वापरा, तुमचे कौशल्य वापरा. ज्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे तिकडे लक्ष्य द्या. चुकीचे काय बरोबर काय हे जाणून चांगले काम करा.

आपण जर यातला फरक जाणून घेतला तर आपली आंतरिक शक्ती वाढून जीवन फुलेल.

ज्ञानामध्ये असणे हीच खरी भक्ती आहे

12
2013
May
बंगलोर, भारत.

(आर्ट ऑफ लिविंगच्या बंगलोर येथील आंतरराष्ट्रीय कँम्पस इथे नवीनच बांधलेल्या गुरु पादुका वनम येथे हजारोंच्या वर ग्राम देवता एकत्रित झालेल्या होत्या. मधोमध पाणी असलेले अंडाकृती बदामी प्रेक्षागृह जे सुंदर सजवलेल्या देवी देवतांनी खचाखच भरून गेलेले होते. हे दृश्य अतिशय स्वर्गीय होते खास करून जेव्हा या सर्व देवांची एकाच वेळेस आरती केली तेव्हा. नगारे, चिपळ्या, शंख आणि वाजणाऱ्या घंटा याने वातावरणाला उत्सवाचे स्वरूप आले होते. या घटनेचे महत्व स्पष्ट करणारे श्री श्री यांचे भाषण खालीलप्रमाणे ) 

दोन प्रकारच्या शक्ती ( उर्जा ) जगाचे रक्षण करीत आहेत. एक आहे दैवी शक्ती ( देवांची उर्जा ) आणि दुसरी आहे असुरी शक्ती ( असुरांची उर्जा ). सकारत्मक घटक आणि नकरात्मक घटक यांच्यातील संघर्ष चालूच राहतो. जेव्हा सकारात्मक घटकांचा विजय होतो तेव्हा जगात समाधान, आराम आणि आनंद नांदते. जेव्हा नकारत्मक घटकांचा विजय होतो तेव्हा समस्या आणि हिंसाचार निर्माण होतो. शेवटी, नेहमी विजय हा सकारत्मक घटकांचाच होतो, परंतु नकारात्मक घटक हे अधून मधून आपले डोके वर काढीत असतात.

आज, १००८ गावांमधून निरनिराळ्या ग्राम देवतांचे इथे आगमन झाले आहे. काही गावांचे मुख्य सांगत होते की त्यांच्या ग्राम देवता या गेल्या ६० ते ६५ वर्षांहून अधिक काळापासून आपापल्या गावांमधून हललेल्या नाहीत. ही पहिली वेळ आहे जेव्हा ह्या ग्राम देवता त्यांचे गाव सोडून इथे आलेल्या आहेत.

तर निरनिराळ्या गावांमधून लोकांनी त्यांची पूजनीय ग्राम देवता इथे आणलेल्या आहेत. 

प्रत्येक गावामध्ये आपल्या पूर्वजांनी ग्राम देवतेला आवाहन केले.

एखाद्या मूर्तीला तुम्ही देवता  म्हणून कधी मान देता? जेव्हा एक सिद्ध ( अध्यात्मिकरित्या परिपूर्ण अथवा साक्षात्कारी ) पुरुष मंत्रांचे उच्चारण करून मूर्तीमध्ये दैवी प्राण शक्तीचे ( जीव शक्तीचे ) आवाहन करतो तेव्हा ती मूर्ती देवता बनते.

एका जागेचे अथवा भूभागाचे ( क्षेत्राचे ) रक्षण करणारे देवता आहेत म्हणून त्यांना क्षेत्र पाल असे म्हणतात. समस्त लोकांना त्या देवतेबद्दल अतिशय आदर आणि श्रद्धा असते, आणि स्वतःच्या भल्याकरिता ते तिची पूजा करतात.

संस्कृतमध्ये ‘ निलीम्पा-परिषद ‘ ( याचा अर्थ देवांची परिषद ) असा शब्द आहे.

ज्याप्रमाणे आपल्याकडे संसद आणि राज्य विधान सभा आहेत त्याप्रमाणेच देवांची स्वतःची परिषद आहे.

तर आज उत्सव साजरा करण्याकरिता इथे देवतांची( गंधर्वांची ) परिषद जमलेली आहे. आपण सर्व ठिकाणहून देवतांना इथे आणलेले आहे.

वडीलधार्यांनी, ‘ स्थान प्रधानम न तू बल प्रधानम ‘, असे म्हंटलेले आहे.

देव हे मंदिराच्या खांबामध्येसुद्धा असतात परंतु आपण केवळ गर्भ गृहामधील देवाचीच पूजा करतो. केवळ शक्ती असून उपयोग नाही तर त्याचबरोबर स्थान असणे जरुरी आहे. आपण देवतेला एक स्थान देतो. ग्राम देवता  जर समाधानी असतील तरच प्रगती होऊ शकते.

जर ग्राम देवता समाधानी पाहिजे असतील तर लोकांमध्ये एकजूट असायला हवी. सगळे चांगले असले पाहिजे आणि समृद्धी नांदली पाहिजे. जर लोकांच्या मनामध्ये उदासी आणि तिरस्कार असेल तर ग्राम देवतेला  अतिशय दुःख होते.

ग्राम देवतेला  आनंदी करण्याकरिता आनंदोत्सव साजरा केला पाहिजे. गावातील प्रत्येकाने भूतकाळ विसरून देवाने जे सर्व काही दिले आहे त्याबद्दल आभार मानाण्याकरिता एकत्र आले पाहिजे.

आपण जाती, जमाती आणि धर्म यांच्यातील फरक बाजूला ठेवून आजचा दिवस साजरा केला पाहिजे आणि आपली काळजी घेणाऱ्या एका देवाचे आपल्यावर राज्य चालते याची आपण आपल्यालाच आठवण करून द्यायला पाहिजे.

प्रत्येक गावामध्ये ग्राम देवतेचे  हेच महत्व आहे.

जेव्हा एक व्यक्तीमध्ये हा विश्वास येतो की त्याने देवासमोर शरणागती स्वीकारली आहे तेव्हा तो त्याची प्रत्येक कर्तव्ये ही ,मालकाप्रमाणे न करता, सेवकाप्रमाणे इमानदारी आणि कृतज्ञतेने करतो. ( म्हणजेच अहंकाराशिवाय आणि कर्त्याची भूमिका न स्वीकारता ). 

समाजामध्ये दोन प्रकारचे लोक असतात : एक प्रकारचे लोक म्हणतात ,’ मी कोणीही नाहीये. मी केवळ देवाचा दास आहे’. दुसऱ्या प्रकारचे लोक असतात जे विचार करतात, ‘ मी सर्व काही आहे.’

गावात किंवा शहरात जर कोणती समस्या असेल तर ती केवळ अहंकारामुळे आहे. अहंकार कोणत्याही चांगल्या कामावर पाणी फिरवते. त्या अहंकाराला नरम करण्यासाठी म्हणून समस्त निष्ठा देवाच्या मूर्तीमध्ये ठेवणे गरजेचे ठरते.

इथे, अहंकार म्हणजे दूर-अहंकार ( वाईट आणि चुकीच्या दिशेने नेणारा अहंकार )असे मला म्हणायचे आहे. ग्राम देवतेची प्रस्थापना केली जाते म्हणजे लोकांमध्ये अहंकार किंवा असुरी प्रवृत्ती ( राक्षसी प्रवृत्ती ) राहणार नाही. जेव्हा लोक देवतेला मान देतात आणि तिची पूर्ण श्रद्धेने पूजा करतात तेव्हा ते खरे बोलतात आणि सत्याच्या मार्गावर चालतात.

तुम्हाला माहिती आहे की पूर्वीच्या काळी कायद्याची न्यायालये नव्हती आणि लोकांना ग्राम देवते  समक्ष उभे केले जायचे? लोकांचे आपापसात जे काही भांडण असेल ते देवतेच्या समोर सोडवल्या जायचे. तर तंटे सोडवण्यात, गुन्हाल्या माफी देण्यास आणि परिसरात सगळे कायद्याचे पालन करतात याची खात्री करण्यास ग्राम देवता एका न्यायाधीशाचे काम करायची.

परिसराचा कारभार ग्राम देवतेच्या  नावाने चालवल्या जायचा.

आजसुद्धा जेव्हा कधी कोणी व्यक्ती कार्यालयाचे कामकाज हाती घेताना देवाच्या नावाने शपथ घेऊनच सुरुवात करतो. जेव्हा कोणी मंत्री बनतात तेव्हा ते देवाच्या नावाने शपथ घेऊन नंतरच मंत्रिपद हाती घेतात. हे करण्यामागे देवाची उपस्थिती आठवणे आणि ती मान्य करणे हा हेतू असतो. लोकांना देवाच्या उपस्थितीची आठवण करून देण्यास आणि त्याच्या उपस्थितीचा त्यांना अनुभव येण्याकरिता म्हणून ग्राम देवतांची  प्रतिष्ठापना केल्या गेली होय.

याचा अर्थ असा नाही की देवाची उपस्थिती केवळ एक मूर्तीमध्येच मर्यादित होती. हे केवळ लोकांना ते करीत असलेल्या प्रत्येक कार्यात आणि त्यांना मिळवायच्या असलेल्या प्रत्येक गोष्टीत देवाच्या उपस्थितीची जाणीव करून देण्याकरिता होते.

म्हणून आज इथे इतक्या गावांमधून जमलेल्या या सर्व देवतांची आराधना करण्याची सुसंधी आपल्याकडे चालून आली आहे.

जेव्हा सर्व देवता एकत्र जमतात तेव्हा तो यज्ञ  होतो. आज इथे प्रचंड मोठा यज्ञ  झालेला आहे. सर्व देवता इथे आलेल्या आहेत आणि त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. प्रत्येक अणुरेणुमध्ये दैवी शक्ती  ( सकारात्मक उर्जा ) नांदते आहे. ध्यान, सत्संग आणि पूजा याद्वारे अश्या शक्तींचे जागर करणे यालाच यज्ञ म्हणतात.

तर आपण सगळे ज्ञान यज्ञ, ध्यान यज्ञ, जप यज्ञ आणि कीर्तन यज्ञ  करीत आहोत. ही संस्कृती फक्त भारतातच आहे आणि याचे जतन करणे आणि विकसित करणे जरुरी आहे. याला कोमेजून जाऊ देऊ नका. ग्राम देवतेचा उत्सव प्रत्येक गावावामधून साजरा होण्याची आपण खात्री करणे जरुरी आहे.

कायम देवाची आठवण ठेवा, इतरांच्या उपयोगी पडा आणि आनंदी राहा.

‘दैवाधीनां जगत सर्वं’, या जगावर देवाचे शासन आहे.

‘मंत्राधीनां तू दैवतां’, देवता या मंत्राने प्रशासित होतात. ज्यांना मंत्राची परिपूर्णता साधली ते देवाच्या योग्यतेचे होतात. म्हणूनच मंत्र घोष आणि ध्यान यांना इतके महत्व दिल्या गेले आहे. देवतांचे नियमित मंत्रोच्चारण आणि प्रार्थना यांच्यामुळे सुखसोयी आणि धन प्राप्ती होते. जे काही आपल्याला मिळाले ते आपण इतरांबरोबर वाटून घेतले पाहिजे. दैवी शक्तीची आराधना करणे आणि समाज असुरी शक्तींपासून मुक्त होऊ दे अशी प्रार्थना करणे हेच धर्माचे सार आहे.

इतर देशांमध्ये ते म्हणतात , ‘ आम्ही जाऊन नकारात्मक घटकांबरोबर लढा देऊ ‘. भारतात, आपण म्हणतो , ‘ आम्ही दैवी शक्ती ( सकारात्मक घटकां ) चा उपयोग असुरी शक्ती ( नकारात्मक घटकां ) च्या नायनाटाकरिता करू’. सकारात्मक घटक सशक्त आहेत याची आपण खातरजमा करणे जरुरी आहे. आणि ते कसे होईल? उपासना, उत्सव साजरा करणे आणि यज्ञ केल्याने साध्य होईल.

आजचा उत्सव साजरा करणे एक भाग आहे. पण तुम्ही हेसुद्धा लक्षात घ्या की सर्व देवता ( येथे दिव्यत्वाची निरनिराळी रूपे या संदर्भाने ) तुमच्या आतच आहेत. असे म्हणतात की ३३ कोटी देव हे तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये आहेत. जेव्हा आपण शांत आणि आत्मसमाधानी असतो, जेव्हा मन उल्हासित असते, तोच नैवैद्य  असतो.

जेव्हा मनात ज्ञानच प्रकाश असतो तेव्हा तीच देवाची साधना असते.

जेव्हा तुम्हाला प्रत्येकाबद्दल प्रेमभावना असते तेव्हा तीच देवाला पुष्पांजली असते.

तर देवतांना पुष्पांजली  अर्पित करणे काय असते? सर्वांकरिता प्रेमभावना फुलून येणे हे होय. आरती  काय आहे? जेव्हा हृदयात ज्ञानाचा दिवा प्रकाशमान होतो; ;मी शरीर नाहीये, मी शुद्ध चेतना आहे. मी ना जन्मलेलो आहे ना मी मृत्यू पावू शकतो. मी अमर आहे. मी सनातन आहे’, ही जाणीव जेव्हा उदय पावते.

या ज्ञानात असणे हीच दिव्यत्वाची खरीखुरी आरती  आहे.

तर, अशा प्रकारे तुम्ही पूजा करून तुमच्यातील ३३ कोटी देवतांची आराधना करा. हे उच्चकोटीचे ज्ञान आहे हे लक्षात ठेवा.

मानवी जीवन अतिशय मौल्यवान आहे

27
2013
Apr
नुसा डुआ, बाली

 

जीवनात तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात : उत्कटता, वैराग्य आणि करुणा. 

जीवनात उत्कटता असणे आवश्यक आहे. उत्कटता असेल तरच तुम्ही कोणतेही काम करू शकता काहीतरी साध्य करू शकता. त्यामुळे आपल्याकडे उत्कटता असणे गरजेचे आहे.

उत्कटते बरोबरच वैराग्य सुद्धा गरजेचे आहे. फक्त उत्कटता असून भागणार नाही. असे लोक आहेत की ज्यांच्यात खूप उत्कटता आहेपण त्याने ते थकून जातात, पटकन दमून जातात.लवकरच त्यांची दमछाक होते आणि कधी कधी त्यांना नैराश्यही येते. कारण त्यांच्या उत्कटता खूप असते पण त्यांना हवे तसे परिणाम दिसत नाहीत.

म्हणूनच उत्कटते बरोबरच तुमच्यात वैराग्य असण्याचीही गरज आहे. ते सुरक्षा वॉल्व सारखे असते. त्याने तुमच्यात समजूतदारपणा येतो आणि तुम्ही स्वस्थ चित्त रहाता. हे असे आहे की, श्वास आंत घेणे म्हणजे उत्कटता आणि बाहेर सोडणे म्हणजे वैराग्य. 

उत्कटता आणि वैराग्याबरोबारच करुणेचीही आवश्यकता असते. वैराग्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते, उत्कटतेमुळे तुम्ही गोष्टी चांगल्या प्रकारे साध्य करू शकता आणि करुणेने तुमचे व्यक्तिमत्व चमकून दिसेल. आपल्याकडे उत्कटता, वैराग्य आणि करुणा तिन्ही असायला हवे. जीवनात या तिन्हीचा समतोल असणे ही मूलभूत गरज आहे.

त्यानंतर तुम्हाला हे माहिती असणे गरजेचे आहे की कुठे आणि किती करुणा असायला हवी. जर तुमचे मूळ शाळेत जायचे नाही म्हणून रडत असेल तर तुम्ही करुणामय होऊन असे म्हणू शकत नाही की, ‘ मी किती करुणामय आहे,मुलाला शाळेत नको जाउदे, घरीच राहू दे.’ नाही !

जर कुणी चुकीच्या गोष्टी करत असेल, कुणी अंमली पदार्थांच्या, दारुच्या व्यसनात अडकून स्वत:चे आयुष्य बरबाद करून घेत असेल तर तुम्ही असे म्हणू शकत नाही की, ‘मला त्यांच्याबद्दल किती करुणा वाटते आहे.’ इथे तुमची करुणा म्हणजे तुमचा मनाच्या खंबीरपणा. तुम्ही खंबीर रहायला हवे.

तर, आपण लोकांशी कश्याप्रकारे वागावे याबद्दलचे, जीवनाचे हेच सूत्र आहे.

हे प्रसंग, या घटना आणि हे जीवन यापेक्षाही श्रेष्ठ असे काही तरी आहे. याहूनही खूप जास्त गूढ असे काहीतरी आहे. जे खरे जग वाटते त्यापेक्षाही खूप जास्त वास्तव असे काही तरी. हे स्वीकारल्याने जीवनाला एक व्यापक असा दृष्टीकोन प्राप्त होतो. तुमची नजर दररोजच्या ठरलेल्या साचेबंद भौतिक जीवनाकडून जास्त उच्च अशा सत्याकडे जाते.

कल्पना करा, हा चंद्र अब्जावधी वर्षांपासून अस्तित्वात आहे. ही पृथ्वी १९ अब्ज वर्षांपासून अस्तित्वात आहे. आणि तुम्ही इथे कधीपासून आहात ? अगदी थोड्या काळापासून. विचार करा, ५० वर्षे, ६० वर्षे किंवा ३० वर्षे ? आणि आणखी किती काळ इथे रहाल ? आणखी ३०,४० वर्षे, बास ! संपलं ! तरीही आपले मन म्हणत असते, ‘ नाही, मी तर इथे कायमचाच आहे !’ 

सहसा असे दिसते की, मुले मोठी होताना तुम्हाला दिसतात पण तरीही तुम्हाला वाटत असते की तुम्ही तसेच आहात. तुमच्यापैकी किती जणांना असा अनुभव आहे ? ‘मुलं व्यवस्थित मोठी झाली आहेत आणि मी तसाच आहे, माझं वय वाढलच नाहिये.’

हे खरे आहे. तुमच्यात असे काही तरी आहे जे स्वीकारत नाही की तुम्ही जन्मलात किंवा तुम्ही मरणार आहात. तुमच्या आत्म्यात, मनात तुमच्यात खोलवर कुठेतरी – आत्मा, जो कधीही वयस्क होत नाही, अजिबात बदलत नाही, मग तुमच्या आसपासचे सगळे काही बदलले तरीही. आणि या जन्माच्या आधीही हा आत्मा होताच.

आणि हा काही एकच जन्म नाहिये. अनेकानेक जन्मात इथे होतोच.

जर कुणाला एकावेळी एकच दिवस लक्षात राहिला. दुसऱ्या दिवशी त्यांना लक्षात राहिले नाही की ते आदल्या दिवशी काय होते. किंवा कल्पना करा की कुणाची कल्पनाशक्ती इतकी कमी आहे की त्यांना फक्त सकाळपासून रात्री पर्यंतचेच लक्षात राहते; त्यांना आदल्या दिवशीचे काहीच लक्षात रहात नाही किंवा उद्याचा दिवस असेल हेही त्यांच्या लक्षात येत नाही.

हे म्हणजे स्मृती भ्रंश झालेल्या लोकांसारखे झाले, ज्यांना काहीच आठवत नाही. आपली सर्वांची अशीच मनस्थिती आहे. जेव्हा कुणी भरपूर दारू ढोसली असेल तेव्हा तेसागलेच विसरतात. त्यांना काहीच आठवत नाही. त्याचं प्रमाणे आपल्यालाही आठवत नाही की आपण याआधीही इथे होतो आणि यानंतरही इथे असणार आहोत आणि अजारो वर्षे आपले अस्तित्व असणार आहे. या सत्याकडे आपण बघायला हवे. मग जीवनाबद्दलचा एक खूप व्यापक दृष्टीकोन मिळतो.

इथे बालीमध्ये ही सगळी देवळं तुम्ही बघितलीत. या देवळांमध्ये देवाची मूर्तीच नसते. तुम्हाला माहित आहे, असे कां ? कारण ते आपल्या पूर्वजांसाठी असते. पूर्वजांच्या आत्म्यासाठी ते योग्य जागा ठेवतात.

देवांसाठीपण देवळे आहेत. इतके सारे देव आहेत. ते येतात, इथे बसतात, तुम्हाला आशिर्वाद देतात आणि तुमची काळजी घेतात. असा इथे विश्वास आहे. खरे म्हणजे हा नुसता विश्वास नाही ते वास्तवही (सत्यही) आहे.

वास्तवाचे (सत्याचे) अनेक स्तर आहेत.

सर्वात पहिला आहे प्रकाश, सर्वश्रेष्ठ, एक देव, अनेक देव नाही, फक्त एकच, जो परमात्मा आहे. परमात्म्याच्या खाली अनेक निरनिराळ्या शक्ती किंवा देवदूत किंवा देव आणि देवी आहेत.

या शक्तींच्या, देवदूतांच्या किंवा देवांच्या खाली अनेक मृतात्मे आहेत.

आणि या मृतात्म्यांच्या खाली आपल्याला जे दिसते ते व्यक्त जग आहे.

तर, आपल्याला दिसते ते हे अभिव्यक्त जग आहे. मग, काही सूक्ष्म शक्ती आहेत ज्या चांगल्या आणि वाईट आहेत. त्यावर देव, पूर्वज आहेत आणि त्यानंतर परमात्मा, दिव्यत्व, देव किंवा त्याला तुम्ही जे काही म्हणत असाल ते आहे.

हे जग म्हणजे सत्याचे स्तरावर स्तर, स्तरावर स्तर, स्तरावर स्तर आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही या देहाचा त्याग करता तेव्हा तुमचा आत्मा बाहेर पडतो आणि बराच काळ दुसऱ्या एका परिमंडलात रहातो, जोपर्यंत त्याला परत येण्यासाठी दुसरे शरिर मिळत नाही. हे जीवन, आपले मानवी जीवन अतिशय मौल्यवान आहे कारण या जीवनातून तुम्ही प्रकाशात विलीन होणार आहात. या जीवनात तुम्ही प्रेम व्यक्त करू शकता. मानवी शरिर अतिशय मौल्यवान आहे.

मी म्हटले त्याप्रमाणे इथे ही जी सगळी देवळे आहेत. हे असे सांगण्यासाठी की दैवत्व निराकार आहे पण त्याचे अस्तित्व आपल्याला इथे जाणवते.त्यामुळेच असे म्हटले आहे की, अस्तित्व जाणवणे. अगदी आठवणींसारखेच. जे पैलतीरावर पोहोचले आहेत अशा आई, वडील, आजी- आजोबा हे नेहमीच टीमच्या मनात असतात, हो की नाही ? त्यांचे अस्तित्व जाणवू शकते, आपल्या आठवणीत ते जाणवतात. त्याचप्रमाणे विविध देवता, देवदूत किंवा देव, देवी आपल्या शरीराच्या निरनिराळ्या भागांसाठी अस्तित्वात असतात.

शरीराचा प्रत्येक भाग विशिष्ठ देवतेच्या हुकमती खाली असतो. आपण जशी त्यांची आठवण करतो तस् तसे ते हजर होतात. आपल्याला त्यांचे अस्तित्व जाणवते.

जगातील जवळ जवळ सर्वच परंपरांमध्ये हा विश्वास आहे. अगदी मेक्सिको,दक्षिण अमेरिका ते मंगोलिया. तरीही विश्वास असून भागत नाही.

तुम्ही ध्यान करता तेव्हा काय होते माहित आहे कां ? तुम्ही वास्तवाच्या इतर परिमंडलांशी चांगला संबंध जोडत असता. 

जेव्हा मन स्थिर असते, ध्यान लागलेले असते तेव्हा तुम्ही फक्त तुमच्या स्वत:च्या शरीरातील प्रत्येक पेशीचे शुद्धीकरण करत नसता तर, तुम्ही तुमच्या सर्व सभोवताली सकारात्मक ऊर्जा पसरवत असता. हे जग सोडून पैलतीरावर गेलेल्या लोकांनाही तुमचे ध्यान शांती आणि आनंद मिळवून देतो आणि हे फार फार महत्वाचे आहे. तुम्ही जेव्हा मौनात शांत असता तेव्हा जगातील गोष्टी तुम्ही तुमच्या मनात शिरू देत नसता , तुम्ही स्वत:ला मुक्त होऊ देऊन, शरीराची, मनाची शुद्धी होऊ देत असता. या काळात काही विचारांचा तुमच्यावर भडीमार सुरु असतो. काही जुन्या गोष्टी मनात येऊन तुम्हाला त्रास देऊ शकतात. काही हरकत नाही. घाबरून जाऊ नका. तुम्ही बसला आहात हेच खूप चांगले आहे. जे छोटे ते सगळे चांगल्यासाठीच.

जर जुने विचार मनात येऊन तुम्हाला त्रास देत असतील तरी हरकत नाही, ते येतात आणि जातात. तरीही, मौनात रहाणे हे खूप मौल्यवान आहे, फक्त तुमच्यासाठी नाही तर सूक्ष्म सृष्टीसाठीही. आणि जगासाठीसुद्धा कारण तुम्ही तुमच्या दर मिनिटाच्या ध्यानात, दर मिनिटाला अशा काही सकारात्मक लहरी निर्माण करत असता की बास !

त्याशिवाय, पूर्णचंद्र, समुद्र आणि ध्यान सगळे अगदी छान जुळून येते.

मन अति जास्त क्रियेमध्ये गुंतले की ते क्षोभीत होते. अधून मधून तुम्ही कामातून बाहेर येता तसे क्षोभ नाहीसा होतो आणि ध्यान होऊ लागते.

शब्दांविना संवाद

09
2013
Mar
बंगलोर, भारत

आपल्या मनात येणारे विचार आपण बघणे आणि निरीक्षण करणे जरुरी आहे, ते सगळे विचार निरुपयोगी आहेत.

मनातील प्रत्येक विचार हा भूतकाळाबद्दल आहे. हे मनात उठणारे विचार हे चेतानेवर भूतकाळाचे प्रक्षेपण असते. भूतकाळात जे काही झाले त्याचेच प्रक्षेपण आपण भविष्यकाळावर करीत असतो. तर भूतकाळाचे विचार मनात सतत येत असतात. ‘हे ठीक आहे, ते ठीक नाही. मला अमुक आवडते,मला तमुक आवडत नाही’.

तुम्ही काय करणे जरुरी आहे तर या विचारांची मोळी बांधा आणि त्यांना बाहेर फेकून द्या. हे सगळे विचार निरुपयोगी आहेत हे केवळ लक्षात घेतल्याने तुमचे मन मुक्त होते. 

तुम्हाला कळते आहे का मी काय म्हणतो आहे ते?

आज, इथे बसलेल्या तुमच्यापैकी काही जणांना याचा अनुभव येत आहे. याला म्हणतात मौन संवाद. जेव्हा तुम्ही मौनामध्ये खोलवर जाता तेव्हा तुम्हाला याचा अनुभव येतो.

हे काय आहे? विचारांव्यतिरिक्त संवादाचा तुम्हाला अनुभव येतो; काहीही न बोलता तुम्हाला समजते की तुम्हाला काय सांगितले जात आहे. तेव्हाच तुमच्या मनातील सगळे प्रश्न नाहीसे होतात.

प्रश्न हे इष्ट स्थळी पोहचण्याची गाडी आहे. प्रश्नांची उत्तरे ही गाडीच्या इंधानाप्रमाणे आहेत. म्हणून जेव्हा प्रश्नाला उत्तर मेलाते तेव्हा गाडी आगेकूच करणे सुरु करते. अर्थात प्रश्नोत्तराचा उपयोग न करता  तुमच्या इष्टस्थानी परस्पर पोहोचणेसुद्धा शक्य आहे. कसे? मौनामध्ये बसून. मौनाचे हे महत्व आहे. जेव्हा तुम्ही मौनामध्ये बसता आणि एखादा प्रश्न मनात येतो तेव्हा त्याचे उत्तरसुद्धा त्याप्रश्नासोबत येते. तुमच्याबरोबर असे घडले आहे का? तुमच्यापैकी कितीजणांना याचा अनुभव आला आहे? ( अनेक जण त्याचे हात वर करतात ) 

मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे; जुनीच तरीसुद्धा नवीन गोष्ट. हे सगळे प्रश्न आणि उत्तरे हे सगळे विचार आहेत; आणि इतर जे काय विचार तुमच्या मनात आहेत त्यांची मोळी बांधा आणि फेकून द्या. केवळ मौन धरा! आणि मगच उत्सव साजरा करणे शक्य होईल. नंतर उत्साह संचारेल आणि मग चैतन्य फुलून येईल.

नाहीतर मग तुम्ही जितके विचारांच्या विळख्यात अडकाल तितके तुमचे चैतन्य जडत्वाच्या दिशेने सरकेल.

जे कोणी विचारांच्या विळख्यात अतिप्रमाणात अडकते त्यांच्या जडत्व किंवा अचेतना येते; याचा अर्थ असा की त्यांच्यात अजिबात उत्साह नसतो.

लहान मुलांकडे पहा,त्यांच्याकडे काय असते? त्यांच्याकडे उत्साह असतो, उत्सव साजरा करण्याची भावना असते, प्रेम आणि आतून एक प्रकारची चमक असते. त्यांना फार कमी विचार असतात, नाही का? जेव्हा जेव्हा तुम्ही लहान मुलांना पाहता तेव्हा असे भासते की जसे काही त्यांचे चैतन्य हे ( आनंदाने) ओसंडून जात आहे.

महाशिवरात्र यासारख्या सर्व सणांचे साजरे करणे हे याकरिताच असते. तुम्ही बाकी सर्व सोडून देण्याकरिता!

बाकीचे सर्व टाकून द्या आणि शिव तत्त्वामध्ये चिंब भिजा. शिवासारखे व्हा, याचा अर्थ असा के त्या निरागसतेच्या भावनेला अनुभवा. निरागसता म्हणजे काय? विचारांच्या विळख्यात न अडकणे, केवळ साधे आणि नैसर्गिक असणे, आणि स्वयंमध्ये आकंठ बुडून जाणे. थोड्या वेळाकरिता संगीतामध्ये स्वतःला चिंब करा.

हे साधण्याकरिता संगीत, प्रार्थना, मंत्रांचा जप, भक्ती, श्रद्धा ही सर्व माध्यमे आहेत. गुरु एक माध्यम आहे. पूजा ही एक माध्यम आहे. हे सर्व आपल्याला आपल्या स्वयंबद्दल जागरूक करतात.

प्रश्न : गुरुदेव, भगवद्गीता म्हणते की आपण कर्ता नाही. आपल्यामार्फत कोणीतरी काम करीत आहे, आपण माध्यम आहोत. आपण म्हणतो की भविष्य हे इच्छास्वातंत्र्यनुसार आहे आणि भूतकाळ हे दैवानुसार आहे. मला यात थोडा विरोधाभास वाटतो. कृपा करून याचे स्पष्टीकरण द्या.

श्री श्री : दोन गोष्टी आहेत; एक आहे कर्ता आणि दुसरा आहे मझा घेणारा. जर तुम्ही कर्ता आहात तर तुम्ही मझा घेणारेसुद्धा आहात. जर तुम्ही कर्ता नाही तर मग तुम्ही मझा घेणारेसुद्धा नाहीत.

म्हणून जेव्हा तुम्ही म्हणता,’मी ते केलेले नाही’, तेव्हा तुमच्यातील एक भाग आहे जो त्याचे परिणाम आणि त्या कृतीने प्रभावित होत नाही. आणि तुमच्यातील दुसरा भाग आहे जो सगळे काही करतो आहे आणि त्याचे परिणाम भोगतो आहे अथवा त्याची मझा लुटतो आहे. तर तुमच्यात दोन बाजू आहेत.

उपनिषदामध्ये सुंदर सादृश्य आहे.

याविश्वाच्या वृक्षावर दोन पक्षी बसलेले आहेत. एक कृतीच्या परिणामांची मझा लुटतो आहे तर दुसरा केवळ त्याचा साक्षीदार आहे. ही तत्त्वज्ञानाची गहनता आहे.

जस जसे तुम्ही ध्यानामध्ये खोल जाऊ लागतात आणि अधिकाधिक समजून घेऊ लागता तास तसे तुम्हाला असे घडताना आढळून येऊ लागेल. केलेले काम अतिशय उत्तम असो अथवा सर्वात वाईट असो, कुठेतरी आत तुम्हाला जाणवेल की मी ते केले नाही, ते तर आपोआप घडले. 

तुम्हाला असे जाणवले आहे? माझ्याकडून ते घडले, मी ते केलेले नाही.  तेच तर आहे. तेच तर आहे जे गोष्टी घडवून अनंते. आणि दुसरी गोष्ट आहे मी कर्ता नाही ही भावना. हा ‘न-कर्ता ‘ दिग्दर्शक आहे.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, मी सांख्य योगा बद्दल वाचले आहे परंतु मला ते समजू शकले नाही. कृपा करून समजावा. संसारिक कार्यांमध्ये गुंतलेले असताना आम्ही त्याचे अनुसरण करू शकतो का हेसुद्धा समजावा.

श्री श्री : हो, निश्चितच तुम्ही अनुसरण करू शकता. सांख्य योग म्हणजे जागे होणे आणि पाहणे की हे सगळे अस्तित्वात नाही. केवळ एकच अस्तितवात आहे, आणि सर्व काही त्याच्यामार्फत चालते. हेच पहा ना विचारसुद्धा काही नसतात, सर्व काही केवळ तरंग लाहिरी असतात.

सांख्य योग म्हणजे आत्मा अमर आहे. माझ्यामध्ये असा अंश आहे जो नष्ट पावत नाही, कमी होत नाही किंवा वृद्ध होत नाही हे समजणे. मी म्हणजे हे शरीर नाही  हे जाणून घ्या आणि आरामात रहा. केवळ हे जाणून, आणि स्वयंमध्ये आराम करणे यालाच सांख्य योग म्हणतात.

प्रश्न : गुरुदेव, गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते कसे सुरु होते आणि त्याची प्रगती कशी होते हे कृपा करून समजावा.

श्री श्री : तुमचे स्वतःबरोबर नाते काय आहे? तुम्ही स्वतःपासून काही लपवता का? नाही, त्याचप्रमाणे गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते आहे. तुम्ही स्वतःच्या स्वयंचे काय आहात? तुम्ही पुत्र आहात, वडील आहात किंवा भाऊ आहात? तुम्ही स्वतःच्या स्वयंचे काय आहात?

( उत्तर : मी सर्वस्व आहे. )

हो,मग तेच गुरूच्याबाबतीतसुद्धा लागू पडते.

प्रश्न : गुरुदेव, मी माझे आंतरिक अंतिम स्थळ, माझे खरे ध्येय कसे शोधू? किंवा मी शोधणे सोडून देऊ?

श्री श्री : मला वाटते की ही फार चांगली कल्पना आहे, शोधणे सोडून द्या आणि आराम करा. स्वयंमध्ये खोलवर जा.

हे बघा, मनाचा स्वभाव आहे की नितनवीन गोष्टींच्या मागे धावण्याचा. नवनवीन गोष्टी या नेहमी बाहेर असतात,म्हणून मन सतत बाहेरच्या दिशने धावत राहते. अर्थात,जेव्हा मन आतल्या दिशेने प्रवास सुरु करते तेव्हा ते नवीन गोष्टीनासुद्धा जुन्या गोष्टी म्हणून ओळखू लागते.

तुम्हाला नवीन अनुभव तेव्हाच मिळतो जेव्हा तो नवीन भासत नाही परंतु खूप ओळखीचा आणि जुना वाटतो. म्हणून त्याला नित्य नूतन  म्हणतात ज्याचा अर्थ आहे सदोदित नवीन, आणि तरीसुद्धा सनातन ज्याचा अर्थ आहे कालातीत अविस्मरणीय.

आत्मा, चेतना ही नित्य नूतन आहे ( सदोदित नवीन ). प्रत्येक क्षणी ती नवीन असते आणि तरीसुद्धा ती सूर्याप्रमाणे सर्वात प्राचीन आहे.

आज सूर्य एकदम नवीन आहे. ताजीतवानी सूर्यकिरणे येत आहेत. तुम्हाला जुनी, शिळी किंवा पुरातन किरणे मिळत नाहीयेत. तरीपण सूर्य नवीन आहे का? नाही, सूर्य प्राचीन आहे. 

चंद्र प्राचीन आहे आणि तरीसुद्धा चंद्राची किरणे कायम ताजी असतात.

आपल्या आत्म्याचे, स्वयंचे सुद्धा हेच आहे. तो नित्य नूतन; सदोदित नवीन आणि तरीसुद्धा प्राचीन. हे परस्परविरोधी आहे; सदोदित नवीन आणि तरीसुद्धा प्राचीन.

प्रश्न : गुरुदेव, मी माझ्या कुटुंबासोबत राहत नाही. माझे वय आता ७६ वर्षे आहे. मला तुमची काहीतरी वस्तू पाहिजे जी मी शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःजवळ ठेवेन. तुम्ही मला काहीतरी दिलेच पाहिजे! तुम्ही काय देणार?

श्री श्री : ही सगळे लोक माझे कुटुंब आहेत, आता ते तुमचेसुद्धा झालेत. आता तर तुमच्याकडे संपूर्ण विश्वच आहे.

हे पहा, वस्तू गोळा करीत राहू नका. जे ज्ञान प्रदान केल्या जात आहे त्याचे ग्रहण करा. कपड्याचा एखादा तुकडा, किंवा माझी एखादी वस्तू गोळा करण्याच्या फंदात पडू नका. हे सर्व सोडून द्या. इतके गहन ज्ञान दिल्या जात आहे. हे ज्ञान ग्रहण करा कारण ते जन्मोजन्म तुमच्यासोबत राहील.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, आर्ट ऑफ लिविंगचे जे शिक्षक आहेत ते तुमच्याबरोबर इतकी जवळीक साधू शकतात आणि तुम्हाला वरचेवर भेटू शकतात. आम्ही जे शिक्षक नाहीत त्यांच्यापेक्षा ते जास्त भाग्यवान आहेत, नाही का?

श्री श्री : हे बघा, जे शिक्षक आहेत ते माझ्या जवळ येऊ शकतात म्हणून शिक्षक नसलेल्यांपेक्षा भाग्यवान आहेत असा विचार करू नका. इथे असलेला प्रत्येकजण भाग्यवान आहे. काहीजण जवळ राहतात तर काही दूर राहतात. त्याचा अर्थ असा नाही की इतरांपेक्षा काहीजण केवळ भाग्यवान. सगळेच्या सगळे माझेच आहेत.
08
2013
Mar
बंगलोर, भारत.


प्रश्न : जर कुणी गुरुच्या सोबत असेल आणि या मार्गावर असेल, तरी सुद्धा धार्मिक विधींमध्ये सहभागी होणं किंवा धार्मिक विधी करणं हे सगळं करायलाच पाहिजे कां ?

श्री श्री : जर गुरुतत्वावर तुमची आढळ श्रद्धा असेल तर दुसऱ्या कशाची आवश्यकता नाही. पण जर तुम्हाला असे वाटत असेल की काही धार्मिक विधी करायला हवे तर तेही ठीकच आहे.

तसेच गुरुतत्वावरील श्रद्धेविना काहीही केले तरी त्याचा काही फायदा होत नाही. गुरुच्या अस्तित्वाशिवाय कोणतीही तंत्र किंवा मंत्र साधना उपयोगाची नाही आणि जर तुम्ही पूर्णपणे गुरूला शरण गेलेले असाल तर या सर्व गोष्टींची फार कमी गरज भासते. पण तुम्हाला तसे करायचे असेल तरी काही हरकत नाही. त्यासाठी हे सगळे पूजाविधी, कर्मकांड अचूक पद्धतीने (धर्म शास्त्रात सांगितल्यानुसार) करणारी व्यक्ती शोधायला हवी. आणि कधी तरी तुम्हीही काही कर्मकांड, धार्मिक विधी (धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार) करायला हरकत नाही. वर्षातून एक दोन वेळा ठीक आहे. त्याचा अतिरेक करू नका.

घरातल्या देवाजवळ अधून मधून दिवा लावा आणि कधी तरी स्वस्थ ध्यानस्थ बसा. ध्यान करणं ही सर्वात चांगली गोष्ट आहे.

जर प्रेम, ध्यान आणि समर्पण भावना असेल तर बाकी सगळे पाठोपाठ येतेच.

कधी तरी दारावर (शुभ संकेत देणारे आणि वाईट प्रवृत्तींना बाहेरच ठेवणारे) तोरण लावून सजवा. हा तोरणाचा अर्थ आहे. आणि जर दारेच नसतील तर तोरण लावण्यात काय अर्थ आहे ?

प्रश्न : गुरुदेव, या सृष्टीमागचा तसेच माया आणि जन्म मृत्यू चक्राचा हेतू काय आहे ?

श्री श्री : तुम्ही क्रिकेट खेळता कां ?

आता मला सांगा,तुम्ही ते कां खेळता? एक बॅट हातात घेऊन खेळपट्टीवर इकडून तिकडे धावणं किती निरर्थक आहे ! त्यात तासंतास वाया कशाला घालवायचे ? करू करून तुम्ही काय करता, तर मैदानाच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाकडे बॉल फेकत असता. हे करून काय मिळते ?

(उत्तर : गुरुजी, ते मनोरंजनाचं एक साधन आहे.)

होय, जसे तुम्ही बॅट आणि बॉल घेउन तुमच्या मनोरंजनासाठी खेळता तसेच ही संपूर्ण सृष्टीसुद्धा देवाचे मनोरंजन आहे. म्हणूनच तर या संपूर्ण सृष्टीला आणि या सगळ्याला देवाची ‘लीला’ म्हणतात.

प्रश्न : गुरुदेव, ही लीला किती काळ चालणार ?

श्री श्री : आता हे सांगणे कठीण आहे. कुणालाच नक्की माहित नाही की हे सगळे कधी सुरु झाले ? त्याचप्रमाणे हेही कुणालाच माही नाही की हे कधी संपणार. तुम्हीसुद्धा या लीलेचा भाग आहात त्यामुळे तुम्हीही याची मजा घ्या.

जेव्हा आपण एखाद्या समस्येत अडकलेले असतो तेव्हाच आपल्या मनात प्रश्न येतो की ‘हे कधी संपणार ?’ पण जेव्हा आपण मजा करत असतो किंवा आनंद उपभोगत असतो तेव्हा आपण कधी विचारत नाही की, ‘ही मजा कधी संपणार ?’ असं करतो कां आपण ? नाही. जेव्हा जीवनाचे ओझे वाटू लागते, बंधन वाटू लागते तेव्हाच आपण आपल्याशीच विचार करतो की,’ यापासून मला मुक्ती कधी मिळेल ?’

असे समजू नका की तुम्ही भविष्यात कधी तरी मुक्त व्हाल. तुम्ही या क्षणालाच मुक्त आहात.हे धरून चाला आणि पुढे जात रहा. 

हा सगळा एक खेळ आहे आणि घटना होतच रहातात. मनात अनेक विचार येतात आणि जातात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुमच्या मनात कसले कसले विचार येतात. तुमच्या मनात येणार्या काही विचारांनी तुम्ही अस्वस्थ होता. पण तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की विचार येतात आणि जातात.त्यात काही अर्थ नसतो. आपल्या विचारांपेक्षा आपण जास्त श्रेष्ठ आहोत. हे लक्षात घ्या आणि निवांत राहा. 

प्रश्न : गुरुदेव, मुस्लीम लोक देवाला ‘अल्ला’ म्हणतात तर हिंदू लोक ‘ भगवान म्हणतात. असे कां ?

श्री श्री : हे बघा, निरनिराळे लोक, निरनिराळ्या भाषांमध्ये एकाच देवाला अनेक नावे देतात. निरनिराळ्या धर्मात त्याचा निराळा अर्थ लावतात. हे तुम्हाला कळले कां ? देव एकच आहे आपण नेहमी हेच म्हणतो. अशी म्हण आहे की, ‘एकम् विप्र बहुदा वदन्ति’ म्हणजे, जे एकाच आहे त्याला विद्वान लोक अनेक नावांनी संबोधतात. आपल्याकडे नेहमी असेच समजले जाते. त्यामुळेच भारतात कोणत्याही वंशाचे लोक आले तरी त्यांचे स्वागतच केले गेले आणि आपल्याला माहित होते की, कोणतेही नाव असले तरी तो देव एकच आहे. आपण लोकांमध्ये कधी भेदभाव केला नाही. आपण असे कधी म्हटले नाही की आमचा देवच तेवढा खरा आहे आणि दुसरे ज्याला पूजतात तो खोटा आहे. जे लोक असे असे म्हणतात आणि इतर लोकांना त्यांच्या धर्मात धर्मांतर करून घेतात ते चुकीची गोष्ट करत आहेत. ‘केवळ माझा देवच खरा देव आहे, बाकीचे सगळे देव खोटे आहेत, त्यामुळे तुमच्या घरातील त्यांच्या तसबिरी काढून टाका’, असे सांगून हे लोक इतरांची दिशाभूल करतात. हे अगदी चुकीचे आहे. 

प्रश्न : गुरुदेव, जेव्हा तुम्ही माझ्या समोर असता तेव्हा तुम्ही स्वप्नवत भासमान वाटता. आणि जेव्हा तुम्ही माझ्या समोर नसता तेव्हा देखील सगळे स्वप्नवत वाटते. असे कां ?

श्री श्री : हे सगळे स्वप्न वाटते आहे, हे तुम्हाला कळते आहे हे चांगले आहे. तुम्ही आता जागे होऊन वास्तवात यायला हवे.

प्रश्न : गुरुदेव, महाशिवरात्रीच्या वेळी संकल्प सोडण्याचे काय महत्व आहे ?

श्री श्री : संकल्प म्हणजे, आपली चेतना विश्वाकडे, असीमतेकडे नेणे. आणि मग मन वर्तमान क्षणात आणून तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करणे. हाच संकल्प आहे.

संकल्प घेताना तुम्ही काहीतरी देता आणि कशाची तरी प्रार्थना करता. सर्व यज्ञ आणि पूजा यांची सुरवात संकल्प सोडूनच होते. जो कोणतीही सेवा करतो तो साहजिकच त्याचा भाग बनतो. जेव्हा यज्ञासाठी एखादा कोणतीही सेवा करतो तेव्हा तो यज्ञाचा भागच बनतो. ते जरी स्वयंपाकघरात सेवा करत असले किंवा भक्तांची काळजी घेत असले तरी तेही यज्ञाचा भाग बनतात.

पण दुसऱ्या कुणासाठी; मित्र किंवा कुटुंबीय यांच्या साठी तुमच्या मनात काही इच्छा असेल आणि यज्ञाचे श्रेय त्यांना मिळावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही संकल्प सोडवा. जेव्हा तुम्ही संकल्प सोडता तेव्हा तुम्ही तुमचे नाव घेता आणि मनातल्या मनात तुमची इच्छा किंवा ती व्यक्ती आठवता आणि मग पुजारी तुमच्यासाठी काही विधी करतात. असेही करता येणे शक्य असते.

ही प्रथा अनेक वर्षांपासून चालू आहे. असे करण्याने कुणाला काही विशेष लाभ होईल असे नाही. पण काही विशेष संकल्प करायचा असेल तर तशीही सोय केलेली आहे.

प्रश्न : गुरुदेव, मन, बुद्धी आणि स्मृती यावर काही संस्कार शिल्लक राहू नयेत म्हणून रोज करण्याचे काही तंत्र आहे कां ?

श्री श्री : निवांत व्हा आणि स्वाभाविक रहा. जर तुम्ही म्हणालात की माझ्या मनावर याचा संस्कार रहायला नको तर तो संस्कार आणखीनच दृढ होईल. जर तो असेल, तर असेल आणि नसेल तर नसेल. निवांत राहा. तुम्हाला असे दिसून येईल की जे बरोबर असेल तेच टिकून राहिल.

तीन गोष्टी ज्यासाठी आपण जगतो

24
2013
Apr
टोकियो, जापान
आपण आयुष्याकडे एका मोठ्या दृष्टीकोनातून बघितले पाहिजे.

आपण हे जे काही जीवन म्हणून आणि हे संपूर्ण जग म्हणून ज्याला समजतो त्याचे आकलन आपल्याला आपल्या ज्ञानेन्द्रीयांमार्फत ओळखतो. हे बघणे,ऐकणे, स्पर्श करणे आणि समजून घेणे याद्वारे होते. या पाच ज्ञानेन्द्रीयांद्वारे मिळणारे ज्ञान हे एका पातळीवर असते. या ज्ञानेन्द्रीयांद्वारा मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा वेगळे उच्च दर्जाचे ज्ञान आहे आणि ते म्हणजे बुद्धीद्वारा मिळणारे ज्ञान.

बुद्धीद्वारा मिळणारे ज्ञान हे ज्ञानेन्द्रीयांद्वारा मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असते. आपण सूर्य उगवताना आणि मावळताना पाहतो, परंतु बुद्धीमुळे आपल्याला समजते की सूर्य ना उगवतो आहे ना मावळतो आहे, ती तर पृथ्वी आहे जी गोल फिरते आहे.

अजून एक प्रकारचे ज्ञान आहे जे की बुद्धीपेक्षादेखील श्रेष्ठ आहे. ते आहे अंतःप्रेरणेचे ज्ञान. मानवप्राणी म्हणून आपल्या सर्वांमध्ये या अंतःप्रेरणेला वाट फोडून द्यायची क्षमता आहे, आणि तेच तर अध्यात्मिक ज्ञान आहे. तुम्ही काळ आणि अवकाश याच्या पलीकडे जाता, आणि तिथून तुम्हाला सत्य दिसून येते.

मला वाटते की तुम्हा सर्वाना कधी ना कधी हा अनुभव आलेला आहे, तुमची बुद्धी काहीही म्हणत असेल परंतु तुमची अंतःस्थ भावना निराळी असते. तुम्हाला असा अनुभव आला आहे का?

तुम्हाला आतून मजबूत अंतःप्रेरणा होती परंतु तुमचा तर्क काहीतरी भलतेच म्हणत होता. तुमची अंतःप्रेरणा संपूर्णपणे वेगळीच होती, आणि तेच तसे घडले. तुमच्यापैकी किती जणांना असा अनुभव आला आहे? ( अनेक लोक हात वर करतात ).

सगळ्यांमध्ये ही मनःशक्ती आहे परंतु ती कशी वापरावी हे माहित नाही.

ही जशी काही खजिन्याची पेटी आहे ज्याला तुम्ही कुलूप तर लावले परंतु त्याची चावी तुमच्याकडे नाही, आणि त्याचे काय करावे हे तुम्हाला काळात नाही. हे तर असे झाले की काँम्प्यूटर तर आहे पण त्याच पासवर्ड माहित नाही.तुमचा फोन लॉक झाला आहे आणि त्याचा कीवर्ड तुम्हाला माहित नाही आणि तो कसा उघडावा हे कळत नाही. आपल्याकडे फोन जरी असला तरी तो वापरता येत नाहीये कारण तो लॉक झाला आहे. आपल्याकडे आयपँड जरी असले तरी ते उघडत नाही कारण ते लॉक झाले आहे आणि तुम्ही कीवर्ड विसरला आहात. आपल्या आयुष्याच्याबाबतीसुद्धा हेच घडते.

आपल्या शरीराला सत्याच्या अनेक मिती आहेत, आणि त्या पातळ्यांवर पोहोचण्याची, इतरांच्या इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आपल्याकडे आहे, आपल्याकडे केवळ पासवर्ड नाहीये. इतके सोप्पे तरीसुद्धा फार फार गहन.

केवळ एक पासवर्ड आणि तुमचा काँम्प्यूटर उघडतो. एकदा का काँम्प्यूटर उघडला की मग सगळी माहिती तुम्हाला मिळते. आपल्या आतील वैश्विक उर्जेबरोबरची संबद्धता, वैश्विक शक्ती जरुरी आहे. एकदा का ती जोडणी झाली की मग विश्वातील कोणत्याही गोष्टीमुळे तुमचे हास्य, उर्जा, उत्साह, आनंद आणि बौद्धिक चमक लोप पावणार नाही. याच्याकरीतच,तुमच्या स्वतःच्या जीवनातील मौल्यवान परिमंडळ तुम्हाला मिळवून देण्याकरिता अध्यात्मिक तंत्रे आहेत.

जरा विचार करा, तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे? तुम्हाला तीन उत्तरे मिळतील. सर्वात प्रथम तुम्ही म्हणाल , ‘ आनंद’.

तुम्ही काम का करता? तुम्ही पैसा का कमावता? कारण तुम्ही आरामात, आनंदात राहू शकाल.

दुसरे आहे प्रेम. समजा तुमच्या जीवनात प्रेम नाहीये तर तुम्हाला या ग्रहावर जगायला आवडेल? तुम्हाला आवडणार नाही. जरा कल्पना करून बघा की या ग्रहावर कोणीसुद्धा तुमच्यावर प्रेम करीत नाही, आणि तुमचे कोणावर प्रेम नाही, मग तुमची इथे असण्याचे कारण काय?

तर, आनंद, प्रेम आणि तिसरी गोष्ट आहे ज्ञान.

या त्या तीन गोष्टी आहेत ज्याच्याकरिता सगळे जगतात, आणि त्या- प्रेम, आनंद आणि ज्ञान या प्रामुख्याने आहेत.

प्रेम अशी गोष्ट आहे जी तुम्ही लपवू शकत नाही. जर तुमच्या हृदयात प्रेम असेल तर ते तुमच्या कृतीतून दिसून येते, ते तुमच्या अभिव्यक्तीतून, तुमच्या चेहऱ्यावरून आविष्कृत होते, आणि ते तुमच्या डोळ्यातून दिसून येते.

तुम्ही जर कोणाच्या डोळ्यात बघितले तर तुम्हाला दिसून येईल की ते काळजीत आहेत, तणावाखाली आहेत, रागावले आहेत किंवा प्रेमात आहेत. तुम्ही तान्ह्या बाळाच्या, कुत्र्याच्या पिल्लाच्या किंवा कुत्र्याच्या डोळ्यात पाहाल तर त्यांच्या सर्वांच्या डोळ्यात तुम्हाला प्रेम दिसेल. सकाल विश्वामध्ये एक बंधक शक्ती आहे ज्यामध्ये सगळे परमाणु बांधल्या गेले आहेत, ज्यामध्ये वृक्ष वाढतात, प्राणी जगतात, वारा वाहतो, पृथ्वी गोल फिरते, आणि ती बंधक शक्ती आहे प्रेम.

प्रेमाला लपवता येत नाही आणि ते पूर्णपणे अभिव्यक्तसुद्धा करता येत नाही. कोणीसुद्धा प्रेम पूर्णपणे व्यक्त करू शकत नाही, त्याला व्यक्त करण्याचा जितका जास्त प्रयत्न कराल तितकी तुम्हाला काहीतरी कमतरता भासेल. तुम्ही त्याला शंभर टक्के व्यक्त करू शकत नाही.

नंतर येते सत्य – तुम्ही सत्याला टाळू शकत नाही, एक ना एक दिवस तुम्हाला त्याला तोंड द्यावेच लागेल. केवळ डोळे बंद केल्याने दिवसाची रात्र होत नाही आणि रात्रीचा दिवस होत नसतो. सत्य तिथेच असते आणि तुम्ही त्याला चुकवू शकत नाही. आणि सत्याची व्याख्या तुम्ही करू शकत नाही. ते इतके प्रचंड आहे की तुम्ही त्याची व्याख्या करू शकणार नाही. 

त्याचप्रमाणे मृत्यू; आपण सगळे एक दिवस मारणार आहोत. आपण सगळे वृद्ध होणार आहोत, तुम्ही त्याच्याकडे पाठ फिरवू शकत नाही.

तिसरी गोष्ट आहे सुंदरता.  सौंदर्याचा ना तुम्ही त्याग करू शकता ना तुम्ही त्याला धारण करू शकता.

जगात सगळ्या समस्या याच्यामुळेच उद्भवतात. आपण सत्याला टाळू पाहतो आणि आपण समस्यांमध्ये अडकतो; आपण प्रेम पूर्णपणे व्यक्त करू पाहतो आणि अडचणीत येतो; आपण सौंदर्य धारण करू पाहतो आणि आपण समस्यांमध्ये सापडतो.

तुम्ही सौंदर्याचा त्याग करू शकता का? जर तुम्ही सौंदर्याचा त्याग करू शकता तर ते सौंदर्य नाही. तुम्ही सौंदर्य धारण करू शकता का? तुम्ही ते धारण करू शकत नाही.

तर आजच्या ज्ञानाचे हे सार आहे. जर तुम्ही केवळ हे लक्षात ठेवले तर दैनंदिन जीवन तुम्हाला त्याची प्रचंड मदत होते आहे असे तुम्हाला दिसून येईल.

सत्याला टाळता येत नाही आणि त्याची व्याख्या करता येत नाही. सौंदर्य ना त्यागता येते ना धारण करता येते. प्रेम लपवता येत नाही आणि ते पूर्णपणे व्यक्त करता येत नाही. या मुद्द्यांवर खोलवर विचार करा आणि अजून ज्ञान तुमच्यात फुलून येईल.

प्रश्न : मी सध्या योग शिक्षक आहे. माझी सर्वात समस्या आहे की लोकांना उद्युक्त कसे करावे? लोक प्रेरित होत नाहीत. लोकांना प्रोत्साहन देण्याकरिता एका शिक्षकाला सर्वात उत्तम सल्ला तुम्ही काय द्याल?

श्री श्री : त्यांना या तीन गोष्टी विचारा : तुम्हाला आनंदी व्हायायचे आहे का? तुम्हाला निरोगी बनायचे आहे का? तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात अधिक वेळ पाहिजे आहे का? जर हो तर मग योग करायला या.

तुम्ही मला १० मिनिटे द्या, मी तुम्हाला दोन तास देईन. जर तुम्ही योग कराल तर तुम्हाला दोन तास किंवा त्यापेक्षा जास्त उर्जा प्राप्त होईल.

योगचा सराव केल्यामुळे तुम्ही कमी आणि गाढ झोपाल, तुम्हाला अधिक उत्साही, अधिक आनंदी वाटेल आणि सर्वांबद्दल तुम्हाला कमालीचे प्रेम वाटेल. अजून अधिक तुम्हाला काय पाहिजे?

’अरे, कोणीसुद्धा प्रेरित नाहीये आणि कोणी येणार नाही’, ही कल्पना सर्वात प्रथम तुमच्या डोक्यातून काढून टाका, तुमच्या मनात हा विचार येता कामा नये. तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमच्याकडे असे काहीतरी आहे जे सर्वाना हवे आहे आणि त्यांना त्याची गरज आहे, आणि ते तुमच्याकडे येणारच.

’अरे, कोणीसुद्धा प्रेरित नाहीये आणि कोणी येणार नाही’, असा विचार जर आपण मनात आणला तर मग कोणीच येत नाही. दररोज टोकियोमध्ये नवीन योग सेंटरचे उद्घाटन होत आहे याचा अर्थ असा की लोकांना ते पाहिजे आहे.

खंबीरपणा, मृदुलता आणि प्रेम

13
2013
Apr
माँन्ट रियल, कँनडा
आज वैशाखी आहे (हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो, विशेषत: सिख लोक पंजाब मध्ये साजरा करतात). धर्माचे संरक्षण करण्यासाठी, राक्षसांचा नाश करण्यासाठी आणि मानवी मुल्यांचे उन्नती करण्यासाठी गुरु गोबिंद सिंह  यांनी आजच्या दिवशी खालसा हा वंश, कुळ चालू केला.

गुरु गोबिंद सिंह  यांचा उपदेश आज हि लागू पडतो.

त्यांनी म्हटले आहे कि, ‘ तुमच्यात चैतन्यपणा हवा, आणि तुमचा स्वभाव सौम्य हवा. तुम्ही अंतर्मनाने अध्यात्मिक असायला हवेत. तुम्ही संत आणि योद्धा दोन्ही असायला हवे.’

त्यांचे म्हणणे असे होते कि तुम्ही अन्याया विरुद्ध आवाज उठवायला हवा. तुम्ही संत बनून, ‘ ठीक आहे, जे काही झाले ते झाले,’ असे म्हणणे योग्य नाही. अन्याया विरुद्ध तुम्ही आवाज उठवायला हवा, आणि त्याचवेळी तुम्ही एका संता प्रमाणे तुम्ही दयाळू असायला हवे.

गुरु गोबिंद सिंह  हे दहावे सिख गुरु होते ज्यांनी दृढता आणि सौम्यता असे दुर्मिळ एकीकरण स्थापन केले.

जेव्हा गुरु गोबिंद सिंह यांनी देहत्याग केला, तेव्हा त्यांनी सांगितले कि, ‘माझ्यानंतर हे पुस्तक म्हणजे ग्रंथ तुमचे गुरु असतील. सर्व ज्ञान या ग्रंथा मध्ये आहे. हे पुस्तक तुम्हाला प्रकाशाकडे जाण्यासाठी मार्ग दाखवेल.

म्हणूनच सर्व गुरुद्वारा (सिख लोक जिथे पूजन करतात) मध्ये गुरु ग्रंथ साहिब एक धार्मिक ग्रंथ तुम्हाला आढळेल.

या धर्म ग्रंथा मुळे मानव जातीला जे ज्ञान मिळते ते अमूल्य आहे. गुरु ग्रंथ साहिब म्हणजे सोळा विविध प्रकारच्या संतांचे आणि त्यांच्या शिकवणीचा संग्रह आहे.

शीख धर्मात दहा गुरु आहेत. या सर्व दहा शीख धर्म गुरुची कथा हि हृदयाला भिडणारी आहे आणि उन्नती करणारी आहे. या सर्व गुरुंनी आपल्या सर्व वैभव संपत्तीचा, प्रामाणिकपणा, निष्पाप आणि चांगुलपणा चे संरक्षण करण्यासाठी त्याग केला. सर्वांना ज्ञान हे साध्या सरळ शब्दात सांगितले गेले.

गुरु नानक देव, शिखांचे पहिले गुरु यांच्या संदर्भात एक छानशी गोष्ट आहे.

जेव्हा त्यांचे पालक त्यांना काही गोष्टी विकायला सांगायचे तेव्हा ते तसे करत असत. ते जेव्हा मोजणी सुरु करीत तेव्हा ते १३ वर अडकायचे, तेरा म्हणजे तुमचा.

ते जेव्हा काम करीत असत तेव्हा त्यांचे लक्ष कामात नसायचे, ते नेहमी ईश्वरामध्ये मग्न असायचे.

गुरु नानक म्हणायचे, ‘मी तुमचा आहे, मी तुमचा आहे, मी तुमचा आहे’.

गुरु नानक यांचे संपूर्ण आयुष्य हे प्रेम, ज्ञान आणि पराक्रमाने भरलेले होते.

शीख धर्मात एक सुंदर अभिवादन आहे, ‘सत सरी अकाल’. हे जगातील सर्वात सुंदर अभिवादन आहे. सत म्हणजे सत्य, सरी म्हणजे वैभव आणि अकाल म्हणजे अनंत. खरे वैभव हे सत्य आहे, जे अनादी अनंत आहे.

सत्य हे अनादी अनंत श्रेष्ठ धर्म आहे आणि हेच खरे वैभव आहे.

तर, तुम्ही सर्वांनी इथे ध्यान करून हे वैभव प्राप्त केले आहे. आणि हेच सत्य आहे ते म्हणजे सत सरी अकाल.

सर्वजण ‘सत सरी अकाल’ असे म्हणतात पण त्यांना त्याचा अर्थ माहित नसतो. हे जगातील सर्वात सुंदर अभिवादन आहे, जे तुम्हाला आठवण करून देते कि सत्य हे अनादी अनंत वैभव आहे.

ज्या अभिवाद्नाची तुम्ही देवाण घेवाण करता, ते तुम्हाला आठवण करून देते कि खरे वैभव हे अध्यात्म, ज्ञान हेच आहे. किती सुंदर आहे ना हे!

‘जो बोले सो निहाल! सत सरी अकाल’ असे जो कोणी म्हणतो (सत सरी अकाल) त्याचा उत्कर्ष होतो.

निहाल म्हणजे अत्यानंद; उन्नती होणे. ‘सत सरी अकाल’ म्हणल्याने तुमचे मन शौर्यानेच भरत नाहीत तर ते अनादी अनंत तत्वाने भरून जाते.

भगवद्गीते मध्ये भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘ओम इते एकाक्श्र्म ब्रम्हा व्याहार्ण मम अनुस्म्रण य: प्रयाति त्याजन देहम परमं गतीम’ (अध्याय ८, श्लोक १३). ह्या ब्रह्मांडात सर्वत्र दैवत्व आहे आणि त्यालाच ओम म्हणतात.

‘एक ओमकार सत नाम’ असे गुरु ग्रंथ साहिब मध्ये म्हटले आहे, ओम एकच आहे,

जे ह्या अनंताचे खरे नाव आहे. ओम हे एखाद्याच्या अहंच्या सखोलता मध्ये अस्तित्वाच्या ध्वनी प्रमाणे आहे. तुम्ही समुद्र किनारी जाऊन जर लाटांचा आवाज ऐकला तर त्या मध्ये तुम्हाला ओम  ऐकू येईल. तुम्ही जर पर्वतावर जाऊन वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज ऐकला तर त्यामध्ये तुम्हाला ओम ऐकू येईल. आपल्या या जन्माच्या आधी आपण ओम मध्ये होतो. या जन्मात मरणानंतर आपण ओम मध्ये विलीन होणार आहोत. आता सुद्धा या सृष्टीच्या सखोला मध्ये ओम चा आवाज दुमदुमतो.

सर्व धर्मात म्हणजेच जैन, बुद्ध, शीख, हिंदू, ओमकार ला अत्यंत महत्व दिले आहे.

ख्रिश्चन मध्ये आमेन, इस्लाम मध्ये अमीन हे पण ओम चा एक प्रकार आहे. या अनंत विविध चेतनाचे नाव ओम आहे.

आज बंगाल, केरळ, तामिळनाडू मध्ये नवीन वर्ष साजरे केले जाते.

प्रश्न: गुरुदेव माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात, पण तरीही ते माझ्या नकारात्मक गुण दाखवायला एक संधी सोडत नाहीत आणि माझा उत्साहावर पाणी पडते. मी काय करावे?

श्री श्री: तुम्ही काहीतरी वेगळे करा. त्याला आश्चर्य चकित करा. जर तो तुमचे नकारात्मक गुण बघत असेल तर तुम्हीं त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करा, त्याची स्तुती करा. त्याला म्हणा. ‘बरोबर, तू म्हणलेले बरोबर आहे! मला हेच तर ऐकायचे होते!’.

प्रत्येक वेळेस एकाच पद्धतीने प्रतिक्रिया दाखवू नका. तुम्हाला ज्या पद्धतीने अभिनय करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही निवड करू शकता. हो कि नाही?

एखादे दिवशी त्याने जर तुमच्यासाठी फुले आणले आणि तुमची स्तुती केली तर तुम्ही तुमची नापसंती दर्शवत विचारा, ‘तुम्ही हे असे का केले?’ जेव्हा तो तुमच्यावर रागवेल तर त्या बद्दल आनंद दर्शवा.

नेहमी लक्षात ठेवा तुमच्या आनंदासाठी तुम्ही जबाबदार आहात. काही झाले तरी कुणीही काहीही म्हणो, तुमच्या मनाची तुम्ही संरक्षण करा आणि तुम्ही आनंदी रहा. तुम्ही निश्चय करा कि, ‘मी माझे सुख कुणालाही हिरावू देणार नाही! जरी माझ्यासमोर देव आला तरी मी त्याला म्हणेन कि “धन्यवाद तुमचे हे मला भेट आहे.”

हा निश्चय आजच करा.

आज वैशाखी आहे. हि तुम्हाला एक चांगली भेट आहे. भेट काय आहे? काही झाले तरी मी या मोह जाळ्यात अडकणार नाही;या बदलत्या जगामध्ये. मी माझ्या सुख समाधानासाठी जबाबदार आहे. कुणीही मला निरुत्साही करू शकत नाही. 

तुम्ही हा निश्चय करा आणि पहा काय होते. असो, हे आश्रम तुमच्या साठी आहे, परत येत रहा.

आपण आपले कपडे मळल्यानंतर धुवायला देतो. हे आश्रम एक चांगले वॉशिंग मशीन आहे, हे सर्व काही धुवून काढते.

प्रश्न: मला प्रेममय रहायचे आहे, पण मला वाटते कि प्रेम आणि ज्ञान यांच्या मध्ये संघर्ष आहे. यांना एकत्र कसे करता येईल?

श्री श्री: तुम्ही ते आधीच केले आहे! तुमच्याकडे ज्ञानासाठी प्रेम नाही तर तुम्ही त्याच्यासाठी संघर्ष का करता. आणि तुम्हाला जर ते माहित आहे, तुम्ही प्रेममय असू शकत नाही. जाणून घेण्याने प्रेम वाढते आणि प्रेम वाढल्याने जाणण्याची उत्सुकता वाढते,

प्रश्न: पाच कोष कोणते आहेत? त्यांचा आध्यात्मिकदृष्ट्या अर्थ काय आहे?

श्री श्री: कोष म्हणजे संरक्षणार्थ असलेले आवरण.

पहिले आवरण म्हणजे पर्यावरण. जर वातावरणात विषारी वायू असेल तर तुमचे शरीर अस्तित्वात राहील का? नाही, कारण या हवे मुळे तुमचे शरीरचे अस्तित्व आहे. म्हणून पर्यावरण हे तुमचे पहिले शरीर आहे. अन्नरसमय कोष, अन्न म्हणजे खाद्य, रस म्हणजे रसदार. बाह्य पर्यावरण रसदार आहे; ते तुमचे डोळे आकर्षित करते, सुगंधित पणाने तुमचे नाक आकर्षित होते, आणि आवाजाने तुम्ही मंत्रमुग्ध होता. हे सर्व रस आहेत म्हणजे भुरळ पाडणारे आहेत. पर्यावरण संपूर्ण अन्न आणि रसांनी भरलेले आहे. शरीरासाठी पण अन्न आहे; उदा. डोळ्यासाठी दृष्टी हे खाद्य आहे.

म्हणून पर्यावरण, अन्नरसमय कोष हा पहिला कोष आहे. काहीजण शरीर हे पहिला कोष आहे असे म्हणतात पण मला वाटते पर्यावरण हाच पहिला कोष आहे.

दुसरे आवरण शरीर आहे. प्राणमय कोष.

तिसरे आवरण मनोमाया कोष, म्हणजेच मन, विचार आणि भावना.

चौथे आवरण म्हणजे विज्ञान माया कोष, जे मना पेक्षा हि सूक्ष्म आहे, अंतर्ज्ञानी भावना. हे असे काही आहे जे विचारा पलीकडे आहे. तुमच्या मध्ये एक शरीर आहे ज्याच्या मधून नवीन उपक्रम, सर्जनशील निर्मितीचे विचार येतात. विज्ञान माया कोष  मधूनच नवीन शोध, सर्जनशील निर्मितीचे विचार, नवीन कला, कविता येतात. मनोमाया कोष मधून नाही.

पाचवे आवरण म्हणजे आनंदमय कोष,  सुखी चेतना. खरे पाहता एक सुखी चेतना हे शारीरिक चेतने पेक्षा मोठी असते, म्हणूनच जेव्हा तुम्ही सुखी आनंदी असता त्यावेळी तुम्हाला जाणवेल कि तुमच्या चेतनेचा विस्तार होतो. हो कि नाही? तुम्ही ज्यावेळेस दु:खी असता त्या वेळेस तुम्हाला कसे वाटते? असे वाटते कि कुणीतरी तुम्हाला चिरडले आहे.

प्रश्न: गुरुदेव, गुरु ग्रंथ साहिब समोर डोके झाकण्याचा काय संबंध आहे?

श्री श्री: हि एक परंपरा जी वर्षा नु वर्षे चालत आलेली आहे. शीख धर्मात पाच गोष्टी आहेत, न कापलेले केस (फेट्या खाली झाकलेले), कंगवा, खंजीर, हातातील कडे आणि विशेष पद्धतीचे पोशाख. हे शीख धर्माचे पाच प्रतीक आहेत. त्याचा आदर केला पाहिजे कारण हे गुरु ने करायला सांगितले आहे, त्याने तुमची एक ओळख होते.

पूर्वी प्रत्येक परिवार आपला सर्वात मोठा मुलगा हे गुरु कडे सोपवत असत. आणि गुरु त्या मुलाला प्रशिक्षण देत असत. हे प्रत्येकाच्या मुला बरोबर होत असत. ते सर्व योद्धा म्हणून प्रशिक्षित असत. धर्माचे संरक्षण करण्याचे त्यांना प्रशिक्षण दिलेले असते.

प्रश्न: गुरुदेव, जर देव आणि ईश्वरीयत्व न दिसणारे आकलन आहेत, तर तुम्ही कोण आहात?

श्री श्री: तुम्हीच शोधा! मी कोण आहे हे जाणण्या आधी तुम्ही कोण आहात हे जाणून घ्या. तुम्ही कुठे आहात इथून सुरुवात करा. जर तुम्ही स्व:तला जाणले तर तुम्ही मला सुद्धा जाणून घ्याल. तुम्ही स्वत:ला जाणले नाही तर मला समजू शकणार नाही.

प्रश्न: गुरुदेव, लोकांना त्यांच्या आजारपणाची जाण कशी करून द्यावी, किंवा त्यांच्या जवळ च्या नातलगाची, परिवारातील लोकांच्या आजारपणाची जाण कशी करून द्यावी?

श्री श्री: काही करू नका. शांत मनाने स्वीकार करा. आजारी माणसाला शब्दाने आराम मिळत नाही, आणि आजारी माणूस आजारी आहे याचा स्वीकार करत नाही. पण तरीही तुम्ही तुमच्या सकारात्मक कंपनाने वातावरण बदलू शकता.

प्रश्न: गुरुदेव, लोक तुमचे चरण स्पर्श का करतात? हे संस्कार आहेत का?

श्री श्री: हो, तो संस्कार आहे.

जपान मध्ये लोकांना अभिवादन करण्यासाठी खाली वाकतात, भारतामध्ये संपूर्ण वाकून नमस्कार करतात. असे मानले जाते कि उत्सर्जन, उर्जा पाया पासून येते. हि पूर्वीची श्रद्धा आहे, म्हणूनच ते करतात. कधी कधी त्याच्या मुळे मला चालण्यासाठी त्रास होतो.

एकदा मी असेच गर्दीत चालत असताना दोघांनी मागून येवून माझे पाय पकडले, मी वेदावेद्रासनात गेले, माझे हात हवेत लटकत होते. मी सुदैवाने पडलो नाही, नाही तर तुम्ही पाहिले असते तुमचे गुरु कुबडे घेवून चालत आहेत.

पहा, मी प्रत्येक परिस्थितीत समतोल राखतो. हे नेहमी घडत असते.

प्रश्न: प्रिय गुरुजी, मी तुमच्या सारखा कसा होवू शकतो? माझ्या खऱ्या स्वभावात मी जाण्यासाठी मला तुम्ही काय सूचना देवू शकता?

श्री श्री: फक्त एकदा आयुष्यात मागे वळून पहा कि तुमची किती उन्नती झाली आहे. जरा विचार करा, तुमच्या मनाची स्थिती बेसिक कोर्स करण्याआधी कशी होती आणि कोर्स झाल्यानंतर कशी आहे? तुम्ही कधीही ध्यान न केलेल्या व्यक्तीशी कसे हाताळू शकता. तुम्ही तो मोठा फरक पहा! आयुष्यात पुढे जाण्यासाठी हे पुरेसे आहे. स्मितहास्य करा, आराम करा, सेवा, साधना आणि सत्संग करत रहा.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, गेल्या ९ महिन्यापासून माझे अध्यात्मिक जगाशी संपर्क तुटल्या सारखा वाटतो. साधना करण्यात रस नाही, सेवा करण्यात रस नाही. हे खूपच दु:खदायक आहे. काही उपदेश?

श्री श्री: हे असे होत राहते, याला आत्म्याची काळी रात्र असे म्हटले जाते. अचानक तुमची अध्यात्मा मधली आवड कमी होते, किंवा चांगल्या गोष्टी नको वाटायला लागतात.तुमचे मन काहीतरी विनाशक गोष्टी कडे वळते.

अशा गोष्टी १२ किंवा ३० वर्षातून एकदा होतात, जर १२ वर्षात एकदा असेल तर ती १ वर्ष राहते आणि जर ३० वर्षात एकदा असेल तर ती अडीच वर्षे राहते.

याच्यावर सर्वात चागला उपाय म्हणजे तुम्ही तुमची साधना नित्य नियमाने करा, ओम नम: शिवाय  चा जप करत रहा. उदासीन मन आही कंपने या तून बाहेर पडण्यासाठी हा जप सर्वात उत्तम आहे.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, मी आयुष्यात संपूर्णता कशी आर्कषित करू?

श्री श्री: जर तुम्ही संपूर्णता साठी इच्छा ठेवली नाही तर ते तुमच्या कडे येईल. जर तुम्ही त्या साठी आसुसलेले असाल आणि सारखे तुमच्या डोक्यात तेच विचार असतील कि, ‘देवा मला सर्व काही केव्हा मिळेल’ तर ते तुम्हाला कधीही मिळणार नाही. आराम करा! तुम्ही जाणून घ्या कि तुम्हाला जे काही हवे आहे ते तुम्हाला मिळणारच आहे.

जर सर्वकाही तुम्हाला आयुष्यात मिळवायचे असेल तर संस्कृत मध्ये एक म्हण आहे, ‘उद्योगिनं पुरुषासिंहं उपैति लक्ष्मी’ 

उद्योगिनं  म्हणजे तुम्ही जे काही काम कराल ते १०० प्रयत्न करून करा. पुरुषासिंहं उपैति लक्ष्मी’ म्हणजे सिंहा प्रमाणे आत्मविश्वास आणि मध्यांकित असणे.

हे पहा, सिंह काही कोंबडी सारखा फिरत नसतो; तुम्ही सिंहाला कधी बसलेला पहिले आहे का? तो आत्मविश्वास अंडी मध्यंकित तुमच्यात असणे महत्वाचे आहे. सिंह एकच गोष्ट करीत नाही, ती म्हणजे प्रयत्न. तो परिश्रम करीत नाही.

‘उद्योगिनं पुरुषासिंहं उपैति लक्ष्मी’. जर तुम्ही कष्टाळू आहात आणि तुमच्या मध्यांकितपणा असेल, जर तुम्ही तुमच्या अंतर्मनाशी अध्यात्मिक रूपाने संलग्न आहात, तर लक्ष्मी जी वैभव लक्ष्मी आहे ती तुमच्या कडे येईल.

जर जीवनात तुम्ही मध्यांकित आहात, तुमच्याकडे आत्मविश्वास आहे, आणि जर तूम्ही अंतर्मनाशी अध्यात्मिक रूपाने संलग्न आहात तर जीवनात संपूर्णता येईल.

प्रश्न: गुरुदेव, नकारात्मक भावना कधी नष्ट होतील?

श्री श्री: ते जाणार नाहीत. ते इथेच असतील! तुम्ही काय करू शकताल? तुम्हाला त्यांच्या बरोबरच जगायचे आहे! ते तुमच्या पासून दूर जाणे संभवच नाही. सगळ्यात चांगली गोष्ट तुम्ही करू शकता आणि ती म्हणजे त्याच्याशी मैत्री करा. त्यांच्याशी हात मिळवा, त्यांना तुमच्या शेजारी बसवा.

ते जर तुमच्या मांडी वर असतील तर त्यांना सांगा कि, ‘कृपया माझ्या शेजारी बसा, माझ्या डोकयावर किंवा मांडीवर बसू नका. तुम्ही फार जड आहात.’

ते तुमच्या पासून दूर जाणे संभवच नाही. तुम्ही काय कराल?

तरंग लहरी बदलणे

11
2013
Apr
माँन्ट रियल, कँनडा
प्रश्न : गुरुदेव, अध्यात्मिक बैठक असलेला वैज्ञानिक अहंभावाने ओतप्रोत असलेल्या शिस्तीमध्ये कसा टिकाव धरू शकेल?

श्री श्री : आनंदाने! जर तुम्ही वैज्ञानिक आहात तर आनंदी रहा. ‘अरे, हे काय धरून बसलात! हे तर लहरींचे काम आहे.’

जर कोणी वैतागले,तर केवळ असे म्हणा,’अरे! लहरींचे काम! तरंग लहरी बदलल्या आहेत.’ इतकेच. कोणी आनंदी असेल तर वेगळे तरंग. जर कोणाला मत्सर वाटत असेल,’अरे, ते तर बदलून तिसऱ्या तरंग लहरींवर गेले आहेत.’ जर कोणी दुःखी असेल, किंवा उदास असेल ,’तरंग लहरी पुन्हा बदलल्या आहेत.’ हे सर्व तरंग लहरी आहेत,येवढेच.

तरंग लहरी बदलण्याबद्दल कोणी रागावू शकते का? नाही. म्हणून सगळ्यांकडे केवळ तरंग लहरी म्हणून पहा. मग तुम्हाला कशाचाही त्रास होणार नाही,ठीक!

विविधतेची मजा लुटा, विभिन्नातेची मजा लुटा. याच्याकरिता तुमचे हास्य गमवायची जरुरत नाही.

जर कोणाला अहंकार आहे तर काय झाले? त्यांना अनुकंपेची आवश्यकता आहे. ते अज्ञानी आहेत. अज्ञानी माणसांकरिता तुमच्याकडे काय आहे? अनुकंपा,हो ना? जर कोणी अहंभावात आहे तर तुम्ही असा विचार करायला पाहिजे,’ बिचारा,त्याला वाटते की तो कोणीतरी आहे. लवकरच तो भूमिगत होणार आहे. त्याला हे माहिती नाही. तो भरपूर उर्जा असलेली केवळ चिंधीची बाहुली आहे हे त्याला माहिती नाही.’

म्हणून अहंकारी माणसांकरिता अनुकंपा ठेवा.

पहा,जेव्हा तुम्हाला इतरांकडून मान्यता हवी असते तेव्हा हा अहंकार आहे आणि तो एक समस्या आहे हे लक्षात घ्या.

जर कोणाला अहंकार असेल तर तुम्हाला त्याचा कसा त्रास होतो? तुम्ही आनंदाने चलू लागा. त्यांना तुमच्याकडे पाहून शरम वाटली पाहिजे. या माणसाकडे पहा,तो किती आनंदात आहे! अहंकारी माणसांना तुम्हाला आनंदी पाहून मत्सर वाटला पाहिजे. हे तुमच्यावर अवलंबून आहे.

जर तुम्ही इतरांच्या अहंकाराला ओळख दिली तर तो तुमच्यात घुसेल आणि तुम्ही एका उंदराप्रमाणे चालू लागाल.एका सिंहाप्रमाणे चला आणि आनंदी राहा. चिडू नका, किंवा सिंहाप्रमाणे डरकाळी फोडू नका, केवळ हसा आणि अंतून सिंहाप्रमाणे असल्याची भावना ठेवा.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, हे जग इतके स्वार्थी आहे. लोकांना फक्त पैशाची किंमत आहे. खरे प्रेम कसे शोधायचे?

श्री श्री : अरेच्या, असे बोलू नका ह. या जगात सर्व प्रकारचे लोक आहेत. त्यांना दोष देऊ नका किंवा सर्व जग स्वार्थी आहे असे लेबल लावू नका. हे बरोबर नाही.

तुम्हाला माहिती आहे, या ग्रहावर चांगले लोक आहेत. खरे तर ते जास्त संख्येने आहेत. भामटे लोकांची संख्या फार छोटी आहे.

समजा तुम्ही निष्ठुर,निर्दयी आणि स्वार्थी आहात असा तुम्हालापण दूषण दिले तर तुम्ही ते लेबल स्वीकाराल का?

स्वतःला विचारा,स्वतःच्या हृदयाला,मनाला विचारा. नाही! तुम्हाला वाटते की तुम्ही फार चांगले आहात,दयाळू आहात परंतु बाकीचे सगळे वाईट आहेत, हो ना? हे बरोबर नाही. समजले?

या जगात, चांगले लोक आहेत आणि असे लोक आहेत जे त्यांचा चांगुलपणा व्यक्त करीत नाहीत. इतकेच. पण तेसुद्धा चांगले आहेत. या पृथ्वीतलावर वाईट प्राणी एकसुद्धा नाहीये.सगळे स्वभावतः चांगले आहेत.

जर तुम्ही तुरुंगातील सर्वात भयंकर कैद्यांबरोबर बोलाल तर तुम्हाला त्यांच्या डोळ्यात दिसेल की तेसुद्धा चांगले माणसे आहेत. कुठेतरी त्यांच्या हातून चूक घडली,कधीतरी त्यांच्या हातून गुन्हा घडला. सर्वात भयंकर अतिरेकीसुद्धा, जर तुम्ही त्यांना जाऊन भेटलं तर तुम्ही आतून बघाल की त्यांच्यात एक चांगला माणूस लपून आहे.

जर तुम्ही माझ्या नजरेने बघाल तर या ग्रहावर वाईट लोक नाहीच आहेत. चांगुलपणा व्यक्त करणारे लोक आहेत आणि असे लोक आहे ज्यांचा चांगुलपणा झाकलेला आहे आणि तो व्यक्त होत नाहीये. इतकेच. तुम्ही तो चांगुलपणा बाहेर येण्याकरिता त्यांची मदत करू शकता. तुम्ही त्यांना त्यांचा चांगुलपणा व्यक्त करण्याकरिता मदत करू शकता. अशाच प्रकारे तुम्ही जगाला पाहिले पाहिजे. जगाला वाईट लोक असे लेबल लावू नका. तसे केले तर तुमचा जगाकडचा दृष्टीकोनसुद्धा वाईट राहील.

प्रश्न : मी आर्ट ऑफ लिविंगमध्ये आल्यापासून तुम्ही माझ्या सर्व समस्यांची काळजी घेतली आहे. माझा एवढाच प्रश्न आहे की असे का की मी तुम्हाला कधीही पहिले तरी माझे डोळे भरून येतात?

श्री श्री : ते बरोबर आहे आणि हे असेच असले पाहिजे.

एका उपनिषदामध्ये त्यांनी आपल्या प्राणप्रियला बघितले की काय होते याचे वर्णन केले आहे. जेव्हा तुम्ही ज्ञानाच्या संपर्कात येता तेव्हा तुमचे हृद्याचे द्वार उघडते, आणि जेव्हा हृदय उघडते तेव्हा मनातील सर्व शंका नाहीशा होतात, अश्रू ओघळू लागतात आणि सर्व कर्म नाहीसे होते.

‘बिध्यन्ति हृदया ग्रंथी’, हृदयातील गाठी मोकळ्या होतात.
‘चीद्यांती सर्वा संशयः’, मनातील सर्व संशय दूर होतात.
‘क्षीणतेचास्य कर्मणी’, सर्व कर्मे आक्रसून जातात आणि ती नाहीशी होतात. ही ज्ञान, प्रज्ञा आणि साक्षात्काराची खूणआहे. जेव्हा तुम्हाला साक्षात्काराची एक झलक मिळेल तेव्हा हे सगळे होईल. मला आठवते, एकदा जेव्हा मी इथे माँन्ट रियल आश्रमात ( तो तेव्हा बांधून झाला नव्हता. आम्ही केवळ जमीन विकत घेतली होती आणि मी फ्लोराबेल इथे राहत होतो) आलो तेव्हा एक पत्रकार महिला आली आणि तिला माझी मुलाकात हवी होती. जेव्हा ती माझ्याबरोबर येऊन बसली, ती म्हणाली,’अरे देवा! मला काय होते आहे? मी सगळेकाही विसरले आहे! मला माफ करा. मला माफ करा.’

तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि ती म्हणाली,’ मला असे आधी कधीही झाले नाही. मला माफ करा.’ तिला फारच दिलगिरी वाटत होते. ती रडत राहिली.

मी म्हणालो,’हरकत नाही. काळजी करू नको. हे असे होते.’ मला विचारायचे सगळे प्रश्न ती विसरली, आणि हे असे बरेच वेळा होते.

प्रश्न : प्रिय गुरुदेव,मी माझ्या चांगला पगार देणाऱ्या नोकरीत समाधानी आहे. परंतु आजकाल मला मनात प्रबळ विचार येतात जसे काही,’मी इथे काय करतो आहे? मी जास्त उपयुक्त काही करणे जरुरी आहे का?’ मी काय करू?

श्री श्री : होय, तुम्ही तुमचा मोकळा वेळ चांगली सेवा, साधना (अध्यात्मिक सराव) आणि सतसंग याला द्या. जीवनात हे सर्व फार मौल्यवान आहे. नुसते बसून राहू नका आणि रोजचा दिवस सिनेमा बघण्यात किंवा टीव्हीवर मालिका बघण्यात घालवू नका.

आपण हेच तर करतो. घरी येतो, टीव्ही चालू करतो आणि दिवसामागून दिवस बघत बसतो. हेच तर आपण करतो आणि हे अतिशय व्यर्थ आहे!

मी तुम्ही टीव्ही बघण्याच्या विरुद्ध नाहीये,बघा परंतु कधी कधी’आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बघणे ठीक आहे,परंतु रोजच्या रोज नाही. हे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे.किंवा दिवसाचे एक किंवा दोन तास समाजाच्या सेवेकरिता ठेवा. जर हे नाही तर मग एक तास बाजूला काढून ठेवा आणि काही ज्ञान लिहून काढा; किंवा facebook किंवा तत्सम सोशल प्रसार माध्यमातून सेवा करा; ज्ञानाचा प्रसार करा. काय म्हणता? चांगली कल्पना आहे? ही सृजनशील कल्पना आहे आणि तसे करताना तुम्हाला समाधान वाटेल.

नुसती बघ्याची भूमिका स्वीकारण्यापेक्षा, विश्वाच्या घडामोडीमध्ये सहभागी व्हा. रोज नुसते टीव्ही बघत आणि कुठे काय चालले आहे ते टीव्हीवर बघत बसण्यापेक्षा समाजच्या बदलाचे तुम्ही प्रतिनिधी अथवा समजाच्या बदलामध्ये तुमचा सहभाग असला पाहिजे.समजले?

तुम्ही टीव्ही पाहू शकता परंतु २-३ तास नाही. त्यापेक्षा एक तास काही तरी सृजनशील करण्यात घालावा.

प्रश्न : जेव्हा कधी कोणी अध्यात्मिक गुरूंच्यासोबत जवळीक निर्माण करतो तेव्हा त्याला जीवनात जास्त समस्यांना तोंड द्यावे लागते, आणि तरी तो हार मानत नाही,हे असे का?

श्री श्री : होय, असे लोक आहेत ज्यांना आव्हाने आवडतात,ज्यांचे आव्हानांवर प्रेम असते. नाहीतर मग शिडाच्या होडीतून लोक जगाच्या सफारीला का बरे जातात? असे का की ते जाऊन एव्हरेस्ट पर्वत चढू लागतात? कारण लोकांना आव्हाने आवडतात.

हा अहंकार आहे ज्याला मोठाली आव्हाने हवी असतात. म्हणून काही माणसांना ते पाहिजे असते आणि ते कठीण मार्ग स्वीकारतात.

हरकात नाही,जेव्हा तुम्ही या मार्गावर येता तेव्हा तुम्ही सर्व काही सुहास्यवदनाने करता. या मार्गाची हीच तर खासियत आहे.

प्रश्न : असे नाहामी भासत आणि दिसून येते की योग आणि हिंदुत्व हे महिलांना वर्जित करते, आणि यामुळे मला असे वाटते की आपण अजूनपर्यंत अध्यात्मिक क्रांतीकारिता तयार नाही. याविषयी आणि महिलांच्या भूमिकेविषयी तुम्ही काय सांगू शकाल? तुमच्या अवतीभवती जास्ती करून पुरुष का असतात जेव्हा की महिला या स्वयंपाक आणि साफ सफाई करतात?

श्री श्री : हे बघा, असे काहीही नाहीये.योग,हिंदुत्व आणि वैदिक ज्ञान या’सर्वांमध्ये महिलांना अजिबात वर्जित केलेले नाही.

पुरुष आणि स्त्री यांना एकाच दर्जा दिलेला आहे. भारतामध्ये परंपरेनुसार आईचा मान पहिला आणि वडिलांचा नंतर. ते म्हणतात,’ मातृ देवो भव’ ( माता ही देव आहे).

तसेच तुम्हाला लिखाणामध्येसुद्धा पाहाल तर दिसेल की आम्ही भारतामध्ये मिस्टर आणि मिसेस असे लिहित नाही तर श्रीमती आणि नंतर श्री असे नेहमी असते.

हिंदू धर्मामध्ये राधे श्याम  असे म्हणतात. पहिले श्याम  आणि नंतर राधे  असे म्हणत नाही. सीता राम  असे नाव आहे, यात पहिले सीता  आणि नंतर राम आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मी आणि नंतर नारायण  आहे. तर स्त्रिया या नेहमी पहिले येतात.

तुम्ही अर्धनारीश्वर बघितला आहे? तुम्हाला त्याची गोष्ट माहिती आहे?

एकदा एक साधू होता त्याला स्त्रियांविषयी घृणा होती. बहुतेकदा लोक जेव्हा संन्यासी होतात तेव्हा ते स्त्रियांपासून लांब पळतात. कोण्या बाईने त्याला फसवले असेल, किंवा काहीतरी झाले असेल.मला माहित नाही. पण त्याला स्त्रियांविषयी घृणा होती. तो स्त्रियांकडे पाहायचासुद्धा नाही. देवतांकडेसुद्धा. तो केवळ ,’शिव, शिव, शिव’ चा जप करायचा आणि शक्तीची पूजासुद्धा करायचा नाही. म्हणून मग त्याच्यासमोर शिवाने अर्धी स्त्री आणि अर्धा पुरुष असा अवतार घेतला. आणि त्याला अर्धनारीश्वर  म्हणतात.

याने सगळ्यांच्या आत तुम्ही अर्धे पुरुष आहात आणि अर्धे स्त्री हे दर्शवते.भौतिकदृष्ट्या तुम्ही स्त्री अथवा पुरुष जे काही असाल परंतु आतून तुम्ही दोन्ही आहात कारण तुम्ही वीर्य आणि अंड या दोन्हीने बनलेले आहात. तुम्ही,आईवडील या दोघांच्याही गुणसूत्राने बनलेले आहात. दोन्ही तुमच्या आत आहेत आणि दोन्ही समान आहेत.

म्हणून,जेव्हा भगवान शिव हे अर्धे पुरुष आणि अर्धी स्त्री म्हणून अवतीर्ण झाले तेव्हा त्याचे स्त्रियांच्या विरुद्ध असलेले पूर्वग्रहदोष नष्ट झाले आणि त्याला मुक्ती प्राप्त झाली. अशी ती कथा आहे. ती खरे तर फार मोठी कथा आहे पण ती थोडक्यात सांगायचे झाले तर त्याला मुक्ती प्राप्त झाली जेव्हा त्याने त्याचे स्त्रियांच्या विरुद्ध असलेले त्याचे मत सोडून दिले. तर असे हे उदाहरण आहे.

कधीतरी मध्ययुगामध्ये जेव्हा भारत हा इस्लामच्या प्रभावाखाली आला तेव्हा हे बदलले. स्त्री पुरोहित रद्दबातल केल्या गेल्या.

जर तुम्ही इंडोनेशियातील,बाली या जागी गेलात तर आजसुद्धा तिथे महिला पुजारी आहेत. तो वास्तविक हिंदू धर्म आहे. परंतु भारतमध्ये काही काळानंतर मध्ययुगामध्ये इस्लामने महिलांना बुरख्याआड घातले आणि हा प्रभाव भारतावर आला आहे. त्याकाळी महिलांना घरातच राहण्यास सांगितले गेले.

वैदिक काळामध्ये महिलांना सर्व अधिकार होते. तुम्ही त्यांना पौरोहित्य आणि ते सगळे करताना पाहू शकत होते. तर हे सगळे बदल घडून आलेले आहेत, आणि जेव्हा बदल घडून येतो तेव्हा तो बराच काळ टिकतो. परंतु असे समजू नका की महिलांना दुय्यम दर्जा आहे. 

पहा, हे नऊ दिवस आहेत केवळ देवी आईच्या आराधनेचे. आणि माझ्याकरिता अनेक महिला इथे काम करतात. आपल्या अनेक महिला शिक्षिका आणि पुरुष शिक्षक आहेत. ते सर्व आपल्या विश्वासाचे आहेत. तर तसे काहीही नाहीये.

खरे पाहता कँनडा आश्रमची अध्यक्ष ही एक महिला (डेब्रा) आहे. कँनडाच्या आश्रमात दीर्घ काळ महिलांचे राज्य आहे. हा राणीचा प्रदेश आहे, कदाचित.

प्रश्न : जय गुरुदेव, आपण चैत्र नवरात्री आणि त्याच्या महत्वाविषयी काही बोलू शकाल काय?

श्री श्री : नवरात्रीचा अर्थ आहे नऊ रात्री. या नऊ रात्रींमध्ये तुम्ही अंतर्मुख होता. अंतर्मुख होण्याकरिता हा काळ असतो ध्यान धारणेचा आणि मग तुमच्यातील सृजनशीलता अभिव्यक्त होते. हे याचे महत्व आहे.

चैत्र म्हणजे नववर्षाची सुरुवात. तर नवीन वर्ष हे अशा प्रकारे अंतर्मुख होण्याने, प्रार्थनेने,ध्यान आणि जप याने सुरु होते. संपूर्ण विश्वातील दिव्यतेला ओळखा आणि त्याला चैतन्यमय करा.

प्रश्न : जातिव्यवस्थेपासून आपण सुटकारा कसा काय मिळवू शकतो? माझे लग्न होऊ शकत नाहीये कारण माझ्या पालकांना आणि त्याच्या पालकांना वाटते की समाज त्यांना वळीत टाकेल. आमच्या दोघांची जात वेगळी आहे. गुरुदेव,काय बरे करावे?

श्री श्री : धीर धरल्याने आणि शिक्षणाने.

मला वाटते की आता याचे प्रमाण फार फार म्हणजे फारच कमी झालेले आहे. लोक आता बरेच मोकळे झालेले आहेत. आता कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तो म्हणजे जेवण्याच्या पद्धतीचा; शाकाहारी आणि मांसाहारी. हा तर फार मोठा धोंडा बनतो. परंतु काळजी करू नका.

तुमच्याकडे मन वळवण्याची क्षमता असली पाहिजे,त्यांना समजावा, तुमच्या पालकांना सहमत करा. सर्वप्रथम त्यांना आर्ट ऑफ लिविंग करायला लावा. हे आधी करणे फारच चांगले होईल.