बनानाज टू ब्लिस (केळ्यांपासून ते परमानंदापर्यंत)

16
2013
May
बंगलोर, भारत

प्रश्न : गुरुदेव, आम्ही घरी परत जाताना तुमचा कोणता संदेश घेउन जावा ?

श्री श्री : बघा, हे म्हणजे असं झालं की तुम्ही एखाद्या सुपर मार्केट मध्ये जाता आणि विचारता की, ‘इथून मी घरी काय घेऊन जाऊ ?’ (हशा) दुकानातले लोक काय म्हणतील ? ते म्हणतील, ‘ तुम्हला जे नेता येईल ते न्या.’

तर, इथे (आश्रमात)सगळे काही उपलब्ध आहे, परमानंदापासून ते केळ्यांपर्यंत. (हशा) काही लोक इथे काहीशा श्रद्धेने येतात आणि एक केळ्याचा तुकडा घेऊन जातात, जो त्यांना गोड लागतो. काही लोक संपूर्ण श्रद्धेने इथे येतात आणि परमानंद घेउन जातात. त्यामुळे, तुम्हाला जे हवे ते मागा आणि तुमची इच्छ असेल ते घेउन जा. तुमच्या सगळ्या समस्या आणि प्रश्न इथे टाकून जा.

प्रश्न : गुरुदेव, अष्टावक्र गीतेत म्हटले आहे की, ‘मी करतो, या भ्रमात राहू नका कारण तुम्ही कर्ता नाही आहात,’ आणि गीतेत म्हटले आहे की,’ जेव्हा तुम्ही स्वत:मध्ये प्रस्थापित होता तेव्हा निवडीची संधी असते.’ आपण कर्ता नाही आहोत, तर मग आपल्याला निवडीची संधी कशी असेल ?

श्री श्री : ज्ञानाचे अनेक स्तर असतात. जेव्हा तुम्ही कर्ता नसता तेव्हा कर्माची फळे उपभोगणारेही तुम्ही नसाल. आणि जेव्हा तुम्ही कर्माची फळे भोगणारे नसता तेव्हा मग निवडीच्या संधीचा प्रश्न कुठे येतो ? तुम्हाला कळते आहे कां ? जसे क्वांटम फिजिक्समध्ये म्हणतात की, प्रत्येक गोष्ट अणू रेणूंनी बनलेली आहे. म्हणजे कोळसा आणि हिरा दोन्ही अणूंनी बनलेले आहेत.

अशा प्रकरणी जर तुम्ही बघीतले तर कोळसा आणि हिरा यात काहीच फरक नाही कारण दोन्ही एकाच अणूपासून बनलेळे आहे. पण प्रत्यक्षात तुम्ही कोळशाच्या जागी हिरा वापरू शकत नाही आणि कोळशाच्या कुड्या कानात घालू शकत नाही.

तर, प्रत्यक्ष सत्य आणि आध्यात्मिक सत्य यात फरक आहे. आणि जेव्हा तुम्ही जीवनात हे दोन्ही एकत्रितपणे आत्मसात करता तेव्हा तुम्ही पूर्णत्व अनुभवता.

जर तुम्ही असे म्हणत राहिलात की, ‘मी कर्ता नाहिये पण मी माझ्या कर्माची फळे भोगतोय.’ तर ते चूक आहे. ज्या ज्या वेळी तुम्ही कर्माची फळे भोगता त्या त्या वेळी आपोआपच तुम्ही कर्ता बनता.

म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात, ‘किं कर्म किंकर्मेती, कवयोऽप्यत्र मोहिता:’ (४.१६)

‘कोणते कर्म करायचे आणि कोणते करायचे नाही याचा निर्णय घेताना अगदी जेष्ठातले जेष्ठ संत आणि अति बुद्धिमानही गोंधळून जातात. कर्म म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो पण त्याआधी तुम्हाला योगी ( योग मार्गावर दृढ असणारा) बनायला हवे.’ 

एकदा तुम्ही योगी बनलात की, तुम्ही जी काही कृती कराल ती अगदी सहज आणि विनासायास सर्व अंगांनी योग्यच होईल.

प्रश्न : गुरुदेव, जर प्रेम म्हणजे आनंद आणि उल्हास पसरवणे आहे, तर मग त्याने इतके क्लेश कां होतात ?

श्री श्री : तुम्हाला माहितीये, या पृथ्वीतलावर आपण येतो तेव्हाचा पहिला अनुभव क्लेश असतो. जेव्हा आपण मातेच्या उदरातून बाहेर येतो तेव्हा ते क्लेशकारक असते.

माता आणि बाल दोघांनाही क्लेशकारक असते. मूळ नऊ महिने काहीही न करता आनंदाने मातेच्या उदरात तरंगत असते. त्याला परस्पर अन्न पुरवले जात असते. त्याला काही चावावेही लागत नाही. एक बाळ म्हणून नऊ महिने तुम्ही अगदी परमानंदात होतात आणि अचानक पाणी नाहीसे झाले आणि तुम्हाला त्या सुखद क्षेत्रातून बाहेर यावे लागले. ते तुमच्यासाठी क्लेशकारक होते. तर, हा तुमचा पृथ्वीतलावर येण्याचा पहिला अनुभव होता. तुम्ही पहिल्यांदा आलात तेव्हा ते इतके क्लेशकारक होते की तुम्ही रडू लागलात. जर तुम्ही रडला नसतात तर आई वडील रडले असते ! तर, तुम्ही राद्लात आणि तुमच्या भोवतीचे लोक हसले. (जन्मामुळे झालेल्या आनंदाने आणि हर्षाने) विचार करा, जन्मल्यानंतर तुम्ही रडलात आणि बाकीचे सगळे खुश झाले.

तुमचा दुसरा अनुभव होता प्रेम. जन्मा झाल्यानंतर तुमच्या आईने जेव्हा तुम्हाला कुशीत तेव्हा तुम्हाला केवढेतरी प्रेम आणि काळजी जाणवली. घरातल्या सर्वांनी तुमच्यावर प्रेम केले. तुमची आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी, सगळेच. सगळ्यांनीच तुमच्यावर इतके प्रेम केले आणि लक्ष दिले. पण हे सगळे थोडेसे क्लेश सहन केल्यानंतर मिळाले. हो की नाही ? तर, क्लेश, वेदना हा प्रेमाचाच भाग आहे आणि तुम्ही ते कडू गोळीप्रमाणे गिळून टाकायला हवे. तुमच्यासाठी ते चांगले असते. क्लेशापासुन दूर पळून जायचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही क्लेशापासुन प्रेदूर पळालात तर प्रेमापासूनही दूर जाल.

प्रश्न : गुरुदेव, विविध गुण संपन्न होण्यासाठी, आपण आपली शक्ती आणेल क्षेत्रात खर्च करतो आणि शेवटी कशातच यश मिळत नाही. आम्ही काय करावे ?

श्री श्री : आत्ता लहान असताना तुम्ही याचा विचार करायची गरज नाही. अनेक कलागुण जोपासायची हीच वेळ आहे. जेव्हा तुम्ही तुमची विशी ओलांडाल तेव्हा एकच गोष्ट टिकून राहील. पण त्याआधी कोणती एकच गोष्ट करायची त्याची काळजी करू नका. नाही, मी याच्याशी सहमत नाही. आत्ता तुम्ही सगळ्या गोष्टी शिकून घ्यायला हव्या.

तुम्हाला शक्य तितक्या जास्तीत जास्त कला जोपासा. तुम्हाला जितक्या भाषा शिकता येतील तितक्या शिका. हीच शिकण्याची वेळ आहे. तुम्ही संगीत,स्वयंपाक, खेळ, चित्रकला इत्यादी सगळ्यात प्राविण्य मिळवायला हवे. आणि नंतर बघा काय काय टिकून रहाते ?

प्रश्न : अपराधीपणाच्या भावनेतून कसे मुक्त व्हावे ?

श्री श्री : तुमच्या अपराधीपणाच्या भावनेतून तुम्हाला आत्ता लगेच मुक्त कशाला व्हायचे आहे ? थोडीशी अपराधीपणाची भावना ही खरं म्हणजे तुमच्यासाठी चांगली आहे. त्या अपराधीपणाची थोडीशी टोचणी तुम्हाला त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करण्यापासून वाचवेल. त्यामुळे धोदेसे अपराधी वाटणे ठीकच आहे. पण जर त्याचे प्रमाण खूपच वाढले तर मग आपण बघू.

प्रश्न : गुरुदेव, जेव्हा तुम्ही बंजारा नदीजवळ कुंभमेळ्यात आला होतात तेव्हा तिथे काही नागा स्वामी होते. ते खूपच भयानाक दिसत होते. ते असे कां रहातात ?

श्री श्री : मला देखील नवल वाटते की ते असे कां रहातात. (हास्य) कदाचित त्यांनी कधीच गीता वाचली नाही. श्रीकृष्णाणे हे मान्य केले नसते. त्यामुळेच श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे ,‘नाहं प्रकाश: सर्वस्व योगमाया समावृत: मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् (७.२५)  

ते म्हणतात, ‘या लोकांना मी माहित नाही.’

असे लोक स्वत:च्याच जगात हरवलेले असतात आणि स्वत:लाच त्रास करून घेतात. पण त्यांच्यातच तुम्हाला काही महान लोकही सापडतील. तेव्हा तुम्ही त्यांच्या बाह्य रूपावरून, त्यांच्यावर चांगले किंवा वाईट असा शिक्का मारू नका.

आपल्याला हे मान्य करायला हवे की, या देशात निरनिराळ्या आध्यात्मिक परंपरा आणि निरनिराळ्या विचारधारा आहेत.

प्रश्न : गुरुदेव, असे म्हणतात की जेव्हा एखाद्याचे पाप भरले की त्याला साधना करावीशी वाटत नाही किंवा सत्संगला जावेसे वाटत नाही. पण जर एक वेळ अशी आली की जर आपल्याला याची जाणीव झाली की आपल्या विशिष्ठ कर्मामुळे हे होते आहे तर मग आपल्या पुरुषार्थाने यावर मात करू शकू कां ?

श्री श्री : होय, नक्कीच. हीच हुशारीही आहे. असे लोकच बुद्धिमान असतात. तुम्ही त्यांना मूर्ख किंवा अज्ञानी म्हणू शकत नाही. जेव्हा तुम्हाला तुमच्या हातून घडलेली चुकीची गोष्ट माहित असेल तेव्हा ही नकारात्मक कर्मे पुसून टाकण्यासाठी साधना आणि सत्संगची तुम्हाला मदत होऊ शकते.

हे सर्व त्या एकाचा विस्तार आहे.

15
2013
May
बंगलोर, भारत


आज शंकराचार्य जयंती आहे. हा आदी शंकराचार्यांचा ( भारतीय तत्वज्ञानाच्या अद्वैत विचारसरणीचे थोर गुरु) जन्म दिवस आहे.

आदी शंकराचार्यांनी अद्वैत तत्वज्ञानाचा प्रसार केला. अद्वैत म्हणजे हे सर्व एकपासून तयार झाले आहेत. अद्वैतात असे म्हटले आहे कि ‘ सर्वं खल्विदं ब्रम्हम’, म्हणजे हे सर्व एका ब्रम्हण पासून तयार झाले आहे किंवा एक चेतनेपासून तयार झाले आहे, हे सर्व वासुदेव (भगवान श्रीकृष्णाचे एक नाव) आहे.

म्हणून तुम्ही जी विविधता पट ती वस्तुतः नाहीये. वस्तुस्थिती हि नेहमी अदृश्य असते, ती नेहमी अनुभवायची असते.

ती पूर्वी मिळणाऱ्या प्राण्यांच्या आकाराच्या बिस्किटा सारखी आहे. तुम्ही ती बिस्किटे बघितली आहे काय? ती सगळे वेगवेगळ्या आकारात मिळायचची-मांजर, कुत्रा, घोडा, हत्ती. मुलांना त्या बिस्किटाशी खेळायला खूप आवडायचे. म्हणून एकाच प्रकारचे समान वापरून त्याची वेगवेगळ्या आकाराची बिस्किटे बनवली जायची.

आज तुम्हाला वेगवेगळ्या प्राणांच्या आकाराची चोकलेट बघायला मिळतात. पण शेवटी ती एकाच प्रकारच्या चोकलेटने बनवलेली असतात. होय कि नाही? आणि त्या सर्वांची चवही सारखीच असते. पण त्यातील वैविध्य पाहून मुले हरखून जातात.म्हणजेच जरी ती वरवर वेगळीवाटत असली तरी आतून ती सर्व एकच असतात. आपण ज्या गोष्टी बघत असतो, त्या मायेच्या प्रभावामुळे जरी वेगवेगळ्या वाटत असल्या तरी ते वेगवेगळेपण खरे नव्हे.

आदी शंकराचार्यांची एक गोष्ट सांगतात.

एकदा, आदी शंकराचार्य सांगत होते कि’ हे सर्व जग, जे काही आहे, ते काहीच नाहीये’. म्हणजेच ते असे सांगत होते कि ‘हे काहीच नाहीये’. हल्लीच्या शास्त्रज्ञ जसे सांगतात कि ‘ ह्या सर्व गोष्टी नाहीयेत, कारण त्या फक्त लहरी आहेत’.

ते जेंव्हा असे सांगत होते कि ‘ हे सर्व काही नाहीये’, तेवढ्यात एक पिसाळलेला हत्ती त्यांच्या रोखाने पळत येताना दिसला.त्याला पाहताच शंकराचार्य ती जागा सोडून आडोश्याला जाऊन उभे राहिले.

तेंव्हा कोणीतरी म्हणाले कि,’ हा हत्ती म्हणजे काहीच नाहीये, तर तुम्ही असे आडोशाला का उभे राहिलात?’ तेंव्हा शंकराचार्य म्हणाले कि, ‘ तो हत्ती म्हणजे काही नाही आणि माझे पळणे हे सुधा काही नाहीये’.

अशी शंकराचार्यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता होती आणि ती तशी फार थोड्या लोकांच्यात असते.

जे त्यांनी हजार वर्षापूर्वी सांगितले तेच आजचे विज्ञान सांगत आहे. आपण त्याला वेगवेगळ्या नावांनी आणि सिद्धांतांनी ओळखतो जसे कि सापेक्षवादाचा सिद्धांत. पण ते सर्व एकच आहे. हे सर्व त्या एकाचा विस्तार आहे.

प्रोफेसर डी’हुरेहाड नावाचे एक ख्यातनाम शास्त्रज्ञ नुकतेच येथे येऊन गेले. हे मला म्हणाले कि ते पदार्थ विज्ञान गेली ४५ वर्षे शिकत आहेत.

ते म्हणाले कि ‘ गुरुदेव, मी ४५ वर्षे पदार्थ विज्ञान शिकलो आणि असे लक्षात आले कि ते अस्तित्वात नाही. मी जेंव्हा भाषण देत असतो तेंव्हा लोकांना असे वाटते कि मी बुद्धिझम किंवा पूर्वेकडील तत्सम तत्वज्ञानावर बोलत आहे, कारण मी सांगतो कि ‘ ह्या सर्व गोष्टी नाहीयेत, कारण त्या फक्त लहरी आहेत’.

आज विज्ञान काही निष्कर्ष काढू लागले आहे, जसे कि ‘ जे दिसते ते तसे नाहीये, आणि जे दृष्टीला पडत नाही तेच सत्य आहे. हे सर्व वासुदेव (भगवान श्रीकृष्णाचे एक नाव) आहे.

आता मी जेंव्हा असेम्हणतो कि हे सर्व वासुदेव आहे, तेंव्हा असा विचार करू नका कि तेथे कोणीतरी मोरपिसांचा मुकुट घालून, भडक पिवळ्या रंगाचे कपडे घालून, झाडाखाली राधे बरोबर हातात बासरी घेऊन ( भगवान श्रीकृष्ण यांचे वर्णन) उभे असेल.तुम्ही जर असा विचार करीत असाल तर तुम्ही आश्चर्य करीत बसाल कि अशी कितीक वर्षे ते हातात बासरी घेऊन उभे आहेत आणि अशी अनेक वर्ष बासरी हातात धरून त्यांचे हात दुखायला लागले असतील (हशा). असा काही गैरसमज करून घेऊ नका.

आणि म्हणून भगवतगीतेच्या नवव्या अध्यायातील अकराव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात,

अवजानन्ति मां मूढा मानुषी तनुमाश्रीतम | 
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम | 

ते अर्जुनाला असे सांगतात कि, ‘ लोक मला एक मनुष्यमात्र समजतात (म्हणजे शरीरापर्यंत मर्यादित), ते मला ओळखू शकत नाहीत. मी म्हणजे एक अशी चेतना आहे कि ज्यातून हे सर्व उत्पन्न होते आणि ज्या मुळे हे सर्व अस्तित्वात राहते.

सर्वत्र आणि सर्वांमध्ये वासुदेव पाहणारे महात्मे हे खरोखरच दुर्मिळ आहेत. असे काही लोक आहेत कि जे समजतात कि, ‘ वासुदेव सर्वत्र आहे, पण माझ्यात नाही. मी फक्त एक सेवक आहे. मी अगदी मामुली असून भगवंताच्या पायाची धूळ व्हायची पण माझी लायकी नाही. मी अगदी नगण्य आहे. नाही, असा विचार करू नका. जर सर्व गोष्टी या वासुदेव असतील तर तुम्ही सुद्धा वासुदेव आहात. हे सर्व जग जे वासुदेव आहे त्याचा तुम्ही एक भाग आहात. वासुदेवाच्या पलीकडे काहीही नाही.

जे आपल्या अंतर-आत्म्याशी एकरूप झाले आहेत असे ज्ञानी लोक फार दुर्मिळ आहेत. 

भगवतगीतेच्या सातव्या अध्यायातील विसाव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात,

कामैसतैसहृतज्ञानः प्रपधैन्तेsन्यदेवताः | 
तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वयाः| 

असे अनेक लोक आहेत कि जे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक देव देवतांची उपासना करतात. काही हनुमानाची पूजा करतात, तर काही शिवाची, तर काही संतोषी मातेची उपासना करतात, काही इतर देवतांची पूजा करतात. ते वेगवेगळ्या देवताची पूजा करतात आणि ते असे का करतात यामागे त्यांच्या वेगवेगळ्या इच्छा आकांक्षा असतात.

भगवान श्रीकृष्ण म्हणतात , ‘ आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक वेगवेगळ्या देवतांची पूजा, आराधना करतात. परंतु त्यांच्या त्या इच्छा त्या देवतांच्या तर्फे पूर्ण करणारा फक्त मी आणि मीच असतो. आणि त्यांची वेगवेगळ्या देवता पूजा करण्याची जी भक्ती असते तिओ पण मीच असतो.’

आज जगात केवळ एक धर्म नसून अनेक भिन्न धार्मिक भावना असलेले लोक बघायला मिळतात. आणि प्रत्येक धर्मात सुद्धा अनेक पंथ बघायला मिळतात. वेगवेगळे लोक वेगवेगळे पंथाच्या शिकवणीवर विश्वास ठेऊन वेगवेगळ्या पंथाची पूजा करितात, आणि त्यातून त्यांना काही प्रगती झाल्यासारखी वाटत आहे.

काही लोक येशूला मानतात, तर काही अल्लाला मानतात तर काही गुरु ग्रंथ साहेब वर विश्वास ठेवतात तर काही जेवोवाह्वर. जे कोणी आपापल्या श्रद्धेनुसार जे आचरण करितात, त्याचे फळ त्यांना जरूर मिळत असते. जर त्यांना त्यातून काही मिळत नसते, तर त्यांनी तशी श्रद्धा ठेवली असती काय?

त्याचप्रमाणे काही लोक देवी काली वर विश्वास ठेवतात, तर काही वैष्णव देवीवर, तर काही आपल्या इच्छा अमरनाथ ( भगवान शिवाचे उत्तर भारतातील एक पवित्र ठिकाण) कडून पूर्ण करून घेतात. काही लोक असा विचार करतील कि अमरनाथ म्हणजे एक बर्फाचा ढीग असून तो निसर्ग नियमांप्रमाणे तयार होतो. तो बघायला तेथे जायची काय गरज आहे? ते तसे नाहीये, तर लोक पूर्ण श्रद्धेने तेथे जातात. या भक्तांसाठी अमरनाथ म्हणजे प्रत्यक्ष भगवान शिव असून तो फक्त बर्फाचा ढीग नाही. हे भगवान शिवच आहेत या श्रद्धेने ते त्यांची पूजा करतात.

म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात कि , ‘ कोणीही कोणत्याही देवाची पूजा केली तरी त्या पूजेचे फळ देणारा मात्र मीच आहे’.

सर्वांना सर्वकाही देणारी अशी ती एक पूर्ण चेतना आहे. जेंव्हा कोणी हजच्या पवित्र यात्रेला जातो तेंव्हा त्यांना त्यातून निश्चितच काही आनंद मिळत असतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात कि, ‘ मी तो आनंद देणारा असतो. हा आनंद फक्त मी आणि माझ्यापासूनच मिळतो.’

मी परत एकदा तुम्हाला सांगतो कि ‘ मी म्हणजे कोणी मोर पिसांचा मुकुट घालून, भडक पिवळे कपडे घातलेली व्यक्ती नव्हे. ती एक पूर्ण चेतना असे सांगत असून ती सर्वत्र आणि सर्व गोष्टींमध्ये भरून राहिली आहे. यालाच वासुदेव असे म्हटले आहे.

असे जे तत्व जे अपरा प्रकृती आणि परा प्रकृती यांना आपल्यात सामावून घेते ते तत्व म्हणजे वासुदेव होय.

आणि हेच वासुदेव असे म्हणतात कि,

यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति | 
तस्य तस्याचला श्रद्धां तामेव विद्ध्याम्यहम | ( ७.२१) 

‘कोणीही, कोणतीही श्रद्धा ठेऊन माझ्याकडे येतो, त्यांना मी त्यांच्या भक्ती प्रमाणे त्यांच्या पूजेचे फळ प्राप्त करून देतो. आणि हि भक्ती त्यांच्यात निर्माण करणारा मीच असतो. म्हणजे हि भक्ती म्हणजे मी, हि पूजा म्हणजे मीच आणि त्याचे फळ पण माझ्याकडूनच येते. पण हे फळ तात्पुरते असते. पण जो ज्ञानी असतो तो मला, माझ्या स्वरूपाचे पूर्ण ज्ञान असलेला असा असतो आणि म्हणून तो त्या चार प्रकारच्या लोकांमध्ये श्रेष्ठ आहे’.

ज्याला कोणाला आत्म-ज्ञान झाले आहे, तो पण हेच म्हणतो कि ती फक्त एक (चेतना) आहे.असे लोक जाणून असतात कि हे सर्व त्या एकपासून निर्माण झाले आहे आणि त्यादृष्टीने ते त्या सर्वत्र एकालाच बघत असतात.

जे जगाच्या आसक्तीमध्ये आणि भांडणांमध्ये अडकून राहतात, त्यांना ते तसे दिसत नाही. ते मग आपापल्या धर्म शास्त्रांच्या पोथ्या-पुराणे एकमेकात भांडत बसतात आणि म्हणतात कि, ‘ मी जे म्हणतो तेच सत्य आहे’. किंवा , ‘ माझा धर्म सर्वश्रेष्ठ आहे’.

पण असे ज्ञानी जे भक्तीच्या परमोच्च शिखरावर पोहोचले आहेत त्यांच्या दृष्टीला सर्वत्र आणि सर्वांमध्ये एकच चैतन्य दिसते.

अनेक जन्म घेतल्यानंतर

15
2013
May
बंगलोर, भारत.


भगवतगीतेच्या सातव्या अध्यायाच्या सतराव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात,

 "तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तीविर्शिश्यते | 
प्रियो हि ज्ञानिनोsत्यर्थमहं स च मम प्रियः |" 

भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ' मला शरण जाणारे लोक साधारणपणे चार प्रकारचे असतात. त्यात पहिले म्हणजे दुखी , दुसरे म्हणजे ज्यांना ऐहिक सुखाची अपेक्षा असते असे, तिसरे म्हणजे जिज्ञासू आणि चवथे म्हणजे ज्ञानी. या सर्वांपैकी ज्ञानी मला सर्वात प्रिय असतो कारण त्याची भक्ति हि माझ्याशी एकरूप झालेली असते.

तसेच जे लोककाही ऐहिक सुखाची अपेक्षा ठेऊन मला शरण जातात ते असतात. कारण त्या क्षणाला त्यांची भक्ति हि परमोच्च असते.

परीक्षेच्या काळात सर्व विद्यार्थी रोज देवळात जाऊन देवाला चांगले गुण मिळविण्यासाठी प्रार्थना करीत असतात. पण एकदा का परीक्षा संपली कि मग देऊळ कोठे आहे हे ते विसरून जातात.मग त्या सर्वांना फक्त चित्रपटगृह दृष्टीला पडतात.(हशा) असे लोक हे आत्म केंद्रित असतात आणि ते फक्त काही उद्धेश ठेऊन (देवाकडे) येतात.

त्याचप्रमाणे जिज्ञासूलोक हे त्यांची ज्ञान जिज्ञासा भागविण्यासाठी देवाकडे वळतात. हे जिज्ञासू लोकपण आत्म केंद्रित असतात आणि म्हणून त्यांच्या देवभक्तीमध्ये काही न्यून दिसून येते.

पण ज्ञानी माणसाचे असे नसते. ज्ञानी माणूस हा समाधानी असतो आणि या अशा सदैव समाधानी माणसाची भक्ति हि नेहमी अविरत, अद्वितीय आणि एकरूप अशी असते.

मग त्याच्या काही इच्छा पूर्ण व्हायच्या असोत किंवा नसोत त्याची भक्ति हि सदैव तशीच असते.

दुख्खात किंवा सुखात असताना त्याच्या भक्तीत काही बदल होत नाही. लाभ किंवा हानी या दोन्ही अवस्थात त्याची भक्ति हि अढळ असते.

म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात कि ' असा ज्ञानी माणूस हा नेहमी माझ्याशी जोडलेला असतो आणि मी त्याच्याशी जोडलेला असतो.' जो माझ्याशी जोडलेला असतो तो ज्ञानी असतो, आणि अशा ज्ञानी माणसाची भक्ती हि अविरत आणि एकरूप अशी असते. असा ज्ञानी मनुष्य मला नेहमी प्रिय असतो आणि मी त्याला नेहमी प्रिय असतो. माझ्याशिवाय इतर कोठल्याच गोष्टीत त्याला रस नसतो आणि त्याच्यासाठी मी सर्वस्व असतो. आणि मग ज्या कोणाला मी असा प्रिय असतो, तो सुद्धा मला सर्वात प्रिय होतो.

भगवतगीतेच्या सातव्या अध्यायाच्या अठराव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात,

"उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम | 
आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्माम गतीम |" 

भगवान श्रीकृष्ण म्हणतात, 'याचा अर्थ असा नव्हे कि बाकीचे भक्त चांगले नाहीत. नाही, ते सर्व चांगले आहेत आणि निःसंशय हे सर्व भक्त मनुष्यात चांगले आहेत. मग ते माझ्याकडे दुखः दूर करण्याची मागणी घेऊन आले असतील किंवा काही ऐहिक सुखाची अपेक्षा ठेऊन आले असतील किंवा उत्सुकतेपोटी आले असोत, ते सर्व उत्तम आणि धार्मिक असेच आहेत. ते काही कामाचे नाहीत असे समजू नका.

सर्वसाधारणपणे, जेंव्हा आपण एकाला उत्तम म्हणतो तेंव्हा बाकीचे नगण्य समजले जातात. आणि मग ती आपली सवय होऊन जाते.जर कोणी एखादा चांगले असेल तर मग बाकीचे वाईट ठरतात.

आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण लगेचच असा खुलासा करतात कि ' हे चार हि प्रकारचे लोक चांगले असतात.म्हणून त्यांचावर टीका करू नका. त्यापैकी कुणा एकाला दुसऱ्यापेक्षा कमी समजू नका. तो कोणत्याही कारणांने भक्ति करीत असेल, मग तो दुखीः आहे म्हणून किंवा त्याच्या भौतिक सुखासाठी असेल म्हणून, किंवा त्याला ज्ञानाची तृष्णा असेल म्हणून, ते सर्व चांगलेच आहेत. पण मी आणि ज्ञानी मनुष्य यात काहीच फरक नाही. तो आणि मी एकच आहे.असा ज्ञानी माणूस माझ्याशी एकरूप होऊन त्याचा उद्धार होतो.

देव, गुरु आणि आत्मन (स्वतः) यात काही फरक नाही.म्हणून वासुदेव (श्रीकृष्णाचे अजून एक नाव)आणि ज्ञानी मनुष्य यात काही फरक नाही.

भगवान श्रीकृष्ण म्हणतात कि ‘ ज्ञानी मनुष्य हा आरश्याप्रमाणे असतो.तुम्ही जर ज्ञानी माणसात डोकावून पाहिलेत तर तेथे तुम्हाला तुमच्या मनाचे प्रतिबिंब पाहायला मिळेल.तुम्हाला तुमचे स्वत्व त्या ज्ञानी माणसात प्रतिबिंबित झालेले दिसेल.म्हणून त्याज्ञानी माणसात मला पाहायला लक्षात ठेवा आणि तो म्हणजेच मी आहे असे ध्यानात ठेवा. भगवतगीतेच्या सातव्या अध्यायाच्या एकोणिसाव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात,

“बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मा प्रपध्यते | 
वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः|” 

अनेक जन्म-मरणाच्या चक्रातून गेल्यानंतर ज्ञान प्राप्त होऊन ज्ञानी होतो. असे ज्ञानी आत्मे, ज्याचा माझ्यावर विश्वास आहे ते अनेक जन्म-मरणाच्या चक्रातून गेल्यानंतर मला प्राप्त करतात.असे पुण्यात्मे, कि ज्यांना माहित असते आणि जे असा विश्वास ठेवतात कि हि सर्व माझीच माया आहेआणि दुसरे काही नाही, ते पुण्यात्मे खरोखरच दुर्मिळ असतात.

तुमच्यापैकी अनेक जन असा विचार करीत असतील कि’ हे सत्य समजण्यासाठी मला अजून किती जन्म घ्यायला लागतील कोण जाणे’.

मी तुम्हाला सांगतो कि आज येथे हे ज्ञान मिळविण्यासाठी जेंव्हा तुम्ही आला आहात, तेंव्हा तुम्ही अनेक जन्म-मरणाची चक्रे पार केलेली आहेत. तुम्ही अनेक जन्म- मरणाची चक्रे पार करून तुम्ही येथे योग्य वेळी पोहोचला आहात. याच्या विरुद्ध विचार करू नका, ‘ हे ज्ञान मिळविण्यासाठी अजून किती जन्म घ्यावे लागणार आहेत कोणास ठाऊक?’

या बाबतीतील तुमची कल्पना अगदी या क्षणाला बदलून टाका.

आपण आपली एखाद्या गोष्टीविषयीची कल्पना केंव्हाही बदलू शकतो.अगदी देवापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा, आपल्याला एका गोष्टीची गरज असते आणि ती म्हणजे फक्त आपला बघण्याचा दृष्टीकोन बदलणे. त्यासाठी दुसरे काही करायची गरज नाही. त्यासाठी तुम्ही आराम करून बाकी सर्व कसे सोडून द्यायचे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता जेंव्हा तुमचे मन हे जगातील अनेक सुंदर गोष्टींकडे आकर्षित होत असताना तुम्ही हे सर्व कसे सोडून देणार. अनेक वेळा तुम्ही तुमच्या वाईट सवयी सोडून देऊ इच्छिता पण तुम्ही त्या सोडू शकत नाही.पण मग जेंव्हा तुम्ही तुम्हाला त्रासदायक आणि दुखः देणाऱ्या त्या वाईट सवयी सोडू शकत नाही तर तुम्हाला आकर्षित करणाऱ्या सुंदर गोष्टी तुम्ही कश्या सोडू शकणार?

जेंव्हा तुम्ही त्या त्रासदायक तसेच सुखकारक अशा गोष्टी सोडू शकत नाही तेंव्हा तुमचे मन दोलायमान होते. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण भगवत गीतेच्या सातव्या अध्यायाच्या अकराव्या श्लोकात म्हणतात, बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम.

जेंव्हा तुम्हाला शक्तीची जाणीव होईल तेंव्हा तेथे मी आहे असे खात्रीने समजा. शक्तिवान माणसाची शक्ती मी आहे. जेंव्हा तुम्हाला कोठे चमक दिसेल तर ती चमक म्हणजे मी होय असे समजा.

जेंव्हा तुम्हाला काही सुंदर गोष्ट दृष्टीला पडेल तेंव्हा ती म्हणजे मी होय असे समजा. जेंव्हा तुम्हाला कोणी बुद्धिमान दिसेल तेंव्हा त्याची बुद्धी म्हणजे मी होय असे समजा. तुम्ही सौंदर्य सोडून देऊ शकत नाही आणिते पकडून ठेऊ शकत नाही. तुम्ही जर ते पकडायचा प्रयत्न केला तर तुम्ही तसे करू शकणार नाही.खरे पाहता जेंव्हा आपण सौदर्य आपल्या ताब्यात ठेवायचा प्रयत्न करीत असतो तेंव्हा अनेक प्रश्न उद्भवतात.

म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘ अनेक जन्मानंतर, ज्ञानी माझ्याकडे येतात आणि मला शरण जातात.’ ज्ञानी लोकांचे अनेक स्तर असतात.आणि अनेक वेळेला काही ज्ञानी लोकांना अहंकाराची बाधा होते आणि ती त्यांच्या विनाशाला कारणीभूत होते. ते असा विचार करतात ‘ मी सर्वात ज्ञानी आहे, माझे ज्ञान हे इतर कोणापेक्षा जास्त आहे.’ असे लोक काही काळ ज्ञानी वाटतात पण लवकरच ते अज्ञानात नाहीसे होतात.

‘मी ज्ञानी आहे’ एवढा विचार अहंकार जागृत करायला पुरेसा असतो.त्याला दुर्हंकार असे म्हणतात. आणि जर एखाद्याला आपण ज्ञानी असल्याचा अहंकार उत्पन्न झाला तर त्याचा परिणाम हा फार वाईट होतो.

अशी विचारसरणी असलेले लोक हे शास्त्रज्ञ आणि हुशार , बुद्धिवान माणसात पाहायला मिळतात.असे लोक जेंव्हा ज्ञानाच्या एका पातळीवर पोहोचतात तेंव्हा त्यांना असे वाटते कि त्यांनाच सर्व काही कळते आणि मग ते दुसऱ्या कोणाचे काही ऐकून घेत नाहीत.

भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘ एक ज्ञानी मनुष्य जो भक्त पण आहे, ज्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, आणि जो जगातली प्रत्येक गोष्टीत मला पाहतो, तो महात्मा’. हा ज्ञानी आणि महात्मा यातील फरक होय.

जो महत तत्व च्या पलीकडे गेला आहे ( असे तत्व कि जे अहंकारापेक्षा सूक्ष्म आहे) तो महात्मा.

ज्याप्रमाणे प्रकृतीचे आठ प्रकार असू शकतात- पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अवकाश, मन, बुद्धी आणि अहंकार, ( दैवी उर्जेच्या आठ प्राकृतिक अभिव्यक्ती) , महा तत्व हे याअहंकाराच्या पलीकडले असून ते अगदी सूक्ष्म आहे.

जो अहंकाराच्या पलीकडे गेलेला आहे आणि ज्याने महा तत्वाचा अनुभव घेतला आहे तो महात्मा.

हाच तर बुद्धी आणि ज्ञान यातील फरक आहे. ज्ञान हे बुद्धीतून निर्माण होते, पण जेंव्हा त्याला अहंकाराचा स्पर्श होतो तेंव्हा ते अज्ञानात परिवर्तीत होते. मग अशा मनुष्याचे अधःपतन सुरु होते. ज्ञानाबद्धलचा अहंकार सर्वात घातक असतो आणि तो मग अधःपतनाला कारणीभूत होतो.

आता कोण या अहंकाराच्या पलीकडे जाऊ शकतो? फक्त एक भक्त अहंकाराच्या पलीकडे जाऊ शकतो. भक्त होणे म्हणजे नम्र,साधे आणि स्वाभाविक असणे होय.

भक्त अगदी वेड्याकडून पण शिकायला तयार असतो, जो लहानमुलाकडून शिकायला तयार असतो, किंवा एक स्त्रीकडून, किंवा पुरुषाकडून, जो कोणाकडून हि ज्ञान मिळवायचा प्रयत्न करतो,कारण त्याला त्या सर्वात देव दिसत असतो, आणि असे नेहमी दुर्मिळ असते. जो सर्वत्र दैवी तत्वाचा अनुभव घेत असतो,तोच महात्मा. असा माणूस जो कि त्याला शिव्या-शाप देणाऱ्या मध्येपण वासुदेवाला पाहतो, आणि त्याची स्तुती करणाऱ्यात पण वासुदेवाला पाहतो, असा दुर्मिळ असतो कारण तो केवळ बाह्यरंग न बघता त्याच्या अंतर-आत्म्याला पाहत असतो आणि वरच्या देखाव्याला भुलत नाही.

याचा अर्थ असा नव्हे कि ‘वासुदेव, वासुदेव “ म्हणत तुम्ही मुलांच्या मागे लागा, असे केल्याने ती घाबरून जातील. तुम्ही नेहमीसारखे वागले पाहिजे पण तुमच्या मनात अशी खूण-गाठ बांधली पाहिजे कि हे सर्व एकाच दैवी तत्त्वातून निर्माण झाले असेऊन त्याचाच एक भाग आहेत.

चित्रपटातील नायक आणि खलनायक हे एकाच तत्त्वातून आलेले असतात.पडद्यावर दिसणारे सर्व एकाच दिव्याच्या भिंगातून येत असतात. तुम्ही तो चित्रपट आणि त्यातील अभिव्यक्ती यात न गुंतता ते दाखविणाऱ्या दिव्याच्या भिंगाकडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे.

ते दैवी भिंग, तो दैवी दिवा म्हणजे वासुदेव होय, ती एक विशुद्ध जागृतीची जाणीव ज्यातून हे सर्व उत्पन्न झाले आहे आणि ज्याच्या आधारावर हे सर्व चालू आहे ते. हे सर्व म्हणजे त्या एकमेव जाणिवेचे खेळ आहेत आणि तीच जाणीव तुमच्यात पण आहे.

म्हणून ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या नाटकात भाग घेता, जेथे प्रत्येकाला एक भूमिका असते, तुम्ही पण तुमच्या वाट्याला आलेली भूमिका पार पाडा.

स्वधर्म काय आहे?

07
2013
Jun
बंगलोर, भारत


प्रश्न : गुरुदेव, स्वधर्म  म्हणजे काय आणि मला कसे कळेल की माझा स्वधर्म  काय आहे ते?

श्री श्री : स्वधर्म  म्हणजे ती कृती जी तुमच्या प्रकृतीबरोबर सुसंगत आहे. तुमची कौशल्ये आणि तुमची गुणवत्ता, तुमचा स्वतःचा स्वभाव यांच्या अन्वये कृती करणे होय आणि ते ज्या करिता तुम्ही जबाबदार (कर्म) आहात.

अशी कोणतीही कृती ज्यामुळे तुम्हाला भय अथवा अस्वस्थता वाटत नाही ती कृती स्वधर्म आहे. ती कृती जी करण्यासाठी तुम्ही भाग आहात असे वाटते आणि ती नाही केली तर तुम्हाला अस्वस्थ वाटते ती कृती स्वधर्म  आहे.

आता यातून गैरसमज करून घेऊ नका आणि असे म्हणू नका, ‘मी जर मद्यप्राशन नाही केले तर मला अस्वस्थ वाटते’. नाही! बिलकुल नाही. दरवेळी जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटते ते नेहमी स्वधर्मामुळेच  वाटते असे नाही. परंतु त्याचवेळेस तुम्ही जर तुमचा स्वधर्म  पाळला नाही तर तुम्हाला नेहमीच अस्वस्थ वाटेल.

म्हणूनच भगवद्गीतेमध्ये, ‘स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः’(३.३५) असे म्हटलेले आहे.

जेव्हा आपण काहीतरी खरेपणाने करीत नाही, केवळ दुसऱ्या माणसाच्या दिखाव्यासाठी करतो तेव्हा आपल्याला भय वाटते कारण अशी कृती अस्सल नसते, ती हृदयापासून आलेली नसते. परंतु जेव्हा आपण काहीतरी करतो जे अस्सल असते आणि हृदयापासून असते तेव्हा कोणतेही भय नसते.

जेव्हा कोणीतरी खोटे बोलते तेव्हा त्यांना नक्कीच आतून कुठेतरी भीती वाटत असते. पण जेव्हा कोणी खरे बोलत असते तेव्हा त्यांना कोणतीही भीती वाटत नाही. खरे पाहता सत्य बोलणे आणि त्याच्याबरोबर एकनिष्ठ राहण्याने तुम्हाला अतिशय शक्ती मिळते, हो न? हाच तर स्वधर्म  आहे.

आपल्याला जीवनात जे नैसर्गिकपणे प्राप्त झाले आहे त्याच्या मागे आपण गेलो तर ते आपल्या जीवनात भरभराट आणि उत्कर्ष घेऊन येते. जेव्हा आपण आपल्या नैसर्गिक स्वभावानुसार जायला लागतो तेव्हा आपण आतून परिपक्व होऊ लागतो. आपल्याला उत्थित करणारी प्रत्येक कृती ही आपला स्वधर्म  आहे.

आपले मन, बुद्धी, स्मृती आणि अंतरात्मा यांना एकत्रितपणे एकोप्याने बांधून ठेवतो तो धर्म होय. वृद्धी तेव्हाच होते जेव्हा आपण आपला स्वधर्म पाळतो. 

प्रश्न : गुरुदेव, भगवद्गीतेत तुम्ही म्हटले आहे की देव सगळीकडे आहे, परंतु याचा प्रात्यक्षिक अनुभव आम्हाला आमच्या दैनंदिन जीवनात कसा काय येऊ शकतो?

श्री श्री : हे पहा, ज्ञानाचे हे दोन पैलू आहेत. एक आहे बोध- म्हणजे ज्ञान स्वयंच होय, आणि दुसरे आहे व्यवहार – म्हणजे ज्ञानाचे आचरण करणे आणि ते प्रात्यक्षिकपणे अनुभवणे. 

तुम्हाला माहिती आहे की तुमच्या घरात दरवाजे, टेबल आणि खुर्च्या आहेत जे लाकडापासून बनलेले आहेत. पण खुर्चीच्या जागी तुम्ही टेबल वापरू शकत नाही, ना तुम्ही खुर्चीच्या जागी दरवाजा वापरू शकता, हो ना? जरी पलंग, दरवाजा आणि टेबल हे सर्व एकाच पदार्थापासून (लाकडापासून) बनलेले आहेत, तरीसुद्धा तुम्ही एकाच्या जागी दुसरे वापरू शकत नाही, कारण प्रत्यक्ष ते एकमेकांपेक्षा निराळे आहेत आणि त्यांचे उपयोगसुद्धा वेगळे आहेत. त्याचप्रमाणे, एकाच देव आहे जो तरुण आणि वयस्क अशा दोन्हीमध्ये आहे. परंतु जर तुम्ही म्हणाल की ते सर्व एकच (एकच देव असलेले) आहेत आणि लहान मुलांच्या पाया पडू लागलात आणि वयस्कर लोकांना आशीर्वाद देऊ लागलात तर त्यांना वाटेल की तुम्हाला वेड लागलेले आहे. त्यांना वाटेल की तुमचे काही खरे नाही. तर तुमची वागण्याची पद्धत प्रत्येक व्यक्तीनुसार भिन्न आहे. तुम्ही सर्वांबरोबर एकाच पद्धतीने वागू शकत नाही. परंतु तुम्हाला संभावना – म्हणजे सर्वांमध्ये आणि सभोवतीच्या सर्व गोष्टींमध्ये देवाला पाहणे- असायला पाहिजे. 

जेव्हा तुम्हाला हे अद्वैताचे  ज्ञान ( भारतीय तत्वज्ञानाची शाखा जी अद्वैताला महत्व देते) समजते आणि तुम्ही ते तुमच्या हृदयात ठेवता तेव्हा तुम्ही तुमच्या स्वयंमध्ये पक्के स्थापित होता. केवळ तेव्हा तुम्ही या निष्कर्षावर येत की अखेरीस एकच आत्मा (चैतन्य) आहे जे सर्वांमध्ये आणि सर्व गोष्टींमध्ये आहे, तरीसुद्धा तुम्हाला प्रत्येक गोष्टीला त्याच्या प्रकृतीनुसार वागणूक द्यायला पाहिजे.( म्हणजे हुशारीने फरक करा आणि तरीसुद्धा अव्यक्त असलेल्या एकत्वला आपल्या सभोवतीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये पाहणे ).

प्रश्न : गुरुदेव, मी माझ्या नवऱ्याला खुश करण्यासाठी काहीही जरी केले जरी तो कधीच खुश होत नाही. तो माझ्यामध्ये दोषच शोधत राहतो. मी काय करू?

श्री श्री : जर तुम्हाला माहिती आहे की ही त्यांची सवय आहे तर मग तुम्ही का विचलित होता? त्यांचा स्वीकार करा आणि पुढे चला. स्वतःला आनंदी ठेवा. जर तुम्ही त्यांच्या वागण्याने विचलित होण्याचे बंद केले तर त्यांचामध्ये बदल घडून येणे सुरु होईल.

प्रत्येक माणसामध्ये कोणता ना कोणता नकारात्मक गुण हा असतोच. आणि हे नकारात्मक गुण तुमच्या कळा दाबण्यासाठीसुद्धा असतात, ज्यामुळे मग तुम्ही शक्तिशाली व्हाल. एकदा का तुम्ही शक्तिशाली झालात की मग तेसुद्धा बदलू लागतील.

जीवनात सर्व काही बदलते, आणि काही गोष्टी अश्या असतात की ज्या बदलत नाहीत. आपण या दोन्ही गोष्टी स्वीकारायला पाहिजे.

प्रश्न : गुरुदेव, भारतामध्ये गोहत्या होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. असा कोणता कडक कायदा संसदेमध्ये पास करता येईल का ज्याद्वारे याच्यावर बंदी घालता येईल?

श्री श्री : भारतात गायींची संख्या स्वातंत्र्यपूर्व असलेलेच्या आता केवळ २०%च आहे हे अतिशय दुर्दैवी आहे. आपल्या देशातील पशु संपत्ती फार मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे आणि आता आजच्या घडीला तर आधीच्या मानाने एकदमच कमी झालेली आहे. 

देशाच्या अनेक भागांमध्ये दुधाचा तुटवडा भासत आहे. उत्तर भारतातील काही बाजारात विकले जाणारी मिठाई खाण्यासाठी सुरक्षित नाही असे तुम्ही ऐकले असेलच. ते मिठाई बनवताना युरिया आणि अजून काही रसायने वापरतात. काही ठिकाणी तर फार मोठ्या प्रमाणावर भेसळ होते. खवा  ( मिठाईला घट्टपणा आणि घनदाट बनवण्यासाठी दुधापासून बनवलेला पदार्थ) बनवताना लोक त्यात रसायने घालतात आणि असा खवा नंतर मिठाई बनवण्यासाठी वापरला जातो. याच्यामुळे कितीतरी लोकांचा मृत्यू झालेला आहे, आणि अनेक लोक अजूनपण सोसत आहेत. लोक भेसळ करायचे तेव्हाच सुरु करतात जेव्हा आवश्यक पदार्थांचा तुटवडा असतो. जर तुटवडा नसेल तर मग भेसळसुद्धा होणार नाही. मग तर भेसळ करणे महाग पडेल. (महाग रसायने आणि कृत्रिम पदार्थ करून भेसळ करणे महाग पडेल.)

आपल्या देशातील पशु संपत्ती वाढवण्याचे आपण प्रयत्न केले पाहिजे, आणि पशु संख्येमध्ये गायींची संख्या वाढवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे.

इतक्यातच माझ्या वाचण्यात एक संशोधन आले ज्यामध्ये त्यांनी भारतीय गायींचे दुध आणि युरोपातून आणलेल्या गायींचे दुध यातील फरक सांगितला आहे.

परदेशातील गायींच्या दुधात सापडणारे प्रथिने आहे त्याला अ१ म्हणतात. अ१ प्रथिनांमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदय विकार इ.इ. होते. अ१ प्रथिनामुळे अनेक आजार होतात. दुसऱ्या बाजूला एक दुसऱ्या प्रकारचे प्रथिने आहे ज्याला अ२ म्हणतात. अ२ प्रथिने हे मातेच्या दुधात सापडतात आणि (भारतीय) गायींच्या आणि शेळीच्या दुधातसुद्धा सापडतात. म्हणून मातेचे दुध, शेळीचे दुध आणि भारतीय गायीचे दुध हे सर्व समान (त्यातील घटक समान आहेत) आहेत. हे कसे ते तुम्हाला माहिती आहे? भारतामध्ये अनेक वर्षांपासून गायीला मातेप्रमाणे मान आणि आदर दिल्या गेला आहे. तर हा विचार किंवा ही जाणीव जी आपल्या परंपरेमध्ये आहे त्यामुळे गायीचे डीनए बदलले असून आता तिच्या दुधात अ२ हे प्रथिने अ१ या प्रथिनाच्या जागी बनू लागले आहे. भारतीय गायींचे दुध हे इतके महत्वाचे आणि उपयुक्त आहे की ते कर्करोगाच्या इलाजावरील औषधांमध्येसुद्धा वापरले जाते.

म्हणून गोहत्या ही कोणत्याही परिस्थितीत बंद झालीच पाहिजे. याच्या विरोधात कडक कायदा पास झालाच पाहिजे, परंतु अधिक महत्वाचे आहे की लोकांना या सत्याच्या बाबतीत अधिकधिक जागरूक केले पाहिजे.

प्रश्न : गुरुदेव, काल तुम्ही म्हणालात की देव सगळ्यांची काळजी घेतो, तर मग सगळीकडे गरिबी का आहे, पूर का येतो?

श्री श्री : कोणतीही समस्या नसलेले जग अशी कल्पना करून पहा. तुम्ही सिनेमा पाहायला जाता आणि त्या सिनेमामध्ये कोणतीही समस्या नाही आणि कोणताही तणाव नाही. एक माणूस उठतो, जेवतो, कामाला जातो, घरी येतो आणि झोपी जातो, आणि दररोज तीच ती गोष्ट करतो. असा सिनेमा बघायला तुम्ही जाल का?

असा सिनेमा बघायला तुम्हाला मजा तरी येईल का? तुम्हाल सिनेमा बघायला कधी मजा येईल? जेव्हा त्यात खलनायक, किंवा काही तणाव, किंवा काही समस्या असतील तर. मग तुम्ही बाहेर येऊन म्हणाल, ‘हा फारच चांगला सिनेमा होता.’

त्याचप्रमाणे, देवाकरिता हे जग म्हणजे एक सिनेमाच आहे . तसेच पुरामध्ये कोणीही मृत्यू पावत नाही. ते सगळे दुसरे शरीर धारण करून पुन्हा येतात.

आपल्यालासुद्धा करायला काहीतरी पाहिजे. जरा कल्पना करून पहा, जर या जगामध्ये काहीच समस्या नसतील, सगळेजण निरोगी आणि आनंदी असतील तर मग अनुकंपेकरिता जागा उरणार नाही. तुम्हाला कोणाच्या प्रती अनुकंपा वाटेल? अनुकंपा आणि इतर सर्व मुल्ये नाहीशी होऊन जातील.

तर या जगामधील आपले उद्दिष्ट आपल्या लक्षात येण्याकरिता या जगामध्ये समस्या आहेत.

प्रश्न : मी माझ्या आकर्षणांवर कसा विजय मिळवू? मला कोणीही फार लवकर आवडू लागते आणि त्याचा मला त्रास होतो.

श्री श्री : मला वाटते की तुमच्याकडे फार जास्त मोकळा वेळ आहे. तुम्हाला व्यस्त राहायला पाहिजे. हे फार लहान वय आहे आकर्षित होण्यासाठी. तुम्ही अजून फुलाप्रमाणे फुललासुद्धा नाही आहात, तुम्ही अजून एक कळीच आहात. तुमचा कोणी चुराडा करू देऊ नका. त्याच्यासाठी अजून बराच अवधी आहे. आता सध्या तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. सगळ्यांना मोहून टाका परंतु अडकून पडू नका, पुढे जात राहा, हे ते सूत्र आहे.

प्रश्न : गुरुदेव, एकदा मी एका योग्याची आत्मकथा  या पुस्तकात असे वाचले की हिमालयात असे योगी आहेत जे एका जागेहून दुसऱ्या जागी खास तंत्राचा वापर करून प्रवास करतात. हे खरे आहे का? जर हो तर आम्हाला असा अनुभव येऊ शकतो का?

श्री श्री : नाही, असे काहीही नाहीये. तुम्ही हिमालयात जाऊन सगळीकडे शोधले तरीसुद्धा तुम्हाला असे काही सापडणार नाही.

प्रश्न : आम्ही तुम्हाला काही जलदगती प्रश्न विचारू शकतो काय?

श्री श्री : होय, जरूर.

तुम्ही कोण आहात?
स्वतःला विचारण्यास चांगला प्रश्न.

गेल्या जन्मी तुम्ही कोण होतात?
ते एक गुपित आहे, मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन.

देव कोण आणि काय आहे?
कोण आणि काय देव नाही आहे.

आम्ही देवाला कसे जाणवावे?
केवळ शांत राहा. त्याच्याबद्दल काळजी करू नका, त्याला तुमची काळजी घेऊन द्या.

जग हिंसाचार-मुक्त आणि तणाव-रहित कसे काय होऊ शकेल?
दि आर्ट ऑफ लिविंग चा प्रसार करा.

पृथ्वीचे भविष्य काय आहे?
तुमच्यासारख्या लोकांबरोबर फारच उज्जवल.

धर्म काय आहे?
तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जाणारा धर्म असतो.

सत्य काय आहे?
ते जे ज्याची व्याख्या करता येत नाही आणि त्याला टाळता येत नाही.

सकारात्मक काय आणि नकारात्मक काय?
तुम्हाला जे उन्नत करते ते सकारात्मक आणि जे तुमचा ऱ्हास करते ते नकारात्मक.

गुरु कोण आहे?
प्रश्नाचे उत्तर देणारा.

मन काय आहे?
ते जे प्रश्न करते.

अभ्यास करताना जेव्हा तुम्हाला तणाव वाटेल तेव्हा केवळ शिथिल व्हा. आणि सर्व विद्यार्थ्यांनी गाजर खाल्ले पाहिजे.

खास करून त्यांनी ज्यांनी चष्मा लावलेला आहे, तुम्हाला अ जीवनसत्वाची गरज आहे आणि ते गाजरातून मिळते.

व्यवस्थित अन्न फार जरुरी आहे. जर तुम्ही व्यवस्थित जेवलात तर तुम्ही आजारी पडणार नाही. आपण आजारी पडतो कारण आपण नीट जेवत नाही. अनेक वेळा आपल्याला चवदार अन्न खायचे असते, आणि शरीरासाठी चांगले असलेले अन्न नको असते. आपण शरीरासाठी चांगले असलेले अन्न जेवले पाहिजे.

आठवड्यातून दोन ते तीन वेळा कडूनिंबाची गोळी घ्या. ती पोट आणि चेतासंस्थेकरिता फार चांगली असते. तुम्हाला माहिती आहे महात्मा गांधींच्या आश्रमात दररोज ते कडूनिंबाची चटणी ठेवायचे, कारण ती मन, शरीर आणि पोट यांच्यासाठी फार चांगली असते. त्याने शरीराची प्रतिकारशक्तीसिद्ध वाढते. त्रिफळा  सुद्धा शरीरासाठी फार चांगली आहे. त्रिफळामुळे शरीराचे सर्व असंतुलन ठीक होऊन जाते.

म्हणून आपण ही आयुर्वेदिक औषधे घेतली पाहिजे, ती शरीरासाठी चांगली असतात. आणि आपण काही मंत्रोच्चार केले पाहिजे.

आज,मी एका लेखामध्ये वाचले की ॐ हा केवळ मंत्र नसून ते एक औषधसुद्धा आहे. म्हणून आपण रोज ॐ चे उच्चारण रोज केले पाहिजे, निदान तीनदा तरी.

ॐ नमो नारायणा  किंवा ॐ नमः शिवाय  याचे रोज उच्चारण करा. यांना महा मंत्र  म्हणतात. आपण मंत्रोच्चारण रोज केले पाहिजे.

तर चांगले अन्न जेवा, औषधे वापरा, मंत्रोच्चार करा आणि सुहास्य राहा.

सर्वांच्या आयुष्यात समस्या आहेत. त्या येतात आणि जातात. कोणतीही समस्या कायमची राहत नाही. तर मला कशाची गरज आहे ते मला मिळणारच अशी श्रद्धा ठेवा आणि पुढे चालत राहा.