देवाकडे आसरा घ्या

25
2013
Nov
बंगलोर, भारत
 
प्रश्न: गुरुदेव, भगवद्गीतेत श्रीकृष्णाने त्याचा आसरा घ्यायला सांगितले 
आहे. त्याचा अर्थ काय ? कृपया सांगा.
श्री श्री : आसरा घेणे म्हणजे निवांत रहाणे. आई घरी आहे म्हटल्यावर मुलाला
कसे निवांत वाटते अगदी तसेच. आई घरी असली की मुलाला आत्मविश्वास 
वाटतो. आई घरी आहे या जाणिवेमुळे तो मनातल्या मनात अगदी आरामशीर 
असतो. एक सुरक्षिततेची भावना, आत्मविश्वास, माझ्या मागे आधार देणारे, 
मला मार्गदर्शन करणारे, माझी काळजी घेणारे कुणीतरी आहे ही भावना, या 
सगळ्यामुळे खोलवर एक सुरक्षिततेची भावना निर्माण होते. हाच हाच आसरा 
आहे. जेव्हा तुमच्याकडे तो नसतो, जेव्हा तुम्ही अस्वस्थ, काळजीत आणि 
तणावाखाली असता तेव्हा तुम्हाला तो अधार हवा असतो. जेव्हा आधार 
दिला जातो तेव्हा तो घेणे म्हणजे आसरा घेणे. 
 
प्रश्न: गुरुदेव, आध्यात्माबद्दल जगातल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या संकल्पना 
असतात. काहींना वाटते की धार्मिक असणे म्हणजे आध्यात्मिक असणे किंवा 
या जगालाच नाकारणे म्हणजे आध्यात्म. तुम्ही आध्यात्माची व्याख्या कशी 
कराल ? 
श्री श्री : हे जड शरिर आणि आत्मा या दोन्हीचे मिळून आपण बनलो आहोत. 
जड शरीर म्हणजे, कर्बोदके, प्रथिने, अमिनो अॅसिड हे सगळे आणि आत्मा 
किंवा चैतन्य म्हणजे मन:शांती, प्रेम, आनंद, करुणा, नैतिकता, प्रामाणीकपणा 
वगैरे सगळे गुण. तर, प्रेम, मन:शांती, आनंद, उत्सव मनवणे, विनोद, 
नैतिकता, प्रामाणीकपणा, ज्ञान या सर्व गोष्टी ज्या कुठल्या गोष्टीमुळे वृद्धींगत 
होतील तीच आध्यात्मिकता आहे. जी गोष्ट या चैतन्याचा स्तर उंचावेल आणि 
तुम्हाला याची जाणीव करून देईल की तुम्ही तुम्ही शरीरापेक्षाही जास्त काही 
आहात, तुम्ही सकल विश्वाशी जोडलेले आहात, तीच आध्यात्मिकता आहे. 
आजकालचे शास्त्रज्ञ म्हणतात की हे संपूर्ण जग एकच जीव एकच वैश्विक 
काया आहे. केवळ एक संकल्पना नाही तर अनुभवाच्या स्तरावर हे समजणे 
म्हणजे आध्यात्म. प्रेमाचेही तसेच आहे, दुसरं असं काहीच नाहिये असं 
तुम्हाला जाणवलं की मग सगळं काही तुमचाच भाग असतं. क्वांटम 
फिजिक्सची ही गोष्ट तुमच्या जीवनातले सत्य म्हणून कळते तेच आध्यात्म 
आहे. क्वांटम फिजिक्स असे म्हणते की संपूर्ण विश्व एका लह्रीपासून 
बंलेआहे.जड वस्तू अशी काहीच नाहिये, सगळ्या लहरीच आहेत. तुम्हाला 
याचा अनुभव आला आहे कां ? तेच आध्यात्म आहे. 
गहिऱ्या ध्यानात या सत्याशी जोडले जाणे आणि त्याची अनुभूती होणे 
शक्य आहे. त्यामुळे ध्यान हा आध्यात्माचाच भाग बनतो. हेच कृतीत 
आणले की ती सेवा होते. म्हणजेच सेवाही आध्यात्माचाच भाग आहे. 


प्रश्न : गुरुदेव, देव या कल्पनेवर किंवा त्या सत्यावर विश्वास नसलेली  
एखादी व्यक्ती आध्यात्मिक असू शकते कां ? 
श्री श्री : होय, नक्की ! आध्यातिक असण्यासाठी कोणत्याही धर्मावर 
विश्वास असण्याची गरज नाही. फक्त जिज्ञासूवृत्ती असली की तुम्ही 
आध्यात्मिक असता. तुमच्यात खळखळता उत्साह असायला हवा. 
तुम्हाला खूपच कमी माहित आहे आणि जाणून घेण्यासारखे अजून 
खूप काही आहे तर तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर पुढे जात आहात. 
जर तुमच्याकडे खळाळता उत्साह, आनंद असेल आणि तुम्ही जर 
सेवा करून दुसर्यांचा आनंद द्विगुणीत करत असाल तर तो आध्यात्माचाच 
भाग आहे. संपूर्ण समाधानाची भावना,पूर्णत्वाची भावना हा सगळा 
आध्यात्माचाच भाग आहे. 
 
प्रश्न: गुरुदेव, प्रेम आणि वैराग्य दोन्ही एका वेळी असू शकते कां ? 
ते दोन्ही विरोधी वाटतात. 
श्री श्री : हे दोन्ही एका वेळी असायलाच हवे नाहीतर तुम्ही असे असूच 
शकणार नाहीं. जसे श्वास आणि उच्छवास दोन्ही विरोधी आहेत पण ते 
दोन्ही असावेच लागतात. तुम्ही श्वास सोडत असतानाच श्वास घेऊ शकत 
नाही, ते एकानंतर एक असेच व्हावे लागते. तसेच प्रेम आणि वैराग्य. 
प्रेम म्हणजे आसक्ती आसक्तीची गरज आहे आणि तुम्हाला शहाणे आणि 
समजूतदार राहण्यासाठी वैराग्यही तितकेच महत्वाचे आहे.


प्रश्न : गळ्यात जानवे (यज्ञोपवित) घातल्यानंतरसुद्धा लॉक आपल्या 
जबाबदाऱ्या नीट निभावत नाहीत. जानवे घातल्यानंतर आपल्याला आपल्या 
जबाबदाऱ्यांची आठवण रहाते असे तुम्हाला खरेच वाटते कां ? 
श्री श्री : ते फक्त एक चिन्ह आहे. 
तुम्ही वंदे मातरमचा बिल्ला लावला म्हणजे तुम्ही देशभक्त होत नाही. 
त्याचप्रमाणे तुम्ही जानवे घातले म्हणजे तुम्ही जबाबदार बनता असे नाही. 
याला काही अर्थ नाही. बरेच लोक जानवे घालतात पण ते कां घालायचे हेच 
त्यांना माहित नसते. त्यांना त्याची काहीच कल्पना नसते. 

प्रश्न : गुरुदेव, लहान मुलांनी कोणत्या दिशेने झोने जास्त चागले ? 
पूर्व, पश्चिम की उत्तरेला तोंड करून ? 
श्री श्री : पृथ्वीचा चुंबकीय अक्ष छेदण्यासाठी पूर्व पश्चिम झोपणे खूप 
चांगले असते असे म्हणतात. 

प्रश्न : जेव्हा तुमच्याकडे पुरेसे असते तेव्हा तुम्ही लोकांना देता. मला 
वाटते की माणसाला हे ठरवणे कठीण आहे की त्याच्यासाठी पुरेसे म्हणजे 
किती ? माझ्यासाठी पुरेसे म्हणजे किती हे मला कसे कळेल ? मनाला 
नेहमी आणखी आणखी हवे असते.
श्री श्री : लोकांकडे लाखो असतात तरी ते लुबाडत असतात. ही दुर्दैवाची 
गोष्ट आहे. हव्यास स्वत:ला आणि दुसऱ्यांनाही मारतो. 
तुम्ही जे कमावता त्यातले थोडेसे बाजूला ठेवा. त्याला हात लावू नका. 
समजा तुम्ही एक क्ष रक्कम कमावली तर्त्यातले दहा टक्के बाजूला ठेवा. 
दहा टक्के तुमच्या स्वत:साठी बचत करा. आणि मग तुमचा जो खर्च 
असेल तो करा. काही रक्कम भविष्याची तरतूद म्हणून ठेवा. असे आयोजन 
करा. 
जी रक्कम तुम्ही वाचवता ती कदाचित् तुम्ही दान करण्यासाठी बाजूला 
ठेवण्याच्या रकमेच्या तीन ते पाच टक्के इतकीच असेल. 
प्रत्येक जण दान करू शकतो. दान करण्यासाठी खूप कमवायला हवे 
असे नाही. तुम्ही जे कमावता त्यातले तीन टक्के दान करण्यासाठी बाजूला ठेवा. 

मला वाटतं तुम्हाला तुमच्या पालकांकडून हात खर्चाला पैसे (पॉकेट मनी) 
मिळत असतील. समजा तुम्हाला क्ष रक्कम मिळत असेल तर तुम्ही 
त्यातले तीन टक्के बाजूला ठेवू शकता. ते सगळे पैसे खाणे, 
सिनेमा आणि इतर्गोष्टींवर खर्च करण्या ऐवजी तुम्ही थोडे पैसें वाचवू शकता 
म्हणजे तुमच्या मध्ये ती सवय बाणवली जाईल. तुम्हाला हे दिसून येईल की 
तुमच्या आयुष्यात कधीच अभाव असणार नाही. अभाव नाहीसा होईल आणि 
तुम्ही आनंदी व्हाल.  

प्रश्न : गुरुदेव, राजयोग म्हणजे काय ? तो फक्त राजासाठीच असतो 
कां ? 
श्री श्री : राजयोग म्हणजे फारसे कष्ट न करता गोष्टी मिळणे. 
तुम्ही जे करताय तो राज योग आहे. तुम्हाला इथे सगळे अगदी 
तबकात ठेऊन तयार मिळते आहे. बुद्धाने जे केले त्यातले तुम्हाला काहीच 
करावे लागले नाही. ते वर्षानुवर्षे मैलोनमैल चालले. त्यांनी काय नाही केले ? 
त्यांनी कित्येक महिने उपवास केला. सगळे सांगतील ते सर्व काही केले. 
तुम्हाला अनुभव मिळण्यासाठी हिमालयात जावे लागले नाही किंवा इथेही 
काही विशेष करावे लागले नाही. राजेशाही थाटात तुम्हाला इथे बसून हवे 
ते मिळाले. हा राज योग आहे. 
राज योग म्हणजे राजा सारखे, ज्याला सगळे एका चुटकी सरशी मिळते. 
आयुष्यात विनासायास सर्व गोष्टी मिळणे म्हणजे राज योग. 
ज्योतिष शास्त्रात अनेक प्रकारचे योग जुळलेले असतात. एका विशिष्ठ प्रकारचे 
योग जुळलेले असले तर तो राज योग असतो. म्हणजे तुम्ही एका चांगल्या 
कुटुंबात जन्मलेले असता, तुमचा व्यवसाय चांगला चाललेला असतो, चांगला 
पैसा, चांगली मुले किंवा चांगले गुण, या सर्व गोष्टी राज्योगाच्या प्रभावामुळे 
मिळाल्या असे मानले जाते. नाव, प्रसिद्धी,गुण हा एक प्रकारचा राज्योग्च आहे. 
अनेक प्रकारचे राज योग आहेत. 

प्रश्न : गुरुदेव, कृष्णाने प्रत्यक्ष ध्यान करायला ण लावताही ध्यान योग 
किंवा कर्म योग कसा शिकवला ? 
श्री श्री : जेव्हा स्वत:च योगेश्वर असतो तेव्हा त्याचे परिणाम ताबडतोब 
होतात. फारसे काही करावे लागत नाही. नुसते म्हटले की ते लगेच पक्के होते.
संस्क्र्त्मध्ये म्हटले आहे की, ‘ऋषीनां यत् चित्तानां वाचं अर्थोनु धावते’. म्हणजे, 
जेव्हा तुम्ही सिध्द झालेले असता तेव्हा तुम्ही काही म्हटले की त्याचा अर्थ त्याच्या 
मागे येतोच. जर तुम्ही स्वत:मध्ये सुस्थापित झालेले नसाल तर तुम्ही एखादा 
शंभर वेळा म्हटलात तरी त्याचा परिणाम होत नाही. 

प्रश्न : गुरुदेव, जग बदलणे आणि सेवा करणे हे माझे ध्येय आहे. माझे 
लग्न न झालेले मित्र मला लग्न करायला सांगताहेत आणि माझे लग्न झालेले 
मित्र म्हणताहेत की जग बदलण्याचे तर विसरूनच जा, तुला टीव्हीचा चॅनलही 
बदलता येणार नाही. मी कुणाचे ऐकू ? 

श्री श्री : तू तुला कशाची गरज आहे ते ऐक, स्वत:च्या मनाचे ऐक. 
लग्न झालेले आणि दु:खी असलेले लोक आहेत; आणि लग्न न होऊनही 
दु:खी असलेले लोक आहेत. त्याचप्रमाणे लग्न न होऊनही आनंदी असलेले लोक 
आहेत आणि लग्न करून आनंदी असलेले लोकही आहेत. तुम्ही दुसऱ्या प्रकारात
असलेले बरे. 


प्रश्नो के उत्तर

27
2014
Apr
बंगलोर, भारत
प्रश्न: गुरुदेव, या जन्मात मी जे दु:ख भोगतो आहे ते जर मागच्या 
जन्मातल्या कर्मामुळे असेल तर, त्यामुळे मला जास्तच वाईट वाटते. त्याला 
कसे तोंड देऊ ? 
श्री श्री: तुमचं डोकं मागच्या बाजूला वळवून ठेऊ नका. पुढे बघा आणि जात 
राहा. तुम्ही मागे बघत बघत पुढे जायला बघताय. त्यामुळेच तुम्हाला वाईट 
वाटतय. सोडून द्या. भूतकाळाबद्दल चिकित्सा करून काय होणार आहे ? त्याच्यात 
काही अर्थ नाही. जीवनात सर्वांनाच चांगल्या, वाईट काळातून जावं लागतं. 
धीराने पुढे जात राहा. या मार्गावर केवढे तरी ज्ञान आणि आनंद आहे. असं 
सगळ असूनही तुम्हाला जर दु:खी वाटत असेल तर मग ज्ञानाचा काय उपयोग ? 
गाढ श्रद्धा ठेवा की तुमच्या बाबतीत सगळे चांगलेच होणार आहे. आत्ता काही 
अवघड परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल तरी काय झाले ? धीराने आणि 
हसऱ्या चेहऱ्याने सामोरे जा. स्वत:ला कशात तरी गुंतवून ठेवा. तुम्हाला माहित 
आहे कां की आज जे कंपन्यांचे मालक किंवा मोठ्या कंपन्यांचे मुख्य आपल्याला 
दिसतात ते कोणे एके काळी खूप अडचणीत होते ? त्यांना नोकरी मिळण्याची 
ही मुश्कील होती. काहींना तर सरकारी नोकरीही मिळत नव्हती. पण ते हिंमत 
हरले नाहीत. त्यांनी अगदी छोट्या दुकानात आपला व्यवसाय सुरु केला. आणि 
हळू हळू आपले व्यवसायातील साम्राज्य स्थापन केले. इतिहासात तुम्हाला असे 
बरेच आदर्श दिसतील. तर, नुसते आळशीपणाने बसून सारखी काळजी करत राहू 
नका. किंवा असे समजू नका की देव तुम्हाला खूप आशिर्वाद पाठवेल आणि अचानक 
सगळे ठीक होईल. असा अगदी एक दिवशी घालवू नका.  
आपण सहसा काय करतो ? आपण सकाळी उठतो आणि पेपर वाचू लागतो. 
अशाप्रकारे आपण मौल्यवान असा एक दीड तास वाया घालवतो. मग आपण 
टी.व्ही. बघण्यात दोन ते तीन तास घालवतो. समजा तुम्हाला एखाद 
मासिक दिसलं तर तुम्ही पानं उलटत रहाता, मग ती माहिती वाचण्यासारखी 
नसली तरी. आजकाल आपण इंटरनेटवर सर्फिंग करण्याठी बराच वेळ घालवतो. 
जर घरी पाहुणे आले तर त्यांच्या बरोबर गप्पा मारण्यात वेळ घालवतो. 
आपला काही वेळ खाण्या पिण्यात जातो. आणि मग शेवटी आपण थकून 
रात्री झोपी जातो. असा दिवस घालवणे ही शहाणपणाची गोष्ट नाही. 
सकाळी उठा, साधना करा, ध्यान करा. त्यानंतर तुमच्या रोजची 
दिनचर्या सुरु करा. रोज काय करायचे, कुठे जायचे, काय विकत घ्यायचे 
ते लिहून ठेवात.दिवसाचा सगळा कार्यक्रम ठरवा आणि त्या दिवशी कुणा 
कुणाला भेटायचे ते लिहून ठेवा.एकदा लिहून झाले की उठा 
आणि कामाला लागा. यादीतली कामे झाले की त्यावर खूण करा. 
जी कामे ठरवली असतील ती पूर्ण झाली की संध्याकाळी जरा शांत बसून 
विश्राम करा. संगीत ऐका, फिरायला जा. रोज संध्याकाळी स्वत:बरोबर 
थोडा वेळ घालवा. संध्याकाळी पुन्हा एकदा १५- २० मिनिटे ध्यान करा. 
तुम्हाला किती छान वाटेल. तुम्हाला शक्तिवान आणि उत्साही 
वाटेल. आळशी आणि मरगळलेले नाही. 

बहुतेक आपण आपला बराचसा मौल्यवान वेळ फालतू गोष्टीत वाया घालवतो. 
आणि मग आपण थकून जातो. आणि मग आपल्याला बसून विश्रांती घ्यावी 
लागते. असे करू नका. 

तर सकाळी उठल्यावर संध्याकाळपर्यंत काय काय करायचे त्याची यादी करा. 
बहुतेक वेळा काय होतं, आपले सेक्रेटरी किंवा मदतनीस आपल्याला
दिवसभरातल्या यादी देतात. मी बहुतेक मझ्या उद्याच्या कामांची यादी 
आजच मागून घेतो! (हास्य) 
त्यात मी दिवसभरात कुणाकुणाला भेटायचे आहे, काय काय करायचे आहे त्या 
सगळ्याची यादी असते. नशिबाने ते दुपारी एक तास मला विश्रांतीसाठी देतात. 
पण त्यानंतर मी पुन्हा कामाला लागतो आणि रात्री बारा पर्यंत माझे काम चालू 
असते. मी भारतात असतो तेव्हाचे माझे वेळापत्रक असे असते. मी जेव्हा 
प्रवास करत असतो तेव्हाही अनेक गोष्टींनी दिवसभराचे वेळापत्रक भरगच्च 
असते. मी कोणत्याही राज्यांत गेलो तरी त्या राज्याचे अपेक्स बॉडी मेम्बर्स 
अगदी भरगच्च कार्यक्रम आखतात.आणि मलाही दिवसभर बिझी रहायला 
आवडते.

मला दिवसभरातला प्रत्येक क्षण सर्वांसाठी काहीतरी उपयुक्त गोष्टीत सत्कारणी 
लागायला हवा असतो. 
सहसा माझा दिवस इतका बिझी असतो की मला बातम्या वाचायला किंवा ऐकायला 
दिवसभरात वेळ मिळत नाही. 
मग कधी कधी मी विमानप्रवासात किंवा मोटारने प्रवास करत असताना वर्तमानपत्र 
वाचतो. माझ्याबरोबर काम करणारे काही लोक मला ताज्या बातम्यांबद्दल आणि 
घटनांबद्दल टेक्स्ट मेसेज, एस.एम.एस.पाठवतात. तर अशा प्रकारे वेळ होईल 
तेव्हा मी बातम्या वाचतो. 
 
तुम्ही सगळे मला प्रेमाने इतकी पत्रे पाठवत असता आणि मी ती सगळी वाचतो. 
काही जण इतक्या बारीक अक्षरात पत्र लिहितात की ती वाचणं कठीण असतं. 
(हास्य) मला आश्चर्य वाटतं ते कागद वापरताना इतकी कंजुषी कां करतात. 
काही लोक पत्र मला देण्याच्या आधी त्याच्या इतक्या घड्या घालतात की 
जेणे करुन ते देताना माझ्या हाताला त्यांचा स्पर्श व्हावा. मला हे माहीतच
 नव्हतं. नुकतच कुणीतरी मला सांगितलं. ते म्हणाले की काही लोकांना 
वाटतं की नेहमीच्या आकारातल्या कागदावर पत्र लिहून दिलं तर त्यांना 
गुरुदेवांच्या हाताला हात लावता येणार नाही. पण त्यांनी जर त्या कागदाच्या 
भरपूर घड्या घातल्या तर ते मला देताना त्यांना माझ्या हाताला स्पर्श करता 
येईल. इतक्या घड्या घातलेलं ते पत्र उघडून वाचणं इतक कठीण असतं ! 
सुदैवाने मला अजून चष्मा लागलेला नाही पण अशी घड्या घातलेली पत्र येत 
राहिली तर मलाही चष्मा वापरावा लागेल. (हास्य)

तर, तुम्ही तुमच्या जीवनातील वेळाचे योग्य नियोजन करायला हवे. रोज 
सकाळी, संध्याकाळपर्यंत संपण्याच्या कामांची यादी करा. 

काही लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात, “ गुरुजी, माझा धंदा नीट 
चालत नाहिये.” आणि त्यामुळे ते दु:खी असतात. मी म्हणतो, जर 
तुमच्या धंदा नीट चालत नसेल तर दुसरा सुरु करा. आज समाजासाठी 
करण्यासारखे बरेच काही आहे. सेवेच्या कार्यासाठी इथे आश्रम एच आर 
मध्ये तुमचे नाव नोंदवा. मी असे ऐकले आहे की इथे बरेच लोक 
आहेत जे म्हणतात की त्यांना काही काम नाहिये. मी त्यांना आश्रम एच 
आर मध्ये नाव नोंदवण्याचा सल्ला देतो. खूप काम करायचे आहे. स्वत:ला 
कामात गुंतवून घ्या. तर, ज्याला खर्च इच्छ असेल त्याला इथे सेवेच्या 
बऱ्याच संधी आहेत आणि करण्यासारखी बरीच कामे आहेत. तुम्हाला जर
धंदा करायचा असेल तर इथे धंद्याच्याही बऱ्याच संधी आहेत. हे आपल् 
आर्ट ऑफ लिव्हिंगच एक मोठ्ठं कुटुंब आहे. इथे तुम्हाला कशाचीच काळजी
करण्याचं कारण नाही. 

काही लोक माझ्याकडे येऊन तक्रार करतात की त्यांच्या मुलीचं किंवा मुलाचं 
लग्न ठरत नाहिये. हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे 
‘ आर्ट ऑफ लिव्हिंग मॅट्रिमोनी’ विभाग आहे. त्यांची स्वत:ची वेब 
साईट आहे. या वेबसाईट मध्ये काही बारीसारिक अडचणी आहेत त्या 
एक आठवड्याभरात आमचे कार्यकर्ते सोडवतील. मग तुम्हाला नाव नोंदणी 
करणे आणि तुमच्या आवडीचा जोडीदार निवडणे सोपे होईल. 

तर, यासगळ्या रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी वेळोवेळी होत रहातील. पण त्यात 
नेमकेपणा / अचूकपणा शोधत बसू नका. या दैनंदिन जीवनातल्या कामांमध्ये 
काहीतरी न्यून असेलच. आपण जेव्हा अध्यात्माच्या मार्गावर खोलवर जातो 
आणि ध्यान करतो तेव्हाच या बारीक सारीक समस्या आणि घटनांवर मात 
करू शकतो. तेव्हाच खरा परमानंद अनुभवू शकतो.  

त्यासाठीच आम्ही आपल्या ‘बेसिक कोर्स’ पासून ‘पार्ट १ कोर्स’ आणि आता 
हॅपिनेस प्रोग्रॅम’ असे नाव बदलले आहे. लोकांनी येऊन हा कोर्स करावा आणि 
या स्वत:च या आनंदाची अनुभूती घावी. कोर्स केल्यानंतर त्यांचे सगळे प्रश्न 
सुटतात आणि दु:ख दूर होते. ज्ञानाच्या मदतीने ते त्यांच्या समस्या आणि
दु:ख यातून बाहेर येतात.

काही दिवसांपूर्वी ऋषिकेशमध्ये आपल्या सत्संगासाठी आलेल्या एका संताना मी 
भेटलो. ते मला म्हणाले, “शाळेमध्ये विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाला की पुढच्या
वर्गात जातो. पण ही शाळा विशेष आहे.(ज्ञानाच्या मार्गाला उद्देशून) इथे येणारा 
उत्तीर्ण होत नाही. ते एकदा (या मार्गावर) आले की ते इथेच रहातात कारण 
इथे त्यांना जीवनातला खरा आनंद मिळतो. 
हा ज्ञानाचा मार्ग खूपच रसभरीत आणि आनंदपूर्ण आहे. तो तुम्हाला सत्याच्या 
मार्गावर आणतो. तो तुम्हाला चिरंतन अशा प्रेमाची अनुभूती देतो आणि तुम्हाला 
अशी शांती देतो जी कधी न संपणारी असते. 
या मुळे तुम्ही जीवनात आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकता. त्यामुळेच असे 
म्हटले आहे की, “चरैवेती ! चरैवेती ! चरैवेती !  
(उपनिषद : पुढे जात राहा ! पुढे जात राहा !) 

आपल्या वेदातही हेच सांगितले आहे. पुढे जात रहा, कशासाठी अडकून 
राहू नका. स्वज्ञानात दृढ राहून जो आयुष्यात पुढे जात रहातो त्याला 
अंतिम ध्येय साध्य होते. पण जो अधीर होऊन मोह आणि इच्छांच्या 
मागे सैरावैरा धावत सुटतो तो जीवनाचे साध्यच हरवून बसतो. 

सर्वात मोठे सुख प्राप्त करणे

25
2014
Mar
व्हिईना, ऑस्ट्रिया
 

प्रश्न: गुरुजी, अध्यात्मिकता मिळविणे हे महत्वाचे आहे असे तुम्हाला का 
वाटते?

श्री श्री: कारण तुम्हाला बिनशर्त आनंदी, सुखी रहायचे आहे; तुम्हाला शांती 
हवी जी छोट्या गोष्टींमुळे दूर जाणार नाही. आणि हे नैसर्गिक आहे. ज्या 
प्रमाणे आपल्याला खोल आराम हवा असतो, कुणीतरी आपल्यावर प्रेम करावे, 
आपण सुखी समाधानी व्हावे असे वाटणे नैसर्गिक आहे त्याच प्रमाणे 
अध्यात्मिकता प्राप्त करणे असे वाटणे हे पण नैसर्गिक आहे. संस्कृत मध्ये 
अध्यात्मिकता ची व्याख्या अशी सांगता येईल, सर्व सुख प्राप्त करणे, 
निर्वाणा प्राप्त करणे. हे नैसर्गिक आहे. ज्या प्रमाणे पाणी उतारावर वाहते, 
अग्नी वरती जातो त्याच प्रमाणे मानवाला ब्रह्मज्ञान हवे असते. 
प्रश्न: अध्यात्मिक गुरु असायला पाहिजे याचा खरा अर्थ काय?

श्री श्री: अध्यात्मिक गुरु असणे म्हणजे स्वत: समाधानी होणे, 
आत्मविश्वासाने अज्ञात कडे जाणाऱ्या या मार्गावर आराम मिळावा म्हणून 
अध्यात्मिक गुरु हवा. एक अध्यात्मिक गुरु म्हणजे – माझी काळजी घेण्यास 
कोणीतरी आहे. मी जर भरकटलो तर मला सावरायला कोणी तरी आहे. 
प्रश्न: माहित नसलेल्या व्यक्तीशी प्रेम कसे करावे?

श्री श्री: नवजात बालक आपल्या आईच्या डोळ्यात पाहतो आणि तो 
आईवर प्रेम करू लागतो. त्या बालकाला आईबद्दल काही माहित नसते. त्याला 
आईचे नाव देखील माहित नसते, ती कुठल्या शाळेत गेली होती, तिने कुठले 
विषय शिकले आहेत, तिचे वय काय आहे त्याला काही माहित नसते. 
त्याला त्याची काही फिकीर नसते. त्याच प्रमाणे तुमच्या घरातील कुत्र्याच्या 
पिल्लाला तुम्ही कोण आहात हे माहित नसते. त्या पिल्लाला तुम्ही कोण 
आहात हे माहित असले असते तर कदाचित त्याने तुमच्यावर प्रेम केले 
नसते. (प्रेक्षकांमध्ये हशा)

म्हणून तुम्ही ज्याच्या वर प्रेम करता त्याची माहिती असणे आवश्यक नाही. 

प्रश्न: गुरुजी, मनावर ताबा मिळविण्यासाठी सर्वात उत्तम उपाय काय?

श्री श्री: तुम्हाला मनावर ताबा का मिळवायचा आहे? मन हे एकाच जागेवर 
रहावे असे तुम्हाला वाटते, बरोबर आहे. हेच तर म्हणजे मनावर ताबा मिळविणे.

ते इकडे तिकडे का धावत आहे? जर टेलिव्हिजन वर एखादा चांगला कार्यक्रम 
चालला असेल तर तुम्ही तुमच्या मनावर तुम्ही ताबा ठेवता का? तुम्ही तुमच्या 
मुलांवर प्रेम करता, तुमच्या पत्नी/पतीवर प्रेम करता त्या वेळेस तुम्ही तुमचे 
मन त्यांच्यावर केंद्रित करता का? नाही !

तुम्ही ज्या गोष्टीवर प्रेम करता त्यावेळेस तुमचे मन त्या गोष्टीवर केंद्रित 
असते.
तुम्हाला मन केव्हा केंद्रित करावे लागते? ज्यावेळेस एखादी गोष्ट आवडत 
नसेल. पण तिथेही मन केंद्रित करायची गरज नसते कारण ती गोष्ट मनाला 
आवडत नसते.
या क्षणी तुम्हाला कोणती गोष्ट हवी आहे, मन त्याच्या वर केंद्रित करावे 
लागते. अशा परिस्थितीमध्ये सुदर्शन क्रिया, योगा तुम्ही मदत करू शकेल.
प्रश्न: या जगात होणाऱ्या अन्याला कसे सामोरे जावे?

श्री श्री: तुम्ही जर सतत अन्यायाचा विचार करत राहिलात तर तुम्ही क्रोधीत 
होताल. आणि तुम्ही जेव्हा क्रोधीत होता त्यावेळेस तुम्ही निर्मळ विचार करू 
शकत नाही. आणि तुमचे विचार निर्मळ नसतील तेव्हा तुमचे कार्य पण 
बरोबर नसेल. ह्या मुळे असे वाटते कि जणू तुम्ही सुद्धा त्या अन्याय 
वाढवायला हातभार लावत आहात.

जेव्हा तुम्ही अन्याय पहाल तर तुम्ही तीन गोष्टी करू शकता,
- त्याच्याकडे थोडे हळूवारपणे पहा.
- या विश्वा मध्ये प्रत्येक क्षेत्रात चांगले व्यक्ती आहेत याच्यावर विश्वास 
 ठेवा. या जगात शंभर लोक 
 चांगले आहेत आणि फक्त ५ व्यक्ती वाईट आहेत. आज हे विश्व तुम्हाला 
 वाईट वाटते कारण त्या पाच वाईट व्यक्तींमुळे नाही तर त्या १०० व्यक्तींमुळे 
 जे निद्रावस्थेत आहेत. त्यांना जागे करा.
- एक वैश्विक उर्जा तुमच्यावर प्रेम करते हे जाणून घ्या. हि उर्जा तुम्ही काळजी 
 घेते हि श्रद्धा ठेवा. तुम्ही या ग्रहाची काही कायम संरक्षण करू शकणार नाही. 
 तुम्ही इथे फक्त ८०-१०० वर्षे आहात. पुढच्या २०० वर्षानंतर काय होईल 
 याच्यावर तुमचा काही अंकुश नाही, ना ज्या क्षणापासून हा ग्रह म्हणजेच 
 १९ अब्ज वर्षांपासून अस्तित्वात आहे त्यावेळेस सुद्धा तुमचा अंकुश नव्हता. 
 तुमचा या सृष्टीवर अंकुश नाही हे जाणून घ्या. तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे
 ‘या ग्रहाचे चांगले होवो’ हि प्रार्थना करू शकता. 

तुम्हाला माहीत आहे का, आपले शास्त्रज्ञ म्हणतात कि हि संपूर्ण सूर्यमाला 
काळ्या छिद्रांच्या मधून जात आहे. कोणत्याही क्षणी हे काळे छिद्र हि सूर्यमाला 
शोषून घेवू शकतात, आणि सर्व काही संपून जाईल.

फक्त पृथ्वीच नाही तर, सूर्य, चंद्र, बृहस्पती सर्व काही संपुष्टात येईल, 
होत्या च नव्हते होवून जाईल. म्हणून तुम्हाला जेव्हा काळजी वाटते किंवा 
अन्यायाचा राग येईल तेव्हा तुम्ही एका तारांगण पहायला जा! तोच शेवटचा 
पर्याय आहे.

त्या आधी, लोकांना जागे करा, त्यांच्या मध्ये जाणीव, कृतीवाद निर्माण करा.

प्रश्न: नकारात्मक कर्मांचा त्याग कसा करावा? ते अस्तित्वात कसे येतात?

श्री श्री: मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. आता जेव्हा इथे लाईट नव्हते, 
इथे अंधकार होता बरोबर आहे? पण जेव्हा इथे लाईट आल्यानंतर तो अंधकार
कुठे गेला? तो दुसऱ्या खोली मध्ये गेला का? का खिडकीतून तो पळून गेला. 
कळले?

त्याच प्रमाणे, जिथे नकारात्मक भावना आहेत तिथे अंधकार असतो, तिथे 
लाईट नाही. लाईट चालू करा आणि पहा तो अंधकार नाहीसा होतो.

नकारात्मक कर्मांचा त्याग कसा करावा? ध्यान, सेवा केल्याने आणि ज्ञानात 
राहून नकारात्मक कर्मांचा त्याग करता येतो. गरजूंची मदग करा. आणि जाणून 
घ्या कि नकारात्मक भावना तुम्हाला स्पर्श सुद्धा करू शकणार नाही. सावली 
सुद्धा तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही.
प्रश्न: माझ्या जीवनाचा मार्ग मला कसा मिळेल? तो मला मिळाला हे 
मला कधी कळेल?

श्री श्री: तुमच्या मनात संशय आहे, याचा अर्थ तुम्हाला तो मार्ग मिळाला 
आहे. याचे कारण म्हणजे आपण नेहमी चांगल्या गोष्टींवर संशय घेतो. 

कोणत्याही वाईट गोष्टींवर आपला संशय नसतो. एखाद्या व्यक्तीच्या 
प्रामाणिकपणावर आपण संशय घेतो, याउलट एखाद्या व्यक्तीच्या अप्रामाणिकते
वर आपण संशय घेत नाही.

जर आपल्या कोणी म्हटले कि, ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे’, 
तुम्ही म्हणाल, ‘खरचं?’तेच जर कुणी म्हटले कि, ‘मला तुझा तिरस्कार येतो’, 
तुम्ही त्यांना ‘खरचं?’ असे म्हणत नाही. तुमचा तुमच्या आनंदावर पण 
संशय असतो. जर कुणी तुम्हाला विचारले, ‘तुम्ही सुखी आहात काय?’, 
तुम्ही म्हणता, ‘मला त्याची खात्री नाही’. तुमच्या अप्रसन्नतेवर तुम्ही कधीही 
संशय घेत नाही !

प्रश्न: मला जास्त प्रेम मिळण्यासाठी माझ्या अंत:करणाला कसे अनावृत्त करू?

श्री श्री: अंत:करणाला अनावृत्त करण्याची गरज नाही. तुम्ही स्वत:वरच 
ह्र्दय शस्त्रक्रिया करू शकत नाही. ते काम तुम्ही माझ्यावर सोपवा.
क्षमा करण्याची वेळ

आयुष्यात जे काही बदल होतात त्यासाठी आपण सदैव तयार असायला हवे. आपण जर या आयुष्यातील बदलाला तयार असलो तर सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआपच मिळतात. तुम्हाला काय वाटते?
हे जीवन फार अनमोल आहे. भारता मध्ये असे मानण्यात येते कि तुमच्या ८४ लाख योनी झाल्यावर तुम्हाला मानवी जन्म मिळतो. म्हणून आपण हे आयुष्य एक्याने जगले पाहिजे.
आपण हे ऐक्य कसे निर्माण करू शकतो? तुम्ही आजचे नृत्य पाहिले का? नृत्य म्हणजे शरीराशी संवाद साधणे. संगीत म्हणजे आवाजाशी संवाद साधणे. त्याचप्रमाणे. जेव्हा मन, शरीर, श्वास आणि बुद्धी यांच्यामध्ये ऐक्य असेल त्यालाच परमानंद म्हणतात.
आपण आयुष्यात आव्हानांना वारंवार सामोरे जातो. आपल्या आजूबाजूला नेहमीच कठीण समस्या असतात, आपल्याला जीवनात समतोल राखण्यास शिकले पाहिजे, त्यालाच जीवन जगण्याची कला म्हणतात (आर्ट ऑफ लिव्हिंग).
आर्ट ऑफ लिव्हिंग काय आहे?
१. सर्व परिस्थिती मध्ये म्हणजेच, आनंदात आणि दु:खात मनाचा समतोल राखणे.
२. वस्तू आणि व्यक्ती जसे आहेत तसे त्यांचा स्वीकार करणे, आणि मग कर्म करणे. स्वीकार करून नुसते निष्क्रिय राहू नका. स्वीकार करून त्याअनुकूल कर्म करा.
३, दुसऱ्याने केलेल्या चुकी मागे वाईट उद्देश पाहू नका. तुमच्या कडून चूक झाली तर तुम्ही काय म्हणाल? “चूक झाली. माणसांकडून चूक होते” आणि आपण आपल्याला माफ करतो.    
जेव्हा दुसऱ्यांकडून चूक होते त्यावेळेस तुम्हाला वाटते कि त्याने ती मुद्दाम केली. तुम्ही विचार करीत नाही कि त्याने ती चूक मुद्दाम केली नाही.


तीन प्रकारचे व्यक्ती असतात: 
-     पहिल्या प्रकारामधील व्यक्ती आपली चूक छोटी आणि दुसऱ्यांची चूक मोठी असे पहातात.
-     दुसऱ्या प्रकारातील व्यक्ती आपली चूक मोठी आणि दुसऱ्यांची चूक छोटी मानतात. त्यांना वाटते कि बाकी लोक आपल्यापेक्षा चांगले आहेत.
-     आणि तिसऱ्या प्रकारामधील व्यक्ती चुकी कडे चूक म्हणूनच पहातात. मग ती कोणाची हि असो. हे हुशार व्यक्ती असतात.
दुसऱ्यांच्या चुकीच्या मागे वाईट उद्देश नाही असे पाहणे हा एक सद्गुण आहे. हा एका सुशिक्षित व्यक्तीचा एक गुणधर्म आहे.
जेव्हा मन शुद्ध नसेल आणि ह्रदयात तिरस्कार असेल, तेव्हा तुमच्या कर्मामुळे अनर्थ होतो. आपण आपल्या ह्रदयाला नेहमी शुद्ध ठेवले पाहिजे, ज्या प्रमाणे सृष्टीने आपल्याला निर्माण केले आहे. जर तुम्ही तुमचे मन नेहमी शुद्ध ठेवले तर तुमच्या मनात स्पष्टता येईल, आणि तुमच्या कृती सुंदर, आनंददायक आणि रचनात्मक होतील, आणि तुम्ही सगळीकडे सुख पसरावाल.  
आता, ह्र्दय कसे शुद्ध करायचे?
शुद्धता हि श्वसनक्रिया आणि ध्यान केल्याने येते. याच्या मुळे सर्व तणाव दूर होतात आणि आपले ह्र्दय आपल्या मुळ परिस्थिती मध्ये येते जसे ते या सृष्टी मध्ये आले होते. प्राणायम आणि ध्यान मुळे सुद्धा मन शुद्ध होते. आपल्या मनाच्या शुद्धते चा अनुभव आपण सगळ्यांनी कोणत्या तरी एका क्षणी घेतला आहेच, म्हणजेच आपल्याला काय हवे आहे आणि काय करावे याची जाणीव होते, होय ना !
इथे पण दोन प्रकारचे व्यक्ती आहेत.
एक प्रकार म्हणजे संवेदनशील आणि दुसरे समंजस.
जे व्यक्ती खूप समंजस आहेत, तर्कशुद्ध आहेत, ज्यांचे मन शुद्ध आहे असे व्यक्ती कधीच दोषी नसतात. त्यांना क्रोध लगेच येतो. पण आयुष्यात फक्त समंजसपणाने काही होत नाही. तुम्हाला संवेदनशील पण असायला हवे.
जे व्यक्ती संवेदनशील आहेत, ते पदोपदी अश्रू ढाळतात. ते लगेच दु:खी होतात. त्यांच्यावर टीका केलेली त्यांना आवडत नाही, आणि त्यांना ज्या गोष्टी काही पसंत नाहीत त्या गोष्टी ते पाहू शकत नाहीत, नाहीतर त्यांचा संयम ढळतो. ते भावनात्मक होतात, आणि सर्वांसाठी गोंधळ निर्माण करतात.
म्हणून आयुष्या मध्ये दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. समंजसपणा आणि संवेदनशीलपणा या मध्ये समतोल राखता आला पाहिजे; ह्रदयाचे मूल्य आणि मनाचे मूल्य समजले पाहिजे. हाच समतोल राखण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग हि एक छोटीशी पायरी आहे.
म्हणून, जेव्हा चूक होतेतर, त्याच्याकडे एक घटना म्हणून पहा. कुणाकडून झाले हे दुय्यम आहे. तुम्ही जर हा मार्ग आत्मसात केलात तर तुमचे मन केंद्रित होईल, तुम्ही सर्वांशी जोडू शकाल. क्रोध, मत्सर, लोभ अशा नकारात्मक दोषांपासून तुमच्यामनाला मुक्ती मिळेल.
प्रश्न: जीवन म्हणजे काय?
श्री श्री: ज्याला या प्रश्नाचे उत्तर माहित आहे तो देणार नाही, आणि जो उत्तर देईल त्याल जीवन काय आहे हे माहित नाही. कारण हा प्रश्न म्हणजे प्रवासातील एका वाह्नासारखा आहे. जेव्हा तुमच्या जीवनाचा प्रवास तुम्हाला ओलांड्याचा असतो, तेव्हा एक सुखी व्यक्ती तुमचे वाहन हिरावून घेणार नाही, तो म्हणेल, आता तुम्ही जा’.


‘जीवनाचा अर्थ काय आहे’, हा प्रश्न खूप महत्वाचा आणि अमुल्य आहे. तुम्ही स्वत:ला हा प्रश्न वारंवार विचारला पाहिजे. असे केल्याने तुमच्या आयुष्यातून क्षुल्लक, अप्रासंगिक, अनावश्यक गोष्टी दूर होतात.
प्रश्न: आपण जेव्हा आत्मसुखी आणि तृप्त असतो तरी पण आपण हि परिस्थिती का गमावतो?
श्री श्री: तुम्ही या विश्वात आहात, कुठल्या बेटावर नाही. तुम्ही अनेक व्यक्तींच्या उर्जेत आहात. ‘मला असे का वाटते’, मला तसे का वाटते’, असा विचार करत बसू नका. तुमच्या मनवर समय आणि ठिकाणाचा प्रभाव असतो. याच कारणामुळे आपल्या भोवतालच्या समाजासाठी आपण जे काही करू शकतो ते करावे, इतरांना मदत करावी.
आपण समाजासाठी एक सुखी लाट निर्माण करावी असे वाटते का तुम्हाला? तर मग आपण ते करूया.
आपण जेव्हा अशी लाट निर्माण करतो तेव्हा तुम्ही पहाल आपली दु:खे कमी कमी होत जातात.
प्रश्न: वादविवाद आणि संघर्ष असणाऱ्या संबंधात शांतता कशी आणावी? तुम्ही या मध्ये राहिला आहात का?
श्री श्री: अशी परिस्थिती दोन पद्धतीने हाताळू शकता,
-     अशा ठिकाणाहून दूर रहा – जेव्हा सर्व जण क्रोधीत असतात आणि परिस्थिती तापलेली असते तेव्हा सर्वजण बहिरे
होतात. क्रोधीत व्यक्ती कुणाचे काहीही ऐकत नाहीत. अशा वेळी सर्वात उत्तम उपाय म्हणजे अशा परिस्थिती पासून काही काळ दूर रहाणे आणि परिस्थिती शांत होण्याची वाट पहाणे.
-     शांतपणे तिथेच रहा – पहिल्यांदा त्या व्यक्तीचा स्वीकार करा आणि सांगा, ‘मी तुझ्याशी सहमत आहे’,
समजा तुमचे पती किंवा तुमची पत्नी तुमच्याशी वाद घालत असेल, तर ‘नाही’ असे म्हणू नका, ‘हो, तुझे बरोबर आहे, मी तुझ्याशी सहमत आहे’, असे म्हणा. ज्या क्षणी तुम्ही स्वीकार कराल त्या क्षणी परिस्थिती निवळेल. त्यानंतर थोड्या वेळाने जेव्हा वातावरण शांत होईल मग सांगा, ‘कारण......’. हे त्याचे गुपीत आहे.
कित्येक वेळा माझ्याकडे बरेच जण मोठी मोठी कल्पना घेऊन येतात. मी त्यांना सांगतो, ‘तुम्ही कल्पना खूप चांगली आहे, पण ती अव्यवहार्य आहे’.
परिस्थिती शांत करण्यासाठी तुम्ही तुमचे कौशल्य वापरा, आणि मग समोरच्या व्यक्तीला तुम्हाला काय म्हणायचे आहे ते पटवून द्या.