लहान मुलांसारखे आनंदी राहणे

रविवार, १२ ऑक्टोबर २०१४,                                                                     क़ुएबेक, कॅनडा.


एक अशी गोष्ट आहे कि प्रत्येकजण त्याच्या शोधात असतो आणि ती म्हणजे आनंद. असे नाही कि लोकांना आनंद सापडत नाही, त्यांना आनंद सापडतो पण तो फार काळ टिकत नाही. तो खुपदा क्षणिक, तर कधी काही तासांपुरता, तर कधी एक , दोन दिवसांपुरता मर्यादित असतो. पण स्वाभाविक मनोवृत्ती अशी असते कि आपण असा चिरकाल टिकणारा आनंद शोधत असतो, कि जो कधीही संपणार नाही .

मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो.एक सद्गृहस्थ आपल्या घरासमोर हरविलेल्या किल्ल्या शोधत असतात. ते त्या रस्त्यावरील दिव्याखाली त्या शोधत होते.मग तेथे आणखी काही लोक जमा झाले आणि ते त्यांना किल्ल्या शोधायला मदत करू लागले. शोधताना एका माणसाने या सद्गृहस्थांना विचारले कि , “ तुमच्या किल्ल्या कोठे हरविल्या आहेत ?” त्यावर ते गृहस्थ म्हणाले कि “ त्या घरात हरविल्या आहेत.” “ मग तुम्ही त्या रस्त्यावर का शोधत आहात?”

असेच काहीसे आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत या जगात होत असते. आपल्या अंतरात अमीप आनंद भरून राहिला आहे तर आपण तो बाहेर शोधात असतो. आता जरा असे आठवून पहा कि आपण आपल्या लहानपणी काय करायचो ? आपण खूप ओरडण्यात, खेळण्यात आनंद मिळवायचो. प्रत्येक मुल हे जणू एक आनंदाचा ठेवा असते , पण आपण जसे मोठे होतो तेंव्हा हा आनंदाचा ठेवा मात्र कोठेतरी हरवून बसतो. एक लहान मुल दिवसातून सुमारे ४०० वेळा हसते. पण जेंव्हा हे मुल किशोर अवस्थेत प्रवेश करते तेंव्हा ते दिवसाला फक्त १७ वेळा हसते आणि ते जेंव्हा प्रौढ होते तेंव्हा ते क्वचितच हसते आणि तेसुद्धा दुसरा कोणी हसला तरच ते हसून प्रतिसाद देते. आता प्रश्न असा आहे कि आपण हे कसे बदलू शकतो? आपल्यापाशी जन्मता जी निरागसता होती ती कशी टिकवून ठेवता येईल ? आपण परत कसे हसू शकू? हे शोधणे आवश्यक आहे.

जर तुम्ही काळजीपूर्वक या प्रश्नाकडे पहिले तर असे लक्षात येईल कि अशा तीन गोष्टी आहेत कि ज्या आपल्याला लहान मुलासारखे आनंदी असण्यापासून रोखतात.
1. पूर्वधारणा
2. असुरक्षितता
3. तणाव

या तीन शिवाय कोणती चौथी गोष्ट असेल असे मला वाटत नाही. तुम्हाला जर ती सापडली तर मला सांगा. आता आपण या तीन गोष्टींपासून सुटका करून घ्यायला पाहिजे.

योग्य श्वसनाच्या पद्धती वापरून आपण तणावापासून दूर राहू शकतो. श्वसनाच्या अशा अनेक पद्धती आहेत कि ज्यापासून आपल्याला आराम मिळून आपण बरीचशी उर्जा परत मिळवू शकतो. तणाव म्हणजे काय असे जर तुम्ही मला विचारलेत तर तणाव काय असतो हे मला माहित नाही , पण मी अनेक लोकांना तणावाखाली असताना बघितले आहे. जेंव्हा मी त्याचे विश्लेषण करतो तेंव्हा असे पाहतो कि मनुष्य तणावाबद्धल उर्जा आणि वेळ यांच्याअभावामुळे फार काही करू शकत नाही.

यासाठी तुम्हाला तुमच्या गरजा कमी करायला पाहिजेत किंवा तुमची उर्जा वाढवायला पाहिजे. आता या दोन्हीमध्ये तुमच्या गरजा कमी करणे हे फारसे व्यवहार्य नाही तर तुमची उर्जा वाढविणे हे आवश्यक आहे. म्हणून श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम, ध्यान, योग हे सर्व १५ ते २० मिनिटांच्या कालावधीत तुमची उर्जा वाढवायला मदत करतात. तुम्ही जर ध्यान करताना जागरूकपणे आराम करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ६ ते ८ तासांच्या झोपेएवढी उर्जा मिळते.

तुम्हाला झोपेमुळे जी विश्रांती मिळते ती सुस्त विश्रांती असते. दुसऱ्याप्रकारची विश्रांती म्हणजे जागृत विश्रांती होय. या विश्रांतीत तुमच्या उर्जेत चंगली वाढ होते. यालाच ध्यान असे म्हणतात. ध्यान म्हणजे नुसते बसून कोणत्यातरी गोष्टीचा विचार करणे नव्हे. हि क्रिया म्हणजे विचारांच्या मुळाशी जाणे होय. म्हणून तणाव कमी करून नाहीसा करणे हि पहिली पायरी होय.

दुसरे म्हणजे पूर्वधारणेचा त्याग करणे होय. या पूर्वधारणेचे अनेक प्रकार असतात. दोन पिढ्यांमध्ये पूर्वधारणा असते. तरुण पिढी हि वयस्कर लोकांबरोबर बसून आपल्या प्रश्नांवर चर्चा करीत नाहीत. याला पिढ्यातील अंतर म्हणतात. तुम्हाला हे साऱ्या जगभर आढळेल. एका विशिष्ट वयोगटातील लोक एकत्र बसून आपली सुख-दुखः एकमेकाना सांगतात. ते आपल्यापेक्षा लहान किंवा मोठ्या माणसांना आपली सुख-दुखः कधीही सांगणार नाहीत.

तसेच वर्ग आणि लिंग यात पण पूर्वधारणा असते. कॅनडाच्या या भागात ती एवढी नसेल पण जगाच्या काही भागात लिंग, धर्म, संस्कृती, भाषा अशा अनेक कारणांनी पूर्वधारणा ठेवली जाते. असे पूर्वधारणेचे अनेक प्रकार असतात. या पूर्वधारणेतून बाहेर पडून सर्व जग के एक कुटुंब आहे असे समजणे हेच खरे शहाणपण होय.

वसुधैव कुटुंबकम हि धारणा असेल तर गुन्हेगारी, युद्ध आणि असे अनेक प्रश्न या जगातून नाहीसे होतील. यात किती लोकांचा बळी जात आहे ते पहा. या जगात सर्वत्र हिंसा दृष्टीस पडत आहे. व्यापक दृष्टीकोन आणि शहाणपणाचा अभाव हे याचे मूळ कारण आहे.

तिसरे म्हणजे असुरक्षितता. आता हि असुरक्षितता कशासाठी? ‘ मला माझे असे कोणीच नाहीये, आता माझी काळजी कोण घेईल?’ मी तुम्हाला सांगतो, कि या पृथ्वीतलावर इतके प्रेम आणि करुणा आहे, तो जगनियंता हा तर मूर्तिमंत प्रेमाचे प्रतिक आहे आणि आपल्याला जेंव्हा जेंव्हा, ज्या ज्या गोष्टीची गरज असते तेंव्हा ती मिळेल याची चोख व्यवस्था त्याच्याकडे आहे. 

तुम्ही जेंव्हा तुमच्या गत आयुष्यात किती वेळा असे असुरक्षित झालात? ती वेळ कशी निभावून गेली आणि आज तुम्ही एक परिपूर्ण व्यक्तिमत्व झाले आहात. आणि जेंव्हा तुम्ही तुमच्या त्या असुरक्षित काळाकडे वळून बघता तेंव्हा असे लक्षात येते कि तुम्हाला तसे वाटणे हा केवळ वेळेचा अपव्यय होता, होय कि नाही? मागील २० वर्षात तुम्ही किती वेळा असुरक्षित काळ घालविला हे मोजा. किती काळ हा तुम्ही उदास अवस्थेत घालविलात ? हा केवळ वेळच अपव्यय नसून त्यामुळे तुमच्या शरीरात विष तयार झाले. या असुरक्षिततेमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो.

तुम्ही तीन गोष्टी केल्या पाहिजेत:

१. तुमचा भूतकाळ आठवून पहा आणि असे पहा कि असुरक्षितत वाटणे हा वेळेचा अपव्यय होता. यामुळे    
    तुम्हाला शक्ती मिळेल.
२. असे लक्षात ठेवा कि या जगात चांगले लोक पण आहेत. ते नेहमीच तुमच्या मदतीसाठी येतात.
३. तुम्हाला मार्गदर्शन करणारी आणि मदत करणारी एक शक्ती या जगात आहे.

असे हे शहाणपण समजून घेतले तर ते तुम्हाला असुरक्षिततेपासून मुक्ती देईल.

आता तुम्ही तणाव दूर केलात, असुरक्षितता आणि पूर्वधारणेपासून मुक्ती मिळवलीत कि तुम्ही एक लहान मुलासारखे आनंद उपभोगू शकाल. खरेतर हा आनंद तुमच्याजवळ असतो पण त्यावर या तीन गोष्टींची राख साचलेली असते आणि ती दूर करताच तो तुमच्या दृष्टीला सापडेल.

अशातऱ्हेने ध्यान, योग आणि श्वसनाचे व्यायाम यांनी तणावावर विजय मिळवा. शहाणपणाने पूर्वधारणेपासून मुक्त व्हा आणि आपले गतआयुष्य आठवून आत्मविश्वास आणि श्रद्धेने असुरक्षितता दूर सारा.

श्रद्धा असणे म्हणजे खूप आहे.

13
2014
Oct
क्युबेक, कॅनडा.
 
प्रश्न: समर्पण हा दैवी गुण आहे, हे सत्य आहे का? ही दैवी गुण मानव 
कसे काय प्राप्त करू शकेल?

श्री श्री: कृपया, समर्पण करण्याचा प्रयत्न करू नका. मला वाटते 
‘समर्पण’ या शब्दाचा खूप गैरवापर केला जातो. म्हणून मी म्हणतो तुम्ही 
हा शब्द दूर कुठेतरी ठेवा अन्यथा तळ्यात नेऊन टाकून द्या. तुम्ही फक्त 
तुमच्या नैसर्गिक स्वभावात, साधे रहावा, समर्पण करण्याचा प्रयत्न करू नका. 
तुमची कोणी तरी काळजी घेत आहे, तुम्हाला मदत करत आहे एवढा 
विश्वास असेल तरी खूप आहे.
ज्या गोष्टी तुमच्या आवाक्याबाहेर आहेत त्यावेळी तुम्ही म्हणता, 
‘माझे प्रयत्न संपले’, आणि तुम्ही त्या गोष्टीचा विचार सोडता, त्यालाच समर्पण 
म्हणतात. तुम्ही ते नैराश्येने पण करू शकता आणि शांत मनाने देखील.
प्रश्न: गुरुजी, तुम्ही आम्हाला सकारात्मक मन कसे ठेवायचे याचे प्रशिक्षण 
देता. काही वेळा मी खूप साऱ्या गोष्टींना हो म्हणतो आणि त्या सर्व गोष्टी 
मी पूर्ण करण्यास असमर्थ ठरतो. मला आता सकारात्मक मन आणि वेळेचे 
व्यवस्थापन या मध्ये खूप कलह निर्माण झाला आहे.
श्री श्री: हा कलह नाही. ‘सकारात्मक मन’ म्हणजे सगळ्या गोष्टींना 
आंधळेपणाने हो म्हणणे असे नाही. पण त्या गोष्टीचे ज्ञान घेणे आणि त्या 
गोष्टींवर सकारात्मक रित्या विचार करणे.
एक ‘सकारात्मक मन’ एका ज्ञानी कडे असतो, मुर्खांकडे नाही.
जर कोणी म्हटले कि तळ्यातील पाणी गरम आहे, तू त्यामध्ये उडी 
मारू शकतोस, तुम्ही लगेच त्याला ‘हो’ म्हणण्याची गरज नाही. तुम्ही 
म्हणायला हवे, ‘मला वाटते तुझे आकलन चुकीचे आहे, तू उन्हाळ्याचा 
विचार करत असशील. पण आत्ता हे पाणी खूप गार आहे’.
‘सकारात्मक मन’  म्हणजे बाकीचे लोक काय म्हणतात त्याला संमती
देणे असे नाही, पण त्या गोष्टीचे ज्ञान असणे.
प्रश्न: या सृष्टी मध्ये कोणत्या क्षणी एका सजीव गोष्टीला आत्मा मिळतो? 
मी झाडे, डास, बेक्टेरीया, कोशिका इत्यादी च्या संदर्भात बोलत आहे.

श्री श्री: प्रत्येक गोष्टी मध्ये आत्मा आहे, अगदी मुंगी पासून ते 
बेक्टेरिया पर्यंत; सगळीकडे आहे. पण एक परिपक्व आत्मा हा तुमच्या 
शरीर संस्थे मध्ये एका ठराविक अवस्थेत प्रवेश करतो, तो एखादे वेळेस 
गर्भधारणे वेळी किंवा चौथ्या किंवा पाचव्या महिन्यात, किंवा जन्मता वेळी. 
ह्या तीन शक्यता आहेत, आणि ते कधी होते हे माहित नाही. म्हणून या 
बाबतीत विचार न करणे चांगले.

प्रश्न: आम्ही तुमच्या कडून सर्वात महत्वाचा कोणता धडा शिकावा 
असे तुम्हाला वाटते?

श्री श्री: हे म्हणजे असे झाले कि तुम्ही एखाद्या औषधाच्या दुकानात 
जाता आणि त्याला म्हणता, ‘तुम्ही मला सर्वात चांगले कोणते औषध 
देऊ शकाल?’
एकच गोष्ट नाही, तुम्हाला जे काही हवे आहे ते सर्व तुम्हाला इथे मिळू 
शकेल. मी सर्वांसाठी एकाच उपदेशाशी का मर्यादित राहू? जर कुणी डाव्या 
बाजूला झुकेत असेल, तर मी त्याला उजवी कडे सरकायला सांगेन, आणि 
जर कुणी उजवी कडे झुकेत असेल तर त्याला डावी कडे सरकायला सांगेल. 
मध्य साधा !
प्रश्न: गुरुजी, तुम्ही डावखुरे आहात कि दक्षिणहस्त आहात?

श्री श्री: मी सर्व गोष्टी योग्य रीतीने हाताळतो. मी समजतो मी कोणतीही 
गोष्ट विसरत नाही, त्यामुळे काही बाकी रहात नाही.
प्रश्न: प्राण्यांना मन असते का? त्यांना पण मानसिक आजार होतात का?
श्री श्री: प्राण्यांमध्ये मन असते, त्यांनाही भावना असतात. एका चित्त्याने 
माकडाच्या एका छोट्या पिल्लाला वाचविले, एका डॉल्फिन ने कुत्र्याला कसे 
वाचविले या संदर्भात काही अनुच्छेद आहेत. अशा प्रकारच्या खूप अद्भुत 
गोष्टी आहेत.
आपण बहुधा एक म्हण वापरत असतो ‘कुत्र्या मांजरा सारखे भांडणे’, 
पण आपल्या आश्रमामध्ये एका मांजरीच्या पिल्लाची देखभाल एक कुत्रा 
करत आहे. ते मांजरीचे पिल्लू त्या कुत्र्याच्या अंगावर खेळते, आणि तो 
कुत्रा त्या मांजरीच्या पिल्लाला गोंजारतो. ते एकमेकाचे चांगले मित्र आहेत.
भानू (श्री श्रीं ची बहिण) मला सांगत होती की एक महिन्या पूर्वी, एका 
मोरा ने एका सापाचे अनुरक्षण केले. तसे पाहिले तर साप आणि मोर 
एकमेकांचे कट्टर वैरी, ते एकमेकांना मारतात, पण त्या ठिकाणी काही 
ससे होते ज्यांना सापा पासून धोका होता, म्हणून मोराने त्या सापाचे 
अनुरक्षण केले आणि त्या सस्यांचे प्राण वाचविले.
ह्या वरून समजते कि प्राण्यांना देखील मन असते. तुम्ही पाहिले असेल, 
हत्ती खूप हुशार असतो. आपल्या आश्रमातील हत्ती, मी जर तिला भात 
दिला, तर ती तिच्या सोंडेत घेत नाही कारण तिला माहित आहे असे 
केल्याने तिला व्यवस्थित खाता येत नाही. पण मी जर का तिला केळी 
दिली तर ती सोंडेत पकडते. मी जर तिला भात दिला तर ती माझा हात 
आपल्या मुखापर्यंत ओढते.
माहूत (हत्तीला सांभाळणारे) सांगतात कि, ‘गुरुजी ही तुमच्या कडे 
येताना धावत येते, पण जाते वेळी ती खूप नाखुश असते कारण तिला 
इथून जायचे नसते. मग ती काही टवाळक्या करते’.
माहूत आणखीन सांगतात, ‘गुरुजी, तुमच्या कुटीर कडे येत असताना 
ती माझे सर्व ऐकत असते, पण परत जाताना ती माझे एक ऐकत नाही’.
प्राणी खूप हुशार असतात. त्यांना पण मन आहे, पण ते स्वत:ला 
निसर्गाबरोबर एकरेखीत करतात. ते निसर्गा विरुद्ध कोणतीही गोष्ट 
करत नाहीत, ते जास्त अन्न खात नाहीत, ते जास्त झोपत नाहीत 
किंवा झोपतच नाहीत. मानवा सारखे ते आनंद मिळविण्यासाठी कोणत्याही 
कार्याचा अतिरेक करत नाहीत. ते खूप चांगले आहेत कारण ते निसर्गाशी 
संरेखित आहेत.
 

आनंद अंतिमतः दुःखाचे कारण बनतो

21
2014
Oct
बंगलोर, भारत
 

आनंद हा नेहमी तुम्हाला क्रियाशील ठेवतो; तो तुम्हाला धावायला लावतो, 
सर्वप्रथम आनंद तुम्हाला त्याच्या दिशेने धावायला लावतो आणि नंतर तो 
तुम्हाला त्याच्यापासून दूर धावायला लावतो. दुसरीकडे आहे योग जो तुम्हाला 
स्थिर ठेवतो. तो तुमच्या जीवनात स्थैर्य आणतो.
 ज्या व्यक्तीचा  देह, मन आणि भावना हे सर्व भक्कम आणि स्थिर 
असतात ती व्यक्ती योगी होय. हे अतिशय महत्वाचे आहे. जर तुमच्या 
भावना या वर आणि खाली होत आहेत तर याचे कारण आहे की तुम्ही 
कशाच्या तरी दिशेने धावत आहात. आणि ज्याच्याकडे तुम्ही धावत आहात 
ते काय आहे? तर तो आहे आनंद आणि एकदा का तुम्ही तिथे पोचलात तर 
तोच आनंद तुम्हाला त्याच्यापासून दूर धावायला भाग पडतो.

 तुम्ही तुमच्या आयुष्याकडे पाहाल तर तुम्हाला दिसेल की ज्याच्या कशाच्या 
दिशेने तुम्ही धावत होतात, ते, कोणत्या ना कोणत्या क्षणी, तुम्हाला 
त्याच्यापासून दूर लोटते कारण ते हाताळणे तुम्हाला शक्य राहात नाही. 
म्हणून सगळे लोक जे कोणत्या ना कोणत्या क्षणी अनुभवतात 
'मला आता पळून जायचे आहे', कारण तुम्हाला त्यात मजा येते आहे 
हे तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये मजा येत असते 
तेव्हा तुम्हाला त्यागोष्टीपासून दूर पळून जावे असे नक्कीच वाटेल. म्हणून 
जर तुम्ही तुमची आनंद शोधण्याची मनोवृत्ती बदलाल आणि केवळ स्थिर
व्हाल तर कोणतीही गोष्ट अति होणार नाही.
  'मी इथे दुसऱ्यांना आराम देण्यासाठी आहे, स्वतःचे सुख शोधण्यासाठी नाही', 
असे तुम्हाला वाटले पाहिजे. या एका दृष्टिकोनामुळे 'अरे बाप रे, हे तर 
अति झाले, मला इथून पळून जावेसे वाटते' या प्रवृत्तीला अटकाव पडेल. 
केवळ आनंद उपभोगणे यामुळे तुम्हाला वाटेल, 'हे अति होते आहे'.
 जेव्हा तुम्ही स्थिर असता, तेव्हा तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही देऊ 
करता. सूर्य कधी म्हणत नाही, 'माझा प्रकाश आता अति झाला आहे 
आणि आता मला पळून जावेसे वाटते'. सोने कधी म्हणत नाही, 
'माझे चमकणे जरा अतिच झाले आहे', कारण ते त्यांच्या स्वभावात 
स्थिर आहेत, योग म्हणजे तुमच्या स्वतःच्या स्वभावात स्थिर पावणे होय.

प्रश्न व उत्तरे. सर्व प्रश्न व उत्तरे विस्तारित करा.


प्रश्न : गुरुदेव, सिमरन (मंत्र घोष) आणि ध्यान यामध्ये काय फरक 
आहे?

श्री श्री:सिमरन ही ध्यानाची सुरुवात आहे आणि समाधी ही ध्यानाचा अंत. 
सिमरन म्हणजे स्मरणे. पहा ना, जर तुम्हाला कोणी आवडत असेल 
आणि तुम्ही त्याची आठवण काढली तर काही भावना दाटून येतात, 
हो ना. जेव्हा भावना ओसंडून जाऊ लागतात तेव्हा मन शांत होते. 
मनातील क्षोभ शांत होतो. जेव्हा भावना ओसंडून वाहतात आणि मनाला 
शांत करतात, ते असते ध्यान.

कुशल भारताकडे वाटचाल

07
2014
Oct
दिल्ली, भारत
(भारतीय उद्योग मंडळ यांच्याकडून श्री श्री रविशंकर यांच्या बरोबर ‘मानवी 
क्षमता आणि व्यापार नीतिमत्ता’ या वर विशेष सत्र आयोजित केले होते 
त्यातील प्रश्न उत्तरांचा हा सारांश )

प्रश्न: (श्रोत्यांमधून प्रश्न विचारण्यात आलो जो नीट ऐकू आला नाही)
श्री श्री: जसे जयंती यांनी अगदी बरोबर सांगितले, आपल्याकडे क्षमता 
भरपूर आहे पण, कौश्यल्य आणि अभियोग्यता किंवा कल नाही. मी 
यात आजून एक गोष्ट सांगेन व्यवहार बुद्धी, सामान्य ज्ञान. कोणीतरी 
विचारले भारतीय असल्याच्या खुणा काय? मी सांगितले ४ गोष्टी आहेत.
१. प्रत्येक भारतीय तत्ववेत्ता आहे. ते तुम्हाला तुम्ही काय करावे 
आणि काय करू नये या बद्दल सल्ला देतील. त्यांची स्वतःचे तत्वज्ञान 
असते. अगदी रिक्षा चालवणारे सुद्धा तुम्हाला सल्ला देतील. 
२. प्रत्येक भारतीय हा राजकारणी आहे. 
३. प्रत्येक जण डॉक्टर आहे. 
४. जर कोणी पुढे जात असेल तर त्यांच्या पुढे जाण्यापेक्षा ते त्यांना 
मागे ओढतील. त्यांच्या कामात अडथळे आणतील.

असे काय आहे जे लोकांना अगदी प्राण ओतून करावेसे वाटते? 
ज्याने लोक प्रेरित होतात आणि पुढे जातात. आपल्याला त्याकडे 
लक्ष दिले पाहिजे.

मला आठवते ८० च्या दशकात देशातल्या काही बड्या उद्योगपतींना 
मी भेटलो होतो. मी त्यांची नवे सांगणार नाही पण तुम्हाला आशर्य 
वाटेल ते पुढे जाणाऱ्या लोकांना मागे कसे ओढता येईल या बद्दल 
चर्चा करत होते. मला त्यांच्या बद्दल करूणा वाटली. जर कोणी 
आपल्या व्यवसायात पुढे जात असेल तर आपण त्याच्या पेक्षा चांगले 
कसे करू या बद्दल विचार केला पाहिजे. आपल्या जडणघडणीत हा 
दृष्टीकोन असला पाहिजे. पूर्वी हा दृष्टीकोन होता, पण आज आपण 
स्वतःच्या क्षमतेवर शंका घेतो. आपल्या हे लक्ष्यात येत नाही कि 
आपल्यात प्रचंड क्षमता आहे. 
छोट्या आणि मध्यम उद्योगसाठी अनेक आव्हाने आहेत याची मला 
जाणीव आहे. नफा आणि तोटा हि बड्या उद्योगाच्या तुलनेत त्यांच्यासाठी 
मोठी गोष्ट आहे. मोठे उद्योग त्यांच्यावर असलेल्या मोठ्या कर्जानंतर 
सुद्धा नीट चालतात. छोट्या आणि मध्यम उद्योगसाठी कौश्यल्य 
आतिशय महत्वाचे आहे. तुम्हाला अनेक लोक भारती करता येत नाहीत 
त्यामुळे तुम्हाला कुशल कामगारांची गरज आहे. तुम्हाला तत्पर, 
स्वतःहून पुढाकार घेऊन काम करणारे, कल्पक आणि प्रामाणिक लोक हवेत. 
हे म्हणजे जवळ जवळ अशक्य वाटते. असे लोक कुठून मिळणार ?
मी सांगतो हे शक्य आहे. थोडा वेळ काढून स्वयंसेवी आणि धार्मिक 
संस्था कश्या काम करतात हे पहा. या संस्थात काम करणारे लोक 
इतके प्रेरित आणि भारलेले कसे असतात हे शिकावे लागेल. तुम्हाला 
वाटत असेल कि तुम्ही धर्मनिरपेक आहात आणि स्वयंसेवी आणि धार्मिक 
संस्थाचे काम बघायचे नाही, तर दुसरा मार्ग आहे दहशतवादी कसे 
काम करतात हे बघावे लागेल. देशात नक्षलवादी किंवा दहशतवादी 
कसे काम करतात ते पहा. असे काय आहे ज्यामुळे ते इतके प्रेरित, 
प्रोत्साहित कि आपले तनमन ओततात. 
तुम्हाला माहित आहे २ वर्ष्यापूर्वी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने 
३५० उल्फा अतिरेकी आमच्या आश्रमात पाठवले, ज्यांना शस्त्र त्याग 
करायचा होता. ते आश्रमात १ महिना राहिले आणि त्यांचे आयुष्य 
आमुलाग्र बदलले. त्यांचे आयुष्य म्हणजे एखाद्या बॉलीवूड सिनेमा 
सारखे होते, वास्तविक सिनेमापेक्षा जास्त रोमांचक. 

या तरुणांच्यात अशी काय शक्ती आहे ज्यामुळे सगळा आराम सोडून 
त्यांनी शस्त्र हाती घ्यावीत, जंगलात राहावे? जर एखादा माणूस 
त्याचे सर्वस्व पणाला लावून विघातक गोष्टी करत असेल तर तीच शक्ती 
आपण विधायक कामाकडे का नाही वळवू शकत? आपण हे करू शकतो.
एक महिना आश्रमात राहिल्यामुळे त्यांचात आमुलाग्र बदल झाला, त्यांनी 
समाजासाठी काही चांगले परिवर्तन घडवण्याची शपथ घेतली. त्यांच्या पैकी 
काही जण शेती करत आहेत, काही जण छोटे उद्योगपती आहेत. 
त्यांना फक्त योग्य दिशा दाखवण्याची गरज होती. 
आपल्यासाठी जे काम करत आहेत त्यांच्यात हि उर्जा जागवण्याची गरज 
आहे. त्यांनी येऊन फक्त ९ ते ५ काम करून निघून जाऊ नये. 
बरेचदा लोक जेव्हा वरिष्ट बघत असतात तेंव्हाच काम करतात. 
वरिष्ठची पाठ फिरतच परत टंगळमंगळ सुरु. आपल्याला हि प्रवृत्ती 
बदलावी लागेल आणि त्यांच्यातले उत्तम गुण बाहेर काढण्यासाठी 
आपल्याला त्यांच्याकडे यंत्र  किंवा फक्त वापरायची वस्तू म्हणून न 
बघता माणूस म्हणून बघितले पाहिजे. आपल्याला त्यांच्या बरोबर 
नाते निर्माण करावे लागेल, त्यांच्याकडे माणूस म्हणून बघावे लागेल. 
उदाहरणार्थ तुमच्या कारखान्याबाहेर असलेला सुरक्षारक्षक, जो तुमच्या 
पूर्ण कारखान्याची रखवाली करतो, त्याचे तुम्ही कधी अभिवादन केले 
आहे? त्याला तुम्ही कधी विचारले ‘तू कसा आहेस?’, तुझी दिवाळी 
कशी झाली? तुला किती मुले आहेत? ती ठीक आहेत का? 
या छोट्या गोष्टी, छोटे संवाद यामुळे त्यांचात एक प्रकारची बांधलकी 
एक आपलेपणा निर्माण होईल. या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष 
दिले पाहिजे कारण याने मोठा फरक पडेल, फक्त पैशाने नाही. 
तुम्ही जर बघितले तर आर्ट ऑफ लिविंग मध्ये IIT आणि IIM चे 
अनेक पदवीधर आहेत. त्यांना बाहेर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भरपूर 
पैसे मिळू शकतात, पण ते अगदी जरुरी पुरते पैसे घेऊन अगदी 
मनापासून, झोकून देऊन काम करतात. जर एका स्वयंसेवी संस्थात 
असे घडू शकते तर कामाच्या ठिकाणी का घडणार नाहीत? हे शक्य आहे. 
जर्मनी मध्ये दुसऱ्या महायुध्दनंतर हेच घडले, तेंव्हा प्रत्येक जण 
‘आपल्याला आपले राष्ट्र पुन्हा उभारायचे आहे, आपले राष्ट्र पूर्ण 
उद्वस्त झाले आहे’ या देश भावनेने जागा झाला. 
युवक आणि महिलांमध्ये हा बदल घडवण्याची शक्ती आहे. मला 
एका ६५ वर्ष्याच्या महिलेने जर्मनीमध्ये तिच्या घरी आमंत्रित केले 
होते. ही साधारण २० वर्ष्या पूर्वीची गोष्ट असेल. त्या महिलेला मुले, 
नातवंडे होती पण तिने आणि तिच्या नवऱ्याने या वयात स्वतःचे घर 
स्वतः बांधले होते.  संपूर्ण लाकडाच्या घरात एकही खिळा इकडे तिकडे
नव्हता. त्यांचात कामाचा प्रचंड उत्स्थह होता.  
   
आपल्या तरुण आणि इतर कामगारर्वर्गात कामाबद्दलची संस्कृती 
उत्पन्न करावी लागेल. यासाठी ४ स्तरावर काम करावे लागेल.
१. त्यांचे आरोग्य चांगले आहे हे बघावे लागेल. जर त्यांना 
कामाबद्दल निरुत्साही वाटत असेल तर त्याकडे लक्ष द्यावे लागेल. 
त्यांच्यात बी किंवा डी जीवनसत्वाची कामतरता असू शकेल. 
आजकाल प्रमाणबाहेर रासायनिक खते वापरल्यामुळे अश्या प्रकारचे 
अन्न आणि भाज्या खाऊन लोक उत्साही, टवटवीत होण्याऐवजी 
लवकर थकतात. हा शारीरिक थकवा आळस आणि नीरुउस्थाही 
बनवतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या जेवणाकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. 
माझ्या सुचनेनुसार कोइमतूर मधल्या एका छोट्या उद्योगाने 
त्यांच्या कामगारांसाठी दुपारचे जेवण द्यायला सुरुवात केली. 
त्यांनी मोड आलेली कडधान्य आणि चपाती, भात असा समतोल 
आहार दिला. जेंव्हा लोक एकत्र येऊन जेवू लागले त्यानंतर 
त्यांची उत्पादनक्षमता वाढली. दुपारचा समतोल आहार त्यांना 
पूर्ण दिवस ताजातवाना ठेवू लागला. जर ते पराठा आणि लस्सी 
जेवणात घेऊ लागले तर त्यांना लगेच झोप येऊ शकते आणि 
त्यांचे कामात लक्ष लागणार नाही. त्यामुळे जेवणाकडे थोडे लक्ष 
दिले पाहिजे. तुम्ही त्यांच्या पगारातून पैसे घेऊ शकता पण त्यांना 
चांगला पोषक आहार द्या. लोकांची काळजी घ्या. वेळोवेळी 
त्यांच्याशी बोलून, कंपनी त्यांची आहे याची जाणीव करून 
दिल्यानेही खूप फरक पडेल. आपल्या देशात पौष्टिक 
आहाराबद्दल्ची जागरुकता खूप कमी आहे. आपण जास्तीतजास्त 
पिष्टमय पदार्थ, बटाटे, टोमाटो, वांगी. आपण हिरव्या भाज्याचा 
समावेश फारसा करत नाही. आपण रोज फक्त बटाटे, कांदे 
टोमाटो आणि वांगी खातो. या भाज्यात पौष्टिक गुणधर्म नाहीत.
 
उपवाससुद्धा चुकीच्या पद्धतीने केले जातात. आपण बटाटे खातो 
आणि सांगतो कि मी उपवास केला, हे चुकीचे आहे. असे म्हंटले 
जाते ‘जसे अन्न तसे मन’. माझी आजी रोज जेवणात काय 
काय खाल्ले पाहिजे या बद्दल खूप आग्रही असे. रोज हिरवी चटणी 
आणि साग असे. तिचे रोजचे जेवण केळीच्या पानावर असे आणि 
गावाकडे राहिल्यामुळे ती ९५ वर्ष जगली. पूर्वी जेवणाबद्दल काही 
संकेत आणि नियम पाळले जात. कुठले अन्न कुठल्या क्रमाने 
खावे कसे वाढावे याकडे बारकाईने लक्ष दिले जात असे. जेवणाचा 
आदर करत असत. जेवण पानावर वाढत असत, जेवायच्या आधी 
प्रार्थना करत असतानी मग जेवत असत. त्यावेळी कमीत कमी 
२ भाज्या आणि २ प्रकारच्या डाळी वाढतच असत. जर तुम्ही 
मागे वळून बघितले तर आपल्या पूर्वजांचा आहार अत्यंत 
समतोल होता. जर तुम्हाला लोकांचा दृष्टीकोन बदलायचा 
असेल तर त्याच्या समतोल आहाराकडे लक्ष दिले पाहिजे.
२. व्यायाम: लोक अजिबात व्यायाम करत नाहीत. ते फक्त 
एका जागेवर बसतात ज्याने शरीर आणि मन दोन्हीवर गंज 
चढतो. त्यांना शारीरिक व्यायाम करण्यासाठी उतेजन देऊ 
शकता. सगळ्यांनी एकत्र व्यायाम करू शकता. आता तुम्ही 
म्हणाल यासाठी वेळ कुठे आहे? पण तुम्ही हे सगळे जेवणाच्या 
सुट्टीत करू शकता. फक्त ५ ते १० मिनिटे पुरेशी आहेत तुम्हाला 
पूर्ण १ तासाची गरज नाही, ५-१० मिनिटांचा व्यायाम 
तंदुरुस्तीसाठी पुरेसा आहे. आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे 
आहे. लोकांची काळजी घेणे वेळोवेळी त्यांच्याशी बोलणे आणि ही 
कंपनी तुमची सुद्धा आहे याची जाणीव करून देण्याने खूप फरक 
पडेल. या सगळ्या गोष्टी करून पहा आणि बघा त्यांना किती 
प्रोत्साहन मिळेल. त्यांना जरी कोणी जास्त पैसे दिले तरी ते 
सांगतील ‘नको मी इथे ठीक आहे’. तुम्हाला कामासाठी एक 
पोषक वातावरण तयार करावे लागेल आणि फक्त शारीरिकच 
नाही तर मानसिक स्वास्थ्य द्यावे लागेल. त्यानंतर लोक 
तुमच्यासाठी चांगले काम करतील. 
३. त्यांना थोडे ध्यान शिकवा, कारण ध्यान हेच ताणतणावावरचे 
औषध आहे. तुम्ही दुपारी M&M ठेवू शकता (Meal & Meditation). 
सगळ्यांनी एकत्र जेवण करून नंतर विश्राम करावा. ध्यान 
म्हणजे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे नव्हे तर विकेंद्रित 
करणे होय.  पाश्त्यय देशात उर्जा वामकुक्षी हा परवलीचा शब्द 
झाला आहे. संशोधनात असे दिसून आले की जेंव्हा लोक 
२० मिनिटे दुपारी उर्जा वामकुक्षी घेतात्त तेंव्हा त्यांची उत्पादकता 
३२% ते ५४% वाढते. त्यामुळे अशी उर्जा वामकुक्षी मनाला विश्राम देते. 
बऱ्याच लोकांना असे वाटते की दुपारची झोप व्यावहारिक नाही, 
पण जे लोक डोक्याचे काम करतात, त्यांची उत्पादन क्षमता 
वाढवण्यासाठी १५-२० मिनिटे विश्राम गरजेचा आहे. ध्यान हा 
त्यासाठी उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही १५-२० मिनिटे ध्यान 
केले तर त्यांनी तुम्हाला ८ तास झोपेची विश्रांती मिळते कारण 
८ तासाच्या झोपेत तुमचे ऑंक्स्शीजन घेण्याचे प्रमाण ८०% 
खाली जाते आणि २० मिनिटाच्या ध्यानात हीच गोष्ट साध्य 
होते. अशा प्रकारे ध्यानाचे अनेक फायदे आहेत.