12
2012
Dec
|
बंगलोर, भारत
|
जेंव्हा एखादी व्यक्ती ध्यान करते तेंव्हा त्याला तपस्या ( शरीर शुद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेले केंद्रित प्रयत्न) म्हणतात. पण जेंव्हाजगातील अनेक लोक एकत्र येऊन ध्यान करतात तेंव्हा त्याला यज्ञ म्हणतात आणि त्यातून एक सात्विक बंधुभाव तयार होतो त्याला एक खास महत्व प्राप्त होते कारण आज जगाला त्याची गरज आहे. म्हणून हे एका नव्या सुरवातीसाठी फार सुंदर आणि फार पवित्र असे आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे जी म्हणजे कि आपण प्राचीन असून सुद्धा आपण आधुनिक आहोत. त्यासूर्याकडे पहा, तो जसा प्राचीन असून सुद्धा आज अगदी ताजातवाना दिसतोय! त्याचे किरण ताजे दिसताहेत, हवा पण अगदी ताजी आहे, झाडे पण ताजी दिसत आहेत, जुनी झाडे पण नवीन ताजी पाने! म्हणून तुम्ही पण अगदी ताजे आहात. तुम्ही अगदी असेच जगायला पाहिजे- प्राचीन तरीसुद्धा आधुनिक, कालातीत आणि चीरतरुण! तुम्हाला असेच खूप ताजे आणि नवीन वाटायला लागले कि मग बघा तक्रारी आणि पश्चातापाची भावना कशी पळून जाते ते! आतमधून स्वीकृतीला सुरवात होऊन, मग गतिशीलता आयुष्यात प्रवेश करून सामंजस्य प्रत्येक स्तरावर वाढीला लागते. आयुष्यात तीन गोष्टींची तुम्हाला गरज असते त्या म्हणजे- करुणा, जिद्द आणि वैराग्य. जेंव्हा तुम्हाला तुम्ही अभागी आहात असे वाटायला लागेल तेंव्हा वैराग्याचा विचार करा, जेंव्हा आनंदी असाल तेंव्हा जिद्द बाळगा.आयुष्यात काही जिद्द असायला पाहिजे आणि सेवा करायची जिद्द हि सर्वात चांगली, ती तर प्रत्येकाने बाळगायला पाहिजे. तर जेंव्हा आनंदी असाल तेंव्हा सेवा करायची जिद्द ठेवा, अभागी वाटायला लागले तर वैराग्याचा विचार पाहिजे आणि करुणा तर कायम असायला पाहिजे! प्रश्न: गुरुदेव, आजच्या आर्थिक मंदीच्या काळात भौतिकवादी लोकांना ध्यानाचे महत्व आणि गरज कशी पटवून द्यावी? श्री श्री : येथे काही जुन्या आठवणी कामी येतील. असे पहा कि दुसऱ्या जागतिक युद्धाच्या सुमारास जगात अगदी संकटाची परिस्थिती निर्माण झाली होती. युद्धामुळे झालेल्या सर्वानाशामुळे लोकांना खायला अन्न कमी होते आणि इतर अनेक वस्तूंची टंचाई होती तरीसुद्धा लोक त्यातून बाहेर पडले. या भूतलावर अनेक वाईटप्रसंग आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात तर अनेक संकटांनी या देशाला घेरले होते. त्या अनेक तऱ्हेच्या संकटात दुष्काळ, पूर, अन्न-टंचाई, एक मोठा प्लेग वगैरे सामील होते. पण त्या सर्व संकटातून आपण तरून गेलो होतो. सध्या परिस्थिती हि त्या संकटाइतकी वाईट नाहीये, आपण जर त्या वाईट काळातून तरलो तर यातून सुद्धा सहज तरून जाऊ. सध्या आपण मानवी मुल्यांची वृद्धी कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. आपण एकमेकांना मदत करायला पाहिजे, आहे ते एकमेकांमध्ये योग्य तऱ्हेने वाटून एकत्र राहायला पाहिजे. आपण एकमेकांबरोबर संवाद वाढवायला पाहिजे. मानवी संबंध हे आपल्याला या संकटातून तरून जायला मदत करतील. जेंव्हा तुम्हाला असे लक्षात येईल कि काही लोक तुमच्या पाठीशी आहेत, तुम्हाला मदत करीत आहेत तर मग त्या संकटांना घाबरायला कशाला पाहिजे? तुमचा जर दैवावर विश्वास असेल, तुमच्या सद्सदविवेक बुद्धीवर विश्वास असेल तर ते निश्चितच तुमच्या पाठीशी आहेत तर मग तुम्ही असे मलूल का? म्हणून तुम्ही येणाऱ्या अशा प्रत्येक संकटाचा सामना करतांना मानवी मूल्यांकडे, दैवावादाकडे, आणि आत्म तत्वाकडे वळण्याची संधी सोडता कामा नये. प्रश्न: गुरुदेव, कोणत्याही परिस्थितीत नवीन आणि चिरतरुण कसे राहावे? उदाहरणार्थ, जेंव्हा आपण कोणाला भेटतो तेंव्हा त्यांच्याबरोबरच्या आधीच्या भेटीचे चित्र आपल्या डोळ्यासमोर तरळत असते. श्री श्री : अर्थातच, म्हणून मी तुम्ही प्राचीन आणि आधुनिक आहात असे सांगतोय. तुम्ही नवीन आहात याचा अर्थ असा नव्हे कि तुम्ही कोणाचेतरी नाव विसरुन गेला आहात.प्रत्येक वेळी तुम्ही कोणाला भेटता तेंव्हा प्रत्येक वेळी नाव विचारीत नाही. तुम्ही नवीन आहात याचा अर्थ असा नव्हे कि तुम्ही सर्व विसरुन जायची तुम्हाला मुभा आहे.तुमची स्मृती नक्कीच काम करीत राहील पण त्यात काहीसा ताजेपणा असेल. आत्म्याच्या नवीन पणाची त्यातएक झलक दिसेल. हे सर्व समजावून सांगणे अवघड आहे पण हे असे आहे. म्हणून नवीन म्हणजे जुने सर्व विसरुन जायची मुभा नव्हे! प्रश्न: गुरुदेव, ध्यान केल्यामुळे बौद्धिक गुणांक वाढतो काय? तसे होत असेल तर ध्यानाने बुद्धिमत्तेत वाढ कशी होते? श्री श्री : ध्यानामुळे मेंदू आणि मन यांना आवश्यक ती विश्रांती मिळते. विश्रांती आणि मौन यातूनच क्रियाशीलता आणि बुद्धिमत्ता उदयास येते.असा तऱ्हेने बुद्धीत वाढ होते. प्रश्न: असे म्हटले जाते कि आपण आपले सर्व आयुष्य हे ध्यान म्हणून व्यतीत करू शकतो. माझे आयुष्य हे ध्यान कसे होऊ शकते? श्री श्री : प्रत्येक क्षण हि एक नवी सुरवात असते. तुम्ही जागे व्हा आणि म्हणा “ हि एक नवी सुरवात आहे!” बस, हे असे आहे! येथे “ कसे” ला काही जागा नाही! होऊन जाउद्यात नवी सुरवात! प्रश्न: गुरुदेव, वैदिक ज्ञानाचा जगाला कसा उपयोग होऊ शकतो ते आम्हाला सांगा श्री श्री : याचा निश्चितच फायदा होत आहे- योग, ध्यान, श्वासाचे व्यायाम, आयुर्वेद-हे सारे वैदिक ज्ञान आहे. वेद म्हणजे ज्ञान प्राचीन आणि आधुनिक. प्राचीन ज्ञान आणि आधुनिक ज्ञान याचं प्रत्येकाचे एक असे मुल्य आहे. समाजात काही हवे असणारे बदल घडवून आणण्यासाठी ते एकत्र काम करीत आहेत. प्रश्न: धर्म हा लोकांना एकत्र आणण्यासाठी असताना मात्र असे दिसून येते कि त्याचा वापर हा एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी किंवा फोडण्यासाठी केला जातोय. श्री श्री : जिथे अहंकार प्रवेश करतो, तेंव्हा धर्मात संघर्षाला सुरवात होते. केवळ धर्म म्हणून नव्हे तर हा माझा धर्म आहे म्हणून तो श्रेष्ठ आहे. येथे ”मी” हे संघर्षाचे मूळ कारण असते, धर्म नव्हे. आपण धर्म एक कारण म्हणून समजतो, जगात संघर्ष घडवून आणायला ते एक निमित्त होत आहे, होय कि नाही? परमेश्वरापर्यंत पोहोचायचे धर्म हे एक साधन आहे हा विचार रुजायला पाहिजे तरच त्याचा आध्यात्मिक उपयोग होऊ शकतो, त्याचा राजकीय उपयोग नव्हे. प्रश्न: गुरुदेव, आम्ही ज्याच्यावर भरवसा करावा, जे कधीच ढळू शकत नाही असे काय आहे? श्री श्री : स्वयं. तुम्ही कशावर भरवसा का करायला पाहिजे? फक्त विश्राम करा. या विश्राम स्थितीत सर्व गोष्टी आपोआप जुळून येतील. तुम्हाला जर एखादी चिंता सातवीत असेल तर ती मला द्या, होय मी तुमच्या बरोबर आहे. प्रश्न: मला विफलतेची नेहमी काळजी वाटत असेत, ते सुद्धा कोणतेही महत्वाचे काम करीत असताना. त्यामुळे माझी कार्य कुशलता कमी होत आहे. मी यातून बाहेर कसा येऊ? श्री श्री : एक नवी सुरवात करून. भूतकाळ विसरुन जा. तुमच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी होणार आहेत यावर विश्वास ठेवा. तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे ती हि कि तुम्ही तुम्हाला पुरते ओळखत नाही. जेंव्हा तुम्ही तुमच्या भूतकाळाकडे बघता किंवा तुमच्या कमतरता लक्षात घेता, तेंव्हा आत्मविश्वास येण्यासाठी असे लक्षात घ्या कि तुम्ही तुम्हाला पुरते ओळखत नाही. जेंव्हा तुम्हाला असे वाटते कि तुम्ही स्वतःला पूर्ण ओळखता तेंव्हाच तुम्ही स्वतःला नकारात्मक घटनाविषयी दुषणे देता. पण जेंव्हा तुम्ही जागे होऊन असे म्हणताकि “ मी तर मला पुरते ओळखत नाही”, तेंव्हा ती एक नवी सुरवात असते. तेंव्हा तुमच्या असे लक्षात येईल कि तुमच्यातील अनेक गुण असून सुद्धा ते तुमच्या परिचयाचे नाहीत. प्रश्न: कोणत्याही अपेक्षा आणि बंधने न ठेवता मी मुक्तपणे प्रेम कसे कार्य शकतो? श्री श्री : तुम्हाला प्रेमात सुरक्षितता पाहिजे मात्र त्याचवेळी कोणतीही बंधने नको आहेत. अशा तऱ्हेने अनेक भावनांचा कल्लोळ तुमच्या मनात तयार होऊन संभ्रम उडालाय. जेंव्हा प्रेमात असा संभ्रम तयार होतो तेंव्हा फक्त विश्राम करा आणि जास्त ध्यान करा. सर्व गोष्टी आपोआप सुरळीत होतील. प्रश्न: गुरुदेव, प्राचीन आणि आधुनिक यात काय आहे? श्री श्री : मी स्वतः! |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'