आयुष्यात जे काही बदल होतात त्यासाठी आपण सदैव
तयार असायला हवे. आपण जर या आयुष्यातील बदलाला तयार असलो तर सर्व प्रश्नांची
उत्तरे आपोआपच मिळतात. तुम्हाला काय वाटते?
हे जीवन फार अनमोल आहे. भारता मध्ये असे
मानण्यात येते कि तुमच्या ८४ लाख योनी झाल्यावर तुम्हाला मानवी जन्म मिळतो. म्हणून
आपण हे आयुष्य एक्याने जगले पाहिजे.
आपण हे ऐक्य कसे निर्माण करू शकतो? तुम्ही आजचे
नृत्य पाहिले का? नृत्य म्हणजे शरीराशी संवाद साधणे. संगीत म्हणजे आवाजाशी संवाद
साधणे. त्याचप्रमाणे. जेव्हा मन, शरीर, श्वास आणि बुद्धी यांच्यामध्ये ऐक्य असेल
त्यालाच परमानंद म्हणतात.
आपण आयुष्यात आव्हानांना वारंवार सामोरे जातो. आपल्या आजूबाजूला नेहमीच कठीण
समस्या असतात, आपल्याला जीवनात समतोल राखण्यास शिकले पाहिजे, त्यालाच जीवन
जगण्याची कला म्हणतात (आर्ट ऑफ लिव्हिंग).
आर्ट ऑफ लिव्हिंग काय आहे?
१. सर्व परिस्थिती मध्ये म्हणजेच, आनंदात आणि दु:खात मनाचा समतोल राखणे.
२. वस्तू आणि व्यक्ती जसे आहेत तसे त्यांचा स्वीकार करणे, आणि मग कर्म करणे.
स्वीकार करून नुसते निष्क्रिय राहू नका. स्वीकार करून त्याअनुकूल कर्म करा.
३, दुसऱ्याने केलेल्या चुकी मागे वाईट उद्देश पाहू नका. तुमच्या कडून चूक झाली
तर तुम्ही काय म्हणाल? “चूक झाली. माणसांकडून चूक होते” आणि आपण आपल्याला माफ
करतो.
जेव्हा दुसऱ्यांकडून चूक होते त्यावेळेस
तुम्हाला वाटते कि त्याने ती मुद्दाम केली. तुम्ही विचार करीत नाही कि त्याने ती
चूक मुद्दाम केली नाही.
तीन प्रकारचे
व्यक्ती असतात:
-
पहिल्या प्रकारामधील व्यक्ती आपली चूक छोटी आणि दुसऱ्यांची चूक मोठी असे
पहातात.
- दुसऱ्या प्रकारातील व्यक्ती आपली चूक मोठी
आणि दुसऱ्यांची चूक छोटी मानतात. त्यांना वाटते कि बाकी लोक आपल्यापेक्षा चांगले
आहेत.
- आणि तिसऱ्या प्रकारामधील व्यक्ती चुकी कडे
चूक म्हणूनच पहातात. मग ती कोणाची हि असो. हे हुशार व्यक्ती असतात.
दुसऱ्यांच्या चुकीच्या मागे वाईट उद्देश नाही असे पाहणे हा एक सद्गुण आहे. हा
एका सुशिक्षित व्यक्तीचा एक गुणधर्म आहे.
जेव्हा मन शुद्ध नसेल आणि ह्रदयात तिरस्कार असेल, तेव्हा तुमच्या कर्मामुळे
अनर्थ होतो. आपण आपल्या ह्रदयाला नेहमी शुद्ध ठेवले पाहिजे, ज्या प्रमाणे
सृष्टीने आपल्याला निर्माण केले आहे. जर तुम्ही तुमचे मन नेहमी शुद्ध ठेवले तर तुमच्या
मनात स्पष्टता येईल, आणि तुमच्या कृती सुंदर, आनंददायक आणि रचनात्मक होतील, आणि
तुम्ही सगळीकडे सुख पसरावाल.
आता, ह्र्दय कसे
शुद्ध करायचे?
शुद्धता हि
श्वसनक्रिया आणि ध्यान केल्याने येते. याच्या मुळे सर्व तणाव दूर होतात आणि आपले ह्र्दय आपल्या मुळ परिस्थिती मध्ये
येते जसे ते या सृष्टी मध्ये आले होते. प्राणायम आणि ध्यान मुळे सुद्धा मन शुद्ध
होते. आपल्या मनाच्या शुद्धते चा अनुभव आपण सगळ्यांनी कोणत्या तरी एका क्षणी घेतला
आहेच, म्हणजेच आपल्याला काय हवे आहे आणि काय करावे याची जाणीव होते, होय ना !
इथे पण दोन
प्रकारचे व्यक्ती आहेत.
एक प्रकार
म्हणजे संवेदनशील आणि दुसरे समंजस.
जे व्यक्ती खूप
समंजस आहेत, तर्कशुद्ध आहेत, ज्यांचे मन शुद्ध आहे असे व्यक्ती कधीच दोषी नसतात.
त्यांना क्रोध लगेच येतो. पण आयुष्यात फक्त समंजसपणाने काही होत नाही. तुम्हाला
संवेदनशील पण असायला हवे.
जे व्यक्ती
संवेदनशील आहेत, ते पदोपदी अश्रू ढाळतात. ते लगेच दु:खी होतात. त्यांच्यावर टीका
केलेली त्यांना आवडत नाही, आणि त्यांना ज्या गोष्टी काही पसंत नाहीत त्या गोष्टी
ते पाहू शकत नाहीत, नाहीतर त्यांचा संयम ढळतो. ते भावनात्मक होतात, आणि सर्वांसाठी
गोंधळ निर्माण करतात.
म्हणून आयुष्या
मध्ये दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. समंजसपणा आणि संवेदनशीलपणा या मध्ये समतोल
राखता आला पाहिजे; ह्रदयाचे मूल्य आणि मनाचे मूल्य समजले पाहिजे. हाच समतोल
राखण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग हि एक छोटीशी पायरी आहे.
म्हणून, जेव्हा
चूक होतेतर, त्याच्याकडे एक घटना म्हणून पहा. कुणाकडून झाले हे दुय्यम आहे. तुम्ही
जर हा मार्ग आत्मसात केलात तर तुमचे मन केंद्रित होईल, तुम्ही सर्वांशी जोडू शकाल.
क्रोध, मत्सर, लोभ अशा नकारात्मक दोषांपासून तुमच्यामनाला मुक्ती मिळेल.
प्रश्न: जीवन म्हणजे काय?
श्री श्री: ज्याला या प्रश्नाचे उत्तर माहित आहे तो देणार नाही,
आणि जो उत्तर देईल त्याल जीवन काय आहे हे माहित नाही. कारण हा प्रश्न म्हणजे
प्रवासातील एका वाह्नासारखा आहे. जेव्हा तुमच्या जीवनाचा प्रवास तुम्हाला
ओलांड्याचा असतो, तेव्हा एक सुखी व्यक्ती तुमचे वाहन हिरावून घेणार नाही, तो
म्हणेल, आता तुम्ही जा’.
‘जीवनाचा अर्थ काय आहे’,
हा प्रश्न खूप महत्वाचा आणि अमुल्य आहे. तुम्ही स्वत:ला हा प्रश्न वारंवार विचारला
पाहिजे. असे केल्याने तुमच्या आयुष्यातून क्षुल्लक, अप्रासंगिक, अनावश्यक गोष्टी
दूर होतात.
प्रश्न: आपण जेव्हा आत्मसुखी आणि तृप्त असतो तरी पण आपण हि
परिस्थिती का गमावतो?
श्री श्री: तुम्ही या विश्वात आहात, कुठल्या बेटावर नाही. तुम्ही
अनेक व्यक्तींच्या उर्जेत आहात. ‘मला असे का वाटते’, मला तसे का वाटते’, असा विचार
करत बसू नका. तुमच्या मनवर समय आणि ठिकाणाचा प्रभाव असतो. याच कारणामुळे आपल्या
भोवतालच्या समाजासाठी आपण जे काही करू शकतो ते करावे, इतरांना मदत करावी.
आपण समाजासाठी एक सुखी
लाट निर्माण करावी असे वाटते का तुम्हाला? तर मग आपण ते करूया.
आपण जेव्हा अशी लाट
निर्माण करतो तेव्हा तुम्ही पहाल आपली दु:खे कमी कमी होत जातात.
प्रश्न: वादविवाद आणि संघर्ष असणाऱ्या संबंधात शांतता कशी
आणावी? तुम्ही या मध्ये राहिला आहात का?
श्री श्री: अशी परिस्थिती दोन पद्धतीने हाताळू शकता,
- अशा ठिकाणाहून दूर रहा – जेव्हा सर्व जण क्रोधीत असतात आणि परिस्थिती तापलेली असते
तेव्हा सर्वजण बहिरे
होतात. क्रोधीत व्यक्ती कुणाचे काहीही ऐकत नाहीत. अशा
वेळी सर्वात उत्तम उपाय म्हणजे अशा परिस्थिती पासून काही काळ दूर रहाणे आणि
परिस्थिती शांत होण्याची वाट पहाणे.
- शांतपणे तिथेच रहा – पहिल्यांदा त्या व्यक्तीचा स्वीकार करा आणि सांगा, ‘मी
तुझ्याशी सहमत आहे’,
समजा तुमचे पती किंवा तुमची पत्नी तुमच्याशी वाद घालत
असेल, तर ‘नाही’ असे म्हणू नका, ‘हो, तुझे बरोबर आहे, मी तुझ्याशी सहमत आहे’, असे
म्हणा. ज्या क्षणी तुम्ही स्वीकार कराल त्या क्षणी परिस्थिती निवळेल. त्यानंतर
थोड्या वेळाने जेव्हा वातावरण शांत होईल मग सांगा, ‘कारण......’. हे त्याचे गुपीत
आहे.
कित्येक वेळा माझ्याकडे बरेच जण मोठी मोठी कल्पना
घेऊन येतात. मी त्यांना सांगतो, ‘तुम्ही कल्पना खूप चांगली आहे, पण ती अव्यवहार्य
आहे’.
परिस्थिती शांत करण्यासाठी तुम्ही तुमचे कौशल्य वापरा,
आणि मग समोरच्या व्यक्तीला तुम्हाला काय म्हणायचे आहे ते पटवून द्या.