प्रश्न: गुरुदेव, भगवद्गीतेत श्रीकृष्णाने त्याचा आसरा घ्यायला सांगितले
आहे. त्याचा अर्थ काय ? कृपया सांगा.
श्री श्री : आसरा घेणे म्हणजे निवांत रहाणे. आई घरी आहे म्हटल्यावर मुलाला
कसे निवांत वाटते अगदी तसेच. आई घरी असली की मुलाला आत्मविश्वास
वाटतो. आई घरी आहे या जाणिवेमुळे तो मनातल्या मनात अगदी आरामशीर
असतो. एक सुरक्षिततेची भावना, आत्मविश्वास, माझ्या मागे आधार देणारे,
मला मार्गदर्शन करणारे, माझी काळजी घेणारे कुणीतरी आहे ही भावना, या
सगळ्यामुळे खोलवर एक सुरक्षिततेची भावना निर्माण होते. हाच हाच आसरा
आहे. जेव्हा तुमच्याकडे तो नसतो, जेव्हा तुम्ही अस्वस्थ, काळजीत आणि
तणावाखाली असता तेव्हा तुम्हाला तो अधार हवा असतो. जेव्हा आधार
दिला जातो तेव्हा तो घेणे म्हणजे आसरा घेणे.
प्रश्न: गुरुदेव, आध्यात्माबद्दल जगातल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या संकल्पना
असतात. काहींना वाटते की धार्मिक असणे म्हणजे आध्यात्मिक असणे किंवा
या जगालाच नाकारणे म्हणजे आध्यात्म. तुम्ही आध्यात्माची व्याख्या कशी
कराल ?
श्री श्री : हे जड शरिर आणि आत्मा या दोन्हीचे मिळून आपण बनलो आहोत.
जड शरीर म्हणजे, कर्बोदके, प्रथिने, अमिनो अॅसिड हे सगळे आणि आत्मा
किंवा चैतन्य म्हणजे मन:शांती, प्रेम, आनंद, करुणा, नैतिकता, प्रामाणीकपणा
वगैरे सगळे गुण. तर, प्रेम, मन:शांती, आनंद, उत्सव मनवणे, विनोद,
नैतिकता, प्रामाणीकपणा, ज्ञान या सर्व गोष्टी ज्या कुठल्या गोष्टीमुळे वृद्धींगत
होतील तीच आध्यात्मिकता आहे. जी गोष्ट या चैतन्याचा स्तर उंचावेल आणि
तुम्हाला याची जाणीव करून देईल की तुम्ही तुम्ही शरीरापेक्षाही जास्त काही
आहात, तुम्ही सकल विश्वाशी जोडलेले आहात, तीच आध्यात्मिकता आहे.
आजकालचे शास्त्रज्ञ म्हणतात की हे संपूर्ण जग एकच जीव एकच वैश्विक
काया आहे. केवळ एक संकल्पना नाही तर अनुभवाच्या स्तरावर हे समजणे
म्हणजे आध्यात्म. प्रेमाचेही तसेच आहे, दुसरं असं काहीच नाहिये असं
तुम्हाला जाणवलं की मग सगळं काही तुमचाच भाग असतं. क्वांटम
फिजिक्सची ही गोष्ट तुमच्या जीवनातले सत्य म्हणून कळते तेच आध्यात्म
आहे. क्वांटम फिजिक्स असे म्हणते की संपूर्ण विश्व एका लह्रीपासून
बंलेआहे.जड वस्तू अशी काहीच नाहिये, सगळ्या लहरीच आहेत. तुम्हाला
याचा अनुभव आला आहे कां ? तेच आध्यात्म आहे.
गहिऱ्या ध्यानात या सत्याशी जोडले जाणे आणि त्याची अनुभूती होणे
शक्य आहे. त्यामुळे ध्यान हा आध्यात्माचाच भाग बनतो. हेच कृतीत
आणले की ती सेवा होते. म्हणजेच सेवाही आध्यात्माचाच भाग आहे.
प्रश्न : गुरुदेव, देव या कल्पनेवर किंवा त्या सत्यावर विश्वास नसलेली
एखादी व्यक्ती आध्यात्मिक असू शकते कां ?
श्री श्री : होय, नक्की ! आध्यातिक असण्यासाठी कोणत्याही धर्मावर
विश्वास असण्याची गरज नाही. फक्त जिज्ञासूवृत्ती असली की तुम्ही
आध्यात्मिक असता. तुमच्यात खळखळता उत्साह असायला हवा.
तुम्हाला खूपच कमी माहित आहे आणि जाणून घेण्यासारखे अजून
खूप काही आहे तर तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर पुढे जात आहात.
जर तुमच्याकडे खळाळता उत्साह, आनंद असेल आणि तुम्ही जर
सेवा करून दुसर्यांचा आनंद द्विगुणीत करत असाल तर तो आध्यात्माचाच
भाग आहे. संपूर्ण समाधानाची भावना,पूर्णत्वाची भावना हा सगळा
आध्यात्माचाच भाग आहे.
प्रश्न: गुरुदेव, प्रेम आणि वैराग्य दोन्ही एका वेळी असू शकते कां ?
ते दोन्ही विरोधी वाटतात.
श्री श्री : हे दोन्ही एका वेळी असायलाच हवे नाहीतर तुम्ही असे असूच
शकणार नाहीं. जसे श्वास आणि उच्छवास दोन्ही विरोधी आहेत पण ते
दोन्ही असावेच लागतात. तुम्ही श्वास सोडत असतानाच श्वास घेऊ शकत
नाही, ते एकानंतर एक असेच व्हावे लागते. तसेच प्रेम आणि वैराग्य.
प्रेम म्हणजे आसक्ती आसक्तीची गरज आहे आणि तुम्हाला शहाणे आणि
समजूतदार राहण्यासाठी वैराग्यही तितकेच महत्वाचे आहे.
प्रश्न : गळ्यात जानवे (यज्ञोपवित) घातल्यानंतरसुद्धा लॉक आपल्या
जबाबदाऱ्या नीट निभावत नाहीत. जानवे घातल्यानंतर आपल्याला आपल्या
जबाबदाऱ्यांची आठवण रहाते असे तुम्हाला खरेच वाटते कां ?
श्री श्री : ते फक्त एक चिन्ह आहे.
तुम्ही वंदे मातरमचा बिल्ला लावला म्हणजे तुम्ही देशभक्त होत नाही.
त्याचप्रमाणे तुम्ही जानवे घातले म्हणजे तुम्ही जबाबदार बनता असे नाही.
याला काही अर्थ नाही. बरेच लोक जानवे घालतात पण ते कां घालायचे हेच
त्यांना माहित नसते. त्यांना त्याची काहीच कल्पना नसते.
प्रश्न : गुरुदेव, लहान मुलांनी कोणत्या दिशेने झोने जास्त चागले ?
पूर्व, पश्चिम की उत्तरेला तोंड करून ?
श्री श्री : पृथ्वीचा चुंबकीय अक्ष छेदण्यासाठी पूर्व पश्चिम झोपणे खूप
चांगले असते असे म्हणतात.
प्रश्न : जेव्हा तुमच्याकडे पुरेसे असते तेव्हा तुम्ही लोकांना देता. मला
वाटते की माणसाला हे ठरवणे कठीण आहे की त्याच्यासाठी पुरेसे म्हणजे
किती ? माझ्यासाठी पुरेसे म्हणजे किती हे मला कसे कळेल ? मनाला
नेहमी आणखी आणखी हवे असते.
श्री श्री : लोकांकडे लाखो असतात तरी ते लुबाडत असतात. ही दुर्दैवाची
गोष्ट आहे. हव्यास स्वत:ला आणि दुसऱ्यांनाही मारतो.
तुम्ही जे कमावता त्यातले थोडेसे बाजूला ठेवा. त्याला हात लावू नका.
समजा तुम्ही एक क्ष रक्कम कमावली तर्त्यातले दहा टक्के बाजूला ठेवा.
दहा टक्के तुमच्या स्वत:साठी बचत करा. आणि मग तुमचा जो खर्च
असेल तो करा. काही रक्कम भविष्याची तरतूद म्हणून ठेवा. असे आयोजन
करा.
जी रक्कम तुम्ही वाचवता ती कदाचित् तुम्ही दान करण्यासाठी बाजूला
ठेवण्याच्या रकमेच्या तीन ते पाच टक्के इतकीच असेल.
प्रत्येक जण दान करू शकतो. दान करण्यासाठी खूप कमवायला हवे
असे नाही. तुम्ही जे कमावता त्यातले तीन टक्के दान करण्यासाठी बाजूला ठेवा.
मला वाटतं तुम्हाला तुमच्या पालकांकडून हात खर्चाला पैसे (पॉकेट मनी)
मिळत असतील. समजा तुम्हाला क्ष रक्कम मिळत असेल तर तुम्ही
त्यातले तीन टक्के बाजूला ठेवू शकता. ते सगळे पैसे खाणे,
सिनेमा आणि इतर्गोष्टींवर खर्च करण्या ऐवजी तुम्ही थोडे पैसें वाचवू शकता
म्हणजे तुमच्या मध्ये ती सवय बाणवली जाईल. तुम्हाला हे दिसून येईल की
तुमच्या आयुष्यात कधीच अभाव असणार नाही. अभाव नाहीसा होईल आणि
तुम्ही आनंदी व्हाल.
प्रश्न : गुरुदेव, राजयोग म्हणजे काय ? तो फक्त राजासाठीच असतो
कां ?
श्री श्री : राजयोग म्हणजे फारसे कष्ट न करता गोष्टी मिळणे.
तुम्ही जे करताय तो राज योग आहे. तुम्हाला इथे सगळे अगदी
तबकात ठेऊन तयार मिळते आहे. बुद्धाने जे केले त्यातले तुम्हाला काहीच
करावे लागले नाही. ते वर्षानुवर्षे मैलोनमैल चालले. त्यांनी काय नाही केले ?
त्यांनी कित्येक महिने उपवास केला. सगळे सांगतील ते सर्व काही केले.
तुम्हाला अनुभव मिळण्यासाठी हिमालयात जावे लागले नाही किंवा इथेही
काही विशेष करावे लागले नाही. राजेशाही थाटात तुम्हाला इथे बसून हवे
ते मिळाले. हा राज योग आहे.
राज योग म्हणजे राजा सारखे, ज्याला सगळे एका चुटकी सरशी मिळते.
आयुष्यात विनासायास सर्व गोष्टी मिळणे म्हणजे राज योग.
ज्योतिष शास्त्रात अनेक प्रकारचे योग जुळलेले असतात. एका विशिष्ठ प्रकारचे
योग जुळलेले असले तर तो राज योग असतो. म्हणजे तुम्ही एका चांगल्या
कुटुंबात जन्मलेले असता, तुमचा व्यवसाय चांगला चाललेला असतो, चांगला
पैसा, चांगली मुले किंवा चांगले गुण, या सर्व गोष्टी राज्योगाच्या प्रभावामुळे
मिळाल्या असे मानले जाते. नाव, प्रसिद्धी,गुण हा एक प्रकारचा राज्योग्च आहे.
अनेक प्रकारचे राज योग आहेत.
प्रश्न : गुरुदेव, कृष्णाने प्रत्यक्ष ध्यान करायला ण लावताही ध्यान योग
किंवा कर्म योग कसा शिकवला ?
श्री श्री : जेव्हा स्वत:च योगेश्वर असतो तेव्हा त्याचे परिणाम ताबडतोब
होतात. फारसे काही करावे लागत नाही. नुसते म्हटले की ते लगेच पक्के होते.
संस्क्र्त्मध्ये म्हटले आहे की, ‘ऋषीनां यत् चित्तानां वाचं अर्थोनु धावते’. म्हणजे,
जेव्हा तुम्ही सिध्द झालेले असता तेव्हा तुम्ही काही म्हटले की त्याचा अर्थ त्याच्या
मागे येतोच. जर तुम्ही स्वत:मध्ये सुस्थापित झालेले नसाल तर तुम्ही एखादा
शंभर वेळा म्हटलात तरी त्याचा परिणाम होत नाही.
प्रश्न : गुरुदेव, जग बदलणे आणि सेवा करणे हे माझे ध्येय आहे. माझे
लग्न न झालेले मित्र मला लग्न करायला सांगताहेत आणि माझे लग्न झालेले
मित्र म्हणताहेत की जग बदलण्याचे तर विसरूनच जा, तुला टीव्हीचा चॅनलही
बदलता येणार नाही. मी कुणाचे ऐकू ?
श्री श्री : तू तुला कशाची गरज आहे ते ऐक, स्वत:च्या मनाचे ऐक.
लग्न झालेले आणि दु:खी असलेले लोक आहेत; आणि लग्न न होऊनही
दु:खी असलेले लोक आहेत. त्याचप्रमाणे लग्न न होऊनही आनंदी असलेले लोक
आहेत आणि लग्न करून आनंदी असलेले लोकही आहेत. तुम्ही दुसऱ्या प्रकारात
असलेले बरे.