07
2014
Oct
|
दिल्ली, भारत
|
(भारतीय उद्योग मंडळ यांच्याकडून श्री श्री रविशंकर यांच्या बरोबर ‘मानवी क्षमता आणि व्यापार नीतिमत्ता’ या वर विशेष सत्र आयोजित केले होते त्यातील प्रश्न उत्तरांचा हा सारांश ) प्रश्न: (श्रोत्यांमधून प्रश्न विचारण्यात आलो जो नीट ऐकू आला नाही) श्री श्री: जसे जयंती यांनी अगदी बरोबर सांगितले, आपल्याकडे क्षमता भरपूर आहे पण, कौश्यल्य आणि अभियोग्यता किंवा कल नाही. मी यात आजून एक गोष्ट सांगेन व्यवहार बुद्धी, सामान्य ज्ञान. कोणीतरी विचारले भारतीय असल्याच्या खुणा काय? मी सांगितले ४ गोष्टी आहेत. १. प्रत्येक भारतीय तत्ववेत्ता आहे. ते तुम्हाला तुम्ही काय करावे आणि काय करू नये या बद्दल सल्ला देतील. त्यांची स्वतःचे तत्वज्ञान असते. अगदी रिक्षा चालवणारे सुद्धा तुम्हाला सल्ला देतील. २. प्रत्येक भारतीय हा राजकारणी आहे. ३. प्रत्येक जण डॉक्टर आहे. ४. जर कोणी पुढे जात असेल तर त्यांच्या पुढे जाण्यापेक्षा ते त्यांना मागे ओढतील. त्यांच्या कामात अडथळे आणतील. असे काय आहे जे लोकांना अगदी प्राण ओतून करावेसे वाटते? ज्याने लोक प्रेरित होतात आणि पुढे जातात. आपल्याला त्याकडे लक्ष दिले पाहिजे. मला आठवते ८० च्या दशकात देशातल्या काही बड्या उद्योगपतींना मी भेटलो होतो. मी त्यांची नवे सांगणार नाही पण तुम्हाला आशर्य वाटेल ते पुढे जाणाऱ्या लोकांना मागे कसे ओढता येईल या बद्दल चर्चा करत होते. मला त्यांच्या बद्दल करूणा वाटली. जर कोणी आपल्या व्यवसायात पुढे जात असेल तर आपण त्याच्या पेक्षा चांगले कसे करू या बद्दल विचार केला पाहिजे. आपल्या जडणघडणीत हा दृष्टीकोन असला पाहिजे. पूर्वी हा दृष्टीकोन होता, पण आज आपण स्वतःच्या क्षमतेवर शंका घेतो. आपल्या हे लक्ष्यात येत नाही कि आपल्यात प्रचंड क्षमता आहे. छोट्या आणि मध्यम उद्योगसाठी अनेक आव्हाने आहेत याची मला जाणीव आहे. नफा आणि तोटा हि बड्या उद्योगाच्या तुलनेत त्यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे. मोठे उद्योग त्यांच्यावर असलेल्या मोठ्या कर्जानंतर सुद्धा नीट चालतात. छोट्या आणि मध्यम उद्योगसाठी कौश्यल्य आतिशय महत्वाचे आहे. तुम्हाला अनेक लोक भारती करता येत नाहीत त्यामुळे तुम्हाला कुशल कामगारांची गरज आहे. तुम्हाला तत्पर, स्वतःहून पुढाकार घेऊन काम करणारे, कल्पक आणि प्रामाणिक लोक हवेत. हे म्हणजे जवळ जवळ अशक्य वाटते. असे लोक कुठून मिळणार ? मी सांगतो हे शक्य आहे. थोडा वेळ काढून स्वयंसेवी आणि धार्मिक संस्था कश्या काम करतात हे पहा. या संस्थात काम करणारे लोक इतके प्रेरित आणि भारलेले कसे असतात हे शिकावे लागेल. तुम्हाला वाटत असेल कि तुम्ही धर्मनिरपेक आहात आणि स्वयंसेवी आणि धार्मिक संस्थाचे काम बघायचे नाही, तर दुसरा मार्ग आहे दहशतवादी कसे काम करतात हे बघावे लागेल. देशात नक्षलवादी किंवा दहशतवादी कसे काम करतात ते पहा. असे काय आहे ज्यामुळे ते इतके प्रेरित, प्रोत्साहित कि आपले तनमन ओततात. तुम्हाला माहित आहे २ वर्ष्यापूर्वी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने ३५० उल्फा अतिरेकी आमच्या आश्रमात पाठवले, ज्यांना शस्त्र त्याग करायचा होता. ते आश्रमात १ महिना राहिले आणि त्यांचे आयुष्य आमुलाग्र बदलले. त्यांचे आयुष्य म्हणजे एखाद्या बॉलीवूड सिनेमा सारखे होते, वास्तविक सिनेमापेक्षा जास्त रोमांचक. या तरुणांच्यात अशी काय शक्ती आहे ज्यामुळे सगळा आराम सोडून त्यांनी शस्त्र हाती घ्यावीत, जंगलात राहावे? जर एखादा माणूस त्याचे सर्वस्व पणाला लावून विघातक गोष्टी करत असेल तर तीच शक्ती आपण विधायक कामाकडे का नाही वळवू शकत? आपण हे करू शकतो. एक महिना आश्रमात राहिल्यामुळे त्यांचात आमुलाग्र बदल झाला, त्यांनी समाजासाठी काही चांगले परिवर्तन घडवण्याची शपथ घेतली. त्यांच्या पैकी काही जण शेती करत आहेत, काही जण छोटे उद्योगपती आहेत. त्यांना फक्त योग्य दिशा दाखवण्याची गरज होती. आपल्यासाठी जे काम करत आहेत त्यांच्यात हि उर्जा जागवण्याची गरज आहे. त्यांनी येऊन फक्त ९ ते ५ काम करून निघून जाऊ नये. बरेचदा लोक जेव्हा वरिष्ट बघत असतात तेंव्हाच काम करतात. वरिष्ठची पाठ फिरतच परत टंगळमंगळ सुरु. आपल्याला हि प्रवृत्ती बदलावी लागेल आणि त्यांच्यातले उत्तम गुण बाहेर काढण्यासाठी आपल्याला त्यांच्याकडे यंत्र किंवा फक्त वापरायची वस्तू म्हणून न बघता माणूस म्हणून बघितले पाहिजे. आपल्याला त्यांच्या बरोबर नाते निर्माण करावे लागेल, त्यांच्याकडे माणूस म्हणून बघावे लागेल. उदाहरणार्थ तुमच्या कारखान्याबाहेर असलेला सुरक्षारक्षक, जो तुमच्या पूर्ण कारखान्याची रखवाली करतो, त्याचे तुम्ही कधी अभिवादन केले आहे? त्याला तुम्ही कधी विचारले ‘तू कसा आहेस?’, तुझी दिवाळी कशी झाली? तुला किती मुले आहेत? ती ठीक आहेत का? या छोट्या गोष्टी, छोटे संवाद यामुळे त्यांचात एक प्रकारची बांधलकी एक आपलेपणा निर्माण होईल. या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे कारण याने मोठा फरक पडेल, फक्त पैशाने नाही. तुम्ही जर बघितले तर आर्ट ऑफ लिविंग मध्ये IIT आणि IIM चे अनेक पदवीधर आहेत. त्यांना बाहेर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भरपूर पैसे मिळू शकतात, पण ते अगदी जरुरी पुरते पैसे घेऊन अगदी मनापासून, झोकून देऊन काम करतात. जर एका स्वयंसेवी संस्थात असे घडू शकते तर कामाच्या ठिकाणी का घडणार नाहीत? हे शक्य आहे. जर्मनी मध्ये दुसऱ्या महायुध्दनंतर हेच घडले, तेंव्हा प्रत्येक जण ‘आपल्याला आपले राष्ट्र पुन्हा उभारायचे आहे, आपले राष्ट्र पूर्ण उद्वस्त झाले आहे’ या देश भावनेने जागा झाला. युवक आणि महिलांमध्ये हा बदल घडवण्याची शक्ती आहे. मला एका ६५ वर्ष्याच्या महिलेने जर्मनीमध्ये तिच्या घरी आमंत्रित केले होते. ही साधारण २० वर्ष्या पूर्वीची गोष्ट असेल. त्या महिलेला मुले, नातवंडे होती पण तिने आणि तिच्या नवऱ्याने या वयात स्वतःचे घर स्वतः बांधले होते. संपूर्ण लाकडाच्या घरात एकही खिळा इकडे तिकडे नव्हता. त्यांचात कामाचा प्रचंड उत्स्थह होता. आपल्या तरुण आणि इतर कामगारर्वर्गात कामाबद्दलची संस्कृती उत्पन्न करावी लागेल. यासाठी ४ स्तरावर काम करावे लागेल. १. त्यांचे आरोग्य चांगले आहे हे बघावे लागेल. जर त्यांना कामाबद्दल निरुत्साही वाटत असेल तर त्याकडे लक्ष द्यावे लागेल. त्यांच्यात बी किंवा डी जीवनसत्वाची कामतरता असू शकेल. आजकाल प्रमाणबाहेर रासायनिक खते वापरल्यामुळे अश्या प्रकारचे अन्न आणि भाज्या खाऊन लोक उत्साही, टवटवीत होण्याऐवजी लवकर थकतात. हा शारीरिक थकवा आळस आणि नीरुउस्थाही बनवतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या जेवणाकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. माझ्या सुचनेनुसार कोइमतूर मधल्या एका छोट्या उद्योगाने त्यांच्या कामगारांसाठी दुपारचे जेवण द्यायला सुरुवात केली. त्यांनी मोड आलेली कडधान्य आणि चपाती, भात असा समतोल आहार दिला. जेंव्हा लोक एकत्र येऊन जेवू लागले त्यानंतर त्यांची उत्पादनक्षमता वाढली. दुपारचा समतोल आहार त्यांना पूर्ण दिवस ताजातवाना ठेवू लागला. जर ते पराठा आणि लस्सी जेवणात घेऊ लागले तर त्यांना लगेच झोप येऊ शकते आणि त्यांचे कामात लक्ष लागणार नाही. त्यामुळे जेवणाकडे थोडे लक्ष दिले पाहिजे. तुम्ही त्यांच्या पगारातून पैसे घेऊ शकता पण त्यांना चांगला पोषक आहार द्या. लोकांची काळजी घ्या. वेळोवेळी त्यांच्याशी बोलून, कंपनी त्यांची आहे याची जाणीव करून दिल्यानेही खूप फरक पडेल. आपल्या देशात पौष्टिक आहाराबद्दल्ची जागरुकता खूप कमी आहे. आपण जास्तीतजास्त पिष्टमय पदार्थ, बटाटे, टोमाटो, वांगी. आपण हिरव्या भाज्याचा समावेश फारसा करत नाही. आपण रोज फक्त बटाटे, कांदे टोमाटो आणि वांगी खातो. या भाज्यात पौष्टिक गुणधर्म नाहीत. उपवाससुद्धा चुकीच्या पद्धतीने केले जातात. आपण बटाटे खातो आणि सांगतो कि मी उपवास केला, हे चुकीचे आहे. असे म्हंटले जाते ‘जसे अन्न तसे मन’. माझी आजी रोज जेवणात काय काय खाल्ले पाहिजे या बद्दल खूप आग्रही असे. रोज हिरवी चटणी आणि साग असे. तिचे रोजचे जेवण केळीच्या पानावर असे आणि गावाकडे राहिल्यामुळे ती ९५ वर्ष जगली. पूर्वी जेवणाबद्दल काही संकेत आणि नियम पाळले जात. कुठले अन्न कुठल्या क्रमाने खावे कसे वाढावे याकडे बारकाईने लक्ष दिले जात असे. जेवणाचा आदर करत असत. जेवण पानावर वाढत असत, जेवायच्या आधी प्रार्थना करत असतानी मग जेवत असत. त्यावेळी कमीत कमी २ भाज्या आणि २ प्रकारच्या डाळी वाढतच असत. जर तुम्ही मागे वळून बघितले तर आपल्या पूर्वजांचा आहार अत्यंत समतोल होता. जर तुम्हाला लोकांचा दृष्टीकोन बदलायचा असेल तर त्याच्या समतोल आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. २. व्यायाम: लोक अजिबात व्यायाम करत नाहीत. ते फक्त एका जागेवर बसतात ज्याने शरीर आणि मन दोन्हीवर गंज चढतो. त्यांना शारीरिक व्यायाम करण्यासाठी उतेजन देऊ शकता. सगळ्यांनी एकत्र व्यायाम करू शकता. आता तुम्ही म्हणाल यासाठी वेळ कुठे आहे? पण तुम्ही हे सगळे जेवणाच्या सुट्टीत करू शकता. फक्त ५ ते १० मिनिटे पुरेशी आहेत तुम्हाला पूर्ण १ तासाची गरज नाही, ५-१० मिनिटांचा व्यायाम तंदुरुस्तीसाठी पुरेसा आहे. आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. लोकांची काळजी घेणे वेळोवेळी त्यांच्याशी बोलणे आणि ही कंपनी तुमची सुद्धा आहे याची जाणीव करून देण्याने खूप फरक पडेल. या सगळ्या गोष्टी करून पहा आणि बघा त्यांना किती प्रोत्साहन मिळेल. त्यांना जरी कोणी जास्त पैसे दिले तरी ते सांगतील ‘नको मी इथे ठीक आहे’. तुम्हाला कामासाठी एक पोषक वातावरण तयार करावे लागेल आणि फक्त शारीरिकच नाही तर मानसिक स्वास्थ्य द्यावे लागेल. त्यानंतर लोक तुमच्यासाठी चांगले काम करतील. ३. त्यांना थोडे ध्यान शिकवा, कारण ध्यान हेच ताणतणावावरचे औषध आहे. तुम्ही दुपारी M&M ठेवू शकता (Meal & Meditation). सगळ्यांनी एकत्र जेवण करून नंतर विश्राम करावा. ध्यान म्हणजे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे नव्हे तर विकेंद्रित करणे होय. पाश्त्यय देशात उर्जा वामकुक्षी हा परवलीचा शब्द झाला आहे. संशोधनात असे दिसून आले की जेंव्हा लोक २० मिनिटे दुपारी उर्जा वामकुक्षी घेतात्त तेंव्हा त्यांची उत्पादकता ३२% ते ५४% वाढते. त्यामुळे अशी उर्जा वामकुक्षी मनाला विश्राम देते. बऱ्याच लोकांना असे वाटते की दुपारची झोप व्यावहारिक नाही, पण जे लोक डोक्याचे काम करतात, त्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी १५-२० मिनिटे विश्राम गरजेचा आहे. ध्यान हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही १५-२० मिनिटे ध्यान केले तर त्यांनी तुम्हाला ८ तास झोपेची विश्रांती मिळते कारण ८ तासाच्या झोपेत तुमचे ऑंक्स्शीजन घेण्याचे प्रमाण ८०% खाली जाते आणि २० मिनिटाच्या ध्यानात हीच गोष्ट साध्य होते. अशा प्रकारे ध्यानाचे अनेक फायदे आहेत. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'