13
2014
Oct
|
क्युबेक, कॅनडा.
|
प्रश्न: समर्पण हा दैवी गुण आहे, हे सत्य आहे का? ही दैवी गुण मानव कसे काय प्राप्त करू शकेल? श्री श्री: कृपया, समर्पण करण्याचा प्रयत्न करू नका. मला वाटते ‘समर्पण’ या शब्दाचा खूप गैरवापर केला जातो. म्हणून मी म्हणतो तुम्ही हा शब्द दूर कुठेतरी ठेवा अन्यथा तळ्यात नेऊन टाकून द्या. तुम्ही फक्त तुमच्या नैसर्गिक स्वभावात, साधे रहावा, समर्पण करण्याचा प्रयत्न करू नका. तुमची कोणी तरी काळजी घेत आहे, तुम्हाला मदत करत आहे एवढा विश्वास असेल तरी खूप आहे. ज्या गोष्टी तुमच्या आवाक्याबाहेर आहेत त्यावेळी तुम्ही म्हणता, ‘माझे प्रयत्न संपले’, आणि तुम्ही त्या गोष्टीचा विचार सोडता, त्यालाच समर्पण म्हणतात. तुम्ही ते नैराश्येने पण करू शकता आणि शांत मनाने देखील. प्रश्न: गुरुजी, तुम्ही आम्हाला सकारात्मक मन कसे ठेवायचे याचे प्रशिक्षण देता. काही वेळा मी खूप साऱ्या गोष्टींना हो म्हणतो आणि त्या सर्व गोष्टी मी पूर्ण करण्यास असमर्थ ठरतो. मला आता सकारात्मक मन आणि वेळेचे व्यवस्थापन या मध्ये खूप कलह निर्माण झाला आहे. श्री श्री: हा कलह नाही. ‘सकारात्मक मन’ म्हणजे सगळ्या गोष्टींना आंधळेपणाने हो म्हणणे असे नाही. पण त्या गोष्टीचे ज्ञान घेणे आणि त्या गोष्टींवर सकारात्मक रित्या विचार करणे. एक ‘सकारात्मक मन’ एका ज्ञानी कडे असतो, मुर्खांकडे नाही. जर कोणी म्हटले कि तळ्यातील पाणी गरम आहे, तू त्यामध्ये उडी मारू शकतोस, तुम्ही लगेच त्याला ‘हो’ म्हणण्याची गरज नाही. तुम्ही म्हणायला हवे, ‘मला वाटते तुझे आकलन चुकीचे आहे, तू उन्हाळ्याचा विचार करत असशील. पण आत्ता हे पाणी खूप गार आहे’. ‘सकारात्मक मन’ म्हणजे बाकीचे लोक काय म्हणतात त्याला संमती देणे असे नाही, पण त्या गोष्टीचे ज्ञान असणे. प्रश्न: या सृष्टी मध्ये कोणत्या क्षणी एका सजीव गोष्टीला आत्मा मिळतो? मी झाडे, डास, बेक्टेरीया, कोशिका इत्यादी च्या संदर्भात बोलत आहे. श्री श्री: प्रत्येक गोष्टी मध्ये आत्मा आहे, अगदी मुंगी पासून ते बेक्टेरिया पर्यंत; सगळीकडे आहे. पण एक परिपक्व आत्मा हा तुमच्या शरीर संस्थे मध्ये एका ठराविक अवस्थेत प्रवेश करतो, तो एखादे वेळेस गर्भधारणे वेळी किंवा चौथ्या किंवा पाचव्या महिन्यात, किंवा जन्मता वेळी. ह्या तीन शक्यता आहेत, आणि ते कधी होते हे माहित नाही. म्हणून या बाबतीत विचार न करणे चांगले. प्रश्न: आम्ही तुमच्या कडून सर्वात महत्वाचा कोणता धडा शिकावा असे तुम्हाला वाटते? श्री श्री: हे म्हणजे असे झाले कि तुम्ही एखाद्या औषधाच्या दुकानात जाता आणि त्याला म्हणता, ‘तुम्ही मला सर्वात चांगले कोणते औषध देऊ शकाल?’ एकच गोष्ट नाही, तुम्हाला जे काही हवे आहे ते सर्व तुम्हाला इथे मिळू शकेल. मी सर्वांसाठी एकाच उपदेशाशी का मर्यादित राहू? जर कुणी डाव्या बाजूला झुकेत असेल, तर मी त्याला उजवी कडे सरकायला सांगेन, आणि जर कुणी उजवी कडे झुकेत असेल तर त्याला डावी कडे सरकायला सांगेल. मध्य साधा ! प्रश्न: गुरुजी, तुम्ही डावखुरे आहात कि दक्षिणहस्त आहात? श्री श्री: मी सर्व गोष्टी योग्य रीतीने हाताळतो. मी समजतो मी कोणतीही गोष्ट विसरत नाही, त्यामुळे काही बाकी रहात नाही. प्रश्न: प्राण्यांना मन असते का? त्यांना पण मानसिक आजार होतात का? श्री श्री: प्राण्यांमध्ये मन असते, त्यांनाही भावना असतात. एका चित्त्याने माकडाच्या एका छोट्या पिल्लाला वाचविले, एका डॉल्फिन ने कुत्र्याला कसे वाचविले या संदर्भात काही अनुच्छेद आहेत. अशा प्रकारच्या खूप अद्भुत गोष्टी आहेत. आपण बहुधा एक म्हण वापरत असतो ‘कुत्र्या मांजरा सारखे भांडणे’, पण आपल्या आश्रमामध्ये एका मांजरीच्या पिल्लाची देखभाल एक कुत्रा करत आहे. ते मांजरीचे पिल्लू त्या कुत्र्याच्या अंगावर खेळते, आणि तो कुत्रा त्या मांजरीच्या पिल्लाला गोंजारतो. ते एकमेकाचे चांगले मित्र आहेत. भानू (श्री श्रीं ची बहिण) मला सांगत होती की एक महिन्या पूर्वी, एका मोरा ने एका सापाचे अनुरक्षण केले. तसे पाहिले तर साप आणि मोर एकमेकांचे कट्टर वैरी, ते एकमेकांना मारतात, पण त्या ठिकाणी काही ससे होते ज्यांना सापा पासून धोका होता, म्हणून मोराने त्या सापाचे अनुरक्षण केले आणि त्या सस्यांचे प्राण वाचविले. ह्या वरून समजते कि प्राण्यांना देखील मन असते. तुम्ही पाहिले असेल, हत्ती खूप हुशार असतो. आपल्या आश्रमातील हत्ती, मी जर तिला भात दिला, तर ती तिच्या सोंडेत घेत नाही कारण तिला माहित आहे असे केल्याने तिला व्यवस्थित खाता येत नाही. पण मी जर का तिला केळी दिली तर ती सोंडेत पकडते. मी जर तिला भात दिला तर ती माझा हात आपल्या मुखापर्यंत ओढते. माहूत (हत्तीला सांभाळणारे) सांगतात कि, ‘गुरुजी ही तुमच्या कडे येताना धावत येते, पण जाते वेळी ती खूप नाखुश असते कारण तिला इथून जायचे नसते. मग ती काही टवाळक्या करते’. माहूत आणखीन सांगतात, ‘गुरुजी, तुमच्या कुटीर कडे येत असताना ती माझे सर्व ऐकत असते, पण परत जाताना ती माझे एक ऐकत नाही’. प्राणी खूप हुशार असतात. त्यांना पण मन आहे, पण ते स्वत:ला निसर्गाबरोबर एकरेखीत करतात. ते निसर्गा विरुद्ध कोणतीही गोष्ट करत नाहीत, ते जास्त अन्न खात नाहीत, ते जास्त झोपत नाहीत किंवा झोपतच नाहीत. मानवा सारखे ते आनंद मिळविण्यासाठी कोणत्याही कार्याचा अतिरेक करत नाहीत. ते खूप चांगले आहेत कारण ते निसर्गाशी संरेखित आहेत. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'