11
2012
Oct
|
बंगलोर, भारत
|
तुम्ही जर पौराणिक चित्रांकडे पाहिले, तर तुम्हाला लक्षात येईल कि भगवान महावीर हे पंचमुखी नागाच्या फण्याखाली बसलेले दिसतील, किंवा भगवान विष्णू ध्यान करायला बसलेले आहेत आणि त्यांच्या मागे नाग आहे. काही ऋषींच्या चित्रांमध्ये सुद्धा तुम्हाला फणा काढलेले नाग दिसतील. तुम्ही असे चित्रे पाहिले आहेत का? हे खूप मार्मिक आहे. पहा, तुम्ही ध्यान करायला बसल्यावर काय होते? तुमची चेतना जागृत होत असते, जणू तुमच्या मागे हजार उभा मुखाचा नाग आहे. नाग हे सतर्कतेचे चिन्ह आहे. तुमच्या पैकी किती जणांना, ध्यान करत असताना, मस्तकाच्या मागील बाजूस सतर्कता जाणवते? एक प्रकारची सजगता! म्हणून नाग हे एका आच्छादित नसलेल्या उर्जेचे चिन्ह आहे, एक अशी उर्जा कि जी सतर्कता परंतु विश्राम किंवा आराम स्थितीत असलेली. त्यांच्यामागे खरोखरिचा नाग नसून, नाग हा पूर्ण आराम आणि जागृत राहणे याचे प्रतीक आहे ज्याला आपण ध्यान म्हणतो – पूर्ण आराम, इच्छाहीन, काहीही श्रम न करता, अभाव पूर्ण, जणू नागाच्या फण्यासारखे; श्रम न करता जागृत राहणे. ह्याचे दोन प्रकाराने वर्णन केले गेले आहेत. एका प्रकारात ते नागा विषयी सांगतात आणि दुसऱ्या प्रकारात फुलांबद्दल. जणू हजारो पाकळ्यांचे कमळ मुकुट चक्रावर उमलत आहे. काहीजण त्याचे फुलांसारखे वर्णन करतात म्हणजे नाजुकता, तर काहीजण नागासारखे, म्हणजे सतर्कता. ते दोन्ही चपखल आहेत. आता तुम्हाला जर तसे वाटत नसेल याचा अर्थ म्हणजे तुम्ही खूप अन्न ग्रहण केले आहे. तुम्हाला अशावेळी नाग दिसणारच नाही, तुम्हाला फक्त म्हैसच दिसेल, कारण तुम्ही खूप अन्न ग्रहण केल्याने तुम्हाला आळस आलेला आहे. त्यामुळेच ते जगभर सर्वजण उपवास आणि प्रार्थना; उपवास आणि ध्यान या बाबतीत बोलत असतात. त्याचवेळी असे लक्षात ठेवा कि तुम्ही खूप उपवास पण चांगले नाहीत. काहीजण दिवसभर उपवास करतात आणि रात्री खूप अन्न ग्रहण करतात. जे चांगले नाही. उपवास करण्याचे काही नियम आहेत त्याचे आपण अनुसरण केले पाहिजे. उपवास कसा करावा हे आपल्याला निसर्गोपचार तज्ञ आणि वैद्य चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. नवरात्रीत आपण उपवास करतो पण उपवासाच्या नावाखाली आपण मेजवानी खातो. लोक म्हणतात. “ आम्ही कडधान्य खात नाही, फक्त बटाटा खातो. ”, आणि बाहेर जावून ते फ्रेंच फ्राईझ आणि बाकी सर्व खातात. “तांदूळ खाणार नाही असे म्हणतात आणि ते इडली खातात”. ही फसवणूक आहे. मी तुम्हाला सांगतो उपवास करणे म्हणजे पुरी हलवा खाणे नाही. ही उपवास करण्याची चुकीची पद्धत आहे. असा उपवास तुम्ही करू नका. अल्पाहार मित आहार – सोप्या रीतीने पचेल असे थोडे अन्न खावे. हा सुद्धा एक प्रकारचा उपवासच आहे. थोडे फळे आणि पाणी ग्रहण करणे. ज्या वेळेस शरीर जड आणि आळशी नसेल त्यावेळेस ते बहरेल आणि तुम्ही ध्यान छान प्रकारे करू शकाल. जास्त उपवास केल्याने तुमचे पित्त वाढते आणि तुम्ही ध्यान करू शकत नाही. त्यामुळेच जास्त पाणी पिल्याने तुमचे पित्त वाढत नाही. प्रश्न: गुरुदेव, भगवान विष्णू आणि भगवान शिव याच्यामध्ये काही फरक नसला तरी कुणापासून कुणाचा उगम झाला आहे? विष्णू पुराणात भगवान विष्णूचे उदात्तीकरण केले आहे आणि शिवा पुराणात भगवान शिव चे. श्री श्री : कुणापासून कुणाचा उगम झाला असा विचार तुम्ही केला तर तो एकरेषीय ठरेल. सत्य हे एकरेषीय नसून गोलाकार आहे. म्हणूनच आपण म्हणत असतो हे पण खरे आहे आणि ते पण खरे आहे. आपण कुठे हि पाहिले तर आपल्याला त्याचे उगम स्थान दिसेल. तुम्ही या बाजूने पाहिले तर तुम्हाला सत्य दिसेल, तुम्ही कुठल्याही बाजूने पाहिले तरी तुम्हाला सत्यच दिसेल. तुम्ही कुठून सुरुवात करता आणि कुठे जाता याच्यावर ते अवलंबून आहे. भगवान शिव आणि भगवान विष्णू वेगळे आहेत, पण ते एकच आहेत. प्रश्न: अष्टवक्र गीते मध्ये असे म्हटले आहे, “तुम्ही धर्म ग्रंथ वाचत रहा, पण तुम्हाला मुक्ती ही धर्मग्रंथ बाबतचे विचार सोडल्यावर मिळेल’. मग धर्मग्रंथ वाचून काय उपयोग? श्री श्री : हे पहा, तुम्ही ज्या वेळेस एका बस मध्ये बसता काही काळाने तुम्हाला ती बस सोडावीच लागते. तुम्ही जर माझ्याबरोबर वाद सुरु केला कि, “ मला जर बस सोडायची असेल तर मी बस मध्ये कशाला बसू?” तुम्ही बस मध्ये एका ठिकाणाहून बसता आणि कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी उतरता. जर तुम्हाला बस मधून उतरायचे असेल तर तुम्ही बस मध्ये चढता कशाला, ह्या वादाला काही अर्थ नाही. धर्मग्रंथ तुम्हाला तुमच्या स्वभावाची ओळख करून देतात, या सृष्टीची ओळख करून देतात, तुमच्या मनाची ओळख करून देतात कि जे छोट्या छोट्या इच्छा मध्ये अडकलेले आहे आणि तुम्हाला जीवनाकडे बघण्याचा एक मोठा दृष्टीकोन देतात. ज्ञान हे साबणा सारखे आहे. पहा, तुम्ही शरीराला साबण लावता पण काही वेळाने तुम्ही ते धुवून टाकता, हो कि नाही?! त्याचप्रमाणे, ‘मला मुक्ती पाहिजे’ ही तुमची इच्छा असते आणि या इच्छेमुळे तुम्ही बाकीच्या छोट्या इच्छा पासून दुरावले जाता. जर तुम्ही त्याच इच्छेला धरून राहिलात तर कालांतराने ती पण एक मोठी समस्या होईल. तुम्ही त्याचा त्याग करून मुक्त झाले पाहिजे. ‘मला मुक्ती पाहिजे, मला मुक्ती पाहिजे, मला मुक्ती पाहिजे’, असे म्हणत राहिल्याने मुक्ती मिळत नाही. तुम्ही जर छोट्या इच्छे पासून मुक्त असाल तर ती इच्छा आवश्यक आहे. मग एक असा क्षण येईल तुम्ही म्हणाल, ‘ मला जर मुक्ती मिळायची असेल तर ती मिळून जाईल’. त्या क्षणी तुम्ही मुक्त असाल. प्रश्न: गुरुदेव, महालय अमावस्येचे महत्व काय आहे? श्री श्री : हि अमावस्या तसे पाहता मृत आत्म्यांसाठी राखीव आहे. तुमचा आत्मा ज्यावेळेस हे शरीर सोडतो त्यावेळेस काही देवदूत त्याला दुसऱ्या जगात जाण्याचा मार्ग दाखवितात. पुरुरावा, विश्वेदेवा हि त्यांची नावे. ते येतात आणि तुम्हाला एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर जाण्यास मदत करतात. महालय अमावस्या म्हणजे सर्व मृत आत्म्यांना स्मरण करून त्यांचे आभार मानून, त्यांच्या आत्म्यांना शांती लाभो हि प्रार्थना करणे. एक पूर्वीची प्रथा आहे ज्यामध्ये कुटुंबातील लोक तीळ आणि तांदूळ घेतात आणि आपल्या पूर्वजांना स्मरण करून ते म्हणतात, ‘ तुमच्या आत्म्याला शांती लाभो, तुमच्या आत्म्याला शांती लाभो, तुमच्या आत्म्याला शांती लाभो ‘. असे तीन वेळा म्हणून ते तीळ पाण्यात सोडतात. या विधीचे महत्व म्हणजे कि आपण जणू काही पूर्वजांच्या आत्म्याला सांगतो कि – तुमच्या मनात अजूनहि काही इच्छा असतील तर त्या या तीळ सारख्या आहेत. त्या इच्छा महत्वाच्या नाहीत, तुम्ही त्या विसरून जा. तुमच्यासाठी आम्ही त्याची काळजी घेवू. तुम्ही आनंदी रहा, तृप्त व्हा! तुमच्या पुढे सर्व सृष्टी आहे. हि सृष्टी अनंत आहे, तुम्ही पुढे जात रहा; तुमच्या सर्व इच्छा विसरून जा. यालाच तर्पण असे म्हणतात. तर्पण म्हणजे पूर्वजांच्या आत्म्यांना कृतार्थता दर्शविणे आणि समाधान करणे. तुम्ही तृप्त रहा आणि पुढे जात रहा हे सांगण्यासाठी हे केले जाते. पाणी हे प्रेमाचे प्रतिक आहे. पाणी देणे म्हणजे प्रेम देण्यासारखे आहे. संस्कृत मध्ये अप म्हणजे पाणी आणि प्रेम सुद्धा होतो. आपल्या प्रिय व्यक्तींना संस्कृत मध्ये आप्त असे संबोधले जाते. म्हणून त्यांना स्मरून तुम्ही त्यांना पाणी देता जे प्रेमाचे आणि जीवनाचे प्रतिक आहे म्हणूनच त्याला महालय अमावस्या म्हटले जाते. या दिवशी तुम्ही तुमच्या पूर्वजांचे स्मरण करा. वेदिक परंपरेनुसार, मातापित्याचे तीन पिढ्यांपर्यंत स्मरण केले जाते आणि आपले सर्व आप्त मित्र, नातेवाईक आणि सर्व जे आपल्याला सोडून गेले आहेत. त्यांना स्मरण करून त्यांना विनंती केली जाते कि तुम्ही तृप्त आणि समाधानी रहा. त्यांच्या स्मरणार्थ काहीजण अन्नदान करतात. हे जगातील सर्व संस्कृती मध्ये केले जाते. मेक्सिको ची जनता हे मानते हे पाहून मला आश्चर्य वाटले. मेक्सिको मधील जनता प्रत्येक वर्षी २ नोव्हेंबर ला आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात. त्याचप्रमाणे हे चीन मध्ये हि मानतात. चायनीज संस्कृती मध्ये एक दिवस असा असतो ज्या दिवशी ते आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना जे काही प्रिय आहे ते त्यांना अर्पण करतात. सिंगापूर मध्येही हे मानले जाते. जरी सिंगापूर हे स्वच्छ शहर असले तरी वर्षातून एकदा काही तासांसाठी ते अस्वच्छ असते कारण तेथील जनता रस्त्यांवरच हे कार्य करतात. तुम्हाला माहीत आहे ते काय करतात? ते कार्ड बोर्ड चे मोठे घर आणि गाड्या बनवितात आणि ते रस्त्यांवरच जाळतात, ते सर्व पुर्वजांपर्यंत पोहचेल असे ते मानतात. ते खोटे मुद्रांक विकत घेतात आणि ते जाळतात, ते असे मानतात कि हे सर्व पुर्वजांपर्यंत पोहचले कि ते त्यांना आशिर्वाद देतात. पिढ्यानपिढ्या जगात सर्वत्र हे मानत आले आहेत. ख्रिस्ती धर्मात सुद्धा All Saints’ Day म्हणून एक दिवस असतो ज्या दिवशी सर्व आपल्या पुर्वजांचे स्मरण करतात. या दिवशी ते स्मशान भूमीत जावून प्रार्थना करतात. या प्रार्थने मुळे आपल्याला सुद्धा कळते कि हे जीवन अस्थायी आहे, हे सर्व जण कितेक वर्षे इथे राहिले आहेत आणि आपल्याला सोडून गेले. आपण या जगात आलो आहोत आणि एक दिवस आपणही हे सर्व सोडून जाणार आहोत. म्हणून आपण त्यांचे स्मरण करून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना करतो. भारता मध्ये ह्या रुढीसाठीचे मंत्र संस्कृत मध्ये आहेत त्यामुळे आपल्याला ते कळत नाही. पंडित जे सांगतील ते आपण विश्वासाने करतो. हे चुकीचे नाही पण जर त्या विषयी ज्ञान असणे आवश्यक आहे. प्रश्न: गुरुदेव, मातापिता किंवा पूर्वज यांच्या कर्माचा आपल्यावर काही प्रभाव होतो का? त्यांच्या वाईट कर्मामुळे आपल्याला शिक्षा होते का? श्री श्री : ऐका, जर तुमचे पूर्वज तुमच्यासाठी घर ठेवून गेले असतील तर ते तुमच्या साठी वरदानच आहे नाही का? तुम्ही असे प्रश्न का विचारत आहात? त्यांनी कष्ट करून पैसे मिळविले, त्यातून घर बांधले आणि तुमच्या साठी मागे ठेवून गेले. तुम्ही त्यांच्या चांगल्या कर्माचे उपभोग घेत आहात. हो कि नाही? आणि त्यांनी जर का तुमच्या डोक्यावर बँकेचे कर्ज ठेवून गेले असतील ज्याची तुम्हाला परत फेड करायची असेल तर ते तुमचे कर्म आहे. त्याचा साहजिकच तुमच्यावर परिणाम होईल. आई वडीलच नाही तर तुमच्या साथ संगतीचा पण तुमच्यावर परिणाम होतो. तुमची संगत जर उदास व्यक्तींची असेल तर तुम्हाला पण उदास वाटेल. पण तुमची संगत जर आनंदी आणि अध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या व्यक्तींची असेल तर तुमचे कर्म सुधारेल. या जगात चांगल्या किंवा वाईट कर्मापासून तुमची सुटका नाही. ते आपल्या बरोबर राहणार आहे, कारण एक वेळ अशी येईल कि आपल्याला आजारी व्यक्तींशी संपर्क साधावा लागेल. त्यावेळी तुम्ही असे म्हणू शकत नाही कि मला यांच्याशी बोलायचे नाही. जर असे सर्वानीच ठरविले तर सर्व रुग्ण आणि रुग्णालयाचे काय होईल? या जगात आपण सर्वाशी चांगला व्यवहार केला पाहिजे त्यासाठी ज्ञान घेतले पाहिजे आणि सेवा केली पाहिजे. म्हणूनच ज्ञान आणि सेवा यांना कवच म्हटले आहे. ओम नम: शिवाय हा मंत्र जप केल्याने आपल्या भोवती चिलखत असल्यासारखे वाटते, म्हणून या मंत्राला कवच असे म्हटले आहे. तो आपल्याला वाईट कर्मापासून वाचवितो, पण हा मंत्र २४ तास जाप करण्याची गरज नाही. जर तसे तुम्ही केले तर तुम्हाला कंटाळा येईल. दिवसातील काही मिनिटे, जसे तुम्ही दात घासता. तुम्ही तुमचे दात प्रत्येक तासाला घासत नाही, हो कि नाही? जर तसे कोणी करत असेल तर त्याचे दात राहणार नाही, सर्व दात पडून जातील. आणि जर का तुम्ही दात घासलेच नाही तरी देखील ते पडून जातील. ज्या प्रमाणे आपण आपल्या दातांचे आरोग्य जपतो त्याचप्रमाणे आपण आपले मानसिक आरोग्य जपले पाहिजे. थोडा वेळ ध्यान, मंत्रोपचार याची खूप मदत होते. आपण अंघोळ थोड्यावेळच करतो, हो कि नाही? सर्वानी पाणी वाचविले पाहिजे. जगात सर्वत्र पाण्याची फार कमतरता आहे, बंगलोर मध्ये सुद्धा. सर्व तळे सुके पडले आहेत आणि या वर्षी पाणी कमी आहे. म्हणून आपण सर्वानी पाणी जपून वापरावे. जितके जरुरी आहे तेवढेच वापरा. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'