आंतरिक अग्नी

23
2012
Oct
बंगलोर, भारत
(सत्संगाची सुरुवात ही संपूर्ण जगातील अनुयायांनी त्यांच्या राष्ट्रीय भाषेमध्ये श्लोक आणि गीत गायनाने झाली. विविध देशांमधून आणि भारताच्या संपूर्ण प्रांतांमधून आलेला तऱ्हेतऱ्हेचा जमाव हा संगीत आणि गायनाने एकत्र झाला होता.) 

संपूर्ण जगाने एकजूट होणे - हेच नवरात्रीचे चैतन्य आहे.

प्राचीन काळी प्रत्येक व्यक्ती ही नीरनिराळ्या वेदात, ज्ञानाच्या एका शाखेत पारंगत असे, आणि नवरात्रीत सगळे जमत असत आणि मग प्रत्येक जण ज्ञानात, नृत्यात, संस्कृती आणि सगळ्यात भाग घेत असत. आम्ही ठेवलेले बासरी वादन,तार वाद्ये,तबला,पखवाज, आणि गायन परवा तुम्ही बघितले असेल.

विश्वामध्ये वैवध्य आहे आणि ती विविधता एकजुटते ती एक चैतन्य;एक वैश्विक चेतना म्हणजेच दैवी चैतन्य (देव)सगळ्यामध्ये आहे या ज्ञानाने. तुम्ही देवाला घाबरू नका कारण तो आईप्रमाणे तुमची काळजी घेतो, तुमच्यावर माया करतो, त्याला तुमचे कौतुक आहे आणि तो तुमची उन्नती करतो. मातृत्वाचे सर्व गुण देवामध्ये उपस्थित आहेत.

आपण नेहमी म्हणतो,'देवाची भीती ठेवा, तुम्हाला शिक्षा द्यायला देव आहे', नाही! ही चुकीची कल्पना आहे. देव तुम्हाला कधीच शासन करणार नाही तर तो तुम्हाला शिकवेल आणि तुमची उन्नती करेल.

आपण जीवनोत्सव साजरा केला पाहिजे.

'ला-इल्लाह-इलल्लाह'- केवळ एकच दैवत्व आहे, असे आपण आत्ताच गाणे ऐकले आणि ते दैवत्व वर कुठेतरी स्वर्गामध्ये नाही,ते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वांमध्ये आहे.

म्हणून पृथ्वीचा मान ठेवा, पाण्याचा मान ठेवा आणि अग्नीचा योग्य वापर करा. केवळ बाह्य अग्नी नव्हे तर तुमच्या आतील अग्नीचासुद्धा योग्य वापर करा.

प्रत्येकाच्या आत एक आग आहे, एक उत्कटता आहे, त्याला योग्य दिशा द्या.

तुम्हाला माहिती आहे, आग ही विध्वंस करते आणि आग ही नवनिर्माणसुद्धा करते, म्हणून तुमच्या आत असलेल्या अग्नीला काहीतरी निर्माण करण्यासाठी परवानगी द्या. तुमच्या आत असलेल्या अग्नीला (उत्कटतेला) एक दिशा द्या.

दिव्य माता, पंचतत्वांमध्ये आणि स्वयंमध्ये असलेली दिव्यता लक्षात ठेवा. स्वयंमध्ये शांतपणे आणि सहजपणे परतणे हाच खरा उत्सव आहे.

देव माझ्यावर अतिशय प्रेम करतो - असा आपल्यामध्ये अत्माविशास असला पाहिजे. कसलेही प्रश्न नाहीत आणि कोणत्याही शंकाकुशंका नाही!

तसेच स्वतःची तुलना दुसऱ्यांबरोबर करू नका, हेसुद्धा फार महत्वाचे आहे.

'अरे,ती व्यक्ती गाऊ शकते, मी नाही', 'ती व्यक्ती बुद्धिमान आहे पण मी नाही', असे चालणार नाही!

सगळे काही तुमच्या आत आहे. परिस्थितीनुसार निरनिराळ्या गोष्टी बाहेर येतील, तुम्ही केवळ धीर धरा.

दुसरे म्हणजे असे की आपल्याला आशीर्वाद आणि कृपा पाहिजे असते, हो ना?! आशीर्वाद मुबलक आहेत, परंतु जर तुमचे भांडेच छोटेसे असेल, तर कोण काय करणार?

जर ही वाटी घेऊन आलात (गुरुदेव एक अगदी छोटी वाटी उचलतात), आणि म्हणालात,'मला यामध्ये दोन लिटर दुध द्या', तर दोन लिटर दुध या छोट्याश्या वाटीत कसे मावेल? तुमची वाटी छोटी आहे आणि तुम्ही त्याच्या कितीतरी पटीने जास्त मागत आहात.

तुम्ही तीन लिटर क्षमता असलेले भांडे आणणे जरुरी आहे आणि मग मी तुम्हाला दोन लिटर किंवा तीन लिटर,तुम्हाला जितके पाहिजे तितके देऊ शकतो.

म्हणून लक्षात ठेवा की तुम्हाला जे मिळाले आहे ते तुमच्या क्षमतेनुसार मिळाले आहे, आणि जर तुम्हाला अजून पाहिजे असेल तर थांब ; तुमची क्षमता वाढवा. 

जेव्हा आपली क्षमता वाढते तेव्हा अजून जास्त नक्कीच आपल्या वाट्याला येते.

या कारणामुळेच लोक उदास असतात. ते छोटी वाटी घेऊन जातात आणि म्हणतात, 'यात मला एक लिटर दुध द्या'.

म्हणूनच आपल्याला हे माहिती असले पाहिजे.

हे पहा,जीवनात तुमच्या वाट्याला कटकटी येतात. 'अरे,हा माणूस काही कामाचा नाही', 'मी या लोकांबरोबर राहू शकत नाही,ते माझा अपमान करतात', असे विचार तुमच्या मनात येतात, आणि जेव्हा तुम्ही ध्यान करायला बसता तेव्हा या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला त्रास व्हायला लागतो. हो ना?

हात वर करून मला प्रामाणिकपणे सांगा,जेव्हा तुम्ही ध्यान करायला बसता तेव्हा या सगळ्याचा नाही का विचार करत- 'अरे,माझ्या नवऱ्याने असे केले तर बरे होईल', 'अरे,माझा मुलगा माझे ऐकत नाही'. शेजाऱ्यांचे, मित्र-मैत्रिणींचे, ओळखीच्या आणि अनोळखी लोकांचे विचार, सगळ्या बारीकसारीक कटकटी मनात येतात आणि त्यामुळे तुम्हाला संताप, हताशपणा आणि चिडचिड हे सर्व होते. तर मग अशी चिडचिड कश्याप्रकारे हाताळावी? 

समजा तुम्ही काही महत्वाचे काम करीत आहात आणि एक माशी येऊन तुमच्यावर बसली तर तुम्ही त्या माशीमुळे फार अस्वस्थ व्हाल का? नाही, एक साध्या क्षुल्लक माशीमुळे तुम्हाला काहीही फरक पडणार नाही, तुम्ही त्या माशीला हलकेच उडवून लावाल.

या सगळ्या गोष्टी त्याचप्रमाणे आहेत हे लक्षात घ्या.

ह्या लहानसहान कटकटी तुमच्यामध्ये स्वीकृती आणण्याचे काम करतात. चिडचिड म्हणजे अस्वीकार. अस्वीकार म्हणजे घट्ट आवळून धरलेली मुठ. स्वीकार करणे म्हणजे मुठ उघडणे होय.

चिडचिड म्हणजे ताठरता. तुम्ही जेव्हा चिडता तेव्हा तुम्हाला एकप्रकारची ताठरता नाही का जाणवत?

स्वीकारणे म्हणजे उघडणे, आणि जेव्हा तुम्ही तुमचा हात उघडता तेव्हा तुम्हाला आकाशसुद्धा ठेंगणे पडेल;सर्वकाही तुमच्यात आहे ( स्वतःच्या उघड्या हाताकडे निर्देश करतात). परंतु जेव्हा तुम्ही बंद असता (स्वतःच्या बंद मुठीकडे निर्देश करीत) तेव्हा त्यामध्ये काहीसुद्धा नसते.

म्हणून सोडून देणे महत्वाचे आहे.

'मी जर सोडून दिले तर मी कृती कशी काय करणार?' असा आता प्रश्न उपस्थित होईल. 

कोणी जर अन्याय करीत असेल आणि तुम्ही विचार कराल,' अरे, गुरुदेव स्वीकार करा असे म्हणाले आहेत, आणि म्हणून मी स्वीकार करतो'. चालणार नाही!

हे पहा, अग्नी आहे परंतु तुम्ही त्याला योग्य दिशा दिली पाहिजे.

चिडून काही कृती केल्याने मदत होणार नाही. सर्वप्रथम स्वीकार करा आणि मग नंतर योग्य कृती करा.

याकरिता भरपूर हिम्मत आणि धीरतेची गरज आहे.

अपमानित होणे ही अजून एक समस्या आहे.

मी तुम्हाला सांगतो की अपमान होणे फार चांगले आहे. अपमानामुळे तुमची क्षमता वाढते; त्यामुळे तुमचे भांडे अजून मोठे होते. अपमानामुळेच मी विरघळून जातो, तो अहंला पळवून लावतो आणि तुम्ही एका बालकाप्रमाणे होता.

तुम्हाला माहिती आहे की तुम्ही लहान बालकाला अपमानित करू शकत नाही कारण लहान मुल हे पोकळ आणि रिकामे असते! परंतु जेव्हा आपण कोणीतरी बनतो,तेव्हा आपण आपल्याबद्दलच्या काही कल्पनांना घट्ट कवटाळून बसतो आणि मग आपल्याला वाटते ,'अरे हा तर अपमान आहे.'

कोणीतरी म्हणाले,'येऊ नको' ,किंवा 'असे करू नको', आणि या बारीकसारीक गोष्टींचा तुम्हाला त्रास होऊ लागतो.

म्हणूनच तर याला माया असे म्हटले आहे कारण या सर्व गोष्टी लक्ष देण्याच्या लायकीच्या नसतात, मन त्यात गुंतून पडते.

आणि जेव्हा तुम्ही म्हणता,' हेसुद्धा माझे नाहीये', तेव्हा ती महामाया असते; हा एक दैवी खेळ आहे. कारण तुम्ही मग त्याच्या सोबत लढू लागता, आणि लढल्यामुळे ते अजून वाढते. 'इकडे आड तिकडे विहीर', अशी ही परिस्थिती होते. तुम्ही यात अजून खोलवर अडकत जाता. 

म्हणून तुम्ही अपमानापासून लाजू नका. जर अपमान झाला तर तो तपसचा एक प्रकार समजा. (तपस म्हणजे ताप. हिंदुत्वामध्ये याला उपमेच्या दृष्टीने वापरले आहे. त्याचा अर्थ अध्यात्मीक कष्ट, शिक्षा किंवा अनुशासन होय)

'ठीक आहे हे तपस आहे. मी हे सहन करेन. मी याचा स्वीकार करतो'.

तपस तुम्हाला अधिक बलवान आणि अधिक सुंदर बनवते.

'ज्ञानमपी चेतनसी देवी भगवती हि सा,बलदक्रीशय मोहय महामाया प्रयछती' असे म्हणूनच म्हंटले आहे.

दुर्गा सप्तशती जी आपण काल गायलो त्यात हेच लिहिले आहे.

मायेची आणि अज्ञानाची शक्ती इतकी जास्त आहे की सर्वात शहाणे लोक आणि महान बुद्धिवान लोकसुद्धा तिच्या तावडीतून वाचू शकत नाही. ती सर्वाना नाचवते आणि असे म्हंटले आहे,'हे माझ्या प्रिय जगन्माते, तू आम्हाला या मनाच्या भ्रमाच्या खेळत खेळवत आहेस'. 

आपण क्षुल्लक गोष्टीना अतिशय महत्व देतो. आपण क्षणभंगुर आणि नश्वर गोष्टी ज्या राहणार नाहीत अशा गोष्टीना महत्व देतो. त्या सर्व गोष्टी संपून जातात आणि निघून जातात. म्हणूनच त्याला महामाया म्हटले आहे.

तुम्हाला माहिती आहे काल मी म्हणालो, ' या देवी सर्व भुतेशु भ्रांतीरूपेणसंस्थिता नमसतस्येनमो नमः' चैतन्य हे केवळ शांती रुपात किंवा शक्ती रुपात उपस्थित नाहीये तर ते भ्रमरुपात सुद्धा उपस्थित आहे. ते भूक , द्वंद , भ्रम यातदेखील हजर आहे आणि ही सर्व त्याचीच रूपे आहेत. जेव्हा तुमच्या हे लक्षात येते तेव्हा तुम्ही मनाच्या खेळाकडे बघून हसता.

आणि मग आता जेव्हा तुमचे कोते मन खेळ करू लागते तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर एकरूप होत नाही,तुम्ही त्याच्या पलीकडे जाता आणि तिथेच तुम्हाला मिळते चिरशांती (कायमची शांतता). मन संपूर्णपणे शांत असते आणि अविचलीत असते.

हे जीवनात असण्यायोग्य आहे, आणि केवळ यासाठीच या सर्व आशीर्वादांची आवशक्यता आहे.

आज आपण ॠषी होम केला. कित्येक युगांपासून भूतकाळातील संतांनी हे ज्ञान जपून ठेवले आहे.

परंपरेनुसार ॠषी पराशर (ॠग वेद काळातील महर्षी आणि अनेक प्राचीन भारतीय लेखांचे लेखक) यांची तर या सर्व पूजा ही खासियत होती.

गुरु पूजेमध्ये आपण नारायणं पद्म भावं वशिष्ठं शक्तिं च तत पुत्र पराशरं च असे म्हणतो. 

ॠषी पराशर  हे संत परंपरेतील पाचवे संत आहेत. त्यांनी पुजांद्वारा प्रेम आणि भक्ती व्यक्त करणे यावर जास्त भर दिला-पूजादिषु अनुराग इति परशराय.

आजसुद्धा आयुध पूजा केली जाते. ती करण्यामागचे कारण असे की आपण वापरत असलेल्या सर्व यंत्रांचा बहुमान करायचा.

जर तुम्ही उद्या शहरात गेलात तर तुम्हाला दिसेल की सगळ्या बसेसना चंदनाचे गंध,हळद कुंकू आणि फुले लावलेले दिसेल. लोक आपापल्या गाड्यांना सजवतील.

याचा अर्थ असा की बारीक टाचणी असो वा मोठा खांब सर्व ठिकाणी देवाचा वास आहे आणि म्हणून सगळ्या यंत्रांचा बहुमान केला जातो. पिना,चाकू,कात्री,स्क्रू ड्रायव्हर,पान्हा, आणि अशासारख्या छोट्या वस्तू यांचे पूजन केले जाते आणि असे म्हंटले जाते की जगन्मातेचा वास या सर्व वस्तूंमध्ये आहे आणि म्हणून आपण त्यांचे पूजन केले पाहिजे. तुम्ही बघाल की वर्षातून एकदा कारखान्यातील सगळ्या यंत्रांची साफसफाई केली जाते. लोक आज यंत्रांचा बहुमान करून यंत्रे,गाड्या,बसेस आणि सगळ्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतील कारण दिव्यता सगळीकडे सगळ्यांमध्ये आहे.

आयुध पूजा  ही नवरात्रीच्या नवव्या दिवशी केली जाते.

उद्या विजयादशमी , विजयाचा दिवस आहे.

म्हणून जेव्हा माया मनाचा ताबा घेते तेव्हा ही केवळ मनाची माया आहे असे जागरूक व्हा. हे तर केवळ मन आहे जे गोल गोल फिरत आहे आणि या सगळ्या गोष्टी करत आहे. फक्त ते सोडून द्या. नवरात्रीचा हाच तर मुख्य संदेश आहे.