02
2012
Oct
|
बंगलोर
|
प्रश्न: गुरुदेव, देवाचा अध्यात्माशी काय संबंध? मी देवावर विश्वास न ठेवता आध्यात्मिक होऊ शकतो काय?
श्री श्री: होय ! तुम्हाला हे माहित आहे काय कि सहा दर्शनापैकी ( भारतीय तत्वज्ञानाच्या विचारसरणी) , पहिले तीन दर्शन हे देवाचा उल्लेख पण करीत नाहीत – ती म्हणजे न्याय, वैशेशिका, आणि सांख्य. गौतम महर्षींचे न्याय दर्शन हे ज्ञानावर भर देते, तुमचे ज्ञान बरोबर आहे कि नाही या वर भर देते. उदाहरणार्थ, तुमच्या जाणीवेतून तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्त बघू शकता. पण न्याय दर्शन असे सांगते कि “ तुम्ही जे बघितलेत फक्त त्यावर विश्वास ना ठेवता खरोखरच सूर्योदय होतोय कि पृथ्वी फिरत आहे ते शोधून काढा.” कोपर्निकसने पृथ्वी सूर्याभोवती फिरते याचा शोध लावला असे आपण समजतो, पण ते योग्य नाही. त्याने ते शोधून काढले यात काही वाद नाही, पण त्याच्या कितीतरी आधी भारतातील लोकांना हे माहित होते कि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे असे सर्व न्याय दर्शनात सांगितले आहे. ते अनुभव, अनुभूती आणि त्यातील सुधारणा याविषयी सांगते. आणि त्यानंतरचे वैशेशिका दर्शन हे या जगातील पृथ्वी, पाणी, अग्नी, हवा, वातावरण अशा या भूतलावरील नानाविध वस्तू आणि विषय यांचे विश्लेषण करते. अशा या वैशेशिका दर्शनमध्ये मन , चेतना, बुद्धी, स्मृती अशा गोष्टीविषयी माहिती आहे. त्या नंतर येते ते सांख्य दर्शन. या तिन्ही दर्शनात देवाचा उल्लेख नाहीये, पण ते चेतनेविषयी बोलतात. पण चौथ्या दर्शनात म्हणजे योग सूत्रामध्ये देव हा एक विषय आहे. म्हणून तुम्हाला देवावर विश्वास असलाच पाहिजे अशी जबरदस्ती नाही, पण तुम्ही कोणावर तर विश्वास ठेवायला पाहिजे. अगदीच काही नाही तर तुम्ही तुमच्या चेतनेवर विश्वास ठेवायला पाहिजे. जेंव्हा आपण देव या संकल्पनेबद्धल विचार करतो तेंव्हा साधारण पणे असा विचार केला जातो कि देव म्हणजे उंच आकाशात , स्वर्गात बसलेली अशी एक व्यक्ती कि ज्याने हि सर्व सृष्टी तयार केली आहे आणि मग स्वर्गात बसून सर्वांचे दोष शोधायला सुरवात केली आहे. तुम्ही काहीही केले तरी ते हातात एक काठी घेऊन तुम्हाला शिक्षा करायला बसले आहेत. पण आपण अशा प्रकारच्या देवाविषयी कधीच सांगितले नाही. हे सर्व जग हे प्रेम या संकल्पनेने तयार झाले आहे आणि तोच देव आहे. तुम्ही काही देवापासून वेगळे नाही. देव या संकल्पनेच्या बाहेर काहीही नसून, हे सर्व त्या संकल्पनेतच सामावलेले आहे. ते सर्व चांगले, वाईट, बरोबर, चूक या सर्वांच्या पलीकडले आहे. सुखद, दुखद यातही काही अर्थ नाहीये. जी एकच गोष्ट अस्तित्वात आहे , आणि त्याला जर काही नाव द्यायचे झाले तर तुम्ही त्याला देव म्हणू शकता, अगदीच तो पण विचार करायचा नसेल तर स्वतःला समजून घ्या. प्रश्न: गुरुदेव, चालू आठवडा हा आर्ट ऑफ लिविंग तर्फे महात्मा गांधी जयंती निमित्त “शांती आणि आरोग्य” म्हणून साजरा केला जात आहे. या संधर्भात आपण “शांती आणि आरोग्य” यांच्यातील परस्पर संबंधांविषयी काही बोलाल काय? श्री श्री : हे साहजिकच आहे कि जर तुम्ही आरोग्यपूर्ण असाल तर तुम्ही शांतीप्रिय असता. आरोग्यातून शांती उदयाला येते. तुम्ही जर शांत, समाधानी नसाल तर तुम्ही स्वतःला आरोग्यपूर्ण म्हणणार नाही. जेंव्हा मन अशांत असते, तेंव्हा शरीर पण अशांत असते. आजारीपण हे नुसते शारीरिक नसते, तर ते मानसिक असू शकते, ते तुमच्या बुद्धीत असू शकते, तो तुमच्या बुद्धीचा संकोच असू शकतो, तुमच्या आत्म्याचा उदासपणा असू शकतो- या सर्व गोष्टी आजारपणात मोडतात. म्हणूनच “स्वास्थ्य” या शब्दाला खूप महत्व आहे. तुम्ही जर बालीला गेलात तर ते तुमचे स्वागत “ ओम् स्वस्ति रस्तु” म्हणून करतात. हे तुम्हाला “अभिनंदन” किंवा “नमस्ते” म्हणण्यासारखे आहे. बालीत ते तुम्हाला “ ओम् स्वस्ति रस्तु” म्हणतील, म्हणजे तुम्ही तुमच्यात स्थापित व्हा. तुम्ही जेंव्हा तुमच्यात स्थापित होता तेंव्हा तुम्ही शांतीपूर्ण असता, तुमच्यात कोणताही संकोच नसतो, तुमच्यात कोणतीही नकारात्मक भावना नसून तुमचे मन स्वच्छ असते, आणि मग तुमचे शरीर स्वस्थ असते. या सर्वांसाठी “स्वस्थ” असा संस्कृत शब्द आहे. प्रश्न: आर्ट ऑफ लिविंग मध्ये आल्यापासून माझे कोणतेही काम असेल तरी ते होणारच असा विश्वास निर्माण झाला आहे. पण केंव्हा तरी ते तसे होत नाही. असे का होते? श्री श्री : होय, कधी असे होते. तेंव्हा असे लक्षात घ्या कि त्यापेक्षा चांगले असे काहीतरी घडणार आहे. असे पहा कि आयुष्यात सुख आणि दुखः, चढ आणि उतार, आदर सत्कार आणि अपमान, हे सर्व होतच असते. पण या सर्व गदारोळात समभाव ठेवणे फार गरजेचे असते. आयुष्यातील कठीण काळच सांगू शकतो कि तुम्ही किती समतोल आहात ते. जेंव्हा सर्व काही व्यवस्थित चालू असते तेंव्हा तुम्ही असे म्हणालात कि “ माझ्यात खूप विश्वास आणि भक्ती आहे” तर त्यात काही मोठेपणा नाही. पण जर जेंव्हा सर्व गोष्टी व्यवस्थित चालू नसतात आणि तेंव्हा जर तुम्ही तुमच्यातील भक्ती आणि विश्वास जागृत असेल तरच ती खरी श्रद्धा होय. प्रकृती कि तुमच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण करते कि जेंव्हा तुमच्या श्रद्धेची कसोटी लागते, पण त्याही परिस्थितीत जर तुमची श्रद्धा अढळ राहिली तरच तुम्ही खरे समतोल आणि मग सारे काही सुरळीत होईल. हा तर निसर्गाचा नियमच आहे. प्रश्न: माझ्यात सकारात्मक गुणांची वाढ होण्यासाठी मी काय करावे? श्री श्री : साधना आणि सेवा हे सकारात्मक गुणांची वाद होण्यास उपयुक्त ठरतात. आणि जर सेवा करतांना लोकांनी तुम्हाला दुषणे दिली तर ते फक्त ऐकून घ्या. त्यांना सांगा “ द्या , देता येतील तेवढी दुषणे द्या.” असे पहा कि जेंव्हा दुषणे घ्यायची तुमची तयारी होते तेंव्हा सकारात्मक गुण फुलायला सुरवात होते. पण जर तुम्ही त्यांना म्हणालात कि “ तुम्ही असे कसे बोलू शकता, मला दुषणे देऊ नका” आणि जर त्याचा प्रतिकार केलात तर मात्र सकारात्मक गुण फुलणे कठीण होते. म्हणून साधना करा आणि ध्यान करा. जेंव्हा आपण अशा क्रियांमध्ये व्यग्र असतो, चेतना जागृत होऊन सर्व सकारात्मक गुण वाढीस लागतात. प्रश्न: गुरुदेव, अब्जावधी लोकांचे आदर्श असताना तुम्हाला कसे वाटतेय? श्री श्री : पोकळ आणि रिकामे, पण त्याचवेळी अत्यंत परिपूर्ण. प्रश्न: उपनयानाम सभेत बोलताना तुम्ही आम्हाला ब्राह्मयाग्न म्हणजेच चार वेदातील चार मंत्राबद्धल सांगितलेत. या मंत्रांचे अर्थ कृपा करून सांगाल काय? श्री श्री : या मंत्रातील कंपने त्याच्या अर्थापेक्षा जास्त महत्वाची आहेत. हे मंत्र ऋषी मुनींनी अधिग्रहण करून लोकांना सोपविले आहेत. याचा अर्थ असा कि ते त्या कंपनाद्वारे त्यांच्या पर्यंत पोहोचले असून ते काही त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेने लिहून काढलेले नाहीत. हे मंत्र सहज ज्ञानयुक्त शुद्ध चेतनेच्या पासून निर्माण झाले आहेत. असे पहा कि एके ठिकाणी बसून चार शब्द एकमेकाला जोडून, त्यापासून काही अर्थ शोधणे हि एक वेगळी गोष्ट होय. पण कवितेसारखी, जर आतून काही सहज ज्ञान होत असेल तर पुढील पिढ्यांसाठी त्याचा विस्तार करता येईल. आणि जेंव्हा प्रत्येक वेळी त्यातून काही वेगळा अर्थ येत असेल तर त्यांना मंत्र म्हणतात. मन्नतात त्रयते इति मंत्रात- जेंव्हा तुम्ही त्याचा पुनरुच्चार करताना तुम्हाला एक वेगळी उर्जा मिळते असे हे मंत्र. या मंत्रांना निश्चितच काही अर्थ आहे, पण तो अर्थ हे हिमनगाचे एक टोक झाले. मंत्रात अर्थ नव्हे तर कंपने महत्वाची असतात. प्रश्न: जेंव्हा आपण गायत्री मंत्र म्हणतो, तेंव्हा त्याचा किती जप झाला हे महत्वाचे असते का? जर का तो थोडा कमी किंवा जास्त झाला तर चालते , कि त्याचे काही वाईट परिणाम होतात का फक्त ते म्हणण्याच्या मागची भावना महत्वाची आहे. श्री श्री : भावनाभारित पठणाला जास्त महत्व आहे. कमी जास्त झाले तर काही शिक्षा नाही. तुम्हाला जर तसे कोणी म्हणाले तर मी तुमचा वकील व्हायला तयार आहे. अनेक विद्वान लोक असे गैरसमज पसरवितात कि काही विपरीत घडेल, स्त्रिया गायत्री मंत्र म्हणू शकत नाहीत. हे सर्व चुकीचे आहे, कारण असे काही नसते. प्रेमाने त्याचे पठन करावे केवळ भीती पोटी नव्हे. प्रश्न: मी कितीही निश्चय केला तरी, नकारात्मक विचार माझ्या मनात येताच राहतात.मी काय करू? श्री श्री : तुम्ही जर त्यांना अडवत राहिलात, विरोध करू लागलात, त्यांना दूर घालवायला लागलात तर ते भूतासारखे तुमच्या मागे लागतील. त्यांच्याशी हस्तांदोलन करा, त्यांना तुमच्या जवळ बोलवा आणि बसवून घ्या आणि सांगा कि तुम्ही त्यांना कधीच सोडणार नाही आणि मग बघा ते कसे नाहीसे होतात ते. विचार तुम्हाला घाबरतात. तुम्ही जर त्यांना घाबरलात तर ते तुम्हाला नियंत्रित करतील. पण जर तुम्ही त्यांना जवळ बोलावलेत तर ते नाहीसे होतील. प्रश्न: गुरुदेव, पाप आणि चूक यात काय फरक आहे, आणि ते दोन्ही क्षम्य आहेत काय? श्री श्री : बिलकुल, ते दोन्ही क्षम्य आहेत. पापाच्या मागे काही विचार असू शकतो,पण चूक हि तुम्ही जागृत नसतांना होते. पाप करतांना तुम्हाला माहित असते कि ते बरोबर नाही तरीपण तुम्ही ते करीत असता.तो फरक असू शकतो. पण काही हरकत नाही, तुम्ही फार विचार करू नका ते दोन्ही क्षम्य आहेत. त्यांना विसरुन जा. प्रश्न: गुरुदेव, जर सर्व गोष्टी या आधी लिहून ठेवल्याप्रमाणे असतील तर कर्माचा यात काय भाग आला? श्री श्री : तुम्ही म्हणताय कि सर्व लिहून ठेवले आहे तर ते तसे नाहीये. काही गोष्टी या विधी-लिखित आहेत तर काही तुमच्यावर सोडलेल्या आहेत. उदाहरणार्थ, जर पाऊस पडणे हे विधी-लिखित आहे तर तुम्ही भिजणे किंवा नाही हे तुमच्यावर सोडलेले आहे, तो तुमचा निर्णय आहे. जर तुम्ही छत्री घेतलीत तर तुम्ही भिजणार नाही आणि जर छत्री घेतली नाहीत तर भिजाल. तर सर्व गोष्टी या विधी लिखित नसून काही तुमच्यावर अवलंबून असतात. प्रश्न: गुरुदेव, पालकत्व स्वीकारल्यावर काय महत्वाचे असते, मुलांना सर्व सुखसोई पुरवणे कि त्यांच्या बरोबर वेळ घालविणे? श्री श्री : असे पहा कि तुम्ही नोकरदार आहात आणि तुम्ही तुमच्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही म्हणून तुमच्या मनात हे विचार येत आहेत. जो काही वेळ देऊ शकाल त्याचा योग्य उपयोग करणे महत्वाचे आहे. प्रश्न: गुरुदेव, मी खूप विसराळू आहे, मी माझी स्मरण शक्ती कशी वाढवू? श्री श्री : काही आयुर्वेदिक औषधी जसे कि शंखपुष्पी, ब्राम्ही रसायन, मेध्यरसायन हि खूप चांगली असून त्याचा स्मरण शक्तीसाठी फायदा होतो. यू टूब आणि दूरदर्शन यात फार वेळ घालवू नका. तुम्ही त्यासाठी काही वेळ देऊ शकता पण एकावेळी जास्त वेळ त्यासाठी घालवू नये. काही वेळा तुम्ही पाच ते सहा तास इंटरनेट समोर बसता, चार पाच तास एकापाठोपाठ एक सिनेमे बघता, असे करू नका. प्रश्न: गुरुदेव, अमली पदार्थांच्या विळख्यातून मी बाहेर कसा येऊ? श्री श्री : येथून बाहेर पडायच्या अशी शपथ घ्या कि तुम्ही परत त्याला स्पर्श करणार नाही. आणि जर तुम्ही दुसऱ्या कोणा बाबतीत बोलत असाल तर त्यांना येथे घेऊन या, अनेक वेळा सुदर्शन क्रिया केल्यावर त्यांची हि सवय जाईल. लक्षावधी लोकांना प्राणायाम, सुदर्शन क्रिया आणि सहज समाधी ध्यानाचा फायदा होऊन ते यातून बाहेर पडले आहेत. प्रश्न: गुरुदेव, मी एक ऋषी मुख मासिकात असे वाचे आहे कि भगवान विष्णू हे देवाचे देव आहेत, पण मग भगवान शिव हे भगवान विष्णूंचे गुरू हे कसे? श्री श्री : होय, भगवान शिव हे देवांचे देव आहेत. असे पहा कि ते काही वेगळे नाहीत. हरी आणि हर हे काही वेगळे नाहीत. शिव आणि विष्णू एकच आहेत. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'