02
2013
Jan
|
बर्लिन, जर्मनी
|
प्रश्न: बऱ्याच गोष्टी वाचल्या नंतर मला कळले आहे कि तुम्ही सर्वव्यापी आहात आणि तुम्हाला सर्व काही माहित असते. ह्या गोष्टी मुळे मी काहीवेळा भयभीत होतो, कारण मी केलेल्या चुका तुम्हाला माहीत असतात. चुकाबद्द्ल तुमचे काय मत आहे? मी वारंवार चुका करतो हे पाहून तुम्हाला राग येतो का? श्री श्री: बिलकुल नाही. तुम्हाला माहीत असेल भक्त हा गुरु पेक्षा सामर्थ्यवान असतो? हे तुम्हाला माहीत आहे का? पण हे असचं आहे. तुम्ही आतापर्यंत गुरूच्या गोष्टी ऐकल्या असतील, पण माझ्याकडे भक्तांच्या खूप गोष्टी आहेत. त्यातील मी तुम्हाला एक सांगतो. नोव्हेंबर च्या शेवटच्या आठवड्यात मी महाराष्ट्राच्या काही दुर्गम खेड्यात गेलो होतो. दुर्गम खेडे आणि जिल्हे जिथे मी आतापर्यंत कधीच गेलो नव्हतो. तिथे बरेच भक्त मला भेटायला आले होते. एका खेडे गावात जाताना मी माझ्या सेक्रेटरीला सांगितले, “तीन भक्तांचे मोबाईल हरविले आहेत आणि ते फार गरीब आहेत तर माझ्या बैग मध्ये तीन नवीन मोबाईल ठेवा”. मला वाटले कि तीन भक्तांचे मोबाईल हरविले आहेत म्हणून मी माझ्या बरोबर तीनच मोबाईल घेतले. मग मी स्वयंसेवक मेळाव्यात पोहचलो आणि कार्यक्रमानतंर म्हणालो, “तुमच्या पैकी काही जणांचे मोबाईल हरविले आहेत. मला माहीत आहे. ज्यांचे मोबाईल हरविले आहेत त्यांनी कृपया उभे रहावे’. आणि फक्त तीनच भक्त उभे राहिले. त्या पैकी एक स्त्री होती. मी तिला म्हणालो, “ गेल्या गुरुवारी तू माझ्या प्रतिमे समोर रडत होतीस. काय करावे तुला कळत नव्हते, कारण तुझा महागडा मोबाईल हरविला होता, घरचे काय म्हणतील या कारणाने तू घाबरली होतीस, कारण त्या मोबाईलची किंमत दोन तीन महिन्याची कमाई इतकी होती. हा घे तुझ्या साठी नवीन मोबाईल. मी हे करत असताना त्या घोळक्यातून एक तरुण माझ्यापशी आला आणि त्याने त्याचा अनुभव सांगितला. तो अडव्हान्स कोर्स करीत होता आणि त्याची बायको घरी होती, त्याला तिच्याशी काही बोलायचे होते. पण त्याचा मोबाईल चार्ज नव्हता आणि तो चार्जर घरी विसरून आला होता. म्हणून त्याने मोबाईल माझ्या फोटो समोर ठेवला आणि म्हणाला. “ गुरुदेव माझा फोन चार्ज करून द्या.” दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठला आणि पाहिले तर त्याचा मोबाईल फुल चार्ज झाला होता. त्याने त्याचा फोन मला दाखविला आणि म्हणाला, ” गेल्या दीड वर्षापासून मी चार्जर फेकून दिला आहे आणि आता मी हा मोबाईल तुमच्या प्रतिमे समोर ठेवतो आणि तो चार्ज होतो.” त्याने मोबाईलचा चार्जर चक्क फेकून दिला! मी म्हणालो, “ हे खुपच आश्चर्यजनक आहे. मला देखील माझा फोने चार्ज करण्यासाठी चार्जर लागतो पण माझे भक्त माझ्या प्रतिमे समोर मोबाईल ठेवून तो चार्ज करतात.” पहा किती सामर्थ्यवान भक्त असू शकतात. मी हे का म्हणत आहे कारण, आपल्या भावना, श्रद्धा, आणि प्रेम या मुळेच या गोष्टी घडून येतात. मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. हि १० वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. मी त्यावेळेस दक्षिण आफ्रिका मध्ये एका कडे पाहुणा म्हणून रहात होतो. जोहान्सबर्ग ला जाण्यापूर्वी आम्ही आमच्या सामानाची बांधाबांध करत होतो, आणि अचानक मी एक दुसऱ्या खोलीत गेलो जिथे काही भक्त रहात होते आणि त्या खोलीत गेल्यानंतर मी इकडे तिकडे पाहू लागलो. सहसा मी कुणाच्या खोलीत जात नाही. सर्वाना आश्चर्य वाटले आणि गोंधळून गेले आणि विचार करत होते कि गुरुदेव आपल्या खोलीत का आले? कल्पना करा, मी अचानक तुमच्या खोलीत आलो तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. सर्व जण विचार करू लागले कि, “गुरुदेव इकडे का आले आणि ते इतके अस्वस्थ का आहेत. ते काय शोधत आहेत?” आणि मला एक चहाचे पाकीट दिसले आणि मी त्यांना विचारले कि, “हे कुणाचे आहे?” ते म्हणाले, “आम्हाला माहीत नाही ते कुणाचे आहे.” मी कधीच चहा घेत नाही, पण मी ते पाकीट घेतले आणि माझ्या सुटकेस मध्ये ठेवून टाकले. आणि मी निश्वास सोडला. ते चहाचे पाकीट मिळे पर्यंत मी खूप अस्वस्थ होतो. सर्वाना ते विचित्र वाटले, गुरुदेव चहाचे पाकीट कसे काय चोरतील, आणि ते सुद्धा आपले नाही हे माहीत असताना. जेव्हा आम्ही जोहान्सबर्ग हून डर्बनला उतरलो, एक वयस्कर गृहस्थ मला विमान तळावर भेटले आणि म्हणाले, “ गुरुदेव, मी तुम्हाला पाठविलेले चहाचे पाकीट मिळाले का? तो एक विशेष चहा आहे. मी स्वत: जाऊन तुमच्या साठी घेतला आणि मला तो तुम्हाला द्यायचा होता पण काही कारणास्तव मी येवू शकलो नाही म्हणून दुसऱ्याबरोबर पाठविला होता. ते चहाचे पाकीट कुणीतरी दिले होते म्हणून त्यांनी दुसऱ्या खोलीत ठेवले कारण त्यांना माहीत होते कि मी चहा घेत नाही, आणि त्यांनी मला सांगितले देखील नाही. हि अशी घटना होती. मग मी त्या गृहस्थाला म्हणालो, “हो, मला पाकीट मिळाले.” याचा अर्थ म्हणजे ज्यावेळेस तुमच्या भावना तीव्र होतात त्यावेळेस मग मी फक्त बाहुला होवून जातो. म्हणून मला ते चहाचे पाकीट शोधावे लागले. मला चहाचे पाकीट कसे चोरावे लागले याची हि गोष्ट, तसे पाहता ती चोरी नव्हती. ते पाकीट माझेच होते पण त्या क्षणी असे वाटत होते कि मी एखादी गोष्ट चोरली जी माझ्यासाठी नव्हती. अशा प्रकारच्या खूप घटना आहेत. एकदा मी दिल्ली मध्ये एका मोठ्या हॉल मध्ये होतो. त्या हॉल मध्ये खुपच गर्दी होती. कार्यक्रमा नंतर सर्वानी माझ्या दर्शना साठी रांग लावली होती. जे लोक माझे संरक्षण करत होते ते म्हणाले, “ अरे! इथे फार गर्दी आहे त्यामुळे गुरुदेव ना वेळ लागेल आणि गुरुदेवना विमान तळावर पोचावयास उशीर होईल.” त्यांनी सर्वाना फसवून मला तळ मजल्या तून थेट गाडी पशी नेले आणि आम्ही तिथून निघून गेलो. तुम्हाला माहीत आहे, तिथे हजारो लोक होती, आणि मी तिथे नाही हे पाहून ते सगळे निराश झाले आणि मी अस्वस्थ झालो. त्या सर्व लोकांना राग आला होता आणि सर्व निराश झाले होते. त्या दिवशी दिवसभर माझे डोके दुखत होते आणि मी अस्वस्थ होतो. ज्या लोकांनी मला गाडीत बसवून थेट विमानतळावर आणले, मी त्यांना विचारले, “तुम्ही हे असे का केले? मला कुणालाही निराश करावयाचे नाही. मी आज पर्यंत कुणालाही निराश केले नाही.” मी हे का म्हणत आहे कारण ज्यावेळेस तुमच्या भावना तीव्र असतात, प्रेम तीव्र असते अशा वेळेस दगडाला सुध्दा पाझर फुटतो. कळले का? तुम्ही जर रोज ध्यान करत असाल तर तुम्हाला खूप सावधानता बाळगावी लागेल. तुम्ही कुणालाही कधीही शाप देवू नका. अपशब्द बोलू नका. तुमच्या तोंडून कधीही वाईट येवू देवू नका. तुम्हाला माहीत आहे, मी गेल्या ५६ वर्षात कधीही वाईट चिंतले नाही. मी एकही वाईट अपशब्द बोललो नाही. आणि मला त्याचा गर्व आहे; तो असाच येत नाही. मी सर्वात वाईट काय बोललो असेल तर, “तुम्ही मुर्ख आहात.” तुम्ही आता पर्यंत मला शपथ घेताना, कुणाबद्दल, कुठेही वाईट अपशब्द बोलताना ऐकले नसेल, माझ्याविषयी सुद्धा. तुम्ही जर रोज ध्यान करत असाल तर तुम्ही तुमची वाणी अपशब्दापासून दूर ठेवली पाहिजे. कारण तुमच्या शब्दामध्ये उर्जा आहे. तुम्ही रोज ध्यान केल्याने तुमच्या मध्ये आशिर्वाद किंवा शाप देण्याची क्षमता येते. सुरुवातीला शाप देण्याची क्षमता येते आणि नंतर आशिर्वाद देण्याची. त्यासाठी सांगतो, ध्यान करणारांनी कुणाबद्दल हि वाईट चिंतू नये आणि तुमच्याकडून कुणालाही अपशब्द बोलू नये, सकारात्मक रहा. मी असे म्हणत नाही कि तुम्हाला कधीही राग येणार नाही. राग, क्रोध हे जीवनाचा एक भाग आहे. तरी पण ज्यावेळेस तुम्हाला राग येईल त्यावेळेस तुम्ही तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवले पाहिजे. आयुष्यात क्रोध हा कधी कधी आला पाहिजे, तो आवश्यक आहे, पण त्या क्षणी तुमच्या तोंडून वाईट अश्लील शब्द येवू देवू नका. का? कारण तुम्ही तुमची खूप सारी सकारात्मक उर्जा वाईट अपशब्द बोलून वाया घालविता. कल्पना करा, तुम्ही एक महिन्याची ध्यान केल्याची मेहनत काही अपशब्द बोलून वाया घालविता. आर्थिक दृष्ट्या बरोबर आहे का? हे असे म्हणजे १० रु. च्या पेया साठी हजारो रुपये घालविण्या सारखे आहे. तुम्ही तुमच्या मध्ये असलेल्या शक्ती, उर्जा आणि निश्चय यांना कमी लेखू नका. तुम्ही ध्यान केल्याने तुमच्या मध्ये खूप सामर्थ्य येते. याच कारणासाठी प्राचीन काळी सर्व ऋषी आपल्या शिष्यांना हे शिकवत नसत, कारण त्यांना माहीत होते हे जर त्यांना शिकविले तर ते खूप सामर्थ्यवान होतील आणि ते काही नियम पाळणार नाहीत, आणि मोठी समस्या निर्माण होईल. म्हणून ते हे सर्वाना शिकवीत नसत. प्रथम ते त्यांची परीक्षा घेत आणि ते जर त्यामध्ये उत्तीर्ण झाले तरच त्यांना ध्यान शिकवीत. पण मी विचार केला कि हे ज्ञान आपण सर्वाना देवू. ते जरुरी आहे. तुम्ही जर चांगले असाल तर तुम्हाल ज्ञान मिळेल. पण तुम्हाल जर ज्ञान मिळत नसेल तर तुम्हाला चांगले होता येणार नाही. म्हणून मी दुसरा मार्ग निवडला. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'