03
2013
Jan
|
बर्लिन, जर्मनी.
|
प्रश्न: या काही वेळा कठीण असणाऱ्या जगात आपली मुले हसत खेळत मोठी होणे खुपच चांगले असते. अशी हि मुले जेंव्हा ध्यान करण्याएवढी मोठी नसतात, तेंव्हा त्यांना आपण प्रेमाशिवाय अजून काय देऊ शकतो? श्री श्री : त्यांच्याबरोबर नेहमी खेळत रहा. त्यांना नेहमी शिकवत बसून , शिकविणे सुरु करु नका. खरेतर त्यांचा आदर करून त्यांच्यापासून काही शिका. त्यांच्या बरोबर वागताना नेहमी गंभीर राहू नका. मला माझे लहानपण आठवते आहे, जेंव्हा रोज संध्याकाळी आमचे वडील बाहेरून घरात यायचे तेंव्हा ते आम्हाला टाळ्या वाजवून हसवायचे.माझी आई काहीशी कडक शिस्तीची होती, पण आमचे वडील मात्र आम्हाला नेहमी रात्रीच्या जेवणाच्या आधी टाळ्या वाजवून हसवायचे. प्रत्येकजण जेवायच्याआधी खूप हसायचा. म्हणून त्यांना नेहमी उपदेश न करता, त्यांच्याबरोबरचे क्षण साजरे करा, त्यांच्या बरोबर खेळा, त्यांच्या बरोबर गाणी म्हणा. असे करणे चांगले असते. तुम्ही जर नेहमी छडी घेऊन त्यांच्या मागे लागलात आणि म्हणू लागलात कि “ हे करू नकोस, ते करू नकोस” तर ते चांगले नाही. लहान मुलांबरोबर तुम्ही नेहमी खेळले पाहिजे, कधी कधी त्यांना गोष्टी सांगायला पाहिजेत. आम्ही जेंव्हा लहान होतो तेंव्हा अनेक छान छान गोष्टी ऐकल्या आहेत. आम्ही रोज एक गोष्ट ऐकायचो. मुलांमध्ये काही गुण वाढीला लागण्यासाठी गोष्टी चांगल्या असतात.तुम्ही जर त्यांना काही मनोरंजक गोष्टी सांगितल्या तर ते सारखे दूरदर्शन समोर ठाण मांडून बसणार नाहीत. लहान मुलांसाठी पंचतंत्र सारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत. आमचे एक साधक पंचतंत्र वर कार्टून तयार करीत आहेत. ते लवकरच उपलब्ध होईल. म्हणून पालकांनी मुलांबरोबर बसून त्यांना नैतिक मूल्ये असलेल्या गोष्टी सांगायला पाहिजेत. काही नैतिक मूल्ये असलेली गोष्ट नेहमी चांगली असते. अशा तऱ्हेने जर तुम्ही त्यांच्याबरोबर एखादा अर्धा तास घालविला तर तो त्यांच्यासाठी अधिक गुणवत्ता पूर्ण आणि चांगला असेल. त्यांच्या बरोबर पाच सहा तास बसून त्यांच्यावर दबाव टाकू नका. ४५ मिनिटे ते एक तास असा गुणवत्तापूर्ण वेळ हा चांगला आणि त्यांच्यासाठी मनोरंजक असा असावा. तुमच्याबरोबर असा वेळ मिळावा म्हणून त्यांच्यात गोष्टी ऐकण्याची उत्कंठा निर्माण व्हायला पाहिजे. मला आठवते आहे कि आमचे एक खूप लट्ठ, गोरे आणि गोल चेहऱ्याचे काका होते. प्रत्येक रविवारी ते आमच्याकडे येऊन आम्हाला गोष्टी सांगायचे. आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबर बसून गोष्टी ऐकायचो आणि मग ते गोष्टीच्या शेवटाला नेहमी काही गुपित असायचे आणि मग आम्ही ते शोधण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने पुढच्या भागाची वाट बघायचो. आपल्यामध्ये आशी काही व्यक्तिमत्वे आहेत. आणि नसतील तर तुमचे मूल हे दुसऱ्या मुलांना गोष्टी सांगू शकते. त्यामुळे त्यांच्या पालकांना आनंद होईल. त्यांना त्यांच्या मुलाकडे बघायला कोणी तरी मिळेल आणि ती तुमची सेवा होईल. म्हणून त्याला मानवी स्पर्शाची गरज असते. हल्लीची मुले उठल्यापासून दूरचित्रवाणी समोर बसून , त्यावर चाललेल्या गोष्टींमध्ये भाग न घेता त्याचे केवळ साक्षीदार असतात, होय कि नाही?. ते दूरचित्रवाणी समोर बसून त्याची केंद्रे बदलत राहतात. त्यांची आई त्यांना नाश्ता करायला बोलावते पण ते उठत नाहीत. मग काही वेळा त्यांची आई त्यांना दूरचित्रवाणी समोर नाश्ता आणून देते. हि संस्कृती बरोबर नव्हे.तुम्हाला काय वाटते? तुमच्यातील किती लोक माझ्याशी सहमत आहेत? मुलांना दूरचित्रवाणी समोर एकतासपेक्षा जास्त वेळ बसू देऊ नये.हा वेळ जर मर्यादित केला नाही तर त्यांच्यात कमतरतेची लक्षणे दिलू लागतील. मेंदूवर त्या प्रतिमांचा सारखा मारा केल्यामुळे मग इतर काही गोष्टी त्यांना समजत नाहीत आणि मग ते मंद होतात. त्यांना मग काही समजत नाही. आमच्या लहानपणी दूरचित्रवाणी नव्हती . या बद्धल आम्ही देवाचे आभारी आहोत. तुमच्यापैकी किती लोकांच्या लहानपणी दूरचित्रवाणी नव्हता? दूरचित्रवाणी शिवाय आम्ही मोठे झाले. खूप वेळ दूरचित्रवाणी बघणारी मुले हुशार असतात असे नाही. दिवसात दोन तास ही मर्यादा घातली पाहिजे. प्रौढांसाठी पण दिवसात एक किंवा दोन तास पुरेसे असावेत. त्यांच्यासाठी पण हे फार होते. तुम्हाला हे माहित आहे कि दूरचित्रवाणीच्या अतिरेकामुळे आपल्या मेंदूच्या नसांवर फार ताण पडतो. काही वेळा लोक मला “ गुरुदेव हा कार्यक्रम खूप छान आहे”, असे म्हणून दूरचित्रवाणी बघायला भाग पाडतात. मी अर्धा किंवा एक तासापेक्षा जास्त वेळ ते पाहू शकत नाही. त्यानेपण मनावर खूप ताण पडतो. मला आश्चर्य वाटते कि लोक आठवड्यात दोन किंवा तीन चित्रपट कसे बघू शकतात. मी तुम्हाला सांगतो कि त्याने आपला मेंदू खूप रिकामा होतो. चित्रपट गृहाच्या बाहेर येणाऱ्या लोकांकडे पहा, ते खूप उत्साही आणि आनंदी दिसतात का? ते चित्रपट गृहात जाताना आणि बाहेर येतानाचा फरक लक्षात घ्या. चित्रपट कितीही चांगला असु देत पण ते मात्र अनुत्साही, थकलेले आणि आळसावलेले दिसतात, होय कि नाही? हा फरक तुमच्या लक्षात आला नसेल तर चित्रपटगृहाच्या बाहेर उभे रहा आणि निरीक्षण करा. लोक आत जाताना कसे होते आणि चित्रपट संपल्यावर बाहेर येताना कसे दिसतात हे पहा. तुम्हाला त्यातील फरक लक्षात येईल. अगदी तुमच्यात पण होणारा हा बदल, तुमच्यापैकी किती लोकांच्या लक्षात आले आहे? कोणत्याही करमणुकीत तुमचा उत्साह वाढायला पाहिजे पण चित्रपटाच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही. समजा तुम्ही कोणत्याही समोर होणाऱ्या कार्यक्रमाला गेलात तर एवढे अनुत्साही वाटत नाही. अशा कार्यक्रमानंतर काहीसे दमल्यासारखे वाटते पण चित्रपटासारखे नाही. हे तुमच्या लक्षात आले आहे काय? आणि जेंव्हा तुम्ही सत्संगाला येता, तेंव्हा बरोबर त्याच्या उलट होते. जेंव्हा तुम्ही येता तेंव्हा तुम्हाला काहीसे वेगळे वाटते पण जेंव्हा तुम्ही बाहेर पडता तुमचा उत्साह वाढलेला असतो. प्रश्न: लहान मुलांना भीतीदायक कथा सांगाव्यात काय? कारण जर्मन भाषेत अशा काही भीतीदायक कथा आहेत आणि लोक म्हणतात कि त्या मुलांना सांगू नयेत. श्री श्री : थोड्या प्रमाणात सांगायला हरकत नसावी. समजा लहानपणी तुम्ही त्यांना तश्या कथा सांगितल्या नाही आणि त्यांनी त्या मोठेपणी ऐकल्यात तर त्यांना अजूनच भीती वाटेल. त्यामुळे ते आणखी कमजोर होतील. पण त्याचवेळी तुम्ही त्यांना फक्त अशाच गोष्टी सांगत बसलात तर त्यांच्यावर भीतीचा पगडा बसू शकतो. अशा दोन्हीचा अतिरेक वाईट आहे. काही प्रमाण भीतीदायक गोष्टी असाव्यात पण त्यांचा अतिरेक टाळायला पाहिजे, विशेष करून दृकश्राव्य खेळांचा. मला असे वाटते कि दृक श्राव्य खेळ हे हिंसक असू नयेत. लहान मुले त्या दृक श्राव्य पडद्यावर बंदुकीतून गोळ्या मारतात आणि मग खऱ्या जगात पण ते बंदुका हातात घेऊन तेच करतात , त्यांना वास्तविक जग आणि काल्पनिक जग यातला फरक कळत नाही. हा एक प्रश्नच आहे. म्हणून मुले हिंसक दृक श्राव्य खेळ खेळू नयेत असे मला प्राध्यान्यपणे वाटते. प्रश्न: सर्व नाती हि पूर्व कर्मांवर आधारित असतात काय? श्री श्री : होय. तुम्हाला माहित आहे काय कि जेंव्हा एखादा आत्मा या जगात येऊ इच्छितो, तेंव्हा तो एक स्त्री आणि एक पुरुष निवडून त्यांच्यामध्ये आकर्षण निर्माण करतो. मग ते दोघे एकमेकांजवळ येतात आणि प्रथम अपत्य जन्माला येताच अचानक त्यांचे एकमेकांवरील प्रेम आटून जाते. तुमच्यातील किती लोकांनी अशी गोष्ट घडताना बघितली आहे? जन्माला आल्यावर त्या आत्म्याचे काम झाले मग त्या पालकांची चिंता तो का करेल. म्हणून मग अचानक पणे त्या मुलाच्या जन्मानंतर त्या जोडप्यातील आकर्षण कमी होते. असे नेहमी घडते असा विचार करू नका. काही बाबतीत असे होते. काही वेळा तर ते तिसऱ्या किंवा पाचव्या अपत्याच्या जन्मानंतर होते. अचानक पणे ते एकमेकांबरोबर राहू शकत नाहीसे होतात कारण त्यांची व्यक्तिमत्वे हि कृत्रिमपणे त्या आत्म्याने या जगात प्रवेश मिळविण्यासाठी जवळ आणलेली असतात. म्हणून असे घडते, नेहमीच नव्हे तर साधारण पणे ३०% जोडप्यांमध्ये त्यांचे एकमेकांबरोबर न जमल्यामुळे त्यांचा शेवट मग घटस्फोटात होतो. त्यांच्या कोणत्याच गोष्टी एकमेकांना पूरक नसतात. अचानक त्यांना साक्षात्कार होतो कि “ अरे, आम्हाला तर वाटले होते कि आम्ही जन्म-जन्मांतरीचे जोडीदार आहोत आणि अचानक हे काय झाले? मी तर पूर्ण पणे वेगळा आहे आणि आमचे कधीच एकमेकांशी पटणार नाही.” मग अशा गोष्टी घडतात. आयुष्यात नेहमी असेच घडत असते, मित्रांचे शत्रू होतात अन् शत्रूचे मित्र होतात. तुम्ही ज्यांच्यासाठी काहीही चांगले केलेले नाही असे लोक तुमच्या भल्यासाठी काम करू लागतात. म्हणून मित्र किंवा शत्रू यांनी काहीही फरक पडत नाही. तुमचे आयुष्य कर्माच्या वेगळ्याच नियमांप्रमाणे घडत असते. म्हणून तुमचे मित्र आणि शत्रू हे एकाच तराजूत तोलत रहा, कारण दहा वर्षांची मैत्री पण शत्रुत्वात बदलू शकते आणि एखादा शत्रू पण तुमचा चांगला मित्र बनू शकतो. ते सर्व तुम्ही आणि तुमचे कर्म यावर अवलंबून असते. प्रश्न: प्रियजनांच्या मृत्यूचा आघात कसा सहन करण्याचा चांगले मार्ग कोणता? श्री श्री : काळ हा आपल्या मार्गाने जात असतो. त्याचा स्वीकार करायचा किंवा इतर काही करायचा प्रयत्न करू नका. त्याची जर टोचणी लागून राहिली तर राहुदेत, काही दिवसांनी ती कमी होईल. काळ हे मोठे रामबाण औषध आहे. जसा जसा काळ पुढे जाईल तसे तो तुम्हाला बरोबर घेऊन जाईल. त्यासाठी काही वेगळे करायची गरज नाहीये, काळाबरोबर या जखमा भरून येतील. किंवा असे पहा कि प्रत्येकजण हा केंव्हा ना केंव्हा तरी जाणारच आहे. ते जरा लवकर गेले तुम्ही थोडे उशिरा जाणार आहात. हे एवढेच आहे. जे लोक पुढे गेलेत त्यांना सांगा कि “ काही वर्षांनी मी तुम्हाला तेथे भेटेन”. सध्यापुरता त्यांचा निरोप घ्या. तुम्ही त्यांना पुढे दुसऱ्या ठिकाणी भेटणार आहात. प्रश्न: मला कुटुंब नाहीये,अशावेळी कमी एकटे वाटण्यासाठी मी काय करावे? श्री श्री : अरे, मी तुम्हाला एवढे मोठे कुटुंब दिले आहे, खरे कुटुंब जे तुमची खरोखरच काळजी घेत आहे. तुम्हाला कुटुंब नाहीये असा विचार कधी करू नका, मी तुमचे कुटुंब आहे. म्हणून तर प्रत्येक वर्षी ख्रिस्तमस आणि नवीन वर्षं सुरु झाल्यावर मी येथे येतो. नाहीतर मी येथे कशाला येऊ?! प्रश्न: तुम्हाला आनंदी करायचा सर्वात चांगला मार्ग कोणता? श्री श्री : स्वतः आनंदी राहून दुसऱ्यांना आनंदी बनविणे हाच! तुम्ही मला आनंदी बनविण्यासाठी वेगळा प्रयत्न करायची गरज नाही कारण मी तसाच आनंदी आहे. पण जर तुम्ही दुसऱ्यांना आनंदी व्हायला मदत केलीत तर मला अधिक आनंद होईल. त्यांना फक्त काही भेटवस्तू किंवा त्यांच्यासाठी जंगी जेवण देऊन नव्हे तर त्यांचे ज्ञान वाढून त्यांना परिपूर्ण बनवून होय. तुम्ही जर हे ज्ञान लोकांच्या निदर्शनास आणून दिले तर ती सर्वात चांगली गोष्ट असेल. लोक असे म्हणतात कि अष्टावक्र गीता ऐकल्यानंतर त्यांचे आयुष्य बदलून गेले आहे. तुमच्यापैकी किती लोकांना हा अनुभव आहे? ( अनेक हात वरती करतात) जेंव्हा तुम्ही अष्टावक्र गीता ऐकता तेंव्हा तुमचा आयुष्याबद्धलचा दृष्टीकोन बदलून जातो. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'