स्व:ताला दुखावून घेवू नका.

15
2013
May
बंगलोर, भारत.

प्रश्न: गुरुदेव, जर माझा कुणी अपमान केला तर मी ते प्रेमाने स्वीकारतो, आणि मी त्याचा सूड घेत नाही. मी असे करून अन्याय करायला प्रेरणा तर देत नाही ना?

श्री श्री: हो, आपण अन्यायाला कधीही पाठिंबा देवू नये. तुम्ही त्यांना एकदा, दोनदा क्षमा करू शकता. पण जर ते वारंवार होत असेल, तर तुम्ही त्यांच्या विरुद्ध उभे राहून त्यांना जाणीव करून दिली पाहिजे की ते जे करत आहेत ते चुकीचे आणे आणि त्यांना योग्य मार्गावर आणले पाहिजे.

पण तुम्ही हे आनंदाने केले पाहिजे, तुम्हाला त्याचा त्रास होतो म्हणून नाही. जो कोणी चुकीचे करत आहे तो स्व:ताला हानी पोचवत आहे ना कि दुसऱ्याला. हे तुम्ही त्यांना जाणवून दिले पाहिजे.

लहान मुलांनी जर काही खोडी केली तर त्याची आई त्याला थोबाडीत मारते, का? कारण त्या मुलाने आईला धडक दिली किंवा आईचा अपमान झाला म्हणून नाही. तर त्या लहान मुलाच्या वाईट स्वभावामुळे तो स्व:ताला हानी करून घेत आहे, त्या कारणा साठी आई आपल्या मुलाला रागविते.

उदा: एक लहान मुलगा आपल्या आईच्या कुशीत बसतो, पण त्याच वेळी तो आईला लाथ मारतो. त्या वेळेस त्याच्या आईला काही वाटत नाही , उलट तिला बरे वाटते. पण त्याच मुलाने काही खोडी केली किंवा तो चाकू बरोबर खेळत असेल तर आई त्याला रागविते कारण त्या चाकूने मुलालाच इजा होईल म्हणून.

हे असे तुम्ही समजले पाहिजे.

प्रश्न: गुरुदेव, काल तुम्ही सांगितले कि जो कोणी समर्पण करतो, देव त्याचे काही वाईट करत नाही. रावण (रामायणातील लंके चा राजा), तो सुद्धा मोठा शिवभक्त होता, तरी पण त्याने दुष्कृत्य (भगवान श्री राम ची पत्नी सीतेच्या अपहरणाच्या संदर्भात) कसे केले?

श्री श्री: श्रीलंके मध्ये मला वाटते दुसरे रामायण वाचले जाते. त्याच्या प्रमाणे भगवान श्री रामाने मोठी चूक केली होती (वनवासा मध्ये आपल्या पत्नीला दुर्लक्षित केले होते).

हा प्रबोधनाचा भाग आहे. श्रीलंके मध्ये रामायण वेगळेच सांगितले जाते, रावण जो राजा असूनही त्याने सीतेचे अपहरण का केले.

रावणाची बहीण सुर्पन्खा हि श्री रामा कडे आकर्षित होवून त्याच्यावर प्रेम करीत होती. जेव्हा श्री रामा कडे येवून तिने तिचे मत मांडले, तेव्हा श्री रामाने तिचा अपमान करून तिला नाकारले. आणि एवढेच नाही तर लक्ष्मणाने (श्री रामाचे छोटे बंधुराज) तिचा उत्साहभंग करीत तिचे नाक कापून टाकले. आता राजाच्या बहिणीचे नाक कापून टाकणाऱ्या व्यक्तीला राजा कसे माफ करेल? कुठलाही राजा किंवा कोणताही मानव असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला माफ करणार नाही. कुणी हे सहन करू शकेल का? नाही, अशा प्रकारच्या गोष्टी सहन करणे म्हणजे एक प्रकारचा अपराधच आहे. म्हणून आपल्या बहिणीचा सन्मान राखण्यासाठी रावणाने सीतेचे अपहरण केले.

पण असे हि म्हटले जाते कि रावणाने सीतेला सन्मान पूर्वक वागणूक दिली होती.

जर रावण एवढा दुष्टच होता तर त्याने रामेश्वरम मध्ये श्री रामा साठी पूजा करण्यासाठी तयार झाला नसता. तुम्हा सर्वांना हि गोष्ट माहीत आहे का?

रावणा बरोबर च्या युद्धात श्री रामाला विजयी व्हायचे होते, आणि त्यासाठी त्यांना एका शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा करावयाची होती. आता हे करण्यासाठी एका पुजाऱ्या ची आवश्यकता होती, पण त्या काळात रामेश्वरम मध्ये पुजारी मिळणे कठीण होते. म्हणून हे विधी पार पाडण्यासाठी श्री रामाला एका चांगल्या पुजाऱ्या ची नितांत आवश्यकता होती.

रावण हा कट्टर शिवभक्त होता आणि जन्माने तो ब्राह्मण होता. म्हणून रावणाचा भाऊ विभीषण (जो श्री रामाच्या बाजूने होता) याने श्री रामाला सांगितले कि रावणाला या विधी करण्याचा अनुभव आहे. म्हणून श्री रामाने रावणाला ह्या पूजेसाठी आमंत्रण पाठविले. 

रावणाने आमंत्राणाचा स्वीकार करून तो पूजा करण्यास तयार झाला. पण तो श्री रामाला म्हणाला कि पूजा हि पत्नी शिवाय केल्यास ती अधुरी होईल. पत्नी शिवाय कुठलीही पूजा किवा यज्ञ हे करता येत नाही. रावण श्री रामाला म्हणाला, ‘तुम्ही विवाहित असल्याकारणाने, पूजेला सपत्नीक बसणे आवश्यक आहे अन्यथा हि पूजा होवू शकत नाही’.

श्री राम रावणाला म्हणाले, ‘अशा अडचणीतून पर्यायी मार्ग सांगण्याचे काम हे पुजाऱ्याचे असते. माझी पत्नी माझ्यापाशी नाही (त्या वेळेस सीता हि रावणाच्या कैदित होती), त्यामुळे यातून पर्यायी मार्ग कोणता मला कृपया सांगा. पत्नीच्या जागी तिची प्रतिमा ठेवली तर चालेल का?’

रावण म्हणाला, ‘पर्यायावर माझा विश्वास नाही. मला शिवलिंगाच्या पूजेच्या वेळी सर्व काही जागच्या जागी हवे आहे. म्हणून मी तुझ्या पत्नीला बोलावून घेतो आणि पूजा झाल्यावर तिला परत लंके मध्ये पाठवून दे’.

मग रावणाने सीतेला पूजेसाठी आणले. पूजा झाल्यावर श्री राम आणि सीता रावणाकडून आशिर्वाद घेण्यासाठी त्यांचे चरण स्पर्श केले, रावणाने आशिर्वाद दिला “विजयी भव”. हा आशीर्वाद देण्याशिवाय त्याच्या कडे दुसरा पर्याय नव्हता.

जेव्हा एखाद्याने पुजाऱ्याचे चरण स्पर्श केला तर पुजाऱ्याला आशिर्वाद देण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. म्हणून रावणाने श्री रामाला आशिर्वाद द्यावाच लागला ज्या साठी श्री रामाने पूजा आयोजित केली होती. दोघांना आशिर्वाद देवून, रावणाने सीतेला परत लंकेला नेले.

हि खूपच चित्तवेधक गोष्ट आहे. आपण नेहमी रावणाचा खलनायक म्हणून जाणले आहे, पण रावणा मध्ये हि काही चांगले सद्गुण होते. याच कारणामुळे जेव्हा रावण युद्धभूमी वर मृत्यू शय्येवर होता, श्री रामाने लक्ष्मणाला रावणाचे चरण स्पर्श करून सर्व ज्ञान प्राप्त करून घेण्यास सांगितले.

श्री राम म्हणाले, ‘मी जर रावणा जवळ गेलो तर तो शरीर सोडून देईल आणि त्याचा आत्मा माझ्या मध्ये विलीन होईल. ते होण्याआधी तू त्याच्या जवळ जा आणि जेवढे काही शिकता येईल ते शिकून घे’.

तुम्हाला माहीत आहे का, रावणाच्या नावाने पण गीता आहे? त्याचे नाव रावण गीता आहे.

पाच गीता ज्या अस्तित्वात आहेत त्या पैकीच हि एक. जसे तुम्हाला माहित आहे श्रीमद भगवत गीता, अष्टावक्र गीता, उद्धवा गीता आणि गुरु गीता; आणखी एक गीता आहे त्याचे नाव आहे रावण गीता. या मध्ये रावणाने लक्ष्मणाला धार्मिक प्रवचन दिले आहे. रावणाचे सर्व शिकवून झाल्यावर लक्ष्मणाने श्री रामाला इशारा केला. श्री राम रावणा जवळ येताच त्याच्या आत्म्याने एक तेजस्वी प्रकाशा प्रमाणे शरीर सोडले आणि श्री रामा मध्ये विलीन झाला. हि गोष्ट अध्यात्म रामायणा तील आहे. मी ती पूर्ण वाचली नाही, मी फक्त ही गोष्ट ऐकली आहे. पण तुम्ही सर्वांनी वाचली पाहिजे.

तुम्ही जेव्हा हे वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल कि कैकयी (दशरथाची पत्नी आणि श्री रामाच्या आई सारखी) हि किती थोर होती ती. आपण नेहमी विचार करतो कि ती खूप दुष्ट आणि कपटी होती. पण ते खरे नाही. ती वाईट स्त्री नव्हती. तिने श्री रामाला जंगलात वनवासाला पाठविले कारण श्री रामाला जायचे होते.

म्हणूनच म्हटले जाते, ‘सर्वम वासुदेवम इति’.

रावण आणी श्री राम हे दोघे हि वसुदेव आहेत (म्हणजे दोघेही एकाच ईश्वराचे अवतार आहेत).

प्रश्न: गुरुदेव, तुम्ही एका गोष्टींचा उल्लेख केला होता कि भगवान श्रीकृष्णाने गीते मध्ये म्हटले आहे कि, ‘मला तीन गुण शासित करू शकत नाही, आणि हे तीन गुण माझ्या मध्ये रहात देखील नाहीत’. हे समजण्यासाठी, कपडे परिधान केलेल्या व्यक्तीचे तुम्ही उदाहरण दिले होते. पण मी घातलेल्या कपड्याकडे पाहता असे वाटत नाही का कि कपडे म्हणजे मीच आहे?

श्री श्री: जे कपडे तुम्ही परिधान केले आहेत, त्या मध्ये तुम्ही असाल तर तुम्ही कपाटात देखील आहात आणि धुलाई यंत्र मध्ये देखील आहात. (प्रेक्षकां मध्ये हशा) 

कपडे धुतले जातात पण तुम्ही नाही. मग असे कसे म्हणता येईल कि तुम्ही कपड्या मध्ये आहात? या गोष्टीवर विचार आणि चिंतन करा.

जेव्हा तुम्ही परिधान केली कपडे बदलून बाजूला ठेवता, तुम्ही त्या कपड्यांमध्ये असता? कपड्यांबरोबर धुलाई यंत्र मध्ये तुम्ही जाता का?

हे तर्क शास्त्राने समजू शकत नाही. हे खूप सूक्ष्म आहे आणि त्याचा अनुभव घेतला पाहिजे. 

जे कपडे तुम्ही परिधान करता, कपडे तुमचेच आहेत, तरी पण तुम्ही त्या कपड्यांमध्ये नाहीत (मर्यादित किंवा शासित). हे स्पष्ट आहे.

म्हणून भगवान श्री कृष्णाने म्हटले आहे कि, ‘मी तिन्ही गुणात उपलब्ध आहे आणि ते माझेच आहेत तरी पण ते माझ्या मध्ये रहात नाहीत’.

हे बुद्धीने पूर्णपणे समजणे जवळ जवळ अशक्य आहे, पण तुम्ही हे अनुभवाने समजू शकाल.

हे पहा, सगळ्या उदाहरणांना एक निश्चित मर्यादा असते. उदाहरणांना जास्त ताणून त्याच्या मर्यादा बाहेर जावून अर्थ लावू नका. नाहीतर त्याचे महत्व जाते आणि आपली बुद्धी पण काम करत नाही. प्रत्येक उदाहरणातील अर्थ व्यक्त करण्यासाठी मर्यादित सामर्थ्य असते. आपण त्याच मर्यादेत त्याचा अर्थ समजला पाहिजे.

उदाहरण म्हणजे जी गोष्ट अकथित, अजाण आणि व्यक्त करण्या पलीकडे आहे ती दर्शविते. ते समजण्यासाठी तुमच्या बुद्धीला एक दिशा दिली जाते. म्हणून तुम्ही त्याच मर्यादेत तुम्ही समजले पाहिजे. तुम्हाला त्याचा अर्थ कळला कि शांत रहा आराम करा.

सखोल विश्रांती नंतरच तुमच्या मध्ये ज्ञानाची पहाट होते. सूक्ष्म गोष्टी तुम्हाला प्रयत्न केल्याने समजू शकत नाहीत.

प्रश्न: गुरुदेव, मी अज्ञानापासून मुक्त कसा होवू?

श्री श्री: तुम्हाला ज्या वेळेस उमजते कि तुम्ही अज्ञान आहात, त्याच क्षणी तुम्ही अज्ञानापासून मुक्त होता. एक अज्ञानी व्यक्ती स्व:ताला अज्ञानी कधीही समजत नाही. ज्या प्रमाणे तुम्ही झोपेतून उठल्यावर कळते कि तुम्ही झोपला होता, त्याच प्रमाणे एक व्यक्ती अज्ञानातून बाहेर पडल्यावर त्याला कळते कि तो अज्ञानी होता.

या ज्ञाना मध्ये खूप मधुरस आहे. आपण तासंतास या विषयावर चर्चा करू शकतो. आज रात्री साठी मी तुम्हाला एक अभ्यास देणार आहे.

‘सर्वम वासुदेवम इति’, लक्षात ठेवा कि तुमच्या अवतीभोवती च्या सर्व गोष्टी वासुदेव (एक प्रकारचा आकार) आहे. तुमच्या मध्ये कितीही श्रद्धा असो ती वासुदेव च्या कृपा दृष्टीनेच आली आहे.

प्रश्न: गुरुदेव, अष्टदा प्रकृती ( ईश्वराच्या आठ उर्जा शक्ती संदर्भात - पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, आणि अहं) मध्ये अहं गणला आहे पण चित्त (स्मृती) नाही. हे असे का?

श्री श्री: तुम्ही गणनांक करू शकता!

वेगवेगळ्या ऋषींनी वेगवेगळ्या तत्वांचे स्पष्ट वर्णन केले आहे आणि अस्तित्वाच्या विविध स्तरांना समजण्याचे मार्ग दाखविले आहेत. तुम्ही मन, बुद्धी आणि अहं यांना स्मृतीचे विस्तार रूप म्हणून पहा. हे चार चेतनेचे केवळ कार्य किंवा स्वभाव आहेत. हे काही घटना पुरतेच मर्यादित आहेत असा गैरसमज करून घेवू नका. हे एकाच चेतनेचे चार वेगवेगळे शब्द प्रयोग आहेत.

काही शाळांमध्ये फक्त तीनच मोजले जातात, चार नाही. त्यांना वाटते स्मृती हा मनाचा किंवा बुद्धीचा अविभाज्य भाग आहे म्हणून तो वेगळा मोजला जात नाही.

प्रश्न: गुरुदेव, तुम्ही सांगितले आहे कि आपली जीवनामध्ये जी काही भूमिका आहे ती आपण १००% देवून पार पाडली पाहिजे. पण आपली भूमिका काय आहे हे कसे कळेल?

श्री श्री: आता तुमची जी काही भूमिका आहे, तीच आहे समजा! (प्रेक्षकांमध्ये हशा). 

प्रत्येक मनुष्य जीवनात वेगवेगळे भूमिका बजावतो. तुम्हाला जीवनात जी काही भूमिका मिळाली आहे तीच करा. काहीजण माता, पिता, पती, पत्नी असे वेगवेगळया भूमिका बजावतो.

समाजाचे चांगले नागरिक म्हणून तुम्ही भूमिका पार पाडा. तुम्ही बुद्धिमान व्यक्ती आहात किंवा एक भक्त किंवा गुरु, तुम्हाला जी काही भूमिका मिळाली आहे ती तुम्ही निर्भयपणे पार पाडा. त्या साठी काही करावे लागले तर ते करायला घाबरू नका.