24
2013
May
|
हाँगकाँग, चीन
|
आज पौर्णिमा आहे, बुद्ध पौर्णिमा. आजच्या दिवशीच बुद्धाचा जन्म झाला होता, आणि याच दिवशी त्याला साक्षात्कार झाला होता. तुम्हाला घरच्यासारखे मोकळे वाटते आहे का? औपचारिकता आपल्याला एका लांबच्या पातळीवर ठेवतात, आणि सत्संग हे एक माध्यम आहे दिलखुलास एकत्र येण्याचे. मोकळेपणाने वावरा, घरच्याप्रमाणे राहा, पूर्णपणे आरामात, कोणतीही औपचारिकता ठेवू नका. ज्याला आपण आयुष्य म्हणून समजतो ते एकदम इवलेसे सत्य वास्तव आहे. इथे प्रत्येक घटने मागे एक तरल जग दडलेले आहे, एक तरल स्तर ज्यामध्ये स्थूलतेपेक्षा जास्त शक्ती आहे. आज, वैज्ञानिकांनीसुद्धा हे सिद्ध केले आहे, आणि ते समान निष्कर्षाला आले आहेत. जगात घडणाऱ्या घटना, ज्या आपण पाहतो, त्या जणू काही आधीपासून अभिलीखीतअसलेल्या सीडीप्रमाणे आहेत. तरल जगामध्ये सर्व गोष्टींना गहन अर्थ आहे, आणि आपण सर्वांना तरल शरीर आहेत. एक आहे स्थूल शरीर, आणि एक आहे तरल शरीर, आणि तरलतेच्या पलीकडे आहे नैमित्तिक शरीर, आणि नंतर आपण ज्या घटनेला वास्तव समजतो ते जग. भौतिकशास्त्राचे फार मोठे प्राध्यापक असलेले जर्मनीचे प्राध्यापक डीहोरे माझ्याकडे बंगलोर आश्रमात आले आणि फार रोचक गोष्ट म्हणाले. ते म्हणाले, ‘गुरुदेव, मी गेले ४५ वर्षे पदार्थाचा अभ्यास केला केवळ हे शोधण्यास कि त्याला अस्तित्व नाही! म्हणून आज जेव्हा मी भाषण देतो तेव्हा लोकांना वाटते की मी बौद्ध किंवा इतर पूर्वेच्या तत्वज्ञानाविषयी बोलत आहे कारण मी म्हणतो की पदार्थाला अस्तित्व नाही, जे अस्तित्वात आहे त्या केवळ लहरी आहेत.’ ज्याला आपण पदार्थ समजतो तो वास्तवामध्ये पदार्थ नाही. पदार्थ इतर काही नसून केवळ लहरी आहेत. परिमाण भौतिक शास्त्र म्हणते की हे संपूर्ण विश्व आणखी काही नसून केवळ लहरींचे काम आहे. म्हणून प्राध्यापक डीहोरे म्हणतात की पदार्थाला अस्तित्व नाही, जे आपण पाहतो त्याला अस्तित्व नाही! जर तुम्ही स्वतःचे शरीर पाहाल तर त्या संपूर्ण शरीराला एक काडेपेटीमध्ये बांधता येईल. तुमच्या शरीरातील सर्व काही आकुंचित होऊ शकते. तितकीच स्थूलता तुमच्या शरीरात आहे, बाकी सर्व काही पोकळ आणि रिक्त जागा आहे. जर तुम्ही तुमच्या कातडीचा तुकडा सूक्ष्मदर्शिकेखाली धरला तर तो तुम्हाला मच्छरदाणीप्रमाणे दिसेल. त्यात बरीच रिकामी जागा दिसेल. आपल्या शरीराचा जवळजवळ ६० टक्के भाग हा पाण्याने बनलेला आहे, १५ टक्के वायू घटक आहे, आणि उरलेला ९० टक्के भाग हा अवकाश या घटकाने व्याप्त आहे. तर आपल्या शरीरात बाकी कशापेक्षा जास्त जागा आहे. तुमचे मन हे आकाशाप्रमाणे पूर्णपणे अवकाश आहे. भगवान बुद्ध तीच गोष्ट म्हणाले, ‘सर्वकाही काहीही नाहीये!’ तुमचे शरीर काही नाही, तुमचे मन काही नाही, जे तुम्ही पाहत आहात ते काही नाही, मी काही नाही, तुम्ही काही नाही! खरी गोष्ट तर ही आहे की सर्व काही कंपने आहेत, केवळ लहरी. संपूर्ण विश्व हे केवळ लहरी आहेत. अष्टावक्र गीतेच्या प्राचीन संहितेमध्ये, ‘तरंग फेन बुडबुडा ’ असे म्हटले आहे. संपूर्ण विश्व हे महासागराप्रमाणे आहे, आणि प्रत्येक व्यक्ती ही एका लाटेप्रमाणे आहे; लाटा उठतात आणि शांत होतात. त्याचप्रमाणे, हे सर्व शरीरे ८०, ९० वर्षांसाठी उठली आहेत आणि नंतर ती पुन्हा महासागरात परत जातील. पुन्हा उठतील आणि पुन्हा परतून जातील. अब्जावधी वर्षांपासून हे विश्व अविरहित सुरु आहेत, आणि हे ६०,८०,किंवा १०० वर्षांचे आयुष्य काहीही नाही. ते या महासागरात एका लाटेप्रमाणे आहे. गेले कित्येक वर्षांपासून लाटा उठता आहेत आणि पुन्हा परतून पाण्यात जात आहेत. जेव्हा तुम्ही जागे होता आणि हे काहीही नाही, सर्वकाही शून्य आहे हे तुमच्या लक्षात येते तेव्हा तुम्ही स्मितहास्य करता आणि त्यालाच निर्वाण म्हणतात! निर्वाण काय आहे? निर्वाणचा अर्थ आहे सर्वकाही शून्य आहे! जेव्हा तुमच्या हे लक्षात येते तेव्हा प्रचंड मुक्ती प्राप्त होते. प्राचीन शिकवणींचे हे सार आहे. हेच टाओ आहे, हेच वेदांत आहे, आणि हेच भगवान बुद्ध यांची शिकवण आहे. आज बौद्ध पौर्णिमेच्या औचीत्यावर मला भगवान बुद्ध यांच्या जीवनवर थोडे बोलायला आवडेल. जेव्हा भगवान बुद्ध यांनी जगातील दुःखे बघितली तेव्हा ते म्हणाले, ‘जीवनाला काही अर्थ नाही. जर तुम्ही म्हातारेच होणार आहात, आणि तुम्ही मरणारच आहात तर मग जगण्यात काय अर्थ आहे!’ जेव्हा त्यांनी एक आजारी मनुष्य, एक मृत व्यक्ती आणि एक साधू पहिले तेव्हा त्यांनी त्यांचा राजवाडा सोडला आणि अनेक वर्षे बसून तपस्या केली. त्यांना साक्षात्कार प्राप्त झाल्यानंतर सात दिवस त्यांनी एक शब्दसुद्धा उच्चारला नाही. देवदूत आणि तरल जगताचे देव हे काळजीत पडले. ते म्हणाले की भरपूर काळानंतर बुद्ध हे या ग्रहावर आले आहेत, ते काही का बोलत नाहीयेत? बुद्ध म्हणाले, ‘ज्या लोकांना माहिती आहे,त्यांना माहित आहे, आणि ज्यांना माहिती नाही, त्यांना माझ्या सांगण्यानेसुद्धा समजणार नाही. ते पैसा कमावण्यात, नातेसंबंध टिकवण्यात,भांडण्यात, खाण्यात आणि झोपा काढण्यात इतके गर्क आहेत की माझ्या सांगण्याने त्यांच्या डोक्यात काहीही शिरणार नाही.’ म्हणून त्यांनी सात दिवस मौन ठेवले, आणि नंतर सर्व देवांनी बुद्ध यांच्याबरोबर युक्तिवाद केला की या लोकांपैकी काही लोक हे सीमारेषेवर आहेत. जर तुम्ही त्यांना सांगितले तर त्यांना ते समजेल! असे लोक आहेत ज्यांना थोडीफार कल्पना असते आणि ज्यांना खरोखर माहित करून घ्यावयाचे असते,त्यांच्यासाठी तरी तुम्ही बोला. अशा प्रकारे भगवान बुद्ध हे बोलू लागले; सातव्या दिवसापासून. पौर्णिमेनंतरच्या सातव्या दिवशी, भगवान बुद्ध बोलू लागले, आणि त्यांनी काय म्हटले असेल तर, ‘हे सर्व काही शून्य आहे!’ आदि शंकराचार्यांनीसुद्धा हेच म्हटले, ‘तुम्ही जे पाहता आहात ते इंद्रजाल आहे, ही माया आहे.’ मायाचा अर्थ आहे ते सर्व काही जे मोजता येते, आणि जे परीवर्तनशील आहे. ज्याच्या परिवर्तन होते ती माया आहे. तुमच्या सभोवतीच्या सर्व गोष्टींमध्ये परिवर्तन येते, नाही का? भगवान बुद्ध म्हणाले, ‘सर्व काही शून्य आहे.’ आदि शंकराचार्य हीच गोष्ट किंचित वेगळ्या प्रकारे म्हणाले. ते म्हणाले, ‘हे सर्व संपूर्ण ब्रह्म आहे, हे सर्व एक आहे.’ सर्वांचा मूळाधार ही एकच उर्जा आहे, एकच दिव्यता आहे. आपण जे पाहतो ते स्वप्नवत आहे. मला तुम्ही ताबडतोब एका गोष्टीची अनुभूती करून पाहिजे. जागे व्हा आणि या क्षणापर्यंत बघा, तुम्ही इथे येईपर्यंत पहा तुमच्या जीवनात गेल्या ३०,५० वर्षात काय काय घडले, ते तुम्हाला स्वप्नवत नाही का भासत? तुमच्या मनाला पुढे आणि मागे घेऊन जा, हे मनाचे फास्ट फाँरवर्ड आणि रीवाइंड आहे. स्वतःचे मशीन हाताळण्यास शिका. आता फास्ट फाँरवर्ड करा. तुम्ही इथे बसलेले आहात, तुम्ही घरी परत जाल, रात्रीचे जेवण जेवल आणि झोपी जाल. उद्या तुम्ही उठाल, दात घासाल आणि आपल्या कामाला लागाल. दुसरा दिवस येईल, तिसरा दिवस येईल आणि जून येईल. नंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, आणि नववर्षाची पार्टी होईल. हे सर्व निघून गेले! हे सर्व दिवस निघून जातील. हे स्वप्नवत नाही का भासत? मी इथे उभा आहे आणि तुमच्याबरोबर बोलत आहे, हे स्वप्न असू शकेल काय? तुम्हाला कसे माहिती की हे वास्तव आहे? हे स्वप्न असू शकते. वर्तमान हे स्वप्न असू शकते, वर्तमानाला सवाल करा. भविष्य हे स्वप्नवत आहे. जर तुम्ही तुमचे लक्ष विस्थापित करू शकलात आणि वास्तव पाहू शकलात तर तुम्हाला याच्यावरचे दिसून येईल. याच्या वरती आणि याच्या पलीकडे काहीतरी आहे जे असते, जे फार सुंदर आहे, ते आहे स्वयं, हेच सत्य आहे. आणि तुम्हाला त्याच्यातून (स्वयंमधून) तुमच्या जीवनात इतकी अविश्वनीय शक्ती, अविश्वनीय उर्जा, अविश्वनीय प्रेम आणि सौंदर्य प्राप्त होईल के ते कशानेही ढळू शकणार नाही. तुम्हाला काय करणे जरुरी आहे? तुम्हाला केवळ जागे होणे आणि बटण चालू जरुरी आहे. हे बटण बंद करा, आणि दुसरे बटण चालू करा. तुम्ही त्रिमितीय चित्रे, ज्यामध्ये तुम्ही निरनिराळ्या कोनातून पहिले की वेगळेच काहीतरी दिसते, पहिली आहेत का? अशी चित्रे तुम्ही पहिली आहेत का? तुम्हाला हेच तर करणे जरुरी आहे. एका कोनातून तुम्हाला भिन्नातेचे जग आणि त्याची गुंतागुंत दिसेल, दुसऱ्या कोनातून तुम्ही एक निराळेच जग पाहाल, तुम्ही आता पाहत आहात त्यापेक्षा फार फार निराळे. आपल्याकडे बटण चालू व बंद करण्याची आणि दोन्हीची क्षमता पाहिजे. तेच तर अध्यात्म आहे, तीच शांतता आहे. एका क्षणाकरिता जागे व्हा आणि पहा, हे सर्व एक स्वप्न आहे, आणि सगळे काही टाकून त्या. त्याच क्षणी तुम्ही वैश्विक उर्जा, ब्रह्म, ॐ, तुम्ही ज्यापासून बनेलेल आहात ते सत्य यांच्यासोबत जोडले जाता! तर, आपण जगत असलेल्या जीवनाच्या या निरनिराळ्या मिती आहेत. जेव्हा तुम्हाला लोकांसोबत काम करायचे असते तेव्हा सर्व काही शून्य आहे हे तत्वज्ञान वापरू नका.तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकणार नाही! तसेच सर्व काही शून्य आहे हे लक्षात ठेवा. याने तुम्हाला आंतरिक शक्ती, अंतःस्फूर्तीची क्षमता,आनंद, समाधान, प्रेम आणि अनुकंपा प्राप्त होते. ही अजून एक पद्धत आहे. तर पद्धती बदलत राहा, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन कामावरून परत याल तेव्हा त्याच्यावर कृती करा! प्रश्न : मला केवळ सांगा, मी तुमच्याकरिता काय करू शकतो, आणि मी ते करेन! श्री श्री : आनंदी राहा आणि आनंद पसरवा. मला तुम्ही ज्ञानामध्ये खोलवर गेलेलात पाहिजे, आणि जगाला देणाऱ्यांपैकी एक असा, आनंद, ज्ञान आणि विवेक उत्सर्जित करा. हे मला तुम्ही करून पाहिजे. या ग्रहावर असलेल्या अब्जावधी लोकांपैकी,केवळ काही थोड्या लोकांनी जरी ज्ञान, प्रेम आणि आनंद उत्सर्जित केला तरी या ग्रहाचे फार भले होईल. हे असे भले होणे अतिशय जरुरी आहे. या काळामध्ये या ग्रहाकरिता तुम्ही फार मौल्यवान आहात. सेवा गटाला जोडून घ्या, आणि काही सेवा करा. प्रश्न : मनाला कसे काय नियंत्रित करावे? श्री श्री : तुम्हाला मनाला कशाला नियंत्रित करायचे आहे? जिथे जास्त आनंद आणि मजा असते तिथेच मन धावते. त्याला सोडून द्या! तुमच्या लक्षात येईल की खरा आनंद हा बाहेर नाहीये तर आत आहे. मन बाहेर सगळ्या दिशेने जाईल, आणि जेव्हा त्याला आनंद प्राप्त होणार नाही तेव्हा शेवटी ते आपणहून आतल्या दिशेने वळेल. जिथे कुठे प्रेम असते तिथे तुम्हाला मनाला नियंत्रित करण्याची गरज पडत नाही. जिथे कुठे रस असेल तिथे मनाला नियंत्रित करण्याची गरज पडत नाही. आपल्या मुलाला प्रेम करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात का? नाही! मुलांकरिता असणारे प्रेम हे उस्फुर्त, नैसर्गिक असते. त्याचप्रमाणे, जेव्हा सगळे रिते भासू लागते तेव्हा मन उच्च ज्ञान, विवेक आणि उर्जा यांच्याकडे जाते. हे फार नैसर्गिक आहे. प्रश्न : मन आणि हृदय हे एकाच प्रकारे कसे विचार करू लागतील? श्री श्री : माझ्या लाडक्या, हृदय विचार करीत नाही, त्याला केवळ जाणवते! मन फक्त विचार करते, त्याला काहीही जाणवत नाही. त्यांना आपापल्या जागी राहू द्या. तुमचा व्यवसाय हा मनाने करा आणि तुमचे जीवन तुमच्या हृदयाबरोबर व्यतीत करा. प्रश्न : एका व्यक्तीला जसे आहे तसे जीवनसाथी म्हणून कसे स्वीकारावे? श्री श्री : मला याचा काही अनुभव नाही! मला वाटते की तुम्ही सभोवती पहिले तर तुम्हाला अनेक सल्ले देणारे भरपूर लोक असतील. त्यांना विचारा आणि पहा त्याने तुमचे काम बनते का ते! अशाच ठिकाणी जीवनाच्या व्यावहारिक पैलूमध्ये वेदांत मदतीला येते. तुम्ही पाहाल तर संपूर्ण भूतकाळ निघून गेलेला आहे, ते एका स्वप्नासारखे होते, ते संपले आहे. निदान अतापुरते तरी, उत्साही व्हा! या क्षणी! जीवनाच्या प्रत्येक क्षणात उत्साह निर्माण करणे हे तुमच्या हातात आहे. हे तुम्ही कसे काय करू शकाल? जर तुम्ही तुमच्या भूतकाळाला घट्ट धरून बसलात तर तुम्ही हे करू शकणार नाही. तुम्हाला तुमचा भूतकाळ केवळ झटकून टाकायचा आहे. त्याला सोडून द्या. ठीक आहे, काल तुमच्याकडून चूक घडली, हरकत नाही. काही सुखद गोष्टी घडतात, काही अप्रिय गोष्टी घडतात, काही चांगल्या गोष्टी घडतात, काही वाईट गोष्टी घडतात. सगळय फेकून टाका!! आता या क्षणी वातावरणात सकारात्मक उर्जा आणि उत्साह निर्माण करणे, आणि परिवारामध्ये अधिकाधिक प्रेम आहे हे बघणे हे तुमचे काम आहे. काय आपण सगळे हे करू शकतो? हे आहे ज्ञानामध्ये जीवन जगणे होय! सहा महिन्यांनी किंवा वर्षभरानंतर जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर बसा आणि तासभर तक्रार करा आणि नंतर त्याबद्दल विसरून जा. पण रोज असे करू नका. सतत चांगले असल्याचा देखावा करा असे मी म्हणत नाही. जीवन हा सर्व गोष्टींचा मिलाफ आहे, कधी भांडण, राग, आणि आनंद. जीवनाला विविध रंग असले पाहिजे; तुमच्या जीवनात सर्व रंग असणे जरुरी आहे, केवळ एकच रंगछटा नको. तसेच, मनाच्या सर्व प्रकारच्या या फडफडण्यातून तुम्ही चुटकीसरशी बाहेर यायला पाहिजे, आणि हे ज्ञान तुम्हाला मदत करेल. रोज सकाळी उठा आणि म्हणा, ‘शिवोहं, मी आहे चैतन्य, पवित्र आणि सुंदर.’ तर, आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी, ‘सर्व काही शून्य आहे’, हा सुंदर संदेश आपल्यासोबत घेऊन जा. ‘अप्पो दीपो भाव’ ,याचा अर्थ आहे, तुम्ही स्वतःचा प्रकाश आहात. तुम्ही प्रकाश आहात. तर आता आनंदाने घरी जा आणि झोपायच्या आधी हे सर्व ज्ञानाचे मुद्दे आठवा. ते तुमच्या सचेतन बुद्धीमध्ये काही वेळा आणणे चांगले असते. पुढचे दोन दिवससुद्धा जर तुम्ही या ज्ञानाची उजळणी करीत राहिलात तर ते तुमच्यासोबत अधिक काळ टिकेल. दोन गोष्टी आहेत. एक आहे श्रवण, याचा अर्थ आहे ऐकणे. दुसरे आहे मनन, याचा अर्थ आहे ज्ञान थोड्या अवधीकरिता तुमच्या मनात, तुमच्या सचेतन अवधानात आठवणे. दोन्ही महत्वाचे आहेत आणि दोन्हीमुळे बरीच मदत होईल. तुम्हाला काय लक्षात ठेवणे जरुरी आहे की सर्व काही शून्य आहे, हे सर्व एक स्वप्न आहे. भूतकाळ स्वप्न आहे, भविष्यकाळ स्वप्न आहे, आता वर्तमान काळ स्वप्न आहे; जग हे स्वप्नवत आहे. आणि तुम्ही स्वतःचा प्रकाश आहात. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'