बनानाज टू ब्लिस (केळ्यांपासून ते परमानंदापर्यंत)

16
2013
May
बंगलोर, भारत

प्रश्न : गुरुदेव, आम्ही घरी परत जाताना तुमचा कोणता संदेश घेउन जावा ?

श्री श्री : बघा, हे म्हणजे असं झालं की तुम्ही एखाद्या सुपर मार्केट मध्ये जाता आणि विचारता की, ‘इथून मी घरी काय घेऊन जाऊ ?’ (हशा) दुकानातले लोक काय म्हणतील ? ते म्हणतील, ‘ तुम्हला जे नेता येईल ते न्या.’

तर, इथे (आश्रमात)सगळे काही उपलब्ध आहे, परमानंदापासून ते केळ्यांपर्यंत. (हशा) काही लोक इथे काहीशा श्रद्धेने येतात आणि एक केळ्याचा तुकडा घेऊन जातात, जो त्यांना गोड लागतो. काही लोक संपूर्ण श्रद्धेने इथे येतात आणि परमानंद घेउन जातात. त्यामुळे, तुम्हाला जे हवे ते मागा आणि तुमची इच्छ असेल ते घेउन जा. तुमच्या सगळ्या समस्या आणि प्रश्न इथे टाकून जा.

प्रश्न : गुरुदेव, अष्टावक्र गीतेत म्हटले आहे की, ‘मी करतो, या भ्रमात राहू नका कारण तुम्ही कर्ता नाही आहात,’ आणि गीतेत म्हटले आहे की,’ जेव्हा तुम्ही स्वत:मध्ये प्रस्थापित होता तेव्हा निवडीची संधी असते.’ आपण कर्ता नाही आहोत, तर मग आपल्याला निवडीची संधी कशी असेल ?

श्री श्री : ज्ञानाचे अनेक स्तर असतात. जेव्हा तुम्ही कर्ता नसता तेव्हा कर्माची फळे उपभोगणारेही तुम्ही नसाल. आणि जेव्हा तुम्ही कर्माची फळे भोगणारे नसता तेव्हा मग निवडीच्या संधीचा प्रश्न कुठे येतो ? तुम्हाला कळते आहे कां ? जसे क्वांटम फिजिक्समध्ये म्हणतात की, प्रत्येक गोष्ट अणू रेणूंनी बनलेली आहे. म्हणजे कोळसा आणि हिरा दोन्ही अणूंनी बनलेले आहेत.

अशा प्रकरणी जर तुम्ही बघीतले तर कोळसा आणि हिरा यात काहीच फरक नाही कारण दोन्ही एकाच अणूपासून बनलेळे आहे. पण प्रत्यक्षात तुम्ही कोळशाच्या जागी हिरा वापरू शकत नाही आणि कोळशाच्या कुड्या कानात घालू शकत नाही.

तर, प्रत्यक्ष सत्य आणि आध्यात्मिक सत्य यात फरक आहे. आणि जेव्हा तुम्ही जीवनात हे दोन्ही एकत्रितपणे आत्मसात करता तेव्हा तुम्ही पूर्णत्व अनुभवता.

जर तुम्ही असे म्हणत राहिलात की, ‘मी कर्ता नाहिये पण मी माझ्या कर्माची फळे भोगतोय.’ तर ते चूक आहे. ज्या ज्या वेळी तुम्ही कर्माची फळे भोगता त्या त्या वेळी आपोआपच तुम्ही कर्ता बनता.

म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात, ‘किं कर्म किंकर्मेती, कवयोऽप्यत्र मोहिता:’ (४.१६)

‘कोणते कर्म करायचे आणि कोणते करायचे नाही याचा निर्णय घेताना अगदी जेष्ठातले जेष्ठ संत आणि अति बुद्धिमानही गोंधळून जातात. कर्म म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो पण त्याआधी तुम्हाला योगी ( योग मार्गावर दृढ असणारा) बनायला हवे.’ 

एकदा तुम्ही योगी बनलात की, तुम्ही जी काही कृती कराल ती अगदी सहज आणि विनासायास सर्व अंगांनी योग्यच होईल.

प्रश्न : गुरुदेव, जर प्रेम म्हणजे आनंद आणि उल्हास पसरवणे आहे, तर मग त्याने इतके क्लेश कां होतात ?

श्री श्री : तुम्हाला माहितीये, या पृथ्वीतलावर आपण येतो तेव्हाचा पहिला अनुभव क्लेश असतो. जेव्हा आपण मातेच्या उदरातून बाहेर येतो तेव्हा ते क्लेशकारक असते.

माता आणि बाल दोघांनाही क्लेशकारक असते. मूळ नऊ महिने काहीही न करता आनंदाने मातेच्या उदरात तरंगत असते. त्याला परस्पर अन्न पुरवले जात असते. त्याला काही चावावेही लागत नाही. एक बाळ म्हणून नऊ महिने तुम्ही अगदी परमानंदात होतात आणि अचानक पाणी नाहीसे झाले आणि तुम्हाला त्या सुखद क्षेत्रातून बाहेर यावे लागले. ते तुमच्यासाठी क्लेशकारक होते. तर, हा तुमचा पृथ्वीतलावर येण्याचा पहिला अनुभव होता. तुम्ही पहिल्यांदा आलात तेव्हा ते इतके क्लेशकारक होते की तुम्ही रडू लागलात. जर तुम्ही रडला नसतात तर आई वडील रडले असते ! तर, तुम्ही राद्लात आणि तुमच्या भोवतीचे लोक हसले. (जन्मामुळे झालेल्या आनंदाने आणि हर्षाने) विचार करा, जन्मल्यानंतर तुम्ही रडलात आणि बाकीचे सगळे खुश झाले.

तुमचा दुसरा अनुभव होता प्रेम. जन्मा झाल्यानंतर तुमच्या आईने जेव्हा तुम्हाला कुशीत तेव्हा तुम्हाला केवढेतरी प्रेम आणि काळजी जाणवली. घरातल्या सर्वांनी तुमच्यावर प्रेम केले. तुमची आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी, सगळेच. सगळ्यांनीच तुमच्यावर इतके प्रेम केले आणि लक्ष दिले. पण हे सगळे थोडेसे क्लेश सहन केल्यानंतर मिळाले. हो की नाही ? तर, क्लेश, वेदना हा प्रेमाचाच भाग आहे आणि तुम्ही ते कडू गोळीप्रमाणे गिळून टाकायला हवे. तुमच्यासाठी ते चांगले असते. क्लेशापासुन दूर पळून जायचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही क्लेशापासुन प्रेदूर पळालात तर प्रेमापासूनही दूर जाल.

प्रश्न : गुरुदेव, विविध गुण संपन्न होण्यासाठी, आपण आपली शक्ती आणेल क्षेत्रात खर्च करतो आणि शेवटी कशातच यश मिळत नाही. आम्ही काय करावे ?

श्री श्री : आत्ता लहान असताना तुम्ही याचा विचार करायची गरज नाही. अनेक कलागुण जोपासायची हीच वेळ आहे. जेव्हा तुम्ही तुमची विशी ओलांडाल तेव्हा एकच गोष्ट टिकून राहील. पण त्याआधी कोणती एकच गोष्ट करायची त्याची काळजी करू नका. नाही, मी याच्याशी सहमत नाही. आत्ता तुम्ही सगळ्या गोष्टी शिकून घ्यायला हव्या.

तुम्हाला शक्य तितक्या जास्तीत जास्त कला जोपासा. तुम्हाला जितक्या भाषा शिकता येतील तितक्या शिका. हीच शिकण्याची वेळ आहे. तुम्ही संगीत,स्वयंपाक, खेळ, चित्रकला इत्यादी सगळ्यात प्राविण्य मिळवायला हवे. आणि नंतर बघा काय काय टिकून रहाते ?

प्रश्न : अपराधीपणाच्या भावनेतून कसे मुक्त व्हावे ?

श्री श्री : तुमच्या अपराधीपणाच्या भावनेतून तुम्हाला आत्ता लगेच मुक्त कशाला व्हायचे आहे ? थोडीशी अपराधीपणाची भावना ही खरं म्हणजे तुमच्यासाठी चांगली आहे. त्या अपराधीपणाची थोडीशी टोचणी तुम्हाला त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करण्यापासून वाचवेल. त्यामुळे धोदेसे अपराधी वाटणे ठीकच आहे. पण जर त्याचे प्रमाण खूपच वाढले तर मग आपण बघू.

प्रश्न : गुरुदेव, जेव्हा तुम्ही बंजारा नदीजवळ कुंभमेळ्यात आला होतात तेव्हा तिथे काही नागा स्वामी होते. ते खूपच भयानाक दिसत होते. ते असे कां रहातात ?

श्री श्री : मला देखील नवल वाटते की ते असे कां रहातात. (हास्य) कदाचित त्यांनी कधीच गीता वाचली नाही. श्रीकृष्णाणे हे मान्य केले नसते. त्यामुळेच श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे ,‘नाहं प्रकाश: सर्वस्व योगमाया समावृत: मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् (७.२५)  

ते म्हणतात, ‘या लोकांना मी माहित नाही.’

असे लोक स्वत:च्याच जगात हरवलेले असतात आणि स्वत:लाच त्रास करून घेतात. पण त्यांच्यातच तुम्हाला काही महान लोकही सापडतील. तेव्हा तुम्ही त्यांच्या बाह्य रूपावरून, त्यांच्यावर चांगले किंवा वाईट असा शिक्का मारू नका.

आपल्याला हे मान्य करायला हवे की, या देशात निरनिराळ्या आध्यात्मिक परंपरा आणि निरनिराळ्या विचारधारा आहेत.

प्रश्न : गुरुदेव, असे म्हणतात की जेव्हा एखाद्याचे पाप भरले की त्याला साधना करावीशी वाटत नाही किंवा सत्संगला जावेसे वाटत नाही. पण जर एक वेळ अशी आली की जर आपल्याला याची जाणीव झाली की आपल्या विशिष्ठ कर्मामुळे हे होते आहे तर मग आपल्या पुरुषार्थाने यावर मात करू शकू कां ?

श्री श्री : होय, नक्कीच. हीच हुशारीही आहे. असे लोकच बुद्धिमान असतात. तुम्ही त्यांना मूर्ख किंवा अज्ञानी म्हणू शकत नाही. जेव्हा तुम्हाला तुमच्या हातून घडलेली चुकीची गोष्ट माहित असेल तेव्हा ही नकारात्मक कर्मे पुसून टाकण्यासाठी साधना आणि सत्संगची तुम्हाला मदत होऊ शकते.