15
2013
May
|
बंगलोर, भारत.
|
भगवतगीतेच्या सातव्या अध्यायाच्या सतराव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
"तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तीविर्शिश्यते |
प्रियो हि ज्ञानिनोsत्यर्थमहं स च मम प्रियः |"
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ' मला शरण जाणारे लोक साधारणपणे चार प्रकारचे असतात. त्यात पहिले म्हणजे दुखी , दुसरे म्हणजे ज्यांना ऐहिक सुखाची अपेक्षा असते असे, तिसरे म्हणजे जिज्ञासू आणि चवथे म्हणजे ज्ञानी. या सर्वांपैकी ज्ञानी मला सर्वात प्रिय असतो कारण त्याची भक्ति हि माझ्याशी एकरूप झालेली असते. तसेच जे लोककाही ऐहिक सुखाची अपेक्षा ठेऊन मला शरण जातात ते असतात. कारण त्या क्षणाला त्यांची भक्ति हि परमोच्च असते. परीक्षेच्या काळात सर्व विद्यार्थी रोज देवळात जाऊन देवाला चांगले गुण मिळविण्यासाठी प्रार्थना करीत असतात. पण एकदा का परीक्षा संपली कि मग देऊळ कोठे आहे हे ते विसरून जातात.मग त्या सर्वांना फक्त चित्रपटगृह दृष्टीला पडतात.(हशा) असे लोक हे आत्म केंद्रित असतात आणि ते फक्त काही उद्धेश ठेऊन (देवाकडे) येतात. त्याचप्रमाणे जिज्ञासूलोक हे त्यांची ज्ञान जिज्ञासा भागविण्यासाठी देवाकडे वळतात. हे जिज्ञासू लोकपण आत्म केंद्रित असतात आणि म्हणून त्यांच्या देवभक्तीमध्ये काही न्यून दिसून येते. पण ज्ञानी माणसाचे असे नसते. ज्ञानी माणूस हा समाधानी असतो आणि या अशा सदैव समाधानी माणसाची भक्ति हि नेहमी अविरत, अद्वितीय आणि एकरूप अशी असते. मग त्याच्या काही इच्छा पूर्ण व्हायच्या असोत किंवा नसोत त्याची भक्ति हि सदैव तशीच असते. दुख्खात किंवा सुखात असताना त्याच्या भक्तीत काही बदल होत नाही. लाभ किंवा हानी या दोन्ही अवस्थात त्याची भक्ति हि अढळ असते. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात कि ' असा ज्ञानी माणूस हा नेहमी माझ्याशी जोडलेला असतो आणि मी त्याच्याशी जोडलेला असतो.' जो माझ्याशी जोडलेला असतो तो ज्ञानी असतो, आणि अशा ज्ञानी माणसाची भक्ती हि अविरत आणि एकरूप अशी असते. असा ज्ञानी मनुष्य मला नेहमी प्रिय असतो आणि मी त्याला नेहमी प्रिय असतो. माझ्याशिवाय इतर कोठल्याच गोष्टीत त्याला रस नसतो आणि त्याच्यासाठी मी सर्वस्व असतो. आणि मग ज्या कोणाला मी असा प्रिय असतो, तो सुद्धा मला सर्वात प्रिय होतो. भगवतगीतेच्या सातव्या अध्यायाच्या अठराव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
"उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम |
आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्माम गतीम |"
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, 'याचा अर्थ असा नव्हे कि बाकीचे भक्त चांगले नाहीत. नाही, ते सर्व चांगले आहेत आणि निःसंशय हे सर्व भक्त मनुष्यात चांगले आहेत. मग ते माझ्याकडे दुखः दूर करण्याची मागणी घेऊन आले असतील किंवा काही ऐहिक सुखाची अपेक्षा ठेऊन आले असतील किंवा उत्सुकतेपोटी आले असोत, ते सर्व उत्तम आणि धार्मिक असेच आहेत. ते काही कामाचे नाहीत असे समजू नका. सर्वसाधारणपणे, जेंव्हा आपण एकाला उत्तम म्हणतो तेंव्हा बाकीचे नगण्य समजले जातात. आणि मग ती आपली सवय होऊन जाते.जर कोणी एखादा चांगले असेल तर मग बाकीचे वाईट ठरतात. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण लगेचच असा खुलासा करतात कि ' हे चार हि प्रकारचे लोक चांगले असतात.म्हणून त्यांचावर टीका करू नका. त्यापैकी कुणा एकाला दुसऱ्यापेक्षा कमी समजू नका. तो कोणत्याही कारणांने भक्ति करीत असेल, मग तो दुखीः आहे म्हणून किंवा त्याच्या भौतिक सुखासाठी असेल म्हणून, किंवा त्याला ज्ञानाची तृष्णा असेल म्हणून, ते सर्व चांगलेच आहेत. पण मी आणि ज्ञानी मनुष्य यात काहीच फरक नाही. तो आणि मी एकच आहे.असा ज्ञानी माणूस माझ्याशी एकरूप होऊन त्याचा उद्धार होतो. देव, गुरु आणि आत्मन (स्वतः) यात काही फरक नाही.म्हणून वासुदेव (श्रीकृष्णाचे अजून एक नाव)आणि ज्ञानी मनुष्य यात काही फरक नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात कि ‘ ज्ञानी मनुष्य हा आरश्याप्रमाणे असतो.तुम्ही जर ज्ञानी माणसात डोकावून पाहिलेत तर तेथे तुम्हाला तुमच्या मनाचे प्रतिबिंब पाहायला मिळेल.तुम्हाला तुमचे स्वत्व त्या ज्ञानी माणसात प्रतिबिंबित झालेले दिसेल.म्हणून त्याज्ञानी माणसात मला पाहायला लक्षात ठेवा आणि तो म्हणजेच मी आहे असे ध्यानात ठेवा. भगवतगीतेच्या सातव्या अध्यायाच्या एकोणिसाव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
“बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मा प्रपध्यते |
वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः|”
अनेक जन्म-मरणाच्या चक्रातून गेल्यानंतर ज्ञान प्राप्त होऊन ज्ञानी होतो. असे ज्ञानी आत्मे, ज्याचा माझ्यावर विश्वास आहे ते अनेक जन्म-मरणाच्या चक्रातून गेल्यानंतर मला प्राप्त करतात.असे पुण्यात्मे, कि ज्यांना माहित असते आणि जे असा विश्वास ठेवतात कि हि सर्व माझीच माया आहेआणि दुसरे काही नाही, ते पुण्यात्मे खरोखरच दुर्मिळ असतात. तुमच्यापैकी अनेक जन असा विचार करीत असतील कि’ हे सत्य समजण्यासाठी मला अजून किती जन्म घ्यायला लागतील कोण जाणे’. मी तुम्हाला सांगतो कि आज येथे हे ज्ञान मिळविण्यासाठी जेंव्हा तुम्ही आला आहात, तेंव्हा तुम्ही अनेक जन्म-मरणाची चक्रे पार केलेली आहेत. तुम्ही अनेक जन्म- मरणाची चक्रे पार करून तुम्ही येथे योग्य वेळी पोहोचला आहात. याच्या विरुद्ध विचार करू नका, ‘ हे ज्ञान मिळविण्यासाठी अजून किती जन्म घ्यावे लागणार आहेत कोणास ठाऊक?’ या बाबतीतील तुमची कल्पना अगदी या क्षणाला बदलून टाका. आपण आपली एखाद्या गोष्टीविषयीची कल्पना केंव्हाही बदलू शकतो.अगदी देवापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा, आपल्याला एका गोष्टीची गरज असते आणि ती म्हणजे फक्त आपला बघण्याचा दृष्टीकोन बदलणे. त्यासाठी दुसरे काही करायची गरज नाही. त्यासाठी तुम्ही आराम करून बाकी सर्व कसे सोडून द्यायचे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता जेंव्हा तुमचे मन हे जगातील अनेक सुंदर गोष्टींकडे आकर्षित होत असताना तुम्ही हे सर्व कसे सोडून देणार. अनेक वेळा तुम्ही तुमच्या वाईट सवयी सोडून देऊ इच्छिता पण तुम्ही त्या सोडू शकत नाही.पण मग जेंव्हा तुम्ही तुम्हाला त्रासदायक आणि दुखः देणाऱ्या त्या वाईट सवयी सोडू शकत नाही तर तुम्हाला आकर्षित करणाऱ्या सुंदर गोष्टी तुम्ही कश्या सोडू शकणार? जेंव्हा तुम्ही त्या त्रासदायक तसेच सुखकारक अशा गोष्टी सोडू शकत नाही तेंव्हा तुमचे मन दोलायमान होते. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण भगवत गीतेच्या सातव्या अध्यायाच्या अकराव्या श्लोकात म्हणतात, बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम. जेंव्हा तुम्हाला शक्तीची जाणीव होईल तेंव्हा तेथे मी आहे असे खात्रीने समजा. शक्तिवान माणसाची शक्ती मी आहे. जेंव्हा तुम्हाला कोठे चमक दिसेल तर ती चमक म्हणजे मी होय असे समजा. जेंव्हा तुम्हाला काही सुंदर गोष्ट दृष्टीला पडेल तेंव्हा ती म्हणजे मी होय असे समजा. जेंव्हा तुम्हाला कोणी बुद्धिमान दिसेल तेंव्हा त्याची बुद्धी म्हणजे मी होय असे समजा. तुम्ही सौंदर्य सोडून देऊ शकत नाही आणिते पकडून ठेऊ शकत नाही. तुम्ही जर ते पकडायचा प्रयत्न केला तर तुम्ही तसे करू शकणार नाही.खरे पाहता जेंव्हा आपण सौदर्य आपल्या ताब्यात ठेवायचा प्रयत्न करीत असतो तेंव्हा अनेक प्रश्न उद्भवतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘ अनेक जन्मानंतर, ज्ञानी माझ्याकडे येतात आणि मला शरण जातात.’ ज्ञानी लोकांचे अनेक स्तर असतात.आणि अनेक वेळेला काही ज्ञानी लोकांना अहंकाराची बाधा होते आणि ती त्यांच्या विनाशाला कारणीभूत होते. ते असा विचार करतात ‘ मी सर्वात ज्ञानी आहे, माझे ज्ञान हे इतर कोणापेक्षा जास्त आहे.’ असे लोक काही काळ ज्ञानी वाटतात पण लवकरच ते अज्ञानात नाहीसे होतात. ‘मी ज्ञानी आहे’ एवढा विचार अहंकार जागृत करायला पुरेसा असतो.त्याला दुर्हंकार असे म्हणतात. आणि जर एखाद्याला आपण ज्ञानी असल्याचा अहंकार उत्पन्न झाला तर त्याचा परिणाम हा फार वाईट होतो. अशी विचारसरणी असलेले लोक हे शास्त्रज्ञ आणि हुशार , बुद्धिवान माणसात पाहायला मिळतात.असे लोक जेंव्हा ज्ञानाच्या एका पातळीवर पोहोचतात तेंव्हा त्यांना असे वाटते कि त्यांनाच सर्व काही कळते आणि मग ते दुसऱ्या कोणाचे काही ऐकून घेत नाहीत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘ एक ज्ञानी मनुष्य जो भक्त पण आहे, ज्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, आणि जो जगातली प्रत्येक गोष्टीत मला पाहतो, तो महात्मा’. हा ज्ञानी आणि महात्मा यातील फरक होय. जो महत तत्व च्या पलीकडे गेला आहे ( असे तत्व कि जे अहंकारापेक्षा सूक्ष्म आहे) तो महात्मा. ज्याप्रमाणे प्रकृतीचे आठ प्रकार असू शकतात- पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अवकाश, मन, बुद्धी आणि अहंकार, ( दैवी उर्जेच्या आठ प्राकृतिक अभिव्यक्ती) , महा तत्व हे याअहंकाराच्या पलीकडले असून ते अगदी सूक्ष्म आहे. जो अहंकाराच्या पलीकडे गेलेला आहे आणि ज्याने महा तत्वाचा अनुभव घेतला आहे तो महात्मा. हाच तर बुद्धी आणि ज्ञान यातील फरक आहे. ज्ञान हे बुद्धीतून निर्माण होते, पण जेंव्हा त्याला अहंकाराचा स्पर्श होतो तेंव्हा ते अज्ञानात परिवर्तीत होते. मग अशा मनुष्याचे अधःपतन सुरु होते. ज्ञानाबद्धलचा अहंकार सर्वात घातक असतो आणि तो मग अधःपतनाला कारणीभूत होतो. आता कोण या अहंकाराच्या पलीकडे जाऊ शकतो? फक्त एक भक्त अहंकाराच्या पलीकडे जाऊ शकतो. भक्त होणे म्हणजे नम्र,साधे आणि स्वाभाविक असणे होय. भक्त अगदी वेड्याकडून पण शिकायला तयार असतो, जो लहानमुलाकडून शिकायला तयार असतो, किंवा एक स्त्रीकडून, किंवा पुरुषाकडून, जो कोणाकडून हि ज्ञान मिळवायचा प्रयत्न करतो,कारण त्याला त्या सर्वात देव दिसत असतो, आणि असे नेहमी दुर्मिळ असते. जो सर्वत्र दैवी तत्वाचा अनुभव घेत असतो,तोच महात्मा. असा माणूस जो कि त्याला शिव्या-शाप देणाऱ्या मध्येपण वासुदेवाला पाहतो, आणि त्याची स्तुती करणाऱ्यात पण वासुदेवाला पाहतो, असा दुर्मिळ असतो कारण तो केवळ बाह्यरंग न बघता त्याच्या अंतर-आत्म्याला पाहत असतो आणि वरच्या देखाव्याला भुलत नाही. याचा अर्थ असा नव्हे कि ‘वासुदेव, वासुदेव “ म्हणत तुम्ही मुलांच्या मागे लागा, असे केल्याने ती घाबरून जातील. तुम्ही नेहमीसारखे वागले पाहिजे पण तुमच्या मनात अशी खूण-गाठ बांधली पाहिजे कि हे सर्व एकाच दैवी तत्त्वातून निर्माण झाले असेऊन त्याचाच एक भाग आहेत. चित्रपटातील नायक आणि खलनायक हे एकाच तत्त्वातून आलेले असतात.पडद्यावर दिसणारे सर्व एकाच दिव्याच्या भिंगातून येत असतात. तुम्ही तो चित्रपट आणि त्यातील अभिव्यक्ती यात न गुंतता ते दाखविणाऱ्या दिव्याच्या भिंगाकडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे. ते दैवी भिंग, तो दैवी दिवा म्हणजे वासुदेव होय, ती एक विशुद्ध जागृतीची जाणीव ज्यातून हे सर्व उत्पन्न झाले आहे आणि ज्याच्या आधारावर हे सर्व चालू आहे ते. हे सर्व म्हणजे त्या एकमेव जाणिवेचे खेळ आहेत आणि तीच जाणीव तुमच्यात पण आहे. म्हणून ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या नाटकात भाग घेता, जेथे प्रत्येकाला एक भूमिका असते, तुम्ही पण तुमच्या वाट्याला आलेली भूमिका पार पाडा. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'