15
2013
May
|
बंगलोर, भारत
|
आज शंकराचार्य जयंती आहे. हा आदी शंकराचार्यांचा ( भारतीय तत्वज्ञानाच्या अद्वैत विचारसरणीचे थोर गुरु) जन्म दिवस आहे. आदी शंकराचार्यांनी अद्वैत तत्वज्ञानाचा प्रसार केला. अद्वैत म्हणजे हे सर्व एकपासून तयार झाले आहेत. अद्वैतात असे म्हटले आहे कि ‘ सर्वं खल्विदं ब्रम्हम’, म्हणजे हे सर्व एका ब्रम्हण पासून तयार झाले आहे किंवा एक चेतनेपासून तयार झाले आहे, हे सर्व वासुदेव (भगवान श्रीकृष्णाचे एक नाव) आहे. म्हणून तुम्ही जी विविधता पट ती वस्तुतः नाहीये. वस्तुस्थिती हि नेहमी अदृश्य असते, ती नेहमी अनुभवायची असते. ती पूर्वी मिळणाऱ्या प्राण्यांच्या आकाराच्या बिस्किटा सारखी आहे. तुम्ही ती बिस्किटे बघितली आहे काय? ती सगळे वेगवेगळ्या आकारात मिळायचची-मांजर, कुत्रा, घोडा, हत्ती. मुलांना त्या बिस्किटाशी खेळायला खूप आवडायचे. म्हणून एकाच प्रकारचे समान वापरून त्याची वेगवेगळ्या आकाराची बिस्किटे बनवली जायची. आज तुम्हाला वेगवेगळ्या प्राणांच्या आकाराची चोकलेट बघायला मिळतात. पण शेवटी ती एकाच प्रकारच्या चोकलेटने बनवलेली असतात. होय कि नाही? आणि त्या सर्वांची चवही सारखीच असते. पण त्यातील वैविध्य पाहून मुले हरखून जातात.म्हणजेच जरी ती वरवर वेगळीवाटत असली तरी आतून ती सर्व एकच असतात. आपण ज्या गोष्टी बघत असतो, त्या मायेच्या प्रभावामुळे जरी वेगवेगळ्या वाटत असल्या तरी ते वेगवेगळेपण खरे नव्हे. आदी शंकराचार्यांची एक गोष्ट सांगतात. एकदा, आदी शंकराचार्य सांगत होते कि’ हे सर्व जग, जे काही आहे, ते काहीच नाहीये’. म्हणजेच ते असे सांगत होते कि ‘हे काहीच नाहीये’. हल्लीच्या शास्त्रज्ञ जसे सांगतात कि ‘ ह्या सर्व गोष्टी नाहीयेत, कारण त्या फक्त लहरी आहेत’. ते जेंव्हा असे सांगत होते कि ‘ हे सर्व काही नाहीये’, तेवढ्यात एक पिसाळलेला हत्ती त्यांच्या रोखाने पळत येताना दिसला.त्याला पाहताच शंकराचार्य ती जागा सोडून आडोश्याला जाऊन उभे राहिले. तेंव्हा कोणीतरी म्हणाले कि,’ हा हत्ती म्हणजे काहीच नाहीये, तर तुम्ही असे आडोशाला का उभे राहिलात?’ तेंव्हा शंकराचार्य म्हणाले कि, ‘ तो हत्ती म्हणजे काही नाही आणि माझे पळणे हे सुधा काही नाहीये’. अशी शंकराचार्यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता होती आणि ती तशी फार थोड्या लोकांच्यात असते. जे त्यांनी हजार वर्षापूर्वी सांगितले तेच आजचे विज्ञान सांगत आहे. आपण त्याला वेगवेगळ्या नावांनी आणि सिद्धांतांनी ओळखतो जसे कि सापेक्षवादाचा सिद्धांत. पण ते सर्व एकच आहे. हे सर्व त्या एकाचा विस्तार आहे. प्रोफेसर डी’हुरेहाड नावाचे एक ख्यातनाम शास्त्रज्ञ नुकतेच येथे येऊन गेले. हे मला म्हणाले कि ते पदार्थ विज्ञान गेली ४५ वर्षे शिकत आहेत. ते म्हणाले कि ‘ गुरुदेव, मी ४५ वर्षे पदार्थ विज्ञान शिकलो आणि असे लक्षात आले कि ते अस्तित्वात नाही. मी जेंव्हा भाषण देत असतो तेंव्हा लोकांना असे वाटते कि मी बुद्धिझम किंवा पूर्वेकडील तत्सम तत्वज्ञानावर बोलत आहे, कारण मी सांगतो कि ‘ ह्या सर्व गोष्टी नाहीयेत, कारण त्या फक्त लहरी आहेत’. आज विज्ञान काही निष्कर्ष काढू लागले आहे, जसे कि ‘ जे दिसते ते तसे नाहीये, आणि जे दृष्टीला पडत नाही तेच सत्य आहे. हे सर्व वासुदेव (भगवान श्रीकृष्णाचे एक नाव) आहे. आता मी जेंव्हा असेम्हणतो कि हे सर्व वासुदेव आहे, तेंव्हा असा विचार करू नका कि तेथे कोणीतरी मोरपिसांचा मुकुट घालून, भडक पिवळ्या रंगाचे कपडे घालून, झाडाखाली राधे बरोबर हातात बासरी घेऊन ( भगवान श्रीकृष्ण यांचे वर्णन) उभे असेल.तुम्ही जर असा विचार करीत असाल तर तुम्ही आश्चर्य करीत बसाल कि अशी कितीक वर्षे ते हातात बासरी घेऊन उभे आहेत आणि अशी अनेक वर्ष बासरी हातात धरून त्यांचे हात दुखायला लागले असतील (हशा). असा काही गैरसमज करून घेऊ नका. आणि म्हणून भगवतगीतेच्या नवव्या अध्यायातील अकराव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
अवजानन्ति मां मूढा मानुषी तनुमाश्रीतम |
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम |
ते अर्जुनाला असे सांगतात कि, ‘ लोक मला एक मनुष्यमात्र समजतात (म्हणजे शरीरापर्यंत मर्यादित), ते मला ओळखू शकत नाहीत. मी म्हणजे एक अशी चेतना आहे कि ज्यातून हे सर्व उत्पन्न होते आणि ज्या मुळे हे सर्व अस्तित्वात राहते. सर्वत्र आणि सर्वांमध्ये वासुदेव पाहणारे महात्मे हे खरोखरच दुर्मिळ आहेत. असे काही लोक आहेत कि जे समजतात कि, ‘ वासुदेव सर्वत्र आहे, पण माझ्यात नाही. मी फक्त एक सेवक आहे. मी अगदी मामुली असून भगवंताच्या पायाची धूळ व्हायची पण माझी लायकी नाही. मी अगदी नगण्य आहे. नाही, असा विचार करू नका. जर सर्व गोष्टी या वासुदेव असतील तर तुम्ही सुद्धा वासुदेव आहात. हे सर्व जग जे वासुदेव आहे त्याचा तुम्ही एक भाग आहात. वासुदेवाच्या पलीकडे काहीही नाही. जे आपल्या अंतर-आत्म्याशी एकरूप झाले आहेत असे ज्ञानी लोक फार दुर्मिळ आहेत. भगवतगीतेच्या सातव्या अध्यायातील विसाव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
कामैसतैसहृतज्ञानः प्रपधैन्तेsन्यदेवताः |
तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वयाः|
असे अनेक लोक आहेत कि जे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक देव देवतांची उपासना करतात. काही हनुमानाची पूजा करतात, तर काही शिवाची, तर काही संतोषी मातेची उपासना करतात, काही इतर देवतांची पूजा करतात. ते वेगवेगळ्या देवताची पूजा करतात आणि ते असे का करतात यामागे त्यांच्या वेगवेगळ्या इच्छा आकांक्षा असतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात , ‘ आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक वेगवेगळ्या देवतांची पूजा, आराधना करतात. परंतु त्यांच्या त्या इच्छा त्या देवतांच्या तर्फे पूर्ण करणारा फक्त मी आणि मीच असतो. आणि त्यांची वेगवेगळ्या देवता पूजा करण्याची जी भक्ती असते तिओ पण मीच असतो.’ आज जगात केवळ एक धर्म नसून अनेक भिन्न धार्मिक भावना असलेले लोक बघायला मिळतात. आणि प्रत्येक धर्मात सुद्धा अनेक पंथ बघायला मिळतात. वेगवेगळे लोक वेगवेगळे पंथाच्या शिकवणीवर विश्वास ठेऊन वेगवेगळ्या पंथाची पूजा करितात, आणि त्यातून त्यांना काही प्रगती झाल्यासारखी वाटत आहे. काही लोक येशूला मानतात, तर काही अल्लाला मानतात तर काही गुरु ग्रंथ साहेब वर विश्वास ठेवतात तर काही जेवोवाह्वर. जे कोणी आपापल्या श्रद्धेनुसार जे आचरण करितात, त्याचे फळ त्यांना जरूर मिळत असते. जर त्यांना त्यातून काही मिळत नसते, तर त्यांनी तशी श्रद्धा ठेवली असती काय? त्याचप्रमाणे काही लोक देवी काली वर विश्वास ठेवतात, तर काही वैष्णव देवीवर, तर काही आपल्या इच्छा अमरनाथ ( भगवान शिवाचे उत्तर भारतातील एक पवित्र ठिकाण) कडून पूर्ण करून घेतात. काही लोक असा विचार करतील कि अमरनाथ म्हणजे एक बर्फाचा ढीग असून तो निसर्ग नियमांप्रमाणे तयार होतो. तो बघायला तेथे जायची काय गरज आहे? ते तसे नाहीये, तर लोक पूर्ण श्रद्धेने तेथे जातात. या भक्तांसाठी अमरनाथ म्हणजे प्रत्यक्ष भगवान शिव असून तो फक्त बर्फाचा ढीग नाही. हे भगवान शिवच आहेत या श्रद्धेने ते त्यांची पूजा करतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात कि , ‘ कोणीही कोणत्याही देवाची पूजा केली तरी त्या पूजेचे फळ देणारा मात्र मीच आहे’. सर्वांना सर्वकाही देणारी अशी ती एक पूर्ण चेतना आहे. जेंव्हा कोणी हजच्या पवित्र यात्रेला जातो तेंव्हा त्यांना त्यातून निश्चितच काही आनंद मिळत असतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात कि, ‘ मी तो आनंद देणारा असतो. हा आनंद फक्त मी आणि माझ्यापासूनच मिळतो.’ मी परत एकदा तुम्हाला सांगतो कि ‘ मी म्हणजे कोणी मोर पिसांचा मुकुट घालून, भडक पिवळे कपडे घातलेली व्यक्ती नव्हे. ती एक पूर्ण चेतना असे सांगत असून ती सर्वत्र आणि सर्व गोष्टींमध्ये भरून राहिली आहे. यालाच वासुदेव असे म्हटले आहे. असे जे तत्व जे अपरा प्रकृती आणि परा प्रकृती यांना आपल्यात सामावून घेते ते तत्व म्हणजे वासुदेव होय. आणि हेच वासुदेव असे म्हणतात कि,
यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति |
तस्य तस्याचला श्रद्धां तामेव विद्ध्याम्यहम | ( ७.२१)
‘कोणीही, कोणतीही श्रद्धा ठेऊन माझ्याकडे येतो, त्यांना मी त्यांच्या भक्ती प्रमाणे त्यांच्या पूजेचे फळ प्राप्त करून देतो. आणि हि भक्ती त्यांच्यात निर्माण करणारा मीच असतो. म्हणजे हि भक्ती म्हणजे मी, हि पूजा म्हणजे मीच आणि त्याचे फळ पण माझ्याकडूनच येते. पण हे फळ तात्पुरते असते. पण जो ज्ञानी असतो तो मला, माझ्या स्वरूपाचे पूर्ण ज्ञान असलेला असा असतो आणि म्हणून तो त्या चार प्रकारच्या लोकांमध्ये श्रेष्ठ आहे’. ज्याला कोणाला आत्म-ज्ञान झाले आहे, तो पण हेच म्हणतो कि ती फक्त एक (चेतना) आहे.असे लोक जाणून असतात कि हे सर्व त्या एकपासून निर्माण झाले आहे आणि त्यादृष्टीने ते त्या सर्वत्र एकालाच बघत असतात. जे जगाच्या आसक्तीमध्ये आणि भांडणांमध्ये अडकून राहतात, त्यांना ते तसे दिसत नाही. ते मग आपापल्या धर्म शास्त्रांच्या पोथ्या-पुराणे एकमेकात भांडत बसतात आणि म्हणतात कि, ‘ मी जे म्हणतो तेच सत्य आहे’. किंवा , ‘ माझा धर्म सर्वश्रेष्ठ आहे’. पण असे ज्ञानी जे भक्तीच्या परमोच्च शिखरावर पोहोचले आहेत त्यांच्या दृष्टीला सर्वत्र आणि सर्वांमध्ये एकच चैतन्य दिसते. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'