31
2013
May
|
बंगलोर, भारत
|
‘प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्'. (९.२)
भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात, ‘हे ज्ञान असे आहे कि तुम्हाला लगेच याचा अनुभव येईल. असे नाही कि तुम्ही जर आज त्याचे अनुगमन केले तर काही वर्षांनी तुम्हाला याचा फायदा होईल. नाही! या ज्ञानाची फळे तुम्हाला लगेच दिसू लागतील. कसे काय? तुम्हाला स्व:ताला त्याचा अनुभव घेता येईल. ज्या प्रमाणे तुम्ही भूक, दु:ख अनुभवता त्याच प्रमाणे. जर तुम्हाला झोप येत असेल तर तुम्ही दुसऱ्या कोणाला विचारता का कि, ‘मला झोप येत आहे का?’ जर तुमचे पाय दुखत असतील तर दुसऱ्या कोणा व्यक्तीला विचारायची गरज नाही कि माझे पाय खरच दुखत आहे का? हे उघड सत्य आहे. त्याच प्रमाणे, तुम्ही पाहू शकाल कि हे ज्ञान स्वत:स्पष्ट आहे आणि तत्क्षणी तुम्हाला त्याचा अनुभव येईल. आता, तुम्ही सर्वजण सुदर्शन क्रिया, प्राणायम, ध्यान रोज करता. तुम्हाला याचा फायदा होतो कि नाही हे तुम्ही दुसऱ्या कोणाला कधी विचारले आहे का? तुम्ही जेव्हा ध्यान करता, तुम्हाला त्यातून काय मिळाले हे तुम्हाला लगेच कळते. तुम्ही सुदर्शन क्रिया केल्यानंतर तुम्हाला त्याचा अनुभव लगेच त्याचा फायदा अनुभवायला मिळतो, हो कि नाही? त्याच प्रमाणे ज्यावेळी तुम्हाला भूक लागते, त्याची जाणीव तुम्हाला लगेच होते. ज्या वेळी तुम्ही ध्यान करता, तत्क्षणी तुम्हाला आनंद आणि शांततेचा अनुभव येतो. त्या क्षणी तुमचे मन एकदम शांत होते. त्याच प्रमाणे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात, ‘ तुम्ही स्व:तासाठी या ज्ञानाचा प्रत्यक्षात अनुभव घेऊ शकता. या ज्ञानाने तुमच्या आयुष्य आनंदी होईल आणि तुम्ही दु:खा पासून मुक्तता. या ज्ञानाचे अनुसरण करणे फायदेमंद आहे. हे ज्ञान समजण्यास आणि अनुसरण करण्यास सोपे आहे, आणि हे ज्ञान अनंत आणि कधीही न बदलणारे आहे.’ तुम्हीं एकदा जरी ध्यान केले तर त्याचे फळ तुम्हाला जे मिळेल ते अनंत आणि कायम स्थायी आहे. तुम्ही जर एखादे चांगले कर्म केले तर त्याचे पुण्य कायम तुमच्या बरोबर राहते. म्हणून हे ज्ञान अनंत आणि कायम स्थायी आहे. तुम्ही जर का एकदा हे ज्ञान आत्मसात केले तर ते तुमच्या जवळ आयुष्यभर राहते. ज्या प्रमाणे तुम्ही सायकल चालवायला शिकता त्यानंतर ती आयुष्यभर तुम्हाला येते. तुम्हाला ती परत ती वारंवार शिकण्याची गरज नाही. त्याच प्रमाणे एकदा जर तुम्ही हलवा ( एक भारतीय गोड पदार्थ) बनवायला शिकलात तर तो वारंवार शिकण्याची गरज नाही. म्हणून भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘मी तुला आता हे ज्ञान जे देणार आहे ते अनंत आणि अजरामर आहे.’ पुढच्या श्लोकात भगवान श्री कृष्ण म्हणतात,
‘अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य परंतप ।
अप्राप्य मां निवर्तंते मृत्युसंसारवर्त्मनि’॥ (९.३)
ते म्हणतात, ‘हे सर्वोच्च ज्ञान जे मी तुला सांगणार आहे त्याच्यावर जर कोणाचा विश्वास नसेल तर ते मला कधीही प्राप्त करू शकणार नाहीत.’ ह्याचा अर्थ म्हणजे असे व्यक्ती स्व:ताला कधीही ओळखू शकणार नाहीत. म्हणून हे म्हणतात, ‘असे नास्तिक व्यक्ती मला कधीही प्राप्त करू शकणार नाहीत आणि ते जन्म मृत्यू च्या विळख्यात अडकून राहतील.’ हे पहा जो व्यक्ती या ज्ञानाच्या मार्गावर येत नाही तो या जगाच्या व्यग्रता मध्ये अडकून राहतो. हे खरे आहे कि नाही? तो रोजच्या जीवनातील संघर्षा मध्ये अडकून राहतो. त्याच त्या तक्रारी, त्याच त्या अडचणी, त्याच त्या गोष्टी वारंवार येत राहतात. जो ज्ञान विरहीत आहे, ज्याची दृष्टी पारिभाषिक नाही, किंवा ज्याचा जीवनात मोठे उद्दिष्ट नाही असा जीवनात काहीही कमवू शकणार नाही. असे व्यक्ती काय करतात? ते इच्छा आणि परावृत्ती मध्ये जखडून जातात. असे व्यक्ती, त्यांच्यावर जे प्रेम करतात त्यांच्याशीच भांडतात आणि त्यांच्या बरोबर जे भांडतात त्यांच्यावर ते प्रेम करतात. ह्या मुळे त्यांचे जे मित्र आहेत ते त्यांचे शत्रू बनतात आणि त्यांचे जे शत्रू आहेत ते त्यांचे मित्र होतात. तुम्ही पाहिले असेल कि तुम्ही जर कुणाचे वाईट केले नसले तरी काही लोक तुमचे शत्रू बनतात. तुमच्या पैकी किती जणांना असा अनुभव आला आहे? (प्रेक्षका मध्ये बरेचजण हात उंचावतात) पहा, बहुतांश जण हात उंचावत आहेत! लोक जीवनात एका पाठोपाठ एका अशा घटनातून जात असतात आणि शेवटी ते मृत्यू ला सामोरे जातात. त्यांना या जन्म मृत्यू च्या विळक्ख्यात बरेच दु:खे भोगावे लागतात, आणि त्यांना सु:ख मिळत नाही. या भौतिक जगात खरा आनंद, सु:ख मिळणे फार कठीण आहे. आणि तुम्ही जर जास्त त्याचा शोध घेत राहिलात तर तुम्हाला जास्त दु:खे भोगावे लागतील. ज्याचा या ज्ञानावर विश्वास नाही आणि ज्याचे जीवन भक्ती विरहीत आहे अशा व्यक्तीच्या जीवनात काय असून शकेल? जीवनातील प्रत्येक गोष्टी वर हे जीवन अर्पण करणाऱ्या या भव्य शक्ती वर जर कुणाचा विश्वास नसेल, जी शक्ती या प्रेमाचा अविष्कार आहे, तर त्याच्या जीवनात काय उरेल? त्याचे जीवन किती कंटाळवाणे असेल. असा व्यक्ती आपल्या इच्छा पूर्ती साठी धडपडत असतो आणि सारखे काही तरी नवीन मागत असतो. त्याला जेव्हा ते मिळत नाही तेव्हा तो दु:खी असतो, आणि ते मिळाल्यावर सुद्धा तो दु:खी असतो. यालाच मृत्यू संसार म्हणतात (हे भौतिक जगताच्या संदर्भात आहे जिथे सर्व काही अस्थायी आहे, अखंडपणे बदलते आहे आणि मृत्यू च्या आधीन आहे). म्हणून भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘असे लोक ज्यांचे जीवन विश्वास आणि भक्ती विरहीत आहे मला कधीही प्राप्त करू शकणार नाहीत. असे लोक अखंड देवत्व म्हणजेच मला प्राप्त करण्यास अपयशी ठरतील, आणि ते या मृत्यू लोकात येत राहतील (बदलते भौतिक विश्व)’. पुढच्या दोन श्लोकात भगवान श्री कृष्ण म्हणतात,
‘मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः‘॥ (९.४)
न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् ।
भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः’॥ (९.५)
भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘हे अर्जुना, ही संपूर्ण सृष्टी म्हणजे माझा अविष्कार आहे. तरी पण मी निराकार आणि अव्यक्त आहे. ही संपूर्ण सृष्टी (ज्याच्या मध्ये आकार आहे) मी निर्माण केली आहे (सुक्ष्म निराकार ईश्वरत्व). तू जे काही या सृष्टी मध्ये पहात आहेस त्याची मिर्मिती मी केली आहे. सर्व पाच भूत: ( सृष्टी चे पाच मुलतत्वे) – पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, आणि वायू माझ्या मध्ये समाविष्ट आहेत आणि माझ्या पासून त्याची निर्मिती होते. पण त्यांच्या मध्ये मी समाविष्ट नाही. हे म्हणजे ‘हा कपडा माझा आहे पण मी त्या कपड्यात नाही’ असे म्हटल्यासारखे आहे. पहा, तुम्ही तुमच्या कपड्या मध्ये आहात आणि त्या कपड्या मध्ये तुम्ही झाकले गेले आहात, तरी पण तुम्ही म्हणजे तो कपडा नाही जो तुम्ही घातलेला आहे. त्याच प्रमाणे भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘हया पंच महाभूतांचा जन्म माझ्यापासून झाला आहे, ते माझ्या मध्ये समाविष्ट आहेत तरी पण मी त्यांच्या मध्ये नाही (ह्याचा अर्थ म्हणजे ईश्वर म्हणजेच दिव्य चेतना ही पंच महाभूतांसाठी मर्यादित नाही जरी त्याची निर्मिती त्यांनी केली असली तरी)’. हेच भगवान श्री कृष्ण इथे सांगतात, आणि हेच मोठे गुपीत आहे. या ठिकाणी ते म्हणतात की, ‘मी एक निराकार पैलू आहे जो कोणालाही दिसत नाही आणि तुम्ही जे काही पाहता त्याच्या पलीकडे आहे.’ उदा: एक झाड आहे आणि त्याच्या खोडामध्ये मधुरस आहे. पनू तुम्ही फक्त झाड पाहू शकता पण त्यातील मधुरस नाही. म्हणून इथे भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘मी तो (ईश्वर) मधुरस आहे जो या सृष्टीमध्ये विविधतेचा उत्कर्ष करतो. सर्व झाडे, त्यावरील पाने, त्यांची फळे या सर्वांच्या मागचे कारण मी आहे. त्याच प्रमाणे तुम्ही व्यक्तीला पाहू शकता पण त्याच्या आत्म्याला नाही. आत्मा हा निराकार आहे आणि तो आत्मा म्हणजे मी आहे.’ प्राणशक्ती हि आपल्या शरीराच्या प्रत्येक कणा कणा मध्ये असते. ज्या क्षणी हि प्राणशक्ती शरीर सोडून जाते त्या क्षणी तो व्यक्ती मृत म्हणून जाहीर केला जातो. उदा: जेव्हा तुमच्या शरीरावरील काही त्वचे बाग भाजला जातो, काही काळानंतर त्या भागावर तुम्हाला काही वेदना होत नाहीत. तुम्हाला त्या भागावर काही झाले तरी कळत नाही कारण त्या भागातील प्राणशक्ती नष्ट झालेली असते. या सृष्टी मध्ये चेतने मुळे जीवन आहे. म्हणून भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘तुमच्या चेतनेला आधार देण्यासाठी मी या सृष्टी मध्ये सर्वत्र आहे. हे मोठे गुपीत आहे जे तुम्ही जाणून घेतले पाहिजे.’ |
|
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'
गीता ज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
गीता ज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
ज्ञानातील अंतर
दूरदृष्टी परिपूर्ण हवी
31
2013
May
|
बंगलोर, भारत
|
भगवतगीतेमधील नवव्या अध्यायला राज-विद्या योग किंवा राज-गुह्या विद्या ( अत्यंत सर्वश्रेष्ठ गोपनीय ज्ञान) असे म्हटले जाते. एक राजा कुठल्या गोष्टी साठी खूप सारे प्रयत्न करीत नाही. तुम्ही कधी कुठल्या राजाला एखाद्या गोष्टी साठी प्रयत्न करताना पहिले आहे का? म्हणून भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात कि, एखादा व्यक्ती हे ज्ञान प्रयत्न न करता घेवू शकतो. भगवान श्री कृष्ण याला राज गुह्या विद्या म्हणतात. म्हणजे हे ज्ञान गोपनीय आहे. भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात,
‘इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात् ॥‘(९.१)
ते म्हणतात, ‘हे अर्जुना! तू अनुसया आहेस (ज्याच्या मध्ये मत्सर, नकारात्मकता नाही), म्हणून मी तुला एक मोठे गुपीत सांगतो.’ अनुसया म्हणजे काय? जो प्रत्येक गोष्टींमध्ये अवगुण शोधत नाही त्याला अनुसया म्हणतात. असूया कुणाला म्हणतात? ज्याला आपल्या आवतीभोवती सतत अवगुण दिसतात त्याला असूया म्हणतात. एखाद्याची दृष्टी विकृत आणि अपरिपूर्ण आहे, तो प्रत्येक गोष्टीमध्ये अवगुण पाहतो. असा व्यक्ती ज्याला प्रत्येक गोष्टी मध्ये अवगुण दिसतात त्याला असूया म्हणतात. म्हणजे असूया म्हणजे ज्याची दृष्टी विकृत आहे. अनुसया म्हणजे ज्याची दृष्टी विकृती आणि नकारात्मकते पासून मुक्त आहे. उदा: जर एका दुखी व्यक्तीला कोणी जर काही सांगितले तर त्याला वाटते कि तो व्यक्ती त्याची चेष्टा करत आहे. तुमच्या पैकी किती जणांना असा अनुभव आला आहे? एखाद्या अस्वस्थ व्यक्तीची तुम्ही जरी स्तुती केली तरी त्याला वाटते कि तुम्ही त्याची चेष्टा करत आहात. तुम्ही त्याचे काही चांगले केले तरी त्याला त्याच्या मध्ये अवगुण दिसतात. तुम्ही जर एखादी गोष्ट चांगल्या उद्दिष्टेने केली तरी असे व्यक्ती त्या मध्ये काही ना काही तरी अवगुण काढतात. असे व्यक्ती ज्यांना प्रत्येक गोष्टी मध्ये अवगुण पाहण्याची प्रवृत्ती असते त्यांना असूया म्हणतात. अनुसया म्हणजे ज्यांची दृष्टी विकृत नाही. असे व्यक्ती प्रत्येक गोष्टी मध्ये अपरिपूर्णता न पाहता त्यांचा आहे तसा स्वीकार करतात. मग तुम्हीं सर्वात गुप्त गोष्ट कुणाला सांगू शकाल? जो अनुसया आहे त्याला. तुम्ही एखादी गुप्त गोष्ट त्याला सांगू शकता जो त्याच्या मध्ये अवगुण शोधणार नाही आणि ज्याची दृष्टी विकृत नाही. असूया व्यक्ती प्रत्येक गोष्टी मध्ये अवगुण पाहतो मग तो कोठे हि असो. असे व्यक्ती आपल्या मनातील नकारात्मकता बाहेरील जगात टाकतात, आणि मग ते दुसऱ्यांना दोषी ठरवतात. ज्या व्यक्तीची दृष्टी विकृत आहे, त्याला स्वत:ची अपरिपूर्णता दिसत नाही. तो दुसऱ्यांमध्ये अपरिपूर्णता आणि वाईट गुण बघतो. तो अवतीभोवती असणाऱ्या व्यक्ती मध्ये जास्तीत जास्त अपरिपूर्णता पाहतो. असा व्यक्ती असूया आहे. अशा व्यक्तींचा कोणीही स्वीकार करत नाही, जरी गुरु ने स्वीकार केला तरी तो गुरूच्या शिकवणी मध्ये चूक काढतो. तो म्हणतो कि, ‘गुरुदेव तुम्ही हे सांगितले खरे पण ते चुकीचे आहे’. असा व्यक्ती गुरुचे ज्ञान काय आत्मसात करेल जो गुरूच्या शिकवणी मध्ये चुका काढतो? त्याला काहीच आत्मसात करता येणार नाही. ह्या मुळेच म्हटले आहे कि आपल्या गुरु कडे मर्यादित बुद्धीने पाहू नका, ज्ञाना बद्दलची आपली दृष्टी विस्तीर्ण ठेवा. भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात, ‘तुझी दूरदृष्टी ही विकृतीहीन आहे म्हणून मी तुला एक थक्क करणारे गुप्त ज्ञान देवू इच्छितो. हे ज्ञान जाणल्याने तू तुझ्या सर्व दु:ख आणि नकारात्मकता पासून मुक्त होशील. हे ज्ञान पारिभाषिक (विज्ञान) आणि अलौकिक (ज्ञान) आहे. ‘हे काय आहे?’ हे जाणून घेणे म्हणजे विज्ञान ( परिमंडळ ज्ञानाच्या संदर्भात), आणि ‘मी कोण आहे’? हे जाणून घेणे म्हणजे अध्यात्म (स्व च्या अलौकिक ज्ञानाच्या संदर्भात). म्हणून ते म्हणतात की, ‘ या ज्ञानामुळे तुझी सर्व अमंगल गोष्टी पासून मुक्तता होईल आणि तुझ्या आसपास नकारात्मकता राहणार नाही. हे ज्ञान जाणल्याने तुला कसलीही इजा होणार नाही किंवा तुला कुठलेही दु:ख भोगावे लागणार नाही. पुढच्या श्लोकात भगवान श्री कृष्ण म्हणतात,
‘राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् ।
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥(९.२)
समजा गुरु ने एखादी गोष्ट आपल्या भक्ताला सांगितली आणि ती जर त्याला करता आली नाही, तर त्याचा काय उपयोग? जर गुरु आपल्या भक्ताला उच्च आणि कठीण ज्ञान देत असेल जे त्या भक्ताला समजत नसेल तर त्याचा काय उपयोग? एकदा एका ज्ञानी ऋषींचे प्रवचन ऐकण्यास एक सद्गृहस्थ गेले होते. प्रवचन ऐकून आल्यावर त्यांनी आपल्या मित्रांना सांगितले की, ‘प्रवचन खूप छान होते. ऋषींनी अद्भुत ज्ञान दिले.’ त्यातील एका मित्राने विचारले, ‘आम्हाला पण सांग ऋषीजी कोणत्या विषयावर बोलत होते.’ ते सद्गृहस्थ म्हणाले, ‘ज्ञान खूप उच्च दर्जाचे होते, ते माझ्या डोक्यावरून गेले.’ जर त्याला त्यातील काहीच समजले नाही तर अशा उच्च दर्जाचे ज्ञान ऐकून त्याला काय मिळाले. आणि जरी एखाद्या व्यक्तीला ते कळले तरी जो पर्यंत तो त्याचा सराव करून त्याचे अनुगमन करीत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही. म्हणूनच भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘मी तुला असे कोणतेही ज्ञान सांगणार नाही जे तुला समजणार नाही अथवा तू त्याचा सराव करू शकणार नाही. मी तुला जे ज्ञान देत आहे ते सर्व ज्ञानापैकी अधिपती आहे. हे सर्वश्रेष्ठ आणि गोपनीय आहे; ते सर्व ज्ञाना मध्ये परम आणि पवित्र आहे.’ जर ज्ञान हे शाही आणि दिव्य असून पवित्र नसेल तर त्याचा काय उपयोग? ते सर्वश्रेष्ठ गुप्त असेल, पण त्याच्या मध्ये काही पवित्रता नसेल, तर कोणालाही या ज्ञानाचा उपयोग होणार नाही. कुठलीही लज्जित करणारी गोष्ट गुप्त ठेवली जायची नाही. मोठमोठ्या गोष्टी साध्य करण्यासाठी जे काही लागते त्या गोष्टी गुप्त ठेवल्या जायच्या. या साठीच या ज्ञानाला राजगुह्यं म्हटले आहे म्हणजेच सर्वश्रेष्ठ आणि गोपनीय ज्ञान. भारताची विशेषता ही आहे कि इथे गुप्तता आणि पवित्रता एकमेकाच्या हातात हात घालून जातात. भक्ताला मंत्र हा गोपनीय पद्धतीने दिला जायचा. शिष्याला दिक्षा देताना, गायत्री मंत्र जो सर्व मंत्रामध्ये पवित्र आहे, त्याच्या कानात गुप्त पद्धतीने सांगितला जायचा. आणि शिष्याला तो मंत्र गुपीत ठेवायला सांगितले जायचे, ज्या मुळे तो मंत्र त्याच्या मध्ये एका बीजा प्रमाणे राहील. ज्या प्रमाणे बीज हे माती च्या खाली पेरले जाते. बीज हे मातीत पेरल्या मुळेच त्याला अंकुर फुटतो आणि त्याचे रुपांतर मोठ्या झाडा मध्ये होते. म्हणून गुप्तता ही एका बीजा प्रमाणेच आहे. गुप्तता हि अशी आहे कि जिच्या मुळे जीवनात पवित्रता येते आणि जीवन एकदम सुंदर, अद्भुत होते. म्हणून श्री कृष्ण म्हणतात कि हे ज्ञान सर्वश्रेष्ठ गोपनीय आहे. ते क्षुल्ल्क किंवा निरर्थक नाही. ह्या ज्ञानात लाज वाटेल किंवा गुप्त ठेवण्या सारखे काही नाही. हे ज्ञान जो कोणी जाणून घेईल तो आनंदी होईल आणि त्याला फायदा होईलच. या ज्ञानाला जो कोणी स्व:तला अर्पण करतो त्याची सर्व गोष्टीतून मुक्तता होते. |
|
तुमच्या इवल्याश्या आरश्यात अफाट सूर्याला पकडा
28
2013
May
|
बंगलोर, भारत
|
‘यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते I हत्वापि स इमाँल्लोकान्न हन्ति न निबध्यते II’ (१८.१७) तो म्हणतो, ‘तो ज्याची बुद्धी ही मायेच्या प्रभावापासून मुक्त आहे (अलिप्त-बुद्धी ), अश्या माणसाने जरी संपूर्ण जगाचा नाश केला तरीसुद्धा तो मुक्त राहतो आणि कोणत्याही पापापासून निर्लेप राहतो. असा माणूस त्याच्या कर्माने बांधल्या जाणार नाही.’ खरे तर अशी जागृत बुद्धी असलेला माणूस जो मायेपासून अलग आहे तो लोकांना मारणे यासारखी हिंसात्मक कृती करणारच नाही. आणि त्याने जरी असे केले तरी तो ती कृती त्याचे योद्ध्याचे कर्तव्य म्हणून करेल आणि तीव्र इच्छा व घृणा यातून करणार नाही. (इथे विवेकी माणसाच्या कृतीतील सुसंस्कृतपणा या गुणाचा संदर्भ आहे). म्हणून हा तिसरा टप्पा आहे ज्यामध्ये अलिप्त-बुद्धी (शुद्ध बुद्धी जी मायेला जोडलेली नाहीये आणि तिच्यामुळे जी प्रभावित होत नाही अशी बुद्धी) असलेली व्यक्ती मायेला ओळखू शकते. अशी व्यक्ती मायेच्या कार्याला थोपवायचा प्रयत्न करीत नाही आणि तिच्यामुळे विचलितसुद्धा होत नाही. अश्या अवस्थेत ती व्यक्ती मायेपासून निर्लेप राहते आणि तिच्यापासून ती मुक्त असते. तुम्हाला कळते आहे का मी काय म्हणतो आहे ते? खरे तर या अवस्थेमध्ये आपल्याला मायेच्या नाना तऱ्हाचे साक्षी होण्यात आनंद मिळतो आणि त्याने आपले मनोरंजन होते. ते एक मौजेचे स्रोत्र बनते. प्रगतीच्या तिसऱ्या टप्प्यात जेव्हा आपण फुलून येतो तेव्हा जिच्यामुळे आपण संसाराच्या जंजाळात आणि भ्रमाच्या गुंतागुंत यामध्ये अडकून पडतो हीच ती माया आपल्या मौजेचे आणि करमणुकीचे स्रोत्र बनते. तर माया बंधने आणि भ्रम निर्माण करते, आणि त्याच वेळेस माया आपल्याला आनंद आणि हर्ष हेसुद्धा देते. म्हणूनच भगवान कृष्ण म्हणतो, ‘दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया I मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते II’ (७.१४) तो म्हणतो, ‘हे अर्जुना! माझी योग माया ही दिव्या गुणांनी युक्त आहे, आणि त्याच्यावर एखाद्याला विजय मिळवणे सोपे नाही. तिला पराभूत करणे अतिशय कठीण आहे. केवळ माझ्यामध्ये आश्रय घेतल्याने आणि मला संपूर्णतः शरण आल्याने तू तिला पराभूत करू शकतो.’ ही संपूर्ण सृष्टी मायेने झाकलेली आहे. ज्याप्रमाणे वायूचा संचार सर्वत्र असतो त्याप्रमाणे संपूर्ण जग हे मायेच्या परिवेष्टनामध्ये आहे. प्रत्येक माणसाच्या मनावर मायेचे आवरण आहे. प्रत्येकजण हा मायेमध्ये खोलवर गुंतलेला आहे. प्रत्येकजणांचे मन हे मायेच्या कोणत्या न कोणत्या प्रभावाखाली आहे. इथे बसलेल्या तुम्हा सर्वांच्या मनात अनेक विविध विचार आहेत. तुमच्या मनात काय काय चालले आहे याचे केवळ अवलोकन करा! आर देवा! (हशा) हीच तर माया आहे. तर या संपूर्ण सृष्टीला मायेचे आवरण आहे. परंतु एक सच्च्या भक्ताला नेहमी असे वाटते, ‘हे भगवान शंकरा, माझे मन हे कायम तुझ्या भक्तीमध्ये गुंग आहे आणि तुझ्या विचारात बुडालेले आहे. माझ्या मनाने तुला संपूर्णपणे घेरलेले आहे. दिवस आणि रात्र मला तुझी आणि फक्त तुझीच आठवण असते.’ आता हे कसे काय शक्य आहे? आपले मर्यादित मन इतक्या प्रचंड आणि सर्वव्यापी परमेश्वराला कसे काय परिवेष्टित करून धरू शकते? देवाला आपल्या मर्यादित मनाने कसे बांधायचे? हे शक्य आहे? होय, हे त्याचप्रकारे शक्य आहे ज्याप्रकारे एका मोठ्या हत्तीला (हत्तीच्या प्रतिमेला) आरश्यामध्ये पकडता येते. तुम्ही सूर्याला संपूर्णपणे आरश्यामध्ये नाही का पकडू शकत? सूर्य इतका प्रचंड आहे, तरीसुद्धा तुम्ही त्याला व्यवस्थितपणे आरश्यामध्ये पकडू शकता, हो ना? त्याचप्रमाणे तुमच्या मनाकडे या दिव्यत्वाला संपूर्णपणे पकडण्याची क्षमता आहे. म्हणूनच असे म्हणतात की तुमचे मन जर पवित्र असेल तर तुम्ही स्वतः देवच आहात! तुम्ही ब्रह्म आहात. परंतु असे केव्हा शक्य आहे? जेव्हा तुमच्या हृदयाचा आरसा हा स्वच्छ आणि पावन असेल तेव्हा तुम्ही दिव्यत्वाला स्वतःच्या आत निरखू शकता. जर आरसा (मायेमुळे) झाकलेला असेल किंवा घाण असेल तर मग काम बनणार नाही. एक संत असा आहे ज्याचे मन आणि हृदय हे आरश्याप्रमाणे लख्ख (नकारात्मकतेपासून मुक्त) असते. एक गुरु असा असतो जो स्वच्छ आरश्याप्रमाणे पवित्र आणि पारदर्शी असतो. म्हणून तुमचे मन हे शुद्ध आणि पवित्र असले पाहिजे म्हणजे मग (चैतन्याची) पूर्णता तुमच्यात फुलून येईल.मग तुम्ही सूर्य आणि चंद्र यांना आपल्या आरश्यात पकडू शकाल. तर, ज्याप्रमाणे एका भल्या मोठ्या हत्तीला एक आरसा पूर्णपणे पकडू शकतो त्याचप्रमाणे तुमचे मनसुद्धा दिव्यत्वाला पकडू शकते. परंतु मनाला मायेचे निवासस्थान होऊ देऊ नका; खरे तर तिथे देवाचे अधिष्ठान असले पाहिजे. मायेमध्ये गडप होणारे हेच ते मन आहे जे देवाला संपूर्णपणे शरणसुद्धा जाऊ शकते. असे सुंदर ज्ञान केवळ ऐकल्यामुळे मन उंचावते आणि ते इतके उंचावते आणि पावन होते, हो ना? सर्व तीव्र इच्छा आणि घृणा यापासून मन त्वरित शुद्ध होते. आपण आपल्या चेहऱ्यावरील हास्य का गमावून बसतो? याचे कारण आहे तीव्र इच्छा आणि घृणा, आणि आपली मायेमधील गुंतागुंत. जेव्हा आपल्या मनातील अवकाश हे तीव्र इच्छा आणि घृणा यांनी भरून जाते तेव्हा आनंद संपूर्णपणे हरवून जातो. ‘अरे, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही! हा मनुष्य चांगला नाही! तो माणूस बरोबर नाही!’ अशा विचारांमध्ये आपण इतके अडकून जातो, मी तर म्हणेन की आता तर तुम्हीसुद्धा बरोबर नाही!अश्या विचारांमध्ये तुमची सर्व उर्जा नष्ट होते. जेव्हा तुम्ही तुमची सर्व सकारात्मक उर्जा अश्या विचारांवर व्यर्थ घालवता तेव्हा तुम्ही तर निरोपयोगी होऊन जाता; काही करण्यायोग्य नाही. जेव्हा तुमचा जीवनातील सर्व उत्साह हरवून जातो तर मग बाकी उरले काय? असे अडकून पडल्यामुळे तुमचे प्रेम, हास्य आणि उत्साह हे सर्व काही हरवून जाते. जेव्हा तुम्ही तुमचा उत्साह गमावून बसता तेव्हा तुम्ही इतर सर्व काही हरवून बसता. मग तुम्ही केवळ एके ठिकाणी पडून राहाल आणि काहीही करणार नाही. हे सर्व का घडते? याचे कारण आहे माया. ही माया फार कोड्यात पडणारी आहे. ती तर कोणालाही पकडते आणि वाट्टेल तसे नाचायला लावते! आणि जो बिचारा अडकल्या जातो तो आपला नाचत राहतो. मायेमुळे समस्त जग त्रस्त आहे. म्हणून याच्यामुळे, अनेक लोक टीका करतात आणि मायेच्या खेळाच्या विरोधी होतात. परंतु भगवान कृष्ण म्हणतो, ‘ही माया दिव्या गुणांनी युक्त आहे, आणि ती माझ्यातून निर्माण झालेली आहे. म्हणून तू तिचा मान राख आणि तिचा आदर ठेव.’ केवळ भगवान कृष्ण अशी गोष्ट म्हणू शकतो, आणि इतर कोणी नाही. हे तर असे झाले की सिनेमाचा दिग्दर्शक केवळ असे म्हणू शकतो, ‘सगळे काही माझ्या मालकीचे आहे. नायक आणि खलनायक दोघेही माझे आहेत.’ खलनायक त्याचा आहे असे नायक म्हणू शकतो का? नाही, हे अश्याप्रकारे काम चालत नाही. सिनेमाच्या नायकाला खलनायकाला खलनायक म्हणूनच वागवले पाहिजे. परंतु, ‘नायक आणि खलनायक दोघे माझे आहेत. या सिनेमामध्ये काम करण्यास मी त्यांना दाम मोजले आहे. म्हणून त्या दोघांमधील भांडण हे मी लिहून काढले आहे आणि याचा अंत हासुद्धा मी लिहिलेला आहे’, असे बोलण्याचा हाक केवळ सिनेमाच्या दिग्दर्शकाला आहे. याचसाठी म्हणून भगवान कृष्ण म्हणतो, ‘ही माया माझ्यापासून निर्माण झालेली आहे. तो मी आहे जो तिचा प्रसार करीत आहे, आणि मी दिव्य आशीर्वादानेच तुम्ही तिला पराजित करू शकता. तुम्ही कितीही जरी प्रयत्न केलात तरी तुम्ही तुमच्या एकट्याच्या प्रयासाने तिच्यापासून मुक्त होऊ शकत नाही. केवळ माझ्यामध्ये आश्रय घेतला तरच तुम्ही हा मायेचा महासागर पार करू शकता.’ म्हणून केवळ स्वतःच्या आत खोलवर गेल्यानेच तुम्ही मायेला पराभूत करू शकता. |
|
हे सर्व त्या एकाचा विस्तार आहे.
15
2013
May
|
बंगलोर, भारत
|
आज शंकराचार्य जयंती आहे. हा आदी शंकराचार्यांचा ( भारतीय तत्वज्ञानाच्या अद्वैत विचारसरणीचे थोर गुरु) जन्म दिवस आहे. आदी शंकराचार्यांनी अद्वैत तत्वज्ञानाचा प्रसार केला. अद्वैत म्हणजे हे सर्व एकपासून तयार झाले आहेत. अद्वैतात असे म्हटले आहे कि ‘ सर्वं खल्विदं ब्रम्हम’, म्हणजे हे सर्व एका ब्रम्हण पासून तयार झाले आहे किंवा एक चेतनेपासून तयार झाले आहे, हे सर्व वासुदेव (भगवान श्रीकृष्णाचे एक नाव) आहे. म्हणून तुम्ही जी विविधता पट ती वस्तुतः नाहीये. वस्तुस्थिती हि नेहमी अदृश्य असते, ती नेहमी अनुभवायची असते. ती पूर्वी मिळणाऱ्या प्राण्यांच्या आकाराच्या बिस्किटा सारखी आहे. तुम्ही ती बिस्किटे बघितली आहे काय? ती सगळे वेगवेगळ्या आकारात मिळायचची-मांजर, कुत्रा, घोडा, हत्ती. मुलांना त्या बिस्किटाशी खेळायला खूप आवडायचे. म्हणून एकाच प्रकारचे समान वापरून त्याची वेगवेगळ्या आकाराची बिस्किटे बनवली जायची. आज तुम्हाला वेगवेगळ्या प्राणांच्या आकाराची चोकलेट बघायला मिळतात. पण शेवटी ती एकाच प्रकारच्या चोकलेटने बनवलेली असतात. होय कि नाही? आणि त्या सर्वांची चवही सारखीच असते. पण त्यातील वैविध्य पाहून मुले हरखून जातात.म्हणजेच जरी ती वरवर वेगळीवाटत असली तरी आतून ती सर्व एकच असतात. आपण ज्या गोष्टी बघत असतो, त्या मायेच्या प्रभावामुळे जरी वेगवेगळ्या वाटत असल्या तरी ते वेगवेगळेपण खरे नव्हे. आदी शंकराचार्यांची एक गोष्ट सांगतात. एकदा, आदी शंकराचार्य सांगत होते कि’ हे सर्व जग, जे काही आहे, ते काहीच नाहीये’. म्हणजेच ते असे सांगत होते कि ‘हे काहीच नाहीये’. हल्लीच्या शास्त्रज्ञ जसे सांगतात कि ‘ ह्या सर्व गोष्टी नाहीयेत, कारण त्या फक्त लहरी आहेत’. ते जेंव्हा असे सांगत होते कि ‘ हे सर्व काही नाहीये’, तेवढ्यात एक पिसाळलेला हत्ती त्यांच्या रोखाने पळत येताना दिसला.त्याला पाहताच शंकराचार्य ती जागा सोडून आडोश्याला जाऊन उभे राहिले. तेंव्हा कोणीतरी म्हणाले कि,’ हा हत्ती म्हणजे काहीच नाहीये, तर तुम्ही असे आडोशाला का उभे राहिलात?’ तेंव्हा शंकराचार्य म्हणाले कि, ‘ तो हत्ती म्हणजे काही नाही आणि माझे पळणे हे सुधा काही नाहीये’. अशी शंकराचार्यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता होती आणि ती तशी फार थोड्या लोकांच्यात असते. जे त्यांनी हजार वर्षापूर्वी सांगितले तेच आजचे विज्ञान सांगत आहे. आपण त्याला वेगवेगळ्या नावांनी आणि सिद्धांतांनी ओळखतो जसे कि सापेक्षवादाचा सिद्धांत. पण ते सर्व एकच आहे. हे सर्व त्या एकाचा विस्तार आहे. प्रोफेसर डी’हुरेहाड नावाचे एक ख्यातनाम शास्त्रज्ञ नुकतेच येथे येऊन गेले. हे मला म्हणाले कि ते पदार्थ विज्ञान गेली ४५ वर्षे शिकत आहेत. ते म्हणाले कि ‘ गुरुदेव, मी ४५ वर्षे पदार्थ विज्ञान शिकलो आणि असे लक्षात आले कि ते अस्तित्वात नाही. मी जेंव्हा भाषण देत असतो तेंव्हा लोकांना असे वाटते कि मी बुद्धिझम किंवा पूर्वेकडील तत्सम तत्वज्ञानावर बोलत आहे, कारण मी सांगतो कि ‘ ह्या सर्व गोष्टी नाहीयेत, कारण त्या फक्त लहरी आहेत’. आज विज्ञान काही निष्कर्ष काढू लागले आहे, जसे कि ‘ जे दिसते ते तसे नाहीये, आणि जे दृष्टीला पडत नाही तेच सत्य आहे. हे सर्व वासुदेव (भगवान श्रीकृष्णाचे एक नाव) आहे. आता मी जेंव्हा असेम्हणतो कि हे सर्व वासुदेव आहे, तेंव्हा असा विचार करू नका कि तेथे कोणीतरी मोरपिसांचा मुकुट घालून, भडक पिवळ्या रंगाचे कपडे घालून, झाडाखाली राधे बरोबर हातात बासरी घेऊन ( भगवान श्रीकृष्ण यांचे वर्णन) उभे असेल.तुम्ही जर असा विचार करीत असाल तर तुम्ही आश्चर्य करीत बसाल कि अशी कितीक वर्षे ते हातात बासरी घेऊन उभे आहेत आणि अशी अनेक वर्ष बासरी हातात धरून त्यांचे हात दुखायला लागले असतील (हशा). असा काही गैरसमज करून घेऊ नका. आणि म्हणून भगवतगीतेच्या नवव्या अध्यायातील अकराव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
अवजानन्ति मां मूढा मानुषी तनुमाश्रीतम |
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम |
ते अर्जुनाला असे सांगतात कि, ‘ लोक मला एक मनुष्यमात्र समजतात (म्हणजे शरीरापर्यंत मर्यादित), ते मला ओळखू शकत नाहीत. मी म्हणजे एक अशी चेतना आहे कि ज्यातून हे सर्व उत्पन्न होते आणि ज्या मुळे हे सर्व अस्तित्वात राहते. सर्वत्र आणि सर्वांमध्ये वासुदेव पाहणारे महात्मे हे खरोखरच दुर्मिळ आहेत. असे काही लोक आहेत कि जे समजतात कि, ‘ वासुदेव सर्वत्र आहे, पण माझ्यात नाही. मी फक्त एक सेवक आहे. मी अगदी मामुली असून भगवंताच्या पायाची धूळ व्हायची पण माझी लायकी नाही. मी अगदी नगण्य आहे. नाही, असा विचार करू नका. जर सर्व गोष्टी या वासुदेव असतील तर तुम्ही सुद्धा वासुदेव आहात. हे सर्व जग जे वासुदेव आहे त्याचा तुम्ही एक भाग आहात. वासुदेवाच्या पलीकडे काहीही नाही. जे आपल्या अंतर-आत्म्याशी एकरूप झाले आहेत असे ज्ञानी लोक फार दुर्मिळ आहेत. भगवतगीतेच्या सातव्या अध्यायातील विसाव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
कामैसतैसहृतज्ञानः प्रपधैन्तेsन्यदेवताः |
तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वयाः|
असे अनेक लोक आहेत कि जे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक देव देवतांची उपासना करतात. काही हनुमानाची पूजा करतात, तर काही शिवाची, तर काही संतोषी मातेची उपासना करतात, काही इतर देवतांची पूजा करतात. ते वेगवेगळ्या देवताची पूजा करतात आणि ते असे का करतात यामागे त्यांच्या वेगवेगळ्या इच्छा आकांक्षा असतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात , ‘ आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक वेगवेगळ्या देवतांची पूजा, आराधना करतात. परंतु त्यांच्या त्या इच्छा त्या देवतांच्या तर्फे पूर्ण करणारा फक्त मी आणि मीच असतो. आणि त्यांची वेगवेगळ्या देवता पूजा करण्याची जी भक्ती असते तिओ पण मीच असतो.’ आज जगात केवळ एक धर्म नसून अनेक भिन्न धार्मिक भावना असलेले लोक बघायला मिळतात. आणि प्रत्येक धर्मात सुद्धा अनेक पंथ बघायला मिळतात. वेगवेगळे लोक वेगवेगळे पंथाच्या शिकवणीवर विश्वास ठेऊन वेगवेगळ्या पंथाची पूजा करितात, आणि त्यातून त्यांना काही प्रगती झाल्यासारखी वाटत आहे. काही लोक येशूला मानतात, तर काही अल्लाला मानतात तर काही गुरु ग्रंथ साहेब वर विश्वास ठेवतात तर काही जेवोवाह्वर. जे कोणी आपापल्या श्रद्धेनुसार जे आचरण करितात, त्याचे फळ त्यांना जरूर मिळत असते. जर त्यांना त्यातून काही मिळत नसते, तर त्यांनी तशी श्रद्धा ठेवली असती काय? त्याचप्रमाणे काही लोक देवी काली वर विश्वास ठेवतात, तर काही वैष्णव देवीवर, तर काही आपल्या इच्छा अमरनाथ ( भगवान शिवाचे उत्तर भारतातील एक पवित्र ठिकाण) कडून पूर्ण करून घेतात. काही लोक असा विचार करतील कि अमरनाथ म्हणजे एक बर्फाचा ढीग असून तो निसर्ग नियमांप्रमाणे तयार होतो. तो बघायला तेथे जायची काय गरज आहे? ते तसे नाहीये, तर लोक पूर्ण श्रद्धेने तेथे जातात. या भक्तांसाठी अमरनाथ म्हणजे प्रत्यक्ष भगवान शिव असून तो फक्त बर्फाचा ढीग नाही. हे भगवान शिवच आहेत या श्रद्धेने ते त्यांची पूजा करतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात कि , ‘ कोणीही कोणत्याही देवाची पूजा केली तरी त्या पूजेचे फळ देणारा मात्र मीच आहे’. सर्वांना सर्वकाही देणारी अशी ती एक पूर्ण चेतना आहे. जेंव्हा कोणी हजच्या पवित्र यात्रेला जातो तेंव्हा त्यांना त्यातून निश्चितच काही आनंद मिळत असतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात कि, ‘ मी तो आनंद देणारा असतो. हा आनंद फक्त मी आणि माझ्यापासूनच मिळतो.’ मी परत एकदा तुम्हाला सांगतो कि ‘ मी म्हणजे कोणी मोर पिसांचा मुकुट घालून, भडक पिवळे कपडे घातलेली व्यक्ती नव्हे. ती एक पूर्ण चेतना असे सांगत असून ती सर्वत्र आणि सर्व गोष्टींमध्ये भरून राहिली आहे. यालाच वासुदेव असे म्हटले आहे. असे जे तत्व जे अपरा प्रकृती आणि परा प्रकृती यांना आपल्यात सामावून घेते ते तत्व म्हणजे वासुदेव होय. आणि हेच वासुदेव असे म्हणतात कि,
यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति |
तस्य तस्याचला श्रद्धां तामेव विद्ध्याम्यहम | ( ७.२१)
‘कोणीही, कोणतीही श्रद्धा ठेऊन माझ्याकडे येतो, त्यांना मी त्यांच्या भक्ती प्रमाणे त्यांच्या पूजेचे फळ प्राप्त करून देतो. आणि हि भक्ती त्यांच्यात निर्माण करणारा मीच असतो. म्हणजे हि भक्ती म्हणजे मी, हि पूजा म्हणजे मीच आणि त्याचे फळ पण माझ्याकडूनच येते. पण हे फळ तात्पुरते असते. पण जो ज्ञानी असतो तो मला, माझ्या स्वरूपाचे पूर्ण ज्ञान असलेला असा असतो आणि म्हणून तो त्या चार प्रकारच्या लोकांमध्ये श्रेष्ठ आहे’. ज्याला कोणाला आत्म-ज्ञान झाले आहे, तो पण हेच म्हणतो कि ती फक्त एक (चेतना) आहे.असे लोक जाणून असतात कि हे सर्व त्या एकपासून निर्माण झाले आहे आणि त्यादृष्टीने ते त्या सर्वत्र एकालाच बघत असतात. जे जगाच्या आसक्तीमध्ये आणि भांडणांमध्ये अडकून राहतात, त्यांना ते तसे दिसत नाही. ते मग आपापल्या धर्म शास्त्रांच्या पोथ्या-पुराणे एकमेकात भांडत बसतात आणि म्हणतात कि, ‘ मी जे म्हणतो तेच सत्य आहे’. किंवा , ‘ माझा धर्म सर्वश्रेष्ठ आहे’. पण असे ज्ञानी जे भक्तीच्या परमोच्च शिखरावर पोहोचले आहेत त्यांच्या दृष्टीला सर्वत्र आणि सर्वांमध्ये एकच चैतन्य दिसते. |
|
अनेक जन्म घेतल्यानंतर
15
2013
May
|
बंगलोर, भारत.
|
भगवतगीतेच्या सातव्या अध्यायाच्या सतराव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
"तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तीविर्शिश्यते |
प्रियो हि ज्ञानिनोsत्यर्थमहं स च मम प्रियः |"
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ' मला शरण जाणारे लोक साधारणपणे चार प्रकारचे असतात. त्यात पहिले म्हणजे दुखी , दुसरे म्हणजे ज्यांना ऐहिक सुखाची अपेक्षा असते असे, तिसरे म्हणजे जिज्ञासू आणि चवथे म्हणजे ज्ञानी. या सर्वांपैकी ज्ञानी मला सर्वात प्रिय असतो कारण त्याची भक्ति हि माझ्याशी एकरूप झालेली असते. तसेच जे लोककाही ऐहिक सुखाची अपेक्षा ठेऊन मला शरण जातात ते असतात. कारण त्या क्षणाला त्यांची भक्ति हि परमोच्च असते. परीक्षेच्या काळात सर्व विद्यार्थी रोज देवळात जाऊन देवाला चांगले गुण मिळविण्यासाठी प्रार्थना करीत असतात. पण एकदा का परीक्षा संपली कि मग देऊळ कोठे आहे हे ते विसरून जातात.मग त्या सर्वांना फक्त चित्रपटगृह दृष्टीला पडतात.(हशा) असे लोक हे आत्म केंद्रित असतात आणि ते फक्त काही उद्धेश ठेऊन (देवाकडे) येतात. त्याचप्रमाणे जिज्ञासूलोक हे त्यांची ज्ञान जिज्ञासा भागविण्यासाठी देवाकडे वळतात. हे जिज्ञासू लोकपण आत्म केंद्रित असतात आणि म्हणून त्यांच्या देवभक्तीमध्ये काही न्यून दिसून येते. पण ज्ञानी माणसाचे असे नसते. ज्ञानी माणूस हा समाधानी असतो आणि या अशा सदैव समाधानी माणसाची भक्ति हि नेहमी अविरत, अद्वितीय आणि एकरूप अशी असते. मग त्याच्या काही इच्छा पूर्ण व्हायच्या असोत किंवा नसोत त्याची भक्ति हि सदैव तशीच असते. दुख्खात किंवा सुखात असताना त्याच्या भक्तीत काही बदल होत नाही. लाभ किंवा हानी या दोन्ही अवस्थात त्याची भक्ति हि अढळ असते. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात कि ' असा ज्ञानी माणूस हा नेहमी माझ्याशी जोडलेला असतो आणि मी त्याच्याशी जोडलेला असतो.' जो माझ्याशी जोडलेला असतो तो ज्ञानी असतो, आणि अशा ज्ञानी माणसाची भक्ती हि अविरत आणि एकरूप अशी असते. असा ज्ञानी मनुष्य मला नेहमी प्रिय असतो आणि मी त्याला नेहमी प्रिय असतो. माझ्याशिवाय इतर कोठल्याच गोष्टीत त्याला रस नसतो आणि त्याच्यासाठी मी सर्वस्व असतो. आणि मग ज्या कोणाला मी असा प्रिय असतो, तो सुद्धा मला सर्वात प्रिय होतो. भगवतगीतेच्या सातव्या अध्यायाच्या अठराव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
"उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम |
आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्माम गतीम |"
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, 'याचा अर्थ असा नव्हे कि बाकीचे भक्त चांगले नाहीत. नाही, ते सर्व चांगले आहेत आणि निःसंशय हे सर्व भक्त मनुष्यात चांगले आहेत. मग ते माझ्याकडे दुखः दूर करण्याची मागणी घेऊन आले असतील किंवा काही ऐहिक सुखाची अपेक्षा ठेऊन आले असतील किंवा उत्सुकतेपोटी आले असोत, ते सर्व उत्तम आणि धार्मिक असेच आहेत. ते काही कामाचे नाहीत असे समजू नका. सर्वसाधारणपणे, जेंव्हा आपण एकाला उत्तम म्हणतो तेंव्हा बाकीचे नगण्य समजले जातात. आणि मग ती आपली सवय होऊन जाते.जर कोणी एखादा चांगले असेल तर मग बाकीचे वाईट ठरतात. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण लगेचच असा खुलासा करतात कि ' हे चार हि प्रकारचे लोक चांगले असतात.म्हणून त्यांचावर टीका करू नका. त्यापैकी कुणा एकाला दुसऱ्यापेक्षा कमी समजू नका. तो कोणत्याही कारणांने भक्ति करीत असेल, मग तो दुखीः आहे म्हणून किंवा त्याच्या भौतिक सुखासाठी असेल म्हणून, किंवा त्याला ज्ञानाची तृष्णा असेल म्हणून, ते सर्व चांगलेच आहेत. पण मी आणि ज्ञानी मनुष्य यात काहीच फरक नाही. तो आणि मी एकच आहे.असा ज्ञानी माणूस माझ्याशी एकरूप होऊन त्याचा उद्धार होतो. देव, गुरु आणि आत्मन (स्वतः) यात काही फरक नाही.म्हणून वासुदेव (श्रीकृष्णाचे अजून एक नाव)आणि ज्ञानी मनुष्य यात काही फरक नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात कि ‘ ज्ञानी मनुष्य हा आरश्याप्रमाणे असतो.तुम्ही जर ज्ञानी माणसात डोकावून पाहिलेत तर तेथे तुम्हाला तुमच्या मनाचे प्रतिबिंब पाहायला मिळेल.तुम्हाला तुमचे स्वत्व त्या ज्ञानी माणसात प्रतिबिंबित झालेले दिसेल.म्हणून त्याज्ञानी माणसात मला पाहायला लक्षात ठेवा आणि तो म्हणजेच मी आहे असे ध्यानात ठेवा. भगवतगीतेच्या सातव्या अध्यायाच्या एकोणिसाव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
“बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मा प्रपध्यते |
वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः|”
अनेक जन्म-मरणाच्या चक्रातून गेल्यानंतर ज्ञान प्राप्त होऊन ज्ञानी होतो. असे ज्ञानी आत्मे, ज्याचा माझ्यावर विश्वास आहे ते अनेक जन्म-मरणाच्या चक्रातून गेल्यानंतर मला प्राप्त करतात.असे पुण्यात्मे, कि ज्यांना माहित असते आणि जे असा विश्वास ठेवतात कि हि सर्व माझीच माया आहेआणि दुसरे काही नाही, ते पुण्यात्मे खरोखरच दुर्मिळ असतात. तुमच्यापैकी अनेक जन असा विचार करीत असतील कि’ हे सत्य समजण्यासाठी मला अजून किती जन्म घ्यायला लागतील कोण जाणे’. मी तुम्हाला सांगतो कि आज येथे हे ज्ञान मिळविण्यासाठी जेंव्हा तुम्ही आला आहात, तेंव्हा तुम्ही अनेक जन्म-मरणाची चक्रे पार केलेली आहेत. तुम्ही अनेक जन्म- मरणाची चक्रे पार करून तुम्ही येथे योग्य वेळी पोहोचला आहात. याच्या विरुद्ध विचार करू नका, ‘ हे ज्ञान मिळविण्यासाठी अजून किती जन्म घ्यावे लागणार आहेत कोणास ठाऊक?’ या बाबतीतील तुमची कल्पना अगदी या क्षणाला बदलून टाका. आपण आपली एखाद्या गोष्टीविषयीची कल्पना केंव्हाही बदलू शकतो.अगदी देवापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा, आपल्याला एका गोष्टीची गरज असते आणि ती म्हणजे फक्त आपला बघण्याचा दृष्टीकोन बदलणे. त्यासाठी दुसरे काही करायची गरज नाही. त्यासाठी तुम्ही आराम करून बाकी सर्व कसे सोडून द्यायचे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता जेंव्हा तुमचे मन हे जगातील अनेक सुंदर गोष्टींकडे आकर्षित होत असताना तुम्ही हे सर्व कसे सोडून देणार. अनेक वेळा तुम्ही तुमच्या वाईट सवयी सोडून देऊ इच्छिता पण तुम्ही त्या सोडू शकत नाही.पण मग जेंव्हा तुम्ही तुम्हाला त्रासदायक आणि दुखः देणाऱ्या त्या वाईट सवयी सोडू शकत नाही तर तुम्हाला आकर्षित करणाऱ्या सुंदर गोष्टी तुम्ही कश्या सोडू शकणार? जेंव्हा तुम्ही त्या त्रासदायक तसेच सुखकारक अशा गोष्टी सोडू शकत नाही तेंव्हा तुमचे मन दोलायमान होते. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण भगवत गीतेच्या सातव्या अध्यायाच्या अकराव्या श्लोकात म्हणतात, बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम. जेंव्हा तुम्हाला शक्तीची जाणीव होईल तेंव्हा तेथे मी आहे असे खात्रीने समजा. शक्तिवान माणसाची शक्ती मी आहे. जेंव्हा तुम्हाला कोठे चमक दिसेल तर ती चमक म्हणजे मी होय असे समजा. जेंव्हा तुम्हाला काही सुंदर गोष्ट दृष्टीला पडेल तेंव्हा ती म्हणजे मी होय असे समजा. जेंव्हा तुम्हाला कोणी बुद्धिमान दिसेल तेंव्हा त्याची बुद्धी म्हणजे मी होय असे समजा. तुम्ही सौंदर्य सोडून देऊ शकत नाही आणिते पकडून ठेऊ शकत नाही. तुम्ही जर ते पकडायचा प्रयत्न केला तर तुम्ही तसे करू शकणार नाही.खरे पाहता जेंव्हा आपण सौदर्य आपल्या ताब्यात ठेवायचा प्रयत्न करीत असतो तेंव्हा अनेक प्रश्न उद्भवतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘ अनेक जन्मानंतर, ज्ञानी माझ्याकडे येतात आणि मला शरण जातात.’ ज्ञानी लोकांचे अनेक स्तर असतात.आणि अनेक वेळेला काही ज्ञानी लोकांना अहंकाराची बाधा होते आणि ती त्यांच्या विनाशाला कारणीभूत होते. ते असा विचार करतात ‘ मी सर्वात ज्ञानी आहे, माझे ज्ञान हे इतर कोणापेक्षा जास्त आहे.’ असे लोक काही काळ ज्ञानी वाटतात पण लवकरच ते अज्ञानात नाहीसे होतात. ‘मी ज्ञानी आहे’ एवढा विचार अहंकार जागृत करायला पुरेसा असतो.त्याला दुर्हंकार असे म्हणतात. आणि जर एखाद्याला आपण ज्ञानी असल्याचा अहंकार उत्पन्न झाला तर त्याचा परिणाम हा फार वाईट होतो. अशी विचारसरणी असलेले लोक हे शास्त्रज्ञ आणि हुशार , बुद्धिवान माणसात पाहायला मिळतात.असे लोक जेंव्हा ज्ञानाच्या एका पातळीवर पोहोचतात तेंव्हा त्यांना असे वाटते कि त्यांनाच सर्व काही कळते आणि मग ते दुसऱ्या कोणाचे काही ऐकून घेत नाहीत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘ एक ज्ञानी मनुष्य जो भक्त पण आहे, ज्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, आणि जो जगातली प्रत्येक गोष्टीत मला पाहतो, तो महात्मा’. हा ज्ञानी आणि महात्मा यातील फरक होय. जो महत तत्व च्या पलीकडे गेला आहे ( असे तत्व कि जे अहंकारापेक्षा सूक्ष्म आहे) तो महात्मा. ज्याप्रमाणे प्रकृतीचे आठ प्रकार असू शकतात- पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अवकाश, मन, बुद्धी आणि अहंकार, ( दैवी उर्जेच्या आठ प्राकृतिक अभिव्यक्ती) , महा तत्व हे याअहंकाराच्या पलीकडले असून ते अगदी सूक्ष्म आहे. जो अहंकाराच्या पलीकडे गेलेला आहे आणि ज्याने महा तत्वाचा अनुभव घेतला आहे तो महात्मा. हाच तर बुद्धी आणि ज्ञान यातील फरक आहे. ज्ञान हे बुद्धीतून निर्माण होते, पण जेंव्हा त्याला अहंकाराचा स्पर्श होतो तेंव्हा ते अज्ञानात परिवर्तीत होते. मग अशा मनुष्याचे अधःपतन सुरु होते. ज्ञानाबद्धलचा अहंकार सर्वात घातक असतो आणि तो मग अधःपतनाला कारणीभूत होतो. आता कोण या अहंकाराच्या पलीकडे जाऊ शकतो? फक्त एक भक्त अहंकाराच्या पलीकडे जाऊ शकतो. भक्त होणे म्हणजे नम्र,साधे आणि स्वाभाविक असणे होय. भक्त अगदी वेड्याकडून पण शिकायला तयार असतो, जो लहानमुलाकडून शिकायला तयार असतो, किंवा एक स्त्रीकडून, किंवा पुरुषाकडून, जो कोणाकडून हि ज्ञान मिळवायचा प्रयत्न करतो,कारण त्याला त्या सर्वात देव दिसत असतो, आणि असे नेहमी दुर्मिळ असते. जो सर्वत्र दैवी तत्वाचा अनुभव घेत असतो,तोच महात्मा. असा माणूस जो कि त्याला शिव्या-शाप देणाऱ्या मध्येपण वासुदेवाला पाहतो, आणि त्याची स्तुती करणाऱ्यात पण वासुदेवाला पाहतो, असा दुर्मिळ असतो कारण तो केवळ बाह्यरंग न बघता त्याच्या अंतर-आत्म्याला पाहत असतो आणि वरच्या देखाव्याला भुलत नाही. याचा अर्थ असा नव्हे कि ‘वासुदेव, वासुदेव “ म्हणत तुम्ही मुलांच्या मागे लागा, असे केल्याने ती घाबरून जातील. तुम्ही नेहमीसारखे वागले पाहिजे पण तुमच्या मनात अशी खूण-गाठ बांधली पाहिजे कि हे सर्व एकाच दैवी तत्त्वातून निर्माण झाले असेऊन त्याचाच एक भाग आहेत. चित्रपटातील नायक आणि खलनायक हे एकाच तत्त्वातून आलेले असतात.पडद्यावर दिसणारे सर्व एकाच दिव्याच्या भिंगातून येत असतात. तुम्ही तो चित्रपट आणि त्यातील अभिव्यक्ती यात न गुंतता ते दाखविणाऱ्या दिव्याच्या भिंगाकडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे. ते दैवी भिंग, तो दैवी दिवा म्हणजे वासुदेव होय, ती एक विशुद्ध जागृतीची जाणीव ज्यातून हे सर्व उत्पन्न झाले आहे आणि ज्याच्या आधारावर हे सर्व चालू आहे ते. हे सर्व म्हणजे त्या एकमेव जाणिवेचे खेळ आहेत आणि तीच जाणीव तुमच्यात पण आहे. म्हणून ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या नाटकात भाग घेता, जेथे प्रत्येकाला एक भूमिका असते, तुम्ही पण तुमच्या वाट्याला आलेली भूमिका पार पाडा. |
|
प्रचंड सामर्थ्याचे गुपित
11
2013
May
|
बंगलोर, भारत
|
नंतर येतात पुढचे दोन श्लोक, ‘बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् I बुद्धीर्बुद्धीमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् II बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् I धर्माविरूद्धो भूतेषु कामोsस्मि भरतर्षभ II’ (७.१० व ७.११) प्रत्येकामध्ये बीज उपस्थित आहे. या जगात येणारा प्रत्येक मनुष्य आपल्या सोबत काहीतरी ( गुण किंवा देणगी) घेऊन येतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये हे काही उपजत गुण (बीज) असतात जे बदलत नाहीत. अनेक वेळा तुम्ही शिक्षकांना, ‘विद्यार्थ्यामध्ये हा गुण जर केवळ विकसित होऊ शकला तर बरे’ असे म्हणताना ऐकले असेल. तुम्ही त्याच गोष्टीचा केवळ विकास करू शकता ज्याचे बीज तुमच्या आत असते. जर सुरुवातीपासूनच काही नसेल तर मग तुम्ही ते गुण कसे काय विकसित करणार? म्हणून भगवान कृष्ण म्हणतो, ‘अनादी काळापासून प्रत्येक जीवामध्ये (जिवंत प्राण्यामध्ये) बीज हजर आहे आणि हे काही नवीन नाहीये. त्याला कोणता आरंभ नाही आणि ते कधी पेरल्या गेले हे कोणालाही माहिती नाही. मीच हे बीज आहे जे सर्व जिवंत प्राण्यांमध्ये (भूतानां) उपस्थित आहे. हे तू जाणून घे कारण प्रत्येक जिवंत प्राणी, प्रत्येक जीवजंतू या सर्वांच्या आत एक बीज अस्तित्वात आहे. ज्याप्रमाणे अनादी काळापासून हे बीज उपस्थित आहे त्याप्रमाणे अनादी काळापासून हे सर्व जीव अस्तित्वात आहेत. तीन गोष्टी आहेत आहेत ज्यांना अनादी (आरंभ रहित) आणि अनंत (शेवट नसलेले) आहेत असे मानतात. एक आहे ईश्वर, दुसरा जीव (इथे वैयक्तिक आत्मा किंवा चैतन्य या अर्थाने). आणि तिसरा आहे प्रकृती (सृष्टी). अनादी काळापासून अपरा-प्रकृती अस्तित्वात आहे. हे ईश्वर आणि जीव यांच्याबाबतीतसुद्धा लागू आहे. तर निर्मिती ही वर्तुळाप्रमाणे (वृत्त); वर्तुळाला न आरंभ असतो आणि न अंत, आणि तरीसुद्धा प्रत्येक बिंदू हा सुरुवात आणि शेवट दोन्हीही असतो. भगवान कृष्ण पुढे अजून समजावतो, ‘हे अर्जुना, जर तुम कोणी बुद्धिमान व्यक्तीला पाहिलेस तर असे समजू नकोस की त्या व्यक्तीने तिचे बुद्धिमत्ता आपणहून कमावली आहे. बुद्धीमंतातील बुद्धीमानता मी आहे.’ भगवानाने ही अतिशय चलाख गोष्ट केली होती. जिथे कुठे मन अडकून पडते किंवा आकर्षित होते तिथे भगवान कृष्ण अर्जुनाच्या मनाला त्या सर्व जागेमधून काढून पुनःपुन्हा त्याच्यावर केंद्रित करण्यास भाग पडतो. बुद्धिमान लोकांचा आपल्यावर फार प्रभाव पडतो. आपण विचार करतो, ‘हा माणूस किती बुद्धिमान आहे. त्याची बुद्धी किती कुशाग्र आहे आणि त्याला किती ज्ञान आहे’. अश्या प्रकारे आपण त्याची स्तुती करू लागतो. मनाला परत आणण्यासाठी म्हणून भगवान कृष्ण म्हणतो, ‘जिथे कुठे तुम्हाला अशी तळपती बुद्धीमानता दिसून येईल तेव्हा ती मी आहे हे जाणून घे. तो केवळ माझ्या एकट्याचा अविष्कार आहे.’ असे म्हणून तो मनाला परत आणून त्याच्यावर केंद्रित करतो. याचा अर्थ असा की जेव्हा कधी तुम्ही कुशाग्र बुद्धी पाहता तेव्हा ती कृष्ण आहे आणि ती कृष्णाकडूनच आलेली आहे हे लक्षात घ्या.जेव्हा तुम्ही हे लक्षात घेता तेव्हा तुमचे मन इतरत्र कुठेही भटकू शकत नाही (कारण कुठेही मन गेले तरी त्याला कृष्णाचे रूप गवसेल आणि अशा तऱ्हेने ते केंद्रित राहील). त्याचप्रमाणे तो म्हणतो, ‘सामार्थ्यावानांमध्ये मी तेजस (प्रभा किंवा उज्ज्वालता) आहे. कोणाच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसणारा मी तजेला आहे. लालसेचा परिणाम न होणाऱ्या व्यक्तीमधील मी धैर्य आहे.’ द्वेष आणि तिरस्कार यापासून एखाद्याला शक्ती मिळू शकते. असे लोक अतिशय भक्कम दिसतात. परंतु मी ते नाही. अतिरेकी आणि हिंसक लोक द्वेषातून प्रचंड शक्ती कमावताना दिसतात. परंतु भगवान कृष्ण म्हणतो, ‘(नकारात्मकतेतून मिळणारी) ती शक्ती मी नाही.’ अतिरेकी इतके क्षोभित होऊन चालतात. ते दुसऱ्यांना घाबरवतात आणि आपल्या शक्तीचे प्रदर्शन करतात. परंतु अशी शक्ती काम आणि क्रोध रहित नसते. जिथे लालसा असते तिथे तिरस्कारसुद्धा असतो. जे लालसेपोटी शक्ती प्रदर्शन करतात ते मूर्ख आहेत. तसेच, उद्विग्नतेची भावना असणारे लोकासुद्धा कमालीची शक्ती प्रदर्शित करतात. आजकल जगामध्ये हे नेहमीच दिसून येते. उद्विग्नेतेची भावना असणारे लोक स्वतःला अतिशय भक्कम दाखवितात, परंतु अशी शक्ती काहीही उपयोगाची नाही. क्षोभित इच्छांमुळे येणारी शक्ती हे वरकरणी असते, केवळ वरवरची. ही शक्ती आतून पोकळ असते. अशा माणसांच्या मनात खोल भीती दडून असते. आणि आतून भीती असणारे भक्कम कधीच असू शकत नाही. आपल्या स्वतःच्या चैतन्यासोबत जो जोडलेला नसतो तो कधीही भक्कम होऊ शकत नाही. जी व्यक्ती आपल्या स्वतःच्या केंद्रस्थानासोबत जोडलेली नाही आणि स्वतःच्या अस्तित्वाविषयी जागरूक नाही, अश्या व्यक्तीने बाहेर कितीही जरी मोठे शक्ती प्रदर्शन तरी आतून ती व्यक्ती भीतीने पोकळ असते. तसेच तिरस्कार आणि राक्षसी वृत्तीने येणारी शक्ती हीसुद्धा आतून पोकळ असते. ‘द्वितीय द्वै भयं भवती’ अशी एक म्हण आहे. याचा अर्थ दोनचे अस्तित्व (इथे द्वंद्व या अर्थाने; म्हणजे स्वतःसोबत संयुक्त न झालेला हा अर्थ अभिप्रेत आहे) हे भयाचे कारण आहे. जे लोक स्वतःच्या चैतन्याबरोबर संयुक्त झालेले नाहीत (अंतर्मुखी) आणि आतल्या दिशेने स्वयंकडे वळलेले नाहीत, अशा लोकांना कधीच भक्कम म्हणता येणार नाही. आणि जेव्हा एखादा लालसा आणि क्षोभाने युक्त असतो तेव्हा त्यांना आतल्या दिशेने जाऊन स्वयंसोबत संयुक्त होता येत नाही. जेव्हा एक व्यक्ती स्वतःच्या आत केंद्रित होते तेव्हा प्रचंड शक्ती उदय पावते. अशी शक्ती लालसा आणि क्षोभ यांच्या नकारात्मकतेपासून मुक्त असते आणि त्यांच्या पलीकडे असते. केवळ तीच खरी शक्ती आहे. म्हणूनच भगवान कृष्ण म्हणतो, ‘जिथे कुठे तुम्हाला अशी निव्वळ शक्ती दिसेल तिथे मी आहे हे जाणून घ्या.’ आता तुम्ही विचाराल, ‘भगवान कृष्णाने सांगितले की जेव्हा आपण लालसा आणि क्षोभ यापासून मुक्त असतो तेव्हा महान शक्ती येते. याचा अर्थ असा की सर्व इच्छा वाईट आहेत? इच्छा असणे चुकीचे आहे, किंवा सर्वांचे कल्याण होवो ही इच्छासुद्धा चुकीची आहे? याचा अर्थ असा झाला का की एखाद्याला काहीसुद्धा इच्छा आकांक्षा असू नये?’ नाही, असे नाहीये. भगवान कृष्ण म्हणतो, ‘धर्माच्या विरुद्ध न जाणाऱ्या (कर्तव्याचे सदाचरण) सर्व इच्छा आकांक्षा मी आहे. जे सर्व लोक धर्मानुसार वागतात आणि आपल्या स्वधर्माचे (आपली जबाबदारी असलेल्या आपल्या कर्तव्याचे) पालन करतात, अशा लोकांमध्ये उद्भवणारी इच्छा ही मी आणि केवळ मीच आहे.’ तुम्ही हे अनुभवले असेल: अशा प्रसंगी जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयात उठणाऱ्या इच्छेनुसार वागता तेव्हा तुम्हाला जाणवते की तुमची आणि इतरांची उन्नती झाली आहे. सगळ्यांचा त्याने फायदा झाला आहे. अशा इच्छा या देवाचा अविष्कार असतात. जेव्हा आपण धर्मानुसार वागतो तेव्हा आपल्या हातून कोणतीही चूक घडू शकत नाही. तसेच धर्मासोबत इच्छासुद्धा निर्माण होतात. परंतु अशा इच्छा या स्वभावाने दैवी (दैवी इच्छाशक्तीने प्रेरित) असतात. म्हणूनच ‘तन्मेया मनः शिव-संकल्पमस्तु’ (सर्वांचे कल्याण करणाऱ्या इच्छा माझ्या मनात येवो) असे वेदांमध्ये म्हटलेले आहे. सर्वांचे भले करणाऱ्या पवित्र इच्छा माझ्या मनात येवो. मला सत्यकडे नेणाऱ्या आणि जे काही मंगल आहे त्या सर्वांकडे घेऊन जाणाऱ्या इच्छा माझ्या मनात येवो. आता, सत्य जाणण्याची इच्छासुद्धा एक इच्छा आहे. जर आपल्याला आयुष्यात प्रगती होऊन पाहिजे असेल तर तीसुद्धा एक इच्छा आहे. सर्वांचे भले होण्याची इच्छासुद्धा पुन्हा एक इच्छा आहे. (सर्वांच्या) अभीष्टचिंतनाशिवाय तुम्ही सण साजरे करूच शकत नाही. तुम्ही तुमच्या जीवनात इच्छेशिवाय एक पाऊलसुद्धा उचलू शकत नाही. जीवनात तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कृती मागे इच्छा असतात. आयुष्यात तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कृती मागे कारण असते, आणि ते कारण आहे इच्छा. तर मग कोणत्याप्रकारची इच्छा असायला पाहिजे? अशी इच्छा जी धर्माच्या विरोधात नाही तर धर्माला अनुसरून आहे. म्हणून भगवान कृष्ण म्हणतो, ‘मी धर्माला अनुसरून असलेल्या सर्व इच्छा आहे.’ तुम्ही सर्वांनी कधीतरी हे अनुभवले असेल, जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वागलात आणि त्याचा निकाल तुम्हाला पाहिजे तसा लागला, आणि अनेक लोकांना तुमच्या या कृतीने दिलासा मिळाला. अशा काही इच्छा आहेत ज्या तुमच्यात निर्माण होतात,जेव्हा तुम्ही त्यानुसार कृती करता तेव्हा त्याने तुम्हाला आणि सभोवतीच्या सर्वाना शांतता आणि आराम मिळतो. अशा इच्छा मनात कोणताही कलह निर्माण करीत नाही आणि त्या धर्माच्या विरुद्ध नसतात. धर्माच्या विरुद्ध असणारी तुमची कोणतीही कृती तुम्हाला मनात टोचण देईल. ती तुम्हाला आतून त्रास देत राहील आणि तुम्हाला वाटेल, ‘अरे, मला वाटते की मी काहीतरी खरोखर चुकीचे केले आहे’. तुमची सदसद्विवेकबुद्धी तुम्हाला हे सांगेल. परंतु जेव्हा तुमची कृती धर्माला अनुसरून असेल तेव्हा तुम्हाला शांत आणि शिथिल वाटेल. ‘ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्र्च ये I मत्त एवेति तान्विध्दि न त्वहं तेषु ते मयि II’ (७.१२) भगवान कृष्ण म्हणतो, ‘हे अर्जुना, तीन गुण, सत्त्व, राजस आणि तमस हे माझ्यातून निर्माण झालेले आहेत. परंतु ना मी त्यांच्यात आहे आणि ना ते माझ्यात, तरीसुद्धा ते सर्व माझ्यापासून निर्माण झालेले आहेत. हे तू जाणून घे.’ हे अतिशय विचित्र वाक्य आहे. भगवान कृष्ण म्हणतो, ‘मी त्रिगुणाने नियंत्रित नाही आणि त्रिगुण माझ्यामध्ये निवाससुद्धा करीत नाही, तरीसुद्धा ते माझ्यापासून अस्तित्वात आले आहेत.’ यामागे मोठे वैज्ञानिक सत्य दडले आहे. जेव्हा तुम्ही हे समजून घेण्यास खोलवर जाता तेव्हा तुम्हाला लक्षात येते की जेव्हा तुम्ही त्रिगुणांच्या खेळाचे साक्षीदार होता तेव्हा तुम्ही त्या सर्वांपासून विभक्त होता. म्हणून तो म्हणतो, ‘ जरी ते (त्रिगुण) माझ्यापासून वेगळे आहेत, तरी ते माझाच विस्तार आहे.’ मी माझ्या शरीरावर कापड घेतले आहे पण मी ते कापड नाही आणि मी त्या कापडाचा भागसुद्धा नाही. हे समजण्यास हे उदाहरण सर्वात जवळचे आहे. जसे आपण आपल्या अंगावर कपडे घालतो, पण आपण आपले कपडे बनत नाही आणि ना आपण त्या कपड्यांचा भाग बनतो, तरीसुद्धा ते आपल्या मालकीचे असतात. तुम्हाला हे समजले का? भगवान कृष्ण म्हणतो, ‘तो मी आहे ज्याने त्रिगुण (कपडा) निर्माण केला, आणि ते माझ्या मालकीचे आहेत, तरीसुद्धा मी त्यांनी प्रभावित नाही आणि ना ते माझ्यामध्ये निवास करतात आणि मीसुद्धा ते त्रिगुण नाही. म्हणून, हे धनंजय (अर्जुनाचे आणिक एक नाव ज्याचा अर्थ आहे महान संपदेचा जेता), तूसुद्धा त्रिगुणांचा साक्षीदार बन. ते माझ्या दैवी स्वभावाचा एक भाग आहे हे तू समजून घे. ते मी निर्माण केले आहेत आणि तो मीच आहे जो त्यांना कायम ठेवून आहे, आणि तरीसुद्धा मी हे त्रिगुण नाही.’ ज्याप्रमाणे तुमच्या शरीराच्या वेगवेळ्या भागासाठी निरनिराळे कपडे असतात, पायांसाठी चप्पल-बूट असतात, शरीरासाठी आतले आणि बाहेरचे कपडे, फेटा-टोपी डोक्यासाठी, त्याचप्रमाणे सर्व गुणांचे निराळे गुणधर्म असतात. आता जर तुम्ही तुमचा फेटा काढून पायाला घातला, किंवा हातमोजे जर तुम्ही पायात घातले आणि पायमोजे हातात घातले तर त्याने काम बनणार नाही. प्रत्येक कपड्याची स्वतःची ठरलेली जागा आहे आणि त्या जागेव्यतिरिक्त ते इतर कुठेही घालता येत नाही. म्हणून भगवान कृष्ण म्हणतो, ‘या प्रत्येक त्रिगुणांचे स्वतःचे निरनिराळे गुणधर्म आहेत आणि त्यांची स्वतःची ठरलेली एक विशिष्ट जागा आहे, आणि ते सर्व माझ्यापासून आलेले आहेत, आणि तरीसुद्धा मी ते नाही. म्हणून मला त्यांच्यात शोधायला जाऊ नको,कारण मी त्यांच्या पलीकडे आहे.’ तुम्हाला कळते आहे का की भगवान कृष्ण इथे काय करण्याचा प्रयत्न करीत आहे? अर्जुनाचे मन ज्या ठिकाणी आकर्षित होण्याची शक्यता आहे तिथून तो परत आणतो आहे, आणि अर्जुनाला कृष्णावर लक्ष केंद्रित करायला लावतो आहे. म्हणून यामध्ये ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीचा सहभाग आहे, आणि या संभाषणाचे हेच वैशिष्ट्य आहे. तर हे विशेष ज्ञान वापरून भगवान कृष्ण वारंवार अर्जुनाच्या मनाला ते जिथे कुठे आकर्षित झाले आहे तिथून त्याला परत आणून अर्जुनाला कृष्णाकडे लक्ष केंद्रित करायला लावतो आहे. याचा अर्थ असा की तो मनाला अतंर्मुख करायला लावून चैतन्याकडे ध्यान केंद्रित करायला लावतो आहे. हे काम गुरुचे आहे आणि शिष्याची जबाबदारी आहे. म्हणून जिथे कुठे प्रचंड शक्ती दिसून येते तिथे ती देवाची आहे आणि जो व्यक्ती ती प्रदर्शित करतो आहे त्याची ती नाही हे ओळखा. जिथे कुठे एखाद्याला सौंदर्य दिसून येते, तर ते सौंदर्य त्या व्यक्तीचे असा विचार करू नका तर त्या सौंदर्य मागे देवाचा हात आहे. देवाच्या शिवाय कोणतेही सौंदर्य असू शकत नाही. म्हणून तर, ‘सत्यं शिवं सुन्दरं’ असे म्हटले आहे. याचा अर्थ असा की जिथे कुठे भगवान शिव आहेत तिथे तिथे सौंदर्य आणि सत्य आहे. तर असे म्हणून भगवान कृष्ण अर्जुनाच्या मनाला सर्व प्रकारच्या आकर्षणांपासून मुक्त करतो आणि त्याला स्वतःकडे ओढून घेतो. कृष्णाचा अर्थ आहे आकर्षण; म्हणजे असा जो सर्वकाही स्वतःकडे आकर्षित करून घेतो. सर्व प्रकारच्या बाह्य आकर्षणांकडे भटकणाची शक्यता असणाऱ्या जागांपासून मनाला मुक्त करणे आणि त्याला केंद्रित करणे- हेच काय ते भगवान कृष्ण आहे. म्हणून जेव्हा तुम्हाला कोणी तेज-पुंजाप्रमाणे (चेहऱ्यावरअध्यात्मिक तेज दिसणे) चमकताना दिसेल तेव्हा ते भगवान कृष्णाच्या गहिऱ्या प्रेमात बुडालेले आहेत हे लक्षात घ्या, म्हणूनच ते सर्वांना स्वतःकडे आकर्षित करून घेत आहेत. याचा अर्थ त्रिगुणांमुळे भिन्नता वाटणाऱ्या या जगाकडे धावणाऱ्या मनाला आत ओढून घेणे आणि त्याला आतील चैतन्याकडे माघारी आणणे. ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पायरी आहे आणि आश्चर्यकारक विज्ञान. |
|
तुमचा वास्तविक स्वभाव
11
2013
May
|
बंगलोर, भारत
|
समग्र निर्मिती ही दोन प्रकारच्या प्रकृतीने बनलेली आहे : परा-प्रकृती आणि अपरा-प्रकृती. अपरा-प्रकृती ही आठ प्रकारची आहे परंतु परा-प्रकृती, ज्यामध्ये समस्त कायम आहे,अशी परा-प्रकृती ही केवळ एकाच प्रकारची आहे. सहाव्या अध्यायात भगवान कृष्ण म्हणतो ,’ एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय I अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा II’ (७.६) तर, भगवान कृष्ण म्हणतो,’ही समग्र सृष्टी ही अपरा-प्रकृती आणि परा-प्रकृती या दोन्हीने बनलेली आहे, आणि या दोन्हीचा जन्म माझ्यामधूनच झालेला आहे. त्यांच्या निर्मितीचे मी कारण आहे आणि त्यांच्या नाशाचेसुद्धा मी कारण आहे, आणि ते सगळे माझ्यामध्येच निवास करून आहे. हे तू जाणून घे.’ ते ज्यापासून सगळे निर्माण झालेले आहे तो देव आहे. आता तुम्ही मला विचाराल, ‘मग देव कुठून आला?’ जर तो कोणत्या उगमापासून निर्माण झाला आहे तर तो देव नाही. मग तो उगम जिथून तो निर्माण झाला तो देव आहे. नेहमी लोक मला विचारतात, ‘देवाला कोणी जन्म दिला?’ जन्म घेणारा कोणी देव कसे काय होऊ शकतो? निर्मितीमधील प्रत्येक गोष्ट ज्यापासून जन्म घेते, आणि सर्वात शेवटी ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट विलीन होते ते देव आहे. हे ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की देव म्हणजे काहीतरी किंवा कोणीतरी असे जे तुमच्यापासून अतिशय दूर आहे; कोणीतरी ज्याच्यापासून सगळी निर्मिती निर्माण झाली आहे. नाही, तो दूरवर नाहीये. म्हणूनच भगवान कृष्ण म्हणतो,’मला आणि फक्त मला (सगळे काही ज्यातून निर्माण झाले आणि ज्यामध्ये सगळे काही विलीन होणार आहे अशा सर्वांचे मूळ असलेल्या मला) जाणून घे.’ हे ‘मी’ व ‘माझे’ जे प्रत्येकामध्येच असते, ते चैतन्य ( स्वयं किंवा बोधावास्था ) आहे. आणि सर्व काही या चैतन्यातून निर्मान्र झाले आहे, आणि सर्वात शेवटी सगळे काही या चैतन्यामध्ये विलीन होणार आहे. चैतन्य हा जीवनाचा पाया आहे. हे शरीर जिवंत आहे याचे कारण आहे चैतन्याची उपस्थिती. जेव्हा चैतन्य देहाला सोडून जाते तेव्हा जीवन संपुष्टात येते. म्हणून भगवान कृष्ण म्हणतो, ‘मला प्रत्येक जिवामध्ये अस्तित्वात असलेली चेतना म्हणून जाणून घे. ती चेतना जी सर्व गोष्टीचा आधार आहे आणि जी समग्र निर्मितीला कायम ठेवून आहे. सर्व गोष्टींचे मी आद्य कारण आहे.’ तर, चैतन्य हे सर्व गोष्टींचा आधार आहे. आईच्या उदरात असलेल्या बाळामध्येसुद्धा चेतना असते ज्यामुळे त्या बाळाचा विकास होते. जर ती नसेल तर बाळाला मृत घोषित करतात. भगवान कृष्ण म्हणतो, ’निर्मितीमध्ये जिवंत असलेली आणि विकास पावणारी प्रत्येक गोष्टीचे कारण मी चैतन्य शक्तीच्या रूपाने सर्वत्र आविष्कृत होत आहे.’ चैतन्याच्या अस्तित्वामुळे झाडांना नवीन पालवी फुटते आणि त्यांना फळे येतात. झाडे आणि झुडुपे जिवंत आहेत कारण त्यांच्यात चैतन्य उपस्थित आहे म्हणून, नाहीतर ते विकसित झाले नसते. आता आपल्याला वाटेल की दगडात प्राण नसतात परंतु तसे नाहीये. दगडातसुद्धा चैतन्य आहे. असे म्हणतात की समस्त निर्मिती ही जैविक (म्हणजेच जिवंत आणि विकास पावणारी) आहे. सम्पूर्ण रचनेमध्ये जीवितरहित काहीही नाहीये. सर्व गोष्टी जिवंत आहेत. तुम्हाला काय वाटते की निसर्ग किंवा पृथ्वी मृत आहे जेव्हा की तिने दीर्घ काळापासून अब्जावधी जीवांना जन्म दिला आणि सांभाळले आहे? बिलकुल नाही!! ही वसुंधरा अतिशय जिवंत आहे, म्हणूनच आपण तिला आपली माता, किंवा भू देवी म्हणतो. तिला ही पदवी बहाल केली आहे कारण तिच्यात जीव आहे. निसर्ग मातासुद्धा जिवंत आहे. तर पृथ्वी ही जैविक आहे. अब्जावधी जिवंत प्राणीमात्र आणि सूक्ष्म जीवजंतू तिच्यामध्ये उपस्थित आहेत. निर्मितीच्या प्रत्येक अणु आणि प्रत्येक पेशी यामध्ये जीव आहे. जेव्हा तुम्ही निर्मितीला या दृष्टीकोनातून पाहता तेव्हा तुम्हाला हे जाणवते की इथे काहीही मृतवत नाहीये, सर्वकाही जिवंत आहे. जर तुम्ही बघाल तर निर्मितीतील काही गोष्टी निश्चल वाटतात तर काही हलताना दिसतात. परंतु वास्तवामध्ये सर्व काही गतिमान आहे. सूर्यसुद्धा हलतो आहे. म्हणून भगवान कृष्ण म्हणतो,’या समस्त निर्मितीमध्ये सर्वत्र मी जिवंत आहे. ही निर्मिती अस्तित्वात आहे ती केवळ माझ्यामुळेच.’ भगवान कृष्ण पुढच्या श्लोकात समजावून सांगतो, ‘मत्तः परतरं नान्यत्किञ्चिदस्ति धनञ्जय I मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव II’ (७.७) तो म्हणतो, ‘ हे अर्जुना! माझ्याविरहित या निर्मितीमध्ये काहीही नाहीये हे जाणून घे. तो केवळ मीच आहे जो सर्व गोष्टींमध्ये आहे. या निर्मितीमध्ये माझ्या पलीकडे काहीही नाहीये. ज्याप्रमाणे मोती हे धाग्यामध्ये ओवलेले असतात त्याप्रमाणे ही समग्र निर्मिती माझ्यामध्ये विणलेली आहे.’ काल मी म्हणालो होतो की ही समस्त निर्मिती ही गडद द्रव्य किंवा गडद उर्जा ज्याला म्हणतात त्या उर्जेने युक्त आहे. याचे सोप्पे उदाहरण आहे हवा. पहा, तुमच्या सभोवती हवा आहे आणि तुमच्या आतसुद्धा हवा आहे. जर तुमच्या शरीरातील सर्व हवा काढून टाकली तर तुमचे शरीर नुसते आक्रसून जाईल. टायरमध्ये ज्याप्रमाणे हवा असते त्याप्रमाणेच शरीरसुद्धा हवेने भरलेले आहे. टायरमधील हवा काढल्यावर ते जसे आकुंचित पावते तसेच आपले शरीरसुद्धा हवा काढल्यावर आकुंचित होऊन एका पिशवीत मावेल. शरीर इतके आकुंचित पावेल. ज्याप्रमाणे हवा काढल्यावर फुगा आकुंचित पावतो आणि एकदम छोटासा होऊ जातो त्याप्रमाणे. त्याचप्रमाणे, हवा हा घटक तुमच्या शरीराच्या आत आणि त्याच्या सभोवती आहे. आपले शरीर हवा या घटकाशिवाय जिवंत राहू शकत नाही. त्याचप्रमाणे, या जगात कोणतीही गोष्ट चैतन्याच्या शक्तीशिवाय जिवंत राहू शकत नाही. म्हणून तो म्हणतो, ‘ज्याप्रमाणे मोती हे धाग्यामध्ये ओवलेले असतात त्याप्रमाणे ही समग्र निर्मितीमध्ये मी उपस्थित आहे. सर्व गोष्टींच्या केंद्रस्थानी मीच आहे.’ पुढचा श्लोक, ‘रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः I प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरूषं नृषु II’ (७.८) आता रोचक भाग सुरु होतो. भगवान कृष्ण म्हणतो, ‘मी पाण्यातील ओलावा आहे, सर्व द्रव्य पदार्थांची चव आहे; सूर्य आणि चंद्र यांच्यातून निघणाऱ्या प्रकाशांची किरणे मी आहे. सर्व वेदांमध्ये प्रणव ( निर्मितीचा आदिम ध्वनी ॐ ) मी आहे.’ आपले वास्तविक नाव ॐ आहे. जे नाव घेऊन आपण वावरतो ते आपल्याला आपल्या पालकांनी दिलेले आहे, आणि ते केवळ या जीवनकालाकरिता मर्यादित आहे. कोणचे जरी छान नाव असले तरीसुद्धा लोक मिंटू, पिंटू किंवा जिमी या लाडिक नावानेच हाक मारतात. मुलीचे नाव असेल पद्मा ( याचा अर्थ कमळ आहे) जे फारच छान नाव आहे, परंतु तरीसुद्धा लोक तिला पम्मी या लाडिक नावानेच बोलावतील. (हशा). तर आजकाल लोक एकमेकांना काहीही नावाने बोलावतात. हे नाव आपला खरा स्वभाव नाही. आपला वास्तविक स्वभाव आहे ॐ. ते आपले जन्माला येण्याधीचे नाव होते आणि ते आपण मृत्यू पावल्यानंतरसुद्धा आपले नाव असणार आहे. एक दिवशी आपण सगळे ॐ मध्ये विलीन पावणार आहोत. शीख धर्मामध्ये गुरुदेव नानक यांची एक प्रार्थना आहे, ‘इक ॐकार (देव एक आहे), सतनाम (त्याचे नाव हे सत्य आहे), कर्ता-पुरख (तो सृष्टीकर्ता आहे)’. याचा अर्थ, ॐ हे केवळ एकुलते एक सत्य आहे आणि ते समस्त सृष्टीचे कारण आहे. परंतु काही अज्ञानी लोक असतात जे म्हणतात, ‘ आम्ही ॐ मध्ये विश्वास ठेवीत नाही, आम्ही ॐकार यावर विश्वास ठेवतो.’ या दोन्हीमध्ये काय फरक आहे? काहीही फरक नाही. ‘ॐ हे सर्व वेदांचे सार आहे आणि तेच मी आहे’ ,असे भगवान कृष्ण अर्जुनाला सांगत आहे. ॐ च्या शिवाय ज्ञानामध्ये काहीही प्रगती होऊ शकत नाही. वेदांचे पठाण हे ॐ ने सुरु होते, आणि ॐ ने संपते. वेद हे ॐ चे विस्तारण आहे. समस्त निर्मितीचे सार हे ॐ आहे. ध्वनी हा अवकाशाबरोबर निगडीत गुण आहे. म्हणून याच श्लोकात भगवान कृष्ण म्हणतो, ‘उच्चारलेला आणि व्यक्त केलेला सर्व प्रकारचा अवकाशातील ध्वनी मी आहे. माणसाला मिळालेले सामर्थ्य मी आहे. ज्याप्रमाणे स्त्रीला तिच्या नाजुकपणा आणि ममत्व याने ओळखतात त्याप्रमाणे तू मला पुरुषातील निश्चयीपणाने (शक्ती, कौशल्य किंवा यत्न या लक्षणांनी) जाण’. पुढच्या श्लोकात, तो म्हणतो: ‘पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्र्चास्मि विभावसौ I जीवनं सर्वभूतेषु तपश्र्चास्मि तपस्विषु II’ (७.९) गंध हा गुण पृथ्वी या घटकाबरोबर निगडीत आहे. आपल्याला वाटते की आपल्याला सुवासाचा अनुभव वायू घटकामुळे येतो, परंतु तसे नाही. ज्याप्रमाणे साखरेचा गुण गोडपणा आहे, पाण्याचा गुण ओलेपणा आहे, अग्नीचा गुण उष्णता आहे, त्याचप्रमाणे सुवास हा गुण पृथ्वी घटकाचा आहे. म्हणून भगवान कृष्ण म्हणतो, ‘मी पृथ्वी घटकाचा सुवास आहे; मी अग्नीची उष्णता आहे, आणि प्रत्येक जीवातील जीवावेग मी आहे. एखादा माणूस चांगला असू दे वा वाईट, सिंह असू दे नाहीतर मांजर, उंदीर किंवा गाढव, जिथे कुठे तुम्हाला जीवन दिसते, त्याचे मूळ कारण मी आहे. हे सर्व मी आहे. ज्ञानी ॠषीमुनींचे तप (तपश्चर्या) मी आहे. यति आणि ज्ञानी ॠषी यांच्यातील अनुकंपा आणि इच्छाशक्ती मी आहे.’ |
|
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
.jpg)
.jpg)
.png)

.jpg)

