गुरू तत्व

11
2012
Aug
बंगलोर
अन्नकुट ( श्री श्री, व्यासपीठावर सजविलेल्या अनेक अन्न पदार्थांच्याकडे बघून म्हणतात) आज बायकांनी ४५१ प्रकारचे पदार्थ बनविले आहेत. हि तर गुजरातची खासियत आहे, हे ४५१ पदार्थ गुजरात मधून आलेल्या स्वयंसेवकांनी बनविले आहेत.

(अन्नकुट (म्हणजे धान्याचा डोंगर) हा कृष्णाच्या इंद्रावरील विजयाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो. अन्नकुटसाठी , अन्न पदार्थांचा, प्रतीकात्मक डोंगर सजविला जातो , असे म्हणतात कि गोवर्धन पर्वत जो भगवान श्रीकृष्ण यांनी भगवान इंद्रापासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी उचलला होता, त्याचे हा अन्नकुट प्रतिक आहे)

भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेत असे म्हटले आहे कि

 “ अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः” 

मी “जठराग्नी” ( आपल्या उदरातील एक प्रकारचा अग्नी जो अन्नपचनाला मदत करितो) आहे. मीच प्राणीमात्रांच्या ठिकाणी निर्माण होणारी भूक आहें आणि मीच चारही प्रकारचे अन्नपचनाला कारण होतो.

पण आपण काय करतो? आम्ही तर भुकेची वाट न बघता सारखे पोटात अन्न भरत असतो. आम्ही भगवान श्रीकृष्ण आमच्या पोटात राहू देत नाही! आणि म्हणूनच कधीतरी उपास कारणे गरजेचे असते.

लोक हे अष्टमीला उपवास करतात, त्याने सपाटून भूक लागते आणि मग ते दुसऱ्या दिवशी देवाला अनेक प्रकारचे अन्नपदार्थ अर्पण करतात.

म्हणून जेंव्हा तुम्हाला भूक लागेल तेंव्हा समजा कि भगवान कृष्ण आले आहेत.

तुमच्या पोटातील आग म्हणजे देव होय, तुमची भूक आणि अन्न म्हणजे पण देवच आहे. 

आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणतात कि “ तुमच्या पोटातील भूक म्हणजे मी होय आणि तुम्ही जे अन्न खाता तो म्हणजे पण मीच होय.

हे एक चमत्कृतीपूर्ण असे ज्ञान आहे. असे ज्ञान फार दुर्मिळ असते. तुम्ही जरी जगातली सर्व पुस्तके पालथी घातलीत तरी असे ज्ञान मिळणार नाही.

बऱ्याच लोकांना हे लक्षात येत नाही, त्यांना असे वाटते कि ते उगीचच असे म्हणत आहेत. पण जे शहाणे आणि ज्ञानी आहेत त्यांच्या हे लक्षात येते. त्यांना त्यातील सत्य आणि त्याचा गाभा कळतो.

प्रश्न: गुरुजी, येथे ४५१ पदार्थ आहेत पण तुम्ही मिठाई आहात. तुम्ही एक अशी अशी मिठाई आहात कि आम्हाला नेहमीच उपलब्ध असेल. तुम्हाला यावर काय वाटते?

श्री श्री : तुम्ही म्हणता ते खरे आहे. तुम्हाला जर मधुमेह नसेल आणि तुम्ही जर गोडखाऊ असाल तर मी नेहमीच मिठाई आहें.

प्रश्न: गुरुदेव, काल तुम्ही असे म्हणालात कि भगवान श्रीकृष्ण हे देवांमधील कार्तिकेय आहेत. आम्हाला कार्तिकेयबद्धल काही सांगा.

श्री श्री : जेंव्हा भगवान शिव ज्यांच्यावर वर्चस्व गाजवतात ती पंचतत्वे (पंच महाभूते-पृथ्वी, पाणी, आग, हवा, वातावरण) यांचा जेंव्हा शक्तीशी संयोग झाला तेंव्हा भगवान कार्तीकेयांचा जन्म झाला.

भगवान शिव यांचे एक नाव पंचानन म्हणजेच पंच मुखी होय. हि पंच मुखे निसर्गाची पाच स्वरूपांची निर्देशक आहेत. जेंव्हा या पांच तत्वांचा चैतन्य शक्तीशी संयोग झाल्यावर , षडानन म्हणजेच भगवान कार्तिकेय यांचा जन्म झाला.

तुम्ही हे कुंडलिनी शक्तीच्या भाषेत चांगले समजू शकाल. ( कुंडलिनी म्हणजे शरीराच्या मणक्याच्या तळभागात वेटोळे स्थितीतील सुप्त पण अत्यंत प्रभावशाली अशी शक्ती होय)

आपल्या शरीरात सात चक्रे असतात त्यांना उर्जा केंद्र म्हणून पण संबोधतात. जेंव्हा या सहा चक्रातून प्रवास करून जेंव्हा सातव्या चक्रात म्हणजे अज्ञ चक्रात ( जे दोन भुवयांच्या मध्ये असते) स्थिरावते, तेंव्हा ती भगवान कार्तीकेयांचे स्वरुपात ( गुरू तत्वच्या स्वरुपात) उमलते. अज्ञ चक्र हे गुरू तत्वाची जागा आहे. तिथेच ते स्थिरावते आणि प्रकट होते. आणि गुरू तत्व म्हणजेच कार्तिकेय तत्व होय.

भगवान शिव हे अव्यक्त दैवत आहे तर कार्तिकेय हे प्रकट दैवत आहे.

म्हणून तुम्ही भगवान कार्तिकेय हे कुंडलिनी शक्तीचे प्रतिक समजू शकता.

इच्छा शक्ती आणि स्वयं ज्ञान हे कुंडलिनी शक्तीमुळे प्राप्त होते. खरे पाहता, त्यात इच्छाशक्ती आणि कार्यशक्ती हे ज्ञान शक्तीचे भाग म्हणता येतील.

इच्छाशक्ती आणि कार्यशक्ती हे दोन्ही एकाच कुंडलिनी शक्तीचे भाग आहेत (कार्तिकेय) आणि मग ते वल्ली आणि देवयानी म्हणून प्रकट होतात तेच भगवान कार्तीकेयांचे दैवी अंश आहेत. आणि भगवान कार्तिकेय हेच प्रत्यक्ष ज्ञान अवतार होत.

सोप्या भाषेत सांगायचे तर कार्तिकेय म्हणजेच गुरू तत्व होय.

भगवान शंकर हे त्रिमूर्ती पैकी एक होय ( ब्रम्हा, विष्णू आणि महेश) जे ओंकार स्वरुपात ओळखले जातात, जो कि एक मौलिक असा निर्मितीचा आवाज आहे. त्यापैकी म हे भगवान शंकर होत.

भगवान कार्तिकेय यांची पुराणात एक गोष्ट अशी आहे.

भगवान शिव यांनी आपल्या पुत्राला भगवान ब्रह्मदेवाकडे अभ्यास आणि ज्ञानार्जन करिता धाडले.

तर कार्तिकेय भगवान ब्रह्मदेवाकडे गेला आणि त्याने म्हटले,'कृपा करून मला ॐ चा अर्थ सांगा.' भगवान ब्रह्मदेव म्हणाले,'अरे पहिले मुळाक्षरे तर शिक! तू तर थेट ॐ चा अर्थ विचारतो आहेस.' कार्तिकेय म्हणाला,'नाही. मला सर्वोच्च ज्ञान ॐ माहित करून घ्यायचे आहे.'

आता भगवान ब्रह्मदेव यांना सगळी मुळाक्षरे माहिती होती,परंतु त्यांना ॐ(अनादी ध्वनी) चा अर्थ माहित नव्हता.

तर कार्तिकेय भगवान ब्रह्मदेव यांना म्हणाला,'जर तुम्हाला ॐ चा अर्थ माहित नाही तर तुम्ही मला कसे शिकवणार? मी तुमच्याकडे शिकणार नाही.' आणि कार्तिकेय त्याचे पिता भगवान शिव यांच्याकडे परत गेला.

भगवान ब्रह्मदेव भगवान शिव यांना म्हणाले,'तुम्हीच तुमच्या पुत्राला सांभाळा.मी काही सांभाळू शकत नाही. मी जे काही म्हणतो,तो त्याच्या अगदी विरुद्ध म्हणतो. मी काही त्याला शिकवू शकणार नाही. आता उत्तम काय ते तुम्हीच ठरवा आणि त्याला सांभाळा.'

हे ऐकून भगवान शिव यांनी कार्तिकेयाला विचारले,'काय झाले,बेटा? भगवान ब्रह्मदेव हे समस्त सृष्टीचे निर्माता आहेत. तुला त्यांच्याकडून शिकले पाहिजे.'

यावर कार्तिकेय उत्तरला,'मग तुम्ही मला सांगा कि ॐ चा अर्थ काय आहे?'

हे ऐकून भगवान शिव यांनी स्मितहास्य केले आणि म्हणाले, 'मलासुद्धा माहित नाही.' 

कार्तिकेय म्हणाला,'मग मी तुम्हाला सांगेन कारण मला ॐ चा अर्थ माहित आहे.'

'जर तुला अर्थ माहित आहे तर मग तू मला सांग,' भगवान शिव म्हणाले. '

असे मी सांगू शकत नाही. तुम्ही मला गुरुचे स्थान दिले पाहिजे.जर मला तुम्ही गुरूच्या आसनावर बसवले तरच मी तुम्हाला सांगू शकतो', कार्तिकेय म्हणाला.

गुरु म्हणजे तो वरिष्ठ जागी अथवा वरिष्ठ आसनावर असला पाहिजे. शिक्षक नेहमी वर बसतो आणि जो शिष्य आहे तो खाली बसून शिक्षकाचे ऐकतो.

कारण भगवान शिव हे त्यांच्या पेक्षा वरची जागा कशी बरे शोधतील कारण त्यांच्या वरचढ काही नाही! म्हणून मग भगवान शिव यांनी त्याला खांद्यांवर उचलून घेतले आणि अशाप्रकारे त्याला स्वतःपेक्षा उंच आसन दिले. आणि मग भगवान शिव यांच्या कानात कार्तिकेयाने सांगितला परम सत्याचा अर्थ-ॐ काय आहे?!

तर मग भगवान शिव यांचा पुत्र कार्तिकेय याने शिव यांना काय सांगितले?

त्रिमूर्ती ( ब्रम्हा, विष्णू आणि महेश) यांचा मिळून ॐ बनतो. ॐ म्हणजे प्रेम. प्रेमाने सर्व ओतप्रोत आहे. सर्वाचे अमृत सार केवळ प्रेमच असून ते अभंग आणि अविनाशी आहे. '

हा ॐ अर्थ चा कार्तिकेयाने भगवान शंकरांना सांगितला.

हे ऐकून माता पार्वती ( भगवान कार्तिकेय यांचीआई आणि प्रत्यक्ष जगन्मातेचा अवतार) खुपच उल्हासित आणि आनंदी झाली.

 मग ती (कार्तिकेयाला) म्हणाली” तू स्वामी झालास माझ्या नाथांचा.” आणि तेंव्हापासून कार्तीकेयांना स्वामिनाथ असेपण संबोधतात.

अशा तऱ्हेने कार्तीकेयांनी गुरुचे स्थान ग्रहण करून ॐअर्थ कार्तिकेयाने भगवान शंकरांना त्यांच्या खांद्यावर बसून सांगितला.

या कथेचा मतितार्थ असा कि –गुरू तत्वाची जागा हि प्रत्यक्ष भगवान शंकरांपेक्षा उंच आहे हेच समजावून सांगण्यासाठी हो गोष्ट स्कंद पुराणात सांगितली आहे.

भगवान शंकर हे गुरू तत्वाचे शिष्य झाले म्हणूनच गुरू तत्व आणि कार्तिकेय तत्व एकच आहेत. अशी एक म्हण आहे कि:

“गुरू गोविंद दौ खडे, काके लागू पाय? बलिहारी गुरू आपके गोविंद दियो मिलये” 

(जेंव्हा गुरू आणि देव हे माझ्यासमोर उभे आहेत तेंव्हा आधी कोणाला नमन करू? तर प्रतःम मी गुरूला वंदन करीन कारण गुरुशिवाय मला देव ओळखताच आला नसता).

भगवान कार्तीकेयांनादेवांचा सेनापती म्हणतात, देव तत्वाचा पालक आणि त्राता म्हणून.भगवान शंकर हे भक्तांना सहज प्रसन्न होऊन वरदान देत असतात अगदी असुरांना सुद्धा. हे असे आमचे भोळे बाबा आहेत कि जे कोणालाही मागेल तो वर किंवा आशीर्वाद देतात आणि मग ते त्यात अडकून जातात.

त्रिमूर्ती ( ब्रम्हा, विष्णू आणि महेश) हे यासाठी प्रसिद्ध आहेत कि ते कोणालाही चटकन प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि मग त्यात अडकून जातात. असाह वेळी मग भगवान कार्तिकेय ज्याअसुरांनी असा वर मिळवून देवावर कुरघोडी करायचा प्रयत्न करायचे त्यांच्याशी लढून मग देवांचे संरक्षण करायचे. म्हणून त्यांना देवांचे सर्-सेनापती म्हणत. 

कार्तिकेय म्हणजे एक असे तत्व कि जे शांत आणि सक्रीय आहे.

साधारण पणे जे लोक सक्रीय असतात ते फारसे शांत नसतात आणि जे शांत असतात ते फारच मठ्ठ असतात. म्हणून कार्तिकेय म्हणजे एक असे तत्व कि जे सक्रीयपण आहे आणि शांत पण आहे.

आध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण आणि जागतिक पातळीवरचे शहाणपण अशी दोन्ही तत्वे महत्वाची आहेत.गतिशीलता आणि खोलवरची शांतता या दोन्हीपासून कार्तिकेय तत्व बनते.

इच्छाशक्ती आणि कार्यशक्ती, ज्ञान शक्तीचे मिळून कार्तिकेय तत्व होते. म्हणून असे म्हणतात कि या क्रिया शक्ती मुळे भगवान कार्तिकेय देवाचे सेनापती झाले आणि त्यांनी देवांचे असुरांपासून संरक्षण केले. 

भगवान कार्तीकेयांनी तारकासुराचा पराभव केला.

तारकासुर हा अहंकाराचा निर्देशक आहे. जेंव्हा कोणी म्हणतो कि” मी सर्व जग जिंकले आहे, सर्वांवर माझे प्रभुत्व आहे, मला सर्व काही माहित आहे’ अशी मनाची भावना म्हणजे तारकासुर होय.

काही लोक असे असतात कि जे नेहमी म्हणतात कि “मला हे या आधीच माहित आहे, मला सांगण्याची गरज नाही.” ते त्यांचे अज्ञान कधीच उघडपणे सांगणार नाहीत. ते असे वागतात कि त्यांना सर्वकाही माहित आहे.

हा दुराभिमान , असा उर्मटपणा ज्यामध्ये सर्व गोष्टी या उन्मत्तपणे धिक्कारण्याची सवय दिसून येते हा असुरीपणा होय.

विनम्रपणा, साधेपणा, आणि नैसर्गिक पणा या सर्व गुणांना उर्मटपणा झाकोळून टाकतो.म्हणून या दुष्ट शक्तींचा नाश करणे हे कुंडलिनी शक्ती म्हणजे कार्तिकेयाचे काम आहे. म्हणून कार्तिकेय हा अहंकाराचा संहारक आहे.

म्हणून अशी गोष्ट आहे कि जेंव्हा तारकासुर (अहंकार) याचा कार्तिकेयाने पराभव केला तेंव्हा त्याचा कोंबडा झाला. कोंबडा हा अशक्त, स्थिरतेचा आणि धैर्याचा अभाव याचे प्रतिक आहे. म्हणून जर कोणी भित्रा, घाबरट असेल तर त्याला कोंबडा म्हणतात, होय कि नाही?

म्हणून हा अहंकार (तारकासुर) त्याला कार्तिकेयाने पराजित केल्यावर एक कोंबडा झाला. 

त्या युद्धातील पराभवानंतर त्यांनी त्याला माफ केले आणि वर मागायला सांगितला. तेंव्हा तारकाने त्यांच्या पायाशी जागा मिळावी असा वर मागितला आणि कार्तीकेयांनी त्याला त्यांच्या ध्वजावर कायमची जागा दिली. याचा अर्थ असा कि अहंकार पूर्ण काबूत ठेवणे असते. अहंकार हा आयुष्यात महत्वाचा असतो पण तो काबूत ठेवायचा असतो.

तुम्ही जर कार्तीकेयांची मूर्ती पाहिलीत तर असे लक्षात येईल त्यांच्या एका हातात भाला आहे.त्याला वेळ असेही म्हणतात. ते त्रिशूल नव्हे. ते कुंडलिनीचे प्रतिक आहे. त्यांच्या दुसऱ्या हातात एक ध्वज आहे कि ज्यावर एक कोंबडा आहे.हा कोंबडा म्हणजे तारकासुराचे चिन्ह आहे, ज्याने कार्तीकेयांना विंनती करून त्यांच्या ध्वजावर जागा मिळविली होती.खरेतर तामिळनाडू आणि दक्षिणेच्या काही राज्यात कार्तिकेय यांचा उल्लेख “मुरुगन” असाही होतो.

प्रश्न: गुरुदेव, भगवान विष्णू यांच्या परशुराम या अवताराविषयी काही गैरसमज आहेत. प्रभू रामचंद्र हे पण परशुराम यांच्याच काळात जन्मालाआले होते. ते दोघेही जर भगवान विष्णू यांचे अवतार असतील हे कसे शक्य आहे?

श्री श्री : अवतार म्हणजे काय हे आधी समजून घ्यायची गरज आहे.

अवतार हा एका वेळी एकाच ठिकाणी अवतीर्ण होतो आणि त्याच वेळी दुसऱ्या ठिकाणी अवतीर्ण होऊ शकत नाही असे नाहीये.अवतार म्हणजे देवतेचा अंश होय.आणि देव कोठे नाहीये?

देवाचा अंश हा सदासर्वकाळ आणि सर्वत्र अस्तित्वात असतो.जेंव्हा देवाचा एक अंश हा पूर्ण पणे प्रकट होतो, जसे कि एखाद्याच्या समोर संपूर्णपणे अवतीर्ण होतो तेंव्हा त्यास अवतार असे म्हणतात.असे नाही कि तो अचानकपणे अवकाशातून अवतीर्ण होतो.देव हा सर्व जगदीश्वर असून तो प्रत्त्येक गोष्टीत आहे.

असे पहा कि घराला चार खिडक्या असू शकतात होय कि नाही? आणि कोणत्याही खिडकीतून तुम्ही पूर्ण सूर्य पाहू शकता.

पण जर तुम्ही मला जीवात्माविषयी विचारू शकता जसे कि जीवात्मा जर एके ठिकाणी जन्मला तर त्याचवेळी तो दुसऱ्या ठिकाणी कसा जन्माला येऊ शकतो? हा प्रश्न तुम्ही विचारू शकता.पण ते परमात्म्याविषयी मात्र खरे असत नाही. देव हा जगदीश्वर असल्यामुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होऊ शकतो.

भगवान परशुराम या स्वरुपात देव बघणे हे फार आकर्षक आहे.

तुम्ही जर परशुरामांच्या जीवन चरित्राकडेनजर टाकलीत तर असे लक्षात येईल कि त्यांच्या हातून अशी कोणतीच गोष्ट घडली नाही कि तुम्हाला वाटेल कि ते देवाचे अवतार आहेत. पहिल्यांदा त्यांनी आईचे डोके उडवले.

आता एखाद्या मुलाला आपल्या आईचे डोके उडवणे शक्य आहे काय? नाही, ते फारच अवघड आहे. खरे तर अशक्य आहे.आणि मग ते सर्व क्षत्रिय लोकांचा सर्वनाश करायला बाहेर पडले.

माझ्या दृष्टीने असे करणे चुकीचे होते. आपण आजखुपच प्रगती केली आहे.पण मग त्यांच्या या वागण्याचा अर्थ काय? त्याचा खरा अर्थ असा आहे कि आश्चर्यकारकपणे ती सर्वोच्च सत्ता अश्या घृणास्पद गोष्टी करू शकते.

परशुरामांनी केलेल्या गोष्टी अमानवी होत्या आणि सामान्य मनुष्य त्या करूच शकत नाही, फक्त देव माणूसच त्या करू शकतो. म्हणून परशुराम हे दैवी अवतार होते हा त्याचा अर्थ आहे. तर या संदर्भ घेऊन परशुराम यांच्या कडे बघितले तर त्याचा उलगडा होतो. 

परशुरामयांनी केलेल्या गोष्टी सामान्य माणूस करू शकत नाही म्हणून त्यांचा कोणी शिष्य बनून त्या मार्गावर चालायला तयार झाला नाही.

प्रथमतः त्यांनी ज्या कृती केल्या , त्या त्यांनी कर्त्याच्या भावनेतून न करिता, फक्त साक्षीभाव ठेऊन केल्या. कर्त्याच्या भूमिकेतून त्यांनी काहीच केले नाही. दुसरे असे कि जर तुम्ही परशुराम यांच्या मध्ये देव बघू शकत असाल तर तुम्हाला सर्वत्र फक्त देवच दिसेल. प्रत्येक मुलात आणि माणसात तुम्ही देव बघू शकाल.

म्हणून परशुराम यांना अवतार म्हणतात.

तुम्ही जर देवाला माशामध्ये (मत्स्य अवतार), वराह मध्ये (वराह अवतार),कासवामध्ये (कुर्म अवतार), सिंह मध्ये (नरसिंह अवतार), हंस, कावळा वगैरे मध्ये, तुमच्या आजूबाजूच्या सर्व गोष्टींमध्ये बघू शकाल तर, आणि पाषाण हृदयी अशा परशुराम यांच्यात देव बघायला लागलात तर मग कामच झाले! मग तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या सर्व निर्मितीमध्ये देव दिसायला लागेल. त्यानंतर तुम्हाला जगात देवाशिवाय काहीच दिसणार नाही.

हे ज्ञान लक्षात येण्यासाठी परशुराम हे अवतारी पुरुष मानले गेले आहेत, येतेय लक्षात? 

म्हणून असे लक्षात घ्या कि देव काही एका धर्मापुरता, एका देशापुरता किंवा काळापुरता मर्यादित नाहीये.देव हा जगदीश्वर असून तो या निर्मितीच्या प्रत्तेक कणा कणात सामावलेला आहे.

भगवान राम हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखिले जातात, तरीसुद्धा ते अगदी वाकून सर्व ऋषी मुन्नींना वांदान करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे.ते सर्वांचा यथोचित मन ठेवीत असत.ते अगस्ती ऋषींच्या पायाशी बसून ज्ञान मिळवीत असत.

त्यांचा मोठेपणा किती सांगावा, रावण आपल्या मृत्यूशय्येवर असताना त्यांनी लक्ष्मणाला त्यांच्याकडे पाठवून सांगितले कि त्यांच्या मृत्यूला अजून काही काळ आहे , जा शक्य तेवढे ज्ञान त्यांच्याकडून घे.असे त्यांनी त्यांच्या लहान भावाला रावण मृत्युशय्येवर असताना ज्ञान घ्यायला सांगितले.

भगवान राम म्हणाले “ मी त्याच्या कडे गेल्यावर ते शरीर सोडून देतील आणि त्यांचा आत्मा माझ्यात विलीन होईल, ते व्हायच्या आत जा आणि शक्य तेवढे ज्ञान त्यांच्याकडून मिळव.त्या नंतर मी त्यांना दर्शन देईन आणि त्यांचा आत्मा मग माझ्यात विलीन होईल. 

श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही भगवान शिव यांचे उपासक होते. भगवान श्रीकृष्ण हे तर देवीचे फार मोठे उपासक होते. भगवान श्रीकृष्ण नेहमी मां भगवतीची उपासना करीत असत.

येथे देवी म्हणजे एक अशी दैवी शक्ती जी सर्व प्राणीमात्रामध्ये चेतना, जीव, भूक,बुद्धी,शक्ती आणि अनेकविध प्रकारात वास करून असते.

आज हीच देवी आपल्यासमोर अन्नपूर्णेच्या स्वरुपात प्रकट झाली आहे. आपल्यासमोर नानाविध प्रकारचे अन्न पदार्थ आहेत. ( गुरुदेव, हे अन्नकुट साठी गुजरात मधून आलेल्या स्वयंसेवकांनी बनविलेल्या ४५१ पदार्थांविषयी बोलत आहेत).