13
2012
Aug
|
बंगलोर
|
हो! आज तुमचे मौन पूर्ण होत आहे! (गुरुदेव सर्व अडव्हान्स कोर्स सहभागी व्यक्तींना संबोधून बोलतात).
अडव्हान्स कोर्स करणाऱ्या दोन व्यक्तींना तळे काठी बोलताना मी एकले, एक म्हणाला. ‘आपले मौन केव्हा पूर्ण होणार?’ तर दुसरा म्हणाला की, ‘उद्या सकाळी! उद्या सकाळी आपले मौन पूर्ण होणार’. (सर्वजण हसतात) अशा पद्धतीचे पण मौन काहीजणांनी ठेवले होता! आणि काही जणांनी पूर्ण निष्ठेने मौन पाळला होता. मौन मध्ये तुम्ही तुमची उर्जा वाचवत असता. आपण बोलत असताना आपली खूप सारी उर्जा वाया जाते, त्यासाठी काही काळ मौन मध्ये असणे चांगले असते. वर्षाकाठी दोन-तीन वेळा किंवा चार महिन्यातून एकदा हा कोर्स करणेचे गरजेचे आहे. हा कोर्स केल्याने खूप फायदे होतात. या मध्ये मानसिक आणि शारीरिक फायदे आहेत. मज्जा संस्थेतून सर्व मानसिक ताण बाहेर पडतो, तुम्ही परत ताजे तवाने होता, आनंदी होता! मौन केल्याने आपली वाणी शुद्ध होते, आणि मग आपण जे बोलाल ते ते होत जाते. या साठीच तर साधनेचे आपले एक असे महत्व आहे. प्रश्न: विश्वासाचे महत्व काय? श्री श्री: विश्वासाशिवाय तुमचे अस्तित्वच नाही! ऐका, समजा तुम्ही इथे तुमची गाडी घेवून आला आहात, तुम्ही तुमची गाडी पार्किंग आवारात पार्क केली आहे. आता तुम्ही इथे बसला आहात, तुम्हाला माहीत आहे, विश्वास आहे की तुम्ही परत ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुमची गाडी तिथेच असेल! या विश्वासाशिवाय तुमचे अस्तित्व काय? प्रथम तुमचा स्व:तावर विश्वास हवा. तीन प्रकारचे विश्वास आहेत जे महत्वाचे आहेत. १. स्व:तावर विश्वास. तुमचा जर तुमच्यावर विश्वास नसेल तर त्याला प्रणालित विभ्रम विकृति. तो ऐक रोग आहे. २. तुमच्या सभोवताली असणाऱ्या सर्व चांगल्या व्यक्तींवर तुमचा विश्वास हवा. या जगात चांगले व्यक्ती आहेत यावर तुमचा विश्वास असायला हवा, नाहीतर तुम्ही या समाजात राहूच शकत नाही. ३. ज्या अमूर्त शक्तीमुळे हे सर्व विश्व चालले आहे अशा अज्ञात शक्तींवर तुमचा विश्वास असायला हवा. हा तिसऱ्या प्रकारचा विश्वास आहे. या तीन विश्वासापैकी पहिले दोन फार महत्वाचे आहेत. तिसऱ्या मुळे तुमचे आयुष्य चांगले व्यतीत होईल. प्रश्न: मी खूप प्रयत्न केल्यानंतर ही मला यश मिळत नाही? श्री श्री: फक्त प्रयत्नाने यश मिळत नाही. प्रयत्नांबरोबर विश्वास आणि भक्ती असायला हवी. तुमच्या कडे भक्ती आणि विश्वास असेल तर तुम्हाला यश मिळतेच. पण असे ही समजू नका की नुसत्या भक्तीने यश मिळेल, त्या बरोबर प्रयत्न केलेच पाहिजेत; दोन्ही एकत्रित करणे महत्वाचे आहे. प्रश्न: गुरुदेव, अहंम बद्दल बोला. श्री श्री: प्रेमा मध्ये हानी झाली तरी तो विजय असतो, आणि अहंम मध्ये विजय झाला तरी ती हानी होवू शकते! प्रश्न: गुरुदेव, भगवतगीतेत भगवान श्री कृष्ण म्हणतात की तुम्ही तुमच्या स्वभावा प्रमाणे रहा आणि तेच करत रहा, जरी त्यातील एखादी गोष्ट योग्य नसेल तरी. यावर मार्गदर्शन करा. श्री श्री: हो, तुम्ही तुमच्या स्वभावा प्रमाणे रहा. तुम्हाला ज्या गोष्टी पटत नाहीत त्या करण्याचा प्रयत्न करू नका. याचा अर्थ असा नाही की तुम्ही मुर्ख व्हा. ठीक आहे! समजा तुम्ही एका अंत्य यात्रेला गेले आहात आणि तिथे तुम्हाला नाचण्याचा विचार आला. तुम्ही काय विचार करणार की गुरुदेवानी सांगितले आहे की स्वभावा प्रमाणे रहा, आणि तुम्ही तिथे टाळ्या वाजवून नाचू लागलात तर ते चालणार नाही. तुम्हाला शिष्टाचार सांभाळता आला पाहिजे. तुम्ही म्हणताल की गुरुदेवांनी सांगितले आहे की हे विश्व म्हणजे एक कुटुंब आहे, सर्वाना मिठीत घेवून आनंदाने पुढे व्हा. म्हणून काय रस्त्यावरून जाणाऱ्या एका स्त्रीला तुम्ही मिठी मारालं? हे कृत्य जर तुम्ही केले तर तुम्हाला चांगलाच मार बसेल. असे काही करू नका! ब्रम्ह भाव जोपासणे चांगले आहे – हे सर्व एकच आहे;हे सर्व माझ्यातील अंश आहेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुणाच्याही पाकिटातले पैसे काढून घेणार आणि म्हणणार हे सर्व माझेच आहेत. प्रश्न: गुरुदेव, मला वाटते की मी उदास असल्या कारणाने लोक माझा स्वीकार करत नाहीत. मी काय करू? श्री श्री: लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात ह्याची काळजी तुम्ही करू नका. जीवनात एक ध्येय ठेवून पुढे चालत रहा. जीवनात मी एकटाच आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकटेच चालत रहा आणि तुमच्या जीवनाचे ध्येय साध्य करा. आणि मग पहा सर्वजण तुमच्या बरोबर असतील. एकेकाळी मी पण खूप उदास असायचो. मला क्रिकेट बद्दल काही ज्ञान नव्हते आणि त्या काळात सर्वजण क्रिकेट बद्दल बोलायचे आणि मी फक्त पहात असायचो. माझ्या किशोर वयात मला क्रिकेटची आवड नव्हती. बाकी सर्वजण त्या साठी वेडे व्हायचे. पाच-पाच दिवस ते कानाला रेडिओ लावून कॉमेंट्री एकत असत. त्या वेळी मला वाटायचे की मी काय बोलू? सर्वजण क्रिक्रेट बद्दलच बोलायचे दुसरे काही नाही. तुम्ही तुमचा मार्ग निवडा आणि त्या वर पुढे चालत रहा. स्व:ताचे आणि दुसऱ्यांचे परीक्षण करू नका. प्रश्न: गुरुदेव, समोर खूप पर्याय असताना, आपल्या साठी कोणता योग्य आहे हे आपल्याला कसे माहित पडेल? आणि ते सर्व पर्याय चांगले असताना मी योग्य तो पर्यायाची निवड कशी करू? श्री श्री: योग्य तो पर्याय आपोआप समोर येईल. अशा परिस्थिती मध्ये थोडे थांबा, धीर धरा आणि पहा योग्य ते होवून जाईल. प्रश्न: गुरुदेव, मी आणि माझा भाऊ एकत्रित वाढलो आणि सगळे संस्कार सारखे झालेत, तरी आम्ही दोघे खूप वेगळे आहोत हे कसे शक्य आहे? श्री श्री: हे फार सखोल शास्त्र आहे. तुम्ही या विषयी विचार करायला हवा. छोट्या छोट्यातील प्रतिकृती या ब्रम्हांडाशी जोडलेली आहे. तसे पाहिले तर हे सर्व एकच आहे. पण ह्या छोट्या प्रतिकृती आणि ब्रम्हांडा मध्ये काहीतरी दुवा आहे. या पृथ्वी वरील धान्य हे ब्रम्हांडाशी विशेषरित्या निगडीत आहेत. आपल्या पूर्वजांना हे माहीत होते. म्हणून त्यांनी सांगितले आहे की आपल्या सूर्यमालेत नऊ ग्रह आहेत, आणि हे नऊ ग्रह नऊ वेगवेगळ्या धान्य, नऊ वेगवेगळे रंग, नऊ वेगवेगळे प्राणी, नऊ वेगवेगळे आकार, नऊ वेगवेगळे पदार्थ या सर्वाशी निगडीत आहेत. एकमेकांशी असणाऱ्या या नात्यांचा शोध त्यांनी कसा काय केला हे आश्चर्यकारक आहे! आपण शाळेत शिकलो आहोत की पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्या भोवती फिरते हा शोध गेलिलिओने लावला आहे. पाश्चिमात्य देशात असे समजले जाते की सूर्य हा पृथ्वी भोवती फिरतो. पण भारतातील कोणत्याही मंदिरात जावा, त्यांना माहीत आहे की सूर्य हे सूर्यमालेतला केंद्र बिंदू आहे. हजारो वर्षापासून भारतात याचा अभ्यास केला गेला आहे. ते सूर्याला मधे ठेवून सर्व ग्रहांना त्याच्या भोवती ठेवतात. आणि पुढे जावून त्यांनी प्रत्येक ग्रहाला एका मंत्राला आणि यंत्राला जोडलेला आहे. जसे मंगळ ग्रहाला हरभरा याच्याशी जोडलेला आहे, बुध ग्रहाला मुग डाळीशी जोडलेले आहे, शनी ग्रहाला तीळ याच्याशी जोडलेले आहे, सूर्य आणि चंद्राला, तांदूळ आणि गहू याच्याशी जोडलेले आहे. राहू आणि केतू, चंद्राच्या या दोन बिंदुना पण वेगवेगळ्या डाळी शी जोडलेले आहे. प्रत्येक ग्रह हा विशिष्ट धान्य, विशिष्ट आकार आणि रंग, आपल्या शरीरातील विशिष्ट भागांशी जोडलेला आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक भाग हा विशिष्ट ग्रहाशी जोडलेला आहे. तुमच्या शरीरामध्ये संपूर्ण सूर्य माला आहे. हे आश्चर्यजनक शास्त्र आहे. पूर्वी या शास्त्राला समुद्रिका लक्षण असे म्हणायचे. या मध्ये तुमच्या चेहऱ्याकडे पाहून तुमची जन्म कुंडली काढली जायची. ते तुमच्या दाता कडे पाहून तुमचा कोणत्या साली जन्म झाला ते सांगायचे. पण आता हे शास्त्र हरवून गेले आहे. खूप सारे ज्ञानाचा गैरवापर करून ते हरवून गेले आहे. या जगातील लोकांचे कल्याण करण्यासाठी विविध मंदिरातील पंडित एकत्र येवून नव ग्रहासाठी यज्ञ करीत आहेत. येणारे काही दिवस हे फार कठीण आहेत, जगातील सकारात्मक प्रभाव वाढविण्यासाठी आणि नकारात्मक कंपन कमी करण्यासाठी हे यज्ञ आज आणि उद्या करीत आहेत. या अशा सर्व पुरातन गोष्टी आहेत. कोणी योग्य प्रकारे समजून घेतले नाही आणि योग्य प्रकारे करणारी लोक नाहीत. अशा विषयामध्ये आपण युवकांना प्रेरित केले पाहिजे. म्हणून मी विचार केला की सर्व पंडितांना एकत्र आणून आपण युवकांना मार्गदर्शन केले पाहिजे. प्रश्न: व्यसनापासून मुक्ती कशी मिळेल? श्री श्री: साधना केल्याने. कोणत्याही व्यसनापासून मुक्ती हवी असेल तर तुम्हाला साधना केली पाहिजे. इथे या, शांत बसा आणि साधना करा. अडव्हान्स कोर्स करत रहा. एक नाही, दोन नाही, पण वारंवार करत रहा आणि पहा तुमची व्यसनापासून कशी मुक्ती होते. ‘मी कोण आहे? मी कोण आहे?’ हे स्व:तशी विचारत रहा. हे सर्वात उत्तम. याच्यातून तुम्हाला उत्तर मिळेल. प्रश्न: गुरुदेव, मला एकच मुलगी आहे. तिच्या लग्नानंतर ती कॅनडाला स्थलांतरित झाली. आणि मला भेटून एक दीड वर्ष झाले आहे. मी तिला भेटू शकेन का? श्री श्री: हो, तिला जावून भेटा! ‘मला आईला भेटायचे आहे’ असे तुमच्या मुलीला पण वाटले पाहिजे. काय झाले आहे की आपण मुलांना वाढविताना अशा पद्धतीने वाढवितो की त्यांच्या मध्ये करुणा ही भावना राहिलेली नाही. आपण त्यांना चांगले संस्कार देवू शकलो नाही म्हणून ते विदेशी जाताच सर्व विसरून जातात आणि स्वार्थी होतात. तुम्ही तिला माफ करा, शांत रहा! सर्व काही व्यवस्थित होईल. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'