30
2012
Aug
|
ब्राझील, दक्षिण अमेरिका
|
आता मी तुम्हाला अतिशय गंभीर प्रश्न विचारणार आहे:
तुम्ही समोरच्या व्यक्तीला मनापासून वंदन करता किंवा ती केवळ एक औपचारिकता समजता? बघा, आपण दररोज लोकांना भेटतो, त्यांना नमस्कार करतो, काही विनोद करतो. परंतु हे एका औपचारिकतेच्या पातळीवर असते. हो ना? कोणी जर प्यायला पाणी आणून दिले तर आपण,"अनेक धन्यवाद" म्हणतो. त्या "अनेक"ला काही अर्थ नाही. जर तुम्ही सहारा वाळवंटात आहात आणि तुम्ही खरोखर एकदम तहानलेले असाल आणि तुम्हाला कोणी प्यायला पाणी दिले आणि तुम्ही त्याला "अनेक धन्यवाद" म्हणालात तर ते मनःपूर्वक असेल. तर जीवनात आपण सदैव वरवरच्या पातळीवर काम करीत असतो आणि जेव्हा आपल्यामध्ये गहनतेची कमतरता होते तेव्हा आयुष्य हे शुष्क आणि निरर्थक वाटू लागते. आपल्याला एका वेगळ्या पातळीवर विस्थापित होण्याची गरज आहे....अस्सलपणाची, खरेपणाची आणि निर्व्याजपणाची पातळी जिथे हृदयाचे तार हृदयाशी जुळतील. यालाच मी अध्यात्म म्हणतो. जेव्हा तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या खरेपणाबरोबर नाते जोडता तेव्हा तेच असते अध्यात्म. बालक असताना आपण सगळे तेच तर करीत होतो. तुम्हाला आठवते आहे का तुम्ही तान्हे बाळ होतात तेव्हा संपूर्ण ग्रह,संपूर्ण विश्व किती जागृत होते. चांदोबा बोलायचा,तरु वेली लता बोलायच्या आणि पशु पक्षी बोलायचे. तुमचे संपूर्ण विश्वासोबत एक नैसर्गिक संभाषण होते. तुम्हाला ते आठवते आहे का? तुम्ही कार्टूनमधली मुले बघितली आहेत का? त्यातील झाडेदेखील त्यांच्याबरोबर बोलतात. ते एक निराळेच जग आहे. आता हा प्रश्न आहे, आपण ती निरागसता अजूनदेखील टिकवून ठेवून त्याचवेळेस बुद्धिमानतेचे शिखर गाठू शकतो का? मी म्हणतो,"होय,आपल्याला हे शक्य आहे." बुद्धीमानता आणि निरागसता हे दोन्ही एकत्र ही जगातील सर्वात मौल्यवान वस्तू आहे. जगात असे लोक आहेत जे हुशार आणि लबाड आहेत ,आणि निरागस व अडाणी असणे फार सोपे आहे. परंतु हुशारी जोपासणारे तरीसुद्धा निरागसता टिकवणाऱ्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे. तर आता आपण आरामशीर आहोत आणि अनौपचारिक आहोत तर आज रात्री कोणत्या विषयावर तुम्हाला मी बोलून पाहिजे? (
(श्रोते : प्रेम,जन्म,क्षमा,नातेसंबंध,निर्णय,देव,भ्रष्टाचार आणि शांती,अनुकंपा,राग,भीती,भांडवलशाही,आशा,सहनशीलता)
तुम्हाला मी सहनशीलतेवर बोलून पाहिजे? ते मी पुढच्या वर्षी करेन. आणि पुढे....
मला सांगा आपण आज रात्री कोणत्या विषयावर बोलतो याने खरोखर काही फरक पडतो का?
सकल जग हे केवळ कंपायमान आहे.
जर तुम्ही भौतिकशास्त्रज्ञाला विचारलं तर तो सांगेल की संपूर्ण विश्व हे दुसरे तिसरे काही नसून ते एक तरंग कार्य आहे. आपण प्रत्येक जण हे एका तरंगेशिवाय काही नाही.
जर तुम्ही तुमच्या केंद्राच्या संपर्कात आहात तर तरंग हे सकारात्मक असतील. जर तुम्ही तुमच्या केंद्राच्या संपर्कात नाही आणि जर तुम्ही गुंतून पडलेले आहात तर तुमचे तरंग नकारात्मक असतील.
शांती,प्रेम,अनुकंपा,हे सर्व आपले खरे तरंग आहेत; आपल्या विकृत न झालेल्या वास्तविक लहरी आहेत. हे सर्व आपल्यातून येणारी सकारात्मक कंपने आहेत. जेव्हा तुम्ही संतप्त होता,अस्वस्थ होता,नकारात्मक होता, तेव्हा तुम्ही काय करता? तुम्हाला ते सकारत्मकतेमध्ये बदलणे जरुरी आहे. परंतु हे कसे करावे हे आपल्याला कोणीसुद्धा शिकवले नाही; ना घरी ना शाळेत. हो ना?
आजी आपल्याला सांगितले असेल,'जा,जाऊन कोपऱ्यात उभा राहा आणि दहापर्यंत अंक मोज',बस्स इतकेच. या दिवसांमध्ये दहापर्यंत आणि शंभरपर्यंत मोजण्याने काहीही होत नाही.
जर तुम्ही तुमच्या मनाचे निरीक्षण कराल तर तुमचे मन हे भूतकाळाच्या घटनावर संतापलेले असते किंवा भविष्याची चिंता सतावत असते. दोन्हीचा काहीच उपयोग नाही. हो ना? भूतकाळातील घटनांवर रागावून काय मिळणार,भूतकाळ तर कधीचा संपलेला आहे. आणि भविष्याची चिंता करून काय उपयोग? हे तर अर्थहीन आहे. आता तुम्हाला वर्तमानाच्या या क्षणात येण्यास कशाची मदत होईल तर ध्यानाची.
हे पहा,जर लोकांना थोडा काळ,दररोज दहा मिनिटे ध्यान करणे माहित असेल तर त्यांच्यामधील तणाव निघून जाईल आणि ते आनंदी होतील.
हिंसा-रहित समाज, निरोगी शरीर, द्विधा-रहित मन, अटकाव-रहित बुद्धी, आघात-रहित स्मृती आणि दुःख-रहित आत्मा हे पाहण्याचे माझे स्वप्न आहे. हे माझे स्वप्न आहे. तुमच्यापैकी कितीजणांना हे स्वप्न सत्यात आणायचे आहे?(सगळे श्रोते त्यांचा हात वर करतात)
आपल्या मुलांना आणि भावी पिढीला आपण अधिक चांगले जग दिले पाहिजे. अधिक प्रेम असलेले,अधिक अनुकंपायुक्त जग आपण त्यांना दिले पाहिजे आणि असे जग नाही जिथे बंदूक संस्कृती असेल. नशेच्या किंवा हिंसेच्या संस्कृती आपल्या मुलांना गरज नाही. ते अधिक प्रेमळ, अधिक माणुसकी आणि अनुकंपा यांनी युक्त समाजाचे अधिकारी आहेत. अधिक निरोगी समाज. तुम्हाला नाही का असे वाटत? मग आपल्याला याच दिशेने काम केले पाहिजे.
प्रश्न : पृथ्वीवरचे आमचे विशेष कार्य काय?
श्री श्री : पृथ्वीवरचे कोणते काम तुमचे नाही याची सर्वप्रथम आपण यादी तयार करू या. तुमचे विशेष कार्य आहे की कधीही दुःखी न होणे आणि इतरांना दुःखी होऊ न देणे.,बरोबर?
आता जर तुम्ही कोणते कार्य तुमचे नाही ते हटवत गेला तर सर्वात शेवटी तुमचे विशेष कार्य काय आहे इथे तुम्ही येऊन पोहोचाल.
प्रश्न : जर इतरांना नकारात्मक वाटत असेल तर त्याचा प्रभाव आपल्यावर कसा पडू नाही द्यायचा?
श्री श्री : तुम्ही जास्तीत जास्त केंद्रित राहा आणि अपूर्णतेकरिता थोडी जागा सोडून द्या. कित्येक वेळेस आपण अपूर्णतेकरिता थोडी जागा सोडत नाही आणि मग आपल्याला त्रास होतो.
जर कोणी नकारात्मक असेल तर त्यांना थोड्या अवधीसाठी नकारात्मक राहण्याचा हक्क आहे. त्यांना तसे असू द्या. त्यांना थोडी जागा द्या. आणि मी तुम्हाला सांगतो की तुमच्या सगळ्या काळज्या गोळा करायला मी इथे आहे. तर मग तुमचे सगळे त्रास,कटकटी,अडचणी आणि काळज्या मला देऊन टाका.
मला तुमच्या चेहऱ्यावर कधीही न मावळणारे हास्य फुललेले पाहिजे आहे.
प्रश्न : आम्ही आमच्या भावनांना कश्या प्रकारे आवर घालू शकतो?
श्री श्री : आपण भावनांच्या पलीकडे सहजपणे जाऊ शकतो जेव्हा आपल्याला हे कळते की भावनांपेक्षा सर्वसामान्य जीवनात काहीतरी आहे जे भावनांपेक्षा मोठे आहे आणि ते आहे स्वयं; कधीही न बदलणारी आपल्या आत असणारी जीवन शक्ती.
प्रश्न : प्रेम आणि वासना यातील फरक कसा ओळखावा?
श्री श्री : प्रेमामध्ये समोरची व्यक्ति महत्वाची असते तर वासानेमध्ये तुम्ही महत्वाचे असता.
प्रश्न : प्रिय गुरुजी, मनातून तीव्र प्रतिरोध करणाऱ्या लोकांची मी कशी काय मदत करू शकतो?
श्री श्री : या जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. ते जसे आहेत तसाच आपण त्यांचा स्वीकार करायला पाहिजे. प्रतिरोध करणारे लोक आहेत. ठीक आहे. त्यांना त्यांच्या स्वतःच्या गतीने चालू द्या.
या ग्रहावर ससे आहेत, हरीण आहे आणि गोगलगाय आहे. मग तुम्ही एका गोगलगायीला सश्याच्या वेगाने धावण्याची अपेक्षा करू शकता; नाही ना?
तर मग बाकीचे जरी हरिणीच्या वेगाने धावत असतील तरी तुम्ही कोणाला गोगलगायीच्या गतीने चालू द्या. हे जग असेच आहे. सुहास्य वदनाने पुढे जात राहा.
प्रश्न : मला लोकांना क्षमा करणे कठीण जाते.
श्री श्री : त्यांना विसरू नका आणि मग बघा ते सोपे आहे का?
जर तुम्ही कोणाला क्षमा करू शकला नाहीत तर तुम्ही सतत त्यांच्याबद्दलच विचार करीत राहाल.
कोणाबद्दल मनात राग धरून ठेवणे खरोखर सोपे आहे का? अरे देवा,आपली किती तरी उर्जा यामध्ये व्यर्थ जाते. तुम्ही दुसऱ्यांना क्षमा कशी करू शकता हे माहिती आहे? तुमच्या स्वतःच्या भल्याकरिता.
तुम्ही एखाद्या गुन्हेगाराला जेव्हा पिडीत म्हणून बघता तेव्हा तुम्ही त्याला माफ करू शकता. प्रत्येक गुन्हेगार हा अज्ञानाने; संकुचित मनाने ग्रासलेला असतो. त्यांना जीवनाची महानता आणि सुंदरता माहिती नसते आणि म्हणून ते अशा आत्मकेंद्रित शुद्र चुका करतात आणि दुसऱ्यांची पर्वा ते करीत नाहीत. याचे कारण म्हणजे की त्यांचे मन हे संकुचित असते. म्हणून त्यांना आपण क्षमा केली पाहिजे. नंतर तुमच्या लक्षात येईल की त्यांना तुमच्याप्रमाणे महान विचार करण्याची किंवा महानता अनुभवण्याची संधी मिळाली नाही. मग तुम्हाला त्यांच्या प्रति अनुकंपा वाटेल आणि मग तुम्ही त्यांना माफ करू शकाल.
|
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'