संध्याकाळचा सत्संग

31
2012
Aug
ब्राझील, दक्षिण अमेरिका
तुमच्यापैकी किती जणांना असे वाटते कि तुम्ही कुणाचेही काहीही वाईट न करता तुमचे शत्रू खूप आहेत?

लोक तुमचे शत्रू बनतात. तुम्ही कुणाला दुखापत केली नाही किंवा कुणाचे वाईट केले नाही तरी पण लोक तुमचे शत्रू बनतात.

त्याच प्रमाणे तुम्ही कुणाची मदत केली नाही वा कुणावर उपकार केले नाहीत तरी पण बरेचजण तुमचे चांगले मित्र बनतात. हो कि नाही?

कितीजणांना हा अनुभव आला आहे?

हे पहा, हे असेच आहे, काही विचित्र कर्मामुळे किंवा कायद्यामुळे लोकं आपले शत्रू अथवा मित्र बनतात. काही विचित्र कर्मामुळेच एकाएकी आपले खास मित्र हे आपले शत्रू बनतात आणि आपले चांगले मित्र आपले शत्रू बनतात.

म्हणून आपल्या सर्व मित्रांना आणि शत्रूंना एका टोपलीत ठेवा आणि तुम्ही निश्चिंत रहा.

तुमच्या मनाला एक तर मित्रांपासून किंवा शत्रूंपासून त्रास होतो, हो कि नाही?

तुम्ही ज्या वेळेस ध्यान करायला बसता त्यावेळेस तुमचे सर्व मित्र, शत्रू यांना बाजूला ठेवून तुम्ही शांत, आराम करा आणि मन मोकळे करा.

काय म्हणताय तुम्ही? बरोबर आहे कि नाही?

जेव्हा तुमचे मन तृप्त असेल, शांत असेल, आनंदी असेल तेव्हा त्याच्याकडे एक विलक्षण शक्ती येते ती म्हणजे आशिर्वाद देण्याची.

जेव्हा तुम्ही आनंदी आणि तृप्त असता त्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांना आशीर्वाद देऊ शकता. जेव्हा तुमचे मन व्याकुळ असेल आणि तुमच्या मनात खूप इच्छा असतात त्यावेळेस तुम्ही आशीर्वाद देऊ शकत नाही. जरी तुम्ही आशीर्वाद दिला तरी त्याचा जास्त प्रभाव पडत नाही. या साठी आपण नेहमी तृप्त असले पाहिजे.

ज्यावेळेस तुमचे मन तृप्त असेल त्यावेळेस तुम्ही तुमच्याच नाही तर दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करू शकता.

प्रश्न: गुरुदेव, कारुण्य बद्दल काही बोला.

श्री श्री: जीवनात तीन महत्वाच्या गोष्टी आहेत:

१. उत्कटता
२. नि:पक्षपाती
३. कारुण्य

श्वास घेणे म्हणजे उत्कटता आहे, आणि श्वास बाहेर सोडणे म्हणजे नि:पक्षपातीपणा होय.

असे कोणीहि म्हणू शकत नाही कि, ‘मला फक्त श्वास आत घ्यावयाचा आहे, बाहेर सोडायचा नाही’. ते अशक्य आहे!

जसे श्वासोच्छवास महत्वाचा आहे त्याचप्रमाणे उत्कटता महत्वाची आहे.

त्यानंतर आहे नि:पक्षपातीपणा. नि:पक्षपाती पणा म्हणजे सर्वाना क्षमा करण्याची क्षमता. नि:पक्षपातीपणा मुळे तुम्हाला मुक्तता मिळते. आणि तिसरे म्हणजे कारुण्य, जो तुमचा स्वभाव बनतो.

म्हणून काम करताना उत्कटता हवी, आराम करताना नि:पक्षपातीपणा हवा आणि कारुण्य हा स्वभाव हवा. कळले !

प्रवर्ग: उत्कटता, नि:पक्षपातीपणा

प्रश्न: ध्यान आणि आराम ची काय गरज आहे?

श्री श्री: आराम केल्याने मनाचा विस्तार होतो.

तुम्ही परीक्षण केले आहे का, तुम्ही आनंदी असताना काय होते? तुमच्या मध्ये अशा कुठल्यातरी गोष्टीचा विस्तार होतो. आणि तुम्ही दु:खी असताना काय होते? तुमच्या मध्ये कुठलीतरी गोष्ट आकुंचित पावते.

म्हणून शरीराला आराम मिळताच मनाला प्रसन्नता मिळते.

प्रवर्ग: ध्यान

प्रश्न: गुरुदेव,परस्परता बद्दल काहीबोला.

श्री श्री: परस्परता हे नैसर्गिक आहे.

उच्च मन:स्थितीत परस्परता ही तत्क्षणीक होते. जर कोणी संवेदनशील नसेल तर तिथे परस्परता नसते.

अनेकदा लोक वाईट गोष्टीची देवाणघेवाण करतात. जर तुम्ही कोणाला दोष दिला तर लगेच तो तुम्हाला दोषी ठरवतात. तुम्ही कोणाचा अपमान केला असेल तर ते लगेच तुमचा अपमान करतात. पण हे चांगल्या गोष्टींच्या बाबतीत होत नाही.

तुम्ही जर काही चांगले केले तर सगळेच तुमच्या बाबतीत चांगले करतील असे नाही. हे फक्त उच्च मन:स्थितीतच होवू शकते.

प्रवर्ग:मानवी मूल्ये, दोष

प्रश्न: मी माझ्या बायको पासून विभक्त झालो आहे. मी आणि माझ्या बायकोने वेगळे मार्ग पत्करले आहेत आणि आम्ही विभक्त जीवन जगत आहोत. आम्हाला दोघांना मुले हवी आहेत. अशा परिस्थिती मध्ये सर्वात शहाणपणाचा मार्ग कोणता?

श्री श्री: मुला समोर दोन्ही मार्ग उघड केले पाहिजेत आणि त्याला निवडण्याची संधी दिली पाहिजे. जर नवरा बायको मध्ये सामंजस्य नसेल तर नक्कीच मुलांच्या मनावर ताण येतो.

मुलांसमोर एकमेकांना दोष देवू नये हे आई वडिलांनी लक्षात ठेवले पाहिजे. मुलांना कुणा एका विरुद्ध ठेवणे चांगले नाही. हे संकुचित मनाचा दृष्टीकोन आहे.

प्रवर्ग: नातेसंबंध, मुले

प्रश्न: गुरुदेव, मृत्यू काय आहे?

श्री श्री: मृत्यू ची व्याख्या करायची गरज नाही. ती एक स्पष्ट घटना आहे.

आपला जन्म झाला आहे आणि एकेदिवशी आपला मृत्यू होणार आहे.

आपण या जगात आल्यावर सर्वात पहिली कोणती गोष्ट केली आहे तर ती म्हणजे श्वास घेवून आपण रडायला सुरुवात केली आहे. आणि सर्वात शेवटची गोष्ट कोणती करतो तर ती म्हणजे श्वास सोडतो आणि बाकीचे रडतात.

आपण जर (मृत्युनंतर) दुसऱ्यांना रडविले नाही तर आपण चांगले जीवन जगलो नाही, हे नक्की.

जेव्हा आत्मा सर्व तृप्तीने, प्रसन्न पणे आनंदी होवून हे शरीर सोडतो तेव्हा तो परत येत नाही. तो परत येतो तो स्व: इच्छेने येतो.

प्रवर्ग: मृत्यू

प्रश्न: गुरुदेव, माझे निर्णय बरोबर आहेत हे मी कसे समजू शकतो?

श्री श्री: तुम्ही ज्या वेळेस निर्णय घेता त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी वाटत असते कि, ‘हो, हे बरोबर आहे.’

एक गोष्ट लक्षात घ्या कि जरी तुमचा निर्णय चुकीचा असला, तरी त्यामुळे तुमचा विकासच होईल. तुम्ही आणखी मजबूत होता आणि त्यामधून तुम्हाला एक धडा शिकायला मिळतो. त्यासाठी काळजी करू नका.

प्रवर्ग: अस्पष्टता

प्रश्न: गुरुदेव, माझ्या मित्रांच्या आणि परिवारांच्या अपेक्षेला विरोध केल्याने मला आनंद मिळतो. अशा परिस्थितीमध्ये मी काय करू?

श्री श्री: हो, तुम्हाला समतोल राखता आला पाहिजे.

तुम्हाला तुमच्या सुखाच्या शोधात आणि लोकांच्या अपेक्षा मध्ये तुम्हाला समतोल राखता आला पाहिजे. हे खूप नाजूक आहे, पण हे करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केले पाहिजेत.

प्रवर्ग: विरोध, परिवार

प्रश्न: गुरुदेव, मानवाची सर्वात मोठी परिसीमा काय आहे?

श्री श्री: शरीराला परिसीमा आहे, मनाला परिसीमा आहे, पण चेतनेला परिसीमा नाही.

जर तुम्ही स्व:ताला शरीर समजले तर तुम्हाला परिसीमा आहे. मग तुम्ही तेवढेच करू शकाल जेवढे तुमचे शरीर सोसेल.

जर तुम्ही स्व:ताला मन समजलात तर मनाला पण परिसीमा आहे. पण तुमच्या प्रेमाला परिसीमा नाही. तुमच्या चेतनेला परिसीमा नाही.

पहा, एका छोट्या फोनच्या माध्यमातून तुम्ही सर्व जगात संपर्क साधू शकता. तुमच्या एका फोन नंबर ने तुम्ही जगात कोणत्याही फोन नंबरशी संपर्क साधू शकता. हो कि नाही?

त्याचप्रमाणे विचार करा ज्या मानवी मनाने फोनचा शोध लावला तो किती सामर्थ्यवान असेल. तुम्ही ते फक्त उपलब्ध करा.

प्रवर्ग: आव्हान

प्रश्न: गुरुदेव, कधी कधी मला वाटते कि मी खूप घमेंडी आहे. मी ह्या घमेंडी पणाचा कसा त्याग करू? मी आर्ट ऑफ लिव्हिंग चा कोर्स केला आहे आणि मी रोज साधना करतो.

श्री श्री: तुम्ही एक परीक्षण केले का, तुम्ही आधीपण घमेंडी होता, पण त्याची तुम्हाला जाणीव नव्हती. पण आता निदान तुम्हाला त्याची जाणीव तरी झाली. ‘हे घडत आहे’ ही जाणीव होणे महत्वाची आहे.

ही जाणीव होणे फार चांगले आहे. ही त्याच्या मधून बाहेर पडण्याची पहिली पायरी आहे.

दुसरी पायरी म्हणजे तुम्ही जीवनाकडे बघण्याचा मोठा दृष्टीकोन ठेवा.

तुम्ही जसे जास्तीत जास्त ज्ञानात सखोल जाताल तसे तुम्हाला सर्व मनाचे खेळ, छोट्या मुलांचे खेळ वाटतील. एकदा जर का तुम्ही हे जाणले मग तुम्हाला तुमच्या घमेंडी पणाचे काही वाटणार नाही, तुम्ही त्याचा स्वीकार करून पुढे चालत रहा.

जेव्हा तुम्ही तुमच्या मनाकडे छोट्या मुलाच्या खेळण्या प्रमाणे बघता म्हणजे तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.

प्रवर्ग: अहंकार, सजकता