तरंग लहरी बदलणे

11
2013
Apr
माँन्ट रियल, कँनडा
प्रश्न : गुरुदेव, अध्यात्मिक बैठक असलेला वैज्ञानिक अहंभावाने ओतप्रोत असलेल्या शिस्तीमध्ये कसा टिकाव धरू शकेल?

श्री श्री : आनंदाने! जर तुम्ही वैज्ञानिक आहात तर आनंदी रहा. ‘अरे, हे काय धरून बसलात! हे तर लहरींचे काम आहे.’

जर कोणी वैतागले,तर केवळ असे म्हणा,’अरे! लहरींचे काम! तरंग लहरी बदलल्या आहेत.’ इतकेच. कोणी आनंदी असेल तर वेगळे तरंग. जर कोणाला मत्सर वाटत असेल,’अरे, ते तर बदलून तिसऱ्या तरंग लहरींवर गेले आहेत.’ जर कोणी दुःखी असेल, किंवा उदास असेल ,’तरंग लहरी पुन्हा बदलल्या आहेत.’ हे सर्व तरंग लहरी आहेत,येवढेच.

तरंग लहरी बदलण्याबद्दल कोणी रागावू शकते का? नाही. म्हणून सगळ्यांकडे केवळ तरंग लहरी म्हणून पहा. मग तुम्हाला कशाचाही त्रास होणार नाही,ठीक!

विविधतेची मजा लुटा, विभिन्नातेची मजा लुटा. याच्याकरिता तुमचे हास्य गमवायची जरुरत नाही.

जर कोणाला अहंकार आहे तर काय झाले? त्यांना अनुकंपेची आवश्यकता आहे. ते अज्ञानी आहेत. अज्ञानी माणसांकरिता तुमच्याकडे काय आहे? अनुकंपा,हो ना? जर कोणी अहंभावात आहे तर तुम्ही असा विचार करायला पाहिजे,’ बिचारा,त्याला वाटते की तो कोणीतरी आहे. लवकरच तो भूमिगत होणार आहे. त्याला हे माहिती नाही. तो भरपूर उर्जा असलेली केवळ चिंधीची बाहुली आहे हे त्याला माहिती नाही.’

म्हणून अहंकारी माणसांकरिता अनुकंपा ठेवा.

पहा,जेव्हा तुम्हाला इतरांकडून मान्यता हवी असते तेव्हा हा अहंकार आहे आणि तो एक समस्या आहे हे लक्षात घ्या.

जर कोणाला अहंकार असेल तर तुम्हाला त्याचा कसा त्रास होतो? तुम्ही आनंदाने चलू लागा. त्यांना तुमच्याकडे पाहून शरम वाटली पाहिजे. या माणसाकडे पहा,तो किती आनंदात आहे! अहंकारी माणसांना तुम्हाला आनंदी पाहून मत्सर वाटला पाहिजे. हे तुमच्यावर अवलंबून आहे.

जर तुम्ही इतरांच्या अहंकाराला ओळख दिली तर तो तुमच्यात घुसेल आणि तुम्ही एका उंदराप्रमाणे चालू लागाल.एका सिंहाप्रमाणे चला आणि आनंदी राहा. चिडू नका, किंवा सिंहाप्रमाणे डरकाळी फोडू नका, केवळ हसा आणि अंतून सिंहाप्रमाणे असल्याची भावना ठेवा.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, हे जग इतके स्वार्थी आहे. लोकांना फक्त पैशाची किंमत आहे. खरे प्रेम कसे शोधायचे?

श्री श्री : अरेच्या, असे बोलू नका ह. या जगात सर्व प्रकारचे लोक आहेत. त्यांना दोष देऊ नका किंवा सर्व जग स्वार्थी आहे असे लेबल लावू नका. हे बरोबर नाही.

तुम्हाला माहिती आहे, या ग्रहावर चांगले लोक आहेत. खरे तर ते जास्त संख्येने आहेत. भामटे लोकांची संख्या फार छोटी आहे.

समजा तुम्ही निष्ठुर,निर्दयी आणि स्वार्थी आहात असा तुम्हालापण दूषण दिले तर तुम्ही ते लेबल स्वीकाराल का?

स्वतःला विचारा,स्वतःच्या हृदयाला,मनाला विचारा. नाही! तुम्हाला वाटते की तुम्ही फार चांगले आहात,दयाळू आहात परंतु बाकीचे सगळे वाईट आहेत, हो ना? हे बरोबर नाही. समजले?

या जगात, चांगले लोक आहेत आणि असे लोक आहेत जे त्यांचा चांगुलपणा व्यक्त करीत नाहीत. इतकेच. पण तेसुद्धा चांगले आहेत. या पृथ्वीतलावर वाईट प्राणी एकसुद्धा नाहीये.सगळे स्वभावतः चांगले आहेत.

जर तुम्ही तुरुंगातील सर्वात भयंकर कैद्यांबरोबर बोलाल तर तुम्हाला त्यांच्या डोळ्यात दिसेल की तेसुद्धा चांगले माणसे आहेत. कुठेतरी त्यांच्या हातून चूक घडली,कधीतरी त्यांच्या हातून गुन्हा घडला. सर्वात भयंकर अतिरेकीसुद्धा, जर तुम्ही त्यांना जाऊन भेटलं तर तुम्ही आतून बघाल की त्यांच्यात एक चांगला माणूस लपून आहे.

जर तुम्ही माझ्या नजरेने बघाल तर या ग्रहावर वाईट लोक नाहीच आहेत. चांगुलपणा व्यक्त करणारे लोक आहेत आणि असे लोक आहे ज्यांचा चांगुलपणा झाकलेला आहे आणि तो व्यक्त होत नाहीये. इतकेच. तुम्ही तो चांगुलपणा बाहेर येण्याकरिता त्यांची मदत करू शकता. तुम्ही त्यांना त्यांचा चांगुलपणा व्यक्त करण्याकरिता मदत करू शकता. अशाच प्रकारे तुम्ही जगाला पाहिले पाहिजे. जगाला वाईट लोक असे लेबल लावू नका. तसे केले तर तुमचा जगाकडचा दृष्टीकोनसुद्धा वाईट राहील.

प्रश्न : मी आर्ट ऑफ लिविंगमध्ये आल्यापासून तुम्ही माझ्या सर्व समस्यांची काळजी घेतली आहे. माझा एवढाच प्रश्न आहे की असे का की मी तुम्हाला कधीही पहिले तरी माझे डोळे भरून येतात?

श्री श्री : ते बरोबर आहे आणि हे असेच असले पाहिजे.

एका उपनिषदामध्ये त्यांनी आपल्या प्राणप्रियला बघितले की काय होते याचे वर्णन केले आहे. जेव्हा तुम्ही ज्ञानाच्या संपर्कात येता तेव्हा तुमचे हृद्याचे द्वार उघडते, आणि जेव्हा हृदय उघडते तेव्हा मनातील सर्व शंका नाहीशा होतात, अश्रू ओघळू लागतात आणि सर्व कर्म नाहीसे होते.

‘बिध्यन्ति हृदया ग्रंथी’, हृदयातील गाठी मोकळ्या होतात.
‘चीद्यांती सर्वा संशयः’, मनातील सर्व संशय दूर होतात.
‘क्षीणतेचास्य कर्मणी’, सर्व कर्मे आक्रसून जातात आणि ती नाहीशी होतात. ही ज्ञान, प्रज्ञा आणि साक्षात्काराची खूणआहे. जेव्हा तुम्हाला साक्षात्काराची एक झलक मिळेल तेव्हा हे सगळे होईल. मला आठवते, एकदा जेव्हा मी इथे माँन्ट रियल आश्रमात ( तो तेव्हा बांधून झाला नव्हता. आम्ही केवळ जमीन विकत घेतली होती आणि मी फ्लोराबेल इथे राहत होतो) आलो तेव्हा एक पत्रकार महिला आली आणि तिला माझी मुलाकात हवी होती. जेव्हा ती माझ्याबरोबर येऊन बसली, ती म्हणाली,’अरे देवा! मला काय होते आहे? मी सगळेकाही विसरले आहे! मला माफ करा. मला माफ करा.’

तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि ती म्हणाली,’ मला असे आधी कधीही झाले नाही. मला माफ करा.’ तिला फारच दिलगिरी वाटत होते. ती रडत राहिली.

मी म्हणालो,’हरकत नाही. काळजी करू नको. हे असे होते.’ मला विचारायचे सगळे प्रश्न ती विसरली, आणि हे असे बरेच वेळा होते.

प्रश्न : प्रिय गुरुदेव,मी माझ्या चांगला पगार देणाऱ्या नोकरीत समाधानी आहे. परंतु आजकाल मला मनात प्रबळ विचार येतात जसे काही,’मी इथे काय करतो आहे? मी जास्त उपयुक्त काही करणे जरुरी आहे का?’ मी काय करू?

श्री श्री : होय, तुम्ही तुमचा मोकळा वेळ चांगली सेवा, साधना (अध्यात्मिक सराव) आणि सतसंग याला द्या. जीवनात हे सर्व फार मौल्यवान आहे. नुसते बसून राहू नका आणि रोजचा दिवस सिनेमा बघण्यात किंवा टीव्हीवर मालिका बघण्यात घालवू नका.

आपण हेच तर करतो. घरी येतो, टीव्ही चालू करतो आणि दिवसामागून दिवस बघत बसतो. हेच तर आपण करतो आणि हे अतिशय व्यर्थ आहे!

मी तुम्ही टीव्ही बघण्याच्या विरुद्ध नाहीये,बघा परंतु कधी कधी’आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बघणे ठीक आहे,परंतु रोजच्या रोज नाही. हे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे.किंवा दिवसाचे एक किंवा दोन तास समाजाच्या सेवेकरिता ठेवा. जर हे नाही तर मग एक तास बाजूला काढून ठेवा आणि काही ज्ञान लिहून काढा; किंवा facebook किंवा तत्सम सोशल प्रसार माध्यमातून सेवा करा; ज्ञानाचा प्रसार करा. काय म्हणता? चांगली कल्पना आहे? ही सृजनशील कल्पना आहे आणि तसे करताना तुम्हाला समाधान वाटेल.

नुसती बघ्याची भूमिका स्वीकारण्यापेक्षा, विश्वाच्या घडामोडीमध्ये सहभागी व्हा. रोज नुसते टीव्ही बघत आणि कुठे काय चालले आहे ते टीव्हीवर बघत बसण्यापेक्षा समाजच्या बदलाचे तुम्ही प्रतिनिधी अथवा समजाच्या बदलामध्ये तुमचा सहभाग असला पाहिजे.समजले?

तुम्ही टीव्ही पाहू शकता परंतु २-३ तास नाही. त्यापेक्षा एक तास काही तरी सृजनशील करण्यात घालावा.

प्रश्न : जेव्हा कधी कोणी अध्यात्मिक गुरूंच्यासोबत जवळीक निर्माण करतो तेव्हा त्याला जीवनात जास्त समस्यांना तोंड द्यावे लागते, आणि तरी तो हार मानत नाही,हे असे का?

श्री श्री : होय, असे लोक आहेत ज्यांना आव्हाने आवडतात,ज्यांचे आव्हानांवर प्रेम असते. नाहीतर मग शिडाच्या होडीतून लोक जगाच्या सफारीला का बरे जातात? असे का की ते जाऊन एव्हरेस्ट पर्वत चढू लागतात? कारण लोकांना आव्हाने आवडतात.

हा अहंकार आहे ज्याला मोठाली आव्हाने हवी असतात. म्हणून काही माणसांना ते पाहिजे असते आणि ते कठीण मार्ग स्वीकारतात.

हरकात नाही,जेव्हा तुम्ही या मार्गावर येता तेव्हा तुम्ही सर्व काही सुहास्यवदनाने करता. या मार्गाची हीच तर खासियत आहे.

प्रश्न : असे नाहामी भासत आणि दिसून येते की योग आणि हिंदुत्व हे महिलांना वर्जित करते, आणि यामुळे मला असे वाटते की आपण अजूनपर्यंत अध्यात्मिक क्रांतीकारिता तयार नाही. याविषयी आणि महिलांच्या भूमिकेविषयी तुम्ही काय सांगू शकाल? तुमच्या अवतीभवती जास्ती करून पुरुष का असतात जेव्हा की महिला या स्वयंपाक आणि साफ सफाई करतात?

श्री श्री : हे बघा, असे काहीही नाहीये.योग,हिंदुत्व आणि वैदिक ज्ञान या’सर्वांमध्ये महिलांना अजिबात वर्जित केलेले नाही.

पुरुष आणि स्त्री यांना एकाच दर्जा दिलेला आहे. भारतामध्ये परंपरेनुसार आईचा मान पहिला आणि वडिलांचा नंतर. ते म्हणतात,’ मातृ देवो भव’ ( माता ही देव आहे).

तसेच तुम्हाला लिखाणामध्येसुद्धा पाहाल तर दिसेल की आम्ही भारतामध्ये मिस्टर आणि मिसेस असे लिहित नाही तर श्रीमती आणि नंतर श्री असे नेहमी असते.

हिंदू धर्मामध्ये राधे श्याम  असे म्हणतात. पहिले श्याम  आणि नंतर राधे  असे म्हणत नाही. सीता राम  असे नाव आहे, यात पहिले सीता  आणि नंतर राम आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मी आणि नंतर नारायण  आहे. तर स्त्रिया या नेहमी पहिले येतात.

तुम्ही अर्धनारीश्वर बघितला आहे? तुम्हाला त्याची गोष्ट माहिती आहे?

एकदा एक साधू होता त्याला स्त्रियांविषयी घृणा होती. बहुतेकदा लोक जेव्हा संन्यासी होतात तेव्हा ते स्त्रियांपासून लांब पळतात. कोण्या बाईने त्याला फसवले असेल, किंवा काहीतरी झाले असेल.मला माहित नाही. पण त्याला स्त्रियांविषयी घृणा होती. तो स्त्रियांकडे पाहायचासुद्धा नाही. देवतांकडेसुद्धा. तो केवळ ,’शिव, शिव, शिव’ चा जप करायचा आणि शक्तीची पूजासुद्धा करायचा नाही. म्हणून मग त्याच्यासमोर शिवाने अर्धी स्त्री आणि अर्धा पुरुष असा अवतार घेतला. आणि त्याला अर्धनारीश्वर  म्हणतात.

याने सगळ्यांच्या आत तुम्ही अर्धे पुरुष आहात आणि अर्धे स्त्री हे दर्शवते.भौतिकदृष्ट्या तुम्ही स्त्री अथवा पुरुष जे काही असाल परंतु आतून तुम्ही दोन्ही आहात कारण तुम्ही वीर्य आणि अंड या दोन्हीने बनलेले आहात. तुम्ही,आईवडील या दोघांच्याही गुणसूत्राने बनलेले आहात. दोन्ही तुमच्या आत आहेत आणि दोन्ही समान आहेत.

म्हणून,जेव्हा भगवान शिव हे अर्धे पुरुष आणि अर्धी स्त्री म्हणून अवतीर्ण झाले तेव्हा त्याचे स्त्रियांच्या विरुद्ध असलेले पूर्वग्रहदोष नष्ट झाले आणि त्याला मुक्ती प्राप्त झाली. अशी ती कथा आहे. ती खरे तर फार मोठी कथा आहे पण ती थोडक्यात सांगायचे झाले तर त्याला मुक्ती प्राप्त झाली जेव्हा त्याने त्याचे स्त्रियांच्या विरुद्ध असलेले त्याचे मत सोडून दिले. तर असे हे उदाहरण आहे.

कधीतरी मध्ययुगामध्ये जेव्हा भारत हा इस्लामच्या प्रभावाखाली आला तेव्हा हे बदलले. स्त्री पुरोहित रद्दबातल केल्या गेल्या.

जर तुम्ही इंडोनेशियातील,बाली या जागी गेलात तर आजसुद्धा तिथे महिला पुजारी आहेत. तो वास्तविक हिंदू धर्म आहे. परंतु भारतमध्ये काही काळानंतर मध्ययुगामध्ये इस्लामने महिलांना बुरख्याआड घातले आणि हा प्रभाव भारतावर आला आहे. त्याकाळी महिलांना घरातच राहण्यास सांगितले गेले.

वैदिक काळामध्ये महिलांना सर्व अधिकार होते. तुम्ही त्यांना पौरोहित्य आणि ते सगळे करताना पाहू शकत होते. तर हे सगळे बदल घडून आलेले आहेत, आणि जेव्हा बदल घडून येतो तेव्हा तो बराच काळ टिकतो. परंतु असे समजू नका की महिलांना दुय्यम दर्जा आहे. 

पहा, हे नऊ दिवस आहेत केवळ देवी आईच्या आराधनेचे. आणि माझ्याकरिता अनेक महिला इथे काम करतात. आपल्या अनेक महिला शिक्षिका आणि पुरुष शिक्षक आहेत. ते सर्व आपल्या विश्वासाचे आहेत. तर तसे काहीही नाहीये.

खरे पाहता कँनडा आश्रमची अध्यक्ष ही एक महिला (डेब्रा) आहे. कँनडाच्या आश्रमात दीर्घ काळ महिलांचे राज्य आहे. हा राणीचा प्रदेश आहे, कदाचित.

प्रश्न : जय गुरुदेव, आपण चैत्र नवरात्री आणि त्याच्या महत्वाविषयी काही बोलू शकाल काय?

श्री श्री : नवरात्रीचा अर्थ आहे नऊ रात्री. या नऊ रात्रींमध्ये तुम्ही अंतर्मुख होता. अंतर्मुख होण्याकरिता हा काळ असतो ध्यान धारणेचा आणि मग तुमच्यातील सृजनशीलता अभिव्यक्त होते. हे याचे महत्व आहे.

चैत्र म्हणजे नववर्षाची सुरुवात. तर नवीन वर्ष हे अशा प्रकारे अंतर्मुख होण्याने, प्रार्थनेने,ध्यान आणि जप याने सुरु होते. संपूर्ण विश्वातील दिव्यतेला ओळखा आणि त्याला चैतन्यमय करा.

प्रश्न : जातिव्यवस्थेपासून आपण सुटकारा कसा काय मिळवू शकतो? माझे लग्न होऊ शकत नाहीये कारण माझ्या पालकांना आणि त्याच्या पालकांना वाटते की समाज त्यांना वळीत टाकेल. आमच्या दोघांची जात वेगळी आहे. गुरुदेव,काय बरे करावे?

श्री श्री : धीर धरल्याने आणि शिक्षणाने.

मला वाटते की आता याचे प्रमाण फार फार म्हणजे फारच कमी झालेले आहे. लोक आता बरेच मोकळे झालेले आहेत. आता कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तो म्हणजे जेवण्याच्या पद्धतीचा; शाकाहारी आणि मांसाहारी. हा तर फार मोठा धोंडा बनतो. परंतु काळजी करू नका.

तुमच्याकडे मन वळवण्याची क्षमता असली पाहिजे,त्यांना समजावा, तुमच्या पालकांना सहमत करा. सर्वप्रथम त्यांना आर्ट ऑफ लिविंग करायला लावा. हे आधी करणे फारच चांगले होईल.