30
2012
Dec
|
बॅड अॅनटोगस्ट, जर्मनी
|
प्रश्न : प्रिय गुरुदेव, भारतातील बलात्कार पिडीतेच्या मृत्यूमुळे मी तुटून गेलो आहे. भारतात येवढा हिंसात्मक बलात्कारचा गुन्हा का घडतो?
श्री श्री : हे बघा,हे काही केवळ एकाच ठिकाणी आणि केवळ भारतातच होते असे नाही. या घटनेला अतिशय प्रसिद्धी मिळाली. संपूर्ण जगभरात कितीतरी गुन्हे घडत आहेत. यात केवळ महिला नाही तर बालके आणि म्हातारे हे सुद्धा बळी पडत आहेत. आत्ताच कार्यकर्त्यांपैकी एकीने मला केनियाची राजधानी नैरोबी इथे काय घडत आहे ते सांगितले. ते फारच भयंकर आहे; तिथे लोक सुरक्षित नाही. तिचे बोलणे ऐकून मी म्हणालो की लोकांनी त्यांच्या घराबाहेर पडायला पाहिजे. यावर ती म्हणाली,’लोकांना घराच्या आत जास्त भीती वाटते कारण इतके दरोडे पडताहेत. त्यांना बाहेर, त्यांच्या गाडीमध्ये सुरक्षित वाटते.’ तुम्ही स्वतःच्या घरात सुरक्षित नाही! अशा घटनांमध्ये वाढ होत आहे; मुंबईतसुद्धा. लोक एकट्या राहणाऱ्या वयस्क लोकांवर लक्ष ठेवतात, आणि त्यांच्यावर निशाणा साधतात. असे गुन्हे जवळजवळ सगळीकडे होत आहेत. इटली,स्पेन,तुर्कस्तान; आणि इथे जर्मनीमध्येसुद्धा असे गुन्हे नोंदविले जात आहेत,हो ना? मी तर ऐकले आहे की रशियामध्ये इतक्या जास्त प्रमाणात आहे की तिथे रस्त्यावर चालणेदेखील सुरक्षित नाही. जेव्हा मी अश्या गोष्टी ऐकतो, तर आपण कोणत्या दिशेने जात आहोत याचे मला नवल वाटते. या एका घटनेने इतकी प्रचंड खळबळ उडवली. तुम्हाला माहिती आहे का की या घटनेबाबत जागरूकता निर्माण करण्यात आर्ट ऑफ लिविंग अग्रेसर होता? सर्वात पहिल्या दिवशी, YES+ च्या विद्यार्थ्यांनी इंडिया गेटवर मेणबत्ती मोर्चा नेला. बघा, जे काही आपण सुरु केले त्याने केवढा मोठा परिणाम केला,त्याने केवढे मोठे रूप धारण केले;आता सगळीकडील लोक जागरूक झाले आहेत. मला खात्री आहे आणि मी आशा करतो की यामुळे सगळीकडे अशा प्रकारचे गुन्हे कमी होत जातील. याकरिता म्हणून आपण हिंसामुक्त आणि तणाव रहित समाज निर्माण करण्याचे कार्य केले पाहिजे. मला माहिती आहे की गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी अशी लोकांची मागणी आहे. परंतु स्वतःच्या तीव्र वासना आणि भावनांवर नियंत्रण नसणारे अजून दहा माणसे उभी ठाकतील. त्यांची विकृती हिंसात्मक रूप धारण करेल. तुम्ही काय कराल? किती लोकांना तुम्ही फासावर लटकवत जाणार, शिक्षा करीत जाणार? आपण सुधारणा घडवण्याची गरज आहे. हजारो तरुण आहेत जे हिंसात्मक सिनेमे बघतात, आणि हिंसात्मक व्हिडिओ गेम खेळतात. जगात हिंसाचार वाढण्याला तेसुद्धा जबाबदार आहेत. जेव्हा व्हिडिओ गेममध्ये मुले गोळ्या झाडू लागतात तेव्हा त्यांना खरे जग आणि खेळ जगत यातील फरक कळत नाही. या दोन विश्वांमध्ये त्यांच्या मनात एक अतिशय तरल रेषा असते. जर ते खेळ जगतात लोकांना गोळ्या झाडू शकतात तर खऱ्या जगात लोकांना गोळ्या मारण्यात त्यांना काहीही मोठे वाटत नाही. अमेरिकेत काँनेक्टीकट इथे हेच तर घडले. एका अतिशय श्रद्धाळू मुलाने आपल्या आईवर, अनेक मुलांवर आणि शेवटी स्वतःवर गोळ्या झाडल्या. गेल्या वर्षी नॉर्वे इथे काय झाले ते पहा. किती भयंकर आहे! असे गुन्हे सर्व जगभरात घडत आहेत. मेक्सिको इथे रस्त्याच्या सिग्नलवर दोन टँक्सी चालकांचे वाजले. ते त्यांच्या गाड्यांमधून उतरले आणि गाडीमध्ये प्रवासी बसलेले असताना त्यांनी एकमेकांना गोळी मारली. त्यांचे केवळ मतभेद झाले होते! आपली सहनशक्ती इतकी खालच्या थरावर गेली आहे. पाकिस्तानमध्ये आज पुन्हा एकदा कार बॉम्बमुळे अनेक लोक मृत्यू पावले आणि अनेक लोक जखमी झाले. पाकिस्तानमध्ये किती लोक मृत्युमुखी पडत आहेत. अशा आकड्यांबद्दल इराकमधील लोक आता बधीर झाले आहेत. इराकमध्ये चाळीस लोक मृत्यू पावले. रोज रोज लोक मृत्युमुखी पडत असले तरी कोणालाही काहीही फरक पडत नाही! सिरीयामध्ये काय होत आहे ते पहा? इजिप्तमध्ये? जवळजवळ निम्मी लोकसंख्या नामशेष केल्या गेली. अशा वेळेस आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपण जे करतो आहे ते किती महत्वाचे आहे! हिंसामुक्त आणि तणाव रहित समाज निर्माण करणे फार महत्वाचे आहे. जास्तीत जास्त मोहोल्ल्यातून जास्तीत जास्त शिक्षक असायला पाहिजे. आपण पसरले पाहिजे आणि लोकांचे मन परिवर्तन केले पाहिजे. आपले शिक्षक तुरुंगामध्ये काम करीत आहेत याचे मला फार समाधान वाटते. इतक्यातच मी अर्जेन्टिनाच्या तुरुंगात गेलो होतो. तिथे फारच हिंसाचार आणि गुन्हेगारी होती, तुरुंगाच्या कोठडीतसुद्धा. आर्ट ऑफ लिविंगचे शिबीर घेतल्यानंतर, ‘आम्ही कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराची कृती करणार नाही’, अशी फीत तिथले कैदी लावू लागले आहेत. अर्जेन्टिनाच्या तुरुंगातील ५२०० दबंग पुरुषांच्या डोळ्यात अश्रू होते! ‘आमचे जीवन बदलले आहे!हे ज्ञान आम्हाला आधी का मिळाले नाही?’ ते म्हणाले. त्याचप्रमाणे जेव्हा मी ब्राझिलच्या रिओ शहरात होतो तेव्हा मी एका तुरुंगाला भेट दिली. त्या तुरुंगात आर्ट ऑफ लिविंगचे सेंटर होते. एका खोलीमध्ये त्यांनी माझा फोटो आणि बरेच आर्ट ऑफ लिविंगचे साहित्य ठेवले आहे. तिथे चप्पल घालून प्रवेश करण्यास मनाई आहे. त्यांनी योगाच्या सतरंज्या घातल्या आहेत. लोक बसतात, योग करतात,ध्यान करता आणि त्यांचे जीवन बदलून गेले आहे! आपल्याला या जगात केवढे काही करायचे आहे, येणाऱ्या पिढीकरिता या जगाला एक चांगली जागा बनवायची आहे. नाहीतर तुमची मुले,नातवंडे तुम्हाला माफ करणार नाही. ते म्हणतील,’हे कोणत्या प्रकारचे जग तुम्ही आम्हाला दिले आहे?’ त्यांना तुम्ही एक चांगले जग देऊ करून पाहिजे- असे जग जिथे जास्त प्रेम आहे आणि जे हिंसा मुक्त आहे. तुमच्या छोट्या छोट्या गरजांमध्ये आणि मित्र आणि इतरांबरोबर झालेल्या लहानसहान बाचाबाचीमध्ये अडकून पडू नका. मोठा विचार करा आणि हिंसाचार,तणाव आणि मानसिक दबाव कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते पहा. आपण हे करणे जरुरी आहे! अति काम वासना असलेले आणि इतरांच्या भल्याच्या बाबतीत अंध असलेल्या लोकांना धडा शिकवणे जरुरी आहे. हार्मोन्सचे असंतुलन आणि तणाव यामुळे माणसे असे घृणास्पद गुन्हे करण्यास प्रवृत्त होतात. यामुळे त्यांचे मन, डोळे आणि त्यांची बुद्धी अंध होतात. बसमध्ये बलात्कार, इतक्या लोकांनी मिळून! मला वाटते की या सगळ्याकडे अधिक माणुसकीच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. आपल्याला समाजात मानवतावादी मुल्ये पुन्हा आणणे जरुरी आहे. लोकांना अध्यात्म शिकवा. मग त्यांचा दृष्टीकोन बदलेल. जे अध्यात्मिक लोक आहेत ते कधीही अशा हिंसात्मक कृतीमध्ये सहभागी होणार नाहीत. या पिढीमध्ये आपण एखाद वेळेस संपूर्ण हिंसाचार मुक्त समाज करू शकणार नाही परंतु आपण त्या दिशेने निदान कार्य तरी सुरु करू या. मला खात्री आहे की आपण जगातील हिंसाचार निश्चितच कमी करू शकू. इतक्यातच,दिल्लीतील एका भागामध्ये, पोलिसांनी ७५६ गुन्हेगारांना एकत्र आणले आणि त्यांना आर्ट ऑफ लिविंगचे पाच दिवसाचे शिबीर करण्यास भाग पडले. त्यांनी प्राणायाम केले, आणि सुदर्शन क्रिया केली. त्या लोकांनी नंतर वाटून घेतलेले अनुभव तुम्ही ऐकायला पाहिजे होते, ते अगदी हेलावून टाकणारे होते. तिथे अमलीपदार्थ वापरणारे लोक होते, आणि पाच दिवसात त्यांना अमलीपदार्थाबद्दल घृणा निर्माण झाली. साखळी चोरी करणारे आणि तशी कामे करणारे, यांच्यात अमुलाग्र बदल झाला, आणि ते झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन सामाजिक कार्य करू लागले. आपले शिक्षक यांना प्रशिक्षण देऊ शकतात. मी त्यांना शिबिराच्या शेवटच्या दिवशी भेट दिली. त्यांच्या अनुभवावरून हेच दिसून येते की या जगाला एक चांगली जागा बनवण्याकरिता अजून आपल्याला आशा आहे. आपण एक बेहतर समाज निर्माण करू शकतो. प्रश्न : गुरुदेव,शिबिरादरम्यान आणि नंतर अद्भुत उर्जा असते. अशी उर्जा जणू काही स्फोटच झाला आहे. परंतु नंतर माझ्याकडून काही गोष्टी घडतात ज्याने २-३ दिवसात माझी उर्जेची पातळी खालावते. यावेळेस असे घडू नये यासाठी मी काय करू? श्री श्री : उर्जा कमीजास्त होते, पण याने जास्त विचलित होऊ नका. असे दिसते आहे की तुमच्याकडे बराच मोकळा वेळ आहे स्वतःच्या उर्जेवर,तिची पातळी खाली आहे का वर असे लक्ष ठेवायला. स्वतःला व्यग्र ठेवा. जेव्हा तुम्ही कामात मग्न असता, तेव्हा सगळे जागच्या जागी बरोबर असते. जेव्हा तुम्ही कामात व्यस्त असता तेव्हा दुःखी व्हायला कोणाकडे वेळ आहे?जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्हाला काही ना काही काम असते. जेव्हा तुम्ही परत येता तेव्हा तुम्ही इतके थकलेले असता की पडल्या पडल्या तुम्हाला लगेच झोप लागते.जर तुम्ही स्वतःला व्यग्र ठेवले तर तुम्हाला तक्रार करायाल किंवा दुःखी व्हायला वेळच नसेल. सक्रीय व्यक्तींना उदास व्हायला वेळ नसतो. ज्यांना बराच मोकळा वेळ मिळतो केवळ असेच लोक खिन्न असतात. बसा आणि ज्ञानाबरोबर काही वेळ व्यतीत करा. योग वसिष्ठ वाचा, त्यामध्ये महान ज्ञान आहे. नारद भक्ती सूत्राच्या किंवा अष्टावक्र गीतेच्या टेप ऐका, या सगळ्या ज्ञानामुळे तुमची उर्जेची पातळी कायम एकदम वर राहील आणि गायन करा! तुम्ही एकटे गाऊ शकता किंवा अंघोळ करताना अजून जास्त पाच मिनिटे घ्या आणि गा. स्नान करताना तुम्हाला गाणे गाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही! आता, तुम्हाला आनंदित होण्याकरिता मी कितीतरी पर्याय दिले आहेत. आणि येवढे करून जर तुम्ही दुःखी व्हायचे ठरवले असेल तर मग मी आता काय म्हणू? तुम्ही विश्वामध्ये रंग भारता; परस्पर विरोधी मुल्ये ही पूरक असतात. हे चालू राहू द्या. तुम्ही जसे आहात तसेच राहा,मी तुमचा स्वीकार केला आहे! जर तुम्ही ज्ञान आत्मसात केले आहे तर तुम्ही दुःखीकष्टी होणे शक्यच नाही. ज्ञान असे आहे की तुम्हाला माहिती आहे की चांगले दिवस असणारेत आणि वाईट दिवस असणार आहेत. चांगले लोक असतील आणि वाईट लोक असतील. कित्येक वेळा तुमचे मित्र तुमच्या शत्रूप्रमाणे वागतील, आणि काहीवेळा तुमचे शत्रू तुमचे मित्र बनतील. हे सगळे जीवनाचा भाग आहे, या गोष्टी होतात. यामुळे तुम्ही केंद्रित आणि मजबूत बनता. मग कोणतेही वादळ तुम्हाला हलवू शकत नाही. जरी तुम्ही माझी सगळी भाषणे विसरलात तरी मी सांगितलेली ही पाच वाक्ये जर तुम्ही लक्षात ठेवली मी म्हणेन की तुम्ही करून दाखवले! तुम्ही जिंकलात! म्हणूनच तर याला माया म्हणतात. हे सगळे विचार आणि भावना ज्या आपल्याला खऱ्या वाटत असतात, त्या मिथ्य असतात,इंद्रजाल असतात. इतरांबद्दल, स्वतःबद्दल असलेल्या आपल्या संकल्पना या आभासमय असतात. त्या झटकून टाका आणि जागे व्हा! तुम्हाला दिसेल की तुम्ही केवळ सळसळती उर्जा, सळसळता उत्साह आहात! तुम्ही प्रेमाचे कारंजे आहात! प्रश्न : प्रिय गुरुदेव, शाश्वतता प्रक्रियेबाबत आणि त्याचे आम्हाला होणारे फायदे याबद्दल कृपा करून समजावा. श्री श्री : शाश्वतता प्रक्रिया म्हणजे केवळ तुमच्या स्मृतीला मागे घेऊन जाणे, जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देणे आणि त्या पुन्हा जगणे, आणि त्यातून सुटका घेणे. प्रश्न : प्रिय गुरुदेव, प्रतिरोपणाची आवश्यकता असलेल्या गरजवंतांकरिता लोकांनी देहदान करावे असे तुम्ही सुचवाल का? श्री श्री : नक्कीच, तुम्ही तुमच्या शरीराचे अवयव दान करू शकता. त्यात काहीच चुकीचे नाही. प्रश्न : गुरुदेव, संपूर्ण वेळ आर्ट ऑफ लिविंगचे शिक्षक असणे याचा काय अर्थ आहे? आणि कोणत्या प्रकारची व्यक्ती ते करू शकते? श्री श्री : तुम्हाला संपूर्ण वेळ शिक्षक होण्याची गरज नाही. तुम्ही अर्धवेळ शिक्षक होऊ शकता. तुमच्या वेळेतील केवळ दोन तास शिकवण्यासाठी पुरेसे आहेत. शिबीर हे बहुतेकदा संध्याकाळी जेव्हा लोक त्यांच्या कामातून मोकळे होतात तेव्हा ठेवले जाते. कार्यक्रमानुसार तुम्ही तीन दिवस,चार दिवस अथवा पाच दिवसानाचे शिबीर घेऊ शकता. तुम्ही महिन्यातून एक किंवा दोन शिबिरांमध्ये शिकवू शकता. शिवाय तुम्ही दोन किंवा तीन शिक्षक जमून एकत्रित शिबीर घेऊ शकता,यामुळे तुम्हा एकट्यावर भार पडणार नाही. यामुळे तुमच्यावरील दबाव नाहीसा होण्यास मदत होते. समजा, तुम्हाला तुमच्या मुलाला काही खरेदी करून देण्याकरिता जायचे आहे,तर ‘अरे! मला तर शिबीर घ्यायचे आहे,मी कसे काय जाऊ.’ असे विचार करण्याची गरज नाही. कारण, दुसरे शिक्षक शिबीर सांभाळून घ्यायला आहेत. म्हणून मी असे सुचवतो की दोन शिक्षकांनी एकत्रित शिबीर घ्यावे. म्हणजे मग तुम्ही तुमची नोकरी,तुमचा जो काही व्यवसाय आहे तो चालू ठेवून,दुसरीकडे लोकांना शिकवण्याचे आणि मदत करण्याचे चालू ठेवू शकता. जर तुम्हाला काही ( वैयक्तिक ) गरजा नाहीत, कोणताही तणाव नाही, तर मग तुम्ही तुमचे जीवन समर्पित करू शकता. ‘मला माझ्याकरिता अतिशय थोड्याची गरज आहे आणि मला संपूर्ण वेळ शिकवायचे आहे’, असे जर तुम्ही म्हणू शकत असाल तर तुम्हीसुद्धा असे करू शकता. परंतु माझे तर हेच म्हणणे असेल की सर्वप्रथम अर्ध वेळ शिक्षक व्हा,काही कार्य करा. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'