30
2014
Aug
|
दिल्ली, भारत
|
(तुम्ही ज्याचा उपदेश करता तेच आचरणात आणा, या प्रवचनाचा हा पुढील भाग आहे) साधारणपणे शंकांचे तीन प्रकार असतात. १. जेंव्हा आपल्याला आपल्याविषयी शंका असते. २. जेंव्हा आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांविषयी शंका असते. ३. जेंव्हा आपल्याला देवाविषयी शंका असते. आपण देवाला केंव्हाही पाहिलेले नसते, म्हणून आपल्या मनात नेहमी त्याच्या अस्तित्वाविषयी शंका असते. समाजातील प्रत्येक व्यक्तीकडे आपण संशयाच्यानजरेने बघत असतो. जेंव्हा लोकांनी आपल्याकडे संशयाने बघू नये असे वाटत असते तेंव्हा आपण पण त्यांच्याकडे संशयाने बघू नये. आता मी जेंव्हा असे सांगतो , तेंव्हा तुम्ही आजूबाजूच्या सर्व लोकांवर पूर्णपणे विश्वास ठेवायला पाहिजे असे नाही. तुमचे पैशाचे पाकीट कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीकडे देऊ नका किंवा त्याला ते घेऊन पळून जाऊ देत असे मला म्हणायचे नाही. पण आपल्या मनात काय चालले आहे याकडे आपण बारकाईने लक्ष दिले पाहिजे. जोपर्यंत आपण स्वतःमध्ये सुधारणा करीत नाही, जोपर्यंत आपण आपले आंतरिक आनंद आणि प्रेम जागृत केले नाही तर समाजात आणि जगात शांती आणि आनंद कसा निर्माण होणार? सर्व प्रथम आपण काही केले पाहिजे तर ते म्हणजे लोक जसे आहेत तसा त्यांचा स्वीकार करणे. तुम्ही तुमच्या आयुष्यात अगदी तुमच्यासारखे असणाऱ्या किती लोकांना भेटला आहात? तुम्हाला तसा एकजण तरी भेटला आहे काय? नाही, तुम्हाला तसे कोणीच भेटले नाही. तरीसुद्धा तुम्हाला सर्वांनी तुमच्यासारखा विचार आणि वागणूक ठेवावी असे वाटते. तुम्हाला हे पण माहित आहे कि तुम्हाला तुमच्यासारखे जर कोणी भेटले तर तुम्ही त्याच्याबरोबर पांच मिनिटे पण राहू शकणार नाही. हे सत्य आहे कि तुमच्यासारखा विचार आणि वागणूक जर तुम्हाला भेटला तर तुम्ही त्याच्या बरोबर राहणे सहन करू शकणार नाही. आर्ट ऑफ लिविंगच्या स्थापनेचे हे एक तत्व आहे. जगात येशू जरी एक होता तरी आज जगात त्यांचे किती संप्रदाय आहेत हे तुम्हाला माहित आहे काय? आज जगात येशूच्या अनुयायांचे ७२ संप्रदाय आहेत. आज इस्लामचे किती संप्रदाय आहेत ? त्यातील पांच प्रमुख संप्रदायात शिया, सुन्नी, अह्मेदिया, सुफी, इत्यादी. गौतम बुद्ध हे एकच होते तरी आज जगात त्यांचे ३२ संप्रदाय आहेत. आणि हिदुत्वाच्या बाबतीत तर किती संप्रदाय आणि परंपरा आहेत त्यांची तर गणतीच नाही. (हशा). प्रत्येक थोर संतांचा एक संप्रदाय आणि त्यांच्या शिकवणीची एक परंपरा असते. शीख समाजातसुद्धा अनेक विचार धारणा आहेत. जसा काळ पुढे जातो तसा विविध संत, विविध धार्मिक तत्वज्ञान आणि विविध विचारधारा निर्माण होत असतात. आपण या नानाविध परंपरा आणि संप्रदाय यांची वाढ आणि विकास होऊ देणे गरजेचे आहे. जेंव्हा कोणी एक व्यक्ती बाकी सर्वांना आपल्या विचारसरणीप्रमाणे विचार करायला आणि वागायला लावतो तेंव्हा मग आपण आज जसे सिरीया, इजिप्त या देशात जे पाहत आहोत ते घडते. तेथील अवस्था फार दुर्दैवी आहे. इराकमध्ये युद्ध सुरु व्हायच्या अगोदर मला तेथे काही विपत्ती येणार असे वाटत होते. आमच्या येथे एक शीख गृहस्थ असून त्यांचा तेथे व्यापार आहे. मी आमच्यातील दोन डॉक्टर त्यांच्याबरोबर तेथे पाठविले आणि त्यांना त्या लोकांबरोबर बोलायला सांगितले. मी त्यांना सद्दाम हुसेन यांच्या एक मंत्र्याबरोबर पण बोलायला सांगितले. ते तेथे जाऊन त्या मंत्र्यांना भेटले, जे कि वित्तमंत्री होते. त्यांच्यातर्फे आम्ही सद्दामकडे असा निरोप पाठविला कि त्यांनी युद्ध करू नये कारण त्याने सामान्य लोकांना फार कष्ट होतात, रक्तपात पण होतो. आता, त्यानंतर जे घडले ती एक फार मोठी कहाणी आहे. दुर्दैवाने युद्ध सुरु झाले. मग आम्ही रेड क्रॉस सोसायटीच्या शेजारी एक पुनर्वसन केंद्र सुरु केले. आता युद्धात या रेड क्रॉसच्या इमारतीवरपण बॉम्ब टाकण्यात आले आणि मग ते लोक तेथून पळायला लागले. मी त्या आपल्या केंद्रातील लोकांना बोलावून सुरक्षित आसरा घेऊन तेथून निघून जायला सांगितले. ते मला काय म्हणाले माहित आहे? ते म्हणाले, “ गुरुदेव, आम्ही जर आमच्या कर्तव्यापासून पळून गेलो तर इथल्या जखमी माणसांची कोण काळजी घेणार? येथे रोज सुमारे ७०० जखमी लोक येतात कि ज्यांना वैद्यकीय उपचारांची गरज असते. आम्ही येथे थांबून त्यांची काळजी घेतो. तुम्ही आमच्यावर खूप माया करता आणि परमेश्वर आमची नेहमी काळजी घेत असतो, तर आम्ही येथे थांबून या लोकांना मदत करतो.” या युद्धात सात लाख स्त्रिया विधवा झाल्या. तेथील परिस्थिती पाहण्यासाठी मी तीन वेळा तेथे गेलो होतो. तेथील लोकांनी एक अजस्त्र आणि जाडजूड भिंत बांधून तो विभाग वाटून घेतला आहे. शिया लोकांचा विभाग वेगळा असून, सुन्नी लोकांचा एक वेगळा विभाग आहे. आम्ही तेथील एका सुन्नी इमामना (इस्लामचे धार्मिक पुढारी) बरोबर घेऊन युद्धामुळे बेघर झालेल्या ८००० लोकांच्या एका खेड्याला भेट दिली. आम्ही तेथील लोकांशी बोललो, दुभाष्याच्या मदतीने त्यांच्या स्थानिक पुढारीलोकांशी पण बोललो आणि हे युद्ध थांबविण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले. त्यांनी ते समजून घेऊन आमचे खुल्या दिलाने स्वागत केले. आणि मग हळूहळू शांतता प्रस्थापित व्हायले लागली. इराक सरकारे तेथील ५० युवक बेंगलोरच्या आंतरराष्ट्रीय केंद्रात प्रशिक्षणासाठी पाठविले. त्यांना तेथे नोकरी होती, त्यांचा कुटुंब परिवार पण होता तरीपण त्यांच्या देशाच्या उद्धारासाठी या प्रशिक्षणाला ते येथे आले होते. मी तुम्हाला सांगतो कि आजची सर्व युद्ध व्हायचे कारण अमेरिकन दारुगोळा बनविणाऱ्या कंपन्या आहेत. त्यांना त्यांची शस्त्रे कोणालातरी विकायची आहेत, नाहीतर त्यांचे शस्त्रांचे कारखाने बंद पडतील. ते बंदुका, दारुगोळा तयार करून दोघांना विकतात आणि मग त्या दोघांना युद्ध करायला भरीस पडतात. भारत पण असे करू शकतो. हिंदू आणि मुसलमान यांना एकमेकाविरुद्ध लढायला लावता येईल पण ते असे नाही. मी काही सर्व उद्योगांविषयी बोलत नाहीये. तर आज जगभर जो एक बंदूक समर्थक वर्ग बळावत चालला आहे त्याविषयी मी बोलत आहे. हा काही एका देशापुरता मर्यादित नाही. त्याचा सर्वदूर प्रसार झाला आहे. हे असे का आहे? कारण कि ते मानवी मूल्यांना महत्व देत नाहीत. त्यांना फक्त पैसा दिसतो आणि तो कसा वाढवायचा याच विचारात ते नेहमी असतात. आज सिरीया, इराण सारख्या देशात हेच चालू आहे. हे सर्व बघून खूप वाईट वाटते. इतकेच नाही तर खुद्द आपल्या देशात आसाम, नागालंड, जम्मू आणि काश्मीर येथे पण हेच चालु आहे. हे आयुष्य अल्प आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. जेथे प्रेम करायला पुरेसा वेळ नाही तर मग द्वेष आणि रक्तपात याच्या मागे आपण का लागतो? आपण सर्वांनी हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे. येथे आपापल्या धर्माप्रमाणे वागायला प्रत्येकाला मुभा असेल, आणि सर्व धर्मात एक प्रकारचा समन्वय असेल असे यामुळे होईल. आज भारतात काहीसे असेच आहे. तुम्हाला माहित असेल, कि काही लोक मला विचारतात ‘ भारतीय लोक इतक्या नानाविध देवी देवतांचे पूजन का करतात?’ त्यांचा हा समाज चुकीचा आहे. तो एकच परमात्मा आहे, पण आपला वैयक्तिक संबंध आणि जवळीक निर्माण होण्यासाठी लोक आपापल्या परीने त्यांची पूजा-अर्चा करतात, आणि म्हणून त्यांना विविध आकार आणि विविध नावे आहेत. लोक जेंव्हा मूर्ती पूजा करीत असतात तेंव्हा पण ते त्या दगडाची पूजा करीत नसून ज्याप्रमाणे आपण आपल्या प्रिया व्यक्तीचे फोटो जवळ ठेवतो त्याप्रमाणे ते त्या दैवत्वाची पूजा करीत असतात. आपण आपल्या मुलांचे फोटो आपल्याजवळ ठेवतो. ते जरी आपल्याजवळ नसले तरी तो फोटो बघतच तत्काळ आपल्याला त्यांची भेट घेतल्याचा आनंद होतो. तसेच मूर्तीचे आहे. दैवत्वाशी तत्काळ संबंध प्रस्थापित करण्यासाठी मूर्ती असते. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'