03
2014
Nov
|
दिल्ली, भारत.
|
इथे श्री गोपाल जे आहेत ते आपल्या नावारूपाने आहेत – ‘गोपाल’ (श्री कृष्णाचे एक नाव ज्याचा अर्थ आहे कि जो गाईचे रक्षण करतो आणि काळजी घेतो). गो संरक्षणासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. मला इथे येण्याची खूप दिवसापासून इच्छा होती, पण काही केल्या ते जमत नव्हते. आज दुपारी १.४५ वा मला दिल्ली हून हैद्राबादला विमानाने जायचे होते. तिथे संध्याकाळी एक सत्संग आहे आणि त्या बरोबरच गोपाष्ट्मी साजरी करायची आहे, आणि गोशाळे मध्ये एक कार्यक्रम आहे. पण आज हैद्राबादला जाताना, व्हाया जयपूर, मला गौशाळेला भेटण्याची संधी मिळाली आहे. मी गाडीतून प्रवास करताना एखाद्या गाईला प्लेस्टीक खाताना पाहिले कि मी खूप अस्वस्थ होतो. मला नेहमीच असे वाटते. तुम्ही जर दिल्ली शहराच्या रिंगरोड वरून प्रवास केला असेल तर तुम्हाला दिसेल कि काही गाया रस्त्याच्यामधोमध प्लेस्टीक चगळताना दिसतील. आज मी हे ऐकून खूप आनंदित झालो आहे कि तुम्ही अशा गायांना इथे गोशाळेत आणून त्यांची काळजी घेत आहात. अशा प्रकारे गाईची काळजी घेणे म्हणजे एक ईश्वरीय सेवा आहे. हे पहा, सर्व थोर आणि सत्वशील गोष्टी ‘ग’ या उच्चारावरून सुरु होतात, उदा. गुरु, ज्ञान, गीता, गंगा, गती, गमन इत्यादि आणि आपण या सर्वांचा आदर केला पाहिजे. जेव्हा भाविक आर्ट ऑफ लिव्हिंग च्या बेंगलोर आश्रम पहायला येतात, तेव्हा तेथील दौऱ्यातील महत्वपूर्ण भाग म्हणजे गौशाला आहे. आश्रमाच्या गौशाळेत सध्या ३०० गाई आहेत. तुम्ही पाहिले असेल ज्या ठिकाणी मोठे आश्रम आहेत तिथे गाईंचे चांगल्या वातावरणात पोषण केले जाते. गाईंचे संरक्षण करणे हा अत्यंत महत्वाचा आणि आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा आश्रमात येताल त्यावेळेस गौशाळेस आवश्य भेट द्या आणि तेथील गाईना चारा खाऊ घाला. ‘गौ’ या शब्दाचे चार अर्थ आहेत: ज्ञान, गमन(प्रगति करणे), प्राप्ती आणि मोक्ष. एक गाई तुम्हाला हे सर्व देऊ शकते. गाईच्या दुधामुळे आपले मन आणि बुद्धी तीक्ष्ण होते. भारतीय गाईच्या दुधामध्ये एक विशिष्ठ प्रकारचे प्रथिन पदार्थ असतो ज्यामुळे एखाद्याच्या बुद्धीचा विकास होतो. त्यानंतर येते ते म्हणजे गमन - म्हणजेच प्रगती. गाईच्या वेगवेगळ्या पदार्थांमुळेच आपण आपल्या रोजच्या जीवनात पुढे जाऊ शकतो. म्हणून गाईच आपल्याला ज्ञान, गमन, प्राप्ती आणि मोक्ष देऊ शकते. आपण याची दक्षता घेतली पाहिजे आणि गाईची आदर केला पाहिजे. हे पहा, गाईची नुसती पूजा करून आणि नमन करून काही होणार नाही. तुम्ही गाईची सेवा केली पाहिजे. आपण नेहमी काय करतो तर गाईला हार घालतो आणि तिची कापूर लावून पूजा करतो. हे बरोबर नाही, कारण याच्या मुळे गाई घाबरते. म्हणूनच तुम्ही गाईची सेवा केली पाहिजे. तुमचे जीवन हे पुढील चार गोष्टीमुळे फुलले पाहिजे – दया, करुणा, सहनशीलता आणि शांती. जर तुमचे ह्र्दय दुसऱ्यांच्या दु:खांना समजू शकत नाही तर त्याचा काय उपयोग? असे ह्र्दय दुसऱ्यांना फक्त दु:ख आणि हिंसा देवू शकतो.आज इथे संसदे मधील मंत्री आहेत. भारतातील जनतेला गौहत्या बंद करायची आहे. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले, असे म्हटले जाते कि त्यावेळेस प्राण्यांची लोकसंख्या १२० दशलक्ष होती आणि जनसंख्या फक्त ३० दशलक्ष. पण आजच्या घडीला बरोबर त्याच्या उलटे झाले आहे. आज जनसंख्या १२० दशलक्ष आणि प्राण्यांची संख्या ३० दशलक्ष झाली आहे. हे गुणोत्तर बरोबर नाही. तुम्हाला काय वाटते, हे बरोबर आहे? म्हणून आपण गाईची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांची संख्या वाढविण्यास प्रयत्न केले पाहिजेत. गोहत्या बंद करण्यासाठी आपण भारतीय प्रशासने कडे अपील करत राहिले पाहिजे. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'