(शांततेची सुरुवात माझ्यापासून होते या प्रकरणाचा उत्तरार्ध)
काल गणेशोत्सवाची सांगता झाली. लोक वारंवार विचारतात, “नेहमी सर्व
प्रथम गणपतीची पूजा करून मग त्याचे पाण्यात विसर्जन का करतात?”
तुम्हाला माहिती आहे अशी परंपरा ठेवण्यामागे ॠषींची ओजस्वी कल्पना आहे.
ते म्हणाले कि या पुजेचा साधासुधा अर्थ आहे की जे काही देव आपल्यासाठी
करतो, आपणसुद्धा ते त्याला प्रेम आणि कृतज्ञतापूर्वक करावे. हे म्हणजे देवाबरोबर
खेळ खेळणे झाले तसेच जसे तो आपल्याबरोबर खेळतो. तर या दैवी खेळाला
पूजा असे म्हणतात. म्हणून आपण गणपतीच्या मूर्तीसोबत ‘खेळतो’
( पूजा-अर्चा करतो) आणि काही काळानंतर मातीची ही मूर्ती पाण्यात विसर्जित
करतो. ‘हे देवा! तू जो आत्मा बनून माझ्या आत वास करतो, मी प्रार्थना करतो
की तू काही काळ मूर्तीच्या रूपाने अवतीर्ण हो म्हणजे तू ज्याप्रमाणे प्रेमाने
माझ्याबरोबर खेळतो त्याप्रमाणे मी तुझ्याबरोबर खेळू शकेन. तुझा उत्सव साजरा
करण्याची माझी इच्छा आहे’, अशा प्रकारे हे संपूर्ण उपस्कार देवावरचे प्रेम व्यक्त
करण्याकरिता आहे.
पूजा संपली की मग आपण देवाला पुन्हा एकदा आपल्या हृदयात खोल
जावयास सांगतो. आणि नंतर आपण मूर्तीचे पाण्यात विसर्जन करतो.
आज अध्यात्मिक शिक्षणाची गरज आहे. अध्यात्मिक ज्ञान ते आहे जे सर्वांना
एकत्र जोडते. आजवर अनेक संत झाले आणि त्या सर्वांचे एकच मत होते-
सर्वकाही एकच आहे.
आदि शंकराचार्य यांनी केलेले गणपती देवाचे वर्णन ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
ते गातात, “ अजम निर्विकल्पं निराकारं एकं”. याचा अर्थ असा की देव गणपती
हा निराकार ( आकार रहित ) आहे. म्हणून इथे आदि शंकराचार्य म्हणतात,
“ हे देवा गणेशा! तू निरंतर, आकाररहित सर्वत्र अगोचर होणारे दैवत्व आहे.”
ईश्वराचे हेच समान वर्णन तुम्हाला पवित्र कुराणाच्या सुरुवातीलासुद्धा सापडेल.
आपल्याला आपल्या स्वतःच्या धर्माबद्दल आणि आपल्या धर्मग्रंथांबद्दल इतके थोडे
माहित आहे हा दुर्दैवी भाग आहे.
जगातील कोणताही धर्म असे शिकवत नाही की तुम्ही दुसऱ्या जीवाला दुःखी
करावे किंवा इजा करावी. तर मग असे आज का घडते आहे? याचे कारण आहे
की सगळ्यांना धार्मिक शिक्षण योग्य प्रकारे दिल्या गेले नाही आहे. आज
अध्यात्मिक शिक्षणाची गरज आहे. अध्यात्मिक शिक्षण ते आहे जे सर्वांना
एकत्र जोडते. आजवर अनेक संत झाले आणि त्या सर्वांचे एकच मत होते-
सर्वकाही एकच आहे.
म्हणून इराकी नेत्यांनी आमच्याकडून तीन गोष्टी मागितल्या.
सर्वात पहिली गोष्ट त्यांना पाहिजे होती ती भारतीय अध्यात्मिकता कारण ते
त्याकडे जोडण्याची आणि सर्वांना प्रेमाने आणि शांततेने एकत्र आणण्याची एक
अनन्यसाधारण पध्दत म्हणून पाहतात.
दुसरी गोष्ट त्यांनी मागितली ती होती शैक्षणिक क्षेत्रात मदत. ते म्हणाले
की आय. आय. टी. मध्ये शिकणारे तरुण अतिशय हुशार आणि कुशाग्र आहेत.
आमच्या तरुणांनासुद्धा आय. आय. टी.मध्ये मिळणाऱ्या चांगल्या प्रशिक्षणासारखे
असे चांगले तांत्रिक शिक्षण मिळण्यासाठी कृपया मदत करा.
तिसरी गोष्ट जी त्यांनी म्हंटली ती अशी की भारतीय टीमने इराकमध्ये यावे
आणि त्यांच्या तेलविहिरीतून तेल काढावे. अनेक पाश्च्यमात्य हे काम बऱ्याच
अवधीपासून करीत आहेत, पण आता आम्हाला भारतीयसुद्धा इथे येऊन आणि
इथल्या आमच्या देशाच्या तैलसंपदेचा फायदा घेऊन पाहिजे आहेत.
मी तुम्हाला सांगतो की जर सर्व देश जे संरक्षणावर खर्च करीत आहेत त्याच्या
०.१% जरी खर्च शांतता आणि एकोपा यासाठी करतील तर संपूर्ण जगात बदल
घडेल. कोणीही घृणा पसंत करीत नाही. पण अनेकदा अजाणतेपणी हे घडते
किंवा भयामुळे हे घडते,
जर आपल्याला जागतिक शांतता पाहिजे असेल तर आपल्याला आपल्या स्वतःपासून
सुरुवात केली पाहिजे. एकदा का तुम्ही स्वतःमध्ये असलेल्या दिव्या प्रकाशाला पाहाल,
मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला कोणीही अनोळखी सापडणार नाही. तुम्हाला वाटेल
जसे काही सर्वजण तुमचे आप्त आहेत.
एक गोष्ट आहे जी मी तुम्हा सर्वांबरोबर वाटू इच्छितो. आज इथे येण्याअगोदर,
एकुलते एक दुसरे असे मुस्लिम विश्वविद्यालय आहे जिथे मी भाषण दिले आहे
आणि ते आहे २०१२ मध्ये लाहोर विश्वविद्यालय, पाकिस्तान. त्या दिवशी हजारो
युवक तिथे जमा झाले होते. मला आठवते की त्यांनी त्या कार्यक्रमाची तयारी
अतिशय उत्साहाने केली होती.
तिथेसुद्धा मला विचारण्यात आले होते की भारतामध्ये आपण इतक्या विविध देवी
आणि देवतांची पूजा का करतो. हे त्यांना समजावण्याकरिता मी एक साधे उदाहरण
दिले. बघा, गव्हाचे पीठ तेच पण तुम्ही त्याचा हलवा ( शिरा) बनवता, पुऱ्या
बनवता आणि सामोसा बनवता. हो की नाही? तसेच एकाच पिठापासून तुम्ही
पिझ्झासुद्धा बनवता आणि नुडल्ससुद्धा.
आपण असे का करतो? याचे कारण आपल्याला अन्नामध्ये वैविध्य हवे असते.
त्याचप्रमाणे आम्ही भारतात असा नेहमी विश्वास करतो की देव हा एकच आहे परंतु
आम्ही त्या एका दिव्यत्वाला वेगवेगळ्या पोशाखात सजवतो! (हशा) म्हणून आम्ही
देवाला वेगवेगळे कपडे घालतो आणि प्रत्येक आकाराला निरनिराळे नाव देतो.
हिंदू धर्मामध्ये देवाची १०८ निरनिराळी नवे आहेत आणि त्यांनी प्रत्येक नावाबरोबर
एक आकार जोडलेले आहे. तर असे आहे हे.
तिथल्या श्रोत्यांनी या समजुतीचे कौतुक केले. काही लोक म्हणाले, “गुरुदेव, तुम्ही
हे खूपच छानपणे समजावले. आतापर्यंत आम्हाला कळत नव्हते की भारतीय इतक्या
देवी आणि देवतांना का पूजतात ते.”
म्हणून जर आज आपल्याला जागतिक शांतता पाहिजे असेल तर आपण ही सुरुवात
सर्वप्रथम आपल्या स्वतःपासूनच केली पाहिजे. एकदा का तुम्ही स्वतःमध्ये असलेल्या
दिव्या प्रकाशाला पाहाल, मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला कोणीही अनोळखी सापडणार
नाही. तुम्हाला वाटेल जसे काही सर्वजण तुमचे आप्त आहेत. जगातील प्रत्येक माणूस
हा तुमचा असेल. पण हा साक्षात्कार तेव्हाच उदय पावेल जेव्हा जो कधीही विझू शकत
नाही असा आपल्यात असणाऱ्या स्वतःच्या प्रकाशाबद्दल तुम्ही जागरूक व्हाल तेव्हा.
आत असलेल्या प्रकाशाबद्दल तुम्हाला जागरूक करणे हेच केवळ उद्देश्य प्राणायाम आणि
ध्यान यांचे आहे.
प्रश्न: पिढ्यांमधील अंतर आणि त्यासोबत येणाऱ्या अडचणी यांच्याबरोबर
जुळवून कसे घ्यावे? आमच्या वडिलधाऱ्यांबरोबर होणाऱ्या आमच्या मतभेदामध्ये
तडजोड कशी करावी?
श्री श्री : ते करणे अतिशय कौशल्याचे आहे. तुमचे म्हणणे त्यांना समजवा
आणि त्यांच्या समोर ठेवा, पण तुम्ही त्यांच्या म्हणण्याचा मान ठेवा आणि त्यांना
काय म्हणायचे आहे तेसुद्धा ऐकून घ्या.
आपली वडीलधारी मंडळी आपल्यावर माया करतात आणि त्यांच्या काळजात आपले
केवळ भले व्हावे हे असते – हे लक्षात ठेवा. म्हणूनच ते वेळोवेळी तुम्हाला सल्ला
देत असतात. ते जुनी पद्धत अनुसरणे आणि जुना कित्ता गिरवणे हे शक्य आहे,
किंवा त्यांना नवी पद्धती पूर्णपणे चांगली माहित नसेल. परंतु आपले भले व्हावे हाच
त्यांचा नेहमी हेतू असतो. कदाचित त्यांची समजावण्याची पद्धत आपल्या अपेक्षेपेक्षा
निराळी असू शकते. थोड्या देवाण-घेवाणीने ही समस्या सहजपणे सोडवता येईल.
प्रश्न: नेहमी सुरुवातीला मी लोकांमध्ये केवळ चांगलेच पाहतो पण जसजसा काळ
व्यतीत होतो, मला ते जवळून माहित होतात तेव्हा मला त्यांच्यात दुर्गुण दिसू
लागतात. त्यांच्याबद्दलच्या माझ्या भावना बदलतात. हे असे का होते आणि अशी
परिस्थिती मी कशी हाताळू?
श्री श्री : तुम्हाला माहिती आहे, या सत्याच्या विरुद्धसुद्धा खरे आहे. अनेकदा
कोणा व्यक्तीबरोबर तुमची सुरुवात नीट होत नाही, परंतु जसजसा काळ जातो
आणि तुम्ही संयम ठेवता, तुम्हाला ती व्यक्ती आवडू लागते. म्हणून दोन्ही गोष्टी
सत्य आहेत.
याप्रकारचे घटनाचक्र प्रत्येकाच्या आयुष्यात येते. तुम्ही कोणालातरी भेटता आणि
सुरुवातीला तुम्हाला ते आवडतात, मग काही समयानंतर तुम्ही त्यांचा तिरस्कार
करू लागता, आणि पुन्हा काही काळानंतर तुम्हाला ते पुन्हा आवडू लागतात.
तुमच्या आई आणि वडिलांना याबद्दल जरा विचारून पहा. (हशा) त्यांनी आनंदाने
लग्न केले पण लवकरच त्यांच्यात बारीकसारीक खटके उडू लागले आणि
मतभेद होऊ लागले.
प्रश्न: शांत आणि यशस्वी जीवनाचे रहस्य काय आहे?
श्री श्री : इतका वेळ हेच तर मी सांगत होतो. लोक आणि परिस्तिथी जसेच्या तसे
स्वीकारा. आणि नेहमी वर्तमान क्षणात राहा. भूतकाळात काय झाले किंवा
भविष्यकाळात काय होणार याचा फार विचार करू नका.
प्रश्न: शांतता आणि जागतिक ऐक्य यांना प्रोत्साहन देण्यात धर्माची काय
भूमिका आहे? यासाठी धर्म उपयुक्त आहे का अडथळा आहे?
श्री श्री :बुद्धिमान लोकांकरिता, धर्म संपत्ती आहे. परंतु निर्बुद्ध लोकांकरिता
तो मार्गातील धोंड आहे. जीवनाचे उत्थान करण्यास मदत करणाऱ्या आणि जीवन
फुलवण्यात मदत करणाऱ्या अनन्यसाधारण खुबी प्रत्येक धर्मामध्ये आहेत. परंतु
आपण जर अविवेकी असू तर आपण त्याच गुणधर्मांना लोकांमध्ये अंतर आणि समस्या
निर्माण वापरतो. तर हे आपल्यावर अवलंबून आहे.
जगातील कोणत्याही धर्मामध्ये काहीही चुकीचे नाहीये. त्याचे अनुसरण आणि
आचरण करणाऱ्यावर हे अवलंबून असते.
एका सुरीचा उपयोग तुम्ही भाज्या चिरायला, लोण्याची चकती कापायला आणि
स्वतःला अपाय करायला करू शकता.
हे त्या समान आहे.