14
2014
Oct
|
क्यूबेक आश्रम कॅनडा
|
प्रश्न : श्रद्धा कशी वाढवता येईल ? कां ती उपजतच असते ? श्री श्री : श्रद्धा वाढवता येत नाही. तुम्ही फक्त तुमच्या शंका लक्षात घ्या आणि त्यां सोडून द्या. तुम्ही तुमच्या शंका टाकून दिल्या की श्रद्धा असतेच. शंका म्हणजे मनावर आलेले मळभ असते. जागे व्हा आणि लक्षात घ्या, ‘शंका म्हणजे काय ? शंका म्हणजे स्वत:ला खाली पाडणे, आणि जडत्व निर्माण करून घेणे. जे भूतकाळात अनेकदा तुम्ही अनुभवले आहे. मग तुम्ही जागे होता. आणि जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा श्रद्धा असतेच. श्रद्धा वाढवता येत नाही पण शंकांपासून सुटका कारण घेता येते. शंका निरसन करण्याला काही अंत नाही. तुम्ही कधीही शंका निरसन करण्याच्या फंदात पडू नका, कारण एका शंकेचे निरसन झाले की आणखी दहा शंका निर्माण होतात. फक्त त्याबद्दल सजग व्हा, ‘ह्याच्यामुळे माझे ओझे वाढते आहे’ आणि ते टाकून द्या. ते झटकून टाकले की तुम्ही तुमच्यातील अशा एका ठिकाणी येऊन पोहोचता जी शक्ती आहे, सत्य आहे, धैर्य आहे. त्यालाच श्रद्धा म्हणतात. तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा तुमच्या मनात शंका असते तेव्हा तुम्ही दुर्बल बनता. जेव्हा तुमच्यात श्रद्धा असते तेव्हा तुम्हाला आतून अद्र्ष्य असे बळ मिळते. त्यामुळे शक्तिशाली आणि धैर्यशील वाटू द्यायचे की दुर्बल ते तुमच्यावर आहे. शंका या नेहमी चांगल्या गोष्टीबद्दल असतात. काही वाईट किंवा नकारात्मक असेल त्यावर आपण कधी शंका घेत नाही. जे चांगले असेल त्यावरच आपण शंका घेतो. ही एक जाणीव ठेवणे, तुमच्यातील शंका झटकून टाकायला पुरेसे आहे. प्रश्न : प्रिय गुरुदेव : मी कृपया तंत्र साधना करू कां ? तुमची काही हरकत नाही नां ? मी दश महाविद्यांपैकी एक साधना करत आहे. श्री श्री : हे बघा, दश महाविद्या जाणणारे फार लोक नाहीयेत. त्यामुळे तुम्ही ते सर्व करण्याची काही गरज नाही. तुम्ही निवांतपणे एखादा मंत्र जाप ऐका. आर्ट ऑफ लिव्हिंगणे बरेच मंत्र जाप प्रसिद्ध केले आहेत ते सर्व त्याचाच भाग आहेत. तुम्हला मिळणारे ‘सहज समाधी’ सारखे मंत्र म्हणजे बीज मंत्र आहे. ते अप्रतिम आहेत. काही जण म्हणतील की, ते तुम्हाला दश महाविद्यांचे ज्ञान प्राप्त करून देतील पण ते फार गुंतागुंतीचे आहे. मी म्हणेन की तुम्ही दुरुनच त्याचा मान राखा. तुम्हाला साधना करण्यासाठी जे दिले गेले आहे ते उत्तम आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही आपल्या केंद्रांमध्ये होत असलेल्या वैदिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. चाळीस दिवसात तुम्ही याबद्दलची बरीच माहिती मिळवू शकता. जर तुम्ही भारतात आलात तर आम्ही ‘उपनयन’ सुद्धा करतो. त्यात तुम्हाला मंत्र शिकायला मिळतील. बरेच लोक म्हणतात की, ‘ मी तुम्हाला हे ज्ञान देतो, ते ज्ञान देतो’. पण त्याने फक्त गोंधळच वाढेल. प्रश्न : योगनिद्रेचा हेतू काय आणि त्याने काय साध्य होते? श्री श्री : त्याने छान वाटते, हो की नाडी ? तुम्ही एक एक करून सर्व अवयवांकडे लक्ष देता, आणि तुमच्या हे लक्षात येते की शरिर आणि आत्मा कसे वेगळे आहेत. तरीही ते एकमेकाशी एकरूप झालेले आहेत. प्रश्न : बाहेरून कितीही काबाडकष्ट, हाल अपेष्टा आणि अन्याय असला तरीही आतून शांत रहाण्याचे महत्व मला समजते. पण जसा एखादा कार्यकर्ता सर्व विरोधांना सामोरा जातो तसे एखाद्या हिंसक कार्यकर्त्याला कसे हाताळायचे? दुसऱ्या शब्दात म्हणजे दुर्बलांनी बालवानांवर वरचढ कसे व्हायचे ? श्री श्री : आपण जर अस्वस्थ असलो, तर आपल्या कृतीचे फळ मिळणार नाही. आपण जेव्हा शांत असतो तेव्हा आपल्यात अंत:प्रेरणेतून विचार येतात आणि या विचारातून तुम्ही काही योजना आखता आणि त्यानुसार कृती करटा. तुम्हला जर एखाद्या कार्यकर्त्याशी एकट्याने लढा द्यायचा असेल तर ते शक्य नाही. तुम्हाला जागरूकता निर्माण करून गटाने काम केले तर हे शक्य आहे. त्याचं बरोबर तुमचा संकल्प पक्का असू द्या आणि हे लक्षात ठेवा की एक शक्ती तुमच्या पाठीशी आहे जी तुम्हाला मार्ग दाखवेल आणि आधार देईल. आठवताय कां, महात्मा गांधी कधी कधी एकटेच चालत असत. इतर वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर जागरुकतेची मोठी लाट निर्माण करत संपूर्ण खंड हादरवून सोडत, हो की नाही ? आणि ते नियमितपणे ध्यान करीत. ते रोज सत्संग करत, भजने वगैरे म्हणत. रो सकाळी ते भगवद्गीता वाचत. त्यामुळे महात्मा गांधींकडे एक आध्यात्मिक शक्ती होती. नाही तर त्यांनी जे साध्य केले ते त्यांना करता आले नसते. प्रश्न : सर्व सीमारेषा आणि स्थानिक सरकार नाहीसे करून जग एक होणे गरजेचे आहे कां ? श्री श्री : नाही, स्थानिक सरकार रद्दबादल करायला नको. ते असू द्यावे आणि त्याच्याबरोबर त्यांनी त्यांची दृष्टी व्याप्त करायला हवी. हे बघा, तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या झटकून टाकू शकत नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी तर घ्यायचीच आहे, त्याच बरोबर तुम्ही तुमचे खेडे, तुमची गाव किंवा तुमचा देश यांचीपण काळजी घ्यायला हवी. तुम्ही दोन्ही भूमिका निभावू शकता आणि त्यात काही तणाव येण्याचे कारण नाही. प्रश्न : माझे धीर धरणे, माझी करुणा, क्षमाशीलता आणि चिकाटी याकडे लोकांनी जर माझ्यातले न्यून मानले तर मी काय करावे ? श्री श्री : हे बघा, दुसऱ्याने काय विचार करावा किंवा त्यांचा विचार बदलावा हे तुमच्या हातात नाही. जर ते असा विचार करत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. जर तुम्ही केंद्रित आणि दृढ असाल तर तुम्ही व्यवस्थित असाल. पुढे जात रहा. प्रश्न : प्रिय गुरुदेव, मला दिवसातला खूप वेळ आर्ट ऑफ लिव्हिंगसाठी द्यायचा आहे. पण मला मुले आहेत आणि मला त्यांनाही वेळ द्यायला हवा. मी काय करू ? श्री श्री : हे बघा, मुले हा अडथळा आहे असे समजू नका. असे बरेच लोक आहेत की ज्यांना लहान मुले असूनही त्यांनी प्रचंड काम केले. आपल्याकडे बऱ्याच प्रशिक्षकांची लहान मुले आहेत आणि तरीही ते काम करत आहेत. जेनिस हे असेच एक उदाहरण आहे. तिला दोन लहान मुले असतानाही तिने बरेच काम केले आहे. पोलंड मध्ये आपली आणखी एक प्रशिक्षिका आहे. तिला तीन मुले आहेत आणि त्यांच्या बरोबर ती शंभर दोनशे जणांचे कोर्स घ्यायची. तर, आपण असा विचार करायची गरज नाही की मुलांमुळे मी काही करू शकत नाही. तुम्ही नक्कीच त्यांच्याकडे दुर्लक्षही करू नका. तुम्ही त्यांची काळजी घ्यायलाच हवी. मुलांकडे लक्ष द्या पण त्याचं बरोबर तुम्हाला समाजासाठी काही करायची इच्छ असेल तर तुम्ही ते करू शकता. त्यासाठी काही वेळ राखून ठेवा. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'