कारण आणि परिणाम

04
2012
Nov
बंगलोर, भारत

प्रश्न: गुरुजी, हे सर्व तुम्ही कुठून शिकलात? तुम्हाला ध्यान करायला कोणी शिकवले?

श्री श्री : तुम्ही लेखक किंवा कवींना विचारता कि ते कुठून शिकले? ते आपोआपच लिहितात कि नाही? जर का कवी किंवा लेखक जर कुठूनतरी कॉपी करू लागले तर आपण ते त्यांनी निर्माण केले असे म्हणू शकतो का? तसेच, जेंव्हा कोणी समाधी अवस्थेमध्ये जाते, तेंव्हा हे सर्व त्यांना अंत:स्फुर्तीनेच ( परमेश्व्वाराकडूनच ) यायला लागते.

प्रश्न: काही सणांमध्ये आपण सर्व प्रकारचे धन्य दान म्हणून देतो. असे का म्हणतात कि या दानाबरोबर ‘मीठ’ देऊ नये ?

श्री श्री : तो तर फक्त एक रिवाज आहे. हे काही शास्त्रांमध्ये सांगितलेले नाहीये. त्याची काही काळजी करू नका.

असा कुठलाही पदार्थ नाही कि ज्यामध्ये मीठ नसते. सगळ्या पदार्थांमध्ये थोड्याफार प्रमाणात मीठ हे असतेच. नैवेद्यासाठी बनविलेल्या सगळ्या पदार्थांमध्ये मीठ हे असतेच. नारळाच्या पाण्यामध्ये मीठ असते. असे म्हणतात कि अगदी फळांमध्ये सुद्धा मीठ असते. आपण ज्या हवेमध्ये श्वास घेतो त्यामध्येही मीठ असते.

असे म्हणतात कि तेल, मिरची आणि पाणी कोणाच्या हातात देऊ नये म्हणून.म्हणून या गोष्टी जमिनीवर ठेवून देत असत. असे म्हणतात कि या गोष्टी जर का हातात दिल्या एका व्यक्तीची स्पंदने त्यामधून दुसर्या व्यक्तींकडे जातात.

जर कोणाच्या काम्पनं मुले तुम्हाला काही परिणाम जाणवत असेल तर भजन म्हणा किना ओम नमः शिवाय चा जप आणि प्राणायाम करा. सर्व नकारात्मक परिणाम दूर होईल.

प्रश्न: मला योग वशिष्ठ मधला एक प्रश्न आहे. भृगु महर्षींचे पुत्र शुक्राचार्यांनी मंत्र म्हणून आणि पवित्र जल शिंपडून एका मृत व्यक्तीला जिवंत केले.हे खरोखर शक्य आहे का?

श्री श्री : योग वशिष्ठ मधील गोष्टींच्या मागे खूप सखोल अर्थ दडलेला आहे. ते एकदा वाचून पुरेसे नाही. तुम्ही ते जसजसे परत परत वाचाल तसतसे त्यामधले रहस्य उलगडत जाईल. 

प्रश्न: आपण जेंव्हा मंत्रांचा जप करतो, तेंव्हा ते आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर , लोकांवर आणि पूर्ण जगावर कसा काय परिणाम करतात?

श्री श्री : या जगात प्रत्येक गोष्ट एक दुसर्यावर प्रभाव पाडत असतात. म्हणून तुम्ही जेंव्हा जेंव्हा मंत्र म्हणता, हवन करता, त्याचा आपल्या सभोवताली एक सकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे तुमच्यामध्ये सकारात्मक कंपने तयार होतात आणि त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक उर्जा पसरते.

प्रश्न: दक्षिणामूर्ती (गुरुस्वरूपी भगवान शंकर), यांना ‘सामवेद प्रिय’ असे का म्हंटले आहे?

श्री श्री : जे लोक सामवेदाशी संबंधित आहेत, नक्की हे त्या लोकांनी लिहिले असेल. जर हे ऋग्वेदी लोकांनी लिहिले असते तर त्यांनी रुग्वेदाप्रीय म्हंटले असते. यजुर्वेदी लोक म्हणतील कि यजुर्वेद सर्व वेन्दांमधील श्रेष्ठ आहे.

भगवान कृष्णाने म्हंटले आहे, ‘ वेदानामसामवेदोस्मी’ (भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक २२). कारण सामवेदा मध्ये भक्ती आणि संगीत, यांना महत्त्व दिले आहे. मेंदूच्या २ भागांमध्ये, डावा मेंदू हा तार्किक आहे तर उजवा मेंदू हा संगीत आहे. साम वेदामध्ये तर्क आणि संगीत, दोन्ही आहे. अशी शक्यात आहे कि म्हणूनहि असे म्हंटले जाते.

प्रश्न: कन्नड भाषेची तुलना कस्तुरी शी का केली आहे?

श्री श्री : तुम्हाला त्याची तुलना मोगऱ्या शी करायची असेल तर तुम्ही करू शकता. कवींनी त्याला ‘कस्तुरी कन्नडा’ असे म्हंटले आहे. त्यांनी असे का म्हंटले हे तुम्ही विचारू शकत नाही. जसे कि, सुंदर स्त्री ला चंद्रमुखी म्हंटले आहे. म्हणजे, ती जिचे मुख चंद्रासारखे आहे अशी. आता खरे तर चंद्रावर खूप सारे डाग आहेत. मग तिच्या चेहऱ्याची तुलना चंद्राशी का केली आहे?

असे म्हणतात कि भुकेलेल्याला चंद्र हा हुलग्या (कानडी पक्वांना) सारखा दिसतो. कस्तुरीचा सुगंध खूप चं असतो. म्हणून कवींनी कन्नड भाषेला मधुर भाषा असे म्हंटले आहे.

प्रश्न: आजकाल आपल्या देशात खूप ठिकाणी दुष्काळ पडला आहे. जर आपण गंगा आणि कावेरी नद्या जोडल्या, तर जल सिंचनाला मदत होईल. तुम्ही राजकारण्यांशी गंभीरपणे याविषयी बोलाल का?

श्री श्री : वैज्ञानिक म्हणतात कि आपण जर आपल्या देशातील सर्व नद्यांवर धरण बांधले आणि समुद्राला मिळणारे पाणी जर अडवले, तर सर्व भारत हा २ फूट पाण्यामध्ये असेल. ( जलसिंचन व्यवस्थित होईल) खुपसे पाणी नद्यांमधून वाहून जाऊन समुद्राला मिळते आणि वाया जाते. आपण नद्यांमधील पाणी काळजीपूर्वक वापरले पाहिजे. पाण्याची कमतरता मुळीच नाहीये. पावसाचे प्रमाण लक्षात घेता भारताचा क्रमांक जगात दुसरा आहे. पण आपण पाण्याचा साठा योग्य प्रकारे करीत नाही.

तुम्ही गट तयार करून पावसाचे पाणी वाचविण्यासाठी धरण बांधा.

प्रश्न: २०१२ मध्ये विशेष करून युरोपिअन लोकांसाठी ‘वेदिक ज्ञान शिबीर’ का आयोजित करण्यात आले होते?

श्री श्री : आपण ते उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील लोकांसाठी केले असते, तर खूप लोक जमले असते. आम्हाला १०० ते १५० लोकांचा गट करायचा होता. म्हणून आम्ही फक्त युरोप साठी ठेवला होता. जर सर्व जगासाठी केला असता तर प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला असता आणि गुरु पूजा कोर्स (१५०० लोक) सारखा झाला असता. आता मला वाटले कि इथे एवढी जागा नाहीये, म्हणून फक्त छोट्या गटासाठी ठेवला होता. या वर्षी, ज्ञानाच्या नवीन लाटेची गरज होती आणि तसे होईल सुद्धा. तुम्हा सगळ्यांना खूप मोट्ठे कार्य कराचे आहे. आज या पुरातन ज्ञानासाठी जग तयार आहे. म्हणून ज्यांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला होता, त्या सर्वांनी हे ज्ञान लाखो लोकांपर्यंत पोचवून त्यांच्या जीवनात प्रकाश आणि हास्य फुलवावे.

प्रश्न: thyroid चा त्रास असलेल्या स्त्रियांची संख्या वाढते आहे. यावर उपाय काय?

श्री श्री : मला असे वाटते कि आपल्या अन्नातील कीटक नाशके आणि रसायने यामुळे असे होते आहे.