क्रोधाला हाताळणे

07
2012
Nov
बंगलोर, भारत
प्रश्न : गुरुदेव,माझ्या मनात असे कुतूहल आहे की तुम्ही आधीच सत्संगाची तयारी करून येता की आयत्या वेळी तुम्ही ध्यान निर्माण करता?

श्री श्री : हे तर त्या क्षणीच होते. मी काहीही तयारी करून येत नाही. मी तर अगोदरपासूनच तयार आहे. (हशा)

प्रश्न : पक्षपात न करता सदाचरण कसे हाताळावे? माझ्या हातून जर चूक घडली तर मी माघार घेतो आणि त्यामुळे विसरणे आणि माफ करणे या माझ्या क्षमतांवर बंधने येतात.

श्री श्री : जेवढे सगळे संतापतात ते सगळे सदाचरणाच्या तत्त्वावरच संतापतात. परंतु त्यांची सदाचरणाची कल्पना अतिशय संकुचित असते. या जगामध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी घडतात,तुम्हाला धीर धरणे जरुरी आहे. कायम सगळे काही बरोबरच असले (सदाचरण)पाहिजे आणि असे म्हणणे ,'मी बरोबर असायला पाहिजे आणि मला सगळे बरोबर पाहिजेत आणि तेसुद्धा आत्ता या क्षणी', तर असे शक्य नाही.

सगळे बरोबर असायची इच्छा असणे ठीक आहे,पण त्याकरिता त्यांना लांबच्या लांब दोरखंड द्या. सदाचरण असू देत पण त्याच्या सोबत सहनशीलता असली पाहिजे, मग क्रोध तुमचा ताबा घेणार नाही.

नाहीतर मग जेव्हा तुम्ही म्हणाल,'मी सदाचरणी आहे' , आणि 'मला हे पाहिजे', अशी जेव्हा तुम्ही मागणी कराल, तेव्हा क्रोध येईल, आणि एकदा का संतापाने प्रवेश केला की मग तुमचे सदाचरण तुम्ही हरवून बसाल. जर तुम्ही रागावला तर ते कोणी काही चुकीची कृती करण्याइतके वाईट.

समजा,कोणी ही जागा स्वच्छ केली नाही आणि इथे सगळी घाण आहे. तुम्ही इथे आलात आणि तुम्ही संतापलात. आता त्या व्यक्तीने तर साफसफाई न करून चूक केली, हे बरोबर आहे. परंतु तुमचे वैतागणे आणि आरडओरडा करणे ही दुसरी चूक आहे.

दोन चुका मिळून एक चुकीला बरोबर नाही करू शकत. म्हणूनच कोणी जर काही चुकी करत असेल तर संयमाने त्यांना एकदा सांगा,दोनदा-तीनदा सांगा आणि त्यांना शिकवा.

कोणाला शिकवणे हे भरपूर संयम आणि सहनशीलतेचे काम आहे. आजकालच्या शालेय शिक्षकांपुढे हेच आव्हान आहे. ते मुलांना दहा वेळा सांगतात आणि तरीसुद्धा मुले त्यांचे ऐकत नाहीत. लक्ष केंद्रित करण्याचा अभाव ही समस्या मुलांना आहे. मुले त्याचे काहीही करत नाही. म्हणूनच संयम आणि सहनशीलता असायला हवी.

संयम हा एक सद्गुण आहे. तो सहा संपत्तीपैकी एक आहे : साम (मनाची शांतता), दाम 
( आत्मसंयम), उपरती (ऐहिक वस्तूंपासून स्वतःला दूर करणे), तितिक्षा (सहनशक्ती), श्रद्धा (निष्ठा) आणि समाधान (थंड डोक्याचे असणे किंवा मनाचे केंद्रित असणे). समाधान म्हणजे ती तृप्तता आणि सहनशीलता असणे होय. हे असणे एकदम जरुरी आहे.

प्रश्न : गुरुदेव,जीवन जगण्याकरिता स्वतःच्यापेक्षा मोठे जीवन उद्देश्य कसे शोधावे? याचा शोध घेण्याची काही प्रक्रिया आहे का की ते उद्देश्य आपल्याला शोधते?

श्री श्री : तुम्हाला काय बनायचे आहे आणि तुम्हाला काय करायचे आहे याचे एक ध्येय, एक दूरदृष्टी तुमच्याकडे असायला पाहिजे...हे तुमच्याकडे पाहिजेच.

एक तर तुमचे वैयक्तिक ध्येय : मला आयुष्यात हे, हे, आणि हे मिळवायचे आहे.

दुसरे ध्येय हे ग्रहाकरिता असले पाहिजे : मी काय देऊ शकतो?

नेहमी असे होते की ध्येयाबद्दल विचार करताना तुम्हाला काय मिळवायचे याबद्दल तुम्ही विचार करता. म्हणूनच मी म्हणतो की तुमची दोन ध्येये असली पाहिजे : एक म्हणजे तुम्हाला काय मिळवायचे आहे,दुसरे म्हणजे तुम्हाला काय देऊ करायचे आहे. ही दोन्ही ध्येये जर एकच असतील तर अतिउत्तम.

प्रश्न : गुरुदेव,जर आम्ही आमच्या अन्न पदार्थांच्या सवयी बदलल्या तर आम्ही आमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकू का? असे म्हंटले जाते की जर आपण अतिशय मसालेदार जेवण जेवत असू तर आपल्याला जास्त राग येतो.

श्री श्री : तुम्ही तसे करून बघा. तुम्ही एक आठवडा मीठाशिवाय आणि तिखटाशिवाय जेवण जेवून बघा. तुम्ही म्हणता तसे असण्याची शक्यता आहे. परंतु अतिशय मसालेदार तिखट जेवणारे आणि तरीसुद्धा क्रोध न होणारे लोक आहेत. हे पण शक्य आहे.