नकारात्मक मतांना हाताळा

28
2012
Oct
बंगलोर, भारत
सखोल विश्रांतीमधेच (ध्यानावस्थेमध्येच) केवळ देव सापडू शकतो.

या सखोल शिथिलते मध्ये कोणकोणत्या अडचणी आहेत हे तुम्हाला माहिती आहे? मनाच्या लालसा आणि मनाचे तिरस्कार. मन जर लालसा आणि तिरस्कार यांनी ओतप्रोत असेल तर संपूर्ण आराम शक्य नाही. आणि जर आराम नसेल तर साधनेचा (अध्यात्मिक सरावाचा) उद्देश्य साध्य होत नाही.

म्हणूनच आपण इच्छा आकांक्षा आणि तिरस्कार यांच्यापासून आपले मन मुक्त करणे गरजेचे आहे.

तर मग आपण हे कसे साध्य करू शकू?

'मला कोणाकडून काहीही नको ', याची आपण आपल्या मनात घट्ट खुणगाठ बांधणे जरुरी आहे.

जेव्हा आपल्याला कोणाकडून काहीही नको असते तेव्हा आपल्या मनामध्ये इतर कोणाच्या प्रती इच्छा आकांक्षा लालसा या उठणार नाहीत. जेव्हा कोणतीही इच्छाच जर निर्माण झाली नाही तर कोणत्याही प्रकारचा तिरस्कार जन्म घेणार नाही.

ती व्यक्ती वाईट आहे असा कोणाबद्दलही विचार करू नका. या जगामध्ये एकही वाईट व्यक्ती नाही. जर लोकांनी काही वाईट केले तर त्याचे कारण ते त्यांनी त्यांच्या अज्ञानामुळे किंवा जागरूकतेच्या अभावामुळे, किंवा त्यांचे मन दुखावल्यामुळे केले होय. म्हणून कोणाच्याही प्रती कोणतेही नकारात्मक मत बनवू नका.

प्रश्न : गुरुदेव, तुम्ही आत्ताच म्हणालात की कोणालाही वाईट समजू नका. परंतु जर कोणी आमच्याबरोबर वाईट व्यवहार करीत असेल तर त्या व्यक्तीला कशी प्रतिक्रिया द्यावी?

श्री श्री : जर दुसऱ्यांचे तुमच्याविषयी नकारात्मक मत असेल तर ती त्यांची समस्या आहे, तुमची नाही. तुम्ही तुमच्याकडून कोणालाही वाईट समजू नका.

असे केल्याने तुमच्या मनाची स्पष्टता आणि प्रसन्नता कायम राहील आणि तुमची बुद्धी कुशाग्र होईल.

असे नाही केले, तर एखादे भूत कसे पछाडते त्याप्रमाणे तुम्हाला वाईट समजणारे तुमच्या मनाला पछाडतील.

जेव्हा असे विचार तुमच्या डोक्यात घर करून बसतील तेव्हा तुमच्या हातून कोणतेही सृजनशील कार्य घडणार नाही.

प्रश्न : जर कोणी आमच्याबरोबर काहीतरी अतिशय चुकीचे केले असेल तर मग आम्ही काय करावे?

श्री श्री : जर कोणी तुमच्याबरोबर अतिशय वाईट वागले असेल तर विचार करा की त्यांनी असे का केले असेल?

एक कारण असे असू शकेल की ते निरोगी नसतील.

तुम्ही एका वेड्याला किंवा मानसिक रुग्णाला अपराधी मानता का? नाही!

जर मानसिक रुग्णाने तुम्हाला काही अपमानकारक बोल बोलले तर तुम्ही ते शब्द गंभीरपणे घेता का? नाही. हे जाणून तुम्ही ते सोडून देता की त्याला मानसिक आजार आहे.

त्याचप्रमाणे जेव्हा कोणी तुम्हाला काही तरी वाईट बोलते तेव्हा याचप्रमाणे विचार करा. जेव्हा एक अस्वस्थ मनुष्य काहीतरी वाईट बडबडतो तेव्हा तुम्ही कशाला अस्वस्थ होता?

प्रश्न : शांत होण्याकरिता आपण दुसऱ्यांकडून कशाचीही अपेक्षा ठेवता कामा नये. परंतु दैनंदिन कामामध्ये, ऑफिसमध्ये किंवा घरात, वेगवेगळ्या माणसांनी वेगवेगळी कामे करणे भाग आहे. जर ते ती कामे करीत नाहीत तर मग समस्या उद्भवतात. प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडलीच पाहिजे. यावर कृपया मार्गदर्शन करा.

श्री श्री : जर कोणी आपली जबाबदारी पार पाडत नसेल तर आपण त्यांना सांगणे जरुरी आहे. इथे आपण आपल्या अधिकाराचा वापर करणे जरुरी आहे.

आपली कामे न करणारे आळशी लोक असतील तर आपण शांत बसता कामा नये. आपण त्यांना त्यांच्या कर्तव्याच्याबाबतीत जागरूक करणे आवश्यक आहे.

जर आपल्यामध्ये त्यांच्याप्रती लालसा अथवा तिरस्कार असेल तर आपण त्यांच्यामध्ये जागरूकता आणू शकत नाही. यामुळे आपला संताप होईल.

प्रश्न : 'कारण आणि परिणाम' याचा अर्थ काय?

श्री श्री : 'कारण आणि परिणाम' यांना "कारणे" आणि "कार्य" म्हणतात.

गाय ही कारण आहे आणि दुध हे परिणाम आहे. जर दुध आहे तर याचा अर्थ असा की ते गायीमुळे आहे.

गायीचे कारण आहे गवत. गवताचे कारण आहे पृथ्वी. पृथ्वीचे कारण आहे सूर्य.

प्रत्येक घटनेमागे एक कारण असते.

देव सर्व कारणांचे कारण, परमकारण,आहे. म्हणूनच 'तस्मै नमः परमकारणा कारणाय ' असे म्हंटले आहे.

समग्र कारणांचे कारण हे भगवान शिव आहेत.

प्रश्न : गुरुदेव , आपण 'आचमन्यम समर्पयामी' असे म्हणतो. पाण्याला 'आप' म्हणून आपण ओळखतो, तर मग आपण 'आचमन्यम' असे का म्हणतो? जल अर्पण करण्याचे महत्व काय?

श्री श्री : होय, पाण्याला आचमन्यम म्हणूनसुद्धा ओळखतात.

ही प्रथा अनेक वर्षांपासून चालू आहे. काही सुरु करण्याआधी किंवा काही संपण्याआधी 'आचमन्यम' अर्पण केले जाते. अभिमंत्रित करण्याची ही एक प्रक्रिया आहे. (अभिमंत्रित करणे म्हणजे पाण्यावर मंत्रोच्चारण करणे. तुम्ही एक भांडभर पाणी घ्या,त्याला आपल्या हाताने झाकून घ्या आणि मग मंत्रोच्चार करा. असे केल्याने उच्चारलेले मंत्र पाण्याच्याआत शोषले जातात) आणि नंतर ते अर्पण करतात. आत हे साधे प्यायचे पाणी राहिले नाही. ते आता मंत्रांच्या कंपनांनी प्रभारित झाले आहे.

जेव्हा कधी घरी अतिथी येतात तेव्हा त्यांना पाय (पद्य) धुण्याकरिता पाणी देतात. नंतर पाणी त्यांच्या हातात (अर्घ्य) देतात. हे झाल्यानंतर त्यांना तहान भागवण्याकरिता पिण्याचे पाणी (आचमन्यम) दिले जाते. प्राचीन काळी या तीन प्रथांचा रिवाज होता.

तुमच्या घरी जर कोणी आले तर तुम्ही त्यांना विचारात नाही का,'तुम्ही काय पिणार? तुम्हाला काय आवडेल सरबतं, दुध,चहा. किंवा कॉफी?'

तुम्ही त्यांना पाणी प्यायला देता की नाही?

त्याचप्रमाणे प्राचीन काळी त्यांचा पद्य, अर्घ्य आणि आचमन्यम यांचा रिवाज होता.

पद्य म्हणजे अतिथीचे घराच्या दारात पाय धुणे होय, यामुळे पायाचा कचरा घाण घरात येणार नाही. अर्घ्य म्हणजे त्यांचे हात धुणे होय. आचमन्यम म्हणजे त्यांना पिण्याकरिता पाणी देणे आणि याची सूचना देणे की आता संवादाला सुरुवात करण्यास हरकत नाही.

प्रश्न : 'पंचामृता' (हिंदू धर्माच्या पूजेमध्ये वापरण्यात येत असणारे पाच पदार्थांचे मिश्रण) चे अभिषेका मध्ये काय महत्व आहे? आणि हेच पदार्थ का निवडण्यात आले?

श्री श्री : दुध, दही, मध, गुळ आणि तूप हे अमृतासमान आहेत. खरे तर गुळाचा वापर करायला पाहिजे परंतु आजकाल सगळे साखर वापरतात.

त्यांच्यामध्ये पाच देवतांचा वास आहे. सवीतृ साखरेमध्ये, विश्वेदेवा मधामध्ये, सूर्य तुपामध्ये,वायू दह्यामध्ये आणि सोम दुधामध्ये वास करतात.

म्हणून जेव्हा तुम्ही अभिषेक करता तेव्हा तुमच्या जीवनात देवांचे गुण फुलून येवो हा उद्देश्य असतो.

सगळ्यांच्या मानसिक शांततेसाठी प्रार्थना करतो.

सगळ्यांच्या मनात आनंद असू दे.

लोकांच्या जीवनात शक्ती, धैर्य आणि उदंडता असू दे.

लोकांच्या जीवनात समाधान आणि उत्कर्ष असू दे.

जीवनात तेजस्वीपणा असू दे.

वारा आणि नद्या यांच्या वाहण्यात गोडवा असू दे.

आमचे दिवस अन रात्र गोड असू दे.

धरतीचा प्रत्येक कण आम्हाला गोडवा आणून देऊ दे.

आकाश, देवता आणि पितर (निवर्तलेले पूर्वज) यांच्याकडून आम्हाला गोडवा मिळू दे. 

आमची वाणी आणि विचार यांच्यामध्ये गोडवा असू दे.

समाज आम्हाला गोडवा प्रदान करू दे.

वनस्पती(वन देवता) आम्हाला गोडवा देऊ दे.

सूर्य आमच्या जीवनात गोडपणा निर्माण करू दे.

आमचे संपूर्ण जीवन दुसऱ्यांच्या जीवनात गोडवा आणू दे.

सामुहिक चेतनेला आमच्याकडून गोडवा येऊ दे.

प्रश्न : कृपा करून कधीही न संपणारी आणि कधी न डळमळणारी भक्ती मिळवण्याचा मार्ग आम्हाला सांगा.

श्री श्री : तुमची भक्ती कधी न डळमळणारी आहे असे समजून चला.

नारदमुनींने भक्ती सूत्रां मध्ये सांगितले आहे की भक्ती ही काही कोणती एक वस्तू नाहीये जी तुम्हाला मिळवायची आहे. जर तुम्ही सगळ्या शंका संशय सोडून दिलेत तर भक्ती तर आहेच.

प्रश्न : जर आपण कायद्याचा अभ्यास केला तर आपण वकील बनण्याची खात्री आहे. जर आपण अभियांत्रिकीचा अभ्यास केला तर प्रयत्न केला असता आपण अभियंता होऊ याची हमी आहे. परंतु आपण जर साधना करीत राहिलो आणि या मार्गावर चालत राहिलो तर मुक्ती मिळेल याची काही निश्चिती नाही.

श्री श्री : त्याची निश्चितपणे हमी आहे.

अर्जुनानेदेखील हाच प्रश्न भगवद गीतेमध्ये केला होता. तेव्हा भगवान कृष्णाने उत्तर दिले की,' न हि कल्याण कृत्कश्चि दुर्गतिं तात गच्छति' ,(अध्याय ६, श्लोक ४०).

कारण अध्यात्माच्या मार्गावर चालणारे तुम्ही केवळ उंचच्या उंच उठत जाल.

प्रश्न : अनेक महान संत,ज्यांनी साक्षात्कार अनुभवला, त्यांनी तो कोणाला सरळपणे दिला नाही. त्यांनी तो अनुभवण्याचा केवळ पर्याय शिकवला . देव सगळ्यांना साक्षात्कार सरळपणे का देत नाही? याकरिता हे सगळे संस्कार आवश्यक आहेत का?

श्री श्री : संस्कार जरुरी आहेत. जर तुम्ही इथे आला आहात तर याचा अर्थ असा की कुठेतरी तुम्हाला स्वारस्यआणि कुतूहल होते. ती आवड जर नसती तर तुम्ही इथे कसे आला असता? म्हणून थोडेफार संस्कार जरुरी आहेत.

परंतु केवळ संस्कार पुरेसे नाहीत. जीवनात संस्कार, संधी आणि कृपा केवळ इतक्याच गोष्टींची आवशक्यता आहे. याव्यतिरिक्त स्वयं प्रयास करण्याची गरज आहे.

जर तुम्हाला सत्संगला यायचे आहे परंतु तुम्ही बिछान्यात लोळत राहिलात तर त्याने काही मदत होईल का? म्हणून स्वयं प्रयास, संस्कार, संधी आणि कृपा या जरुरी आहेत.

प्रश्न : नियमित साधना करणाऱ्या लोकांसुद्धा अपस्माराचे झटके येण्याची शक्यता आहे का?

श्री श्री : ती व्यक्ती काय खाते, पिते आणि दिवसभर काय करते यावर अवलंबून आहे. जर खाणे पिणे आणि राहणीमानाच्या सवयी बरोबर नसतील तर हे होणे शक्य आहे.

जर चेतासंस्थेवर जास्त तणाव असेल तर असे झटके येणे संभाव आहे.

जर कोणी निरोगी जीवन जगत असेल तर असे होणार नाही.