05
2012
Nov
|
बंगलोर, भारत
|
प्रश्न: आपण पाद्य पूजा ( एक भारतीय पारंपारिक स्वागत करण्याची पद्धत ज्यात अतिथीचे पाय पाण्याने धुवून त्यावर फुले वाहिली जातात) का करितो? पाद्य पूजेचे काय महत्व आहे? श्री श्री : पूर्वीच्या काळी जेंव्हा अतिथी घरी यायचे तेंव्हा अशी त्यांचे पाय धुवून पूजा करायची पद्धत होती. ते पूर्वी चालत यायचे आणि म्हणून त्यांच्या पायावर धूळ असायची जी मग पाण्याने धुवून काढली जायची. आपली विनम्रता दाखवायची ती एक पद्धत होती. काही वेळा जेंव्हा आपल्याकडे कोणी पाहुणे आले तर एखादी पुष्प-माला त्यांना अर्पण करून किंवा काही फुले किंवा फुलांचा गुच्छ त्यांना दिला जातो. कोणे एके काळी जगभर हि पद्धत प्रचलित होती. मोठ्या लोकांचे पाय धुवायची पद्धत असायचे कारण असे कि हात आणि पाय यातून उर्जा संक्रमित होत असते. म्हणून मग लोक एकमेकांना असे म्हणत कि “ तुमचे हात माझ्या डोक्यावर ठेऊन मला आशीर्वाद द्या”. भारतात पद-स्पर्श करून आशीर्वाद घ्यायची पण पद्धत आहे. पण फक्त पायातून उर्जा संक्रमित होते हे म्हणणे तितकेसे योग्य नाही, तर ती साऱ्या शरीरातून येत असते. त्याचप्रकारचे फायदे हे शब्द उच्चारांच्या कम्पनातून येत असतात. हा आशीर्वादाचा खरा अर्थ आहे. थोरांचे स्मरण करून पण आशीर्वाद मिळतात. विचार, शब्द, दृष्टी आणि मग स्पर्श या माध्यमातून आशीर्वाद मिळतात. जरी दर्शन, स्पर्श आणि दृष्टी या माध्यमातून आशीर्वाद मिळत असले तरी तुम्ही असे म्हणता कामा नये कि “गुरुदेव, माझ्या मस्तकाला योग्य तऱ्हेने स्पर्श करून मला आशीर्वाद द्या”. हल्लीच्या काळी काही लोक आशीर्वाद कसा द्यायचा हे गुरूला शिकवायला लागले आहेत. कृपा आणि आशीर्वाद हे आपसूक येत असतात. त्यासाठी तुम्ही माझ्या पायावर डोके ठेवणे किंवा मी तुमच्या डोक्यावर हात ठेवणे याची गरज नसते. फक्त दर्शन घेऊन किंवा आवाज ऐकून आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचला असे समजा. तुम्ही असे समजा कि, तुम्ही कोठेही बसून फक्त तुमच्या मनातून आशीर्वाद मागितले कि समजा ते तुमच्या पर्यंत पोहोचले म्हणून. असेच श्राद्ध ( पूर्वजांचे स्मरण करून त्यांचा आदर सत्कार करायची पद्धत) केले जाते. त्यात आपण एके ठिकाणी बसून, जे आपल्याला सोडून गेलेले आहेत त्यांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद घेत असतो. आणि असा विचार करीत असताना ती कंपने आपल्यापर्यंत पोहोचतात. तुम्ही मला असे विचाराल कि हे कसे शक्य आहे. मला सांगा काम वासना कशी जागृत होते? मनात तसे विचार येताच ती जागृत होते, होय कि नाही? शरीरात जास्त प्रमाणात संप्रेरके तयार होतात. तुम्हाला राग कसा येतो? फक्त विचाराने. दुस्वास कसा निर्माण होतो? जे तुम्हाला आवडत नाहीत त्यांचा फक्त विचार मनात येताच. त्यालोकांचा मनात विचार येताच शरीराचा थरकाप होतो. भीती कशी वाटते? फक्त विचाराने. मग जर फक्त विचाराने, काम वासना जागृत होते,राग येतो, भीती वाटते, दुस्वास वाटतो, मग विचाराने आशीर्वाद का मिळणार नाहीत? आशीर्वाद हे कमी परिणामकारक असतात किंवा ते मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करायला लागतात? नाही! त्यासाठी तुम्ही काही करायची गरज नसते. फक्त विचाराने तुम्ही आशीर्वाद मिळवू शकता. आणि म्हणून मग अनेक धार्मिक पाठ जसे कि दुर्गा सप्तशती केल्याने तुम्हाला आनंदी वाटायला लागते. त्या मागचे कारण असे आहे कि देवाचे स्मरण करून आशीर्वाद मिळवता येतात. हे असे घडत असते. म्हणून जेंव्हा तुम्हाला उपकृत वाटत असेल तेंव्हा निश्चितच आशीर्वाद पण मिळालेले असतात. प्रश्न: असे म्हणतात कि शरण गेलेल्या माणसाला सर्व गोष्टींचा लाभ होतो, मग असे म्हणणे योग्य होईल का कि ज्याला सर्व काही मिळालेले नाही तो पूर्णपणे शरण गेलेला नाही? श्री श्री : सर्व काही मागण्यापूर्वी शांतपणे विचार करायला पाहिजे. तुम्ही जर सर्व मागाल तर त्यात चांगले आणि वाईट अशा सर्वांचा समावेश असेल. आनंद, दुःख, समस्या असे सर्व काही त्यात समाविष्ट असू शकते. हे सर्व आयुष्याचा एक भाग आहे. यात तुमच्या विचारांची स्पष्टता दिसत नाहीये. तुम्हाला काय पाहिजे हेच तुम्हाला स्पष्टपणे माहित नाहीये. एखाद्या दिवशी शांतपणे कोठेतरी बसून ठरवा कि तुम्हाला काय पाहिजे? तुमच्या मनात अनेक इच्छा निर्माण होऊन मग संभ्रम निर्माण होतो हे काही बरोबर नाही. एक इच्छा ठेवा आणि मग तिचा पाठपुरावा करा. असा एक पण माणूस सापडणार नाही जो म्हणेल कि त्याची कोणतीच इच्छा पूर्ण झाली नाहीये. त्याचप्रमाणे ज्याच्या १००% इच्छा पूर्ण झाल्या आहेत असा माणूस पण सापडणार नाही. माणूस जितका जास्ती सात्विक तितक्या त्याच्या इच्छा जास्त पूर्ण होतात, आणि तो जे काही इच्छा करेल ती फलद्रूप होईल. तुम्ही जितके आनंदी असाल तेवढे जास्त काम पूर्ण होईल. तुमच्या इच्छा आकांक्षा जेवढ्या कमी, त्याप्रमाणात त्या जास्त पूर्ण होतील. तुम्हाला जर मिनिटाला एक अशी इच्छा व्हायला लागली तर आपली बुद्धी जी एक संगणकासारखी आहे ती संभ्रमात पडून अचानक बंद पडेल. तुमच्या भ्रमण ध्वनी सारखे एका वेळी अनेक कामे करायला घेतलीत तर ते बंद पडेल. आपली बुद्धी हि त्या भ्रमण ध्वनिसारखी एक संगणक यंत्रणा आहे. त्याचप्रमाणे इच्छा बाळगणे हि पण एक कला आहे आणि मग बाळगलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणे हि पण एक कला आहे. मग पुढे जाऊन न इच्छिलेल्या आकांक्षा पूर्ण होणे हि एक फार मोठी कला आहे, यालाच सिद्धी म्हणतात. तुमच्यापैकी कितीजणांना असा अनुभव आहे कि मनात यायच्या अगोदर इच्छा पूर्ण झाल्या आहेत? (प्रेक्षकांपैकी अनेकजण हात वरती करतात.) पहा, येथे अनेक सिद्ध बसले आहेत. प्रत्येकजण हात वरती करीत आहे. तुम्ही मनात इच्छा करायच्या आधी ते काम झालेले असते हे खरोखरीच प्रशंसनीय आहे. प्रश्न: गुरुदेव, आत्म-बोध झाल्यानंतर राजा जनकाने तपस्या केली असे तुम्ही म्हणालात. आत्म-बोध झाल्यानंतर तपस्या करणे शक्य आहे काय? श्री श्री : मी असे म्हटले होते कि आत्म-बोध झाल्यानंतर भोग भोगणे म्हणजे तपस्या होय. मी आत्म-बोधानंतर जगण्याविषयी काही बोललो नाही. आत्म-बोधाआधी योग हि तपस्या असते तर आत्म-बोधानंतर भोग हि तपस्या असते. प्रश्न: शिव-परिवारातील लोकांची वाहने हि मर्त्य पशूंची बनलेली आहेत जसे कि सिंह आणि बैल, किंवा साप आणि उंदीर. या मागील रहस्य काय आहे? श्री श्री : विरोधी गोष्टी या नेहमी एकमेकांना पूरक असतात. शिवाच्या सान्निध्यात सर्व गोष्टी या संयुक्त असतात. जेंव्हा अध्यात्म वाढते तेंव्हा वेगवेगळे लोक एकत्र येतात.शिव-तत्व किंवा गुरू-तत्वाच्या सानिध्यात एक तऱ्हेचे नव्हे तर भिन्न भिन्न प्रवृत्ती असलेले एकत्र नांदताना दिसतात. हे त्याचे वैशिष्ट् आहे. प्रश्न: मी असे ऐकले आहे कि या कलीयुगात तमस गुणांची वाढ होणार आहे, पण साधक लोकांसाठी हा एक चांगला काळ आहे.तमस गुण वाढीवर असतांना हा काळ साधकांसाठी चांगला कसा? श्री श्री : असे पहा कि जेंव्हा तुम्ही साधक होता तेंव्हा कोणताही काळ हा उत्तम आणि फायदेशीर समजला पाहिजे. आनंद आणि दुःख यांचे काही विशिष्ट स्थान असते. सर्व प्रकारची परिस्थिती हि साधकासाठी उपयोगी समजून ती साधनेच्या दृष्टीने एक महत्वाचा घटक म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. प्रश्न: गुरुदेव, तुमची कृपा सर्व साधकांवर सारखी असतांना काही साधकांना इतरांपेक्षा जास्त संघर्ष का करावा लागतो? श्री श्री : सर्वजण सारखे नसतात. देवाने सर्वांना एकसारखे बनविले नाहीये. जगात अनेक प्रकारचे, विभिन्न क्षमता असलेले, भिन्न विचार सरणी असलेले, विभिन्न लालन-पालन असलेले, विविध संस्कार असलेले असे लोक असतात. जेंव्हा तुम्ही स्वतः एक साधक असता तेंव्हा स्वताची दुसऱ्या बरोबर तुलना करू नका. स्वतःला अतुलनीय समजा. प्रत्येकाने स्वतःला अतुलनीय समजायला पाहिजे. जेंव्हा आपण कोणाबरोबर तुलना करू लागतो तेंव्हा मग आपले लक्ष बाहेर केंद्रित होऊन मग लालसा, घृणा यांच्या एका गुंत्यात अडकले जाऊ लागतो. प्रश्न: गुरुदेव, तुम्ही अंतर्यामी आहात, आपण सर्वकाही जाणता. कृपया माझ्या मनातील प्रश्नाचे उत्तर द्या. श्री श्री : मी तेथे तुमच्या मनात त्याचे उत्तर देईन. जर तुमच्या मनात एक प्रश्न असता तर गोष्ट वेगळी होती, पण मला तर तेथे अनेक प्रश्न, एखाद्या साखळी सारखे तुमच्या मनात तयार झालेले दिसत आहेत. शांतपणे आरामात बसा. मग तुमच्या असे लक्षात येईल कि सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपसूक मिळत जातील. प्रश्न: गुरुदेव, पुरुष आणि प्रकृती यांचा जन्म कसा झाला? त्या दोघात काय नाते आहे? श्री श्री : आता त्यांचा जन्म कसा आणि कधी झाला हे तर मला माहित नाही. खरेतर त्यांचा जन्म झाला कि कसे हे पण मला माहित नाही. अनंतकाळापासून ते अस्तित्वात आहेत. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'