जीवनाचे रहस्य

25
2012
Oct
बंगलोर, भारत


प्रश्न: गुरुदेव, तुमच्या ‘Living the Mystery of Life’ या पुस्तकात तुम्ही म्हटले आहे कि, ‘ या जगात तुम्ही काम करा, पण मनात कामाचा ध्यास धरू नका’.

तुम्ही याचा अर्थ परत एकदा सांगा. याचा अर्थ वैराग्य तर नाही ना?

श्री श्री: हेच तर आत्ता आपण ध्यानामध्ये केले आहे.

आपण जेव्हा डोळे उघडे ठेवतो त्या वेळेस आपण समोरचे दृश्य पाहतो, आणि आपण जेव्हा डोळे बंद करतो त्यानंतर आपले मन दुसऱ्याच जगात असते. तुम्ही याचे परीक्षण केले आहे का?

समजा तुम्ही एका जागी बसून नुसते विचार करत बसलात कि, ‘माझी सून अशीच आहे. माझा मुलगा माझा आदर करत नाही.. वगैरे वगैरे’. तुम्ही रात्रभर हा विचार केलात तर त्याचा तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्रास होईल.

मला काय म्हणायचे आहे, त्यांनी जे काही केले आहे त्याचा विचार तुम्ही सोडून द्या. जेव्हा तुम्ही डोळे बंद करता त्या वेळी तुम्ही तुमच्या अंर्तमनाबरोबर रहा. बाहेरच्या जगाची काळजी तुम्ही करू नका.

मला माहीत आहे हे सोपे नाही, फार अवघड आहे. पण आपण याच दिशेने पुढे जायचे आहे.

दोन प्रकारची विश्व आहेत आणि सत्य ह्या दोन्हीच्या मध्ये दडलेले आहे. एक आहे मनोरजयं – आपल्या मनातील विश्व. आणि दुसरे आहे समाज – बाह्य विश्वातील वातावरण. समाजम आणि मनोरजयं ह्या दोन्हीच्या मधेच सत्य दडलेले आहे.

प्रश्न: गुरुदेव, मी ज्या वेळेस ध्यान करायला बसतो, त्यावेळेस माझ्या मनात काही विचार येतात आणि ढगां सारखे निघून जातात. पण काही विचार असे येतात कि ज्या मुळे मी हरवून जातो आणि अचानक मला त्याची जाणीव होते. कोणत्या कारणामुळे आपण हरवून जातो, सगळेच विचार ढगां सारखे का निघून जात नाहीत?

श्री श्री: हे असेच आहे. काही विचार असे आहेत, तर काही विचार तसे आहेत. काही विचारांमुळे तुम्हाला त्रास होतो आणि काही मुळे होत नाही. त्यासाठीच तर तुमचे मन स्थिर करण्यासाठी विविध प्रकारची तंत्र अवलंबले जातात.

पहा, आता जी पूजा झाली त्यामध्ये विविध प्रकारची संगीत उपकरणे का वाजविली गेली? त्या झांजाचा किती मोठा आवाज येत होता, नादस्वरम (एक दाक्षिणात्य शास्त्रीय संगीत साधन) वाजविले गेले, मंत्रोपचार चालू होता, कोणीतरी मोठा आवाज काढत होते. तुमचे मन जास्त विचार करू नये म्हणून बाहेर एवढे मोठे आवाज केले जात होते.

म्हणून म्हणतो कि असे बरेच मार्ग आहेत. आपल्या कुशलतेने आपण आपल्या मनाला स्थिर करू शकतो.

आपले मन कसे आहे याची आपण तक्रार करू शकत नाही. कधी कधी आपले मन काही नगण्य आही क्षुल्लक कारणावरून अस्थिर होते. त्यासाठीच म्हणतात कि आपले मन हे अनाकलनीय आहे.

भगवतगीतेमधे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतात, ‘मन हे राक्षसा सारखे आहे. माझे त्याच्यावर नियंत्रण नाही, ते माझे काही ऐकत नाही.’

त्यावर भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘ नक्कीच, मी ते मान्य करतो.’

पण शेवटी ते म्हणतात कि त्यातूनहि मार्ग आहे.

प्रश्न: गुरुदेव, तुमचे आशीर्वाद जास्तीत जास्त घेण्यासाठी मी माझी क्षमता कशी वाढवू?

श्री श्री: अडवान्स कोर्स मध्ये तुम्ही शत संपत्ती (सहा प्रकारचे धन किंवा सद्गुण) बद्दल ऐकले आहे.

समा (शांत मन)
दमा (अविचलीत किंवा ज्ञानेन्द्रीयांवर नियंत्रण)
उपरती (तृप्ती)
तितिक्षा (सहनशक्ती)
श्रद्धा (विश्वास)
समाधान (एकाग्रता)

आयुष्यामध्ये तुम्ही या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून वाढविल्या पाहिजेत. तुमच्यातील या सद्गुणामध्ये वाढ झाल्यास तुमची आशीर्वाद घेण्याची क्षमता वाढेल.

ज्ञानाच्या चार स्तंभा पैकी तिसऱ्या स्तंभामध्ये हे सहा सद्गुण आहेत तेच तर आपल्याला वाढवायचे आहेत.

या बरोबर आपण साधना आणि सत्संग पण केले पाहिजे.

प्रश्न: गुरुदेव, आपले धर्मग्रंथ, ‘मला काय मिळेल’ या सारख्या विचार सरणीच्या पलीकडे घेवून जातात? तर मग प्रत्येक धर्मग्रंथ मध्ये फलश्रुती (धर्मग्रंथाचे लाभ) बद्दल का एवढे विस्तार पूर्वक समजावून सांगितले गेले आहे?

श्री श्री: ते करण्यासाठी तुम्हाला भुरळ पाडली जाते. (गुरुदेव हसतात). ते एक कौशल्य आहे. तुम्हाला माहीत आहे एक प्रकारची म्हण आहे, ‘ काही लाभ मिळत असल्याशिवाय कोणी काही करत नाही’.

मी हे काम केल्याने मला यातून काय मिळेल असा विचार एक मंद बुद्धीचा व्यक्ती पण करतो.

पूर्वीच्या ऋषी मुनींना हे माहीत होते म्हणून त्यांनी प्रत्येक धर्मग्रंथां मध्ये फलश्रुती बद्दल लिहिले आहे. ते म्हणतात, तुम्ही जर हे केलेत तर तुम्हाला हे फायदे होतील.

त्याच करिता त्याला अपरा असे म्हटले आहे.

अपरा विद्या  म्हणजेच तुम्ही प्रत्येक अभ्यासाला काही लाभ दाखवू शकता.

त्या पेक्षा हि सूक्ष्म म्हणजे पर-पारा  आणि शेवटी पर विद्या  आहेच जिथे ह्या सर्व गोष्टींचा काही अर्थ नाही. पर विद्या  मिळवून काही उपयोग नाही.

प्रश्न: गुरुदेव, आम्ही असे ऐकले आहे कि नवरात्री म्हणजे सत्व चा रजस आणि तमस वर विजय. पण ह्या जीवनाचे अस्तित्व टिकविण्यासाठी या तिन्ही गुणांचे समान महत्व नाही का? आपण एकावर पसंती कशी दाखवू शकतो?

श्री श्री: नाही, हे नेहेमी असेच असते. तिन्ही पैकी एक नेहमी वरचढ असतो.

सत्व हा नेहमी सर्वामध्ये असतो त्याच प्रमाणे रजस आणि तमस. हे तिन्ही गुण एकत्रित सर्वामध्ये असतात. पण कोणता गुण वरचढ आहे हे तुम्हाला लक्षात येईल.

जर तमोगुण वरचढ असेल तर दु:ख असेल.

जेव्हा रजोगुण वरचढ असेल तर संघर्ष असेल.

आणि जर का सत्वगुण वरचढ असेल तर जाण, ज्ञान आणि आनंद असेल.

कोणत्या क्षणी कोणता गुण वरचढ आहे याचे तुम्ही निरीक्षण केले पाहिजे.

प्रश्न: गुरुदेव, तुम्ही काल सांगितले होते कि आपण बऱ्याच गोष्टी बदलू शकतो, आपले नशीब सुद्धा. माझ्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी बदलण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीत आहे, पण मला असे वाटत आहे कि माझ्या नशिबात जे आहे तेच सर्व होत आहे. असे का?

श्री श्री: हे पहा आयुष्य हे सुख दुःखाचे मिश्रण आहे. तुमच्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी झाल्या आहेत त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा म्हणजे तो आनंद आणखीन द्विगुणीत होईल.

तुम्ही ज्ञानात असल्यावर सुद्धा तुमचे नशीब बदलू शकते.