गौ हत्या बंद करा.

03
2014
Nov
दिल्ली, भारत.
 
इथे श्री गोपाल जे आहेत ते आपल्या नावारूपाने आहेत – ‘गोपाल’ (श्री कृष्णाचे 
एक नाव ज्याचा अर्थ आहे कि जो गाईचे रक्षण करतो आणि काळजी घेतो). गो 
संरक्षणासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे.
मला इथे येण्याची खूप दिवसापासून इच्छा होती, पण काही केल्या ते जमत नव्हते. 
आज दुपारी १.४५ वा मला दिल्ली हून हैद्राबादला विमानाने जायचे होते. तिथे 
संध्याकाळी एक सत्संग आहे आणि त्या बरोबरच गोपाष्ट्मी साजरी करायची आहे, 
आणि गोशाळे मध्ये एक कार्यक्रम आहे. पण आज हैद्राबादला जाताना, व्हाया जयपूर, 
मला गौशाळेला भेटण्याची संधी मिळाली आहे.
मी गाडीतून प्रवास करताना एखाद्या गाईला प्लेस्टीक खाताना पाहिले कि मी खूप 
अस्वस्थ होतो. मला नेहमीच असे वाटते. तुम्ही जर दिल्ली शहराच्या रिंगरोड 
वरून प्रवास केला असेल तर तुम्हाला दिसेल कि काही गाया रस्त्याच्यामधोमध 
प्लेस्टीक चगळताना दिसतील. आज मी हे ऐकून खूप आनंदित झालो आहे कि 
तुम्ही अशा गायांना इथे गोशाळेत आणून त्यांची काळजी घेत आहात. अशा प्रकारे 
गाईची काळजी घेणे म्हणजे एक ईश्वरीय सेवा आहे.
हे पहा, सर्व थोर आणि सत्वशील गोष्टी ‘ग’ या उच्चारावरून सुरु होतात, 
उदा. गुरु, ज्ञान, गीता, गंगा, गती, गमन इत्यादि आणि आपण या सर्वांचा 
आदर केला पाहिजे. 
जेव्हा भाविक आर्ट ऑफ लिव्हिंग च्या बेंगलोर आश्रम पहायला येतात, तेव्हा 
तेथील दौऱ्यातील महत्वपूर्ण भाग म्हणजे गौशाला आहे. आश्रमाच्या गौशाळेत 
सध्या ३०० गाई आहेत. तुम्ही पाहिले असेल ज्या ठिकाणी मोठे आश्रम आहेत 
तिथे गाईंचे चांगल्या वातावरणात पोषण केले जाते. गाईंचे संरक्षण करणे हा 
अत्यंत महत्वाचा आणि आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. तुम्ही जेव्हा 
जेव्हा आश्रमात येताल त्यावेळेस गौशाळेस आवश्य भेट द्या आणि तेथील गाईना 
चारा खाऊ घाला. ‘गौ’ या शब्दाचे चार अर्थ आहेत: ज्ञान, गमन(प्रगति करणे), 
प्राप्ती आणि मोक्ष. एक गाई तुम्हाला हे सर्व देऊ शकते.
गाईच्या दुधामुळे आपले मन आणि बुद्धी तीक्ष्ण होते. भारतीय गाईच्या दुधामध्ये 
एक विशिष्ठ प्रकारचे प्रथिन पदार्थ असतो ज्यामुळे एखाद्याच्या बुद्धीचा विकास 
होतो. त्यानंतर येते ते म्हणजे गमन -  म्हणजेच प्रगती. गाईच्या वेगवेगळ्या 
पदार्थांमुळेच आपण आपल्या रोजच्या जीवनात पुढे जाऊ शकतो. म्हणून गाईच 
आपल्याला ज्ञान, गमन, प्राप्ती आणि मोक्ष देऊ शकते. आपण याची दक्षता 
घेतली पाहिजे आणि गाईची आदर केला पाहिजे.
हे पहा, गाईची नुसती पूजा करून आणि नमन करून काही होणार नाही. तुम्ही 
गाईची सेवा केली पाहिजे. आपण नेहमी काय करतो तर गाईला हार घालतो 
आणि तिची कापूर लावून पूजा करतो. हे बरोबर नाही, कारण याच्या मुळे गाई 
घाबरते. म्हणूनच तुम्ही गाईची सेवा केली पाहिजे.
तुमचे जीवन हे पुढील चार गोष्टीमुळे फुलले पाहिजे – 
दया, करुणा, सहनशीलता आणि शांती. जर तुमचे ह्र्दय दुसऱ्यांच्या दु:खांना 
समजू शकत नाही तर त्याचा काय उपयोग? असे ह्र्दय दुसऱ्यांना फक्त दु:ख 
आणि हिंसा देवू शकतो.आज इथे संसदे मधील मंत्री आहेत. भारतातील जनतेला 
गौहत्या बंद करायची आहे.
जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले, असे म्हटले जाते कि त्यावेळेस प्राण्यांची 
लोकसंख्या १२० दशलक्ष होती आणि जनसंख्या फक्त ३० दशलक्ष. पण आजच्या 
घडीला बरोबर त्याच्या उलटे झाले आहे. आज जनसंख्या १२० दशलक्ष आणि 
प्राण्यांची संख्या ३० दशलक्ष झाली आहे. हे गुणोत्तर बरोबर नाही. तुम्हाला 
काय वाटते, हे बरोबर आहे? म्हणून आपण गाईची काळजी घेतली पाहिजे 
आणि त्यांची संख्या वाढविण्यास प्रयत्न केले पाहिजेत. गोहत्या बंद करण्यासाठी 
आपण भारतीय प्रशासने कडे अपील करत राहिले पाहिजे. 

तुम्ही तुमचे जग घडवता.

13
2014
Nov
बंगळूरू, भारत.

हे सर्व जग कंपनांपासून बनले आहे आणि ही सर्व कंपने सात्विक ( सकारात्मक 
आणि उत्थापित करणारी) असावीत हे बघणे हे आपले काम आहे.

जेंव्हा एखादा डॉक्टर चांगला असून सर्वांवर उपचार करून त्यांना तो बरे करणारा 
असेल तर आपण म्हणतो कि तो एक चांगला चिकित्सक स्पर्श असलेला आहे. 
असे पहा कि सर्व डॉक्टर सारखेच असतात पण काहीजण त्यांच्या रोग्यांचा 
इतरांपेक्षा चांगला इलाज करतात. त्यांच्या हाताला चिकित्सक स्पर्श आहे असे 
म्हटले जाते. आपण आपल्या चेतनेमध्ये ज्याची बीजे पेरतो, त्याचीच कंपने 
आपल्या सभोवती तयार होतात. म्हणून आपण नियमितपणे योग आणि प्राणायाम 
केला पाहिजे. म्हणून तुमच्या मनाचा आणि आयुष्याचा स्तर उंचावण्याची हि 
एक अदभूत संधी आहे.

आम्ही आश्रमात प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मी देवीची एक छोटी पूजा करीत असतो. 
उद्या तुमच्यापैकी ज्या कोणाला हि पूजा बघायची इच्छा असेल ते तसे करू 
शकतात. सर्वप्रथम आम्ही वेळेवर पाउस पडावा म्हणून देवाची प्रार्थना करणार 
आहोत, ज्यामुळे शेतात जे काही पेरले असेल ते उगवून भरपूर धान्य उत्पादन 
होऊन आपल्या देशात कोणीही उपाशी राहणार नाही.

पूजेनंतर इतर सत्र व कार्यक्रम होतील. कोणतीही नवी गोष्ट सुरु करण्यापूर्वी 
देवाची प्रार्थना करावी असे आम्हाला शिकविले आहे. हि भारतातील एक अनोखी 
परंपरा असून ती जगातील इतर कोठल्याही देशात सापडत नाही.

जेंव्हा आपण प्रार्थना करतो, तेंव्हा आपण या गोष्टीची आठवण ठेवायला पाहिजे 
कि आपण जेंव्हा या जगात प्रवेश केला तेंव्हा आपण आपले पालक आणि कुटुंबीय 
यांच्यावर आपल्या गरजांसाठी अवलंबून होतो. जेंव्हा आपण म्हातारे होतो तेंव्हा 
पण आपण आपली मुले आणि कुटुंबीय यांच्यावर कोणत्या तरी कारणांनी अवलंबून 
असतो. अश्या तऱ्हेने लहानपणी आणि म्हातारपणी आपण दुसऱ्यावर अवलंबून 
असतो.आणि आयुष्याच्या या दोन अवस्थामध्ये पण आपण अनेक गोष्टींवर अवलंबून 
असतो, उदाहरणार्थ पाऊस, समाज इत्यादी. अशातऱ्हेने आपण आयुष्यभर 
कोणत्यातरी गोष्टीवर किंवा व्यक्तीवर अवलंबून असतो. परंतु जेंव्हा आपल्याला 
आठवते कि आपले हे कोणावरतरी अवलंबून असणे हे खऱ्या अर्थाने आपल्या सर्व 
गरजांसाठी देवावर अवलंबून असणे आहे, तेंव्हा असे देवावर अवलंबून असणे हा 
आपला कमकुवतपणा नसून ती एक मोठी आंतरिक शक्ती आहे. असे असेल तर 
मग आपण लाचारीचे क्षणसुद्धा या शक्तीच्या जोरावर पार करू शकतो. हेच देव 
पूजेचे रहस्य आहे. 

तुम्ही हिंदीमधील एक म्हण ऐकली असेल “ निर्बल के बल राम “ (कमजोर 
माणसासाठी देव ही शक्ती असते). म्हणून हे लक्षात घ्या कि तुम्ही कमजोर 
आहात आणि मग असे लक्षात घ्या कि देव ही कमजोर माणसाची शक्ती आहे. 
जेंव्हा तुमची अशी दृढ श्रद्धा असते, तेंव्हा तुम्ही कमजोर आणि लाचार राहू शकता 
काय ? नाही, हे ज्ञान मिळाल्यावर तुम्हाला अपरिमित शक्तीची जाणीव होते 
आणि मग तुम्ही आत्मनिर्भर आणि स्वतंत्र होता. आपल्या शेतकऱ्यांना असे स्वतंत्र 
आणि आत्मनिर्भर होण्याची खूप गरज आहे.   

आज आर्ट ऑफ लिविंगचा संस्थापना दिवस आहे. खरे पाहता या ज्ञानाची कोठेही 
सुरवात नाही कारण ते कालातीत आणि प्रारंभातीत आहे. पण आम्ही औपचारिकरित्या 
आजच्या दिवशी आर्ट ऑफ लिविंग फौन्डेशन आणि वेद विज्ञान महा विद्यापीठ 
याची स्थापना केली आणि १३ नोव्हेंबर १९८१ रोजी यांची नोंदणी झाली. आज 
आम्ही सेवेची ३३ वर्षे पूर्ण केली. आमचे सुरवातीचे एक विश्वस्त न्यायाधीश 
व्ही.आर. कृष्णय्या होते. आज ते शंभर वर्षांचे झाले. त्यांचा १०० वा वाढदिवस 
आहे. हे भारतातील एक नावाजलेले कायदे पंडित आणि न्यायाधीश आहेत. त्याकाळी 
ते स्वतःला नास्तिक समजायचे. पण मला भेटल्यानंतर आमची अध्यात्मावर अनेकदा 
चर्चा होत असे आणि हळूहळू त्यांना त्यात रस वाटू लागला.

त्याकाळी सुदर्शन क्रिया नसल्यामुळे माझ्या मार्गदर्शित ध्यानाला ते उपस्थित असायचे 
आणि मी तेंव्हा फक्त ध्यान करवून घ्यायचो. त्यांनी माझ्याबरोबर बराच काळ व्यतीत 
केला. त्यानंतर त्यांना अध्यात्माविषयी काही अदभूत आहे असे वाटू लागले आणि 
मग तेंव्हापासून एक भक्त आणि विश्वासू म्हणून त्यांचा प्रवास सुरु झाला. ते एक 
मोठ्या उमद्या मनाचे गृहस्थ आहेत.

तुम्हाला माहित आहे कि एखादा माणूस नास्तिक किंवा देवावर, अध्यात्मावर विश्वास 
ठेवणारा असला तरी जोपर्यंत तो आपले बोलणे आणि कृती याच्याविषयी दृढ आणि खरा 
राहतो तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. आणि मग जसा जसा काळ पुढे जातो, 
हळूहळू आणि निश्चितपणे त्यांना अध्यात्माविषयी गोडी वाटायला लागेत आणि ते 
एक सच्चे भक्त होतात. हे आपण अनेक वेळा पाहिले आहे.

कोणीतरी कधीतरी असे म्हणेल कि ‘मी नास्तिक आहे’, पण त्यांचे असे म्हणणे 
अनेक वेळा अगदी वरवरचे असते. त्यांना मनात खोलवर अशी जाणीव असते कि 
त्यांच्या मर्यादित ज्ञानाच्या पलीकडे पण खरेच काहीतरी आहे. अशा लोकांना हळूहळू 
आणि निश्चितपणे अध्यात्माचे महत्व समजायला लागते. खरे पाहता त्यावेळी संस्था 
सुरु करायला मी फारसा उत्सुक नव्हतो. काही लोकांनी मला संस्था सुरु करायला 
स्फूर्ती आणि समर्थन दिले, त्यात प्रामुख्याने पिताजी ( गुरुदेवांच्या वडिलांचे प्रेमाने 
घेतलेले नाव) , न्यायाधीश कृष्णय्या, न्यायाधीश भगवती, श्रीयुत लक्ष्मण राव जे 
त्यावेळी बंगलोरचे महापौर होते, आणि श्रीयुत नरसिंह राव जे त्यावेळी कर्नाटका 
राज्याचे प्रधान सचिव होते. हे पांच लोक मला असे म्हणाले कि “ नाही, तुम्ही 
हि संस्था सुरु केलीच पाहिजे”. ३३ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी संस्थेची नोंदणी झाली. 

अश्यातऱ्हेने ह्या आश्रमाने आपल्या अस्तित्वाची ३३ वर्षे पूर्ण केली. त्या काळात आश्रम 
आज आहे तसा नव्हता. त्या सुरवातीच्या काळात खोल्या आणि रहायच्या वसाहती या 
भुस्सा आणि चिखलापासून शाकारुन बनवलेल्या असायच्या.त्याकाळी सिमेंट वापरून 
केलेले एकही पक्के घर नव्हते तर प्रत्येकाने झोपड्या बनवल्या होत्या. पण आजचा 
बदल पहा. आज प्रत्येकजण सिमेंटने बनविलेले भक्कम घर बनवीत असतो. त्याकाळी, 
पावसाळ्यात त्या भूश्याच्या छपरातून पाणी गळायचे. मला नेहमी साधेपणा आवडतो. 
मी नेहमी लोकांना जुन्याकाळाप्रमाणे नारळाचा काथ्या आणि गवतापासून बनविलेली 
घरे बांधा असे सांगत असे. त्यावेळी माझ्याबरोबर सुमारे १०० ते २०० लोक होते. 
त्यापैकी काही आजपण येथे बसले आहेत. आम्ही विहिरीतून पाणी भरायचो आणि 
जनित्रातून आश्रमाला दिव्यांसाठी वीज पुरवठा होत असे. त्याकाळी फक्त एक किंवा 
दोन तास वीज पुरवठा व्हायचा. त्याकाळी खूप पाऊस असायचा आणि वारे पण
इतके जोरदार असत कि सर्वकाही उडून जात असे. तेंव्हा आम्ही असे ठरविले कि 
आता पक्की घरे बांधायला पाहिजेत. परदेशातून अनेक लोक मला भेटायला येऊ 
लागले. त्यापैकी एक जण मला म्हणाला, “गुरुदेव, हल्ली आश्रमात येणाऱ्या 
भक्तांची संख्या वाढायला लागली आहे. या सर्वांना सामावून घेईल अशा एका 
मोठे सभागृह बांधण्याची गरज आहे. ते फार काळ या झोपड्या आणि तंबूत 
राहू शकणार नाहीत.”

मी त्यांच्याशी सहमती दाखवून त्यांना बांधकाम सुरु करायला सांगितले. मी स्वतः 
या सभागृहाची रचना तयार करून त्यांना सूचना दिल्या. ते ध्यानाचे सभागृह म्हणजे 
आज तुम्ही बसला आहात तो विशालाक्षी मंडप होय.

त्यानंतर १०-१५ वर्षांनी, अधिक आणि अधिक भक्कम घरे बांधायला सुरवात झाली. 
मग मी त्यांना म्हणालो, आपण जर आपल्यासाठी पक्की घरे बांधत आहोत तर 
आपण आजूबाजूच्या खेड्यातील आणि आसपासच्या लोकांना पक्की घरे बांधायला 
मदत केली पाहिजे. माझ्याजवळ त्यावेळी जे भक्त होते त्यांना मी सांगितले कि 
जर येथे (जवळपास) राहणाऱ्या सर्वांना जर पक्की घरे मिळणार असतील तर मी 
ती तशी घरे आश्रमात बांधायला परवानगी देईन. त्या सर्वांनी एकत्र येऊन आश्रमाच्या 
आसपास सर्वांना पक्की घरे मिळतील याची व्यवस्था केली. प्रत्येक घरात एक 
शौचालय आहे. आश्रमाच्या मागील परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी एक वसाहत 
बांधली. त्याआधी ते झोपड्यात राहत होते. त्यामुळे लोकांच्या राहण्याच्या 
परिस्थितीत सुधारणा झाली.     


अपराधीपणाला थारा नाही

13
2014
Nov
बंगलोर, भारत.

प्रश्न: गुरुदेव, मागची अनेक वर्ष मी शिक्षक आहे. मी जेंव्हा स्वतः कडे आणि 
बाकीच्या शिक्षकांकडे बघतो तेंव्हा असे लक्षात येते कि आम्ही मुलभूत प्रशिक्षणातील 
काही अभ्यास स्वतः करत नाही आणि मग जेंव्हा मी मुलभूत प्रशिक्षणचा अभ्यासक्रम 
दुसऱ्यांना शिकवत असतो तेंव्हा मला आपण स्वतः न करता इतरांना शिकवितो 
त्यामुळे अपराधीपणा जाणवतो. काय करावे?

श्री श्री : तुम्हाला अपराधी वाटते आहे हे चांगले आहे. हे एक सुरक्षा द्वार आहे. 
तुम्ही जर विसराळूपणामुळे तुमच्या प्रशिक्षणाचा सराव करीत नाही तर तो एक खरा 
प्रश्नच आहे. जेंव्हा तुम्हाला तुमच्यातील कमीपणाबद्धल जाणीव होते तेंव्हा तुम्ही 
सुरक्षित असता.

तुम्ही धोकेबाज आहात असा विचार करू नका. तुम्ही या मार्गावरील एक वाटसरू 
असून तुमच्या मागून येणाऱ्या लोकांना तुम्ही मार्गदर्शन करीत आहात. यामुळे 
तुमच्यात विनम्रता येऊन ज्ञान हे अमूल्य आहे असे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही 
जरी १००% अनुसरण करत नसाल पण यामुळे तुमचे आयुष्य बदलले आहे हे तुम्ही 
नाकारू शकत नाही आणि तुम्ही सुमारे ८०% अनुसरण करीत आहात. म्हणून तुम्ही 
जरी प्रशिक्षणातील सर्व मुद्दे किंवा ज्ञान १००% अनुसरीत नसाल तरी तुम्ही जे ८०% 
अनुसरीत आहात त्याकडे लक्ष द्या. असे पण अनेक लोक आहेत कि ज्यांना काहीच 
समजले नाही, किंवा त्यांनी अजून या मार्गावर प्रवास सुरु केला नाही. त्यांना तुमची 
खरोखरच मदत होऊ शकते.

तुम्ही स्वतःला पाखंडी समजायची गरज नाहीये कारण जेंव्हा तुम्ही दुसऱ्याला शिकवत 
असता तेंव्हा तुम्ही पण ते शिकत असता. दुसऱ्याला शिकवताना तुम्ही स्वतः शिकून 
ज्ञान घासून पक्के करीत असता. नुसते बसून स्वतःला आणि दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा 
तुम्ही परत शिकवायला सुरवात करणे बरे. नाहीतर तुम्ही नुसते बसून स्वतःला दोष 
देत बसाल , ‘ मी कमकुवत आहे, मी ज्ञानाचे अनुसरण करू शकत नाही, मी 
वाईट आहे’ आणि मग स्वतःला अपराधी ठरवून दोषी समजू लागाल. अध्यात्मिक 
मार्गावर असताना घडू शकणारी हि सर्वात वाईट गोष्ट आहे. म्हणून अध्यात्मिक 
मार्गावर असताना तुम्हाला नेहमी गुरूची गरज असते. तुम्ही तुमचा कमकुवतपणा 
गुरूजवळ सोडून तुमच्या शक्तीनुसार या मार्गावर जेवढे जाता येईल तेवढे चालत 
राहायचे असते. तेंव्हा तुम्ही स्वतःच्या बाबतीत एवढे कठोर होऊ नका आणि त्याच 
वेळी असे लक्षात घ्या कि जरी तुम्ही सर्व ज्ञान आचरणात आणू शकत नाही पण ते 
सर्व ज्ञान आचरणात आणण्याचा तुमचा इरादा आहे हे चांगले आहे.

तुम्ही या मार्गावर चालत रहा. या मार्गावर भरकटून स्वतःला दोष देऊ नका. तुम्हाला 
तसे वाटत असेल तर या पुढील प्रगत अभ्यासक्रम किंवा आशीर्वाद अभ्यासक्रम करा, 
त्याने ते सर्व धुतले जाईल कारण , हे आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे आणि जो 
पर्यंत तुम्ही परिपूर्ण होत नाही तो पर्यंत चालत रहा. आणि हळूहळू स्थिरपणे तुम्हाला 
ते निश्चित साध्य होईल.

मागे वळून पहा आणि विश्लेषण करा. समजा तुम्ही आयुष्यात कोणताही मुद्दा 
अभ्यासला नसता तर आजे तुम्ही कोठे असता? ते तसे झाले असते तर ते खूप 
भयानक झाले असते हे लक्षात घेऊन पुढे चालत राहा. तुमच्यातला जो कमीपणा 
आहे तो माझ्यापाशी सोडा.

प्रश्न: गुरुदेव, अनेक गुरु आणि संत यांनी भारताच्या पुनर्निर्माणाचे गरजेविषयी 
सांगितले आहे. असे वाटते कि या नवीन सरकारबरोबरच ती वेळ पण आली आहे. 
हे पुनर्निर्माण कोणत्या स्वरुपात व्हावे?

श्री श्री : काही वर्षांपूर्वी हे पुनर्निर्माण सुरु झाले आहे. लोक आता जागे झाले 
आहेत आणि त्याला आवश्यक असलेल्या उत्साहाने आणि वेगाने ते चालू राहिले 
पाहिजे. त्यासाठी सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी खूप सावध, जागृत राहून या 
पुनर्निर्माण प्रक्रियेला पाठींबा द्यायला पाहिजे. माझी खात्री आहे कि ते तसे करतील. 
त्यातील बरेचजण तसे करतील.

प्रश्न: गुरुदेव, प्रेम कसे अबाधित राहू शकते? मला कधी प्रेमाची अनुभूती होते तर 
कधी अजिबातच होत नाही ?

श्री श्री : होय, प्रेम ही एक भेट आहे, म्हणून जेंव्हा त्याची अनुभूती होते तेंव्हा 
कृतज्ञ होता आणि जेंव्हा त्याची अनुभूती होत नाही तेंव्हा त्याची आस लागून 
तुमच्याकडून एखादी प्रार्थना म्हटली जाईल, एखादी कविता केली जाईल. फक्त 
प्रेमातूनच कविता निर्माण होते असे नाही तर जेंव्हा त्याची आस लागलेली असते 
तेंव्हा कविता निर्माण होते, प्रार्थना निर्माण होतात आणि अनेक चमत्कार पण घडू 
शकतात तेंव्हा त्याचा आस्वाद घ्या.

प्रश्न: गुरुदेव, येझदीना एवढा त्रास का सहन करावा लागत आहे? ते त्या काळात 
हिटलरच्या छळ छावण्यांचे सुरक्षा-रक्षक  म्हणून त्यांना आत्ता हे सहन करायला 
लागत आहे? कोणी काही केलेले नसताना त्यांना ही पिडा का सहन करायला लागत 
आहे?

श्री श्री : खरे पाहता या प्रश्नाला काही उत्तर नाही कारण ते आपल्या समजुतीच्या 
पलीकडे असलेल्या कोणत्यातरी गोष्टीशी निगडीत आहे. नुसते बसून ते का त्रासात 
आहेत असा विचार करण्यापेक्षा आपण त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. ते असा 
त्रास का सहन करीत आहेत याचे उत्तर शोधण्यापेक्षा आपण त्यांच्यासाठी काय करू 
शकतो याचा विचार करूयात. 

कुर्दिस्तानमध्ये त्यांनी अन्नधान्य आणि इतर सामुग्री सुमारे ११० टन जमा केली आहे. 
सिंजर पर्वताच्या परिसरात अडकलेल्या लोकांसाठी आम्ही हे विमानाने पोहोचवायची 
व्यवस्था करीत आहोत. तेथे सुमारे ९५०० लोक अडकलेले आहेत. आमची 
आर्ट ऑफ लिविंग ही व्यवस्था करीत आहे. ज्यांना कोणाला मदत करायची इच्छा असेल 
त्यांनी संपर्क करावा. आपण त्यांना कशी मदत करू शकतो ते पाहूयात. त्यांच्या या 
त्रासाबद्धल लोकांमध्ये जागरूकता करायची गरज आहे. 
 
मध्य-युगात पारशी लोकांची अशीच अवस्था झाली होती. त्यांना इराण मधून 
हुसकावून लावण्यात आले. ते छोट्या होड्यांमधून गुजरातच्या किनाऱ्यावर उतरले 
तेंव्हा तेथील राजाने त्यांना आश्रय दिला. भारतातील लोक दयाळू होते, त्यांनी 
पारशी लोकांना त्यांच्या धर्माप्रमाणे आचरण करायला आणि त्यांच्या परंपरा पाळायला 
परवानगी दिली. भारताची एक जुनी परंपरा अशी आहे कि ज्यांच्या अस्तित्वाला धोका 
आहे त्यांचे संरक्षण करणे.त्याचप्रमाणे भारतात आलेल्या ज्यू लोकांना पण संरक्षण 
दिले गेले.

आज येझदी लोक संकटात आहेत आणि म्हणून आर्ट ऑफ लिविंग त्यांना स्वतःच्या 
हक्कांचे संरक्षण करायला मदत करून या परिस्थितीतून आणि संकटातून बाहेर 
पडायला मदत करीत आहे.
प्रश्न: गुरुदेव, गुरु बरोबरचे नाते हे चिरकालीन, अनेक जन्म टिकणारे असते काय? 
अनेक जन्मांमध्ये आपण एकाच गुरूबरोबर असतो काय?

श्री श्री : तुमचा प्रवास एकाच आयुष्यात संपवावा असे तुम्हाला का वाटत नाही? 
तुम्ही तो पुढे का ढकलीत आहात? मला कोंडीत पकडण्यासाठी तुम्ही असा अवघड 
प्रश्न विचारीत आहात. तुमचे काम तुम्ही या जन्मातच व्यवस्थित करा आणि 
‘पुढच्या जन्मात पण मला संधी मिळेल’ असा विचार करून ते पुढे ढकलू नका. 
पुढच्या जन्मात तुम्ही कोण असाल काय माहित, कदाचित गोठ्यातील एक गाय असाल. 
म्हणून पुढच्या जन्मापर्यंत ते पुढे ढकलू नका. मी अधून मधून असू शकतो. कदाचित 
तुम्हाला अनेक जन्म घ्यावे लागतील.

प्रश्न: गुरुदेव, प्रेम मिळवणे हे वेदनादायी आहे, प्रेम मिळाले नाही तर ते जास्त 
वेदनादायी आहे आणि प्रेमाचा सांभाळ करणे हे पण वेदनादायी आहे. यातल्या कोणत्या 
वेदनेचा मी स्वीकार करू?

श्री श्री : इच्छा तुमची, आशीर्वाद माझे. तुम्ही जर वेदनेचा स्वीकार करणार असाल 
तर तुमचे स्वागतच आहे, पण मी तुम्हाला सांगतो कि मोठ्या वेदनेचा स्वीकार करा 
कारण छोट्या वेदना काही कामाच्या नाहीत. संपूर्ण मानवतेच्या प्रेमाचा तुम्ही विचार 
करायला पाहिजे. ग्रहांविषयी प्रेम, प्राण्यांविषयी प्रेम , प्राण्यांचे अधिकार (प्राण्यांना 
पण जगण्याचा अधिकार आहे). त्यांचा जीव घ्यायचा आपल्याला कोणताही अधिकार 
नाही. या सगळ्याविषयी तुम्हाला काळजी वाटली पाहिजे.

शेळीच्या डोळ्यात पहा, किंवा अगदी कोंबड्या, गाई, कुत्र्यांच्या सुद्धा. त्यांच्या 
डोळ्यात बघा. या सर्व विश्व-रचनेमध्ये प्रेम भरून राहिले आहे, आणि आपल्या 
पोटाची खळगी भरण्यासाठी लोक त्यांचा बळी कसा घेऊ शकतात? ते आरोग्यदायी 
पण नाही. हे फार दुर्दैवी आहे.

प्रश्न: गुरुदेव, मागच्या पांच वर्षात आश्रम हा एखाद्या किल्ल्यासारखा झाला आहे. 
आजच्यापेक्षा पूर्वी येथे शांतता मिळणे जास्त सोपे होते.
श्री श्री : वर्तमान क्षणात राहून ज्ञान ऐका. पूर्वीच्या काळी कमी लोक असतील. 
आज खूप जास्ती लोक आहेत. जेंव्हा जास्ती लोक असतात, तेंव्हा तुम्हाला तुमचे 
ज्ञान, शहाणपण जास्त लोकांबरोबर वाटता येते, आणि सहनशीलता वाढविता येते. 
३० वर्ष जुन्या गोष्टीबरोबर चिकटून राहणे बरोबर नाही. ३० वर्षापूर्वी तुमचा संवाद 
हा १० लोकांबरोबर होत असे. आज तुम्हाला कदाचित १००० लोकांबरोबर संवाद 
करावा लागेल. वाढत्या काळाबरोबर आपण आपला आवाका वाढवायला पाहिजे आणि 
कोशामध्ये गुरफटून जाता कामा नये.

“वसुधैव कुटुंबकम” असे आपण म्हणतो. संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे असे आपण 
मान्य केले आहे. तुम्ही या संकल्पनेशी जुळवून घ्यायला पाहिजे. कोणाशीही आणि 
सर्वांशी नाळ जुळली पाहिजे. तुमच्यासाठी काय आरामदायी आहे आणि काय आरामदायी 
नाही याचा विचार करू नका. तुम्ही तुमच्या आराम कोशातून बाहेर पडून इतरांना 
आरामशीर कसे वाटेल हे बघायला पाहिजे.

हे महत्वाचे आहे.

किती लोक तुमच्याबरोबर कसे सहजपणे वागत आहेत ते पहा. तुम्ही किती 
लोकांच्याबरोबर सहजपणे आनंदी आणि आरामशीर राहू शकता याचा आढावा घ्याल काय? 
तुम्हाला जर लोक आवडत नसतील तर तुमच्या असे लक्षात येईल कि तुम्ही स्वतः 
मित्रता-पूर्ण असण्याची शक्यता नाही.

जसा आपला विस्तार होतो, आपण वेगवेगळ्या स्वभावाच्या आणि जगातील 
वेगवेगळ्या भागातील लोकांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होतात. काही वेळा आपल्या 
राज्यातील, देशातील किंवा धर्मातील लोकांबरोबर मैत्रीपूर्ण असतो. येथे तुम्हाला 
सर्वांशी मिळून मिसळून राहावे लागते. येथे वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत हिंदू, 
ख्रिश्चन, मुस्लीम, शीख. भारतातील प्रत्येक राज्यातील,  पुर्वोतर ते केरळ, 
जम्मू काश्मीर ते तामिळनाडू असे सर्वराज्यातील लोक येथे आले आहेत. जगातल्या 
सर्व भागातील लोक अगदी वेगवेगळे आचार-विचार आणि खाण्याच्या सवयी असलेले 
आहेत. म्हणून तुम्ही त्यांना सहजपणे आपलेसे केले पाहिजे. तुम्हाला स्वतःला पुरेशी 
शांती मिळाली आहे आता तुम्ही दुसऱ्यांना शांती कशी मिळेल हे बघा.      
 
    
 
  

तुमच्या जागरूकतेची कक्षा रुंद करा

12
2014
Nov
बेंगळूरु, भारत

(“सत्य हे काळाच्या कसोटीवर खरे उतरते” याचा उत्तरार्ध खालीलप्रमाणे)
प्रश्न : गुरुदेव, कधी कधी ज्ञान लक्षात ठेवणे हेसुद्धा एक बोजा बनते. अशा 
वेळेस मनन ( पुन्हा पुन्हा सतत विचार) करून मिळालेले ज्ञान आम्ही 
निधीध्यासाकडे (ज्ञानाबरोबर संपूर्णपणे एकरूप होण्याकडे) कसे नेऊ शकतो?
 
श्री श्री : हा प्रश्न विचारूनसुद्धा तुम्ही तुमचा बोजा का वाढवता आहात? 
(हशा) निश्चिंत राहा आणि काही काळ मौन धरा. 
मनाला त्याच्या सीमित आकलनशक्ती आणि संकल्पना यांच्याकडून परिवहन 
करून जागरूकतेच्या रुंदावलेल्या अवस्थेकडे नेणे हे ज्ञानाचे ध्येय आहे. मनाला 
एकमत करून ‘हो!’ म्हणायला लावणे हे ज्ञानाचे ध्येय आहे.
जेव्हा तुम्ही ज्ञान ऐकता तेव्हा मन सर्वप्रथम ‘अरे हो!’ म्हणते आणि मग हळू 
हळू मन रुंदावते आणि मौन होते. मग तुम्ही ‘ते आहे’ असे म्हणता.
तुम्हाला ‘हो’ म्हणायला लावणे हे बुद्धीचे काम आहे. जेव्हा विचारशक्ती विश्राम 
करते आणि ज्ञानाबरोबर एकमत होते तेव्हा तुमच्यात रुंदावलेल्या जागरूकतेचा 
उदय होतो आणि तुम्ही इतर काही नसून केवळ चैतन्य आहात ही तुमच्या 
खऱ्या अस्तित्वाबद्दलची जाणीव तुम्हाला होते.
या अवस्थेपासून तुम्ही अजून पुढे प्रगती करता आणि तुम्हाला समजते की फक्त 
आत्माच सगळीकडे आहे. तुम्हाला जाणवते की जे काही ते सगळे केवळ 
आत्माच आहे.
तर तुम्ही व्यक्तिगत चैतन्याच्या अवस्थेकडून म्हणजेच मीपणा कडून सगळेकाही 
केवळ तेच आहे ही रुंदावलेली अवस्था जाणवण्याकडे जाता.
ज्ञानामुळे आपली जागरुकता या ओघाने रुंदावते.
 
प्रश्न : गुरुदेव,जर आम्ही अद्वैत ज्ञानाचे पालन करीत असू तर आम्ही देवी 
आणि देवता यांच्यावर आमची श्रद्धा कशी ठेवावी?
 
श्री श्री : सगळे काही एकाच प्रकाशाने बनलेले आहे व त्यानेच प्रकाशित आहे हे 
माहित असणे म्हणजे अद्वैत. (इथे एक दिव्यत्व किंवा एक परम चैतन्य याचा 
उल्लेख आहे)
निरनिराळ्या देवी देवतांची पूजा आणि सन्मान करणे हे त्याचप्रमाणे आहे 
ज्याप्रमाणे वेगवेगळ्या रंगांचे आणि ध्वनीलहरींचे अनेक प्रकाश मिसळून एक शुभ्र 
प्रकाश बनतो हे समजणे आणि व्यक्त करणे आहे. सूर्याची सर्व किरणे समान प्रकाशच 
देतात. ते सर्व एकाच उगमस्थानाकडून येतात, पण तुम्ही प्रकाशाच्या किरणला जेव्हा 
काचेच्या लोलकातून किंवा पाण्याच्या एका थेंबातून जाताना पाहाल तर तो विविध 
रंगात विभाजल्या जातो. तर हे विविध किरण म्हणजे निरनिराळे देवी आणि देवता 
असा विचार करा. 
सरतेशेवटी या दोन्हीमधील एकता तुम्हाला दिसून येईल, आणि (द्वैताच्या पलीकडे 
एका चैतन्याकडे जाणे )हे करणे बुद्धीचे कार्य आहे. म्हणूनच आपल्या ग्रंथांमध्ये 
आपण असे म्हणतो, ‘हे खरे आहे आणि तेसुद्धा खरे आहे!’
उदाहरणार्थ, जेव्हा आपण या खोलीतील फर्निचर बघतो तर आपण म्हणतो की हे 
सर्व लाकडापासून बनलेले आहे. त्याचवेळी दरवाजा हे खुर्ची नाही, आणि खुर्ची हे 
खिडकी नाही जरी ते एकाच लाकडापासून बनलेले असले तरीसुद्धा. हे समजण्याला 
द्वैत म्हणतात.
म्हणून, अद्वैत आणि द्वैत  हे एकोप्याने एकत्र अस्तित्वात आहेत.
 
प्रश्न : गुरुदेव, आम्ही काशीबद्दल (आधुनिक भारतातील वाराणसी हे शहर) 
चर्चा करीत होतो. असे म्हणतात की जर कोणी अखेरचा श्वास काशीमध्ये घेतला 
किंवा त्यांच्या मृतदेहाची राख जर गंगा नदीत विसर्जन केली तर त्यांच्या 
आत्म्याला मुक्ती मिळते. हे कितपत खरे आहे?
 
श्री श्री : नाही, असे अजिबात नाहीये. काशीला वाराणसी असेसुद्धा संबोधितात, 
आणि हे नाव पडले आहे ते वरुणा आणि असी या दोन नद्यांच्या संगमाचे स्थान 
असलेल्यामुळे. 
काशी ही खरे पाहता बाहेर नाही तर ती आपल्या आतच आहे. अज्ञा चक्र (मानवी 
शरीरातील अतींद्रिय उर्जेचे सहावे केंद्र) हा ईदा, पिंगला आणि सुषुम्ना या नाड्यांचे 
(मानवी शरीरातील उर्जेच्या मार्गांचे) एका ठिकाणी मिळण्याचा बिंदू आहे. म्हणून 
ज्याचे प्राण हे अखेरीस सुषुम्ना नाडीमधून वाहतात त्यालाच मुक्ती प्राप्त होते 
(भौतिक जगाच्या द्वैतापासून मुक्त होऊन दिव्यत्वाबरोबर एकरूप होणे).
याचा तुम्ही असा समज करून घेऊ नका की मोक्ष मिळवण्याकरिता प्रत्येकाने काशीलाच 
मृत्यू पावले पाहिजे
वास्तविक काशी कोठे आहे? कपाळावर भुवयांच्या मधील भाग, अज्ञा चक्राचे क्षेत्र- हे 
वरुणा (ईदा नाडीचे प्रातिनिधिक) आणि असी (पिंगला नाडीचे प्रातिनिधिक) यांच्या 
संगमाचा बिंदू आहे. म्हणून मृत्युसमयी जर या क्षेत्रावर प्राण निश्चलपणे प्रस्थापित 
केले तर मोक्ष प्राप्ती होते. या आख्यायिकांचा हा खरा अर्थ आहे.
काशी शहरासोबत अजून एक अर्थ जोडलेला आहे. काशी म्हणजे जे ज्ञानाने ओसंडून 
वाहत आहे. प्राचीन काळी, ती ज्ञान आणि शिक्षणाचे मोठे अधिष्ठान होते. त्याकाळी 
या महान नगरीच्या गल्लोगल्ली पंडित होते जे धर्मग्रंथांवर विवाद करायचे आणि त्यांचा 
अर्थ समजवायचे. लोक ज्ञान आणि धर्मग्रंथांवर चर्चा करायचे.
आज गंगा नदीच्या किनाऱ्यावर बसून लोक जसे पत्ते खेळतात तसे पूर्वीच्या काळी 
खेळत नसत. आज आहे तशी नदी तेव्हा घाण नव्हती. त्याकाळी शहरात मांसाहारी 
अन्न ग्रहण केल्या जायचे नाही किंवा गायींची कत्तल व्हायची नाही. त्या काळी 
काशी शहर हे ज्ञानाने ओसंडू वाहणारे आणि प्रत्येक गल्लोगल्ली बौद्धिके यासाठी प्रसिद्ध 
होते. असे म्हणतात की शहर ज्ञानाने इतके संपन्न होते की पोपट आणि मैनासुद्धा 
ज्ञानावर चर्चा करायचे. म्हणून जो अश्या ज्ञानी आणि साक्षात्कारी लोकांच्या संगतीत 
बसतो त्याला केवळ ज्ञान ऐकण्याने मोक्ष प्राप्त होतो.
तुम्ही इथे गेल्या तीन किंवा चार दिवसापासून बसत आहात. तुम्हाला उन्नत आणि 
आनंदी वाटत नाहीये का? येथील वातावरण फार निराळे आहे. प्रत्येकजण आनंदी आहे, 
ते ध्यान धरत आहेत आणि सेवा करण्यात मग्न आहेत. म्हणून अशा जागा जिथे 
लोक हे सर्व पाळत आहेत त्या नैसर्गिकपणे ज्ञानाचे केंद्र बनतात. म्हणूनच 
काशीबद्दल अश्या सर्व गोष्टी बोलल्या जातात.
याचा असा अर्थ नाही की जे लोक इतर ठिकाणी मृत्यू पावतात त्यांना मोक्ष मिळत 
नाही. कर्नाटकात मृत्यू पावणाऱ्या बऱ्याच लोकांनासुद्धा मोक्ष मिळतो. (हशा ).
दीर्घ कालावधीपासून काशीला महत्व प्राप्त झाले आहे कारण ते नेहमीच ज्ञान आणि 
बुद्धिमान लोकांचे केंद्र होते. जगभरातून विद्वान काशीला यायचे ते ज्ञानाच्या शोधात 
आणि ज्ञानावर चर्चा करण्यास, अशी तिची कीर्ती होती. परंतु आज तुम्हाला केवळ 
१५-२० असे लोक सापडतील ज्यांना अस्सल गहन आवड आणि ज्ञान आहे. अशी 
दुर्दैवी अवस्था आज या नगरीची आहे. मला हे पाहून फार दुःख होते.
जेव्हा मी तरुण मुलगा होतो, मला आठवते की त्याकाळी अनेक नामांकित विद्वान 
होते. आज फार थोडे खरेखुरे विद्वान आहेत.
प्रश्न : गुरुदेव, आपल्या देशात ३३,००० कत्तलखाने आहेत आणि दररोज 
जवळ जवळ एक लाख गायींची कत्तल केल्या जाते त्यांचे मांस व कातडीसाठी. 
गायींचा बचाव आणि संरक्षण करण्यासाठी आम्ही काय करू शकतो यासाठी कृपा 
करून आम्हाला मार्गदर्शन करा.
 
श्री श्री : होय, गायींचा बचाव करणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे. याबाबतीत 
मीसुद्धा खूपच चिंतीत आहे. जर आपल्याला आपल्या देशाच्या सांस्कृतिक वारश्याचा 
बचाव आणि संरक्षण करायचे असेल तर गायींचा बचाव करण्यासाठी जे शक्य आहे 
ते सर्व काही आपण करणे अतिशय जरुरी आहे.
तुम्ही गावोगावी गेले पाहिजे आणि तेथील लोकांना देशी भारतीय गायींचा बचाव 
करण्याचे शिक्षण दिले पाहिजे. गायी जरी दुध देत नसतील तरी गोमुत्र हे लागवड 
केलेला मळा आणि शेत यात वापरता येईल. खरे तर गोमुत्राचे संकेंद्रीकरण करून 
त्याचा खत म्हणून वापर करणे शेतकऱ्यांना शिकवले पाहिजे. 

तुम्हाला माहिती आहे, एक एकर जमिनीला खतावण्यासाठी केवळ एक गाय बस 
आहे. आपण शेतकऱ्यांना कृत्रिम रासायनिक खाते विकत घेण्यापासून थांबवले पाहिजे. 
खत विकत घेण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या एक तृतीयांश पैसे खर्च करून गाय विकत 
घेता येईल जिला तुम्ही वाढवू शकाल आणि ठेवून घेऊ शकाल आणि तुमचे शेत 
अतिशय निरोगी शेत असेल जे उत्तम पिक देईल.
 
प्रश्न : काश्मीर समस्येसाठी काय उपाय आहे? गेली ५० वर्षे शांततेच्या वाटाघाटी 
फोल ठरल्या आहेत. भगवान कृष्णानेसुद्धा सत्याकरिता युद्ध केले. काश्मीरची 
समस्या हा काय अहंकाराचा मुद्दा झाली आहे का?
 
श्री श्री : नोंद केलेल्या जागतिक इतिहासानुसार, जग केवळ २८८ वर्षे शांत होते. 
हे काळाच्या केवळ ८% आहे! असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. याचा अर्थ असा 
की तंटे हे कायम होतेच.
भारत-पाक समस्येकरिता लोकांचा एकमेकांबरोबर संपर्क होणे जरुरी आहे. या 
मार्गानेच पुढे जाणे शक्य आहे. ज्या अतिरेक्यांना त्यांनी भारताविरुद्ध प्रशिक्षण 
दिले तेच आता त्यांच्या विरोधात कार्य करत आहेत. त्यांना हे समजायला हवे. 
त्यांनी हे डावपेच सोडून द्यायला हवेत आणि मंडळावर येऊन त्यांनी दक्षिण 
आशियाला गरिबीमुक्त केले पाहिजे. त्यांनी गरीबीविरुद्ध लढा पुकारला पाहिजे, 
भारताविरुद्ध नव्हे. भारत आणि पाकिस्तान यांनी गरीबी-निर्मूलनासाठी एकत्रितपणे 
कार्य केले पाहिजे.
आज जर तुम्ही काश्मिरी लोकांना सांगाल, ‘ज्यांना पाहिजे त्यांनी पाकिस्तानात 
जावे’, तर कोणीही जाणार नाही. त्यांना माहिती आहे की त्याबाजुच्या काश्मीरमध्ये 
लोक खुश नाही आहेत. तेथील लोक हे भारतीय काश्मिरींपेक्षा गरीब आहेत.
मुक्त काश्मिऱ्यांनी साधे बिछानेसुद्धा पाहिलेले नाहीयेत. त्यांना वातानुकूलन, 
जेवणाचे टेबल किंवा खुर्च्या म्हणजे काय हे माहित नाही. ते अतिशय गरिबीत 
आहेत. जेव्हा ते इथे येतात आणि येथील लोकांना पाहतात तेव्हा ते म्हणतात की 
हे खरोखर निराळेच आहे.

श्रद्धेतून शक्ती मिळवणे

14
2014
Oct
क्यूबेक आश्रम कॅनडा
  

प्रश्न : श्रद्धा कशी वाढवता येईल ? कां ती उपजतच असते ? 
श्री श्री : श्रद्धा वाढवता येत नाही. तुम्ही फक्त तुमच्या शंका लक्षात घ्या 
आणि त्यां सोडून द्या. तुम्ही तुमच्या शंका टाकून दिल्या की श्रद्धा असतेच. 
शंका म्हणजे मनावर आलेले मळभ असते. जागे व्हा आणि लक्षात घ्या, 
‘शंका म्हणजे काय ? शंका म्हणजे स्वत:ला खाली पाडणे, आणि जडत्व 
निर्माण करून घेणे. जे भूतकाळात अनेकदा तुम्ही अनुभवले आहे. मग 
तुम्ही जागे होता. आणि जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा श्रद्धा असतेच. 

श्रद्धा वाढवता येत नाही पण शंकांपासून सुटका कारण घेता येते. 
शंका निरसन करण्याला काही अंत नाही. तुम्ही कधीही शंका निरसन करण्याच्या 
फंदात पडू नका, कारण एका शंकेचे निरसन झाले की आणखी दहा शंका निर्माण 
होतात. फक्त त्याबद्दल सजग व्हा, ‘ह्याच्यामुळे माझे ओझे वाढते आहे’ आणि 
ते टाकून द्या. ते झटकून टाकले की तुम्ही तुमच्यातील अशा एका ठिकाणी येऊन 
पोहोचता जी शक्ती आहे, सत्य आहे, धैर्य आहे. त्यालाच श्रद्धा म्हणतात. 

तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा तुमच्या मनात शंका असते तेव्हा तुम्ही 
दुर्बल बनता. जेव्हा तुमच्यात श्रद्धा असते तेव्हा तुम्हाला आतून अद्र्ष्य असे बळ  
मिळते. त्यामुळे शक्तिशाली आणि धैर्यशील वाटू द्यायचे की दुर्बल ते तुमच्यावर 
आहे. 

शंका या नेहमी चांगल्या गोष्टीबद्दल असतात. काही वाईट किंवा नकारात्मक 
असेल त्यावर आपण कधी शंका घेत नाही. जे चांगले असेल त्यावरच आपण शंका 
घेतो. ही एक जाणीव ठेवणे, तुमच्यातील  शंका झटकून टाकायला पुरेसे आहे.   

प्रश्न : प्रिय गुरुदेव : मी कृपया तंत्र साधना करू कां ? तुमची काही हरकत 
नाही नां ? मी दश महाविद्यांपैकी एक साधना करत आहे. 
श्री श्री : हे बघा, दश महाविद्या जाणणारे फार लोक नाहीयेत. त्यामुळे तुम्ही 
ते सर्व करण्याची काही गरज नाही. तुम्ही निवांतपणे एखादा मंत्र जाप ऐका. 
आर्ट ऑफ लिव्हिंगणे बरेच मंत्र जाप प्रसिद्ध केले आहेत ते सर्व त्याचाच भाग 
आहेत. तुम्हला मिळणारे ‘सहज समाधी’ सारखे मंत्र म्हणजे बीज मंत्र आहे. 
ते अप्रतिम आहेत. काही जण म्हणतील की, ते तुम्हाला दश महाविद्यांचे ज्ञान 
प्राप्त करून देतील पण ते फार गुंतागुंतीचे आहे. मी म्हणेन  की तुम्ही दुरुनच 
त्याचा मान राखा. तुम्हाला साधना करण्यासाठी जे दिले गेले आहे ते उत्तम आहे. 
तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही आपल्या केंद्रांमध्ये होत असलेल्या वैदिक 
कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. चाळीस दिवसात तुम्ही याबद्दलची बरीच 
माहिती मिळवू शकता. जर तुम्ही भारतात आलात तर आम्ही ‘उपनयन’ सुद्धा करतो. 
त्यात तुम्हाला मंत्र शिकायला मिळतील. बरेच लोक म्हणतात की, ‘ मी तुम्हाला हे 
ज्ञान देतो, ते ज्ञान देतो’. पण त्याने फक्त गोंधळच वाढेल. 
प्रश्न : योगनिद्रेचा हेतू काय आणि त्याने काय साध्य होते? 
श्री श्री : त्याने छान वाटते, हो की नाडी ? तुम्ही एक एक करून सर्व अवयवांकडे 
लक्ष देता, आणि तुमच्या हे लक्षात येते की शरिर आणि आत्मा कसे वेगळे आहेत. 
तरीही ते एकमेकाशी एकरूप झालेले आहेत. 

प्रश्न : बाहेरून कितीही काबाडकष्ट, हाल अपेष्टा आणि अन्याय असला तरीही 
आतून शांत रहाण्याचे महत्व मला समजते. पण जसा एखादा कार्यकर्ता सर्व विरोधांना 
सामोरा जातो तसे एखाद्या हिंसक कार्यकर्त्याला कसे हाताळायचे? दुसऱ्या शब्दात 
म्हणजे दुर्बलांनी बालवानांवर वरचढ कसे व्हायचे ? 
श्री श्री : आपण जर अस्वस्थ असलो, तर आपल्या कृतीचे फळ मिळणार नाही. 
आपण जेव्हा शांत असतो तेव्हा आपल्यात अंत:प्रेरणेतून विचार येतात आणि या
विचारातून तुम्ही काही योजना आखता आणि त्यानुसार कृती करटा. तुम्हला जर 
एखाद्या कार्यकर्त्याशी एकट्याने लढा द्यायचा असेल तर ते शक्य नाही. तुम्हाला 
जागरूकता निर्माण करून गटाने काम केले तर हे शक्य आहे. त्याचं बरोबर तुमचा 
संकल्प पक्का असू द्या आणि हे लक्षात ठेवा की एक शक्ती तुमच्या पाठीशी आहे 
जी तुम्हाला मार्ग दाखवेल आणि आधार देईल. आठवताय कां, महात्मा गांधी कधी 
कधी एकटेच चालत असत. इतर वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर जागरुकतेची मोठी 
लाट निर्माण करत संपूर्ण खंड हादरवून सोडत, हो की नाही ? आणि ते नियमितपणे 
ध्यान करीत. ते रोज सत्संग करत, भजने वगैरे म्हणत. रो सकाळी ते भगवद्गीता 
वाचत. त्यामुळे महात्मा गांधींकडे एक आध्यात्मिक शक्ती होती. नाही तर त्यांनी जे 
साध्य केले ते त्यांना करता आले नसते.   
 
प्रश्न : सर्व सीमारेषा आणि स्थानिक सरकार नाहीसे करून जग एक होणे गरजेचे 
आहे कां ? 
श्री श्री : नाही, स्थानिक सरकार रद्दबादल करायला नको. ते असू द्यावे आणि 
त्याच्याबरोबर त्यांनी त्यांची दृष्टी व्याप्त करायला हवी. हे बघा, तुम्ही तुमच्या 
कुटुंबाच्या जबाबदाऱ्या झटकून टाकू शकत नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी 
तर घ्यायचीच आहे, त्याच बरोबर तुम्ही तुमचे खेडे, तुमची गाव किंवा तुमचा देश 
यांचीपण काळजी घ्यायला हवी. तुम्ही दोन्ही भूमिका निभावू शकता आणि त्यात काही 
तणाव येण्याचे कारण नाही. 

प्रश्न : माझे धीर धरणे, माझी करुणा, क्षमाशीलता आणि चिकाटी याकडे लोकांनी 
जर माझ्यातले न्यून मानले तर मी काय करावे ? 
श्री श्री : हे बघा, दुसऱ्याने काय विचार करावा किंवा त्यांचा विचार बदलावा हे 
तुमच्या हातात नाही. जर ते असा विचार करत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. 
जर तुम्ही केंद्रित आणि दृढ असाल तर तुम्ही व्यवस्थित असाल. पुढे जात रहा.    

प्रश्न : प्रिय गुरुदेव, मला दिवसातला खूप वेळ आर्ट ऑफ लिव्हिंगसाठी द्यायचा आहे. 
पण मला मुले आहेत आणि मला त्यांनाही वेळ द्यायला हवा. मी काय करू ? 
श्री श्री :  हे बघा, मुले हा अडथळा आहे असे समजू नका. असे बरेच लोक आहेत 
की ज्यांना लहान मुले असूनही त्यांनी प्रचंड काम केले. आपल्याकडे बऱ्याच 
प्रशिक्षकांची लहान मुले आहेत आणि तरीही ते काम करत आहेत. 
जेनिस हे असेच एक उदाहरण आहे. तिला दोन लहान मुले असतानाही तिने बरेच 
काम केले आहे. पोलंड मध्ये आपली आणखी एक प्रशिक्षिका आहे. तिला तीन मुले 
आहेत आणि त्यांच्या बरोबर ती शंभर दोनशे जणांचे कोर्स घ्यायची. 
तर, आपण असा विचार करायची गरज नाही की मुलांमुळे मी काही करू शकत 
नाही. तुम्ही नक्कीच त्यांच्याकडे दुर्लक्षही करू नका. तुम्ही त्यांची काळजी 
घ्यायलाच हवी. मुलांकडे लक्ष द्या पण त्याचं बरोबर तुम्हाला समाजासाठी काही 
करायची इच्छ असेल तर तुम्ही ते करू शकता. त्यासाठी काही वेळ राखून ठेवा. 




सर्व धर्म एकच आहेत

30
2014
Aug
दिल्ली भारत
 

 (शांततेची सुरुवात माझ्यापासून होते या प्रकरणाचा उत्तरार्ध)
काल गणेशोत्सवाची सांगता झाली. लोक वारंवार विचारतात, “नेहमी सर्व 
प्रथम गणपतीची पूजा करून मग त्याचे पाण्यात विसर्जन का करतात?”
तुम्हाला माहिती आहे अशी परंपरा ठेवण्यामागे ॠषींची ओजस्वी कल्पना आहे. 
ते म्हणाले कि या पुजेचा साधासुधा अर्थ आहे की जे काही देव आपल्यासाठी 
करतो, आपणसुद्धा ते त्याला प्रेम  आणि कृतज्ञतापूर्वक करावे. हे म्हणजे देवाबरोबर 
खेळ खेळणे झाले तसेच जसे तो आपल्याबरोबर खेळतो. तर या दैवी खेळाला 
पूजा असे म्हणतात. म्हणून आपण गणपतीच्या मूर्तीसोबत ‘खेळतो’ 
( पूजा-अर्चा करतो) आणि काही काळानंतर मातीची ही मूर्ती पाण्यात विसर्जित 
करतो. ‘हे देवा! तू जो आत्मा बनून माझ्या आत वास करतो, मी प्रार्थना करतो 
की तू काही काळ मूर्तीच्या रूपाने अवतीर्ण हो म्हणजे तू ज्याप्रमाणे प्रेमाने 
माझ्याबरोबर खेळतो त्याप्रमाणे मी तुझ्याबरोबर खेळू शकेन. तुझा उत्सव साजरा 
करण्याची माझी इच्छा आहे’, अशा प्रकारे हे संपूर्ण उपस्कार देवावरचे प्रेम व्यक्त 
करण्याकरिता आहे.
पूजा  संपली की मग आपण देवाला पुन्हा एकदा आपल्या हृदयात खोल 
जावयास सांगतो. आणि नंतर आपण मूर्तीचे पाण्यात विसर्जन करतो.
आज अध्यात्मिक शिक्षणाची गरज आहे. अध्यात्मिक ज्ञान ते आहे जे सर्वांना 
एकत्र जोडते. आजवर अनेक संत झाले आणि त्या सर्वांचे एकच मत होते- 
सर्वकाही एकच आहे.
आदि शंकराचार्य यांनी केलेले गणपती देवाचे वर्णन ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 
ते गातात, “ अजम निर्विकल्पं निराकारं एकं”. याचा अर्थ असा की देव गणपती 
हा निराकार ( आकार रहित ) आहे. म्हणून इथे आदि शंकराचार्य म्हणतात, 
“ हे देवा गणेशा! तू निरंतर, आकाररहित सर्वत्र अगोचर होणारे दैवत्व आहे.” 
ईश्वराचे हेच समान वर्णन तुम्हाला पवित्र कुराणाच्या सुरुवातीलासुद्धा सापडेल. 
आपल्याला आपल्या स्वतःच्या धर्माबद्दल आणि आपल्या धर्मग्रंथांबद्दल इतके थोडे 
माहित आहे हा दुर्दैवी भाग आहे.
जगातील कोणताही धर्म असे शिकवत नाही की तुम्ही दुसऱ्या जीवाला दुःखी 
करावे किंवा इजा करावी. तर मग असे आज का घडते आहे? याचे कारण आहे 
की सगळ्यांना धार्मिक शिक्षण योग्य प्रकारे दिल्या गेले नाही आहे. आज 
अध्यात्मिक शिक्षणाची गरज आहे. अध्यात्मिक शिक्षण ते आहे जे सर्वांना 
एकत्र जोडते. आजवर अनेक संत झाले आणि त्या सर्वांचे एकच मत होते- 
सर्वकाही एकच आहे.
म्हणून इराकी नेत्यांनी आमच्याकडून तीन गोष्टी मागितल्या.
सर्वात पहिली गोष्ट त्यांना पाहिजे होती ती भारतीय अध्यात्मिकता कारण ते 
त्याकडे जोडण्याची आणि सर्वांना प्रेमाने आणि शांततेने एकत्र आणण्याची एक 
अनन्यसाधारण पध्दत म्हणून पाहतात.
दुसरी गोष्ट त्यांनी मागितली ती होती शैक्षणिक क्षेत्रात मदत. ते म्हणाले 
की आय. आय. टी. मध्ये शिकणारे तरुण अतिशय हुशार आणि कुशाग्र आहेत. 
आमच्या तरुणांनासुद्धा आय. आय. टी.मध्ये मिळणाऱ्या चांगल्या प्रशिक्षणासारखे 
असे चांगले तांत्रिक शिक्षण मिळण्यासाठी कृपया मदत करा.
तिसरी गोष्ट जी त्यांनी म्हंटली ती अशी की भारतीय टीमने इराकमध्ये यावे 
आणि त्यांच्या तेलविहिरीतून तेल काढावे. अनेक पाश्च्यमात्य हे काम बऱ्याच 
अवधीपासून करीत आहेत, पण आता आम्हाला भारतीयसुद्धा इथे येऊन आणि 
इथल्या आमच्या देशाच्या तैलसंपदेचा फायदा घेऊन पाहिजे आहेत.
मी तुम्हाला सांगतो की जर सर्व देश जे संरक्षणावर खर्च करीत आहेत त्याच्या 
०.१% जरी खर्च शांतता आणि एकोपा यासाठी करतील तर संपूर्ण जगात बदल 
घडेल. कोणीही घृणा पसंत करीत नाही. पण अनेकदा अजाणतेपणी हे घडते 
किंवा भयामुळे हे घडते,
जर आपल्याला जागतिक शांतता पाहिजे असेल तर आपल्याला आपल्या स्वतःपासून 
सुरुवात केली पाहिजे. एकदा का तुम्ही स्वतःमध्ये असलेल्या दिव्या प्रकाशाला पाहाल, 
मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला कोणीही अनोळखी सापडणार नाही. तुम्हाला वाटेल 
जसे काही सर्वजण तुमचे आप्त आहेत.
एक गोष्ट आहे जी मी तुम्हा सर्वांबरोबर वाटू इच्छितो. आज इथे येण्याअगोदर, 
एकुलते एक दुसरे असे मुस्लिम विश्वविद्यालय आहे जिथे मी भाषण दिले आहे 
आणि ते आहे २०१२ मध्ये लाहोर विश्वविद्यालय, पाकिस्तान. त्या दिवशी हजारो 
युवक तिथे जमा झाले होते. मला आठवते की त्यांनी त्या कार्यक्रमाची तयारी 
अतिशय उत्साहाने केली होती.
तिथेसुद्धा मला विचारण्यात आले होते की भारतामध्ये आपण इतक्या विविध देवी 
आणि देवतांची पूजा का करतो. हे त्यांना समजावण्याकरिता मी एक साधे उदाहरण 
दिले. बघा, गव्हाचे पीठ तेच पण तुम्ही त्याचा हलवा ( शिरा) बनवता, पुऱ्या 
बनवता आणि सामोसा बनवता. हो की नाही? तसेच एकाच पिठापासून तुम्ही 
पिझ्झासुद्धा बनवता आणि नुडल्ससुद्धा. 
आपण असे का करतो? याचे कारण आपल्याला अन्नामध्ये वैविध्य हवे असते.
त्याचप्रमाणे आम्ही भारतात असा नेहमी विश्वास करतो की देव हा एकच आहे परंतु 
आम्ही त्या एका दिव्यत्वाला वेगवेगळ्या पोशाखात सजवतो! (हशा) म्हणून आम्ही 
देवाला वेगवेगळे कपडे घालतो आणि प्रत्येक आकाराला निरनिराळे नाव देतो.
हिंदू धर्मामध्ये देवाची १०८ निरनिराळी नवे आहेत आणि त्यांनी प्रत्येक नावाबरोबर 
एक आकार जोडलेले आहे. तर असे आहे हे.
तिथल्या श्रोत्यांनी या समजुतीचे कौतुक केले. काही लोक म्हणाले, “गुरुदेव, तुम्ही 
हे खूपच छानपणे समजावले. आतापर्यंत आम्हाला कळत नव्हते की भारतीय इतक्या 
देवी आणि देवतांना का पूजतात ते.”
म्हणून जर आज आपल्याला जागतिक शांतता पाहिजे असेल तर आपण ही सुरुवात 
सर्वप्रथम आपल्या स्वतःपासूनच केली पाहिजे. एकदा का तुम्ही स्वतःमध्ये असलेल्या 
दिव्या प्रकाशाला पाहाल, मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला कोणीही अनोळखी सापडणार 
नाही. तुम्हाला वाटेल जसे काही सर्वजण तुमचे आप्त आहेत. जगातील प्रत्येक माणूस 
हा तुमचा असेल. पण हा साक्षात्कार तेव्हाच उदय पावेल जेव्हा जो कधीही विझू शकत 
नाही असा आपल्यात असणाऱ्या स्वतःच्या प्रकाशाबद्दल तुम्ही जागरूक व्हाल तेव्हा. 
आत असलेल्या प्रकाशाबद्दल तुम्हाला जागरूक करणे हेच केवळ उद्देश्य प्राणायाम आणि 
ध्यान यांचे आहे.

प्रश्न: पिढ्यांमधील अंतर आणि त्यासोबत येणाऱ्या अडचणी यांच्याबरोबर 
जुळवून कसे घ्यावे? आमच्या वडिलधाऱ्यांबरोबर होणाऱ्या आमच्या मतभेदामध्ये 
तडजोड कशी करावी?
 
श्री श्री : ते करणे अतिशय कौशल्याचे आहे. तुमचे म्हणणे त्यांना समजवा 
आणि त्यांच्या समोर ठेवा, पण तुम्ही त्यांच्या म्हणण्याचा मान ठेवा आणि त्यांना 
काय म्हणायचे आहे तेसुद्धा ऐकून घ्या.
आपली वडीलधारी मंडळी आपल्यावर माया करतात आणि त्यांच्या काळजात आपले 
केवळ भले व्हावे हे असते – हे लक्षात ठेवा. म्हणूनच ते वेळोवेळी तुम्हाला सल्ला 
देत असतात. ते जुनी पद्धत अनुसरणे आणि जुना कित्ता गिरवणे हे शक्य आहे, 
किंवा त्यांना नवी पद्धती पूर्णपणे चांगली माहित नसेल. परंतु आपले भले व्हावे हाच 
त्यांचा नेहमी हेतू असतो. कदाचित त्यांची समजावण्याची पद्धत आपल्या अपेक्षेपेक्षा 
निराळी असू शकते. थोड्या देवाण-घेवाणीने ही समस्या सहजपणे सोडवता येईल.

प्रश्न: नेहमी सुरुवातीला मी लोकांमध्ये केवळ चांगलेच पाहतो पण जसजसा काळ 
व्यतीत होतो, मला ते जवळून माहित होतात तेव्हा मला त्यांच्यात दुर्गुण दिसू 
लागतात. त्यांच्याबद्दलच्या माझ्या भावना बदलतात. हे असे का होते आणि अशी 
परिस्थिती मी कशी हाताळू?
 
श्री श्री : तुम्हाला माहिती आहे, या सत्याच्या विरुद्धसुद्धा खरे आहे. अनेकदा 
कोणा व्यक्तीबरोबर तुमची सुरुवात नीट होत नाही, परंतु जसजसा काळ जातो 
आणि तुम्ही संयम ठेवता, तुम्हाला ती व्यक्ती आवडू लागते. म्हणून दोन्ही गोष्टी 
सत्य आहेत.
याप्रकारचे घटनाचक्र प्रत्येकाच्या आयुष्यात येते. तुम्ही कोणालातरी भेटता आणि 
सुरुवातीला तुम्हाला ते आवडतात, मग काही समयानंतर तुम्ही त्यांचा तिरस्कार 
करू लागता, आणि पुन्हा काही काळानंतर तुम्हाला ते पुन्हा आवडू लागतात. 
तुमच्या आई आणि वडिलांना याबद्दल जरा विचारून पहा. (हशा) त्यांनी आनंदाने 
लग्न केले पण लवकरच त्यांच्यात बारीकसारीक खटके उडू लागले आणि 
मतभेद होऊ लागले.
प्रश्न: शांत आणि यशस्वी जीवनाचे रहस्य काय आहे?
 
श्री श्री : इतका वेळ हेच तर मी सांगत होतो. लोक आणि परिस्तिथी जसेच्या तसे 
स्वीकारा. आणि नेहमी वर्तमान क्षणात राहा. भूतकाळात काय झाले किंवा 
भविष्यकाळात काय होणार याचा फार विचार करू नका.

प्रश्न: शांतता आणि जागतिक ऐक्य यांना प्रोत्साहन देण्यात धर्माची काय 
भूमिका आहे? यासाठी धर्म उपयुक्त आहे का अडथळा आहे?

श्री श्री :बुद्धिमान लोकांकरिता, धर्म संपत्ती आहे. परंतु निर्बुद्ध लोकांकरिता 
तो मार्गातील धोंड आहे. जीवनाचे उत्थान करण्यास मदत करणाऱ्या आणि जीवन 
फुलवण्यात मदत करणाऱ्या अनन्यसाधारण खुबी प्रत्येक धर्मामध्ये आहेत. परंतु 
आपण जर अविवेकी असू तर आपण त्याच गुणधर्मांना लोकांमध्ये अंतर आणि समस्या 
निर्माण वापरतो. तर हे आपल्यावर अवलंबून आहे.
जगातील कोणत्याही धर्मामध्ये काहीही चुकीचे नाहीये. त्याचे अनुसरण आणि 
आचरण करणाऱ्यावर हे अवलंबून असते. 

एका सुरीचा उपयोग तुम्ही भाज्या चिरायला, लोण्याची चकती कापायला आणि 
स्वतःला अपाय करायला करू शकता. 
हे त्या समान आहे.

बोले तैसा चाले

30
2014
Aug
दिल्ली, भारत
 


(जामिया मिलिया इस्लामिया यांनी ‘द आउटरीच प्रोग्राम’ मध्ये श्री श्री रविशंकर 
यांचे व्याख्यान आयोजित केले होते. श्री श्री त्यांच्या व्याख्यानात, जागतिक शांतता, 
आणि वैश्विक सुसंवाद याबद्दल बोलले. त्यानंतर ध्यान घेण्यात आले. त्यानंतर जामिया 
मिलिया इस्लामिया मधील शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसह ४०० हून अधिक 
संख्येने जजर असलेया प्रेक्षकांनी प्रश्नोत्तराच्या सत्रात श्री श्रींशी संवाद साधला.) 
इथे व्यासपीठावर पुष्पगुच्छ देऊन माझे स्वागत केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. 
या तुमच्या छानशा कृतीतून तुम्ही, मला तुम्हाला जे सांगायचे होते ते तुम्ही सर्वांनी 
आधीच सांगून टाकले आहे. 
  
या पुष्पगुच्छाप्रमाणेच आपला वैश्विक समाजही एक गुच्छ आहे. ज्यात लाल फूल आहे, 
पांढरे फूल आहे, कार्नेशनचे फूल आहे वगैरे. तर, पुष्पगुच्छ हा अनेक रंगछटा 
असलेल्या विविध प्रकारच्या फुलांनी बनवलेला असतो. आपण जेव्हा हे विसरतो 
आणि सर्व फुले एकाच रंगाची असावी अशी अपेक्षा करतो तेव्हाच मग समस्येला 
सुरवात होते.   
जागतिक शांतता प्रस्थापित होणासाठी आधी व्यक्ती शांत असायला हवी. जर मी शांत 
नसेन तर मी जाईन तिथे शांती पसरवू शकणार नाही. आणि व्यक्ती शांत कधी होईल ? 
तर जेव्हा तो किंवा ती पूर्णपणे तणावमुक्त असेल तेव्हाच. 

आज प्रत्येक घरात हेच दृश्य असते. समजा एका घरात पाच किंवा दहा लोक एकत्र 
रहात असतील तर प्रत्येक जण आपल्याच दुनियेत असते. (विचार आणि श्रद्धा) जर 
त्यांच्यात काही संवाद घडत नसेल त्यांच्या समविचार नसेल तर मग अशावेळी भांडणे 
सुरु होतात . 
 
आजच्या चर्चापिठाचा विषय आहे, जागतिक शांतता.मी तुम्हाला सांगतो, जागतिक 
शांतता प्रस्थापित होण्यासाठी, व्यक्ती शांत असली पाहिजे. जर मी शांत नसलो तर 
मी जिथे जाईन तिथे संती कशी पसरवू शकेन ? आणि एखादी व्यक्ती शांत कशी होऊ 
शकेल ? जेव्हा ती किंवा तो तणावमुक्त असेल तेव्हाच. जेव्हा आपण स्वत:च आतून 
खूश, शांत नाही आहोत तेव्हा आपण इतरांशी संपर्क करून ती खुशी कशी पसरवणार ? 

आपल्यात शांती रुजवण्यासाठी आपल्याला काय करायला हवे ? 
सर्वात प्रथम आपल्याला तणावमुक्त जीवन जगण्याची गरज आहे. आपल्या आयुष्यात 
तणाव निर्माण होणे सहाजिक आहे. तणाव म्हणजे काय आणि आपल्याला तो कधी 
जाणवतो ? जेव्हा आपल्या अगदी कमी वेळात खूप काही करायचे असते आणि ते 
करण्याची आपल्यात शक्ती नाहिये असे लक्षात येते, तेव्हा आपल्याला तणाव जाणवतो. 

तुम्ही तुमचे तणाव कमी करण्यासाठी, तुमच्या जीवनातल्या गरजा आणि जबाबदाऱ्या 
कमी करू शकता. किंवा दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही तुमची शक्ती वाढवू शकता. मी 
शक्ती म्हणतोय ती केवळ शारीरिक शक्ती नाही तर मानसिक आणि भावनिक दृष्ट्या 
शक्तिशाली बनणे. त्यामुळे आपण आपली शक्ती आणि ऊर्जा कशी वाढवू शकतो 
याचा विचार करायला हवा.  
आपली उर्जाशक्ती आतून वाढवण्याची अनेक तंत्रे आहेत. पण या देशात या तंत्रांचा 
उपयोग करणारे फारसे लोक नाहीयेत आणि दुर्दैवाने ते याबद्दल दुसऱ्या कुणाला सांगत 
नाहीत. भारतात जात, धर्माच्या तत्वांवर इतका जास्त  भेद भाव आहे. आपल्या 
कुटुंबात देखील आपल्या आकांक्षा आणि ध्येय यांच्यामुळे आपल्यात भेद भाव होतात. 
लोक म्हणतात की , ‘मी हे तंत्र कुणालाही शिकावार नाही.’ हे बरोबर नाही. असा 
विचार कां कारावा ? खरं तर तुम्ही ही तंत्रे सर्वांना शिकवायला हवी. जर या तंत्रांमुळे 
तुमची तब्येत सुधारत असेल आणि तुमचा तणाव नाहीसा होत असेल तर तुम्ही ती 
इतरांनाही शिकवून मदत करायला हवी. आपण मात्र ते इतरांना न शिकवता गुपित 
ठेवतो.   
मला वाटते हे असे नसावे. मी म्हणतो की ज्या तंत्रांमुळे तब्येत सुधारते आणि 
छान वाटते ती सर्वांना शिकवायला हवी. जसे प्राणायाम, काही व्यायाम प्रकार आणि 
योगासने. जगातील सर्वांना या तंत्रांचे फायदे समजले पाहिजेत. जेणे करून सर्वसामान्य 
माणूस शांत आणि आनंदी राहील आणि त्याच्या भोवतालच्या माणसांशी चांगले संबध
ठेऊ शकेल. याच विचाराने आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था चालू केली.  
जोपर्यंत आपल्याला आतून शांत वाटत नाही तोपर्यंत आपण बाहेरून शांत राहून 
सुसंवाद साधू शकणार नाही आणि जागतिक शांतता निर्माण होणार नाही आणि 
व्यक्तिगत जीवनात प्रगतीही साधता येणार नाही. आता शांती निर्माण करण्यासाठी 
सर्वाच्या मेहनतीची गरज आहे. त्यासाठी जे काही थोडे फार करता येईल ते प्रत्येकाने 
करायला हवे.   
भारतात आपण नेहमी म्हणतो, ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणजे हे संपूर्ण जग म्हणजे 
माझे कुटुंब आहे. पण खरोखरच आपले एक कुटुंब कधी होऊ शकेल ? हे तेव्हाच 
शक्य होईल जेव्हा आपण ज्ञानात राहू, जेव्हा प्रत्येक जण शांती अनुभवत असेल 
आणि जेव्हा आपण प्रेमाने सर्वांना जवळ घेऊ शकू. 
आपण जे सांगतो आणि जे करतो त्यात फरक असता कामा नये. आपल्या 
अंतर्मनाला जे वाटते तसेच वागायला हवे. त्यामुळे अंतर्शक्ती मिळते. ही शक्ती 
असणे ही मोठी गोष्ट आहे आणि तिचा उपयोग करुन आपण जीवनात  यशाकडे 
वाटचाल करू शकतो. 
आता मी हे बोलत असताना तुम्ही ऐकताय आणि तुमच्या मनात सत् वाद चालू 
आहे की, ‘ हां, हे असे असू शकेल’, ‘नाही हे बरोबर नाही’. तुमच्यातही एक 
संभाषण चालू असते, हो की नाही ? हे खूप महत्वाचे आहे आणि आपल्याला 
त्याची जाणीव व्हायला हवी. 
मी सांगतो आहे ते तुम्हला पटते आहे की नाही हे महत्वाचे नाही. पण तुमचे 
मन सांगते आहे ते तुम्हाला पट्टे आहे नां ? हा मुद्दा विशेष आहे. यालाच सजगता 
म्हणतात. त्याला आपण प्रज्ञा असेही म्हणतो. म्हणजेच जागृत बुद्धी. म्हणजे, 
आपल्या आत काय चालले आहे त्याचे आपण सजगतेने निरीक्षण करतो.  
माझ्या मते शिक्षणाचा खरा हेतू प्रज्ञा म्हणजेच सजगता वाढवणे हाच आहे. 
शिक्षण म्हणजे केवळ जास्तीत जास्त माहिती जमवणे इतकेच नाही. ते तर संगणकही 
करू शकतो. शिक्षण म्हणजे माणसाला माणूसकी असलेला कसे बनवायचे याची 
कला आहे. शिक्षण म्हणजे एकमेकाबरोबर खेळीमेळीने रहाणे आणि एकमेकातील 
संघर्षावर प्रगल्भ आणि अहिंसक मार्गाने, सर्वांना फायदेशीर होईल असा मार्ग 
काढून ते मिटवणे.  

जरा विचार करा, आज जागा सगळीकडे किती कलह आणि अशांतता आहे. 
गाझा, इराक, सिरीय वगैरे ठिकाणी काय चालले आहे बघा. भारतातील पत्रकार 
या घटनांबद्दल जास्त काही प्रसिद्ध करत नाहिये ते बरे आहे. पण तुम्ही जागतिक 
वृत्तवाहिनी वर बघितले तर या सर्व बातम्या असतात आणि त्यां पाहून तुम्ही 
बेचैन व्हाल. 

पैगंबर महंमदाने एकदा म्हटले होते की, ‘ मला पूर्वेकडून (भारत) येणारा गार 
वारा जाणवतो आहे.’ मी हे कार्य हाती घेतले आहे की युध्द आणि संघर्षाच्या 
गरम वार्यापेक्षा, पूर्वेकडून नेहमीच गार वाऱ्याचा ( शांती आणि सुसंवाद) झोत 
येत राहील. त्यांनी हे १४०० वर्षांपूर्वी म्हटले होते. पण मी आजही ही स्थिती 
टिकवण्यास वचनबद्ध आहे. 

भारत हा एक अनुकरण करण्यायोग्य असा आदर्श देश म्हणून जगापुढे यायला 
हवा. निरनिराळ्या धर्माच्या लोकांना आपण एकत्र कसे आणू शकतो ? खरे 
तर विविध धर्मांमध्ये तंटा नाहीच आहे. पण जेव्हा गैरसमज होतो किंवा आपल्यात 
खूप ताण असतो, तेव्हा आपल्या भोवतीच्या लोकांशी तंटा निर्माण होतो. बऱ्याचशा 
घरांमध्येही असेच होत असते. कुटुंबातील भावा भावात भांडण असते. त्यामुळे 
जोपर्यंत आंतरिक शांती मिळत नाही तो पर्यंत बाहेरून शांती आणि सलोखा निर्माण 
होऊ शकत नाही. आणि जागतिक शांतीही निर्माण होऊ शकत नाही किंवा तुमच्या 
जीवनात वैयक्तिक प्रगतीही होऊ शकत नाही. आणि ही शांती आणण्यासाठी 
प्रत्येकाच्या प्रयत्नाची गरज आहे. या दिशेने जे काही करता येईल ते कारायला हवे.
  

आता मी तुम्हला इथेच एक प्रक्रिया करायला सांगणार आहे. तुम्ही त्यात भाग 
घाल नां ? खरे तर आज की तुम्हाला दोन गोष्टी करायला सांगणार आहे . 
मला खूप लांब लांब भाषण करायला आवडत नाही. प्रत्यक्ष अनुभवावर माझा 
जास्त विश्वास आहे. तुमच्या अवती भवती बघा आणि त्यांच्याकडे बघून म्हणा, 
‘मी तुमचाच आहे.’ समजले सर्वांना ? तुमच्या पुढे, मागे बसलेल्या लोकांनाही 
तुम्ही असे अभिवादन करू शकता. फक्त तुमच्या बाजूला बसलेल्यांनाच नाही.
आता मला सांगा अभिवादन करत असताना तुम्ही जे म्हटलेत तसे तुम्हाला खरेच 
वाटत होते कां, की तुम्ही नुसते वरवरचे म्हटलेत ? तुम्हीच विचा करा. इतराना 
सांगायची गरज नाही. जीवनातही असेच होत असते. बरेचदा आपण ‘सॉरी’ किंवा 
‘थँक यू’ असे अगदी वरवर म्हणतो. ते मनापासून आलेले नसते. जेव्हा तुम्ही 
विमानातून बाहेर पडता तेव्हा हवाई सुंदरी देखील, ‘बाय बाय, तुमचा दिवस चांगला 
जाऊ दे’ असे म्हणते, पण तुमचा दिवस खरोखरच चांगला जातो की वाईट याचे 
त्यांना काही नसते. पण तेच वाक्य जर तुम्ही तुमच्या आईकडून किंवा आजी 
आजोबांकडून ऐकले तर त्यांच्या म्हांन्यात वेगळेपणा जाणवतो. ते जेव्हा तुम्हाला 
हेच म्हणतात तेव्हा त्यांच्या म्हणण्यात काही वेगळ्या लहरी, आपलेपणा जाणवतो, 
हो की नाही ? ते बोलत नसतात. ते अगदी मनापासून बोलत असतात हे तुम्हाला 
जाणवते. आणि त्यात काही तरी असते की त्यांचा आशिर्वाद फळाला येतो. आणि 
मग तुम्ही प्रेमाच चिंब भिजून जाता, तुमच्यात त्यां प्रेमाच्या लहरी निर्माण होतात 
आणि तुमच्या भोवतालची माणसे सुद्धा त्याला प्रतिसाद देऊ लागतात. हा निसर्गाचा 
नियम आहे.  

आपल्या भोवती सतत अनेक प्रकारच्या लहरी असतात. केवळ, ‘शांती, शांती शांती’ 
असे ओरडून आपल्या भोवतालची परिस्थिती शांततामय होत नाही. अशा 
लोकांमध्ये, ना त्यांच्या आवाजात शांती असते ना त्यांच्या असण्यात. आपण 
शब्दांपेक्षा आपल्या असण्यातून जास्त व्यक्त करत असतो. 
  
घरातील लहान मूळ बोलू शकत नाही कारण त्याच्याकडे भाषा नसते. पण फक्त 
तुमच्या डोळ्यात पाहून सगळे प्रेम आणि भावना त्याच्यापर्यंत पोहोचतात. घरातल्या 
कुत्र्याचे उदाहरण घ्या. तुम्ही कामावरून किंवा शाळेतून घरी आलात की तो इतक्या 
आनंदाने तुमच्या भोवती फेऱ्या मारू लागतो, तुमच्या अंगावर उड्या मारतो. त्याच्या 
लहारीन्मधून त्याचे सगळे प्रेम व्यक्त होते. जरी एखाद्याने १०० शब्दात त्याचे प्रेम 
तुमच्या जवळ व्यक्त केले तरी त्याचा तितकासा परिणाम होत नाही किंवा भावना 
पोहोचत नाहीत. 
र, आपल्या लहरी सकारात्मक होण्यासाठी आपल्याला तीन गोष्टींची गरज असते. 
१. मनाची स्पष्टता 
२. हृदयाची शुद्धता 
३. कृतीतला प्रामाणिकपणा
तुमच्या मनात आणि विचारात स्पष्टता असायला हवी. तुमचे हृदय शुध्द असायला 
हवे. आणि तुमच्या कृतीत प्रामाणीकपणा  असायला हवा. तुम्ही जे काही कराल ते  
१०० % देऊन आणि मनापासून करायला हवे. 
चला, आपण आणखी एक प्रक्रिया करू. तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला सांगा 
की,‘ माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही.’ 
हे करता आले कां तुम्हा सर्वांना ? तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे म्हणता आले नाही. 
तुम्ही म्हणायचा प्रयत्न केलात तरी दोघांनाही हसू यायला लागले. 
ठीक आहे, आता तुम्ही सर्वानी डोळे बंद करा आणि कल्पना करा की जगातले सगळे 
लोक तुम्हाला म्हणताहेत की त्यांचा तुमच्यावर विश्वास नाही. कल्पना करा की ते 
सगळे तुमच्याकडे शंकेच्या नजरेने बघत आहेत. अंदाजे ३० सेकंद पर्यंत फक्त हे करा. 
आणि मग डोळे उघडा. कसे वाटले तुम्हा सर्वांना ? तुम्हाला आतून खूप खराब वाटले, 
हो की नाही ?
कुणीही आपल्याकडे संशयाने बघू नये असे आपल्याला वाटते. पण आपण स्वत:च 
अनेक लोकांकडे अशा संशयित नजरेने बघत असतो. मग आपण तशाच लहरी आपल्या 
भोवती निर्माण करतो. आणि लोक त्यां लहरी पकडतात. आपण जेव्हा शंका कुशंकांमध्ये 
अडकतो तेव्हा आपण आपल्या भोवतीच्या लोकांमध्येही तशाच लहरी निर्माण करतो.
 
जेव्हा तुम्ही प्रेमात बुडालेले असता तेव्हा तुमच्यात प्रेमाच्या लहरी निर्माण होतात 
आणि तुमच्या भोवतालचे लोकही त्याला त्याचं प्रेमाने प्रतिसाद देतात. हा निसर्गाचा 
नियम आहे. 

तीन प्रकारच्या शंका असतात 
१. स्वत:वर घेतलेली शंका 
२. आपल्या भोवतालच्या लोकांवर घेतलेल्या शंका
३. देवावरची शंका 
आपण देवाला कधीच बघितले नाही त्यामुळे मनात कुठेतरी नेहमीच शंका असते 
की देव खर्च आहे की नाही. 
पहिली गोष्ट मंजे आपण लोकाना ते आहेत तसे स्वीकारायला हवे. आपण समाजात 
प्रत्येकाला एका शंकेच्या नजरेने बघत असतो. आपल्याकडे लोकांनी शंकेने बघू नये 
असे आपल्याला वाटते तर मग आपणही लोकांकडे शंकेने बघू नये. मी असे म्हणतोय 
याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येकाच्या प्रत्येक गोष्टीववर आंधळेपणाने विश्वास 
टाकावा.    
अनोळखी माणसासमोर तुमच्या पर्सची काळजी घ्यायची नाही किंवा तो ती घेऊन 
पळाला तरी, ठीक आहे, असे वाटू देऊ नका. मी असे म्हणायचे नाहिये. पण आपल्या 
मनात काय चालले आहे त्याची जाणीव असावी. याकडे आपण लक्ष द्यायला हवे. 
आपण जोपर्यंत आपल्यात सुधारणा करत नाही, जोपर्यंत आपण आपल्यातले प्रेम आणि 
आनंद जागवत नाही तोपर्यंत समाजात आणि सर्व जगात शांती आणि आनंद कसा 
निर्माण होईल ?  

सर्वात आधी आपल्याला लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारायला हवे. 
तुम्ही जगात अशा किती लोकांना भेटला आहात जे अगदी तुमच्यासारखे आहेत? 
तुम्हाला असे कुणी भेटले आहे कां? 
नाही भेटले. तरीही तुम्हला वाटत असते की प्रत्येकाने तुमच्यासारखाच विचार आणि 
कृती करावी. तुम्हाला माहितीये, जर तुम्हला अगदी तुमच्यासारखेच कुणी भेटले तर 
तुम्ही पाच मिनिटेही त्यांना सहन करू शकणार नाही. सत्य हे आहे की, अगदी 
तुमच्यासारखाच विचार करणाऱ्या आणि वागणाऱ्या व्यक्तीला सहन करणे अवघड 
आहे. हे आर्ट ऑफ लिव्हिंगचे अगदी मूलभूत तत्व आहे. 
बघा, या जगात येशू एकच आहे पण, तुम्हाला माहित आहे, आज जागात 
क्रिश्चन 
धर्माच्या किती शाखा आहेत ? 
आज जगात क्रिश्चन धर्माच्या ७२ शाखा आहेत. 
आज इस्लामच्या किती शाखा आहेत ? पाच तर अगदी सर्वांना माहित आहेत. 
जसे, शिया, सुन्नी, अहेमदिया, सुफी, वगैरे.. गौतम बुद्ध एकाच होता पण 
आज बुद्ध धर्माच्या ३२ शाखा आहेत. आणि हिंदू धर्मात तर असंख्य शाखा आहेत. 
(हास्य) 
प्रत्येक महासंताचा एक पंथ आणि त्यांचे अनुयायी तयार होतात. शिख धर्मातही 
अनेक विचारधारा आहेत. काळा बरोबर अनेक संत,निरनिराळे धर्म, तत्वज्ञान आणि 
विचार प्रवाह तयार होतात. आपण या सर्व वैविध्यपूर्ण परंपरांना आणि पंथांना 
वाढू द्यायला हवे, विकसित होऊ द्यायला हवे.  
प्रत्येकाने आपल्या सारखेच वागावे आणि विचार करावा असे जेव्हा एखाद्याचा प्रयत्न 
असतो तेव्हा त्याचा काय परिणाम होतो हे आपण सिरीय, इजिप्त वगैरे ठिकाणी 
बघतो आहोत. हे देश खूप दुर्दैवी आहेत. इराक मध्ये युध्द सुरु होण्याच्या आधी की 
इथे काही तरी भयंकर संकट कोसळणार आहे. 

इथे एक सरदारजी होता त्याचा तिकडे धंदा होता. तिकडे जाऊन त्यांच्याशी बोलण्यासाठी, 
मी दोन डॉक्टरांना त्याच्याबरोबर तिकडे पाठवले. त्यांना सद्दाम हुसेनच्या मंत्रिमंडळातील 
मंत्र्यांशी बोलायला सांगितले. ते गेले आणि एका मंत्राशी बोलले, जो आर्थ मंत्री होता. 
तर आम्ही सर्वांनी त्याला हे रक्तपात आणि दैन्यावस्था करणारे युद्ध थांबाविण्याविषयी 
सद्दाम हुसेनला सांगायला सांगितले. त्यानंतर काय झाले हे सर्वांनाच माहित आहे. 
दुर्दैवाने युद्ध झाले. त्यामुळे आम्ही तिथे एक पुनर्वसन केंद्र स्थापन केले, रेड क्रॉस 
सोसायटीच्या केंद्रा शेजारीच. युद्धाच्या दरम्यान रेड क्रॉस च्या इमारतीवर बॉम्ब पडला 
आणि इमारतीतील सर्व लोक पळून गेले. मी आमच्या अलोकाना बोलावले आणि 
त्यांना सुद्धा आसरा शोधून निघून जायला सांगितले. ते मला काय म्हणाले माहितीये ? 
ते म्हणाले, ‘ गुरुदेव, जर आम्हीही निघून गेलो तर जखमींची काळजी कोण घेणार ? 
इथे रोज ७०० लोकांना वैद्यकीय मदतिची गरज असल्याचे आम्ही बघतोय. आम्ही 
इथे राहून त्यांची काळजी घेऊ. तुम्ही आमच्यावर इतकं प्रेम कर्ता आणि देव आहेच, 
सदैव आमची काळजी घ्यायला. त्यामुळे आम्ही इथे राहूनया लोकांची काळजी घेऊ.  
या युद्धामुले सात लाख स्त्रिया विधवा झाल्या. तिथली परिस्थिती बघायला मी तीन 
वेळा तिथे गेलो. तिथल्या जागेचे भाग पाडण्यासाठी त्यांनी मोठ्या भिंती बांधल्या होत्या. 
शियांचा भाग वेगळा आणि सुन्नींचा भाग वेगळा केला होता. आम्ही एका सुन्नी 
इमामाला बरोबर घेतले आणि युद्धामुळे पळून गेलेले ८,००० लोक रहात असलेल्या 
त्या खेड्यात गेलो. आम्ही तिथल्या लोकांशी बोललो, आणि दुभाषा च्या मदतीने 
स्थानिक नेत्यांनाही भेटलो आणि त्यांना युध्द थांबवण्यासाठी विनंती केली. त्यांना 
कळले आणि त्यांनी आमचे खुल्या दिलाने स्वागत केले. हळू हळू शांतीचे वातावरण 
निर्माण होऊ लागले. इराक सरकारने ५० युवकांना प्रशिक्षणासाठी बंगलोरच्या 
आंतरराष्ट्रीय केंद्रात प्रशिक्षणासाठी पाठवले. त्या सर्वाच्या नोकर्या होत्या, कुटुंबीय 
होते तरीही ते त्यांच्या देशातल्या समाजाच्या उर्जितावस्थे साठी प्रशिक्षण घ्यायला आले.   
मी तुम्हाला सांगतो, आज बहुतेक सगळी युद्धे अमेरिकेच्या दारूगोळा, युध्दसामुग्री 
याच्या उद्योगामुळे होत आहेत. त्यांना त्यांची शस्त्रास्त्रे कुणाला तरी विकायची 
असतात नाहीतर त्यांचा त्यांची शस्त्रास्त्रे बव्न्याचा व्यवसाय बंद पडेल. ते बंदुकी 
आणि बॉम्ब तयार करतात आणि दोन्ही पक्षांना विकतात. आणि दोघानाही युध्द 
करण्यासाठी चिथावतात . 
भारतही असे करू शकतो. ते हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांच्या विरुध्द भांडायला 
चिथावू शकतात. पण असे नाहिये. मी सर्वच व्यवसायानबद्दल असे म्हणत नाहिये. 
सर्व जगभर पसरलेल्या बंदुकीच्या व्यवसायाबद्दल मी बोलतोय. हे कुणा एका देशापर्यंत 
मर्यादित नाहिये. तर सर्व दूर पसरले आहे. असे का ? कारण ते मानवी मूल्यांना 
महत्व देत नाहीत. ते फक्त पैसा बघतात आणि आणखी पैसा कसा मिळवायचा हे 
बघतात. सिरीय, इराण वगैरे देशात हेच होत आहे. हे सर्व बघून वाईट वाटते. हे 
आपल्या देशातही, आसाम, नागालँड आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांत होत आहे. 
आपण हे लक्षात ठेवायला हवे की जीवन क्षणभंगुर आहे. प्रेम करायला पुरेसा वेळ 
नाहिये तर मग द्वेष पसरवत आणि रक्तपात करत कां फिरायचे. आपण सर्वांनी 
हा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा.  
यामुळेच आपल्या सभोवती एक नवीन जग तयार होईल जिथे प्रत्येक जण आपापला 
धर्म पाळायला मुक्त असतील आणि एकमेकात सलोख्याचे वातावरण असेल. भारतात 
खरे तर असेच आहे. काही लोक असे विचारतात की ‘ भारतीय लोक इतक्या साऱ्या 
देवी देवतांची पूजा कां करतात ?’  हा चुकीचा समज आहे. देव एकाच आहे पण
त्याच्याची व्यक्तिगत संबध जोडण्यासाठी आणि एकरूप होण्यासाठी, लोक त्यांच्या 
त्यांच्या पद्धतीनुसार पूजा करतात. त्यामुळेच आपल्याकडे इतकी रूपे आणि इतकी 
नावे आहेत. लोक जेव्हा मूर्ती पूजा करतात तेव्हा सुद्धा ते दगडाची पूजा करत नसतात. 
तर दिव्यत्वाची पूजा करत असतात. जसे आपण आपल्या आवडत्या व्यक्तींचे फोटो 
जाऊ तिथे जवळ बाळगतो तसेच.                 
आपण आपल्या मुलांचे फोटो जवळ बाळगतो. ते आपल्या जावल नसतील तरी त्यांचे 
फोटो बघितले की ती जवळीक जाणवते. मूर्तीचेही तसेच आहे. मूर्ती ही केवळ त्यां 
दिव्यत्वाशी संबंध जोडण्यासाठीच असते. 
सर्व धर्म सारखेच आहेत. 
कालच गणेश उत्सव पूर्ण झाला. लोक विचारतात की, ‘ तुम्ही आधी मूर्तीची पूजा 
करता आणि मग ती पाण्यात विसर्जित कां करता ?’ 
ही पद्धत ठेवण्यामागे ऋषींची अगदी छान कल्पना होती. ते म्हणत की, पूजा म्हणजे, 

जे देव आपल्यासाठी करतो तेच आपण देवासाठी प्रेमभावाने आणि कृतज्ञतेने करायचे.
जसा देव आपल्यासोबत क्रिडा करत असतो तसेच आपण दिव्याताशी क्रिडा करतो. 
तर पूजा ही दिव्य क्रिडा आहे. त्यामुळे आम्ही गणेश ‘मूर्तीशी’ पूजा करून खेळतो 
आणि मग काही काळाने मूर्तीचे पाण्यात विसर्जन करतो. ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे 
देवाला असे सागत असतो की , ‘देवा, तू आमच्या हृदयात आत्म्याच्या रूपात 
आहेसच, मी तुझी प्रार्थना करतो की तू या मूर्तीमध्ये काही काळासाठी प्रस्थापित 
व्हावेस म्हणजे आम्ही काळ तुझ्याशी खेळू शकू, जसे तुम्ही आमच्याशी प्रेमाने खेळता. 
तसाच मलाही उत्सव करू द्या. मग पूजा करून झाली की आम्ही देवाला पुन्हा 
परत आमच्या हृदयात परत यायला सांगतो आणि मग मूर्ती पाण्यात विसर्जित करतो. 
आज आधायात्मिक शिक्षणाची गरज आहे. आध्यात्मिक शिक्षण सर्वांना एकत्र जोडते. 
आजपर्यंत अनेक संत होऊन गेले आणि त्यासार्वांचे हेच मत होते की सर्व एकाच आहे.  

श्री आदि शंकराचार्यांनी गणेशाचे जे वर्णं केले आहे ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 
ते म्हणतात, ‘अजं निर्विकल्पं निराकार एकं’, म्हणजे गणेश हा निराकार आहे, 
आकार हीन आहे. आदि शंकराचार्य म्हणतात, ‘ श्री गणेशा तू अनंत आहेस, निराकार 
आहेस, सर्वव्यापी आहेस. देवाचे असेच वर्णन तुम्हाला कुराणाच्या सुरवातीच्या 
कलमांमध्ये दिसेल.   
दुर्दैवाचा भाग हा आहे की आपल्याला आपल्या धर्माबद्दल आणि आपल्या धर्म ग्रंथांबद्दल 
खूपच कमी माहिती आहे. कोणत्याही धर्मात असे सांगितलेले नाही की तुम्ही दुसऱ्या 
माणसाला त्रास द्या किंवा जखमी करा. मग हे आज असे क होते आहे ? याचे कारण 
धर्माचे शिक्षण सर्वांना योग्य प्रकाराने दिले जात नाही. 

इराक मधल्या नेत्यांनी आम्हाला तीन गोष्टी मागितल्या. त्यांना हवी असलेली पहिली 
गोष्ट होती, भारतीय आध्यात्म. कारण ते हे बघतात की ही सर्वांना प्रेमाने आणि 
सलोख्याने एकत्र आणणारी एक खास गोष्ट आहे.  

दुसरी गोष्ट त्यांनी मागितली, ती म्हणजे शिक्षण क्षेत्रातील मदत. ते म्हणाले की 
भारतात आय आय ती मध्ये शिकणारी मुले खूप हुशार आणि तल्लख असतात. 
कृपया आमच्या मुलांनाही असेच आय आय टी मधील तांत्रिक शिक्षण उपलब्ध करा. 
तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे भारतीय टीम नि येऊन इराक मधील 
तेलाच्या विहिरीतून तेल काढावे. बरेच पाश्चिमात्य हे खूप आधीपासून करत आहेत. 
पण आता आम्हाला भारतीयांनी येऊन आमच्या देशातील तेल साठ्यांचा उपयोग 
करून घ्यायला हवे आहे. 
मी तुम्हाला सांगतो, जर सर्व देशांनी त्यांच्या संरक्षण खर्चातील ०.१% इतका 
पैसा शांती आणि सलोखा पसरवण्यासाठी वापरला तरी संपूर्ण जग बदलून जाईल. 
द्वेष कुणालाच नको असतो. पण बरेचदा नकळत तसे होते. किंवा कधी कधी 
इतरांची भीती, असुरक्षितता यामुळे होते.  
आज जर आपल्याला जागतिक शांतता हवी असेल तर आपण प्रथम आपल्यापासून 
सुरवात कारायला हवी. एकदा तुमच्यात तो प्रकाश पडला की मग तुम्हाला कुणीच 
परका वाटणार नाही. सर्वजण जणूकाही आपलेच आहेत असे तुम्हाल वाटू लागेल. 
एक गोष्ट मला तुम्हा सर्वांना सांगायची आहे. आज इथे येण्या अगोदर, एखाद्या 
इस्लामिक विद्यापीठात भाषण देण्याची संधी फक्त पाकिस्तानातील लाहोर 
विद्यापीठात २०१२ मध्ये  मिळाली होती. त्यादिवशी तिथे हजारो विद्यार्थी जमले होते. 
मला आठवते आहे, त्यां कार्यक्रमाची तयारी त्यांनी इतकी उत्साहाने केली होती. 
तिथे देखील विचारले गेले होते की, तुम्ही भारतात इतक्या देवी देवतांची पूजा कां 
करता ? हे समजावण्यासाठी मी त्यांना एक साधेसे उदाहरण दिले. बघा एकाच 
कणकेपासून तुम्ही हलवा बनवता, पुऱ्या , समोसा बनवता. हो की नाही ? हीच 
कणिक तुम्ही पिझा बनवण्यासाठीही वापरता, नुडल्स साठीही वापरता. आपण असे 
कां करतो ? कारण आपल्याला जेवणात वैविध्य आवडते. त्याचप्रमाणे आम्ही भारतात 
एक देव आहे असेच मानतो. पण आम्ही त्या एका देवालाच वेगवेगळ्या वेशभूषेत 
सजवतो.  आम्ही त्यांना वेगवेगळे कपडे घालतो आणि प्रत्येकाला वेगवेगळे नाव देतो.   
हिंदू धर्मात देवाची १००८ नावे आहेत. आणि प्रत्येक नावाला एकेका रूपाशी जोडले 
आहे. असे आहे .
तिथल्या श्रोत्यांना हे स्पष्टीकरण आवडले. काही जण म्हणाले, ‘ गुरुदेव तुम्ही हे 
इतके छान समजावून सांगितले. आतापर्यंत माहीतच नव्हते की देव एकाच असून 
भारतीय लोक इतक्या देव देवतांची पूजा कां करतात.’ 

तर आपल्याला जर जागतिक शांतता हवी असेल तर आपल्याला स्वत:पासून 
सुरवात कारायला हवी. एकदा तुमच्यात तो प्रकाश पडला की मग तुम्हाला 
कुणीच परका वाटणार नाही. सर्वजण जणूकाही आपलेच आहेत असे तुम्हाल 
वाटू लागेल. जगातील प्रत्येक जण आपलाच असेल. पण हे सत्य तेव्हाच जाणवेल 
जेव्हा आपल्याला आपल्यातील प्रकाश कोणीही विझवू शकत नाहीई याची जाणीव 
होईल. तुमच्यातील प्रकाशाची तुम्हाला जाणीव व्हावी हाच प्राणायाम आणि ध्यानाचा 
उद्देश आहे. 
 
प्रश्नोत्तरे:
 
प्रश्न : पिढीतील अंतर आणि त्यामुळे येणाऱ्या प्रश्नांना कसे सोडवावे ? आमच्या 
वडीलधाऱ्यांबरोबर असलेल्या मतभेदांना  कसे हाताळावे ? 

श्री श्री : हे अतिशय कुशलतेने करावे लागेल. तुम्ही तुमचे म्हणणे त्यांना 
समजावून सांगावे पण त्यांचे म्हणणेही आदराने ऐकूनही घ्यायला हवे. लक्षात ठेवा 
की आपल्या वडीलधाऱ्यांच्या मनात नेहमी आपल्याबद्दलचे प्रेम आणि भलेच असते. 
म्हणूनच ते वेळोवेळी तुम्हाला सल्ला देत असतात. हे शक्य आहे की ते अजूनही 
त्यांच्या पिढीच्या जुन्या मतांचे असतील किंवा त्याना नवे विचार माहित नसतील. 
पण त्यांचा हेतू नेहमी चांगलाच असतो. कदाचित त्यांची सांगण्याची पद्धत आपल्या 
अपेक्षेपेक्षा वेगळी असेल. थोडेसे द्यावे , थोडे घावे आणि सहजपणे हा गुंता सोडवावा.
 
प्रश्न : सुरवातीला मला लोकांमधी चांगलेच दिसते. पण कालांतराने जसे मी त्यांना 
जवळून ओळखू लागतो तास तसे मला त्यांच्यातले वाईटच दिसू लागते. माझी त्यांच्या 
विषयीची भावना बदलते. असे कां होते ? आणि मी ही परिस्थिती कशी हाताळावी ?
 
श्री श्री : कधी कधी याच्या उलटही होते. सुरवातीला तुमचे एखाद्या 
व्यक्तीशी पटत नाही पण काही काळाने तुम्हाला ती व्यक्ती आवडू लागते. दोन्ही 
गोष्टी खऱ्या आहेत. जीवनात अशाप्रकारचे चक्र चालू असते. सुरवातीला तुम्हाला 
एखादी व्यक्ती आवडते आणि नंतर आवडेनाशी होते आणि पुन्हा काही दिवसांनी 
आवडायला लागते. तुमच्या आई बाबांना विचारा. (हास्य). त्यांचे लग्न आनंदात 
झाले. पण नंतर छोटी छोटी भांडणे आणि मतभेद होत गेले.  

प्रश्न : शांत आणि यशस्वी जीवनाचे रहस्य काय ? 
श्री श्री : मी तुम्हाला इतका वेळ तेच तर सांगतोय. लोक जसे आहेत तसा 
त्यांचा स्वीकार करा. नेहमी वर्मान क्षणात रहा.पूर्वी काय झाले आणि पुढे काय 
होणार याचा विचार करत बसू नका. 

प्रश्न : जागतिक शांती आणि सलोखा प्रस्थापित करण्यात धर्माची भूमिका काय आहे ?
 
श्री श्री: बुद्धीमां लोकांसाठी धर्म ही एक जमेची बाजू आहे. पण मूर्ख 
लोकांसाठी तो एक अडथळा आहे. प्रत्येक धर्मात काही खास गोष्टी आहेत, 
ज्याच्यामुळे आपले जीवन विकसित होऊ शकते. आपण जीवनात बहरून  येऊ 
शकतो. पण आपण जर मूर्ख असलो तर त्याचं गोष्टी लोकांमधील भेद आणि 
समस्यांचे मूळ बनू शकते. तर हे सर्व आपल्यावरच अवलंबून आहे. जगातल्या 
कोणत्याही धर्मात काही चूक नाहिये. तो धर्म पाळणाऱ्याच्या  समजण्यावर 
अवलंबून आहे. तुम्ही सुरीने भाजीही कापू शकता, लोणी लावू शकता किंवा 
तुम्हाला इहा पोहोचवू शकता. असे आहे ते . 


 


 






माझ्यापासून शांतीची सुरुवात होते.

30
2014
Aug
दिल्ली, भारत
 

(तुम्ही ज्याचा उपदेश करता तेच आचरणात आणा, या प्रवचनाचा हा पुढील 
भाग आहे)

साधारणपणे शंकांचे तीन प्रकार असतात.
१. जेंव्हा आपल्याला आपल्याविषयी शंका असते.
२. जेंव्हा आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांविषयी शंका असते.
३. जेंव्हा आपल्याला देवाविषयी शंका असते.

आपण देवाला केंव्हाही पाहिलेले नसते, म्हणून आपल्या मनात नेहमी त्याच्या 
अस्तित्वाविषयी शंका असते.

समाजातील प्रत्येक व्यक्तीकडे आपण संशयाच्यानजरेने बघत असतो. जेंव्हा 
लोकांनी आपल्याकडे संशयाने बघू नये असे वाटत असते तेंव्हा आपण पण 
त्यांच्याकडे संशयाने बघू नये.

आता मी जेंव्हा असे सांगतो , तेंव्हा तुम्ही आजूबाजूच्या सर्व लोकांवर पूर्णपणे 
विश्वास ठेवायला पाहिजे असे नाही. तुमचे पैशाचे पाकीट कोणत्याही त्रयस्थ 
व्यक्तीकडे देऊ नका किंवा त्याला ते घेऊन पळून जाऊ देत असे मला म्हणायचे 
नाही. पण आपल्या मनात काय चालले आहे याकडे आपण बारकाईने लक्ष दिले 
पाहिजे.

जोपर्यंत आपण स्वतःमध्ये सुधारणा करीत नाही, जोपर्यंत आपण आपले 
आंतरिक आनंद आणि प्रेम जागृत केले नाही तर समाजात आणि जगात शांती 
आणि आनंद कसा निर्माण होणार?

सर्व प्रथम आपण काही केले पाहिजे तर ते म्हणजे लोक जसे आहेत तसा त्यांचा 
स्वीकार करणे.

तुम्ही तुमच्या आयुष्यात अगदी तुमच्यासारखे असणाऱ्या किती लोकांना भेटला 
आहात? तुम्हाला तसा एकजण तरी भेटला आहे काय? नाही, तुम्हाला तसे कोणीच 
भेटले नाही. तरीसुद्धा तुम्हाला सर्वांनी तुमच्यासारखा विचार आणि वागणूक ठेवावी 
असे वाटते. तुम्हाला हे पण माहित आहे कि तुम्हाला तुमच्यासारखे जर कोणी 
भेटले तर तुम्ही त्याच्याबरोबर पांच मिनिटे पण राहू शकणार नाही. हे सत्य आहे 
कि तुमच्यासारखा विचार आणि वागणूक जर तुम्हाला भेटला तर तुम्ही त्याच्या 
बरोबर राहणे सहन करू शकणार नाही. आर्ट ऑफ लिविंगच्या स्थापनेचे हे एक 
तत्व आहे.

जगात येशू जरी एक होता तरी आज जगात त्यांचे किती संप्रदाय आहेत हे तुम्हाला 
माहित आहे काय? आज जगात येशूच्या अनुयायांचे ७२ संप्रदाय आहेत.
आज इस्लामचे किती संप्रदाय आहेत ? त्यातील पांच प्रमुख संप्रदायात शिया, 
सुन्नी, अह्मेदिया, सुफी, इत्यादी. गौतम बुद्ध हे एकच होते तरी आज जगात त्यांचे 
३२ संप्रदाय आहेत. आणि हिदुत्वाच्या बाबतीत तर किती संप्रदाय आणि परंपरा आहेत 
त्यांची तर गणतीच नाही. (हशा).

प्रत्येक थोर संतांचा एक संप्रदाय आणि त्यांच्या शिकवणीची एक परंपरा असते. 
शीख समाजातसुद्धा अनेक विचार धारणा आहेत. जसा काळ पुढे जातो तसा विविध 
संत, विविध धार्मिक तत्वज्ञान आणि विविध विचारधारा निर्माण होत असतात. 
आपण या नानाविध परंपरा आणि संप्रदाय यांची वाढ आणि विकास होऊ देणे गरजेचे 
आहे.

जेंव्हा कोणी एक व्यक्ती बाकी सर्वांना आपल्या विचारसरणीप्रमाणे विचार करायला 
आणि वागायला लावतो तेंव्हा मग आपण आज जसे सिरीया, इजिप्त या देशात 
जे पाहत आहोत ते घडते. तेथील अवस्था फार दुर्दैवी आहे. इराकमध्ये युद्ध सुरु 
व्हायच्या अगोदर मला तेथे काही विपत्ती येणार असे वाटत होते.

आमच्या येथे एक शीख गृहस्थ असून त्यांचा तेथे व्यापार आहे. मी आमच्यातील 
दोन डॉक्टर त्यांच्याबरोबर तेथे पाठविले आणि त्यांना त्या लोकांबरोबर बोलायला 
सांगितले. मी त्यांना सद्दाम हुसेन यांच्या एक मंत्र्याबरोबर पण बोलायला सांगितले. 
ते तेथे जाऊन त्या मंत्र्यांना भेटले, जे कि वित्तमंत्री होते. त्यांच्यातर्फे आम्ही 
सद्दामकडे असा निरोप पाठविला कि त्यांनी युद्ध करू नये कारण त्याने सामान्य 
लोकांना फार कष्ट होतात, रक्तपात पण होतो.

आता, त्यानंतर जे घडले ती एक फार मोठी कहाणी आहे. दुर्दैवाने युद्ध सुरु झाले. 
मग आम्ही रेड क्रॉस सोसायटीच्या शेजारी एक पुनर्वसन केंद्र सुरु केले. आता 
युद्धात या रेड क्रॉसच्या इमारतीवरपण बॉम्ब टाकण्यात आले आणि मग ते लोक 
तेथून पळायला लागले. मी त्या आपल्या केंद्रातील लोकांना बोलावून सुरक्षित 
आसरा घेऊन तेथून निघून जायला सांगितले.

ते मला काय म्हणाले माहित आहे? ते म्हणाले, “ गुरुदेव, आम्ही जर आमच्या 
कर्तव्यापासून पळून गेलो तर इथल्या जखमी माणसांची कोण काळजी घेणार? 
येथे रोज सुमारे ७०० जखमी लोक येतात कि ज्यांना वैद्यकीय उपचारांची गरज 
असते. आम्ही येथे थांबून त्यांची काळजी घेतो. तुम्ही आमच्यावर खूप माया 
करता आणि परमेश्वर आमची नेहमी काळजी घेत असतो, तर आम्ही येथे 
थांबून या लोकांना मदत करतो.”

या युद्धात सात लाख स्त्रिया विधवा झाल्या. तेथील परिस्थिती पाहण्यासाठी 
मी तीन वेळा तेथे गेलो होतो. तेथील लोकांनी एक अजस्त्र आणि जाडजूड भिंत 
बांधून तो विभाग वाटून घेतला आहे. शिया लोकांचा विभाग वेगळा असून, 
सुन्नी लोकांचा एक वेगळा विभाग आहे. आम्ही तेथील एका सुन्नी इमामना 
(इस्लामचे धार्मिक पुढारी) बरोबर घेऊन युद्धामुळे बेघर झालेल्या ८००० लोकांच्या 
एका खेड्याला भेट दिली. आम्ही तेथील लोकांशी बोललो, दुभाष्याच्या मदतीने 
त्यांच्या स्थानिक पुढारीलोकांशी पण बोललो आणि हे युद्ध थांबविण्यासाठी त्यांना 
प्रवृत्त केले. त्यांनी ते समजून घेऊन आमचे खुल्या दिलाने स्वागत केले. आणि 
मग हळूहळू शांतता प्रस्थापित व्हायले लागली.

इराक सरकारे तेथील ५० युवक बेंगलोरच्या आंतरराष्ट्रीय केंद्रात प्रशिक्षणासाठी 
पाठविले. त्यांना तेथे नोकरी होती, त्यांचा कुटुंब परिवार पण होता तरीपण 
त्यांच्या देशाच्या उद्धारासाठी या प्रशिक्षणाला ते येथे आले होते.

मी तुम्हाला सांगतो कि आजची सर्व युद्ध व्हायचे कारण अमेरिकन दारुगोळा 
बनविणाऱ्या कंपन्या आहेत. त्यांना त्यांची शस्त्रे कोणालातरी विकायची आहेत, 
नाहीतर त्यांचे शस्त्रांचे कारखाने बंद पडतील. ते बंदुका, दारुगोळा तयार करून 
दोघांना विकतात आणि मग त्या दोघांना युद्ध करायला भरीस पडतात.

भारत पण असे करू शकतो. हिंदू आणि मुसलमान यांना एकमेकाविरुद्ध 
लढायला लावता येईल पण ते असे नाही. मी काही सर्व उद्योगांविषयी बोलत 
नाहीये. तर आज जगभर जो एक बंदूक समर्थक वर्ग बळावत चालला आहे 
त्याविषयी मी बोलत आहे. हा काही एका देशापुरता मर्यादित नाही. त्याचा सर्वदूर 
प्रसार झाला आहे. हे असे का आहे?  कारण कि ते मानवी मूल्यांना महत्व देत 
नाहीत. त्यांना फक्त पैसा दिसतो आणि तो कसा वाढवायचा याच विचारात ते 
नेहमी असतात. आज सिरीया, इराण सारख्या देशात हेच चालू आहे. हे सर्व 
बघून खूप वाईट वाटते. इतकेच नाही तर खुद्द आपल्या देशात आसाम, नागालंड, 
जम्मू आणि काश्मीर येथे पण हेच चालु आहे.

हे आयुष्य अल्प आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. जेथे प्रेम करायला 
पुरेसा वेळ नाही तर मग द्वेष आणि रक्तपात याच्या मागे आपण का लागतो? 
आपण सर्वांनी हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे. येथे आपापल्या धर्माप्रमाणे
वागायला प्रत्येकाला मुभा असेल, आणि सर्व धर्मात एक प्रकारचा समन्वय असेल 
असे यामुळे होईल. आज भारतात काहीसे असेच आहे.

तुम्हाला माहित असेल, कि काही लोक मला विचारतात ‘ भारतीय लोक इतक्या 
नानाविध देवी देवतांचे पूजन का करतात?’ त्यांचा हा समाज चुकीचा आहे. 
तो एकच परमात्मा आहे, पण आपला वैयक्तिक संबंध आणि जवळीक निर्माण 
होण्यासाठी लोक आपापल्या परीने त्यांची पूजा-अर्चा करतात, आणि म्हणून त्यांना 
विविध आकार आणि विविध नावे आहेत. लोक जेंव्हा मूर्ती पूजा करीत असतात 
तेंव्हा पण ते त्या दगडाची पूजा करीत नसून ज्याप्रमाणे आपण आपल्या प्रिया 
व्यक्तीचे फोटो जवळ ठेवतो त्याप्रमाणे ते त्या दैवत्वाची पूजा करीत असतात.

आपण आपल्या मुलांचे फोटो आपल्याजवळ ठेवतो. ते जरी आपल्याजवळ नसले 
तरी तो फोटो बघतच तत्काळ आपल्याला त्यांची भेट घेतल्याचा आनंद होतो. 
तसेच मूर्तीचे आहे. दैवत्वाशी तत्काळ संबंध प्रस्थापित करण्यासाठी मूर्ती असते.