क्रोधाला हाताळणे

07
2012
Nov
बंगलोर, भारत
प्रश्न : गुरुदेव,माझ्या मनात असे कुतूहल आहे की तुम्ही आधीच सत्संगाची तयारी करून येता की आयत्या वेळी तुम्ही ध्यान निर्माण करता?

श्री श्री : हे तर त्या क्षणीच होते. मी काहीही तयारी करून येत नाही. मी तर अगोदरपासूनच तयार आहे. (हशा)

प्रश्न : पक्षपात न करता सदाचरण कसे हाताळावे? माझ्या हातून जर चूक घडली तर मी माघार घेतो आणि त्यामुळे विसरणे आणि माफ करणे या माझ्या क्षमतांवर बंधने येतात.

श्री श्री : जेवढे सगळे संतापतात ते सगळे सदाचरणाच्या तत्त्वावरच संतापतात. परंतु त्यांची सदाचरणाची कल्पना अतिशय संकुचित असते. या जगामध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी घडतात,तुम्हाला धीर धरणे जरुरी आहे. कायम सगळे काही बरोबरच असले (सदाचरण)पाहिजे आणि असे म्हणणे ,'मी बरोबर असायला पाहिजे आणि मला सगळे बरोबर पाहिजेत आणि तेसुद्धा आत्ता या क्षणी', तर असे शक्य नाही.

सगळे बरोबर असायची इच्छा असणे ठीक आहे,पण त्याकरिता त्यांना लांबच्या लांब दोरखंड द्या. सदाचरण असू देत पण त्याच्या सोबत सहनशीलता असली पाहिजे, मग क्रोध तुमचा ताबा घेणार नाही.

नाहीतर मग जेव्हा तुम्ही म्हणाल,'मी सदाचरणी आहे' , आणि 'मला हे पाहिजे', अशी जेव्हा तुम्ही मागणी कराल, तेव्हा क्रोध येईल, आणि एकदा का संतापाने प्रवेश केला की मग तुमचे सदाचरण तुम्ही हरवून बसाल. जर तुम्ही रागावला तर ते कोणी काही चुकीची कृती करण्याइतके वाईट.

समजा,कोणी ही जागा स्वच्छ केली नाही आणि इथे सगळी घाण आहे. तुम्ही इथे आलात आणि तुम्ही संतापलात. आता त्या व्यक्तीने तर साफसफाई न करून चूक केली, हे बरोबर आहे. परंतु तुमचे वैतागणे आणि आरडओरडा करणे ही दुसरी चूक आहे.

दोन चुका मिळून एक चुकीला बरोबर नाही करू शकत. म्हणूनच कोणी जर काही चुकी करत असेल तर संयमाने त्यांना एकदा सांगा,दोनदा-तीनदा सांगा आणि त्यांना शिकवा.

कोणाला शिकवणे हे भरपूर संयम आणि सहनशीलतेचे काम आहे. आजकालच्या शालेय शिक्षकांपुढे हेच आव्हान आहे. ते मुलांना दहा वेळा सांगतात आणि तरीसुद्धा मुले त्यांचे ऐकत नाहीत. लक्ष केंद्रित करण्याचा अभाव ही समस्या मुलांना आहे. मुले त्याचे काहीही करत नाही. म्हणूनच संयम आणि सहनशीलता असायला हवी.

संयम हा एक सद्गुण आहे. तो सहा संपत्तीपैकी एक आहे : साम (मनाची शांतता), दाम 
( आत्मसंयम), उपरती (ऐहिक वस्तूंपासून स्वतःला दूर करणे), तितिक्षा (सहनशक्ती), श्रद्धा (निष्ठा) आणि समाधान (थंड डोक्याचे असणे किंवा मनाचे केंद्रित असणे). समाधान म्हणजे ती तृप्तता आणि सहनशीलता असणे होय. हे असणे एकदम जरुरी आहे.

प्रश्न : गुरुदेव,जीवन जगण्याकरिता स्वतःच्यापेक्षा मोठे जीवन उद्देश्य कसे शोधावे? याचा शोध घेण्याची काही प्रक्रिया आहे का की ते उद्देश्य आपल्याला शोधते?

श्री श्री : तुम्हाला काय बनायचे आहे आणि तुम्हाला काय करायचे आहे याचे एक ध्येय, एक दूरदृष्टी तुमच्याकडे असायला पाहिजे...हे तुमच्याकडे पाहिजेच.

एक तर तुमचे वैयक्तिक ध्येय : मला आयुष्यात हे, हे, आणि हे मिळवायचे आहे.

दुसरे ध्येय हे ग्रहाकरिता असले पाहिजे : मी काय देऊ शकतो?

नेहमी असे होते की ध्येयाबद्दल विचार करताना तुम्हाला काय मिळवायचे याबद्दल तुम्ही विचार करता. म्हणूनच मी म्हणतो की तुमची दोन ध्येये असली पाहिजे : एक म्हणजे तुम्हाला काय मिळवायचे आहे,दुसरे म्हणजे तुम्हाला काय देऊ करायचे आहे. ही दोन्ही ध्येये जर एकच असतील तर अतिउत्तम.

प्रश्न : गुरुदेव,जर आम्ही आमच्या अन्न पदार्थांच्या सवयी बदलल्या तर आम्ही आमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकू का? असे म्हंटले जाते की जर आपण अतिशय मसालेदार जेवण जेवत असू तर आपल्याला जास्त राग येतो.

श्री श्री : तुम्ही तसे करून बघा. तुम्ही एक आठवडा मीठाशिवाय आणि तिखटाशिवाय जेवण जेवून बघा. तुम्ही म्हणता तसे असण्याची शक्यता आहे. परंतु अतिशय मसालेदार तिखट जेवणारे आणि तरीसुद्धा क्रोध न होणारे लोक आहेत. हे पण शक्य आहे.

तुम्ही धन्य आहात !

05
2012
Nov
बंगलोर, भारत

प्रश्न: आपण पाद्य पूजा ( एक भारतीय पारंपारिक स्वागत करण्याची पद्धत ज्यात अतिथीचे पाय पाण्याने धुवून त्यावर फुले वाहिली जातात) का करितो? पाद्य पूजेचे काय महत्व आहे?

श्री श्री : पूर्वीच्या काळी जेंव्हा अतिथी घरी यायचे तेंव्हा अशी त्यांचे पाय धुवून पूजा करायची पद्धत होती.

ते पूर्वी चालत यायचे आणि म्हणून त्यांच्या पायावर धूळ असायची जी मग पाण्याने धुवून काढली जायची. आपली विनम्रता दाखवायची ती एक पद्धत होती.

काही वेळा जेंव्हा आपल्याकडे कोणी पाहुणे आले तर एखादी पुष्प-माला त्यांना अर्पण करून किंवा काही फुले किंवा फुलांचा गुच्छ त्यांना दिला जातो. कोणे एके काळी जगभर हि पद्धत प्रचलित होती.

मोठ्या लोकांचे पाय धुवायची पद्धत असायचे कारण असे कि हात आणि पाय यातून उर्जा संक्रमित होत असते. म्हणून मग लोक एकमेकांना असे म्हणत कि “ तुमचे हात माझ्या डोक्यावर ठेऊन मला आशीर्वाद द्या”.

भारतात पद-स्पर्श करून आशीर्वाद घ्यायची पण पद्धत आहे. पण फक्त पायातून उर्जा संक्रमित होते हे म्हणणे तितकेसे योग्य नाही, तर ती साऱ्या शरीरातून येत असते. त्याचप्रकारचे फायदे हे शब्द उच्चारांच्या कम्पनातून येत असतात. हा आशीर्वादाचा खरा अर्थ आहे.

थोरांचे स्मरण करून पण आशीर्वाद मिळतात.

विचार, शब्द, दृष्टी आणि मग स्पर्श या माध्यमातून आशीर्वाद मिळतात.

जरी दर्शन, स्पर्श आणि दृष्टी या माध्यमातून आशीर्वाद मिळत असले तरी तुम्ही असे म्हणता कामा नये कि “गुरुदेव, माझ्या मस्तकाला योग्य तऱ्हेने स्पर्श करून मला आशीर्वाद द्या”.

हल्लीच्या काळी काही लोक आशीर्वाद कसा द्यायचा हे गुरूला शिकवायला लागले आहेत. 

कृपा आणि आशीर्वाद हे आपसूक येत असतात. त्यासाठी तुम्ही माझ्या पायावर डोके ठेवणे किंवा मी तुमच्या डोक्यावर हात ठेवणे याची गरज नसते. फक्त दर्शन घेऊन किंवा आवाज ऐकून आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचला असे समजा.

तुम्ही असे समजा कि, तुम्ही कोठेही बसून फक्त तुमच्या मनातून आशीर्वाद मागितले कि समजा ते तुमच्या पर्यंत पोहोचले म्हणून.

असेच श्राद्ध ( पूर्वजांचे स्मरण करून त्यांचा आदर सत्कार करायची पद्धत) केले जाते. त्यात आपण एके ठिकाणी बसून, जे आपल्याला सोडून गेलेले आहेत त्यांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद घेत असतो. आणि असा विचार करीत असताना ती कंपने आपल्यापर्यंत पोहोचतात.

तुम्ही मला असे विचाराल कि हे कसे शक्य आहे. मला सांगा काम वासना कशी जागृत होते? मनात तसे विचार येताच ती जागृत होते, होय कि नाही? शरीरात जास्त प्रमाणात संप्रेरके तयार होतात.

तुम्हाला राग कसा येतो? फक्त विचाराने.

दुस्वास कसा निर्माण होतो? जे तुम्हाला आवडत नाहीत त्यांचा फक्त विचार मनात येताच. त्यालोकांचा मनात विचार येताच शरीराचा थरकाप होतो.

भीती कशी वाटते? फक्त विचाराने.

मग जर फक्त विचाराने, काम वासना जागृत होते,राग येतो, भीती वाटते, दुस्वास वाटतो, मग विचाराने आशीर्वाद का मिळणार नाहीत? आशीर्वाद हे कमी परिणामकारक असतात किंवा ते मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करायला लागतात? नाही! त्यासाठी तुम्ही काही करायची गरज नसते. फक्त विचाराने तुम्ही आशीर्वाद मिळवू शकता.

आणि म्हणून मग अनेक धार्मिक पाठ जसे कि दुर्गा सप्तशती केल्याने तुम्हाला आनंदी वाटायला लागते. त्या मागचे कारण असे आहे कि देवाचे स्मरण करून आशीर्वाद मिळवता येतात. हे असे घडत असते. म्हणून जेंव्हा तुम्हाला उपकृत वाटत असेल तेंव्हा निश्चितच आशीर्वाद पण मिळालेले असतात.

प्रश्न: असे म्हणतात कि शरण गेलेल्या माणसाला सर्व गोष्टींचा लाभ होतो, मग असे म्हणणे योग्य होईल का कि ज्याला सर्व काही मिळालेले नाही तो पूर्णपणे शरण गेलेला नाही?

श्री श्री : सर्व काही मागण्यापूर्वी शांतपणे विचार करायला पाहिजे. तुम्ही जर सर्व मागाल तर त्यात चांगले आणि वाईट अशा सर्वांचा समावेश असेल. आनंद, दुःख, समस्या असे सर्व काही त्यात समाविष्ट असू शकते. हे सर्व आयुष्याचा एक भाग आहे.

यात तुमच्या विचारांची स्पष्टता दिसत नाहीये. तुम्हाला काय पाहिजे हेच तुम्हाला स्पष्टपणे माहित नाहीये. एखाद्या दिवशी शांतपणे कोठेतरी बसून ठरवा कि तुम्हाला काय पाहिजे? तुमच्या मनात अनेक इच्छा निर्माण होऊन मग संभ्रम निर्माण होतो हे काही बरोबर नाही. एक इच्छा ठेवा आणि मग तिचा पाठपुरावा करा. असा एक पण माणूस सापडणार नाही जो म्हणेल कि त्याची कोणतीच इच्छा पूर्ण झाली नाहीये. त्याचप्रमाणे ज्याच्या १००% इच्छा पूर्ण झाल्या आहेत असा माणूस पण सापडणार नाही.

माणूस जितका जास्ती सात्विक तितक्या त्याच्या इच्छा जास्त पूर्ण होतात, आणि तो जे काही इच्छा करेल ती फलद्रूप होईल.

तुम्ही जितके आनंदी असाल तेवढे जास्त काम पूर्ण होईल.

तुमच्या इच्छा आकांक्षा जेवढ्या कमी, त्याप्रमाणात त्या जास्त पूर्ण होतील.

तुम्हाला जर मिनिटाला एक अशी इच्छा व्हायला लागली तर आपली बुद्धी जी एक संगणकासारखी आहे ती संभ्रमात पडून अचानक बंद पडेल.

तुमच्या भ्रमण ध्वनी सारखे एका वेळी अनेक कामे करायला घेतलीत तर ते बंद पडेल. आपली बुद्धी हि त्या भ्रमण ध्वनिसारखी एक संगणक यंत्रणा आहे. त्याचप्रमाणे इच्छा बाळगणे हि पण एक कला आहे आणि मग बाळगलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणे हि पण एक कला आहे.

मग पुढे जाऊन न इच्छिलेल्या आकांक्षा पूर्ण होणे हि एक फार मोठी कला आहे, यालाच सिद्धी म्हणतात.

तुमच्यापैकी कितीजणांना असा अनुभव आहे कि मनात यायच्या अगोदर इच्छा पूर्ण झाल्या आहेत? (प्रेक्षकांपैकी अनेकजण हात वरती करतात.)

पहा, येथे अनेक सिद्ध बसले आहेत. प्रत्येकजण हात वरती करीत आहे. तुम्ही मनात इच्छा करायच्या आधी ते काम झालेले असते हे खरोखरीच प्रशंसनीय आहे.

प्रश्न: गुरुदेव, आत्म-बोध झाल्यानंतर राजा जनकाने तपस्या केली असे तुम्ही म्हणालात. आत्म-बोध झाल्यानंतर तपस्या करणे शक्य आहे काय?

श्री श्री : मी असे म्हटले होते कि आत्म-बोध झाल्यानंतर भोग भोगणे म्हणजे तपस्या होय. मी आत्म-बोधानंतर जगण्याविषयी काही बोललो नाही. आत्म-बोधाआधी योग हि तपस्या असते तर आत्म-बोधानंतर भोग हि तपस्या असते.

प्रश्न: शिव-परिवारातील लोकांची वाहने हि मर्त्य पशूंची बनलेली आहेत जसे कि सिंह आणि बैल, किंवा साप आणि उंदीर. या मागील रहस्य काय आहे?

श्री श्री : विरोधी गोष्टी या नेहमी एकमेकांना पूरक असतात. शिवाच्या सान्निध्यात सर्व गोष्टी या संयुक्त असतात. जेंव्हा अध्यात्म वाढते तेंव्हा वेगवेगळे लोक एकत्र येतात.शिव-तत्व किंवा गुरू-तत्वाच्या सानिध्यात एक तऱ्हेचे नव्हे तर भिन्न भिन्न प्रवृत्ती असलेले एकत्र नांदताना दिसतात. हे त्याचे वैशिष्ट् आहे.

प्रश्न: मी असे ऐकले आहे कि या कलीयुगात तमस गुणांची वाढ होणार आहे, पण साधक लोकांसाठी हा एक चांगला काळ आहे.तमस गुण वाढीवर असतांना हा काळ साधकांसाठी चांगला कसा?

श्री श्री : असे पहा कि जेंव्हा तुम्ही साधक होता तेंव्हा कोणताही काळ हा उत्तम आणि फायदेशीर समजला पाहिजे. आनंद आणि दुःख यांचे काही विशिष्ट स्थान असते. सर्व प्रकारची परिस्थिती हि साधकासाठी उपयोगी समजून ती साधनेच्या दृष्टीने एक महत्वाचा घटक म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे.

प्रश्न: गुरुदेव, तुमची कृपा सर्व साधकांवर सारखी असतांना काही साधकांना इतरांपेक्षा जास्त संघर्ष का करावा लागतो?

श्री श्री : सर्वजण सारखे नसतात. देवाने सर्वांना एकसारखे बनविले नाहीये. जगात अनेक प्रकारचे, विभिन्न क्षमता असलेले, भिन्न विचार सरणी असलेले, विभिन्न लालन-पालन असलेले, विविध संस्कार असलेले असे लोक असतात.

जेंव्हा तुम्ही स्वतः एक साधक असता तेंव्हा स्वताची दुसऱ्या बरोबर तुलना करू नका. स्वतःला अतुलनीय समजा. प्रत्येकाने स्वतःला अतुलनीय समजायला पाहिजे.

जेंव्हा आपण कोणाबरोबर तुलना करू लागतो तेंव्हा मग आपले लक्ष बाहेर केंद्रित होऊन मग लालसा, घृणा यांच्या एका गुंत्यात अडकले जाऊ लागतो.

प्रश्न: गुरुदेव, तुम्ही अंतर्यामी आहात, आपण सर्वकाही जाणता. कृपया माझ्या मनातील प्रश्नाचे उत्तर द्या.

श्री श्री : मी तेथे तुमच्या मनात त्याचे उत्तर देईन.

जर तुमच्या मनात एक प्रश्न असता तर गोष्ट वेगळी होती, पण मला तर तेथे अनेक प्रश्न, एखाद्या साखळी सारखे तुमच्या मनात तयार झालेले दिसत आहेत.

शांतपणे आरामात बसा. मग तुमच्या असे लक्षात येईल कि सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपसूक मिळत जातील.

प्रश्न: गुरुदेव, पुरुष आणि प्रकृती यांचा जन्म कसा झाला? त्या दोघात काय नाते आहे?

श्री श्री : आता त्यांचा जन्म कसा आणि कधी झाला हे तर मला माहित नाही. खरेतर त्यांचा जन्म झाला कि कसे हे पण मला माहित नाही. अनंतकाळापासून ते अस्तित्वात आहेत.

कारण आणि परिणाम

04
2012
Nov
बंगलोर, भारत

प्रश्न: गुरुजी, हे सर्व तुम्ही कुठून शिकलात? तुम्हाला ध्यान करायला कोणी शिकवले?

श्री श्री : तुम्ही लेखक किंवा कवींना विचारता कि ते कुठून शिकले? ते आपोआपच लिहितात कि नाही? जर का कवी किंवा लेखक जर कुठूनतरी कॉपी करू लागले तर आपण ते त्यांनी निर्माण केले असे म्हणू शकतो का? तसेच, जेंव्हा कोणी समाधी अवस्थेमध्ये जाते, तेंव्हा हे सर्व त्यांना अंत:स्फुर्तीनेच ( परमेश्व्वाराकडूनच ) यायला लागते.

प्रश्न: काही सणांमध्ये आपण सर्व प्रकारचे धन्य दान म्हणून देतो. असे का म्हणतात कि या दानाबरोबर ‘मीठ’ देऊ नये ?

श्री श्री : तो तर फक्त एक रिवाज आहे. हे काही शास्त्रांमध्ये सांगितलेले नाहीये. त्याची काही काळजी करू नका.

असा कुठलाही पदार्थ नाही कि ज्यामध्ये मीठ नसते. सगळ्या पदार्थांमध्ये थोड्याफार प्रमाणात मीठ हे असतेच. नैवेद्यासाठी बनविलेल्या सगळ्या पदार्थांमध्ये मीठ हे असतेच. नारळाच्या पाण्यामध्ये मीठ असते. असे म्हणतात कि अगदी फळांमध्ये सुद्धा मीठ असते. आपण ज्या हवेमध्ये श्वास घेतो त्यामध्येही मीठ असते.

असे म्हणतात कि तेल, मिरची आणि पाणी कोणाच्या हातात देऊ नये म्हणून.म्हणून या गोष्टी जमिनीवर ठेवून देत असत. असे म्हणतात कि या गोष्टी जर का हातात दिल्या एका व्यक्तीची स्पंदने त्यामधून दुसर्या व्यक्तींकडे जातात.

जर कोणाच्या काम्पनं मुले तुम्हाला काही परिणाम जाणवत असेल तर भजन म्हणा किना ओम नमः शिवाय चा जप आणि प्राणायाम करा. सर्व नकारात्मक परिणाम दूर होईल.

प्रश्न: मला योग वशिष्ठ मधला एक प्रश्न आहे. भृगु महर्षींचे पुत्र शुक्राचार्यांनी मंत्र म्हणून आणि पवित्र जल शिंपडून एका मृत व्यक्तीला जिवंत केले.हे खरोखर शक्य आहे का?

श्री श्री : योग वशिष्ठ मधील गोष्टींच्या मागे खूप सखोल अर्थ दडलेला आहे. ते एकदा वाचून पुरेसे नाही. तुम्ही ते जसजसे परत परत वाचाल तसतसे त्यामधले रहस्य उलगडत जाईल. 

प्रश्न: आपण जेंव्हा मंत्रांचा जप करतो, तेंव्हा ते आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर , लोकांवर आणि पूर्ण जगावर कसा काय परिणाम करतात?

श्री श्री : या जगात प्रत्येक गोष्ट एक दुसर्यावर प्रभाव पाडत असतात. म्हणून तुम्ही जेंव्हा जेंव्हा मंत्र म्हणता, हवन करता, त्याचा आपल्या सभोवताली एक सकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे तुमच्यामध्ये सकारात्मक कंपने तयार होतात आणि त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक उर्जा पसरते.

प्रश्न: दक्षिणामूर्ती (गुरुस्वरूपी भगवान शंकर), यांना ‘सामवेद प्रिय’ असे का म्हंटले आहे?

श्री श्री : जे लोक सामवेदाशी संबंधित आहेत, नक्की हे त्या लोकांनी लिहिले असेल. जर हे ऋग्वेदी लोकांनी लिहिले असते तर त्यांनी रुग्वेदाप्रीय म्हंटले असते. यजुर्वेदी लोक म्हणतील कि यजुर्वेद सर्व वेन्दांमधील श्रेष्ठ आहे.

भगवान कृष्णाने म्हंटले आहे, ‘ वेदानामसामवेदोस्मी’ (भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक २२). कारण सामवेदा मध्ये भक्ती आणि संगीत, यांना महत्त्व दिले आहे. मेंदूच्या २ भागांमध्ये, डावा मेंदू हा तार्किक आहे तर उजवा मेंदू हा संगीत आहे. साम वेदामध्ये तर्क आणि संगीत, दोन्ही आहे. अशी शक्यात आहे कि म्हणूनहि असे म्हंटले जाते.

प्रश्न: कन्नड भाषेची तुलना कस्तुरी शी का केली आहे?

श्री श्री : तुम्हाला त्याची तुलना मोगऱ्या शी करायची असेल तर तुम्ही करू शकता. कवींनी त्याला ‘कस्तुरी कन्नडा’ असे म्हंटले आहे. त्यांनी असे का म्हंटले हे तुम्ही विचारू शकत नाही. जसे कि, सुंदर स्त्री ला चंद्रमुखी म्हंटले आहे. म्हणजे, ती जिचे मुख चंद्रासारखे आहे अशी. आता खरे तर चंद्रावर खूप सारे डाग आहेत. मग तिच्या चेहऱ्याची तुलना चंद्राशी का केली आहे?

असे म्हणतात कि भुकेलेल्याला चंद्र हा हुलग्या (कानडी पक्वांना) सारखा दिसतो. कस्तुरीचा सुगंध खूप चं असतो. म्हणून कवींनी कन्नड भाषेला मधुर भाषा असे म्हंटले आहे.

प्रश्न: आजकाल आपल्या देशात खूप ठिकाणी दुष्काळ पडला आहे. जर आपण गंगा आणि कावेरी नद्या जोडल्या, तर जल सिंचनाला मदत होईल. तुम्ही राजकारण्यांशी गंभीरपणे याविषयी बोलाल का?

श्री श्री : वैज्ञानिक म्हणतात कि आपण जर आपल्या देशातील सर्व नद्यांवर धरण बांधले आणि समुद्राला मिळणारे पाणी जर अडवले, तर सर्व भारत हा २ फूट पाण्यामध्ये असेल. ( जलसिंचन व्यवस्थित होईल) खुपसे पाणी नद्यांमधून वाहून जाऊन समुद्राला मिळते आणि वाया जाते. आपण नद्यांमधील पाणी काळजीपूर्वक वापरले पाहिजे. पाण्याची कमतरता मुळीच नाहीये. पावसाचे प्रमाण लक्षात घेता भारताचा क्रमांक जगात दुसरा आहे. पण आपण पाण्याचा साठा योग्य प्रकारे करीत नाही.

तुम्ही गट तयार करून पावसाचे पाणी वाचविण्यासाठी धरण बांधा.

प्रश्न: २०१२ मध्ये विशेष करून युरोपिअन लोकांसाठी ‘वेदिक ज्ञान शिबीर’ का आयोजित करण्यात आले होते?

श्री श्री : आपण ते उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील लोकांसाठी केले असते, तर खूप लोक जमले असते. आम्हाला १०० ते १५० लोकांचा गट करायचा होता. म्हणून आम्ही फक्त युरोप साठी ठेवला होता. जर सर्व जगासाठी केला असता तर प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला असता आणि गुरु पूजा कोर्स (१५०० लोक) सारखा झाला असता. आता मला वाटले कि इथे एवढी जागा नाहीये, म्हणून फक्त छोट्या गटासाठी ठेवला होता. या वर्षी, ज्ञानाच्या नवीन लाटेची गरज होती आणि तसे होईल सुद्धा. तुम्हा सगळ्यांना खूप मोट्ठे कार्य कराचे आहे. आज या पुरातन ज्ञानासाठी जग तयार आहे. म्हणून ज्यांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला होता, त्या सर्वांनी हे ज्ञान लाखो लोकांपर्यंत पोचवून त्यांच्या जीवनात प्रकाश आणि हास्य फुलवावे.

प्रश्न: thyroid चा त्रास असलेल्या स्त्रियांची संख्या वाढते आहे. यावर उपाय काय?

श्री श्री : मला असे वाटते कि आपल्या अन्नातील कीटक नाशके आणि रसायने यामुळे असे होते आहे.

पुरातन ज्ञान

30
2012
Oct
बंगलोर, भारत
प्रश्न: गुरुदेव, आम्ही उद्यापासून वेदिक ज्ञानाबद्दलची सत्रे सुरु करत आहोत. उपनयन (मुंज) पासून त्याची सुरुवात होईल. युरोपातून सुमारे १०० लोक आले आहेत. हे वेदिक ज्ञान आपल्या रोजच्या जीवनात कसे वापरावे याबद्दल कृपया आम्हाला मार्गदर्शन कराल का?

श्री श्री: असे बघा वेदिक ज्ञान इथे अनादी काळापासून आहे. ह्या ज्ञानाचा कधी उगम झाला याची नेमकी वेळ नाही. हे कोणी एका माणसाने सुरु केले नाही. जेंव्हा लोक गहन ध्यानात गेले तेंव्हा त्यांना हे उमगले. अनेक ऋषींनी जेंव्हा ध्यान केले तेंव्हा त्या गहन मौनात त्यांना काही ऐकू आले. त्यांनी जे ऐकले त्याचे ते कथन करत गेले आणि कोणालातरी ते लिहून घ्यायला सांगितले. त्यानंतर त्याचा एकाकडून दुसर्याकडे तोंडी प्रसार झाला. याचप्रमाणे पाठांतराच्या माध्यमातून इतर सर्व शाखा, जसे आयुर्वेद पसरवले गेले.

आयुर्वेदाचा उगम कसा झाला याची तुम्हाला कल्पना आहे का?

मध्य भारतात निमिषारण्य नावाचे अरण्य होते. त्या जंगलात ८४००० साधू आणि साधक जमले. त्यांनी विचार केला की ‘समाजाच्या कल्याणासाठी, येणाऱ्या पिढीसाठी आपण काहीतरी केले पाहिजे’ त्यांचे हेच उदिष्ट होते. त्यांनी ठरवले की आपण ध्यान करून आयुर्वेद; जीवनशास्त्र समजावून घेऊ. पण जर सगळेच ध्यानात गेले तर मग ते ज्ञान लिहून कोणी काढायचे? त्यामुळे त्यांनी एका ऋषिवर ही जबाबदारी टाकली. ते ऋषी म्हणाले ‘मी जागा राहतो, आणि सगळे लिहून काढतो. तुम्ही सगळे ध्यानात जा आणि जे जे येईल ते सांगत रहा’. ८४००० ऋषी ध्यानात गेले आणि एका, भारद्वाज ऋषींनी सगळे ताडाच्या पानांवर लिहून काढले. अश्याप्रकारे एका चेतनेतून संपूर्ण आयुर्वेद जन्माला आला आहे. त्यामुळेच काळाच्या कसोटीवर तो टिकून आहे.

प्रत्येक अवयवासाठी जी जडीबुटी सांगितली आहे त्याचे कोणी खंडन करू शकत नाही. आजही ते सत्याची साक्ष आहे.

याचप्रमाणे संगीत सुद्धा असेच उगम पावले आहे. संगीतात सात सूर आहेत ‘सा रे ग म प ध नी’ हे सात सूर सात प्राण्यांशी जोडलेली आहेत. जसे शरीराने मोठ्ठा असलेला हत्ती, ‘नी’ असे म्हणतो. जेंव्हा जेंव्हा हत्ती आवाज काढतो तेंव्हा त्यात ‘नी’ किंवा निषाद (संगीतातील एक प्रकार) असतो. याचप्रमाणे बुलबुल ‘पा’ असा आवाज काढतो. बुलबुल पाचव्या आवर्तात, ‘पा’ गातात. ‘रे’ ऋषभ (रेडा किंवा म्हैस) याचाशी निगडीत आहे. वेगवेगळी जनावरे जेंव्हा आवाज काढतात तेंव्हा ‘सा रे ग म प ध नी’ तयार होते. फक्त मनुष्य या सगळ्याचा सूरमिलाप करू शकतो. ‘गंधर्व वेद’ हे संगीताबद्दलचे एक विलक्षण शास्त्र आहे. संगीतकारांनी हे शिकले पाहिजे. हे खूप मनोरंजक आहे.

असे म्हणतात ७२ प्रमुख धून, राग आहेत, आणि त्या ७२ धुनीच्या अनेक उपधून आहेत. ‘खरार प्रिया’ नावाच्या रागाच्या २००० उपधून आहेत. संगीत, धून, सुरावट कसे जन्मले हे गंधर्व वेदात सांगितले आहे.

याच प्रमाणे ‘स्थापत्य वेद’ (वास्तुशास्त्र आणि दिशांशी संबंधित ज्ञान) घर कसे बनवावे, त्याची दिशा कशी असावी, त्याचे परिणाम याबद्दल सांगते. पण यातील बरेचसे ज्ञान, शास्त्र लुप्त होत आहे. मध्यमयुगीन काळात हे ग्रंथ, लेख जाळून टाकण्यात आले. ह्या ज्ञानाची कदर केली नाही, आणि बरेचसे लुप्त झाले.

प्रश्न: गुरुदेव आम्हीही हे ध्यान करून समजू शकतो का?

श्री श्री: होय आपण सुद्धा हे समजू शकतो. पण असे म्हटले जाते की कलीयुगात (विश्वाच्या पूर्ण चक्रातील शेवटचे युग) या गोष्टीला मर्यादा आहेत. कलीयुगात ‘तमो गुण’ जास्त प्रभावी आहे, म्हणूनच जास्तीत जास्त लोकांनी ध्यान केले पाहिजे जेणेकरून नवनवीन गोष्टी शोधल्या जातील.

जेंव्हा वातावरणात खूप तमस असतो तेंव्हा त्याला दूर करणे गरजेचे असते. त्यामुळे इथे हे सगळे यज्ञ तुम्हाला दिसत आहेत. भारतात इतर ठिकाणी क़्वचित हे यज्ञ इतक्या शास्त्रशुद्ध पणें आणि साग्रसंगीतपणे केलेले तुम्हाला दिसतील.

प्रश्न: गुरुदेव, ‘राम नाम सत्य है’ हा जप माणूस मेल्यानंतर का केला जातो?

श्री श्री: कारण कोणीतरी मेल्यानंतर तरी लोकांनी हे लक्षात ठेवावे म्हणून. बरेचदा लोक दूरचे कोणीतरी गेले कि हा जप करतात. आपल्या जवळचे कोणीतरी गेले कि आपल्याला या जपाची आठवण होत नाही.

कमीतकमी दूरचे का होईना कोणीतरी गेल्यावर माणसाला समजते कि देवाचे नामस्मरण हेच एक सत्य आहे, बाकी सर्व क्षणभंगुर आहे. लोकांना याची जाणीव करून देण्यासाठी ही प्रथा सुरु झाली. ही प्रथा फक्त उत्तर भारतात दिसून येईल, दक्षिण भारतात कोणीतरी गेल्यानंतर मौन पाळतात.

प्रश्न: गुरुदेव, बरेचदा मन आपल्या अंतरंगाचा आवाज दडपते. आपले अंतर्ज्ञान विकसित करण्यासाठी काय करावे?

श्री श्री: आपण ३ प्रकारचे ज्ञान मिळवतो. पहिल्या प्रकारचे ज्ञान म्हणजे ‘इंद्रियजन्य ज्ञान’. हे ज्ञान आपल्याला ५ इंद्रियांद्वारे मिळते. डोळ्यांनी बघणे, कानांनी ऐकणे, नाकाने वास घेणे, जीभेनी चव घेणे आणि स्पर्श. हे मुलभूत ज्ञान आहे.

या पेक्षा वरचे म्हणजे जे बुद्धीद्वारे मिळवले जाते, ‘बुद्धी जन्य ज्ञान’– बौद्धिक ज्ञान.

याही वरचे म्हणजे जे ‘आतून’ येते ते ज्ञान, विनाप्रयत्न येणारे अंतर्ज्ञान, जे आपल्या ५ इंद्रियाशिवाय येऊ शकते. हे ज्ञान आपल्या आतून उमलते.

हे झाले ज्ञानाचे ३ स्तर.

बुद्धीद्वारे मिळालेले ज्ञान इंद्रियांद्वारे मिळालेल्या ज्ञानपेक्षा वरचे आहे, आणि त्याही पेक्षा वरचे आहे अंतर्ज्ञान. आपण जसजसे मोठे होतो तसतसे ज्ञान अधिक तरल आणि शुद्ध होते कारण मन सुद्धा परिपक्व आणि तरल होते. मन तीव्र इच्छा आणि घृणा यापासून मुक्त होते. यामुळे आपल्याला हे तरल ज्ञान, अंतर्ज्ञान प्राप्त होते.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, तुम्ही तुमच्या भक्तांना कोणत्या निकषावर पुरस्कृत करता. कारण मला वाटते कि मी मला जे मिळाले आहे त्याच्या १०% सुद्धा मी याला पात्र नाही. तुमच्याकडून मोजणीत काही चूकभूल झाली आहे का?

श्री श्री: मी काही मोजणी करत नाही, कशाला तसदी घ्यायची? मी आरामात असतो. तुम्ही सुद्धा निवांत राहा.

आपल्याला आपल्या योग्यतेपेक्षा जास्त मिळाले आहे याची जाणीव असणे चांगले आहे. त्यामुळे आपण अधिक नम्र होतो. सतत काहीतरी मागणे आपल्या डोक्यातून निघून जाते, सतत काहीतरी मागण्यामुळे प्रेम नष्ट होते. जेंव्हा आपल्याला जाणीव असते की आपल्याला आयुष्यात खूप काही मिळाले आहे तेंव्हा आपण प्रेम करतो. आपण कृतज्ञ असतो तेंव्हा आपल्याला अधिक मिळते. आपण जितके अधिक कृतज्ञ तितके अधिक आपल्याला मिळते. आपण जर असे म्हणू लागलो ‘ओह मी इतके केले पण मला फक्त एवढेच मिळाले, मला अधिक हवे ’तर मग तक्रारी, राग, चिडचिड आणि नैराश्य येईल.

आयुष्यात आपली धारणा ‘ओह, मला माझ्या योग्यतेपेक्षा जास्त मिळाले आहे’ अशी असावी.

याचा अर्थ तुम्ही काम करू नये असा नाही. तुम्ही काम केले पाहिजे. काम करत असताना तुमची धारणा ‘माझी कामाची क्षमता मला वाटते त्या पेक्षा अजून खूप आहे’ अशी असावी.पण ज्यावेळी काहीतरी मिळायची वेळ येईल तेंव्हा ती आपल्याला खूप काही मिळाले अशी असावी. हीच गोष्ट तुम्हाला उंचीवर, विशेषतः अध्यात्मिक उंचीवर घेऊन जाईल. हा आपला नियम असावा.

मानवी हक्काच्या बाबतीत मात्र मी म्हणेन हा नियम लागू नसावा. जर तिथे तुमच्या हक्कांची पायमल्ली होत असेल तर तुम्ही हक्काने त्याची मागणी करावी. पण तुमच्या अध्यात्मिक उन्नतीसाठी जाण ठेवा ‘मला माझ्या योग्यतेपेक्षा बरेच मिळाले आहे’ याचा अर्थ एवढाच आहे की तुमचा देवावर आणि त्याच्या न्यायावर पूर्ण विश्वास आहे.

प्रश्न: गुरुदेव. आर्ट ऑफ लिविंग आता खूप लोकप्रिय झाले आहे, तरीही आमच्या पालकांना समजावताना बर्याच अडचणी येतात. तुमच्या वेळी तुम्ही तुमच्या पालकांची परवानगी कशी मिळवलीत?

श्री श्री: होय मलाही त्यासाठी खूप कष्ट करावे लागले. तुम्हाला माहित आहे मला दाढी का ठेवावी लागली? नाही माहित? दिल्ली मध्ये मी जेंव्हा शिकवायला सुरुवात केली तेंव्हा बरेच प्राध्यापक तिथे येत, कारण त्यांनी ऐकले होते कि मी ध्यान शिकवतो. ते जेंव्हा जागेवर येत तेंव्हा विचारत असत ‘गुरुदेव कुठे आहेत?’ मी त्यांना सांगत असे ‘मी गुरुदेव आहे’ मी १९ वर्षांचा लहान मुलगा दिसत असे त्यामुळे ते मला गांभीर्याने घेत नसत. मी बोलत असताना ते इकडे तिकडे बघत आणि विचार करत असत ‘ओह, हा छोटा मुलगा काहीतरी बोलत आहे’. ते मला गांभीर्याने घेत नसत आणि माझ्याकडे लक्ष देत नसत. काही लोक म्हणत ‘ओह तुम्ही गुरुदेव आहात?’ असे म्हणून ते तिथून पळून जात.

त्यानंतर मी थोडा मोठा आणि प्रौढ दिसण्यासाठी दाढी वाढवू लागलो. मी जेंव्हा बंगलोरला परत आलो तेंव्हा मी दाढी वाढवलेली बघून माझ्या आईला आवडले नाही. ती भानूला म्हणत असे ‘त्याला सांग दाढी काढून टाक’ आणि मग भानू तिला सांगे ‘मी नाही सांगणार तूच त्याला सांग’. त्या दोघींचा हा संवाद मी दुसर्या खोलीतून ऐकत असे. ती म्हणत असे ‘त्याला आत्ता काही सांगू नकोस तो बर्याच दिवसांनी घरी आला आहे, त्याला जे करायचे असेल ते करू देत, त्याला नाराज करू नको’ त्या दोघींना मी दाढी ठेवलेली आवडत नसे पण तरीही मी ती ठेवली कारण लोक मला शिक्षक असण्याइतका मोठा समजत नसत. मी तसाही पहिल्यापासून लहान मुलासारखाच आहे!!

मला दाढी ठेवावी लागली आणि एकदा ठेवली ती कायमचीच. तर ही अशी गोष्ट आहे.

प्रश्न: गुरुदेव, आपण १० इंद्रियांवर कसा विजय मिळवावा (इथे प्रश्नकर्ता ५ कर्मेंद्रिय, आणि ५ ज्ञानेंद्रिय या बद्दल बोलत आहे)

श्री श्री: पहिल्यांदा स्वतःला व्यस्त ठेवा. जर तुम्ही निष्क्रिय झालात तर तुमची इंद्रिय तुमच्यावर नियंत्रण करतील. स्वतःला व्यस्त ठेवणे महत्वाचे आहे. आयुष्यात मोठे ध्येय ठेवा त्याने तुम्हाला याचा त्रास होणार नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे संयम आणि तुम्ही काय खातापिता याकडे लक्ष द्या.

प्रश्न: गुरुदेव, जर कर्माचा ठसा आपल्या मनावर उमटलेला असेल तर तो काढून टाकण्यासाठी ‘मी हे मन नाही आणि मी जो कोणी आहे त्याला कर्म चिकटू शकत नाही’  इतके माहित असणे पुरेसे आहे का? की मला पश्चाताप करून स्वतःला सुधारावे लागेल?

श्री श्री: नाही, हे माहित असणे पुरेसे आहे. तुम्ही क्षमा मागून सुधारणा करू शकता, पण हे माहित असे महत्वाचे आहे.

प्रश्न: भगवत गीतेत कृष्ण अर्जुनाला सांगतो ‘आदित्यात मी विष्णू आहे, वेदात मी सामवेद आहे, देवात मी इंद्र आहे आणि रुद्रात मी शंकर आहे’ . त्याने एकापेक्षा वरचढ असणे का पसंत केले?

श्री श्री: त्याने नेहेमीच ‘मी सर्वोत्कृष्ट आहे’ असे म्हंटले आहे. तो नेहेमीच सर्वोत्कृष्ट आहे. वेदात सामवेद उत्तम मानला जातो कारण तो संगीतमय आहे. संगीत, स्वरमेळ, प्रेम, आणि भक्ती यांची तो जननी आहे. कृष्ण एकाच्या तुलनेत दुसरे पसंत करतो. ही त्याची पसंती आहे. त्याने असे कधीही म्हंटले नाही की बाकीच्या गोष्टी कमी महत्वाच्या आहेत किंवा चांगल्या नाहीत. त्याने फक्त म्हंटले‘मी असा आहे’. जसे तुम्ही हॉटेल मध्ये जाता आणि विशिष्ठ गोष्ट मागता आणि म्हणता ‘मला हे आवडते’ याचा अर्थ तुम्हाला इतर गोष्टी आवडत नाहीत असे नाही.

नकारात्मक मतांना हाताळा

28
2012
Oct
बंगलोर, भारत
सखोल विश्रांतीमधेच (ध्यानावस्थेमध्येच) केवळ देव सापडू शकतो.

या सखोल शिथिलते मध्ये कोणकोणत्या अडचणी आहेत हे तुम्हाला माहिती आहे? मनाच्या लालसा आणि मनाचे तिरस्कार. मन जर लालसा आणि तिरस्कार यांनी ओतप्रोत असेल तर संपूर्ण आराम शक्य नाही. आणि जर आराम नसेल तर साधनेचा (अध्यात्मिक सरावाचा) उद्देश्य साध्य होत नाही.

म्हणूनच आपण इच्छा आकांक्षा आणि तिरस्कार यांच्यापासून आपले मन मुक्त करणे गरजेचे आहे.

तर मग आपण हे कसे साध्य करू शकू?

'मला कोणाकडून काहीही नको ', याची आपण आपल्या मनात घट्ट खुणगाठ बांधणे जरुरी आहे.

जेव्हा आपल्याला कोणाकडून काहीही नको असते तेव्हा आपल्या मनामध्ये इतर कोणाच्या प्रती इच्छा आकांक्षा लालसा या उठणार नाहीत. जेव्हा कोणतीही इच्छाच जर निर्माण झाली नाही तर कोणत्याही प्रकारचा तिरस्कार जन्म घेणार नाही.

ती व्यक्ती वाईट आहे असा कोणाबद्दलही विचार करू नका. या जगामध्ये एकही वाईट व्यक्ती नाही. जर लोकांनी काही वाईट केले तर त्याचे कारण ते त्यांनी त्यांच्या अज्ञानामुळे किंवा जागरूकतेच्या अभावामुळे, किंवा त्यांचे मन दुखावल्यामुळे केले होय. म्हणून कोणाच्याही प्रती कोणतेही नकारात्मक मत बनवू नका.

प्रश्न : गुरुदेव, तुम्ही आत्ताच म्हणालात की कोणालाही वाईट समजू नका. परंतु जर कोणी आमच्याबरोबर वाईट व्यवहार करीत असेल तर त्या व्यक्तीला कशी प्रतिक्रिया द्यावी?

श्री श्री : जर दुसऱ्यांचे तुमच्याविषयी नकारात्मक मत असेल तर ती त्यांची समस्या आहे, तुमची नाही. तुम्ही तुमच्याकडून कोणालाही वाईट समजू नका.

असे केल्याने तुमच्या मनाची स्पष्टता आणि प्रसन्नता कायम राहील आणि तुमची बुद्धी कुशाग्र होईल.

असे नाही केले, तर एखादे भूत कसे पछाडते त्याप्रमाणे तुम्हाला वाईट समजणारे तुमच्या मनाला पछाडतील.

जेव्हा असे विचार तुमच्या डोक्यात घर करून बसतील तेव्हा तुमच्या हातून कोणतेही सृजनशील कार्य घडणार नाही.

प्रश्न : जर कोणी आमच्याबरोबर काहीतरी अतिशय चुकीचे केले असेल तर मग आम्ही काय करावे?

श्री श्री : जर कोणी तुमच्याबरोबर अतिशय वाईट वागले असेल तर विचार करा की त्यांनी असे का केले असेल?

एक कारण असे असू शकेल की ते निरोगी नसतील.

तुम्ही एका वेड्याला किंवा मानसिक रुग्णाला अपराधी मानता का? नाही!

जर मानसिक रुग्णाने तुम्हाला काही अपमानकारक बोल बोलले तर तुम्ही ते शब्द गंभीरपणे घेता का? नाही. हे जाणून तुम्ही ते सोडून देता की त्याला मानसिक आजार आहे.

त्याचप्रमाणे जेव्हा कोणी तुम्हाला काही तरी वाईट बोलते तेव्हा याचप्रमाणे विचार करा. जेव्हा एक अस्वस्थ मनुष्य काहीतरी वाईट बडबडतो तेव्हा तुम्ही कशाला अस्वस्थ होता?

प्रश्न : शांत होण्याकरिता आपण दुसऱ्यांकडून कशाचीही अपेक्षा ठेवता कामा नये. परंतु दैनंदिन कामामध्ये, ऑफिसमध्ये किंवा घरात, वेगवेगळ्या माणसांनी वेगवेगळी कामे करणे भाग आहे. जर ते ती कामे करीत नाहीत तर मग समस्या उद्भवतात. प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडलीच पाहिजे. यावर कृपया मार्गदर्शन करा.

श्री श्री : जर कोणी आपली जबाबदारी पार पाडत नसेल तर आपण त्यांना सांगणे जरुरी आहे. इथे आपण आपल्या अधिकाराचा वापर करणे जरुरी आहे.

आपली कामे न करणारे आळशी लोक असतील तर आपण शांत बसता कामा नये. आपण त्यांना त्यांच्या कर्तव्याच्याबाबतीत जागरूक करणे आवश्यक आहे.

जर आपल्यामध्ये त्यांच्याप्रती लालसा अथवा तिरस्कार असेल तर आपण त्यांच्यामध्ये जागरूकता आणू शकत नाही. यामुळे आपला संताप होईल.

प्रश्न : 'कारण आणि परिणाम' याचा अर्थ काय?

श्री श्री : 'कारण आणि परिणाम' यांना "कारणे" आणि "कार्य" म्हणतात.

गाय ही कारण आहे आणि दुध हे परिणाम आहे. जर दुध आहे तर याचा अर्थ असा की ते गायीमुळे आहे.

गायीचे कारण आहे गवत. गवताचे कारण आहे पृथ्वी. पृथ्वीचे कारण आहे सूर्य.

प्रत्येक घटनेमागे एक कारण असते.

देव सर्व कारणांचे कारण, परमकारण,आहे. म्हणूनच 'तस्मै नमः परमकारणा कारणाय ' असे म्हंटले आहे.

समग्र कारणांचे कारण हे भगवान शिव आहेत.

प्रश्न : गुरुदेव , आपण 'आचमन्यम समर्पयामी' असे म्हणतो. पाण्याला 'आप' म्हणून आपण ओळखतो, तर मग आपण 'आचमन्यम' असे का म्हणतो? जल अर्पण करण्याचे महत्व काय?

श्री श्री : होय, पाण्याला आचमन्यम म्हणूनसुद्धा ओळखतात.

ही प्रथा अनेक वर्षांपासून चालू आहे. काही सुरु करण्याआधी किंवा काही संपण्याआधी 'आचमन्यम' अर्पण केले जाते. अभिमंत्रित करण्याची ही एक प्रक्रिया आहे. (अभिमंत्रित करणे म्हणजे पाण्यावर मंत्रोच्चारण करणे. तुम्ही एक भांडभर पाणी घ्या,त्याला आपल्या हाताने झाकून घ्या आणि मग मंत्रोच्चार करा. असे केल्याने उच्चारलेले मंत्र पाण्याच्याआत शोषले जातात) आणि नंतर ते अर्पण करतात. आत हे साधे प्यायचे पाणी राहिले नाही. ते आता मंत्रांच्या कंपनांनी प्रभारित झाले आहे.

जेव्हा कधी घरी अतिथी येतात तेव्हा त्यांना पाय (पद्य) धुण्याकरिता पाणी देतात. नंतर पाणी त्यांच्या हातात (अर्घ्य) देतात. हे झाल्यानंतर त्यांना तहान भागवण्याकरिता पिण्याचे पाणी (आचमन्यम) दिले जाते. प्राचीन काळी या तीन प्रथांचा रिवाज होता.

तुमच्या घरी जर कोणी आले तर तुम्ही त्यांना विचारात नाही का,'तुम्ही काय पिणार? तुम्हाला काय आवडेल सरबतं, दुध,चहा. किंवा कॉफी?'

तुम्ही त्यांना पाणी प्यायला देता की नाही?

त्याचप्रमाणे प्राचीन काळी त्यांचा पद्य, अर्घ्य आणि आचमन्यम यांचा रिवाज होता.

पद्य म्हणजे अतिथीचे घराच्या दारात पाय धुणे होय, यामुळे पायाचा कचरा घाण घरात येणार नाही. अर्घ्य म्हणजे त्यांचे हात धुणे होय. आचमन्यम म्हणजे त्यांना पिण्याकरिता पाणी देणे आणि याची सूचना देणे की आता संवादाला सुरुवात करण्यास हरकत नाही.

प्रश्न : 'पंचामृता' (हिंदू धर्माच्या पूजेमध्ये वापरण्यात येत असणारे पाच पदार्थांचे मिश्रण) चे अभिषेका मध्ये काय महत्व आहे? आणि हेच पदार्थ का निवडण्यात आले?

श्री श्री : दुध, दही, मध, गुळ आणि तूप हे अमृतासमान आहेत. खरे तर गुळाचा वापर करायला पाहिजे परंतु आजकाल सगळे साखर वापरतात.

त्यांच्यामध्ये पाच देवतांचा वास आहे. सवीतृ साखरेमध्ये, विश्वेदेवा मधामध्ये, सूर्य तुपामध्ये,वायू दह्यामध्ये आणि सोम दुधामध्ये वास करतात.

म्हणून जेव्हा तुम्ही अभिषेक करता तेव्हा तुमच्या जीवनात देवांचे गुण फुलून येवो हा उद्देश्य असतो.

सगळ्यांच्या मानसिक शांततेसाठी प्रार्थना करतो.

सगळ्यांच्या मनात आनंद असू दे.

लोकांच्या जीवनात शक्ती, धैर्य आणि उदंडता असू दे.

लोकांच्या जीवनात समाधान आणि उत्कर्ष असू दे.

जीवनात तेजस्वीपणा असू दे.

वारा आणि नद्या यांच्या वाहण्यात गोडवा असू दे.

आमचे दिवस अन रात्र गोड असू दे.

धरतीचा प्रत्येक कण आम्हाला गोडवा आणून देऊ दे.

आकाश, देवता आणि पितर (निवर्तलेले पूर्वज) यांच्याकडून आम्हाला गोडवा मिळू दे. 

आमची वाणी आणि विचार यांच्यामध्ये गोडवा असू दे.

समाज आम्हाला गोडवा प्रदान करू दे.

वनस्पती(वन देवता) आम्हाला गोडवा देऊ दे.

सूर्य आमच्या जीवनात गोडपणा निर्माण करू दे.

आमचे संपूर्ण जीवन दुसऱ्यांच्या जीवनात गोडवा आणू दे.

सामुहिक चेतनेला आमच्याकडून गोडवा येऊ दे.

प्रश्न : कृपा करून कधीही न संपणारी आणि कधी न डळमळणारी भक्ती मिळवण्याचा मार्ग आम्हाला सांगा.

श्री श्री : तुमची भक्ती कधी न डळमळणारी आहे असे समजून चला.

नारदमुनींने भक्ती सूत्रां मध्ये सांगितले आहे की भक्ती ही काही कोणती एक वस्तू नाहीये जी तुम्हाला मिळवायची आहे. जर तुम्ही सगळ्या शंका संशय सोडून दिलेत तर भक्ती तर आहेच.

प्रश्न : जर आपण कायद्याचा अभ्यास केला तर आपण वकील बनण्याची खात्री आहे. जर आपण अभियांत्रिकीचा अभ्यास केला तर प्रयत्न केला असता आपण अभियंता होऊ याची हमी आहे. परंतु आपण जर साधना करीत राहिलो आणि या मार्गावर चालत राहिलो तर मुक्ती मिळेल याची काही निश्चिती नाही.

श्री श्री : त्याची निश्चितपणे हमी आहे.

अर्जुनानेदेखील हाच प्रश्न भगवद गीतेमध्ये केला होता. तेव्हा भगवान कृष्णाने उत्तर दिले की,' न हि कल्याण कृत्कश्चि दुर्गतिं तात गच्छति' ,(अध्याय ६, श्लोक ४०).

कारण अध्यात्माच्या मार्गावर चालणारे तुम्ही केवळ उंचच्या उंच उठत जाल.

प्रश्न : अनेक महान संत,ज्यांनी साक्षात्कार अनुभवला, त्यांनी तो कोणाला सरळपणे दिला नाही. त्यांनी तो अनुभवण्याचा केवळ पर्याय शिकवला . देव सगळ्यांना साक्षात्कार सरळपणे का देत नाही? याकरिता हे सगळे संस्कार आवश्यक आहेत का?

श्री श्री : संस्कार जरुरी आहेत. जर तुम्ही इथे आला आहात तर याचा अर्थ असा की कुठेतरी तुम्हाला स्वारस्यआणि कुतूहल होते. ती आवड जर नसती तर तुम्ही इथे कसे आला असता? म्हणून थोडेफार संस्कार जरुरी आहेत.

परंतु केवळ संस्कार पुरेसे नाहीत. जीवनात संस्कार, संधी आणि कृपा केवळ इतक्याच गोष्टींची आवशक्यता आहे. याव्यतिरिक्त स्वयं प्रयास करण्याची गरज आहे.

जर तुम्हाला सत्संगला यायचे आहे परंतु तुम्ही बिछान्यात लोळत राहिलात तर त्याने काही मदत होईल का? म्हणून स्वयं प्रयास, संस्कार, संधी आणि कृपा या जरुरी आहेत.

प्रश्न : नियमित साधना करणाऱ्या लोकांसुद्धा अपस्माराचे झटके येण्याची शक्यता आहे का?

श्री श्री : ती व्यक्ती काय खाते, पिते आणि दिवसभर काय करते यावर अवलंबून आहे. जर खाणे पिणे आणि राहणीमानाच्या सवयी बरोबर नसतील तर हे होणे शक्य आहे.

जर चेतासंस्थेवर जास्त तणाव असेल तर असे झटके येणे संभाव आहे.

जर कोणी निरोगी जीवन जगत असेल तर असे होणार नाही.

मन मोठ्या मोलाचे आहे

24
2012
Oct
बंगलोर, भारतहे बघा, काहीही करून तुम्ही तुमचे मन वाचवायला हवे.

काय होते की तुम्ही अगदी आनंदी, मजेच्या मनस्थितीत असाल आणि कोणीतरी येऊन तुमच्या कानात काहीतरी सांगते जे तुम्हाला आवडत नाही. ते म्हणतात, ‘ अमक्याने तुमच्याबद्दल असे म्हटले.’ जणूकाही नकळत ते म्हणताहेत की,‘ हे काय, तुम्हाला काहीच वाटत नाही ? हे बरोबर नाही.’ आणि अचानक तुमच्या मनात चक्र फिरू लागते आणि तुम्हाला कसेतरी वाटू लागते. तुमची बेचैनी खूपच वाढू लागते.

हे सगळे कसे काय होते ? कुणीतरी काहीतरी नकारात्मकता तुमच्या मनात भरवून जाते. हे नेहमीचेच आहे. तुमच्या रोजच्या जीवनात तुम्हाला दिसेल की लोक येऊन तुमच्या मनात काही तरी नकारात्मकता भरवून जातात, ज्याने तुमचे मन, तुमची जिद्द हादरून जाते. असे होऊ देऊ नका.

लोकांनी तुमच्या मनात काही तरी नकारात्मक भरवणे हे स्वाभाविक आहे पण जेव्हा तुम्ही स्वत:शी अगदी घट्ट जोडलेले असाल, जेव्हा तुम्हाला ते ज्ञान असेल तेव्हा तुम्ही ते सगळे हसण्यावारी सोडून द्याल. तुम्ही तुमच्या कानाला चाळणी लावाल.

तुम्हाला माहिती आहे की हे जग असेच आहे. तुम्हाला माहिती आहे की काही गोष्टी सुखद असतात आणि काही दु:खद असतात. आपण त्या कशा हाताळतो आणि आपला मार्ग कसा धरून ठेवतो हे सर्वात जास्त महत्वाचे आहे.

या नऊ दिवसात आपण जी काही साधना केली, जे यज्ञ केले, जो उत्सव साजरा केला त्या सर्वामुळे तुम्हाला तुमच्या उत्साहाच्या आणि उर्जेच्या मूळ स्थितीवर यायला मदत होईल. 

तर, तुमचे हृदय बळकट आणि मन तरतरीत ठेवा म्हणजे तुमच्या जीवनाची गाडी अगदी सुरळीत चालेल.

छोट्या छोट्या गोष्टी सोडून द्या आणि मोठ्या गोष्टीचा विचार करा. आपण समाजासाठी, देशासाठी, जगासाठी काय करू शकू याचा विचार करा. जीवनात तुमचे असे खूप मोठे ध्येय असायला हवे.

लोक सहसा काहीतरी छोट्या गोष्टीची मागणी करतात.

लोक म्हणतात, ‘ गुरुजी एक गाडी पाठवून द्या, आम्हाला टॅक्सी मिळत नाहिये.’

अशा किरकोळ गोष्टी मागत रहातात. हेही ठीक आहे. अशा गोष्टी मागण्यात काही गैर नाही पण काहीतरी मोठा विचार करा. त्यामुळेच आपल्या संस्कृतीत हजारो वर्षांपासून लोक म्हणत आले आहेत की, ‘ सुखी बसे संसार सब, दुखी रहे नां कोय.’ (सगळे सुखी असू देत, कोणीही दु:खी नसावे) आपण प्रार्थना करताना हेच म्हणतो, ‘लोका समस्ता सुखीनौ भवंतु ’ ( सर्व लोक सुखी होऊ देत)

केवळ हे जगच नाही तर सूक्ष्म जगात रहाणारे आपले पूर्वजही सुखी होवोत. अशी आपण आशा करुया. महत्वाचे हे आहे की तुम्ही समाधानी असायला हवे.

तुम्ही अधून मधून स्वत:चे मुल्यमापन करायला हवे. स्वत:ला विचारा जे मी करत आहे त्याचा दुसऱ्यांनां फायदा होतो आहे की नाही ?

एखद्या गोष्टीने त्या वेळी जरी थोडा त्रास झाला तरी पुढे जाऊन त्या गोष्टीचा सर्वांना फायदा होणार असेल तर ती गोष्ट करणे अगदी योग्य आहे. हीच परीक्षा आहे.

कोणतेही काम करताना तुम्ही स्वत:ला विचारायला हवे की , ‘ मी अगदी छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घालतो आहे की व्यापक दृष्टीने विचार करत आहे. ह्याची गरज आहे.

तर, तुमची दृष्टी व्यापक करणे गरजेचे आहे. जेव्हा दृष्टीकोन संकुचित असेल तेव्हा आपले निर्णय चुकीचे ठरतात. पण जेव्हा आपला दृष्टीकोन व्यापक असेल, दूरदृष्टी असेल तेव्हा आपल्यातील अंत:प्रेरणा वाढीस लागते.

आज ज्याचा दिवस आहे. चांगल्याने वाईटावर मिळवलेला विजय. नव्याने विचार करायला लागण्यासाठी चांगला दिवस आहे. स्वत:ला विचारा की, ‘ आता मला काय करायचे आहे ?’ तुमच्या स्वत:साठी एक ध्येय ठेवा आणि एक ध्येय जगासाठी ठेवा. आणि हे दोन्ही एकच असले तर ते सर्वात चांगले. हे दोन्ही एक नसले तरी ठीक आहे. तुम्ही दोन्ही ध्येये ठेऊ शकता पण हे बघा की ती दोन्ही एकमेकांच्या आड येत नाहीयेत.

पहिला दृष्टीकोन समाजासाठी, जगासाठी, लोकांसाठी आणि मग तुमच्या ज्याकाही आकांक्षा, इच्छा असतील त्या साहजिकच पूर्ण होतील. आताही असेच होते आहे नां ? किती जणांचा असा अनुभव आहे की जे तुम्ही मागता ते तुम्हाला मिळते ? ( श्रोत्यांपैकी बरेच जण हात वर करतात )

साधकाचे असेच आहे. म्हटलेच आहे की, ‘ प्रत्यवायो न विद्यते’ एकदा का तुम्हाला मार्ग सापडला की मग त्यात अडथळे रहात नाहीत. मग तुम्ही जो काही संकल्प कराल तो विनासायास पूर्ण होऊ लागतो.

आताच जो अश्विन महिना संपला तो खूपच महत्वाचा महिना आहे. कां ? कारण पंधरा दिवस हे आपल्याला सोडून गेलेल्या पितरांच्या आठवणीसाठी राखून ठेवले आहेत आणि उरलेले पंधरा दिवस देवादिकांची पूजाअर्चा करण्यात आणि त्यांच्याशी संवाद साधण्यात घालवले जातात. त्यामुळे हा महत्वाचा महिना आहे. आणि पौर्णिमेपर्यंत हे उत्सव चालूच रहातील. 

पण आपल्यासाठी रोजच उत्सव असतो , हो की नाही ? उत्सव नेहमीच असतो पण हा महिना जरा जास्तच खास आहे.

प्रश्न : या जगात महात्मे आणि राक्षस दोन्ही असतात.जे महात्म्यांचे शिष्यत्व स्वीकारतात ते सात्विक होतात. आणि मग राक्षस असतात ते सात्विक लोकांना दडपून टाकायचा प्रयत्न करतात. अशावेळी काय करावे ?

श्री श्री : चांगल्या लोकांची एकी असणे गरजेचे आहे. हा समाज काही थोड्या वाईट लोकांमुळे ढासळत चालला आहे असे नाही तर चांगल्या लोकांच्या गप्प रहाण्याने. चांगल्या भावना असलेले लोक इतके गप्प रहातात की मतदान करायलाही जात नाहीत. ते असा विचार करतात की , ‘ आम्हाला काय करायचं, असंही आम्ही काहीच करू शकत नाही. आपण आपले काम करावे आणि आनंदात रहावे.’ अशा उदासीन भावनेने ते गप्प रहातात. हे बरोबर नाही. तुम्हाला काही तरी करायला हवे.निष्क्रियता हा काही चांगला गुण समजला जाऊ नये. एखादा माणूस निष्क्रीय राहिला आणि मग म्हणू लागला की, ‘ मी चांगला माणूस आहे,’ तर तो चांगुलपणा काही उपयोगाचा नाही. तुम्ही जर चांगले असाल आणि करुणा मय असाल तर काही काम करा. हो की नाही ?

जे सुधारून ठीक करता येते ते नक्की ठीक करावे, आणि जे तुम्हाला सुधारून ठीक करता येत नसेल, जे तुमच्या क्षमतेच्या बाहेर असेल त्यासाठी प्रार्थना करणे सर्वात उत्तम.

त्यामुळेच जीवनात चार गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. भक्ती,मुक्ती,शक्ती आणि युक्ती. युक्तीने तुम्हाला तुमचे काम करून घेता येते. जीवनात शक्तीचीही गरज असतेच. पण फक्त युक्ती आणि शक्ती असून भागणार नाही.त्याच्या बरोबरच भक्ती आणि मुक्तीही आवश्यक आहे. तुम्हाला माहित आहे कां की, जेव्हा तुमच्यात आंतून मुक्तीची भावना असते तेव्हा तुमच्यात इतके बळ निर्माण होते की तुम्हाला जे काही काम करायचे असेल ते सहज पूर्ण होऊन जाते.

चांगल्या लोकांनी असे कधीही समजू नये की ते दुर्बल आहेत. तुम्ही कुठे दुर्बल आहात ? तुमच्यात केवढेतरी सामर्थ्य आहे. ते तुम्ही ओळखायला हवे. परवा काय झाले आठवते आहे नां ? ती हत्तीण इथे यज्ञशाळेत आली तेव्हा कां घाबरली माहितीये ? ( आश्रमातल्या इंद्रायणी नावाच्या ह्त्तीणीला चंडी होमात भाग घेण्यासाठी आणण्यात आले त्याविषयी ) ती घाबरली कारण तिने टीव्हीच्या मोठ्या पडद्यावर स्वत:लाच बघितले आणि तिला वाटले की तिथे आणखी एक हत्ती उभा आहे. तिला हे कळले नाही की ते तीचे स्वत:चेच प्रतिबिंब आहे. त्यामुळे आपल्याला टीव्हीचा तो पडदा बंद करावा लागला.

आपलेही असेच होते. आपण स्वत:चे अस्तित्वाची ओळखच घालवून बसलो आहोत. आपण कोण आहोत तेच आपल्याला माहित नाही. एकदा का हे कळले की मग जीवनात काही दु:खच रहाणार नाही.

प्रश्न : गुरुदेव, बारा ज्योतिर्लिंगाचे काय महात्म्य आहे ते कृपया सांगावे.

श्री श्री : ज्योती तुमच्यातच आहे. आणि जिथे ज्योती असते तिथे शिव असतो. ज्योतिर्लिंग तुमच्यातच आहे. बारा ज्योतिर्लिंग आपल्या शरिरातच आहेत. आपल्या शरिरात अशी बारा स्थाने आहेत जिथे बारा ज्योतिर्लिंगे स्थित आहेत.

प्राचीन काळी केदारनाथ ते रामेश्वर या मधल्या विविध ठिकाणी ज्योतिर्लिंगांची स्थापना केली गेली जेणेकरून लोक तीर्थयात्रेच्या निमित्ताने उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत प्रवास करतील. भारत हा एकत्र देश बनवण्याच्या उद्देशाने आपल्या पूर्वजांनी ही योजना अंमलात आणली. भारताला एकत्र आणण्याचा दुसरा काही मार्ग नव्हता. दुसऱ्या कोणता मार्ग होता ज्याने भारताला एकत्र आणता आले असते ? प्रत्येक जागेची वेगळी भाषा आहे. तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशचा काय संबंध ? ते दोन वेगळ्या देशासारखे आहेत, ज्यांची संस्कृती, परंपरा, आहार आणि कपडे सगळेच वेगळे आहे.

त्यामुळे लोकांना रामेश्वरला जायला सांगीतले आणि तिथून त्यांना काशीला जाऊन पवित्र गंगेत स्नान करायला सांगितले गेले. त्यानंतर त्यांना सांगितले गेले की त्यांनी गंगाजल घेऊन काशीहून रामेश्वरला जावे आणि ते तिथल्या ज्योतिर्लिंगाला वहावे. त्यांनी ती एक रूढीच बनवली आणि अशाप्रकारे भारताच्या सर्व भागातले लोक एकत्र आले. नाही तर युरोपप्रमाणेच त्याचे चोवीस भाग पडले असते. आपल्या पूर्वजांनी भारतातील वेगवेगळ्या भागांना एकत्र आणण्याचे महत्वाचे कार्य साध्य केले आहे. त्यासाठीच असे म्हटले जाते की गंगेचे पाणी आणून ते रामेश्वरला वाहावे.

प्रश्न : गुरुदेव, ज्ञानाच्या गोष्टी ऐकत असताना बरेचदा असे मनात यते की, ‘ अरे हे मी आधीही ऐकले आहे.’ अशी स्थिती कशी मिळवावी की तुम्ही पुन्हा त्याच ज्ञानाच्या गोष्टी ऐकत असतानाही तितकेच नवल वाटावे.

श्री श्री : तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्ही हे ऐकले आहे तर ते आत्म्यात स्वत:त आधीपासून आहेच . हे चांगले आहे. जाणणे, स्विकार करणे आणि त्याचाच भाग बनून जाणे या तीन स्थिती उत्स्फूर्तपणे होतील.

प्रश्न : गुरुदेव, दुर्गा देवीच्या विविध आयुधांचे महत्व कृपया आम्हाला सांगावे.

श्री श्री : मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यां काळात बंदुका नव्हत्या. त्याकाळी फक्त त्रिशूल होते. त्याकाळी जर बंदुका असत्या तर कदाचित दुर्गा मातेच्या हातात ए के ४७ असली असती.

असे म्हणतात की, देवतांनी एकदा दुर्गा मातेला विचारले, ‘ तुम्ही ही आयुधे कां धरली आहेत ? तुमच्या एका आवाजानेही तुम्ही सर्व दैत्यांची राख करून टाकू शकता.’

मग देवतांनी स्वत:च उत्तर दिले की ,’ देवी तू इतकी दयाळू आहेस की तुला दैत्यांची सुद्धा तुझ्या आयुधांनी शुद्धी करायची आहे. तुला त्यांना मुक्ती मिळवून द्यायची आहे आणि त्यामुळे तू हे करत आहेस.’

यामागचा संदेश असा आहे की प्रत्येक कृतीचे स्वत:चे मोल असते. फक्त संकल्प असून उपयोगाचे नाही. बघा, देवाने आपल्याला हात पाय दिले आहेत जेणेकरून आपण काम करू शकू.

आता, देवी मातेला इतके हात कां असतात बरे ? हे दाखवून देण्यासाठी की देव सुद्धा काम करतात आणि ते देखील फक्त एका हाताने नाही तर हजार हातांनी हजार प्रकारांनी. दैत्याचा नाश करण्यासाठी देवीकडे अनेक मार्ग आहेत. वाईटाचे निवारण ती एका फूलानेसुद्धा करू शकते, गांधीगिरी सारखे.त्यासाठीच देवी एका हातात फूल धारण करते, फूलाने गोष्टी घडवून आणण्यासाठी. शंख फुंकून ती ज्ञान देत असते. आणि त्यानेही काम झाले नाही तर ती सुदर्शन चक्र वापरते. तर, तिच्याकडे एकाहून जास्त युक्त्या आहेत. ह्याचा अर्थ असा आहे की जगात बदल घडवून आणण्यासाठी एकच युक्ती वापरून चालणार नाही. तुम्हाला अनेक मार्ग शोधावे लागतील.

आपल्या नातेसंबंधांचेही तसेच आहे. आपल्याला सर्व प्रकारच्या परिस्थितीत हटवादीपणा करून चालणार नाही. तुम्ही जर तुमच्या वडिलांबरोबर हटवादीपणा केलात आणि गोष्टी नीट होतील असे धरून चाललात तर तसे होणार नाही. कधी कधी प्रेमाने तर कधी हट्ट करून तर कधी रागावून कामे होतात. मुलांबरोबरही तसेच आहे. मुले वाढवताना आई वडील कशा हर तऱ्हेच्या युक्त्या आणि वागणूक वापरतात. कधी कधी त्यांना प्रेमानेही कामे करून घ्यावी लागतात.

तर असे सगळे सांगितले गेले आहे. एखादी समस्या सोडवण्याचे अनेक मार्ग आहेत आणि त्यासाठीच देवीला इतकी सगळी आयुधे बहाल केली आहेत.

प्रश्न : गुरुदेव, कृपया देवी मातेच्या चीन्नमास्ता च्या रूपाचे महत्व सांगा.

श्री श्री : देवी मातेने स्वत:चेच छाटलेले मुंडले स्वत:च्याच हातात धरलेले रूप तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला भीती वाटली असेल. या स्वरूपाचा अर्थ काय आहे माहित आहे कां ? सकाळपासून रात्रीपर्यंत आपण आपल्या डोक्यात अडकलेले असतो. डोकेच नसेल तर मग काहीच काळज्या नाहीत, प्रश्न नाहीत, भांडणे नाहीत.

आणि मग फक्त हृदय काम करू लागते. आणि यांच हृदयातून प्रेमाचे आनंदाचे, खुशीचे आणि साधेपणाचे झरे वाहू लागतात.

हे सगळे भेद डोक्यातून निर्माण होतात, हृदयातून नाही. धर्म, जात, समाजात असलेली पत वगैरे सर्व डोक्यातून येते. उर्मटपणा डोक्यात सुरु होतो. चुकीच्या कृती डोक्यात सुरु होतात, हिंसासुद्धा डोक्यात सुरु होते. आता पर्यंत कोणीही हृदयातून हिंसाचारी झालेले नाही हे सर्व डोक्यातून येते.

तर चीन्नमास्ता म्हणजे देवीने स्वत:चा शिरच्छेद केला आहे.जेव्हा डोकेच बाजूला केले जाते तेव्हा शुद्ध चेतनेत जे काही शिल्लक रहाते ते म्हणजे हृदय. आणि जेव्हा फक्त हृदय उरते तेव्हा जीवनात प्रेम,करुणा, आणि आनंद फुलू लागते. वाईटाचा नाश होतो. ही चीन्नमास्ताच्या मागची प्रतीकात्मकता आहे.

ही सर्व रूपे प्रतीकात्मक आहेत. या रूपांच्या मागे काही गुपिते दडलेली आहेत. ह्या गुपितांचा शोध घेतला पाहिजे.

जीवनाचे रहस्य

25
2012
Oct
बंगलोर, भारत


प्रश्न: गुरुदेव, तुमच्या ‘Living the Mystery of Life’ या पुस्तकात तुम्ही म्हटले आहे कि, ‘ या जगात तुम्ही काम करा, पण मनात कामाचा ध्यास धरू नका’.

तुम्ही याचा अर्थ परत एकदा सांगा. याचा अर्थ वैराग्य तर नाही ना?

श्री श्री: हेच तर आत्ता आपण ध्यानामध्ये केले आहे.

आपण जेव्हा डोळे उघडे ठेवतो त्या वेळेस आपण समोरचे दृश्य पाहतो, आणि आपण जेव्हा डोळे बंद करतो त्यानंतर आपले मन दुसऱ्याच जगात असते. तुम्ही याचे परीक्षण केले आहे का?

समजा तुम्ही एका जागी बसून नुसते विचार करत बसलात कि, ‘माझी सून अशीच आहे. माझा मुलगा माझा आदर करत नाही.. वगैरे वगैरे’. तुम्ही रात्रभर हा विचार केलात तर त्याचा तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्रास होईल.

मला काय म्हणायचे आहे, त्यांनी जे काही केले आहे त्याचा विचार तुम्ही सोडून द्या. जेव्हा तुम्ही डोळे बंद करता त्या वेळी तुम्ही तुमच्या अंर्तमनाबरोबर रहा. बाहेरच्या जगाची काळजी तुम्ही करू नका.

मला माहीत आहे हे सोपे नाही, फार अवघड आहे. पण आपण याच दिशेने पुढे जायचे आहे.

दोन प्रकारची विश्व आहेत आणि सत्य ह्या दोन्हीच्या मध्ये दडलेले आहे. एक आहे मनोरजयं – आपल्या मनातील विश्व. आणि दुसरे आहे समाज – बाह्य विश्वातील वातावरण. समाजम आणि मनोरजयं ह्या दोन्हीच्या मधेच सत्य दडलेले आहे.

प्रश्न: गुरुदेव, मी ज्या वेळेस ध्यान करायला बसतो, त्यावेळेस माझ्या मनात काही विचार येतात आणि ढगां सारखे निघून जातात. पण काही विचार असे येतात कि ज्या मुळे मी हरवून जातो आणि अचानक मला त्याची जाणीव होते. कोणत्या कारणामुळे आपण हरवून जातो, सगळेच विचार ढगां सारखे का निघून जात नाहीत?

श्री श्री: हे असेच आहे. काही विचार असे आहेत, तर काही विचार तसे आहेत. काही विचारांमुळे तुम्हाला त्रास होतो आणि काही मुळे होत नाही. त्यासाठीच तर तुमचे मन स्थिर करण्यासाठी विविध प्रकारची तंत्र अवलंबले जातात.

पहा, आता जी पूजा झाली त्यामध्ये विविध प्रकारची संगीत उपकरणे का वाजविली गेली? त्या झांजाचा किती मोठा आवाज येत होता, नादस्वरम (एक दाक्षिणात्य शास्त्रीय संगीत साधन) वाजविले गेले, मंत्रोपचार चालू होता, कोणीतरी मोठा आवाज काढत होते. तुमचे मन जास्त विचार करू नये म्हणून बाहेर एवढे मोठे आवाज केले जात होते.

म्हणून म्हणतो कि असे बरेच मार्ग आहेत. आपल्या कुशलतेने आपण आपल्या मनाला स्थिर करू शकतो.

आपले मन कसे आहे याची आपण तक्रार करू शकत नाही. कधी कधी आपले मन काही नगण्य आही क्षुल्लक कारणावरून अस्थिर होते. त्यासाठीच म्हणतात कि आपले मन हे अनाकलनीय आहे.

भगवतगीतेमधे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतात, ‘मन हे राक्षसा सारखे आहे. माझे त्याच्यावर नियंत्रण नाही, ते माझे काही ऐकत नाही.’

त्यावर भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘ नक्कीच, मी ते मान्य करतो.’

पण शेवटी ते म्हणतात कि त्यातूनहि मार्ग आहे.

प्रश्न: गुरुदेव, तुमचे आशीर्वाद जास्तीत जास्त घेण्यासाठी मी माझी क्षमता कशी वाढवू?

श्री श्री: अडवान्स कोर्स मध्ये तुम्ही शत संपत्ती (सहा प्रकारचे धन किंवा सद्गुण) बद्दल ऐकले आहे.

समा (शांत मन)
दमा (अविचलीत किंवा ज्ञानेन्द्रीयांवर नियंत्रण)
उपरती (तृप्ती)
तितिक्षा (सहनशक्ती)
श्रद्धा (विश्वास)
समाधान (एकाग्रता)

आयुष्यामध्ये तुम्ही या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून वाढविल्या पाहिजेत. तुमच्यातील या सद्गुणामध्ये वाढ झाल्यास तुमची आशीर्वाद घेण्याची क्षमता वाढेल.

ज्ञानाच्या चार स्तंभा पैकी तिसऱ्या स्तंभामध्ये हे सहा सद्गुण आहेत तेच तर आपल्याला वाढवायचे आहेत.

या बरोबर आपण साधना आणि सत्संग पण केले पाहिजे.

प्रश्न: गुरुदेव, आपले धर्मग्रंथ, ‘मला काय मिळेल’ या सारख्या विचार सरणीच्या पलीकडे घेवून जातात? तर मग प्रत्येक धर्मग्रंथ मध्ये फलश्रुती (धर्मग्रंथाचे लाभ) बद्दल का एवढे विस्तार पूर्वक समजावून सांगितले गेले आहे?

श्री श्री: ते करण्यासाठी तुम्हाला भुरळ पाडली जाते. (गुरुदेव हसतात). ते एक कौशल्य आहे. तुम्हाला माहीत आहे एक प्रकारची म्हण आहे, ‘ काही लाभ मिळत असल्याशिवाय कोणी काही करत नाही’.

मी हे काम केल्याने मला यातून काय मिळेल असा विचार एक मंद बुद्धीचा व्यक्ती पण करतो.

पूर्वीच्या ऋषी मुनींना हे माहीत होते म्हणून त्यांनी प्रत्येक धर्मग्रंथां मध्ये फलश्रुती बद्दल लिहिले आहे. ते म्हणतात, तुम्ही जर हे केलेत तर तुम्हाला हे फायदे होतील.

त्याच करिता त्याला अपरा असे म्हटले आहे.

अपरा विद्या  म्हणजेच तुम्ही प्रत्येक अभ्यासाला काही लाभ दाखवू शकता.

त्या पेक्षा हि सूक्ष्म म्हणजे पर-पारा  आणि शेवटी पर विद्या  आहेच जिथे ह्या सर्व गोष्टींचा काही अर्थ नाही. पर विद्या  मिळवून काही उपयोग नाही.

प्रश्न: गुरुदेव, आम्ही असे ऐकले आहे कि नवरात्री म्हणजे सत्व चा रजस आणि तमस वर विजय. पण ह्या जीवनाचे अस्तित्व टिकविण्यासाठी या तिन्ही गुणांचे समान महत्व नाही का? आपण एकावर पसंती कशी दाखवू शकतो?

श्री श्री: नाही, हे नेहेमी असेच असते. तिन्ही पैकी एक नेहमी वरचढ असतो.

सत्व हा नेहमी सर्वामध्ये असतो त्याच प्रमाणे रजस आणि तमस. हे तिन्ही गुण एकत्रित सर्वामध्ये असतात. पण कोणता गुण वरचढ आहे हे तुम्हाला लक्षात येईल.

जर तमोगुण वरचढ असेल तर दु:ख असेल.

जेव्हा रजोगुण वरचढ असेल तर संघर्ष असेल.

आणि जर का सत्वगुण वरचढ असेल तर जाण, ज्ञान आणि आनंद असेल.

कोणत्या क्षणी कोणता गुण वरचढ आहे याचे तुम्ही निरीक्षण केले पाहिजे.

प्रश्न: गुरुदेव, तुम्ही काल सांगितले होते कि आपण बऱ्याच गोष्टी बदलू शकतो, आपले नशीब सुद्धा. माझ्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी बदलण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीत आहे, पण मला असे वाटत आहे कि माझ्या नशिबात जे आहे तेच सर्व होत आहे. असे का?

श्री श्री: हे पहा आयुष्य हे सुख दुःखाचे मिश्रण आहे. तुमच्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी झाल्या आहेत त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा म्हणजे तो आनंद आणखीन द्विगुणीत होईल.

तुम्ही ज्ञानात असल्यावर सुद्धा तुमचे नशीब बदलू शकते.

तुमच्यावर माया केली जात आहे!

22
2012
Oct
बंगलोर, भारत
तर , देवाचा संदेश असा आहे की- तुम्ही देवाचे अतिशय लाडके आहात. तुम्हाला केवळ हे ओळखणे जरुरी आहे की तुमच्यावर माया केली जात आहे.

देव तुमच्यावर किती माया करतो याची तुम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही. त्याचे इतके प्रचंड प्रेम आहे. ज्याप्रमाणे लहान बालकाने काहीही जरी केले तरी आई त्याच्यावर वात्सल्याचा वर्षाव करतच राहते त्याप्रमाणे ते छोटे बाळ पसारा मांडून ठेवेल पण आईची काहीच हरकत नसते. ती हासऱ्या चेहऱ्याने सगळा पसारा आवरते आणि पुन्हा मुलावर ममता करणे सुरु ठेवते. त्याचप्रमाणे तुम्ही देवाचे सर्वात लाडके आहात. हे आपण आपल्या मनात कायम ठेवले पाहिजे. तुम्हाला हेच तर सांगण्याकरिता मी इथे आलेलो आहे, आणि बाकी काही नाही!

तुम्ही हे समजलात की माझे काम फत्ते!

'मी देवाचा एकदम लाडका आहे' आणि 'देव इथे या क्षणी आहे',केवळ या दोन गोष्टी लक्षात ठेवण्याची आवशकता आहे.

आपल्यामधील मी विरघळून जाऊन जेव्हा केवळ एक उर्जा उरते तेव्हा हर्ष फुलून येतो. नाही तर मग तुम्ही विचार करीत राहता,'मला साक्षात्कार व्हायला पाहिजे', किंवा 'मला याचा अनुभव यायला पाहिजे'. आणि यातला हा जो मी आहे तो तुम्हाला दुःखीकष्टी बनवतो.

आणि या मी मध्ये जेव्हा शंका उपस्थित होते तेव्हा ती सर्वात वाईट परिस्थिती असते.

भगवद गीतेमध्ये भगवान कृष्ण म्हणतात,'जेव्हा एखाद्या माणसाच्या हृदयात शंकेने प्रवेश केला तेव्हा तो संपला आणि त्याची अवस्था सर्वात वाईट होऊन बसते'.

म्हणून हे तुम्ही नक्की ओळखून घ्या की तुम्ही देवाचे सर्वात लाडके आहात आणि देव तुमच्यावर अतिशय माया करतो. बस्स. हे मोहोरबंद करा! याबाबत काहीही शंकाकुशंका किंवा स्वतःवर अविश्वास नको.

माझ्यावर माया आहे किंवा नाही असे वादविवाद नको. तुम्ही सवाल विचारता कामा नये.

प्रथम देव तुम्हाला सांगतो,'तुम्ही माझे अतिशय लाडके आहात', आणि मग भक्त म्हणतो,'होय,मीसुद्धा तुझ्यावर प्रेम करतो!' म्हणून तर पहिले देव तुम्हाला काय सांगतो आहे त्याचे शब्द ऐका, की तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. तो तुम्हाला कधीही बुडू देणार नाही- ही पहिली गोष्ट.

दुसरे म्हणजे अशी श्रद्धा की मला कधीही बुडू दिले जाणार नाही. माझ्या नाकापर्यंत पाणी येईल परंतु नाक कधीही पाण्यात बुडणार नाही.

आणि तिसरी गोष्ट अशी की आपण आपले मन नेहमी प्रसन्न आणि समाधानी ठेवावे. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जायला लागू दे पण आपण नेहमी प्रसन्नचित राहावे.

एका असमाधानी आणि चिडचिड करणाऱ्या मनाला या ग्रहावरील सगळी सुखे समोर उभी केली तरी ते मन कायम कटकटच करीत राहील.

या विश्वामधील कोणतीही वस्तू तुम्हाला समाधान देऊ शकत नाही. ते तुमचे तुम्हाला स्वतः आणावे लागते. आणि हे असे कधी घडते? हे तेव्हाच घडते जेव्हा तुम्ही सोडून देता आणि समजून घेता. पवित्रता, निर्मलता, आणि समाधान हा सुखाचा कानमंत्र आहे. 

बायबलमध्ये सुद्धा एक म्हण आहे,ती अशी, 'ज्यांच्याकडे आहे त्यांना अजून दिले जाईल, ज्यांच्याकडे नाहीये त्यांच्याकडे जे काही थोडेफार आहे तेदेखील परत घेतले जाईल'.

हे एकदम खरे आहे. मनामध्ये जर समाधान नसेल आणि तुम्ही सतत कटकट करीत तक्रारीचा सूर लावून बसाल तर याबाबत जागरूक व्हा आणि या मनःस्थितीतून त्वरित बाहेर पडा. याची जबाबदारी तुम्ही स्वतः घ्या, हे फार महत्वाचे आहे.

समाधान आणि प्रसन्नचित! प्रत्येक गोष्ट आनंदाने करा. चालणे,बोलणे,बसणे आनंदाने करा;जर तुम्हाला कोणची तक्रार करायची असेल तर ती देखील आनंदाने करा.

मला वाटते की आपण इथे आश्रमात असे वरचेवर करतो! (श्री श्री हसतात)

तुम्हाला माहिती आहे, परवा खरेदी विभागातील व्यक्तीने मला मध्य रात्री बोलावले आणि सांगितले, 'गुरुदेव, उद्याकरिता आपल्याला थोड्याफार वस्तू खरेदी करणे जरुरी आहे.'

मी म्हणालो, 'काय?'

आणि यावर तो उत्तरला, '३००० किलो साखर आणि २००० किलो मुगाची डाळ यांची पक्वान्न बनवण्यासाठी आपल्याला गरज आहे.'

आणि मी म्हणालो, 'काय?(आश्चर्यचकित होऊन), तुम्ही तर थोड्याफार वस्तू म्हणाला होतात.'

मग खरेदी विभागाने होलसेल बाजाराकडे धाव घेतली, मध्यरात्री त्यांनी लोकांना झोपेतून उठवले, आणि सगळ्या जिन्नसा आश्रमात पोच करून घेतल्या.

त्यांना अनेक दुकानदारांना उठवावे लागले, त्यांना त्यांच्या दुकानात घेऊन जाऊन त्यांचे गोदाम उघडवून सर्व वस्तू आणाव्या लागल्या. परंतु ते सगळे आनंदात होते.

विकणारा खुश होता, खरेदी करणारा खुश होता, आचारी खुश होता आणि ज्यांनी ते पदार्थ खाल्ले तेसुद्धा खुश होते.

तुम्हाला माहिती आहे, हा सगळा प्रसंग पुष्कळ तापदायक ठरू शकला असता.

त्या व्यक्तीने मला अगदी शेवटच्या क्षणाला सांगितले. इतक्या शेवटच्या क्षणाला आम्ही कुठे जायचे? या जागी खूप कटकट आणि तक्रारी होऊ शकल्या असत्या, आणि त्यांनी हात हलवत परत येऊन सांगितले असते, 'अरे देवा,आता काहीच करणे शक्य नाही.' पण असे घडले नाही.

असे पहा,जिथे कुठे सत्त्व आणि सकारात्मकता आहे, तिथली आव्हानेसुद्धा गोड असतात. 

म्हणूनच आनंदीपणा आणि समाधान हे अतिशय महत्वाचे आहे.

बघा,जर छोटीशी बाब असेल तर ठीक आहे. तुम्ही जाऊन एखादे दुकान उघडू शकता. पण तुम्हाला एकाच दुकानातून ३००० किलो साखर मिळणे शक्य नाही.

त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात की ज्या आपल्याला कधी कधी अशक्यप्राय वाटतात. असे का तुम्हाला माहिती आहे? याचे कारण म्हणजे आपण आपल्या स्वयंला ओळखत नाही म्हणून.

तुम्हाला माहित आहे हत्तीण इथे (यज्ञशाळेत) आल्यावर का भेदरली? (आश्रमातील हत्ती) इंद्राणी जिला चंडी होमामध्ये सहभागी होण्याकरिता आणले गेले होते,तिच्याकडे इशारा करीत )

ती भेदरली कारण तिने मोठ्या पडद्यावर स्वतःला पहिले आणि तिला वाटले की इथे अजून एक हत्ती उभा आहे. ती स्वतःचीच प्रतिमा आहे ते तिला कळले नाही. म्हणून मग आपल्याला तो मोठा पडदा बंद करावा लागला. त्याचबरोबर तिने आज एक मोठा धडा आपल्याला शिकवला. लोकांबरोबरसुद्धा हेच होत आहे,ते स्वतःला ओळखत नाही. प्रत्येकजण ही तुमचीच एक प्रतिमा आहेत. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखत नाहीत, किंवा तुम्ही स्वतःकडे बघायलासुद्धा इतके घाबरता, तेव्हा ज्ञान तुम्हाला ते प्रतिबिंब पाहायला, ओळखायला मदत करते.

स्वतःच्या आत डोकावून पहा, काय आहे तिथे, कशाचा त्रास आहे, काय बोचण आहे?

जर तुम्हाला काही नकारात्मक वृत्ती दिसल्या तर मी तुम्हाला सांगतो की त्याची काळजी करू नका, कारण त्यापासून तुम्ही तुमची सुटका करून घेऊ शकत नाही. त्याची काळजी घ्यायला कोणीतरी आहे. हाच तर संदेश आहे!

दुर्गा सप्तशती मध्ये असे म्हटले आहे, 'या देवी सर्व-भुतेशु भ्रांती-रूपेण संस्तीथा नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः' हे माते,तू सर्व जीवांमध्ये शांती आणि अशांती,ज्ञान आणि भ्रम या रूपांनी उपस्थित आहेस. मी तुझी पूजा करतो आणि तुझ्यासमोर मी नतमस्तक आहे!

तर देव हा अशांततेच्या रूपानेसुद्धा उपस्थित आहे.

या ग्रहावरच्या प्रत्येक जीवाला पहा, ते किती अशांत आहेत. थोड्या वेळासाठी का होईना पण हत्तीणसुद्धा विचलित झाली. ते काय होते? ती चेतना आहे; भ्रमाच्या, ज्ञानाच्या आणि अज्ञानाच्या रूपामध्ये उपस्थित असलेली ती शुद्ध उर्जा आहे. म्हणूनच प्रत्येक गोष्टीची पूर्णतः पूजा करा. त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन चला. त्यात निवड करण्याचा किंवा त्यांना विभक्त करण्याचा प्रयत्न करू नका, त्यांना सगळ्यांना घ्या आणि मग तुम्हाला शांती प्राप्त होईल; परम शांती. हेच तर सकल सार आहे. नंतर दुःखांपासून सुटका, शांती प्राप्त, ओसंडून वाहणारे प्रेम आणि उत्साह, भक्ती आणि मानसिक स्वातंत्र्य -हे सर्व त्याच्यासोबत मिळेल.

संपूर्ण विश्व हे एकच चेतना आहे. आज तुम्हाला हे जाणवले नाही का?

हे म्हणजे अनेक शरीरे पण एकच मन.

जरी अनेक अंग असले तरी एकच शरीर, संपूर्ण क्षेत्रामध्ये केवळ एकच जीव.

त्या एकाचा आपण सगळे भाग आहोत-ही समज म्हणजे एक गहन अनुभव आहे.

आता असे विचारू नका,'गुरुजी मला हा अनुभव कधी मिळेल? मला आताच्या आत्ता पाहिजे.' आराम करा! काहीसुद्धा करू नका!

फक्त हे लक्षात ठेवा की तुम्ही देवाचे लाडके आहात आणि देव हा या क्षणी इथे आहे, तुमच्यामध्ये. आणि आजच्यासाठी इतके बस्स

आंतरिक अग्नी

23
2012
Oct
बंगलोर, भारत
(सत्संगाची सुरुवात ही संपूर्ण जगातील अनुयायांनी त्यांच्या राष्ट्रीय भाषेमध्ये श्लोक आणि गीत गायनाने झाली. विविध देशांमधून आणि भारताच्या संपूर्ण प्रांतांमधून आलेला तऱ्हेतऱ्हेचा जमाव हा संगीत आणि गायनाने एकत्र झाला होता.) 

संपूर्ण जगाने एकजूट होणे - हेच नवरात्रीचे चैतन्य आहे.

प्राचीन काळी प्रत्येक व्यक्ती ही नीरनिराळ्या वेदात, ज्ञानाच्या एका शाखेत पारंगत असे, आणि नवरात्रीत सगळे जमत असत आणि मग प्रत्येक जण ज्ञानात, नृत्यात, संस्कृती आणि सगळ्यात भाग घेत असत. आम्ही ठेवलेले बासरी वादन,तार वाद्ये,तबला,पखवाज, आणि गायन परवा तुम्ही बघितले असेल.

विश्वामध्ये वैवध्य आहे आणि ती विविधता एकजुटते ती एक चैतन्य;एक वैश्विक चेतना म्हणजेच दैवी चैतन्य (देव)सगळ्यामध्ये आहे या ज्ञानाने. तुम्ही देवाला घाबरू नका कारण तो आईप्रमाणे तुमची काळजी घेतो, तुमच्यावर माया करतो, त्याला तुमचे कौतुक आहे आणि तो तुमची उन्नती करतो. मातृत्वाचे सर्व गुण देवामध्ये उपस्थित आहेत.

आपण नेहमी म्हणतो,'देवाची भीती ठेवा, तुम्हाला शिक्षा द्यायला देव आहे', नाही! ही चुकीची कल्पना आहे. देव तुम्हाला कधीच शासन करणार नाही तर तो तुम्हाला शिकवेल आणि तुमची उन्नती करेल.

आपण जीवनोत्सव साजरा केला पाहिजे.

'ला-इल्लाह-इलल्लाह'- केवळ एकच दैवत्व आहे, असे आपण आत्ताच गाणे ऐकले आणि ते दैवत्व वर कुठेतरी स्वर्गामध्ये नाही,ते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वांमध्ये आहे.

म्हणून पृथ्वीचा मान ठेवा, पाण्याचा मान ठेवा आणि अग्नीचा योग्य वापर करा. केवळ बाह्य अग्नी नव्हे तर तुमच्या आतील अग्नीचासुद्धा योग्य वापर करा.

प्रत्येकाच्या आत एक आग आहे, एक उत्कटता आहे, त्याला योग्य दिशा द्या.

तुम्हाला माहिती आहे, आग ही विध्वंस करते आणि आग ही नवनिर्माणसुद्धा करते, म्हणून तुमच्या आत असलेल्या अग्नीला काहीतरी निर्माण करण्यासाठी परवानगी द्या. तुमच्या आत असलेल्या अग्नीला (उत्कटतेला) एक दिशा द्या.

दिव्य माता, पंचतत्वांमध्ये आणि स्वयंमध्ये असलेली दिव्यता लक्षात ठेवा. स्वयंमध्ये शांतपणे आणि सहजपणे परतणे हाच खरा उत्सव आहे.

देव माझ्यावर अतिशय प्रेम करतो - असा आपल्यामध्ये अत्माविशास असला पाहिजे. कसलेही प्रश्न नाहीत आणि कोणत्याही शंकाकुशंका नाही!

तसेच स्वतःची तुलना दुसऱ्यांबरोबर करू नका, हेसुद्धा फार महत्वाचे आहे.

'अरे,ती व्यक्ती गाऊ शकते, मी नाही', 'ती व्यक्ती बुद्धिमान आहे पण मी नाही', असे चालणार नाही!

सगळे काही तुमच्या आत आहे. परिस्थितीनुसार निरनिराळ्या गोष्टी बाहेर येतील, तुम्ही केवळ धीर धरा.

दुसरे म्हणजे असे की आपल्याला आशीर्वाद आणि कृपा पाहिजे असते, हो ना?! आशीर्वाद मुबलक आहेत, परंतु जर तुमचे भांडेच छोटेसे असेल, तर कोण काय करणार?

जर ही वाटी घेऊन आलात (गुरुदेव एक अगदी छोटी वाटी उचलतात), आणि म्हणालात,'मला यामध्ये दोन लिटर दुध द्या', तर दोन लिटर दुध या छोट्याश्या वाटीत कसे मावेल? तुमची वाटी छोटी आहे आणि तुम्ही त्याच्या कितीतरी पटीने जास्त मागत आहात.

तुम्ही तीन लिटर क्षमता असलेले भांडे आणणे जरुरी आहे आणि मग मी तुम्हाला दोन लिटर किंवा तीन लिटर,तुम्हाला जितके पाहिजे तितके देऊ शकतो.

म्हणून लक्षात ठेवा की तुम्हाला जे मिळाले आहे ते तुमच्या क्षमतेनुसार मिळाले आहे, आणि जर तुम्हाला अजून पाहिजे असेल तर थांब ; तुमची क्षमता वाढवा. 

जेव्हा आपली क्षमता वाढते तेव्हा अजून जास्त नक्कीच आपल्या वाट्याला येते.

या कारणामुळेच लोक उदास असतात. ते छोटी वाटी घेऊन जातात आणि म्हणतात, 'यात मला एक लिटर दुध द्या'.

म्हणूनच आपल्याला हे माहिती असले पाहिजे.

हे पहा,जीवनात तुमच्या वाट्याला कटकटी येतात. 'अरे,हा माणूस काही कामाचा नाही', 'मी या लोकांबरोबर राहू शकत नाही,ते माझा अपमान करतात', असे विचार तुमच्या मनात येतात, आणि जेव्हा तुम्ही ध्यान करायला बसता तेव्हा या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला त्रास व्हायला लागतो. हो ना?

हात वर करून मला प्रामाणिकपणे सांगा,जेव्हा तुम्ही ध्यान करायला बसता तेव्हा या सगळ्याचा नाही का विचार करत- 'अरे,माझ्या नवऱ्याने असे केले तर बरे होईल', 'अरे,माझा मुलगा माझे ऐकत नाही'. शेजाऱ्यांचे, मित्र-मैत्रिणींचे, ओळखीच्या आणि अनोळखी लोकांचे विचार, सगळ्या बारीकसारीक कटकटी मनात येतात आणि त्यामुळे तुम्हाला संताप, हताशपणा आणि चिडचिड हे सर्व होते. तर मग अशी चिडचिड कश्याप्रकारे हाताळावी? 

समजा तुम्ही काही महत्वाचे काम करीत आहात आणि एक माशी येऊन तुमच्यावर बसली तर तुम्ही त्या माशीमुळे फार अस्वस्थ व्हाल का? नाही, एक साध्या क्षुल्लक माशीमुळे तुम्हाला काहीही फरक पडणार नाही, तुम्ही त्या माशीला हलकेच उडवून लावाल.

या सगळ्या गोष्टी त्याचप्रमाणे आहेत हे लक्षात घ्या.

ह्या लहानसहान कटकटी तुमच्यामध्ये स्वीकृती आणण्याचे काम करतात. चिडचिड म्हणजे अस्वीकार. अस्वीकार म्हणजे घट्ट आवळून धरलेली मुठ. स्वीकार करणे म्हणजे मुठ उघडणे होय.

चिडचिड म्हणजे ताठरता. तुम्ही जेव्हा चिडता तेव्हा तुम्हाला एकप्रकारची ताठरता नाही का जाणवत?

स्वीकारणे म्हणजे उघडणे, आणि जेव्हा तुम्ही तुमचा हात उघडता तेव्हा तुम्हाला आकाशसुद्धा ठेंगणे पडेल;सर्वकाही तुमच्यात आहे ( स्वतःच्या उघड्या हाताकडे निर्देश करतात). परंतु जेव्हा तुम्ही बंद असता (स्वतःच्या बंद मुठीकडे निर्देश करीत) तेव्हा त्यामध्ये काहीसुद्धा नसते.

म्हणून सोडून देणे महत्वाचे आहे.

'मी जर सोडून दिले तर मी कृती कशी काय करणार?' असा आता प्रश्न उपस्थित होईल. 

कोणी जर अन्याय करीत असेल आणि तुम्ही विचार कराल,' अरे, गुरुदेव स्वीकार करा असे म्हणाले आहेत, आणि म्हणून मी स्वीकार करतो'. चालणार नाही!

हे पहा, अग्नी आहे परंतु तुम्ही त्याला योग्य दिशा दिली पाहिजे.

चिडून काही कृती केल्याने मदत होणार नाही. सर्वप्रथम स्वीकार करा आणि मग नंतर योग्य कृती करा.

याकरिता भरपूर हिम्मत आणि धीरतेची गरज आहे.

अपमानित होणे ही अजून एक समस्या आहे.

मी तुम्हाला सांगतो की अपमान होणे फार चांगले आहे. अपमानामुळे तुमची क्षमता वाढते; त्यामुळे तुमचे भांडे अजून मोठे होते. अपमानामुळेच मी विरघळून जातो, तो अहंला पळवून लावतो आणि तुम्ही एका बालकाप्रमाणे होता.

तुम्हाला माहिती आहे की तुम्ही लहान बालकाला अपमानित करू शकत नाही कारण लहान मुल हे पोकळ आणि रिकामे असते! परंतु जेव्हा आपण कोणीतरी बनतो,तेव्हा आपण आपल्याबद्दलच्या काही कल्पनांना घट्ट कवटाळून बसतो आणि मग आपल्याला वाटते ,'अरे हा तर अपमान आहे.'

कोणीतरी म्हणाले,'येऊ नको' ,किंवा 'असे करू नको', आणि या बारीकसारीक गोष्टींचा तुम्हाला त्रास होऊ लागतो.

म्हणूनच तर याला माया असे म्हटले आहे कारण या सर्व गोष्टी लक्ष देण्याच्या लायकीच्या नसतात, मन त्यात गुंतून पडते.

आणि जेव्हा तुम्ही म्हणता,' हेसुद्धा माझे नाहीये', तेव्हा ती महामाया असते; हा एक दैवी खेळ आहे. कारण तुम्ही मग त्याच्या सोबत लढू लागता, आणि लढल्यामुळे ते अजून वाढते. 'इकडे आड तिकडे विहीर', अशी ही परिस्थिती होते. तुम्ही यात अजून खोलवर अडकत जाता. 

म्हणून तुम्ही अपमानापासून लाजू नका. जर अपमान झाला तर तो तपसचा एक प्रकार समजा. (तपस म्हणजे ताप. हिंदुत्वामध्ये याला उपमेच्या दृष्टीने वापरले आहे. त्याचा अर्थ अध्यात्मीक कष्ट, शिक्षा किंवा अनुशासन होय)

'ठीक आहे हे तपस आहे. मी हे सहन करेन. मी याचा स्वीकार करतो'.

तपस तुम्हाला अधिक बलवान आणि अधिक सुंदर बनवते.

'ज्ञानमपी चेतनसी देवी भगवती हि सा,बलदक्रीशय मोहय महामाया प्रयछती' असे म्हणूनच म्हंटले आहे.

दुर्गा सप्तशती जी आपण काल गायलो त्यात हेच लिहिले आहे.

मायेची आणि अज्ञानाची शक्ती इतकी जास्त आहे की सर्वात शहाणे लोक आणि महान बुद्धिवान लोकसुद्धा तिच्या तावडीतून वाचू शकत नाही. ती सर्वाना नाचवते आणि असे म्हंटले आहे,'हे माझ्या प्रिय जगन्माते, तू आम्हाला या मनाच्या भ्रमाच्या खेळत खेळवत आहेस'. 

आपण क्षुल्लक गोष्टीना अतिशय महत्व देतो. आपण क्षणभंगुर आणि नश्वर गोष्टी ज्या राहणार नाहीत अशा गोष्टीना महत्व देतो. त्या सर्व गोष्टी संपून जातात आणि निघून जातात. म्हणूनच त्याला महामाया म्हटले आहे.

तुम्हाला माहिती आहे काल मी म्हणालो, ' या देवी सर्व भुतेशु भ्रांतीरूपेणसंस्थिता नमसतस्येनमो नमः' चैतन्य हे केवळ शांती रुपात किंवा शक्ती रुपात उपस्थित नाहीये तर ते भ्रमरुपात सुद्धा उपस्थित आहे. ते भूक , द्वंद , भ्रम यातदेखील हजर आहे आणि ही सर्व त्याचीच रूपे आहेत. जेव्हा तुमच्या हे लक्षात येते तेव्हा तुम्ही मनाच्या खेळाकडे बघून हसता.

आणि मग आता जेव्हा तुमचे कोते मन खेळ करू लागते तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर एकरूप होत नाही,तुम्ही त्याच्या पलीकडे जाता आणि तिथेच तुम्हाला मिळते चिरशांती (कायमची शांतता). मन संपूर्णपणे शांत असते आणि अविचलीत असते.

हे जीवनात असण्यायोग्य आहे, आणि केवळ यासाठीच या सर्व आशीर्वादांची आवशक्यता आहे.

आज आपण ॠषी होम केला. कित्येक युगांपासून भूतकाळातील संतांनी हे ज्ञान जपून ठेवले आहे.

परंपरेनुसार ॠषी पराशर (ॠग वेद काळातील महर्षी आणि अनेक प्राचीन भारतीय लेखांचे लेखक) यांची तर या सर्व पूजा ही खासियत होती.

गुरु पूजेमध्ये आपण नारायणं पद्म भावं वशिष्ठं शक्तिं च तत पुत्र पराशरं च असे म्हणतो. 

ॠषी पराशर  हे संत परंपरेतील पाचवे संत आहेत. त्यांनी पुजांद्वारा प्रेम आणि भक्ती व्यक्त करणे यावर जास्त भर दिला-पूजादिषु अनुराग इति परशराय.

आजसुद्धा आयुध पूजा केली जाते. ती करण्यामागचे कारण असे की आपण वापरत असलेल्या सर्व यंत्रांचा बहुमान करायचा.

जर तुम्ही उद्या शहरात गेलात तर तुम्हाला दिसेल की सगळ्या बसेसना चंदनाचे गंध,हळद कुंकू आणि फुले लावलेले दिसेल. लोक आपापल्या गाड्यांना सजवतील.

याचा अर्थ असा की बारीक टाचणी असो वा मोठा खांब सर्व ठिकाणी देवाचा वास आहे आणि म्हणून सगळ्या यंत्रांचा बहुमान केला जातो. पिना,चाकू,कात्री,स्क्रू ड्रायव्हर,पान्हा, आणि अशासारख्या छोट्या वस्तू यांचे पूजन केले जाते आणि असे म्हंटले जाते की जगन्मातेचा वास या सर्व वस्तूंमध्ये आहे आणि म्हणून आपण त्यांचे पूजन केले पाहिजे. तुम्ही बघाल की वर्षातून एकदा कारखान्यातील सगळ्या यंत्रांची साफसफाई केली जाते. लोक आज यंत्रांचा बहुमान करून यंत्रे,गाड्या,बसेस आणि सगळ्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतील कारण दिव्यता सगळीकडे सगळ्यांमध्ये आहे.

आयुध पूजा  ही नवरात्रीच्या नवव्या दिवशी केली जाते.

उद्या विजयादशमी , विजयाचा दिवस आहे.

म्हणून जेव्हा माया मनाचा ताबा घेते तेव्हा ही केवळ मनाची माया आहे असे जागरूक व्हा. हे तर केवळ मन आहे जे गोल गोल फिरत आहे आणि या सगळ्या गोष्टी करत आहे. फक्त ते सोडून द्या. नवरात्रीचा हाच तर मुख्य संदेश आहे.

उलटे असलेले झाड!

10
2012
Oct
बंगलोर, भारत
प्रश्न : गुरुदेव, गीतेतील १५ व्या अध्यायामध्ये एका उलट्या झाडाचे वर्णन आहे. फांद्या जमिनीमध्ये आणि मुळे आकाशाकडे. याचे महत्व कृपा करून समजवाल का?

श्री श्री : तुमचे उत्त्पतीस्थान हे ईश्वरीय आहे, तुमची चेतना याचे ते प्रतीक आहे. ते तुमचे मूळ आहे. मन आणि त्याचा सगळा फाफट पसारा हे फांद्याप्रमाणे आहे. आणि जीवनातील सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लयी, निरनिराळ्या भावना, इ.इ. या पानांप्रमाणे आहेत. त्या कायम राहत नाहीत,त्या कालांतराने गळून जातात.

म्हणून जर तुम्ही पानांवर लक्ष केंद्रित केले, आणि मुळांना पाणी घालयला विसरलात, तर मग झाड तग धरून राहणार नाही.

म्हणून "अश्वत्थेनं सुविरुढमुलं असंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा" (भगवद्गीता गीता, अध्याय १५, श्लोक ३) असे म्हटलेले आहे.

या वेगवेगळ्या भावना,हे जीवनाचे निरनिराळे स्वरूप हे तुम्ही नाही, हे लक्षात घ्या. म्हणून ते तसे म्हंटले आहे.

नाहीतर आपण वरपांगी रंगात इतके रंगून जातो की आपल्याला मुख्य मुळाचा विसर पडतो. या झाडाला वेळोवेळी छाटणे जरुरी आहे नाहीतर तो अस्ताव्यस्त वाढत जातो. तर ते सर्व छाटून टाका आणि तुमचे मूळ कुठेतरी वर आहे हे माहित करून घ्या.

"सुरमंदिरतरूमुलानिवासहसय्या भूतलामजीनं वासः सर्वपरीग्रह भोगत्यागः कस्य सुखं न करोति विरागः" असे आदिशांकाराचार्य यांनी फार सुंदरपणे म्हंटले आहे.

ते म्हणतात,"माझी मूळ जागा ही स्वर्गात आहे,मी इथे थोड्या दिवसांकारीतच आलेलो आहे; केवळ मौजमजा करायला.आज मी केवळ आराम करण्याच्या उद्देशाने आलो आहे, परंतु ही माझी आदिम जागा नाही, ती दुसरीकडे कुठेतरी आहे". माझे घर दुसरीकडे कुठेतरी आहे,मी इथे केवळ भेट देण्याकरिता आलो आहे- हा केवळ विचार तुमच्यामध्ये अंतर निर्माण करते.

हे जग एक प्रतीक्षालय आहे.

तुम्हाला माहिती आहे विमानतळ आणि रेल्वेस्थानक यावर अशी प्रतीक्षालये असतात, आणि प्रतीक्षालयामध्ये तुम्ही काय करता?

तुम्ही तुमचे सामान ठेवता आणि खायला बसता. तुम्ही तिथले स्नानगृह आणि बाकीचे वापरता, परंतु तुम्ही तुमचे सामान उघडत नाही आणि सगळीकडे तुमचे कपडे लटकवून ठेवायला सुरुवात करीत नाही. असे तुम्ही प्रतीक्षालयात करीत नाही. तुम्ही तुमचे सामान बांधलेलेच ठेवता.

त्याचप्रमाणे हे जग एक प्रतीक्षालय आहे. याला आपले घर समजायची चूक करू नका.

प्रश्न : माझ्या मुलाला पाच वर्षांपूर्वी द्वीध्रुवीय असल्याचे निदान झाले. तो माझा एकुलता एक मुलगा आहे आणि मी प्रत्येक क्षणाला त्याचे दुःख अनुभवते आहे. ह्या आधी मी अतिशय आनंदी महिला होते परंतु आता मी १५० मिलीग्राम निराशा-निवारक गोळ्यांवर आहे. आता, मला तुम्ही खात्रीपूर्वक सांगा की टोकाची निराशा यासारखा आजार किंवा असाध्य दुर्धर व्याधी ग्रस्त करणार नाहीत.

श्री श्री : होय, मी तुमच्या वेदना समजू शकतो.

कित्येक वेळा थोडीशी निराशा येते आणि तेव्हा व्यक्तीला मोठ्या प्रमाणावर औषध दिले जाते आणि त्याने अवस्था वाईट होते. मी असे होताना पहिले आहे.

छोटीशी निराशा ही टोकाच्या निराशेमध्ये बदलते आणि मग ते अशा व्यक्तींना 'लीथीयम' सारख्या औषधावर ठेवतात. या मुद्द्यावर संपूर्ण वैद्यक पेशामध्ये इतका प्रचंड गोंधळ आहे. म्हणूनच मानसिक आरोग्य इतके महत्वाचे असते.

इथे असलेल्या सगळ्यांनी आपल्या मुलांना आणि आपल्या मित्रांच्या मुलांना आर्ट एक्ष्सेल (Art Excel) , येस(YES) आणि येस+ (YES+) या कार्यक्रमांमध्ये घालावे. कसेही करून त्यांना प्राणायाम आणि ध्यान करायला लावा.

हे कसे होते ते तुम्हाला माहिती आहे? सर्वात आधी मनामध्ये थोडा तणाव असतो, आणि मग तो मोठा व्हायला लागतो आणि तो मोठा होतच जातो आणि मग तो इतका मोठा होतो की तो मेंदूमधील सर्व महत्वाच्या जोडण्या उडवून टाकतो. अशाप्रकारे सर्व सुरु होते.

आपण याची काळजी फार आधीच्या टप्प्यावर घेणे जरुरी आहे. आजार रोखणे हे आजारावरच्या इलाजापेक्षा कधीही चांगले. आणि हे रोखण्याकरिता तुम्हाला तुमच्या मुलांना आनंदी ठेवणे गरजेचे आहे आणि त्यांच्या आतील नकारात्मकता आणि नकारात्मक भावना यांना योग्य पद्धतीने हाताळावयास शिकवायला पाहिजे. हे फार महत्वाचे आहे.

प्रश्न : गुरुदेव, अष्टलक्ष्मी पैकी विजयलक्ष्मी एक आहे. तुम्ही म्हणालात की आपल्याला विजयलक्ष्मी ची गरज आहे. काहीही जिंकण्याची किंवा कशातही यशस्वी होण्याची ती उर्जा आहे. याबाबत कृपा करून अधिक विवरण कराल का?

श्री श्री : मला वाटते की मी आठ लक्ष्मींबद्दल बरेच बोललो. ज्ञानी लोक कशाचेही जास्त विवरण देत नाहीत.ते सार कळण्याकरिता केवळ काही खुण, संकेत देतात.

असे म्हणतात, 'अल्पाक्षरं असंधीग्धं सर-वत विश्वतो-मुखं.'

अल्पाक्षरं चा अर्थ आहे केवळ थोडे शब्द.

सूत्रे ही अशीच आहेत, त्यात सार आहे आणि ती बहुमितीय आहेत. त्यात अनेक मिती आहेत. आणि ज्ञानी लोकसुद्धा असाच संवाद साधतात,केवळ अल्प शब्दांनी.

जे कमी ज्ञानी आहेत तेच फक्त उगाचच मोठेच्या मोठे लांबलचक स्पष्टीकरण देतात.

तुम्ही वाचता त्या पुस्तकातदेखील हेच असते, पाना मागून पाने लांबण लावणे चालू असते. मी तुम्हाला सांगतो की त्यांना केवळ एकाच ओळ लिहायला पाहिजे. इतकेच बस्स आहे! 

सगळ्या प्राचीन ऋषींनी हेच तर सांगितले आहे.

'हेयं दुःखं अनागतं', एवढेच आणि संपले.

'तदा द्रस्तुः स्वरूपे वास्थानां', झाले!

प्रश्न : गुरुदेव, प्रेमावस्थेत असणे हे साक्षात्कारापेक्षाही महान आहे का?

श्री श्री : वरचे आणि खालचे हे सर्व आधीच विरून जाते.

वरची पातळी आणि खालची पातळी असे काही नसते, ती शिडी कधीच अदृश्य होऊन जाते. अशी कल्पना करा की तुम्ही अंतराळात, विश्वामध्ये आहात. तिथे वर कुठे आणि खाली कुठे? पूर्व कुठे आणि पश्चिम कुठे? तिथे काहीच नाही. काही वरचे आणि खालचे नाही.

प्रश्न : तुमच्याकडून इतक्या ज्ञानाची प्राप्ती करूनसुद्धा मी ते पूर्णपणे जगू शकत नाही?

श्री श्री : तुम्ही ते ज्ञान थोडेफार जरी जगलात तरीदेखील मी आनंदी होईन. इतके करणेसुद्धा बस्स आहे. तुम्ही इंच इंचांनी पुढे व्हाल.

प्रश्न : गुरुदेव, घरात पिंपळाचे (बोधी वृक्ष) असणे शुभ आहे का?

श्री श्री : होय,ते अतिशय चांगले आणि फारच शुभ आहे. तुमच्या घरासमोर बोधी वृक्ष असणे म्हणजे देव स्वतः तिथे उभा आहे असे झाले.

म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणाले, 'झाडांमध्ये, मी अश्वत्थ (पिंपळाचे झाड किंवा बोधी वृक्ष)आहे'.

बोधी वृक्ष इतका महत्वाचा आहे कारण तो दिवसाचे २४ तास केवळ प्राणवायूच देतो. म्हणून हे झाड घरासमोर असणे अतिशय चांगले आहे.

काही लोक असे आहेत जे म्हणतात की घरासमोर चिंचेचे झाड असणे चांगले नाही. त्यामुळे कोणत्याप्रकारच्या लहरी निर्माण होतात, मला ते माहित नाही परंतु असे म्हंटले जाते.

आता जर तुमच्या घरासमोर चिंचेचे झाड असेल तर मी तर म्हणेन की ते तोडायला जाऊ नका, फक्त त्याच्या आजूबाजूला दुसरी झाडे लावा.

प्रश्न : गुरुदेव, भावना कुठून उगम पावतात? त्या शरीर आहेत का मन?

श्री श्री : भावना मनात असतात, परंतु त्यांच्याशी सलग्न संप्रेरक (हार्मोन) किंवा संवेदना शरीरात असतात. म्हणून ते दोहोंचे मिश्रण आहे.

जेव्हा एड्रनलीन ग्रंथी वेगाने काम करीत असते तेव्हा तुम्ही भीती आणि चलबिचल अनुभवता. तशा भावना वेगाने वाढू लागतात.

तर वेगवेगळी संप्रेरके अथवा ग्रंथी आपल्या भावनांवर वेगळे परिणाम करतात. तर हे पण नाही आणि तेसुद्धा नाही,तर सगळे एकत्र.

प्रश्न : गुरुदेव, एका साधकासाठी चांगल्या संगतीचे काय महत्व आहे? आणि अशी चांगली संगत उपलब्ध नसेल तर एखाद्याने काय करावे?

श्री श्री : जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सामर्थ्यवान आहात आणि तुम्ही तुमचा प्रभाव तुमच्या संगतीवर पाडू शकता तर त्यांच्यात बदल घडवून आणा. त्यांना तुमच्यासारखे बनवा. परंतु तुमच्यात तेवढी ताकद नसेल तर मग वाईट संगतीपासून दूर राहा. ते करण्याकरिता तुम्ही मोकळे आहात.

पंचमुखी नागाचे महत्व

11
2012
Oct
बंगलोर, भारततुम्ही जर पौराणिक चित्रांकडे पाहिले, तर तुम्हाला लक्षात येईल कि भगवान महावीर हे पंचमुखी नागाच्या फण्याखाली बसलेले दिसतील, किंवा भगवान विष्णू ध्यान करायला बसलेले आहेत आणि त्यांच्या मागे नाग आहे. काही

ऋषींच्या चित्रांमध्ये सुद्धा तुम्हाला फणा काढलेले नाग दिसतील.

तुम्ही असे चित्रे पाहिले आहेत का?

हे खूप मार्मिक आहे.

पहा, तुम्ही ध्यान करायला बसल्यावर काय होते? तुमची चेतना जागृत होत असते, जणू तुमच्या मागे हजार उभा मुखाचा नाग आहे. नाग हे सतर्कतेचे चिन्ह आहे.

तुमच्या पैकी किती जणांना, ध्यान करत असताना, मस्तकाच्या मागील बाजूस सतर्कता जाणवते? एक प्रकारची सजगता!

म्हणून नाग हे एका आच्छादित नसलेल्या उर्जेचे चिन्ह आहे, एक अशी उर्जा कि जी सतर्कता परंतु विश्राम किंवा आराम स्थितीत असलेली.

त्यांच्यामागे खरोखरिचा नाग नसून, नाग हा पूर्ण आराम आणि जागृत राहणे याचे प्रतीक आहे ज्याला आपण ध्यान म्हणतो – पूर्ण आराम, इच्छाहीन, काहीही श्रम न करता, अभाव पूर्ण, जणू नागाच्या फण्यासारखे; श्रम न करता जागृत राहणे.

ह्याचे दोन प्रकाराने वर्णन केले गेले आहेत. एका प्रकारात ते नागा विषयी सांगतात आणि दुसऱ्या प्रकारात फुलांबद्दल. जणू हजारो पाकळ्यांचे कमळ मुकुट चक्रावर उमलत आहे. 

काहीजण त्याचे फुलांसारखे वर्णन करतात म्हणजे नाजुकता, तर काहीजण नागासारखे, म्हणजे सतर्कता. ते दोन्ही चपखल आहेत.

आता तुम्हाला जर तसे वाटत नसेल याचा अर्थ म्हणजे तुम्ही खूप अन्न ग्रहण केले आहे. तुम्हाला अशावेळी नाग दिसणारच नाही, तुम्हाला फक्त म्हैसच दिसेल, कारण तुम्ही खूप अन्न ग्रहण केल्याने तुम्हाला आळस आलेला आहे. त्यामुळेच ते जगभर सर्वजण उपवास आणि प्रार्थना; उपवास आणि ध्यान या बाबतीत बोलत असतात.

त्याचवेळी असे लक्षात ठेवा कि तुम्ही खूप उपवास पण चांगले नाहीत. काहीजण दिवसभर उपवास करतात आणि रात्री खूप अन्न ग्रहण करतात. जे चांगले नाही. उपवास करण्याचे काही नियम आहेत त्याचे आपण अनुसरण केले पाहिजे.

उपवास कसा करावा हे आपल्याला निसर्गोपचार तज्ञ आणि वैद्य चांगल्या पद्धतीने सांगू शकतील.

नवरात्रीत आपण उपवास करतो पण उपवासाच्या नावाखाली आपण मेजवानी खातो.

लोक म्हणतात. “ आम्ही कडधान्य खात नाही, फक्त बटाटा खातो. ”, आणि बाहेर जावून ते फ्रेंच फ्राईझ आणि बाकी सर्व खातात.

“तांदूळ खाणार नाही असे म्हणतात आणि ते इडली खातात”.

ही फसवणूक आहे. मी तुम्हाला सांगतो उपवास करणे म्हणजे पुरी हलवा खाणे नाही. ही उपवास करण्याची चुकीची पद्धत आहे. असा उपवास तुम्ही करू नका.

अल्पाहार मित आहार – सोप्या रीतीने पचेल असे थोडे अन्न खावे.

हा सुद्धा एक प्रकारचा उपवासच आहे. थोडे फळे आणि पाणी ग्रहण करणे.

ज्या वेळेस शरीर जड आणि आळशी नसेल त्यावेळेस ते बहरेल आणि तुम्ही ध्यान छान प्रकारे करू शकाल. जास्त उपवास केल्याने तुमचे पित्त वाढते आणि तुम्ही ध्यान करू शकत नाही. त्यामुळेच जास्त पाणी पिल्याने तुमचे पित्त वाढत नाही.

प्रश्न: गुरुदेव, भगवान विष्णू आणि भगवान शिव याच्यामध्ये काही फरक नसला तरी कुणापासून कुणाचा उगम झाला आहे? विष्णू पुराणात भगवान विष्णूचे उदात्तीकरण केले आहे आणि शिवा पुराणात भगवान शिव चे.

श्री श्री : कुणापासून कुणाचा उगम झाला असा विचार तुम्ही केला तर तो एकरेषीय ठरेल. सत्य हे एकरेषीय नसून गोलाकार आहे.

म्हणूनच आपण म्हणत असतो हे पण खरे आहे आणि ते पण खरे आहे. आपण कुठे हि पाहिले तर आपल्याला त्याचे उगम स्थान दिसेल.

तुम्ही या बाजूने पाहिले तर तुम्हाला सत्य दिसेल, तुम्ही कुठल्याही बाजूने पाहिले तरी तुम्हाला सत्यच दिसेल.

तुम्ही कुठून सुरुवात करता आणि कुठे जाता याच्यावर ते अवलंबून आहे.

भगवान शिव आणि भगवान विष्णू वेगळे आहेत, पण ते एकच आहेत.

प्रश्न: अष्टवक्र गीते मध्ये असे म्हटले आहे, “तुम्ही धर्म ग्रंथ वाचत रहा, पण तुम्हाला मुक्ती ही धर्मग्रंथ बाबतचे विचार सोडल्यावर मिळेल’. मग धर्मग्रंथ वाचून काय उपयोग?

श्री श्री : हे पहा, तुम्ही ज्या वेळेस एका बस मध्ये बसता काही काळाने तुम्हाला ती बस सोडावीच लागते. तुम्ही जर माझ्याबरोबर वाद सुरु केला कि, “ मला जर बस सोडायची असेल तर मी बस मध्ये कशाला बसू?” तुम्ही बस मध्ये एका ठिकाणाहून बसता आणि कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी उतरता.

जर तुम्हाला बस मधून उतरायचे असेल तर तुम्ही बस मध्ये चढता कशाला, ह्या वादाला काही अर्थ नाही.

धर्मग्रंथ तुम्हाला तुमच्या स्वभावाची ओळख करून देतात, या सृष्टीची ओळख करून देतात, तुमच्या मनाची ओळख करून देतात कि जे छोट्या छोट्या इच्छा मध्ये अडकलेले आहे आणि तुम्हाला जीवनाकडे बघण्याचा एक मोठा दृष्टीकोन देतात.

ज्ञान हे साबणा सारखे आहे. पहा, तुम्ही शरीराला साबण लावता पण काही वेळाने तुम्ही ते धुवून टाकता, हो कि नाही?!

त्याचप्रमाणे, ‘मला मुक्ती पाहिजे’ ही तुमची इच्छा असते आणि या इच्छेमुळे तुम्ही बाकीच्या छोट्या इच्छा पासून दुरावले जाता. जर तुम्ही त्याच इच्छेला धरून राहिलात तर कालांतराने ती पण एक मोठी समस्या होईल. तुम्ही त्याचा त्याग करून मुक्त झाले पाहिजे. 

‘मला मुक्ती पाहिजे, मला मुक्ती पाहिजे, मला मुक्ती पाहिजे’, असे म्हणत राहिल्याने मुक्ती मिळत नाही. तुम्ही जर छोट्या इच्छे पासून मुक्त असाल तर ती इच्छा आवश्यक आहे. मग एक असा क्षण येईल तुम्ही म्हणाल, ‘ मला जर मुक्ती मिळायची असेल तर ती मिळून जाईल’.

त्या क्षणी तुम्ही मुक्त असाल.

प्रश्न: गुरुदेव, महालय अमावस्येचे महत्व काय आहे?

श्री श्री : हि अमावस्या तसे पाहता मृत आत्म्यांसाठी राखीव आहे. तुमचा आत्मा ज्यावेळेस हे शरीर सोडतो त्यावेळेस काही देवदूत त्याला दुसऱ्या जगात जाण्याचा मार्ग दाखवितात. पुरुरावा, विश्वेदेवा हि त्यांची नावे. ते येतात आणि तुम्हाला एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर जाण्यास मदत करतात.

महालय अमावस्या म्हणजे सर्व मृत आत्म्यांना स्मरण करून त्यांचे आभार मानून, त्यांच्या आत्म्यांना शांती लाभो हि प्रार्थना करणे.

एक पूर्वीची प्रथा आहे ज्यामध्ये कुटुंबातील लोक तीळ आणि तांदूळ घेतात आणि आपल्या पूर्वजांना स्मरण करून ते म्हणतात, ‘ तुमच्या आत्म्याला शांती लाभो, तुमच्या आत्म्याला शांती लाभो, तुमच्या आत्म्याला शांती लाभो ‘. असे तीन वेळा म्हणून ते तीळ पाण्यात सोडतात.

या विधीचे महत्व म्हणजे कि आपण जणू काही पूर्वजांच्या आत्म्याला सांगतो कि – तुमच्या मनात अजूनहि काही इच्छा असतील तर त्या या तीळ सारख्या आहेत. त्या इच्छा महत्वाच्या नाहीत, तुम्ही त्या विसरून जा. तुमच्यासाठी आम्ही त्याची काळजी घेवू. तुम्ही आनंदी रहा, तृप्त व्हा! तुमच्या पुढे सर्व सृष्टी आहे. हि सृष्टी अनंत आहे, तुम्ही पुढे जात रहा; तुमच्या सर्व इच्छा विसरून जा.

यालाच तर्पण असे म्हणतात.

तर्पण म्हणजे पूर्वजांच्या आत्म्यांना कृतार्थता दर्शविणे आणि समाधान करणे. तुम्ही तृप्त रहा आणि पुढे जात रहा हे सांगण्यासाठी हे केले जाते.

पाणी हे प्रेमाचे प्रतिक आहे. पाणी देणे म्हणजे प्रेम देण्यासारखे आहे. 

संस्कृत मध्ये अप म्हणजे पाणी आणि प्रेम सुद्धा होतो. आपल्या प्रिय व्यक्तींना संस्कृत मध्ये आप्त असे संबोधले जाते.

म्हणून त्यांना स्मरून तुम्ही त्यांना पाणी देता जे प्रेमाचे आणि जीवनाचे प्रतिक आहे म्हणूनच त्याला महालय अमावस्या म्हटले जाते.

या दिवशी तुम्ही तुमच्या पूर्वजांचे स्मरण करा.

वेदिक परंपरेनुसार, मातापित्याचे तीन पिढ्यांपर्यंत स्मरण केले जाते आणि आपले सर्व आप्त मित्र, नातेवाईक आणि सर्व जे आपल्याला सोडून गेले आहेत. त्यांना स्मरण करून त्यांना विनंती केली जाते कि तुम्ही तृप्त आणि समाधानी रहा.

त्यांच्या स्मरणार्थ काहीजण अन्नदान करतात.

हे जगातील सर्व संस्कृती मध्ये केले जाते. मेक्सिको ची जनता हे मानते हे पाहून मला आश्चर्य वाटले. मेक्सिको मधील जनता प्रत्येक वर्षी २ नोव्हेंबर ला आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात.

त्याचप्रमाणे हे चीन मध्ये हि मानतात. चायनीज संस्कृती मध्ये एक दिवस असा असतो ज्या दिवशी ते आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना जे काही प्रिय आहे ते त्यांना अर्पण करतात.

सिंगापूर मध्येही हे मानले जाते. जरी सिंगापूर हे स्वच्छ शहर असले तरी वर्षातून एकदा काही तासांसाठी ते अस्वच्छ असते कारण तेथील जनता रस्त्यांवरच हे कार्य करतात. तुम्हाला माहीत आहे ते काय करतात? ते कार्ड बोर्ड चे मोठे घर आणि गाड्या बनवितात आणि ते रस्त्यांवरच जाळतात, ते सर्व पुर्वजांपर्यंत पोहचेल असे ते मानतात. ते खोटे मुद्रांक विकत घेतात आणि ते जाळतात, ते असे मानतात कि हे सर्व पुर्वजांपर्यंत पोहचले कि ते त्यांना आशिर्वाद देतात.

पिढ्यानपिढ्या जगात सर्वत्र हे मानत आले आहेत.

ख्रिस्ती धर्मात सुद्धा All Saints’ Day म्हणून एक दिवस असतो ज्या दिवशी सर्व आपल्या पुर्वजांचे स्मरण करतात. या दिवशी ते स्मशान भूमीत जावून प्रार्थना करतात.

या प्रार्थने मुळे आपल्याला सुद्धा कळते कि हे जीवन अस्थायी आहे, हे सर्व जण कितेक वर्षे इथे राहिले आहेत आणि आपल्याला सोडून गेले. आपण या जगात आलो आहोत आणि एक दिवस आपणही हे सर्व सोडून जाणार आहोत. म्हणून आपण त्यांचे स्मरण करून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना करतो. भारता मध्ये ह्या रुढीसाठीचे मंत्र संस्कृत मध्ये आहेत त्यामुळे आपल्याला ते कळत नाही. पंडित जे सांगतील ते आपण विश्वासाने करतो. हे चुकीचे नाही पण जर त्या विषयी ज्ञान असणे आवश्यक आहे.

प्रश्न: गुरुदेव, मातापिता किंवा पूर्वज यांच्या कर्माचा आपल्यावर काही प्रभाव होतो का? त्यांच्या वाईट कर्मामुळे आपल्याला शिक्षा होते का?

श्री श्री : ऐका, जर तुमचे पूर्वज तुमच्यासाठी घर ठेवून गेले असतील तर ते तुमच्या साठी वरदानच आहे नाही का? तुम्ही असे प्रश्न का विचारत आहात?

त्यांनी कष्ट करून पैसे मिळविले, त्यातून घर बांधले आणि तुमच्या साठी मागे ठेवून गेले. तुम्ही त्यांच्या चांगल्या कर्माचे उपभोग घेत आहात. हो कि नाही? आणि त्यांनी जर का तुमच्या डोक्यावर बँकेचे कर्ज ठेवून गेले असतील ज्याची तुम्हाला परत फेड करायची असेल तर ते तुमचे कर्म आहे. त्याचा साहजिकच तुमच्यावर परिणाम होईल. आई वडीलच नाही तर तुमच्या साथ संगतीचा पण तुमच्यावर परिणाम होतो.

तुमची संगत जर उदास व्यक्तींची असेल तर तुम्हाला पण उदास वाटेल. पण तुमची संगत जर आनंदी आणि अध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या व्यक्तींची असेल तर तुमचे कर्म सुधारेल.

या जगात चांगल्या किंवा वाईट कर्मापासून तुमची सुटका नाही. ते आपल्या बरोबर राहणार आहे, कारण एक वेळ अशी येईल कि आपल्याला आजारी व्यक्तींशी संपर्क साधावा लागेल. त्यावेळी तुम्ही असे म्हणू शकत नाही कि मला यांच्याशी बोलायचे नाही. जर असे सर्वानीच ठरविले तर सर्व रुग्ण आणि रुग्णालयाचे काय होईल?

या जगात आपण सर्वाशी चांगला व्यवहार केला पाहिजे त्यासाठी ज्ञान घेतले पाहिजे आणि सेवा केली पाहिजे. म्हणूनच ज्ञान आणि सेवा यांना कवच म्हटले आहे.

ओम नम: शिवाय हा मंत्र जप केल्याने आपल्या भोवती चिलखत असल्यासारखे वाटते, म्हणून या मंत्राला कवच असे म्हटले आहे. तो आपल्याला वाईट कर्मापासून वाचवितो,

पण हा मंत्र २४ तास जाप करण्याची गरज नाही. जर तसे तुम्ही केले तर तुम्हाला कंटाळा येईल. दिवसातील काही मिनिटे, जसे तुम्ही दात घासता.

तुम्ही तुमचे दात प्रत्येक तासाला घासत नाही, हो कि नाही? जर तसे कोणी करत असेल तर त्याचे दात राहणार नाही, सर्व दात पडून जातील. आणि जर का तुम्ही दात घासलेच नाही तरी देखील ते पडून जातील.

ज्या प्रमाणे आपण आपल्या दातांचे आरोग्य जपतो त्याचप्रमाणे आपण आपले मानसिक आरोग्य जपले पाहिजे. थोडा वेळ ध्यान, मंत्रोपचार याची खूप मदत होते.

आपण अंघोळ थोड्यावेळच करतो, हो कि नाही?

सर्वानी पाणी वाचविले पाहिजे. जगात सर्वत्र पाण्याची फार कमतरता आहे, बंगलोर मध्ये सुद्धा. सर्व तळे सुके पडले आहेत आणि या वर्षी पाणी कमी आहे. म्हणून आपण सर्वानी पाणी जपून वापरावे. जितके जरुरी आहे तेवढेच वापरा.