09
2013
Feb
बंगलोर, भारत

प्रश्न: गुरुदेव, आज मदिरापान हा आध्यात्मिक जीवनासाठी तसेच सुरक्षित समाजासाठी एक मोठा प्रश्न होऊन बसला आहे. परंतु मागील दोन दिवसांच्या व्यावसायिक संस्कृती आणि आध्यात्मिकता परिषदेत या विषयी कोणीच काही बोलले नाही. कृपया आम्हाला मार्गदर्शन करा.

श्री श्री : आम्ही लोकांना सांगतो कि आमच्यापाशी अधिक नशील्या गोष्टी आहेत जसे कि ध्यान, गायन आणि सेवा. हे जास्त नशीले असून तुम्हाला अधिक उंचीवर घेऊन जातात. लोकांना हा मद्याचा प्रकार माहित नाही असे दिसते.

लोकांची सेवा करण्यात आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू बघणे हा आनंद वेगळाच असतो याची लोकांना कल्पना नाही. ध्यानात आनंद असतो, खूप खोलवर शांती आणि खूप खोलवरची सुविधा या बाबतीत लोकांना काही कल्पना नसते. आपण लोकांना याची जाणीव करून द्यायची गरज आहे म्हणजे ते मदिरेच्या बाटल्या फेकून देतील.

प्रश्न: गुरुदेव, मुठभर ब्रिटिशांनी अध्यात्मात अग्रेसर असलेल्या भारतावर अनेक वर्ष राज्य कसे केले ? यातून काही शिकण्यासारखे आहे काय?

श्री श्री : बरे तर तुम्हाला त्याचे आश्चर्य वाटू शकते! भारताचे एक वैशिष्ट्य असे होते कि येथे लोकांमध्ये कधीच एकी नव्हती.

एकदा मी युरोपला गेलो असतांना तेथील एका पत्रकाराने असे विचारले कि” गुरुदेव, साधारणपणे असे दिसते कि इतर कोणापेक्षा भारतीय पत्रकार हे भारतावर सर्वाधिक टीका करीत असतात, हे कसे?”

मी त्यांना म्हणालो कि “ हि तर आमची खासियत आहे कि आम्ही नेहमी एकमेकांशी भांडत असतो.”

अनेक राज्यांमधील एकमेकांतील कलह आणि स्वार्थी राजे यांच्यामुळे हि आपत्ती ओढवली. पण एका अर्थी जे झाले ते बरे झाले कारण कि ब्रिटिशांनी भारतीय वसाहतींसाठी अनेक चांगल्या गोष्टी केल्या. तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या सकारात्मक बाजूकडे पहायला शिकले पाहिजे. अर्थातच भारतातील ब्रिटीश राज्यामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी होत्या पण तुम्ही त्यातील सकारात्मक गोष्टी पण पहा. नाहीतर आज आपण इंग्रजी बोलू शकलो नसतो आणि भारताने संगणक कधी बघितलाच नसता. मग आपली परिस्थिती चीन सारखी झाली असती. मग आपली प्रत्येकाची स्वतंत्र भाषा असती, ६०० बोली भाषा, २४ भाषा आणि मग भारताचे खरोखर विभाजन झाले असते.

कसेही असले तरी आज इंग्रजी हि एक सर्वसाधारण वापरातील भाषा झाली आहे आणि त्यामुळे आपण सर्व जगाशी संपर्क ठेवू शकतो. म्हणजे त्यात काही फायदे आहेत, काही चांगल्या गोष्टी आहेत.

साहजिकच काही वाईट गोष्टी पण आहेत. आज वापरात असलेले अनेक कायदे हे कालबाह्य झालेले आहेत. तुमच्या सारख्या तरुण लोकांनी पुढे येऊन हे सर्व कायदे बदलायला पाहिजेत.

काही महिलांनी पुढे येऊन त्या दृष्टीने पाऊले टाकून सर्व लगाम आपल्या हाती घेऊन काही कायदे बदलायला सुरवात केली आहे. मला खात्री आहे कि ते नक्की तसे होईल.

प्रश्न: गुरुदेव, एक गोष्ट माझ्या लक्षात येत आहे ती अशी कि आपल्या देशात जरी शिक्षित पदवीधर तयार होत आहेत तरी त्यांना उद्योग धंद्यात येताना प्रशिक्षण द्यावे लागते. तुमच्या विद्यापीठाच्या सहयोगाने आम्ही त्यांना आमच्या उद्योगासाठी आवश्यक असे प्रशिस्कन देऊ शकतो काय?

श्री श्री : नक्कीच आपण अशी कौशल्य केंद्र सुरु करू शकतो. तुम्ही कुलगुरू डॉ.मिश्रा (ओरिसातील श्री श्री विद्यापीठाचे) आणि इतर सदस्यांशी या विषयावर बोलू शकता, ते सर्व आज येथे उपस्थित आहेत. आपण नीट विचार करून विद्यार्थ्यांसाठी नवीन पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम तयार करू शकू.

पूर्वेकडचे आणि पश्चिमेकडील उत्तम असे मी विद्यार्थ्यांना देई इच्छितो.

आज सीमा रेषांना फारसे महत्व नाहीये, खरेतर सीमारेषा या नाहीशा झाल्या आहेत. आज आपण एका जागतिक समाजात राहत आहोत आणि येणारी पिढीसमोर अशा एकत्रित जगाची जागतिक दृष्टी असणे आवश्यक आहे.’माझा देश’ ‘आपला देश’ या संकल्पना आता विसरायला पाहिजेत. एकसंध जागतिक समाज ज्या मध्ये काहीच अंतर असणार नाही अशा दिशने आपण वाटचाल करीत आहोत.

 असे पहा कि काल येथे एक परिषद झाली, पण त्यात इंटरनेटचा वापर करून ९० देश सहभागी झाले होते. जगातील अनेक देशातील लोक ते वेबकास्टच्यामदतीने पहात होते. आपण ज्ञान आणि शहाणपणा याच्या एका नवीन युगाकडे वाटचाल करीत आहोत. म्हणून आपण आपले मन यासाठी तरी केले पाहिजे. आणि म्हणून मी पूर्व आणि पश्चिम यातील सर्वोत्तम हे विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो मग ते या जागतिक नागरिक होऊन ते राहत असलेल्या देशाची सेवा करतील.

प्रश्न: गुरुदेव, उत्कृष्टता न साधल्यामुळे मी नेहमी असमाधानी राहतो. उत्कृष्टता न साधता समाधानी राहता येते काय? ते कसे, याचे कृपया मार्गदर्शन करा.

श्री श्री : जर निराशा हि उत्कृष्टतेची जननी असती तर आज असे अनेक देश आहेत कि जे नैराश्याने ग्रासलेले आहेत आणि आपल्याला तेथे उत्कृष्टता दिसत नाही.

लोक असे म्हणतात कि ‘ समाधान तुम्हाला सुस्त आणि निष्क्रीय बनविते’.जर निराशेतून रचनात्मकता येत असेल तर लेबेनन, अफगाणिस्तान आणि त्यासारखे अनेक देश आज रचनात्मक कार्यात पुढे गेलेले दिसले असते. पण ते तसे नाहीये, होय कि नाही?

म्हणून समाधान हि एक गोष्ट आहे आणि रचनात्मकता हि दुसरी वेगळी गोष्ट बाब आहे. तुम्ही जेंव्हा अगदी शांत , बिलकुल निर्मल असता तेंव्हा आतमध्ये खोलवरून रचनात्मकतेचे अंकुर फुटायला सुरवात होते.

प्रश्न: गुरुदेव, फारसे कष्ट न करता मी खूपसारा पैसा कसा मिळवू शकतो? त्यासाठी काही मंत्र आहे काय?

श्री श्री : असेच तर घोटाळे सुरु होतात (हास्य).

तुम्ही या सर्व घोटाळ्याविषयी ऐकले असेलच, होय कि नाही? एका पाठोपाठ एक असे प्रत्येक महिन्यात ते बाहेर येत आहेत.

नाही, झटपट पैसे मिळवायच्या नादी लागू नका कारण मागते तसेच झटपट नाहीसे होतात.निरंतर अर्थव्यवस्था हि चांगली असते. तुमची नैतिक मूल्ये चागली असतील तर तुम्ही म्हणाल कि ‘ मी खूप पैसा मिळवणार आहे पण तो नैतिक मार्गाने आणि अनैतिक पणे काहीही मिळवणार नाही.

मागील शतकात लोक वाईट कर्मांपासून लांब राहायचे,कारण मग देव दुखी होईल. देवाची भीती किंवा वाईट कर्मांची भीती त्यांना अनैतिक कामांपासून दूर ठेवीत असे.

लोक असे म्हणायचे ‘ ते पाप आहे, मी ते पैसे घेणार नाही’. ते असे का म्हणायचे ते तुम्हाला माहित आहे? कारण लोकांचा असा दृढविश्वास होता कि वाईट मार्गाने मिळविलेला पैसा खर्च करून त्यांना आनंद मिळणार नाही. ते असे म्हणत कि ‘ त्यामुळे मी जास्ती दुर्दैवी होईन’. हा असा दृढ विश्वास त्यांना होता. खरे तर लोक असे म्हणायचे कि अनैतिक मार्गाने मिळविलेला पैसा हा इस्पितळे आणि कोर्ट यातच खर्च होतो.

अशी एक टोचणी कायम असायची, आज ती दिसत नाहीये.

ते म्हणतात कि ‘जेंव्हा आम्ही निगमित सामाजिक जबाबदारी चे काम करतो तेंव्हा आम्हाला त्याचा कितीतरी अधिक प्रमाणात परतावा मिळणार आहे.’

अशी निगमित सामाजिक जबाबदारी हि एक गुंतवणूक मानली जायची तर अनैतिक मार्गाने मिळविलेला पैसा हि एक शिक्षा मानली जायची. आज हि सर्व नैतिक मूल्ये हरवली आहेत म्हणून आपण त्यांच्याकडे पुन्हा एकदा बघायची गरज आहे.

प्रश्न: गुरुदेव, आज कोठल्याही क्षेत्रात मग ते निगमित असो किंवा सामाजिक असो, चांगले / वाईट समजणे खूप अवघड झाले आहे. आता निगमित सामाजिक जबाबदारी हि निगमित क्षेत्रात अनिवार्य केल्यामुळे काम करण्यासाठी चांगली बिगर सरकारी संस्था कशी ओळखावी?

श्री श्री : ती बिगर सरकारी संस्था पारदर्शी व्यवहार करतेय का आणि त्यांच्यात काही धार्मिक पूर्वग्रह आहेत काय हे बघणे महत्वाचे आहे.

काही लोक निगमित सामाजिक जबाबदारी म्हणून काम करीत असतात पण त्यांचे उदेश वेगळे असतात. ते लोकांना एका धर्मातून दुसऱ्या धर्मात परिवर्तीत करू इच्छितात , किंवा एका विचारसरणी मधून दुसऱ्या विचारसरणीत परिवर्तीत करू इच्छितात किंवा मग एक गठ्ठा मत विभागणीत बदल करू इच्छितात. खरेतर हे टाळले पाहिजे कारण हे काही परोपकार नव्हे तर परोपकाराच्या नावाखाली चालणारा धंदा होय. यासाठी लोकांचे इरादे चांगले असले पाहिजेत, त्यांचे मन स्वच्छ आणि शुद्ध असायला पाहिजे.

अशा अनेक बिगर सरकारी संस्था आहेत कि ज्याचे उद्धिष्ट हे लोकांना आनंदी करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणे हे आहे. त्यांचे इरादे चांगले आहेत काय, त्यांचे ताळेबंद बरोबर आहेत काय , पैसे खर्च करण्यात ते पारदर्शी आहेत काय आणि त्यांचे प्रशासनिक खर्च मर्यादित आहेत काय हे पण पहा. त्यांचे प्रशासनिक खर्च जास्त असता कामा नयेत. काही वेळ प्रशासनिक खर्च जास्त असल्याने लाभार्थींना फार कमी फायदा मिळतो.

बऱ्याच बिगर सरकारी संस्था सुमारे ४०% ते ५०% हे प्रशासकीय खर्च करतात. हे अपेक्षित नाही. प्रशासकीय खर्च ५% ते १०% पर्यंत मर्यादित ठेवायला पाहिजेत, फार फार तर १५%. हे सर्व बघा आणि कोण लोक त्या संस्थेत काम करीत आहेत ते बघा, त्यांची मदत घ्या.

प्रश्न: गुरुदेव, माझे वडील म्हणतात कि मी कधी तणावाखाली नसतो पण मी दुसऱ्यांसाठी तणावाची परिस्थिती निर्माण करतो. मला असे म्हणायचे आहे मी जर त्यांना तणाव देत असेल तर ते तो का घेतात? इतरांनी त्यांची तणावाची परिस्थिती त्यांच्या काबूत ठेवू नये काय?

श्री श्री : त्याकडे बघण्याचा तो एक दुसरा दृष्टीकोन पण आहे.

काही लोक म्हणतात कि ‘ मी येथे फक्त तुमचे धैर्य बघायला आलो आहे. देवाने मला सर्वांचे धैर्य बघायला पाठविले आहे.

एक जुनी म्हणा अशी आहे कि ‘ कोणी दुसरा तुम्हाला समस्या किंवा सुविधा देत नाही तर समस्या आणि सुविधा हे तुमच्या मनाचे खेळ आहेत’.

आपण कोठे सुविधापूर्ण राहायचे किंवा कोठे अभागी राहायचे हा सर्वस्वी आपला निर्णय आहे.

प्रश्न: गुरुदेव, अशी एक प्राचीन म्हण आहे कि ‘जेंव्हा तुम्ही गुरूच्या सानिध्यात येता तेंव्हा तुमच्यातील कौशल्ये वृद्धिंगत होतात. हे खरे आहे काय? कारण येथे आश्रमातील हत्तीला मी तोंडाने बाजा वाजविताना बघितले.

श्री श्री : होय, हे असे होताना दिसत आहे.

ज्यांना कधी संगीताचा गंध नव्हता ते गायला लागले आहेत. अनेकजण कविता करायला लागले आहेत. मला आजूबाजूला अनेक रचनात्मक गोष्टी नजरेस पडू लागल्या आहेत. असे वाटते कि ते ती प्राचीन म्हण खरी असल्याचे सिद्ध करीत आहेत!

असे पहा कि जेंव्हा तुमचे मन मूक आणि शांत असते, जेंव्हा तुम्ही ध्यान करता, जेंव्हा तुम्ही आतून आनंदी असता, तेंव्हा रचनात्मकता हि आपोआप फुलायला लागते. हे अगदी साहजिक आहे आणि ते जर तसे झाले नाही तरच नवल आहे.

प्रश्न: गुरुदेव, हल्ली सर्वजण द्वेषपूर्ण भाषण करतात त्यामुळे लोकांच्या मनात खळबळ निर्माण होते आणि मग त्यांना अटक होते. कोणताही राजकीय पुढारी प्रेमाने बोलत नाही. आम्ही काय करावे?

श्री श्री : आता, सर्व-प्रथम तुम्ही येथे सर्वजण असा जो शब्दप्रयोग केलात तो मागे घ्या.

सर्व जण असे करीत नाहीयेत. काही लोक असे करीत आहेत ते फार तर एक किंवा दोन असतील. ते असे करतात कारण असे केल्याने ते माध्यमांच्या दृष्टीला पडतात. त्यांची द्वेषपूर्ण भाषणे हि माध्यमे प्रदर्शित करतात. त्यांना माध्यमांच्या दृष्टीला पडायचे असते म्हणून ते असे करतात. आणि मग अटक झाल्यावर त्यांच्या समाजात त्यांना नायक म्हणून मान मिळतो. यात आपण काय करू शकतो? त्यांचा सकारात्मक प्रचार होत नाही म्हणून मग ते नकारात्मक प्रचार निवडतात. असा नकारात्मक प्रचार होण्यासाठी मग ते कोणाविरुद्ध गरळ ओकतात किंवा कोठेतरी द्वेषपूर्ण भाषणे करतात.

आश्चर्य असे वाटते कि अशा भाषणाला अनेक लोक टाळ्या वाजवितात कारण त्यांच्यासाठी ते फारच रोमांचकारी असते.

गोड बोलणे आणि चांगल्या प्रेम कथा लोकांना हितकारक वाटत नाही. ‘सर्व जण या आपण त्याला एक ठोसा मारु’ असे म्हटले कि लोकात जोश येतो.

याला जमावाचे मनोविज्ञान म्हणतात. जमावाला जगात नेहमी विघातक गोष्टीत जास्त रुची असते.जमाव कधीच विधायक गोष्टी करीत नाही तर तो नेहमी विघातक गोष्टी करताना दिसतो.

अर्थात काही वेळा विघातक गोष्टींची पण आवश्यकता असते जसे कि स्वातंत्राची चळवळ जी ब्रिटीश राजवटीविरुद्ध सुरु केली होती. तेंव्हा पण जमाव एकत्र आला होता पण शांततापूर्ण मार्गाने. आणि हे कसे झाले ? कारण त्यांचे पुढारी हे एक आध्यात्मिक पुरुष होते-महात्मा गांधी. ते पण आपल्याप्रमाणे सत्संग करीत असत. प्रत्येक दिवशी भजन, ध्यान आणि देशापुढील आणि जगासमोरील प्रश्नावर चर्चा होत असे.

त्यावेळच्या सत्ताधार्यांना खिळखिळे करण्यासाठीची ती एक रक्त-हीन, हिंसा-हीन चळवळ होती. जगाच्या इतिहासातील ती एक अद्वितीय अशी चळवळ होती जेथे कि जमाव एकत्र झाला तरी त्यांनी कोणाचे नुकसान केले नाही, कोणाला वेदना दिल्या नाहीत किंवा कोणाला पीडा दिली नाही.

असाच जमाव सध्या जगात एकत्र येताना दिसत आहे.अरब जगात काय होत आहे पाहिलेत? लोक एकमेकांचे प्राण घेत आहेत आणि सगळीकडे दुख व्यापून राहिले आहे.

मी एक वेगळेच स्वप्न बघत आहे. मला लोकांनी रचनात्मक कल्पना आणि योजना कार्यान्वित करण्यासाठी एकत्र यावे असे वाटते. अशाच एका क्रांतीचे बीज ३ फेब्रूवारीला दिल्ली येथे पेरण्यात आले तेंव्हा भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातील लोकांपेक्षा तिप्पट जास्त लोक जमले होते. त्या जमावाने काही विधायक करण्याची शपथ घेतली. चिंतीत सरकारने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आत येताना आणि बाहेर जाताना प्रत्येकाची तपासणी केली जात होती आणि या प्रक्रियेला खूप वेळ लागत होता. परंतु तेथे कोणतेही दोषारोप , कोणतेही द्वेषपूर्ण भाषणे नव्हती तर ते सर्वजण काहीतरी विधायक करण्यासाठी जमले होते. 

आपल्या तरुणामध्ये खूप उर्जा आहे फक्त तो योग्य दिशेला वळवली पाहिजे.

तुम्ही कल्पना करू शकता काय कि कोणतीही साधने नसताना दिल्लीमध्ये २ महिन्यात सुमारे १००० प्रकल्प पूर्ण करण्यात आले. आर्ट ऑफ लिविंगने दत्तक घेतलेल्या १७ झोपडपट्ट्यात छोटे सुमारे १००० प्रकल्प पूर्ण करण्यात आले. आता ते स्वयंसेवक १०० झोपडपट्ट्यात काम करू लागले आहेत.

भारतात सध्या घोटाळे आणि झोपडपट्ट्या यांचे पेव फुटले आहे आणि आपल्याला काहीतरी विधायक करण्यासाठी अशा उत्साही लोकांची गरज आहे.

कुमाद्वती नावाची एक नदी आहे जी आता पूर्णपणे सुकून गेली आहे. म्हणून मग आमच्या काही स्वयंसेवकांनी तिचे उगमापासून , ती ज्या १२ तेहसील मधून जाते त्या सर्वाचे पुनरज्जीवन करण्याचे योजिले आहे. हा एक चांगले उपक्रम असून त्यामुळे अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. जमिनीतील पाण्याचे स्तर खुप खाली जात आहे. काही वर्षांपूर्वी जे पाणी २० ते ३० फुटावर सापडायचे ते आता ६०० फुट खोल जाऊनसुद्धा मोठ्या मुश्किलीने सापडते! म्हणून हे स्वयंसेवक त्याचे आता पुनरज्जीवन करणार आहेत. ते आता पावसाच्या पाण्याचे साठवण करणार आहेत आनी नदीचे पुनरज्जीवन करण्यासाठी ते आवश्यक आहे. 

या कामासाठी काही कोटी रुपये खर्च झाले असते. पण लोक स्वतः पेट्रोल घालून, स्वतःच्या गाड्या घेऊन हे काम करीत आहेत. हा आनंद , हि सेवेची नशा काही औरच असते. 

त्याचप्रमाणे आमच्या दोन स्वयंसेवकांनी आज अशी घोषणा केली आहे ते एक नवीन प्रकल्प हाती घेत आहेत जेणेकरून सुमारे १००० शौचालये बांधली जातील.

प्रश्न: गुरुदेव, कृपया प्रश्न विचारण्याच्या कलेविषयी काही बोला कारण बऱ्याच वेळा मी मिळालेल्या उत्तराने समाधानी नसतो किंवा मी त्याने अधिक गोंधळून जातो.

श्री श्री : जेंव्हा मन बेचैन असते तेंव्हा काहीही उत्तर मिळाले तरी समाधान होत नाही. जेंव्हा मन शांत असते तेंव्हा उत्तरादाखल मिळालेली एखादे सूचक वाक्य पण पुरेसे असते कारण मग त्यावरून तुम्ही उत्तर काय असेल याचा अंदाज करू शकता कारण सर्व उत्तरे तुमच्या मनात असतात. जेंव्हा तुम्ही शांत असता तेंव्हा आपसूक ते उत्तर तुम्हाला सुचते. म्हणून काहीसा विश्राम आवश्यक असतो.

जेंव्हा तुम्ही एखाद्या बेचैन माणसाला काही जरी सांगितले तरी तो “पण” म्हणतो.तुम्ही जरी उत्तर दिले तरी तो म्हणेल कि “ ठीक आहे, पण.....” आणि मग ते विषय बदलत राहतील.

हि एका कल्पना आणि संकल्पाने मनाची खुण आहे जेंव्हा कोणताही नवीन विषयाला किंवा संकल्पनेला त्यात जागाच नसते.

एका गुरू शिष्यात अशीच एक गोष्ट घडली आहे.

एक शिष्य गुरुकडे आला आणि गुरूला काही प्रश्न विचारू लागला (तुमच्या आताच्या परिस्थिती सारखा). तो एका पाठोपाठ प्रश्न विचारीत होता पण गुरूच्या उत्तराने त्याचे समाधान होत नव्हते. म्हणून मग गुरू त्याला म्हणाले कि “चल, आपण चहा घेऊयात”

गुरूने त्याला विचारले कि “तुला चहा आवडतो का?

तो म्हणाला “होय”

मग गुरूने शिष्याच्या कपात चहा ओतायला सुरवात केली. कप भरला तरी ते चहा ओतत होते. कप भरून वाहताना तो चहा टेबल आणि जाजमावर सांडला.

त्या शिष्याने विचारले” गुरुजी तुम्ही हे काय करीत आहात? कप पूर्ण भरला आहे आणि चहा खाली जाजमावर सांडतोय!

यावर गुरू हसले आणि म्हणाले “ तुझी अगदी अशीच स्थिती झाली आहे. तुझा कप पूर्ण भरला आहे, त्यात आता बिलकुल जागा नाही तरीसुद्धा तुला अजून हवा आहे. पहिल्याने कपात आहे ते पिऊन तो रिकामा कर.”

पूर्वीच्या ऋषींनी वेदात हेच सांगितले आहे ‘श्रवण’, प्रथम ऐका आणि मग ‘मनन’ नंतर त्यावर विचार करा. उत्तर ऐकून ते समजावून घ्या आणि ते आत्मसात करा. त्याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या. कोणी काही सांगितले तर त्यावर तसाच विश्वास ठेऊ नका. हि एक मुलभूत गोष्ट सर्वांनी विचारात घ्यायला पाहिजे. माझा अनुभव हा माझा अनुभव आहे आणि तुमचा अनुभव हा तुमचा अनुभव आहे. एखादी गोष्ट मी सांगितली आहे म्हणून त्यावर चटकन विश्वास ठेऊ नका.त्याचप्रमाणे कोणी काही सांगितले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, तुम्ही एक चांगला श्रोता व्हा. प्रथम ऐका, नंतर त्यावर विचार करा. त्याचा अनुभव घ्या मगच ते आकलन होते. ज्ञान हे मग शहाणपण बनते.- श्रवण, मनन आणि निजध्यास.

अर्जुनाला ७०० श्लोकांची गीता सांगितल्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले’ हे बघ अर्जुना,मला सांगायचे ते मी सर्व सांगितले. त्यावर विचार कर आणि तुला जे योग्य वाटेल ते कर’.

वैचारिक स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य, श्रद्धा आणि विश्वासाचे स्वातंत्र्य याची गरज आहे. तुम्ही एखादी गोष्ट सर्वांवर लादू शकत नाही. विश्वास हा आतून तयार व्हायला लागतो.

प्रश्न: गुरुदेव, काम-वासना वाईट असते काय? आम्ही तिच्याकडे जितके दुर्लक्ष करतो तितकी ती अधिक दृढ होते.

श्री श्री : संयम! कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.

रिकाम्या वेळात काम-वासना जागृत होणे साहजिक आहे. जेंव्हा तुम्ही व्यस्त असता तेंव्हा ती तितकेसे डोके वर काढीत नाही. तुमची उर्जा तुम्ही रचनात्मक कामासाठी वापरता तेंव्हा तुम्ही जास्ती केंद्रित झाल्याचे जाणवेल.

प्रश्न: गुरुदेव, अध्यात्माच्या मार्गावर चालायला लागल्यापासून माझ्या कामात मी अक्षम होतो. या दोन्हीचे संतुलन कसे करावे?

श्री श्री : मग आध्यात्मिक मार्ग सोडा आणि कामाच्या ठिकाणी सक्षम व्हा.

जी गोष्ट तुम्हाला अक्षम बनवते ती कशाला करायची ? हा आध्यात्मिक मार्ग तुम्हाला सक्षम करण्यासाठी आहे. जर ती तुम्हाला अक्षम करीत असेल तर ती सोडून द्या. या आध्यात्मिक मार्गापासून दूर व्हा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करून बघा तुम्हाला ते जमतेय का. तुमच्या विश्रामाला किंवा ध्यानाला अक्षमतेचा शिक्का मारू नका. तुम्ही म्हणताय ते होणे शक्य नाही असे मला वाटत आहे पण तुम्ही तसा प्रयोग करायला हरकत नाही.