चमत्कार घडायला एक संधी द्या

25
2014
Oct
शिकागो, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका.
 

जीवनाचे तीन घटक आहेत.
१. प्रयत्न. स्व-प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय काहीही घडत नाही. 
   म्हणून तुम्ही तुमचे प्रयास हे करायलाच हवे. केवळ तुमच्या प्रयत्नांनी 
   सर्व काही घडून येईल का? नाही. 
   तुम्ही प्रयास केले आणि आज एक आंब्याचे कलम लावले आणि 
   तुम्हाला लगेच उद्या त्याचे फळ पाहिजे असेल तर ते कलम काही 
   तुम्हाला उद्या फळ देणार नाही. त्याला त्याचा समय लागणार आहे.
२. समय हा तो दुसरा घटक आहे. प्रत्येक गोष्टीकरिता योग्य वेळ यावी 
   लागते. त्याचप्रमाणे कृती करण्याचीसुद्धा एक योग्य वेळ असते. 
   समजा तुम्ही हिवाळ्यात आंब्याचे कलम लावले आणि नंतर तुम्ही 
   म्हणाल, “अरे, हे तर अंकुरितच झाले नाही”, जर ते हरितगृहात 
   असेल तर ठीक, नाहीतर त्याला आता अंकुर फुटणार नाही. कृती 
   करण्याची एक योग्य वेळ असणे आणि कृतीचे फळ चाखण्याचीसुद्धा 
   एक योग्य वेळ असते. म्हणून समय अथवा वेळ हा दुसरा घटक आहे.
३. सर्व शक्याशक्यतांमध्ये दैवी शक्ती किंवा अनुग्रह हा पुढचा घटक 
   आहे. तुम्ही सर्वप्रकारच्या शक्यतांसाठी जागा ठेवणे जरुरी आहे; 
   चमत्कार घडायला एक संधी द्या. तार्कीकदृष्ट्या एखादी गोष्ट 
   तुमच्या विचाराने अशक्य असेल, परंतु अनेकवेळा ते शक्य होते. 
   तुमच्यापैकी कितीजणांना हा अनुभव आला आहे? सर्व शक्याशक्यतांमध्ये 
   दैवी शक्ती किंवा अनुग्रह हे एक वरदान आहे.
चिकाटी, संयम आणि शक्यता अशा प्रकारे तुम्ही या तीन घटकांना 
एकत्रित करू शकता. हे तीन घटक आहेत. हे ज्ञान आहे.
मध्यरात्री तुम्ही असे म्हणू शकत नाही, “मी सर्व प्रयास केले, 
मी पडदा काढून टाकला तरीपण सूर्य काही येत नाहीये”. नाही. 
केवळ योग्य वेळेलाच सूर्य येईल. आणि जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा 
जर तुम्ही पडदे गच्च लावून सगळीकडून घट्ट बंद करून ठेवले तर 
तुम्हाला सूर्यप्रकाश मिळणार नाही. म्हणून तिन्ही घटकांचे जुळून 
येणे जरुरी आहे.
जसे मोबाईल फोन, त्याचे चार्जर, सिम कार्ड आणि सिग्नल या सर्व 
गोष्टी असणे जरुरी आहे. जर फोन चार्ज असेल परंतु त्यामध्ये सिम 
कार्ड नसेल किंवा रेंज नसेल तर तो फोन चालणार नाही. म्हणून हे 
तिन्ही पैलू एकत्रित असणे जरुरी आहे.
जर योग्य वेळी तुम्ही खूप प्रयास केले तर त्याचे फळ तुम्हाला मिळते. 
परंतु कित्येक वेळा असेसुद्धा घडते की तुम्ही अतिशय थोडे प्रयत्न करता 
पण तरीसुद्धा तुम्हाला भरपूर यश प्राप्त होते. यामागचे कारण आहे की 
अदृश्य संभावना तुमची मदत करीत असतात. उदाहरणार्थ : एखाद्याने 
काहीही मेहनत न करता लॉटरी जिंकणे.
जेव्हा वेळ आणि शक्यता एकत्र येतात तेव्हा त्याला नशीब म्हणतात. 
तुम्ही म्हणता, “मला माहित नाही हे सगळे कसे काय घडले!” योग्य 
वेळ आणि शक्यता यांचे एकत्रित येणे हे भक्तांच्या आयुष्यात जास्त 
वेळा घडते.
जेव्हा तुम्ही योग्य वेळी भरपूर मेहनत करता तेव्हा त्याचा फायदा 
तुम्हाला होतो. जेव्हा तुम्ही अतिशय स्व-कष्ट करता परंतु निसर्गाकडून 
अजिबात आधार मिळत नाही तेव्हा ते दुर्दैव किंवा कमनशिबी असते. 
जेव्हा एकदम कमी प्रयास असतात पण भरपूर दैवी आधार मिळतो तेव्हा 
ते सुदैव असते.
आत्ता इतक्यातच सूर्य ग्रहण समाप्त झाले. मंत्र घोष आणि ध्यान 
धरण्यासाठी ग्रहण हा फारच चांगला काळ आहे. जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि 
चंद्र एका रेषेत असतात तेव्हा त्याचा परिणाम मनावर होतो आणि असे 
म्हणतात की अशा वेळी मंत्र घोष केला तर ते अतिशय शक्तिशाली असते. 
असे पुरातन सुवचन आहे.
ग्रहणाच्या एक किंवा दोन तास आधी अन्न ग्रहण करणे बंद करा म्हणजे 
जे पोटात अन्न आहे त्याचे पचन चांगल्या प्रकारे होते आणि ग्रहणादरम्यान 
तुमचे पोट रिकामे असेल आणि रिकाम्या पोटी मंत्र घोष करण्याने सर्वाधिक 
फायदा होतो.
प्रश्न आणि उत्तरे
 
प्रश्न: एखादा संकल्प मोडला तर काय?
श्री श्री: हरकत नाही. शेतात तुम्ही इतक्या बिया पेरता. सगळ्याच 
अंकुरित होत नाहीत. काही अंकुरित होतात, काही होत नाहीत. जेव्हा 
तुम्ही एखादे कलम लावता तेव्हा प्रत्येक कलम रुजते असे नाही. काही 
रुजतात, काही रुजत नाहीत. झाडावरचे प्रत्येक फुलाचे फळ होत नाही. 
काही तर कच्चे असताना झाडावरून पडतात. म्हणून तुम्ही तुमच्याकडून 
मेहनत करा आणि मग सोडून द्या ( इथे समर्पण असा अर्थ अभिप्रेत 
आहे)
मेहनत न करता समर्पण करणे हा वेडेपणा आहे आणि तुमच्याकडून सर्व 
प्रकारे प्रयत्न करून झाल्यानंतर समर्पित न करणे हा सुद्धा वेडेपणा आहे. 

तुम्ही सर्व प्रकारे प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि सोडून द्या. प्रयत्नांची 
पराकाष्ठा न करता सोडून देणे हासुद्धा वेडेपणा आहे.
तुम्हाला काय मुक्त करते? मेहनत करणे आणि सोडून देणे हे तुम्हाला 
मुक्त करते.
जर तुम्ही अजिबात मेहनत न करता म्हणता, “मी सोडले” तर त्याने 
तुम्हाला मुक्ती प्राप्त होणार नाही.तुम्ही म्हणता, “ मी सोडले”, परंतु 
तुम्ही खरोखर सोडत नाही कारण कृती करण्याच्या इच्छेच्या त्या तुमच्या 
प्रवृत्तीमुळे. यामुळे मुक्त होण्यापासून तुम्ही मागे खेचल्या जाता. 
तुमच्याकडून प्रयास करा आणि सोडून द्या हे मुक्तीचे गुपित आहे.
काहीही प्रयास न करणे आणि सोडून देणे याने मुक्ती मिळत नाही. 
आणि संपूर्ण शक्ती खर्च करून तुमचे प्रयास करणे आणि सोडून न देणे 
यानेसुद्धा तुम्हाला मुक्ती मिळणार नाही.
Any action should only be done with awareness. An 
action from an unaware state has no meaning. Then 
it’s not called effort. कोणतीही कृती ही केवळ जागरूकतेने 
केली पाहिजे. अनभिज्ञ अवस्थेत केलेल्या कृतीला काहीही अर्थ नसतो. 
तेव्हा त्याला प्रयास म्हणता येत नाही. 

(श्रोत्यांपैकी एक सदस्याने एक प्रश्न विचारला आणि तो ऐकू येऊ 
शकला नाही.)
 
श्री श्री: वेळ येण्यासाठी वाट पहा.
निवड चांगले आणि वाईट यांच्यात नाही. जे काही तुम्ही निवडाल 
त्याच्याहून इतर नेहमी अधिक चांगले दिसेल. म्हणून पर्याय-रहित, 
उत्स्फूर्त राहा. काहीतरी मुद्दा उचलून धरा. आयुष्याची खेळी खेळा.
खूप जास्त पर्याय आणि त्यातून निवड करणे कठीण होते.