सर्वात मोठे सुख प्राप्त करणे

25
2014
Mar
व्हिईना, ऑस्ट्रिया
 

प्रश्न: गुरुजी, अध्यात्मिकता मिळविणे हे महत्वाचे आहे असे तुम्हाला का 
वाटते?

श्री श्री: कारण तुम्हाला बिनशर्त आनंदी, सुखी रहायचे आहे; तुम्हाला शांती 
हवी जी छोट्या गोष्टींमुळे दूर जाणार नाही. आणि हे नैसर्गिक आहे. ज्या 
प्रमाणे आपल्याला खोल आराम हवा असतो, कुणीतरी आपल्यावर प्रेम करावे, 
आपण सुखी समाधानी व्हावे असे वाटणे नैसर्गिक आहे त्याच प्रमाणे 
अध्यात्मिकता प्राप्त करणे असे वाटणे हे पण नैसर्गिक आहे. संस्कृत मध्ये 
अध्यात्मिकता ची व्याख्या अशी सांगता येईल, सर्व सुख प्राप्त करणे, 
निर्वाणा प्राप्त करणे. हे नैसर्गिक आहे. ज्या प्रमाणे पाणी उतारावर वाहते, 
अग्नी वरती जातो त्याच प्रमाणे मानवाला ब्रह्मज्ञान हवे असते. 
प्रश्न: अध्यात्मिक गुरु असायला पाहिजे याचा खरा अर्थ काय?

श्री श्री: अध्यात्मिक गुरु असणे म्हणजे स्वत: समाधानी होणे, 
आत्मविश्वासाने अज्ञात कडे जाणाऱ्या या मार्गावर आराम मिळावा म्हणून 
अध्यात्मिक गुरु हवा. एक अध्यात्मिक गुरु म्हणजे – माझी काळजी घेण्यास 
कोणीतरी आहे. मी जर भरकटलो तर मला सावरायला कोणी तरी आहे. 
प्रश्न: माहित नसलेल्या व्यक्तीशी प्रेम कसे करावे?

श्री श्री: नवजात बालक आपल्या आईच्या डोळ्यात पाहतो आणि तो 
आईवर प्रेम करू लागतो. त्या बालकाला आईबद्दल काही माहित नसते. त्याला 
आईचे नाव देखील माहित नसते, ती कुठल्या शाळेत गेली होती, तिने कुठले 
विषय शिकले आहेत, तिचे वय काय आहे त्याला काही माहित नसते. 
त्याला त्याची काही फिकीर नसते. त्याच प्रमाणे तुमच्या घरातील कुत्र्याच्या 
पिल्लाला तुम्ही कोण आहात हे माहित नसते. त्या पिल्लाला तुम्ही कोण 
आहात हे माहित असले असते तर कदाचित त्याने तुमच्यावर प्रेम केले 
नसते. (प्रेक्षकांमध्ये हशा)

म्हणून तुम्ही ज्याच्या वर प्रेम करता त्याची माहिती असणे आवश्यक नाही. 

प्रश्न: गुरुजी, मनावर ताबा मिळविण्यासाठी सर्वात उत्तम उपाय काय?

श्री श्री: तुम्हाला मनावर ताबा का मिळवायचा आहे? मन हे एकाच जागेवर 
रहावे असे तुम्हाला वाटते, बरोबर आहे. हेच तर म्हणजे मनावर ताबा मिळविणे.

ते इकडे तिकडे का धावत आहे? जर टेलिव्हिजन वर एखादा चांगला कार्यक्रम 
चालला असेल तर तुम्ही तुमच्या मनावर तुम्ही ताबा ठेवता का? तुम्ही तुमच्या 
मुलांवर प्रेम करता, तुमच्या पत्नी/पतीवर प्रेम करता त्या वेळेस तुम्ही तुमचे 
मन त्यांच्यावर केंद्रित करता का? नाही !

तुम्ही ज्या गोष्टीवर प्रेम करता त्यावेळेस तुमचे मन त्या गोष्टीवर केंद्रित 
असते.
तुम्हाला मन केव्हा केंद्रित करावे लागते? ज्यावेळेस एखादी गोष्ट आवडत 
नसेल. पण तिथेही मन केंद्रित करायची गरज नसते कारण ती गोष्ट मनाला 
आवडत नसते.
या क्षणी तुम्हाला कोणती गोष्ट हवी आहे, मन त्याच्या वर केंद्रित करावे 
लागते. अशा परिस्थितीमध्ये सुदर्शन क्रिया, योगा तुम्ही मदत करू शकेल.
प्रश्न: या जगात होणाऱ्या अन्याला कसे सामोरे जावे?

श्री श्री: तुम्ही जर सतत अन्यायाचा विचार करत राहिलात तर तुम्ही क्रोधीत 
होताल. आणि तुम्ही जेव्हा क्रोधीत होता त्यावेळेस तुम्ही निर्मळ विचार करू 
शकत नाही. आणि तुमचे विचार निर्मळ नसतील तेव्हा तुमचे कार्य पण 
बरोबर नसेल. ह्या मुळे असे वाटते कि जणू तुम्ही सुद्धा त्या अन्याय 
वाढवायला हातभार लावत आहात.

जेव्हा तुम्ही अन्याय पहाल तर तुम्ही तीन गोष्टी करू शकता,
- त्याच्याकडे थोडे हळूवारपणे पहा.
- या विश्वा मध्ये प्रत्येक क्षेत्रात चांगले व्यक्ती आहेत याच्यावर विश्वास 
  ठेवा. या जगात शंभर लोक 
  चांगले आहेत आणि फक्त ५ व्यक्ती वाईट आहेत. आज हे विश्व तुम्हाला 
  वाईट वाटते कारण त्या पाच वाईट व्यक्तींमुळे नाही तर त्या १०० व्यक्तींमुळे 
  जे निद्रावस्थेत आहेत. त्यांना जागे करा.
- एक वैश्विक उर्जा तुमच्यावर प्रेम करते हे जाणून घ्या. हि उर्जा तुम्ही काळजी 
  घेते हि श्रद्धा ठेवा. तुम्ही या ग्रहाची काही कायम संरक्षण करू शकणार नाही. 
  तुम्ही इथे फक्त ८०-१०० वर्षे आहात. पुढच्या २०० वर्षानंतर काय होईल 
  याच्यावर तुमचा काही अंकुश नाही, ना ज्या क्षणापासून हा ग्रह म्हणजेच 
  १९ अब्ज वर्षांपासून अस्तित्वात आहे त्यावेळेस सुद्धा तुमचा अंकुश नव्हता. 
  तुमचा या सृष्टीवर अंकुश नाही हे जाणून घ्या. तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे
  ‘या ग्रहाचे चांगले होवो’ हि प्रार्थना करू शकता. 

तुम्हाला माहीत आहे का, आपले शास्त्रज्ञ म्हणतात कि हि संपूर्ण सूर्यमाला 
काळ्या छिद्रांच्या मधून जात आहे. कोणत्याही क्षणी हे काळे छिद्र हि सूर्यमाला 
शोषून घेवू शकतात, आणि सर्व काही संपून जाईल.

फक्त पृथ्वीच नाही तर, सूर्य, चंद्र, बृहस्पती सर्व काही संपुष्टात येईल, 
होत्या च नव्हते होवून जाईल. म्हणून तुम्हाला जेव्हा काळजी वाटते किंवा 
अन्यायाचा राग येईल तेव्हा तुम्ही एका तारांगण पहायला जा! तोच शेवटचा 
पर्याय आहे.

त्या आधी, लोकांना जागे करा, त्यांच्या मध्ये जाणीव, कृतीवाद निर्माण करा.

प्रश्न: नकारात्मक कर्मांचा त्याग कसा करावा? ते अस्तित्वात कसे येतात?

श्री श्री: मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. आता जेव्हा इथे लाईट नव्हते, 
इथे अंधकार होता बरोबर आहे? पण जेव्हा इथे लाईट आल्यानंतर तो अंधकार
कुठे गेला? तो दुसऱ्या खोली मध्ये गेला का? का खिडकीतून तो पळून गेला. 
कळले?

त्याच प्रमाणे, जिथे नकारात्मक भावना आहेत तिथे अंधकार असतो, तिथे 
लाईट नाही. लाईट चालू करा आणि पहा तो अंधकार नाहीसा होतो.

नकारात्मक कर्मांचा त्याग कसा करावा? ध्यान, सेवा केल्याने आणि ज्ञानात 
राहून नकारात्मक कर्मांचा त्याग करता येतो. गरजूंची मदग करा. आणि जाणून 
घ्या कि नकारात्मक भावना तुम्हाला स्पर्श सुद्धा करू शकणार नाही. सावली 
सुद्धा तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही.
प्रश्न: माझ्या जीवनाचा मार्ग मला कसा मिळेल? तो मला मिळाला हे 
मला कधी कळेल?

श्री श्री: तुमच्या मनात संशय आहे, याचा अर्थ तुम्हाला तो मार्ग मिळाला 
आहे. याचे कारण म्हणजे आपण नेहमी चांगल्या गोष्टींवर संशय घेतो. 

कोणत्याही वाईट गोष्टींवर आपला संशय नसतो. एखाद्या व्यक्तीच्या 
प्रामाणिकपणावर आपण संशय घेतो, याउलट एखाद्या व्यक्तीच्या अप्रामाणिकते
वर आपण संशय घेत नाही.

जर आपल्या कोणी म्हटले कि, ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे’, 
तुम्ही म्हणाल, ‘खरचं?’तेच जर कुणी म्हटले कि, ‘मला तुझा तिरस्कार येतो’, 
तुम्ही त्यांना ‘खरचं?’ असे म्हणत नाही. तुमचा तुमच्या आनंदावर पण 
संशय असतो. जर कुणी तुम्हाला विचारले, ‘तुम्ही सुखी आहात काय?’, 
तुम्ही म्हणता, ‘मला त्याची खात्री नाही’. तुमच्या अप्रसन्नतेवर तुम्ही कधीही 
संशय घेत नाही !

प्रश्न: मला जास्त प्रेम मिळण्यासाठी माझ्या अंत:करणाला कसे अनावृत्त करू?

श्री श्री: अंत:करणाला अनावृत्त करण्याची गरज नाही. तुम्ही स्वत:वरच 
ह्र्दय शस्त्रक्रिया करू शकत नाही. ते काम तुम्ही माझ्यावर सोपवा.